ArchivesSolid Joys

21 जानेवारी : आनंदाचा नांगर

Alethia4India
Alethia4India
21 जानेवारी : आनंदाचा नांगर
Loading
/

माझ्यामुळें जेव्हां लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचें वाईट लबाडीनें बोलतील तेव्हां तुम्हीं धन्य.” (मत्तय 5:11)

थापि भुतें तुम्हांला वश होतात ह्याचा आनंद मानूं नका; तर तुमची नांवे स्वर्गांत लिहिलेलीं आहेत ह्याचा आनंद माना.” (लूक 10:20)

येशूनें या शास्त्रपाठांत एक असें रहस्य प्रकट केलें जें आपल्या आनंदाचे दुःखाच्या भीतीपासून आणि यशाच्या गर्वापासून संरक्षण करते. आणि तें रहस्य म्हणजे हें: स्वर्गांत तुमचें प्रतिफळ मोठें आहे. आणि त्या प्रतिफळाचें मूल्य म्हणजे येशू ख्रिस्ताच्या गौरवाचा पूर्णानंद घेणें (योहान 17:24).

जेव्हां येशू असें म्हणतो,

“माझ्यामुळें जेव्हां लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचें वाईट लबाडीनें बोलतील तेव्हां तुम्हीं धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गांत तुमचें प्रतिफळ मोठें आहे; कारण तुमच्यापूर्वीं जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनीं तसाच छळ केला” (मत्तय 5:11-12),

तेव्हां तो दुःखापासून  आपल्या आनंदाचें संरक्षण करतो.

स्वर्गांत असलेलें आपलें मोठें प्रतिफळ आपल्या आनंदाला मनुष्यांकडून होणारा छळ आणि निंदा यांपासून भयमुक्त करते.

जेव्हां तो असें म्हणतो,

थापि भुतें तुम्हांला वश होतात ह्याचा आनंद मानूं नका; तर तुमची नांवे स्वर्गांत लिहिलेलीं आहेत ह्याचा आनंद माना” (लूक 10:20),

तेव्हां तो यशाच्या  गर्वापासून सुद्धा आपल्या आनंदाचे संरक्षण करतो.

शिष्य आपला आनंद सेवेंत मिळालेल्या त्यांच्या यशांत शोधत होतें. “आपल्या नावानें भुतें देखील आम्हांला वश होतात!” (लूक 10:17). पण त्यामुळें त्यांचा खरा आनंद जो एकमेव अशा स्थिर व अढळ नांगराला बांधलेला आहे, त्यापासून तुटला असता.

म्हणून, येशू स्वर्गांत असलेल्या त्याहूनही मोठ्या प्रतिफळाचे अभिवचन देऊन यशाच्या गर्वापासून त्यांच्या आनंदाचे संरक्षण करतो. आनंद मानायचांच असेल तर ह्याचा माना: तुमची नांवे स्वर्गांत लिहिलेलीं आहेत. तुमचा वारसा आकलना पलीकडे, सार्वकालिक, स्थिर व अढळ आहे.

आपला आनंद सुरक्षित आहे. दु:ख  असो वा यश, यांपैकीं कांहीच त्यां नांगराला नष्ट करू शकत नाहीं. स्वर्गांत तुमचें प्रतिफळ मोठें आहे. तिथे तुमचे नांव लिहिलेलें आहे. ते एकदम सुरक्षित आहे.

येशूनें दु:ख भोगत असलेल्या आपल्या पवित्र प्रजेच्या आनंदाचा नांगर स्वर्गांत असलेल्या प्रतिफळाच्या समुद्रांत टाकला आहे. आणि तसेंच, यशस्वी पवित्र प्रजेच्या आनंदाचा नांगर देखील त्यानें तिथेंच टाकला आहे.

आणि अशा प्रकारे, त्यानें आपल्याला ऐहिक पीडा आणि ऐहिक सुख – ऐहिक दुःख आणि ऐहिक यश, यांच्या जुलूमशाहीपासून बंधमुक्त केलें.

20 जानेवारी : आठवण करून द्यावें असे युद्ध

Alethia4India
Alethia4India
20 जानेवारी : आठवण करून द्यावें असे युद्ध
Loading
/

हें मींनांत आणितों म्हणून मला आशा आहे. आम्हीं भस्म झालों नाहीं ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणें खंड पडत नाहीं.” (विलापगीत 3:21-22)

आशेचा एक मोठा शत्रू म्हणजे देवाच्या अभिवचनांचा विसर पडणें. आठवण करून देणें ही एक मोठ्या जबाबदारीची सेवा आहे. पेत्र व पौल हें दोघेंहि म्हणतात कीं त्यांनी त्यांची पत्रें आठवण करून देण्याच्या उद्देशानेंच लिहिलींत (2 पेत्र 1:13; रोमकरांस 15:15).

आपल्याला जें ठाऊक असणें आवश्यक आहे तें सर्वकांही आठवण करून द्यावायांस आपला प्रमुख कैवारी हा पवित्र आत्मा आहे (योहान 14:26). परंतु याचा अर्थ असा नाहीं कीं तुम्हीं निकामी बसून रहावें. तुमच्यावर केवळ तुम्हां स्वतःला आठवण करून  देण्याच्या सेवेची जबाबदारी आहे. आणि सर्वांत पहिली व्यक्ती जिला तुम्हीं आठवण करून देण्याची गरज आहे, ती तुम्हीं स्वतः आहां.

मनाचें सर्वांत मोठें सामर्थ्य हें आहे: ते आठवण करून देऊन स्वतःशी संवाद साधू शकते. जसं कीं शास्त्रपाठ सांगते, आपलं मन स्वतःहून गोष्टींना “मनांत आणूं” शकते: हें मींनांत आणितों म्हणून मला आशा आहे. आम्हीं भस्म झालों नाहीं ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणें खंड पडत नाहीं.” (विलाप 3:21-22).

देवानें स्वतःविषयीं आणि आपल्यांविषयीं जें कांही सांगितलें आहे तेंच जर आपण “मनात आणत नाहीं” तर आपण अशक्त किंवा क्षीण होऊं. अरे, मला इतक्या वेदनादायक अनुभवांतून गेल्यावर हें कसें समजलें! तुमच्या स्वतःच्या मनांत उद्भवणाऱ्या अधर्मी विचारांच्या चिखलांत लोळत बसूं नका, म्हणजे असे विचार: “हें तर माझ्यासाठीं अशक्य आहे. . .” “ती तें करणार नाहींच. . .” “तीं माणसें तें कधीच करूं शकणार नाहींत. . .” “यांत कधीच यश मिळालें नाहीं. . .”

यां सबबी खऱ्या कीं खोट्या, मुद्दा हा नाहीं. पण जोपर्यंत तुम्हीं यां गोष्टींपेक्षाहि मोठं असं कांहीतरी तुमच्या “मनांत आणित” नाहीं, तोपर्यंत तुमचं मन मात्र यां सबबी खऱ्याच आहेत हें दाखवीण्याचा नेहमीच कुठलातरी मार्ग शोधेल. देव हा सर्व गोष्टींना शक्य करणारा देव आहे. कठीण परिस्थितींतून पळ काढण्यापेक्षा देव अशक्य गोष्टी करतो याची स्वतःला आठवण करून देणें अधिक सार्थक ठरेल.

आपण जर स्वतःला देवाची महानता आणि कृपा आणि सामर्थ्य आणि शहाणपण याची आठवण करून देत नाहीं, तर मग आपण पिळून टाकणाऱ्या क्रूर निराशेंत बुडतो. “मी तर मूढ व अज्ञानी होतों; तुझ्यापुढें मी पशुवत होतों” (स्तोत्र 73:22).

स्तोत्र 77 मध्ये निराशेंकडून आशेकडे जें मोठें वळण येतें तें यां शब्दांमध्यें: “मी परमेशाचीं महात्कृत्यें वर्णीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचें स्मरण  करीन. मी तुझ्या सर्व कृत्यांचें मननहि  करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार  करीन” (स्तोत्र 77:11-12).

हें माझ्या जीवनांतील सर्वांत मोठें युद्ध आहे. आणि तुमचेंहि हेंच युद्ध असेल असें मी गृहीत धरतों. आठवण करून देण्याचें युद्ध! प्रथम स्वतःला. त्यानंतर दुसऱ्यांना.

19 जानेवारी: दुष्ट धन्याची सेवा कशी करावी

Alethia4India
Alethia4India
19 जानेवारी: दुष्ट धन्याची सेवा कशी करावी
Loading
/

ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असें मानून ती सद्भावानें करा; कारण तुम्हांला माहीत आहे कीं, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जें कांही चांगले करितो, तेंच तो प्रभूकडून भरून पावेल. (इफिस 6:7-8)

तुमच्या नोकरीशी संबंधित इफिसकरांस 6:7-8 मधील पुढील पाच गोष्टींचा विचार करा.

1) मुळांत प्रभु-केंद्रित जीवन जगण्यासाठीं पाचारण.

आपण सामन्यपणें ज्या पद्धतीनें जगतो ती लक्षांत घेतां आमच्या मूळ पाचारणाचा हा विषय थक्क करणारा आहे. पौल म्हणतो कीं आपण आपली सर्व चाकरी आपल्यावर लक्ष ठेवणाऱ्या कोणा मनुष्यासाठीं नव्हें, तर ख्रिस्ताची चाकरी करित आहों असें मानून ती करावीं : माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा.

याचा अर्थ असा कीं, आपण आपल्या नौकरीच्या ठिकाणी जें कांही काम करितो तें आपण आपल्या प्रभूचा विचार करूनच करणार. आपण स्वतःला प्रश्न विचारूं कीं, प्रभूला हे काम माझ्यांकडून का  करून घ्यावयाचे आहे? हे काम मीं कसें  करावें म्हणून प्रभूची इच्छा आहे? हे काम मीं केव्हां  पूर्ण करावें म्हणून प्रभूची इच्छा आहे? हे पूर्ण करण्यांस प्रभू मला सहाय्य पुरवेल का? यां कामामुळें  प्रभूचा कसा आदर होईल? दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ख्रिस्ती असणें म्हणजे आमचे जगणें व नौकरी/कामधंदा करणें ह्यांत पूर्णपणें प्रभु-केंद्रित असणें.

2) उत्तम व्यक्ती होण्यासाठीं पाचारण.

प्रभु-केंद्रित जगणें म्हणजे उत्तम व्यक्ती बनणें आणि ज्यां कांही गोष्टीं चांगल्या आहेत त्यांच करणें. पौल म्हणतो, प्रत्येक जण जें काही चांगले [चाकरी] रितो” तें “सद्भावानें करा. येशूनें म्हटलें कीं जेव्हां आपण आपला प्रकाश लोकांसमोर पडू देतो, लोक आपली “सत्कृत्यें” पाहून आपल्या स्वर्गातील पित्याचा गौरव करतील (मत्तय 5:16).

3) आपल्या देहदशेंतील पाषाणहृदयी धन्यांसाठीं चांगले काम करण्यांस बळ.

ख्रिस्ती दासांना आपल्या पाषाणहृदयी धन्यांसाठीं, प्रभु-केंद्रित राहूनच, चांगले काम करित राहावें यांसाठीं सबळ बनविणें हा पौलाचा हेतूं आहे. जेव्हां तुमचा बॉस  तुमच्याकडे सतत दुर्लक्ष करतो किंवा तुमच्या कामासंबंधाने तुमची टीका करित राहतो, त्यावेळीं सुद्धा तुम्हीं तुमचें काम उत्तमपणें कसे चालू ठेवतां? पौलाचे उत्तर आहे: तुमचा बॉस हांच तुमचा मुख्य धनी आहे असा विचार करणें थांबवा आणि यांपुढें ते काम प्रभूचे आहे असें मानून करा. हींच चित्तवृत्ती ठेऊन तुमच्या देहदशेंतील धन्यानें जें काम तुम्हांला सोपविलें आहे त्यांत आपलें कर्तव्य पूर्ण करा.

4) उत्तेजन कीं तुम्हीं केलेलें कोणतेहि चांगले काम वाया जात नाहीं.

या शास्त्र-पाठांत असलेलें सर्वांत अद्भुत शब्द कदाचित हें आहेत : “प्रत्येक जण…… जें कांही चांगले करितो, तेंच तो प्रभूकडून भरून पावेल.” ही बाब अद्भुत आहे. जें काही! “प्रत्येक जण.. जे कांही चांगलं करितो तेंच.” तुम्हीं केलेल्या प्रत्येक छोट्यां चांगल्या कामाकडे प्रभू लक्ष्य ठेवतो, आणि तें तो मूल्यवान समजतो, आणि त्याचे प्रतिफळ देतो.

आणि तुम्हीं त्याच्याकडून पूर्णपणे भरून पावाल. तुम्हीं कांहीतरी कमावलें आहे या अर्थाने नव्हें — जणू कांही तुम्हीं त्याला आपला ऋणी बनवू शकता. तो तुमचा आणि यां विश्वातील प्रत्येक गोष्टीचा धनी आहे. तो कोणत्याहि गोष्टीसाठीं आमचा ऋणी नाहीं. परंतु विश्वासानें केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी तो स्वेच्छेनें व कृपेनें आपल्याला प्रतिफळ देण्याचे ठरवितो.

5) प्रोत्साहन कीं पृथ्वीवरील क्षुल्लक काम सुद्धा स्वर्गातील महान प्रतिफळ मिळवून द्यावयांस अडथळा नाहीं.

तुम्हीं केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाचे प्रतिफळ प्रभू स्वतः देईल – “मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो.” तुमचा बॉस कदाचित असा विचार करील कीं तुम्हीं कोणीही नाहीं —नावाला, फक्त एक दास. किंवा तुम्हीं तिथें काम करित आहां हे सुद्धा त्याला कदाचित ठाऊक नसेल. पण त्यानें काही फरक पडत नाहीं. तुम्हीं तिथें काम करता हे प्रभूला ठाऊक आहे. आणि सरतेशेवटी, विश्वासूपणें केलेलीं कोणतीही चाकरी व्यर्थ जाणार नाहीं.

18 जानेवारी: गर्विष्ठपणावर उपाय

Alethia4India
Alethia4India
18 जानेवारी: गर्विष्ठपणावर उपाय
Loading
/

अहो! जे  तुम्हीं म्हणतां कीं, “आपण आज किंवा उद्यां अमुक एका शहरीं जाऊ, तेथें एक वर्ष घालवूं आणि व्यापारांत कमाई करू,” त्या तुम्हांला उद्याचें समजत नाहीं; तुमचें आयुष्य तें काय? तुम्हीं वाफ आहां, ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता, “प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू,” असे म्हणा. आता तुम्हीं गर्विष्ठ आहां म्हणून फुशारकी मारतां; अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे. (याकोब 4:1316)

याकोब गर्विष्ठपणा आणि फुशारकी मारणेंआणि ज्यां धूर्तपणाने तें आपली डोकें वर काढतात यांविषयी बोलत आहेत. “तुम्हीं गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता; अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे.”

जेव्हां तुम्हीं शहाणपण, शक्ती आणि धन-संपत्ती या तीन गोष्टींसंबंधाने आत्मनिर्भर बनता, तेव्हां त्यां मिळून गर्विष्ठपणाच्या अंतिम टप्याकडे घेऊन जाणाऱ्या एका शक्तिशाली प्रेरणेला जन्म देतात; म्हणजेच, नास्तिकता. आम्हांला स्वतःच्या बाबतींत असलेला मोठेपणा जर कायम ठेवायचा असेल तर त्याचा सर्वात सुरक्षित उपाय म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी वर आकाशांत मोठा आहे या गोष्टीला नाकारणे.

म्हणूनच गर्विष्ठ लोकांमध्यें इतरांना स्वतःपेक्षा कमी लेखून त्यांच्याकडे हीन भावनेनें पाहण्याची जन्मजात प्रवृत्ती असते. सी.एस. लुईस असें म्हणतात, “गर्विष्ठ माणूस नेहमी त्याच्या आजूबाजूच्या गोष्टींकडे आणि लोकांकडे खालच्या नजरेनें पाहतो: आणि, अर्थातच, ज्याअर्थी तुम्हीं इतरांना खालच्या नजरेनें पाहता त्याअर्थी तुम्हीं तुमच्यापेक्षाहि वर कोणीतरी आहे हे पाहूंच शकत नाहीं” (Mere Christianity).

परंतु गर्वाचे भरण-पुरण करण्यांसाठीं, ज्याच्याकडे वर दृष्टि करून पाहावें असा स्वर्गात कोणीहि नाहीं असें सरळ जग-जाहिर करणें अधिक सोपे असूं शकते. “दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही;” “देव नाही” असेच त्याचे सर्व विचार असतात” (स्तोत्र 10:4). शेवटी, देव नाहींच हे स्वतःला पटवून देणें गर्विष्ठांला अगत्याचे आहे.

याचे एक कारण असें, कीं देवाचें वास्तव जीवनाच्या एकएका आणि अगदी लहान-लहान घटनेंत अनिवारपणे उघड आहे जे नाकारले जाऊ शकत नाहीं. मनुष्याचा गर्विष्ठपणा इतका उंच आहे कीं देवानें हे विश्व चालवण्यांत इतक्या व्यक्तीगतपणे हस्तक्षेप करावा हे सुद्धा तो सहन करू शकत नाहीं, तर मग जीवनाच्या एकएका तपशीलवार आणि लहान-लहान गोष्टींचा तर विषयच नको.

गर्व देवाच्या सार्वभौमत्वाचा द्वेष करतो. म्हणून, गर्वाला देवाचे अस्तित्व आवडत नाहीं, कारण देव सार्वभौम आहे. आणि ही बाब तो “देव नाहीं” असें जाहिर करून व्यक्त करू शकते. किंवा ही बाब तो “मीं नाताळाच्या सुटीत गोव्याला जात आहे” असें जाहिर करून व्यक्त करू शकते.

याकोब म्हणतो, “इतकी खात्री बाळगू नका.” असे न म्हणता, “प्रभूची इच्छा असेल तरआम्हीं जगू आणि नाताळाच्या सुटीत गोव्याला जाऊ”, असें म्हणा.

याकोबाला असें म्हणायचे आहे कीं तुम्हीं गोव्याला जावें कीं नाहीं आणि तुम्हीं हा सुभक्तीपर बोध वाचून होईपर्यंत जगता कीं नाहीं हे देवच ठरवितो. गर्विष्ठपणानें भरलेल्यां आत्मनिर्भर लोकांसाठीं हे सत्य अत्यंत आक्षेपार्ह आहे — हा सुभक्तीपर बोध वाचून होईपर्यंत आपण जिवंत राहणार कीं नाहीं यावर सुद्धा आमचे कांहींच चालत नाहीं म्हणजे काय!

याकोब असें म्हणतो कीं तुमच्या भविष्यातील एक एक, व लहान-सहान अशा सर्व गोष्टींवर देवाच्या सार्वभौम अधिकारांवर विश्वास न ठेवणें म्हणजे गर्विष्ठपणा आहे.

या गर्वाशी लढण्याचा उपाय म्हणजे जीवनांत होणाऱ्या सर्व गोष्टींमध्यें देवाच्या सार्वभौमत्वाला मान्य करून आत्म-समर्पण करणें आणि आपले सहाय्य करण्यांत तोच आपले सामर्थ्य प्रकट करील (2 इतिहास 16:9), आम्हांला दररोज कल्याण व दया ही लाभूं देईल (स्तोत्र 23:6), त्याची आशा धरून राहणार्‍यांचे इष्ट करील (यशया 64:4), आणि आपल्याला त्याच्या गौरवासाठीं जगण्यांस आवश्यक असलेल्या प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करील  (इब्री 13:21) या त्याच्या कधीहि विफळ न होणाऱ्या अभिवचनांमध्यें विसावा घेणे.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, देवाच्या सार्वभौम भावी कृपेवर अढळ विश्वास हांच गर्विष्ठपणावर उपाय आहे.

17 जानेवारी : अस्सल विश्वास ख्रिस्ताच्या दुसर्‍यांदा प्रकट होण्याची उत्कंठेनें वाट पाहतो

Alethia4India
Alethia4India
17 जानेवारी : अस्सल विश्वास ख्रिस्ताच्या दुसर्‍यांदा प्रकट होण्याची उत्कंठेनें वाट पाहतो
Loading
/

त्याअर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांचीं पापें स्वतःवर घेण्यासाठीं’ एकदांच अर्पिला गेला, आणि जे त्याची (उत्कंठेनें) वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठीं तो दुसर्‍यांदा दिसेल. (इब्रीलोकांस 9:28)

तुमची पापें ख्रिस्ताच्या रक्तानें दूर केलीं गेलीं आहेत आणि तो दुसर्‍यांदा दिसेल तेव्हां तो तुम्हांला देवाच्या क्रोधापासून वाचवेल आणि तुम्हांला सार्वकालिक जीवन देईल याची तुम्हांला खात्री पटावी म्हणून तुम्हीं काय करावें? उत्तर असें आहे: ख्रिस्तावरील तुमचा विश्वास असा असूं द्या कीं ज्यामुळें तुम्हीं त्याच्या दुसर्‍यांदा प्रकट होण्याची आतुरतेनें वाट पाहाल.

वरील वचन असें सांगते कीं जे “त्याची उत्कंठेनें वाट पाहतात” त्यांच्या तारणासाठीं तो दुसऱ्यांदा येत आहे. मग तुम्हीं त्यासाठीं कशी तयारी करावीं? देवानें ख्रिस्तामध्यें तुम्हांला तुमच्या पापांची क्षमा केलीं आहे याची जाणीव तुम्हांला कशी होते? आणि त्याला भेटण्यासाठीं तुम्हीं कशी तयारी करता? त्याच्यावर अशा प्रकारे विश्वास ठेवून कीं ज्यामुळें तुम्हीं त्याच्या दुसर्‍यांदा प्रकट होण्याची आतुरतेनें वाट पाहाल.

ख्रिस्ताच्या दुसर्‍यांदा प्रकट होण्याची अशा आतुरतेनें भरलेलीं प्रतीक्षा म्हणजे या गोष्टीचें प्रमाण आहे कीं आपण त्याच्यावर प्रीति करतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो – त्याच्यावर खरा विश्वास, अस्सल विश्वास ठेवतो.

एक बनावटी विश्वास सुद्धा आहे, आणि हा असा विश्वास आहे जो फक्त नरकापासून सुटका करून घेण्याइतकाच मर्यादित असतो, परंतु ख्रिस्तासाठीं त्यांत कोणतीहि उत्कंठा नसतें. अशा प्रकारचा विश्वास तारत नाही. असा विश्वास ख्रिस्ताच्या दुसर्‍यांदा प्रकट होण्यासाठीं आतुरता निर्माण करत नाही. या उलट, असा विश्वास ठेवणारा मनुष्य ख्रिस्तानें दुसऱ्यांदा येण्यासाठीं शक्य तितका काळ उशीर करावा अशीच अपेक्षा करतो, जेणेंकरुन त्याला या जगाचा जास्तीत जास्त उपभोग घेता यांवा.

परंतु असा विश्वास जो ख्रिस्ताला आपला तारणारा व प्रभू आणि आपले धन आणि आपली आशा व आपला आनंद म्हणून दृढनिश्चयानें धरून ठेवतो तोच हा विश्वास आहे जो आपणांला ख्रिस्ताच्या दुसर्‍यांदा प्रकट होण्याची आतुरतेनें वाट पाहण्यांस भाग पाडतो. आणि हाच विश्वास आपणांला तारतो.

म्हणून, मीं तुम्हांला विनवितो कीं, या जगाकडे आणि तुमच्या पापांकडे आपली पाठ फिरवा. ख्रिस्ताकडे वळा. त्याचा स्वीकार करा, त्याचें स्वागत करा, ख्रिस्ताला केवळ तुमचा आरोग्य विमा म्हणून नव्हे तर तुमचे असें धन आणि मित्र आणि प्रभु म्हणून कवटाळा ज्याच्या प्रकट होण्याची तुम्हीं मोठ्या उत्कंठेनें वाट पाहत आहां.

16 जानेवारी : वायफळ शब्द

Alethia4India
Alethia4India
16 जानेवारी : वायफळ शब्द
Loading
/

“तुम्हीं शब्दाशब्दाला धरावयाला पाहतां काय? निराश मनुष्याचे उद्‍गार केवळ वायफळ आहेत? (ईयोब 6:26)

लोक दु:ख, वेदना आणि निराशेमध्यें असतांत, तेव्हां तें नको त्यां गोष्टीं  बोलतांत. ते उद्याची वाट न बघतां, आजंच परिस्थितीचे  अतिशयोक्तीनें वर्णन करतांत. तें खालच्या पट्टीवर गातांत आणि तेंच संगीत असल्यासारखें बोलतात. तें फक्त ढगांकडे बघतांत आणि अशा गोष्टीं बोलतांत कीं जणू आकाशाचे अस्तित्वच नाहीं.

तें कुरकुर करत म्हणतांत , “देव कुठे आहे?” किंवा: “आता पुढे जाण्यांत कांही अर्थ नाहीं.” किंवा: “सर्व गोष्टीं निरर्थक आहेत.” किंवा: “माझ्यासाठीं कोणतीही आशा नाहीं.” किंवा: “जर देव चांगला असता तर असलें कांही वाईट घडले नसतें.”

या अशा उद्‍गारांना आपण काय आणि कसें उत्तर द्यावें?

ईयोब म्हणतो कीं आपण त्यांना दोष देण्याची गरज नाहीं. त्यांचे असें उद्‍गार निव्वळ वारा आहे किंवा अक्षरशः “वायफळ” आहेत. तें लवकरच भुसासारखें वार्‍यानें उडविलें जातील. परिस्थितीं पालटून जाईल, आणि नैराश्यानें विव्हळ झालेलीं व्यक्ती अंधकाराच्या रात्रींतून जागे होईल आणि आपल्या अविचारी उद्‍गारांवर पश्चात्ताप करील.

म्हणून, मुख्य विषय असा आहे कीं, अशा शब्दांसाठीं मनुष्याला दोष देत बसून आपला वेळ आणि शक्ती खर्च करूं नये. ते वायफळ असल्यामुळें, वाऱ्यानें आपोंआपच उडून जातील. शरद ऋतूंत झाडाची पानें कापण्याची आपणांला गरज नाहीं. तें परिश्रम वायाफळ आहे. तें लवकरच स्वतःहून उडून जातील.

अरेरे, असें वायफळ शब्द ऐकतांच आपण लगेच किती आवेशानें देवाचा, तर कधी-कधी सत्याचा बचाव करण्यांसाठीं सरसावतो. जर आपल्यामध्यें समंजसपणा असतां तर आपण मूळ असलेलें शब्द आणि भुसासारखें वाऱ्यानें उडून जाणारे शब्द यांतील फरक ओळखू शकलो असतों, नाहीं का?.

खोटे शिक्षण आणि वाईट गोष्टींनी भरलेलें असें उद्‍गार आहेत ज्यांची मुळें खूप खोलवर गेलेली असतांत. परंतु सर्वंच उद्‍गार कांडवळलेल्यां मनांतून निघत नाहीत. कांही शब्द मुख्यतः वेदना आणि निराशेनें डागाळलेलें असतात. तुम्हीं जें ऐकतां तें नेहमींच अत्यंत आतल्या गाभाऱ्यांतून येत नसते. ते जिथून निघतांत तिथे खरेंच काहीतरी वास्तविक आणि काळोखमय आहे. परंतु ते तात्पुरते आहे, एखाद्या अशा संसर्गजन्य रोगासारखें —वास्तविक आणि वेदनादायक- ज्याची साथ कालांतराने नाहीशी होईल, परंतु वास्तविक असलेली ती व्यक्ती नाहीशी होणार नाहीं.

तर मग, जें उद्‍गार आपल्याविरुद्ध, देवाविरुद्ध, किंवा सत्याविरुद्ध बोललें जातांत तें केवळ वाऱ्यासारखे आहेत कीं काय हे आधी आपण समजून घ्यायला शिकूं या– म्हणजे तें अंत:करणातून नव्हें, तर वेदनेंतून बोलले जातात हे. जर तें वायफळ असतील तर आपण दोष न लावता तें उडून जाईपर्यंत शांत राहूं. भग्नावस्थेत असलेल्या जीवाला दोष लावणे नव्हें, तर पून्हा उभें करणें, हेंच ख्रिस्ती प्रीतिचे ध्येय आहे.

15 जानेवारी : कृपेची मुक्तता

Alethia4India
Alethia4India
15 जानेवारी : कृपेची मुक्तता
Loading
/

तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळें मृत झालेलें असतांहि त्यानें आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळें, ख्रिस्ताबरोबर आपणांला जिवंत केलें, (कृपेनें तुमचें तारण झालेलें आहे); आणि ख्रिस्त येशूच्या ठायीं त्याच्याच बरोबर उठविलें व त्याच्याचबरोबर स्वर्गांत बसविलें. (इफिसकरांस 2:4-6)

आम्हांला स्वत:कडे वळवितांना देवानें जीं प्रभावोत्पादक कृती केलीं तीं म्हणजे ही कीं “आपण आपल्या अपराधांमुळें मृत झालेलें असतांहि त्यानें……..ख्रिस्ताबरोबर आपणांला जिवंत केलें”. म्हणजे, आपण देवाकरिता मृत होतो. आम्हीं प्रतिक्रिया देण्यासंबंधानें निर्जीव होतो; आमच्यांत आध्यात्मिक गोष्टींसाठीं कोणतीहि आवड नव्हती वा रस नव्हता; ख्रिस्ताचे सौंदर्य दिसावें असें आमचे आध्यात्मिक डोळे नव्हतें. ज्यां गोष्टीं अंतिमरीत्या सर्वांत महत्त्वाच्या आहेत त्यांच सर्व गोष्टींसाठीं आम्हीं केवळ मृत असें होतो.

मग देवानें कृती केलीं – कोणतीहि अट न ठेवता – म्हणजे, त्याच्या उपस्थितींत जाण्यांस पात्रता कमविण्यासाठीं आपण कांहीतरी कृति करण्यांस समर्थ व्हावें त्यांपूर्वीच. त्यानें आपणांला जिवंत केलें. आपणांला ख्रिस्ताचे वैभव पाहता यावें म्हणून त्यानें सार्वभौमपणे आपणांला आध्यात्मिक मृत्यूच्या कबरेंतून उठविलें (2 करिंथकरांस 4:4). आध्यात्मिक गोष्टींसंबंधानें आमची मृत झालेलीं सर्व जाणीव, किंबहुना ज्ञानेंद्रियेंच त्या अद्भुत कृत्यामुळें जिवंत झालीं.   

इफिसकरांस 2:4 म्हणते कीं ही कृति “दयेचे” कार्य होते. म्हणजेच, देवानें आम्हांला आमच्या मृतावस्थेत पाहिलें आणि आम्हांवर दया केलीं. ज्यामुळें सार्वकालिक मरण येते व आमची दुर्दशा होते तें पापाचें भयंकर वेतन देवानें पाहिलें. “देव दयासंपन्न आहे म्हणून. . . आपणांला जिवंत केलें.” आणि त्याची दयासंपन्नता अगदी आमच्या गरजेच्या वेळीं आपणांवर विपुलतेने वाहत आली. पण या शास्त्रपाठांत एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ही कीं, “कृपेनें तुमचें तारण झालेलें आहे” ही गोष्ट जोडण्यासाठीं पौल स्वतःच्या वाक्यप्रवाहांत खंड आणतो, तें असें, “देव दयासंपन्न आहे म्हणून… त्यानें ….. ख्रिस्ताबरोबर आपणांला जिवंत केलें, –कृपेनें तुमचें तारण झालेलें आहे– आणि…त्याच्याच बरोबर उठविलें.”

पौल हींच गोष्ट 8 व्या वचनांत पुन्हा सांगणार होता. मग तो त्यांच गोष्टीला तेथें जोडण्यासाठीं स्वतःच्याच वाक्यप्रवाहांत खंड का आणतो? त्यांहीपेक्षा अधिक हे कीं, ह्या वचनांत देवाच्या दयासंपन्नतेंवर भर टाकण्यांत येत आहे जीं आपणांवर आपल्या मृतावस्थेच्या दयनीय अवस्थेत विपुलपणें झालीं; तर मग पौल कृपेनें तुमचें तारण झालेलें आहे असें सांगण्यांसाठीं विषयाच्या बाहेर का येतो?

माझ्या मतें त्याचें उत्तर हे आहे कीं पौलाला जाणीव होतें कीं येथे फुकटपणें झालेल्या कृपेवर भर देण्याची एक उत्तम संधी आहे. देवानें आम्हांला स्वत:कडे वळविलें त्यापूर्वीच्या आमच्या मृत स्थितीचे वर्णन करित असतांना, त्याच्या लक्षांत येते कीं मृत असलेलें लोक तारणाच्या अटी पूर्ण करू शकत नाहीत. जर त्यांचे तारण व्हावयाचे असेल तर त्यांना तारण्यासाठीं देवालांच कोणत्यांहि अटीशिवाय आणि पूर्णपणे फुकट अशी कृती करणें अगत्याचे आहे. ही स्वतंत्र कृति कृपेचे मर्म आहे.

एका व्यक्तीनें दुसर्‍या व्यक्तीला मेलेल्यांतून उठवावें यापेक्षा एकतर्फी फुकट आणि वाटाघाटीस अयोग्य अशी कृती कोणती असूं शकते! कृपेचा हांच अर्थ आहे.

14 जानेवारी : अंत:करणची खिडकी

Alethia4India
Alethia4India
14 जानेवारी : अंत:करणची खिडकी
Loading
/

तुमची मनें खचून तुम्हीं थकून जाऊं नये म्हणून ज्यानें आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयीं विचार करा. (इब्री 12:3)

मानव-अंत:करण हे पुष्कळ आकलनशक्तींनी भरलेलें आहे, त्यांपैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे त्यानें निवडलेल्या एखाद्या गोष्टीवर पूर्ण एकाग्रतेनें चिंतन करण्याची क्षमता. आपण क्षणभर थांबून आपल्या अंत:करणाला म्हणूं शकतो, “या गोष्टीचा विचार कर, त्या गोष्टीचा विचार करूं नको.” आपण आपले लक्ष एखाद्या विशिष्ट युक्तीवर किंवा चित्रावर किंवा एखाद्या विशिष्ट अडचणीवर किंवा आशेवर केंद्रित करूं शकतो.

ही एक अद्भुत शक्ती आहे. नि:संशय, ही शक्ती पशू-पक्षांत नसते. तें आत्म-चिंतक नसतात, तर तें आपल्या उत्तेजक शक्तीनें आणि आंतरिक सहज प्रवृतिनें चालतांत.

तुम्हीं पापाविरुद्ध करत असलेल्या तुमच्या संघर्षात देवाची जी शस्त्रसामग्री धारण केलेलीं आहें त्यांत समाविष्ट असलेल्या या महान शस्त्राकडे तुम्हीं दुर्लक्ष करत आहात का? आपण या उल्लेखनीय दानाचा उपयोग करावा म्हणून बायबल आपल्याला पुन्हा पुन्हा आव्हान करते. चला, आपण ह्या शस्त्राला म्यानेंतून बाहेर काढूं, आणि त्यांवर बसलेली धूळ झाडूं आणि त्याला उपयोगांत आणूं.

उदाहरणार्थ, पौल रोमकरांस 8:5-6 मध्यें असें म्हणतो, “कारण जें देहस्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात; आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. कारण देहस्वभावाचें चिंतन हें मरण; पण आत्म्याचें चिंतन हें जीवन व शांति आहे.”

ही गोष्ट थक्क करणारी आहे. तुम्हीं ज्यां गोष्टींकडे तुमचे चित्त लावता त्यांवरून हे ठरविलें जातें कीं तुम्हीं तुमचे चित्त जीवनाकडे लावत आहां कीं मरणाकडे.

आपण परिवर्तन, पूर्णत्व आणि शांतिच्या शोधांत असतांना आपल्यापैंकी बरेंच जण अति निष्क्रिय झालें आहेत. मला तर असें वाटते कीं आजच्या मानसोपचाराच्या युगात आपण फक्त “आमच्या अडचणीबद्दल बोलणें” किंवा “आपल्या समस्यांना सामोरे जाणें” किंवा “आपल्या मानसिक आजाराच्या मूळाचा छडा कौटुंबिक इतिहासांतच कुठेतरी लावणें” या निकामी मानसिकतेच्या आहारी गेलें आहोत.

परंतु परिवर्तनाच्या बाबतींत मला नवीन करारांत असा एक मार्ग दिसून येतो जो अधिक आक्रमक, अत्यंत सक्रिय असा आहे, म्हणजे, चित्त लावण्याच्या बाबतींत. आणि तो मार्ग म्हणजे, “वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावूं नका” (कलस्सैकरांस  3:2).

आपल्या भावना मोठ्या प्रमाणात आपण ज्या गोष्टींचा विचार करतो – म्हणजे आपण आपले मन सर्वाधिक ज्यां गोष्टींवर लावतो- त्याद्वारें नियंत्रित केल्यां जातांत. उदाहरणार्थ, येशूनें आम्हांला सांगितलें कीं एक विशिष्ट प्रकारचे चिंतन करून आपण काळजी व चिंतेच्या आपल्या भावनांवर विजय मिळवावा: “कावळ्यांचा विचार करा. . . . फुलें कशी वाढतांत ह्याचा विचार करा” (लूक 12:24, 27).

आमचे मन हें आमच्या अंत:करणाची खिडकी आहे. जर आपण आपले मन सतत अंधाराच्या गोष्टींवर लावले तर आमचे अंतःकरण सुद्धा अंधारमय होईल. परंतु जर आपण आपल्या मनाची खिडकी प्रकाशासाठी उघडली तर अंतःकरण सुद्धा प्रकाशमान होईल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चित्त केंद्रित करण्याची आणि विचार करण्याची आपल्या मनाची ही महान शक्ती यांसाठीं आहे कीं आपण येशूविषयीं विचार करावा (इब्री 12:3). तर मग, आपण हेंच करूं: “तुमची मनें खचून तुम्हीं थकून जाऊं नये म्हणून ज्यानें आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयीं विचार करा.”

13 जानेवारी : आज्ञा जी उत्पन्न करते

Alethia4India
Alethia4India
13 जानेवारी : आज्ञा जी उत्पन्न करते
Loading
/

कारण जें कांही उघड होतें तें प्रकाश आहे. म्हणून तो म्हणतो, “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.” (इफिसकरांस 5:1314)

येशूनें लाजराला मेलेल्यांतून ऊठ अशी आज्ञा दिलीं तेव्हां त्यानें ती आज्ञा कशी पाळलीं? योहान 11:43 असें म्हणते, “त्यानें [येशूनें] मोठ्यानें हाक मारून म्हटलें, “लाजरा, बाहेर ये.’” ही आज्ञा एका मेलेल्या मनुष्याला देण्यांत आली होतीं. पुढील वचन म्हणते, “तेव्हां जो मेलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेलें व तोंड रुमालानें वेष्टिलेलें होतें” (योहान 11:44).

लाजरानें ती आज्ञा कशीं पाळलीं? त्यां मेलेल्या मनुष्यानें ‘पुन्हा जिवंत हो’ ही आज्ञा कशी पाळली? या प्रश्नाचे उत्तर येणेप्रमाणें असूं शकते: त्या आज्ञेत नवीन जीवन उत्पन्न करण्याची शक्ती होती. ती आज्ञा पाळण्याचा अर्थ म्हणजे जें केवळ जिवंत लोक करूं शकतांत तें करणें असा होतो.

ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. देवानें दिलेलीं आज्ञा- “मेलेल्यांतून ऊठ!” ती पाळण्यासाठीं आपल्याला आवश्यक असलेलें सामर्थ्य तिच्यांत असतं. आपण स्वतः आधी ते जीवन उत्पन्न करून मग ती आज्ञा पाळतो असें ते नाही. जिवंत लोक जें कांही ऐकल्यानंतर करतात तसेंच आपणहि ऐकल्यानंतर सक्रिय होऊन ती आज्ञा पाळतो — लाजर बाहेर आला. तो उठला. तो चालत येशूकडे बाहेर आला. देवाची हाक जीवनाची उत्पत्ती करतें. तीं हाक जे तत्व उत्पन्न करतें त्यांच तत्वाच्या सामर्थ्यानें आम्हीं प्रतिसाद देतो.

इफिस 5:14 मध्ये, पौल म्हणतो, “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.” निद्रेंतून जागे होण्याची आज्ञा तुम्हीं कशी पाळता? जर तुमच्या घरात विषारी कार्बन मोनोऑक्साइड असेल आणि कोणीतरी बाहेरून ओरडून सांगत असेल, “ऊठ! आपला जीव वाचव! बाहेर ये!” तेव्हां तुम्हीं स्वतःलाच जागे करून आज्ञा पाळत नाहीं. जोरात हाक मारून दिलेलीं शक्तिशाली आज्ञाच तुम्हाला जागे करतें. धोक्याच्या वेळी जागृत असलेलें लोक जें करतात तेंच करून तुम्हीं आज्ञा पाळता. तुम्हीं उठून घरा बाहेर येता. ती हाकच तुम्हांला जागे करतें. तीं हाक जे तत्व -जागृतपणा- उत्पन्न करतें त्यांच तत्वाच्या सामर्थ्यानें तुम्हीं प्रतिसाद देता.

बायबल नव्यां जन्माविषयी विरोधाभासी वक्तव्य का करतें याचे हें स्पष्टीकरण देते असें मला वाटते; म्हणजे, आपल्याला आपल्या ठायीं नवे हृदय स्थापित करणें अगत्याचे आहे, परंतु तें नवें हृदय निर्माण करणारा तो देवच आहे. उदाहरणार्थ:

अनुवाद 10:16: “आपल्या अंतःकरणाची सुंता करा!”

अनुवाद 30:6: “परमेश्वर तुझ्या हृदयाची…….सुंता करील.”

यहेज्केल 18:31: “आपल्या ठायीं नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा!”

यहेज्केल 36:26: “मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायीं नवा आत्मा घालीन.”

योहान 3:7: “तुम्हांला नव्यानें जन्मलें पाहिजे.”

1 पेत्र 1:3: “त्यानें आपल्याला पुन्हा जन्म दिला.”

नव्यानें जन्मलें पाहिजे ह्या आज्ञेचें पालन करण्यासाठीं प्रथम जीवन आणि श्वास या दैवी देणगीचे कार्य आमच्यांत साधले जाणें अगत्याचें आहे, आणि त्यानंतरच आम्हीं तें करूं शकतो जें जिवंत आणि श्वास घेणारें लोक करूं शकतांत: देवावर विश्वास ठेवून कृतज्ञ अंत:करणानें आणि प्रीतिनें त्याचा धावा करणें. जेव्हां देवाची आज्ञा पवित्र आत्म्याच्या उत्पत्ती करणाऱ्या आणि बदल घडवून आणणाऱ्या सामर्थ्यासह येते, तेव्हां तीं आज्ञा जीवन देते. आणि आम्हीं विश्वास ठेवतो आणि आनंद करतो आणि आज्ञा पाळतो.

12 जानेवारी : अनुभवजन्य गुरुकिल्ली

Alethia4India
Alethia4India
12 जानेवारी : अनुभवजन्य गुरुकिल्ली
Loading
/

सर्व प्रकारची कृपा तुम्हांवर विपुल होऊं देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठीं कीं, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठीं सर्वकांही तुमच्याजवळ विपुल व्हावें. (2 करिंथकरांस 9:8)

आम्हांला ठाऊक आहे कीं देवाच्या भावी कृपेवर विश्वास हा औदार्यपणाची अनुभवजन्य गुरुकिल्ली आहे, कारण करिंथकरांसच्या दुसऱ्यां पत्रांत पौल हें अद्भुत अभिवचन आपल्या पुढें सादर करतो: “सर्व प्रकारची कृपा  तुम्हांवर विपुल होऊं देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठीं कीं, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठीं सर्वकांही तुमच्याजवळ विपुल व्हावें” (2 करिंथकरांस 9:8).

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, जर तुम्हांला तुमचें धन साठवून ठेवण्याच्या दडपणांतून मुक्त व्हायचे असेल, आणि जर तुम्हांला प्रत्येक चांगल्या कामासाठीं (कृपेच्या) विपुल पुरवठ्यानें भरून जायचे असेल, तर मग तुमचा विश्वास भावी कृपेवर असूं द्या. हांच उद्देश्य तुमच्याठायीं साधून देण्यांस देव भविष्यांतहि क्षणोक्षणी “सर्व प्रकारची कृपा तुम्हांवर विपुल होऊं देण्यास समर्थ आहे” या अभिवचनावर विश्वास ठेवा.

मीं नुकतेंच भावी कृपेवरील आमच्या ह्या विश्वासाला औदार्यपणाची अनुभवजन्य गुरुकिल्ली  म्हटलें, म्हणजे जेणेंकरून माझ्यानें एक ऐतिहासिक गुरुकिल्ली सुद्धा आहे ही वस्तुस्थिती नाकारलीं जाऊं नये. एक गुरुकिल्ली अनुभवाची आहे, तर एक दुसरी गुरुकिल्ली इतिहासाची आहे. जेव्हां पौल करिंथ येथील मंडळींतील लोकांना त्यांच्यांवर झालेल्या कृपेबद्दल सांगतो तेव्हां तो त्यांना कृपेच्या ऐतिहासिक गुरुकिल्लीची आठवण करून देतो, “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे; तो धनवान असतां तुम्हांकरितां दरिद्री झाला, अशा हेतूनें कीं, त्याच्या दारिद्र्यानें तुम्हीं धनवान व्हावें” (2 करिंथ 8:9).

गतकाळांत झालेल्या कृपेच्या ह्या कार्यावांचून, ख्रिस्ताला उंचवणाऱ्या औदार्यपणाची कपाटे बंदच राहतील. गतकाळांत झालेली हीच कृपा औदार्ययुक्त प्रेम फुलविणारी स्वाभाविक गुरुकिल्ली आहे.

परंतु या वचनांत वर्णिलेली गतकाळांतील कृपा कशी कार्य करते त्यांकडे लक्ष द्या. ती कृपा (ख्रिस्त दरिद्री झाला) भावी काळांतील कृपेचा (कीं आपण धनवान व्हावें) पाया बनली आहे. अशा प्रकारे, ज्याद्वारें आपण सढळ हातानें देणारें बनतों ती ऐतिहासिक  (कृपेची) गुरुकिल्ली ही भावी कृपेवरील आमच्या विश्वासाच्या अनुभवजन्य गुरुकिल्लीचा पाया आहे.

अशाप्रकारे, प्रेम आणि औदार्यपणाची अनुभवजन्य गुरुकिल्ली ही आहे: भावी काळांत होणाऱ्या कृपेवर तुमचा विश्वास दृढ असूं द्या- म्हणजे असा कीं, “सर्व प्रकारची (भावी) कृपा तुम्हांवर विपुल होऊं देण्यास देव (भविष्यांतहि) समर्थ आहे” –कीं जेणेंकरून तुमच्या गरजा पूर्ण व्हाव्यांत, आणि जेणेंकरून तुम्हीं औदार्ययुक्त प्रेमानें विपुल होण्यांस समर्थ व्हावें.

लोभापांसून पूर्ण स्वातंत्र्य देवाच्या भावी कृपेवर खोलवर समाधान देणाऱ्या विश्वासाद्वारेंच मिळतें.