सर्व प्रकारची कृपा तुम्हांवर विपुल होऊं देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठीं कीं, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठीं सर्वकांही तुमच्याजवळ विपुल व्हावें. (2 करिंथकरांस 9:8)
आम्हांला ठाऊक आहे कीं देवाच्या भावी कृपेवर विश्वास हा औदार्यपणाची अनुभवजन्य गुरुकिल्ली आहे, कारण करिंथकरांसच्या दुसऱ्यां पत्रांत पौल हें अद्भुत अभिवचन आपल्या पुढें सादर करतो: “सर्व प्रकारची कृपा तुम्हांवर विपुल होऊं देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठीं कीं, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठीं सर्वकांही तुमच्याजवळ विपुल व्हावें” (2 करिंथकरांस 9:8).
दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, जर तुम्हांला तुमचें धन साठवून ठेवण्याच्या दडपणांतून मुक्त व्हायचे असेल, आणि जर तुम्हांला प्रत्येक चांगल्या कामासाठीं (कृपेच्या) विपुल पुरवठ्यानें भरून जायचे असेल, तर मग तुमचा विश्वास भावी कृपेवर असूं द्या. हांच उद्देश्य तुमच्याठायीं साधून देण्यांस देव भविष्यांतहि क्षणोक्षणी “सर्व प्रकारची कृपा तुम्हांवर विपुल होऊं देण्यास समर्थ आहे” या अभिवचनावर विश्वास ठेवा.
मीं नुकतेंच भावी कृपेवरील आमच्या ह्या विश्वासाला औदार्यपणाची “अनुभवजन्य गुरुकिल्ली” म्हटलें, म्हणजे जेणेंकरून माझ्यानें एक ऐतिहासिक गुरुकिल्ली सुद्धा आहे ही वस्तुस्थिती नाकारलीं जाऊं नये. एक गुरुकिल्ली अनुभवाची आहे, तर एक दुसरी गुरुकिल्ली इतिहासाची आहे. जेव्हां पौल करिंथ येथील मंडळींतील लोकांना त्यांच्यांवर झालेल्या कृपेबद्दल सांगतो तेव्हां तो त्यांना कृपेच्या ऐतिहासिक गुरुकिल्लीची आठवण करून देतो, “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे; तो धनवान असतां तुम्हांकरितां दरिद्री झाला, अशा हेतूनें कीं, त्याच्या दारिद्र्यानें तुम्हीं धनवान व्हावें” (2 करिंथ 8:9).
गतकाळांत झालेल्या कृपेच्या ह्या कार्यावांचून, ख्रिस्ताला उंचवणाऱ्या औदार्यपणाची कपाटे बंदच राहतील. गतकाळांत झालेली हीच कृपा औदार्ययुक्त प्रेम फुलविणारी स्वाभाविक गुरुकिल्ली आहे.
परंतु या वचनांत वर्णिलेली गतकाळांतील कृपा कशी कार्य करते त्यांकडे लक्ष द्या. ती कृपा (ख्रिस्त दरिद्री झाला) भावी काळांतील कृपेचा (कीं आपण धनवान व्हावें) पाया बनली आहे. अशा प्रकारे, ज्याद्वारें आपण सढळ हातानें देणारें बनतों ती ऐतिहासिक (कृपेची) गुरुकिल्ली ही भावी कृपेवरील आमच्या विश्वासाच्या अनुभवजन्य गुरुकिल्लीचा पाया आहे.
अशाप्रकारे, प्रेम आणि औदार्यपणाची अनुभवजन्य गुरुकिल्ली ही आहे: भावी काळांत होणाऱ्या कृपेवर तुमचा विश्वास दृढ असूं द्या- म्हणजे असा कीं, “सर्व प्रकारची (भावी) कृपा तुम्हांवर विपुल होऊं देण्यास देव (भविष्यांतहि) समर्थ आहे” –कीं जेणेंकरून तुमच्या गरजा पूर्ण व्हाव्यांत, आणि जेणेंकरून तुम्हीं औदार्ययुक्त प्रेमानें विपुल होण्यांस समर्थ व्हावें.
लोभापांसून पूर्ण स्वातंत्र्य देवाच्या भावी कृपेवर खोलवर समाधान देणाऱ्या विश्वासाद्वारेंच मिळतें.