ArchivesSolid Joys

4 जानेवारी: अपूर्ण ख्रिस्ती लोकांसाठीं आशा

Alethia4India
Alethia4India
4 जानेवारी: अपूर्ण ख्रिस्ती लोकांसाठीं आशा
Loading
/

कारण पवित्र होणार्‍यांना त्यानें एकाच अर्पणानें सर्वकाळचें पूर्ण केलें आहें. (इब्री 10:14)

हा शास्त्रलेख आपल्यांसारख्या अपूर्ण पाप्यांसाठीं उत्तेजनानें भरलेला आहे, आणि त्यांत पवित्र जीवनासाठीं विपुल प्रेरणा आहे.

म्हणजेंच तुम्हीं तुमच्या स्वर्गीय पित्याच्या दृष्टीनें पूर्ण आणि सिद्ध आहांत अशी खात्री तुम्हीं बाळगू शकता, पण तुम्हीं स्वतःमध्यें पूर्ण आहांत असें नाही, तर नेमके ह्यामुळें कीं तुम्हीं आता पूर्ण नसता “पवित्र केले जात आहांत “, “पवित्र बनविलें जात आहांत” – म्हणजें असें कीं, देवाच्या अभिवचनांवर विश्वासाद्वारें, तुम्हीं तुमच्या हेलकावणाऱ्या अपूर्णतेपासून अंशा- अंशानें वाढत जाणाऱ्या पवित्रतेकडें वाटचाल करित आहांत. हाच इब्री 10:14 चा प्रमुख मुद्दा आहे.

तुमचा विश्वास तुमच्यांत पापाचा त्याग करण्याची आणि पवित्रतेत अंशा-अंशानें प्रगती करण्याची उत्कंठा निर्माण करतो का? हा असा विश्वास आहे कीं जो अपूर्णतेच्या ढगाळ स्थितिंतहि ख्रिस्ताकडे पाहून म्हणूं शकतो, “तूं तर मला तुझ्या दृष्टीनें पूर्वींच पूर्ण केलें आहेस.”

हा विश्वास म्हणतो, “ख्रिस्ता, आज मीं पाप केलें आहें. पण मला माझ्या पापाचा वीट आला आहे. कारण तूं नियमशास्त्रातील आचार माझ्या अंत:करणात लिहिलें आहेस, म्हणून तें पाळण्याची मला उत्कंठा लागली आहें. आणि जें काहीं तुझ्या दृष्टीनें मान्य व आवडणारे आहे तें तूं माझ्यामध्यें साधून देत आहेस (इब्री 13:21). आणि म्हणून, जीं पापें अद्यापहि माझ्या हांतून होतांत त्यां पापांचा मला वीट आला आहें; इतकेंच नव्हें, तर मला माझ्या मनांत उद्भवणाऱ्या पापी विचारांचा सुद्धा वीट आला आहें.”

हाच तो खऱा आणि अस्सल विश्वास आहे ज्याद्वारें आम्हीं तारले जातो. हाच तो विश्वास आहे जो पुढील वचनांचा गोड आस्वाद घेऊं शकतो : “कारण पवित्र होणार्‍यांना त्यानें एकाच अर्पणानें सर्वकाळचें पूर्ण केलें आहें.” हा बलवानांचा गर्विष्ठपणा नाहीं. ही त्यां दुर्बळ पाप्यांची ओरड आहे ज्यांना तारणकर्त्याची गरज आहे.

मीं तुम्हांला हाक मारतो, तुम्हांला विनंती करतो कीं, इतके दुर्बळ व्हां कीं ख्रिस्तावर तुमचा असा विश्वास शोभून दिसला पाहिजें.

3 जानेवारी: अति अल्प विश्वास

Alethia4India
Alethia4India
3 जानेवारी: अति अल्प विश्वास
Loading
/

ह्यावरून हें इच्छा बाळगणार्‍यावर नव्हे किंवा धावपळ करणार्‍यावर नव्हे, तर दया करणार्‍या देवावर अवलंबून आहे. (रोमकरांस 9:16)

वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच आपण हें स्पष्ट समजून घेऊया की येशूवर विश्वास ठेवणारें म्हणून या वर्षी देवाकडून आपल्याला जे काहीं मिळेल, तीं केवळ त्याची दया आहे. जे काही सुख किंवा जे काही दुःख आपल्या वाट्याला येतील तें सर्व दया करणार्‍या देवापासून असतील.

ख्रिस्त ह्याकरितां जगात आला: “असे की….परराष्ट्रीयांनीं त्याच्या दयेमुळें देवाचें गौरव करावें” (रोमकरांस 15:9). शिवाय, “त्यानें आपल्या महादयेनुसार आपल्याला पुन्हा जन्म दिला” (1 पेत्र 1:3). “आपल्यावर दया व्हावी” (इब्री 4:16) अशी आम्हीं रोज प्रार्थना करतो; आणि आता आपण “सार्वकालिक जीवनासाठीं आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट” पाहत आहों (यहूदा 1:21). जर कोणी ख्रिस्ती मनुष्य विश्वासू असल्याचें सिद्ध करतो, तर तो ते “विश्वासू होण्याची दया प्रभूद्वारें झाली आहे” म्हणून करतो (1 करिंथकर 7:25).

लूक 17:5-6 मध्ये, प्रेषित प्रभूला विनंती करतात, “आमचा विश्वास वाढवा!” तेव्हां येशू म्हणतो, “तुम्हांमध्यें मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल, तर ह्या तुतीला, ‘तू मुळांसकट उपटून समुद्रांत लाविली जा,’ असें तुम्हीं सांगताच ती तुमचें ऐकेल.” म्हणजें, आपल्या ख्रिस्ती जीवनांत आणि सेवेंत घडणाऱ्या गोष्टी ह्या आपल्या विश्वासाच्या बळकटीमुळें किंवा परिमाणामुळें होत नाहींत, कारण झाडे मुळांसकट उपटून टाकणे हे त्यामुळें होत नाहीं. ते देव करतो. म्हणून, सर्वात कमी विश्वास जों खऱ्या अर्थाने आम्हांला ख्रिस्ताशी जोडतो तो विश्वास त्याच्या सामर्थ्याद्वारें आपल्यासाठीं गरजेच्या असलेल्या सर्व गोष्टीं घडवून आणावयांस पुरेसा आहे.

पण ज्यां ज्यां प्रसंगी तुम्हीं यशस्वीपणें प्रभूची आज्ञा पाळता त्या त्या प्रसंगांचे काय? तुमचा आज्ञाधारकपणा तुम्हाला दयेसाठीं विनवणी करणाऱ्यांच्या श्रेणीतून बाहेर काढते का? लूक 17:7-10 च्या पुढील वचनांमध्ये येशू असें उत्तर देतो :

“तुम्हांपैकीं असा कोण आहे कीं, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरें राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘आतांच येऊन जेवावयाला बैस.’ उलट ‘माझें जेवण तयार कर, माझें खाणेंपिणें होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर, आणि मग तूं खा व पी,’ असें तो त्याला म्हणणार नाहीं काय? सांगितलेली कामें दासानें केलीं म्हणून तो त्याचे उपकार मानतो काय? त्याप्रमाणें तुम्हांला सांगितलेली सर्व कामें केल्यावर आम्हीं निरुपयोगी दास आहों, आम्हीं आमचे कर्तव्य केलें आहे, असें म्हणा.”

यांवरून मीं असे मानतो कीं, पूर्ण आज्ञाधारकपणा आणि सर्वात कमी विश्वास यां दोन्हीं गोष्टीं देवाकडून एकच गोष्ट प्राप्त करून घेतांत : ती म्हणजें कृपा. फक्त मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास जरी असेल, तर तो झाड हलविणारीकृपा प्राप्त करून देण्याइतपत हितकारक ठरतो. आणि निष्कपट आज्ञाधारकपणा आपल्याला पूर्णपणे दयेवर विसंबून ठेवतो.

शेवटी मुख्य मुद्दा हा आहे : देवाच्या दयेचे निमित्त किंवा स्वरूप काहीही असो, दयेचे अपात्र लाभार्थी म्हणून आपली जी लायकी आहे, त्यापलीकडें आपण कधींच जात नाहीं. जी गोष्ट प्राप्त होण्यांस आपली पात्रता नाही त्यां गोष्टींसाठीं आपण नेहमी पूर्णपणे विसंबून राहतो.

ह्यास्तव या, आपण स्वतःला नम्र करूं, आणि आनंद करूं आणि “त्याच्या दयेमुळें देवाचें गौरव करूं!”

2 जानेवारी: येशूनें मरणाचे काय केलें

Alethia4India
Alethia4India
2 जानेवारी: येशूनें मरणाचे काय केलें
Loading
/

ज्याअर्थी माणसांना एकदांच मरणें व त्यानंतर न्याय होणें नेमून ठेवलें आहे, त्याअर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापें स्वतःवर घेण्यासाठीं’ एकदांच अर्पिला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठीं तो दुसर्‍यांदा दिसेल. (इब्री 9:27-28).

येशूच्या मरणानें आमच्या पापांचा भार वाहून नेला. हा सिद्धांत ख्रिस्ती धर्माचे मर्म आहे, आणि सुवार्तेचा मुख्य विषय आहे आणि जगात देवानें मानवाच्या मुक्तीसाठीं केलेल्या महान कार्याचे मर्म आहे. ख्रिस्त मरण पावला तेव्हां त्यानें पापें स्वतःवर वाहून नेलीं. जीं पापें त्यानें वाहून नेलीं तीं त्याची स्वतःची पापें नव्हती. तर त्यानें इतरांनी केलेल्या पापांसाठी मरण सोसले, ह्यासाठीं कीं त्यांनी पापांपासून मुक्त व्हावें.

तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या अडचणीचे हेच समाधान आहे, मग तुम्हाला ती अडचण मोठी वाटत असों वा नसों. आपण पापी असतानांहि देवा बरोबर आपले नाते कसे पुनर्स्थापित होऊ शकतें या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि याचे उत्तर असें कीं ख्रिस्ताचा मृत्यू हा “पुष्कळांची पापें स्वतःवर घेण्यासाठीं” एकदांच केलेलें अर्पण आहे. त्यानें आमची पापें उचलून तीं वधस्तंभावर नेलीं आणि जे मरण आम्हीं मरावयास पात्र होतो त्या मरणानें तो तेथे मरण पावला. तर आता माझ्या मरणाशी ह्याचा काय संबंध आहे? “[माझ्यासाठी] एकदांच मरणें नेमून ठेवलें आहे.” म्हणजे आता माझे मरण हे माझ्यासाठीं पापदंडस्वरूपाचे नाही. यापुढे माझे मरण पापसंबंधात असलेला दंड नाही. माझे पाप वाहून दूर करण्यांत आलें आहे. ख्रिस्ताच्या मृत्यूनें माझी “पापे नाहीशी” करण्यात आलीं आहेत. ख्रिस्तानें ती शिक्षा स्वतःवर घेतली.

मग मीं अजूनहि शरीराने का मरतो? कारण देवाची अशी इच्छा आहे की पापाच्या भयंकर भयावहतेची कायमस्वरूपी साक्ष म्हणून मरण सांप्रतकाळी जगामध्येच कायम असावें, आणि ते त्याच्या स्वतःच्या लेकरांमध्येहि कायम असावें. जेव्हां आम्हीं मरतो तेव्हां त्या मरणाद्वारे आपण ह्या जगात पापाचें आजहि कायम असलेलें बाह्य परिणाम प्रकट करतो.

पण देवाच्या मुलांसाठी हे ऐहिक मरण आता त्यांच्यावर असलेला त्याचा कोप नाही. तें मरण आता आम्हांसाठीं दंडाज्ञा नाही, तर आमच्या तारणाचे प्रवेशद्वार बनलें आहे.

1 जानेवारी: नवीन वर्षासाठी कृपा

Alethia4India
Alethia4India
1 जानेवारी: नवीन वर्षासाठी कृपा
Loading
/

तरी जो कांही मी आहें तो देवाच्या कृपेनें आहें आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाहीं; परंतु ह्या सर्वांपेक्षां मीं अतिशय श्रम केले, ते मीं केले असें नाहीं, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेनें केले. (1 करिंथकरांस 15:10).

कृपा म्हणजे देवाचा केवळ स्वभावगुण नव्हे ज्याद्वारे तो आमची लायकी नसतांनाहि आमच्यासाठीं काहीतरी चांगले घडवून आणतो. तर ती देवा कडून असलेलें वास्तविक सामर्थ्य आहे जें सतत आमच्या ठायीं आणि आमच्यासाठीं कृति करते व आमच्या ठायीं आणि आमच्यासाठीं उत्तम अशा गोष्टी घडवून आणते.

पौलाला अतिशय श्रम करण्यासासाठीं चालना मिळावी म्हणून देवाची कृपा पौलाच्या ठायीं देवाची कृति साधून देत होती: “देवाच्या कृपेनें . . . ह्या सर्वांपेक्षां मीं अतिशय श्रम केले.” म्हणून जेव्हा पौल म्हणतों, “भीत व कांपत आपले तारण साधून घ्या,” तो पुढे असेहि म्हणतो, “कारण इच्छा करणें व कृति करणें हे तुमच्या ठायीं आपल्या सत्संकल्पासाठीं साधून देणारा तो देव आहे” (फिलिप्पै 2:12-13). कृपा ही देवापासून येणारे सामर्थ्य आहे जे आमच्या ठायीं आणि आमच्यासाठीं उत्तम अशा गोष्टी घडवून आणते.

आम्हांवर हीं कृपा गतकाळात झालीं आणि ती भावी काळातहि होणार आहे. ती वर्तमान समयाच्या अमर्याद झऱ्यावर सतत होणारा वर्षाव आहे, तो झरा तर भविष्यातून आमच्याकडे वाहत येणाऱ्या कृपेच्या अक्षय नदीतून वाहत आम्हांवर गतकाळात झालेल्या कृपेच्या सतत वाढत जाणाऱ्या जलाशयात भरती करतो.

पुढच्या पाच मिनिटांत, तुमच्या आत्म्याचे पोषण करणारी कृपा तुम्हांला प्राप्त होईल जी तुमच्याकडे भावीकाळातून वाहत येते, व तसेच तुम्हीं गतकाळाच्या कृपेच्या जलाशयात आणखी पाच मिनिटांची कृपा साठवून ठेवाल. गतकाळात तुम्हांवर झालेल्या कृपेला योग्य प्रतिसाद म्हणजे देवाचे आभार मानणे, आणि भविष्यात तुम्हांवर होणाऱ्या कृपेच्या अभिवचनाला योग्य प्रतिसाद म्हणजे विश्वासात स्थिर राहणे. गेल्या वर्षाच्या गतकाळातील आम्हांवर झालेल्या कृपेबद्दल आम्हीं देवाचे आभार मानतो, आणि ह्या नवीन वर्षासाठीं सुद्धा तो आम्हांला भविष्यातील कृपा पुरवेल असा आम्हीं विश्वास धरितो.