ArchivesSolid Joys

3 फेब्रुवारी : सर्वात मोठी प्रीति

Alethia4India
Alethia4India
3 फेब्रुवारी : सर्वात मोठी प्रीति
Loading
/

मुलांनो, मी तुम्हां लिहितो, कारण त्याच्या नावामुळें तुमच्या पापांची तुम्हां क्षमा झाली आहे. (1 योहान 2:12)

देव “त्याच्या नावामुळें” म्हणजे त्याच्या स्वतःच्या गौरवासाठीं आम्हांवर प्रेम करतो, आम्हांला क्षमा करतो आणि तारतो यावर भर देणे का महत्वाचे आहे? त्याची कारणे आहेत, त्यांपैकीं दोन येथें सांगितले आहें.

1) आपण यावर भर देणे कीं देव त्याच्या स्वतःच्या गौरवासाठीं प्रीति करतो आणि क्षमा करतो यामुळें महत्वाचे आहे कारण बायबल यावर भर देते.

मी आपल्याकरितां  तुझे अपराध पुसून टाकितो; मीच तो, तुझी पातकें स्मरत नाहीं (यशया 43:25)

हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठीं  माझ्या दुष्टाईची क्षमा कर; कारण ती फार झाली आहे. (स्तोत्र 25:11)

हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या महिम्यासाठीं आम्हांला साहाय्य कर; आपल्या नावासाठीं आम्हांला सोडव व आमची पातके धुऊन टाक! (स्तोत्र 79:9)

हे परमेश्वरा, आमचे अपराध जरी आमच्याविरुद्ध साक्ष देतात तरी तू आपल्या नामास्तव कार्य कर. (यिर्मया 14:7)

हे परमेश्वरा, आमची दुष्टता, आमच्या पूर्वजांचे दुष्कर्म, आम्हीं जाणतो; आम्हीं तुझ्याविरुद्ध पाप केले आहे. तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नकोस; तुझ्या वैभवाच्या गादीची अप्रतिष्ठा करू नकोस. (यिर्मया 14:20-21)

त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवानें त्याला [ख्रिस्ताला]  पुढे ठेवले. ह्यासाठीं कीं, पूर्वी झालेल्यां पापांची देवाच्या सहनशीलतेनें उपेक्षा झाल्यामुळे त्यानें आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे; म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे कीं, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणार्‍याला नीतिमान ठरवणारे असावे. (रोमकरांस 3:25-26)

त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झाली आहे. (1 योहान 2:12)

2) आपण यावर भर देणे कीं देव त्याच्या स्वतःच्या गौरवासाठीं प्रीति करतो आणि क्षमा करतो यामुळें महत्वाचे आहे कारण त्यामुळें हे स्पष्ट होते कीं  देव आपल्यावर मोठे प्रेम करतो.

हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे कीं, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथें माझ्याजवळ असावे; ह्यासाठीं कीं, जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा. (योहान 17:24)

देवाची आपल्यावरील प्रीति अशी प्रीति नाहीं कीं जी आपल्याला मोठे बनविते, तर ती अशी प्रीति आहे ज्याद्वारें तो स्वतःचा मोठेपणा दाखवून देतो. स्वर्ग हा आरशांचा प्रेक्षागृह नसून त्याच्या अविनाशी महानतेचा असा दृष्टीक्षेप असेल जिला तुम्हीं जितके अधिक दूरवर पाहाल तितकी दूरवर दिसून येईल. आपण अद्वितीय किंवा मोठे आहों या भावनेनें स्वर्गात जाणें निव्वळ फजिती ठरेल.

सर्वात मोठी प्रीति ह्या गोष्टीची खात्री करून घेते कीं देवच सर्व कांही अशा प्रकारे करतो कीं ज्यामुळें केवळ त्याच्या स्वतःच्या प्रभुत्वाचे सामर्थ्य व गौरवाची स्तुति होते, ह्यासाठीं कीं जेव्हां आपण स्वर्गात जाऊं तेव्हां आपला आनंद बहुगुणीत करणारी एक गोष्ट तेथें असेल: देवाचा गौरव. देवानें आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरिता समर्पण केलें ही त्याची सर्वांत मोठी प्रीति होय (रोमकरांस 8:32). जेव्हां तो म्हणतो कीं तो आपल्यावर प्रीति करितो व आपल्या नावासाठीं   आमच्या अपराधांची क्षमा करितो तेव्हां त्याला हेंच म्हणायचे आहे.

2 फेब्रुवारी: पापक्षेमेचें चक्र

Alethia4India
Alethia4India
2 फेब्रुवारी: पापक्षेमेचें चक्र
Loading
/

“आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हींहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो; आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस.” (लूक 11:4)

मुळांत कोण कोणाला आधी क्षमा करतो?

  • एकीकडे, येशू म्हणतो, “आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हींहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो.” (लूक 11:4)
  • तर दुसरीकडे, पौल म्हणतो, “प्रभूने तुम्हांला क्षमा केलीं तशी तुम्हींहि करा.” (कलस्सैकर 3:13)

जेव्हां येशू आम्हांला अशी प्रार्थना करण्यास शिकवतो कीं देवानें आम्हांला आमच्या पापांची क्षमा करावी “कारण आम्हींहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो,” तेव्हां त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा नाहीं कीं क्षमा करण्याचे पहिले पाऊल आम्हीं उचललें होतें. या उलट, अर्थ असा आहे: आम्हीं ख्रिस्तावर पहिल्यांदा विश्वास ठेवला त्यावेळीच देवानें आम्हांला क्षमा केलीं (प्रेषितांची कृत्ये 10:43). मग, या भग्न झालेल्यां, आनंदी, कृतज्ञ, आमचीहि क्षमा करण्यांत आली या आशादायक अनुभवातून, आपणहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो.

ही क्षमाशील भावना असें ठळकपणे प्रकट करते कीं आपल्याला क्षमा करण्यात आली आहे जिचे फळ तारण आहे. म्हणजे, जेव्हां आम्हीं एकमेकांना क्षमा करतो तेव्हां आपल्याठायीं विश्वास असल्याचे दिसून येते; आपण ख्रिस्ताबरोंबर एकरूप झालों आहों; आमच्याठायीं दया करणारा व आम्हांला दीन अंत:करण देणारा पवित्र आत्मा वसतो.

तरी आपण वेळोवेळी पाप करतो (1 योहान 1:8, 10). म्हणून आपण वेळोवेळी ख्रिस्तानें आमच्यासाठीं केलेल्यां प्रायश्चित्ताची नव्याने आठवण ठेऊन देवाकडे वळतो – म्हणजे पुन्हा एकदा पापांची क्षमा मागतो. जर आम्हांमध्यें एकमेकांना क्षमा करणारा आत्मा वस्ती करित नसेल तर आपणहि त्याच्याकडे क्षमायाचनेची मजल मारूं शकत नाही. (मत्तय18:23-35 मधील कृतघ्न (क्षमा न करणाऱ्या) चाकराचा दाखला लक्षात ठेवा. त्याला आपले एक कोटी रुपयाचे देणें माफ केलें गेलें, तरी देखील त्यानें मात्र आपल्या  सोबतीच्या दासाला पंचवीस रुपयाचे येणें माफ करण्यांस नकार दिला. त्यानें आपल्या कृतघ्न आत्म्याद्वारें दाखवून दिलें कीं राजानें त्याच्यावर केलेल्या दयेचा त्याच्यावर कांहीहि प्रभाव पडला नव्हता.)

या मूर्खपणापासून आम्हांला वाचविण्यासाठीं येशूनें आम्हांला अशी प्रार्थना करण्यास शिकविलें कीं, “आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हींहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो” (लूक 11:4). म्हणून येशू म्हणतो कीं आम्हीं यासाठीं क्षमा मागतो कारण आम्हींहि क्षमाशील आहों. हे जणूं असे म्हणणें आहे कीं, ” हे पित्या, ख्रिस्तानें जी दया माझ्यासाठीं विकत घेतलीं आहे ती माझ्यावर कायमस्वरूपी असूं दें, कारण या दयेमुळेंच मला माझे अपराध क्षमा केलें गेलें आहेंत, आणि मी सूड घेणे सोडले आहे, आणि जशी तू माझ्यावर दया केलीं आहेस तशी मीहि इतरांना दया करीन.”

देव करो कीं, देवाची क्षमा काय आहे हें तुम्हीं आज पुन्हा नव्याने जाणून घ्यावें आणि देव करो कीं तुम्हीं एकमेकांना क्षमा करून तुमच्या अंत:करणांत असलेली दया ओसंडून वाहावी. आणि तुमच्या जीवनातील कृपेचा तो गोड अनुभव तुम्हाला तुमच्या तारणाची आणखी खात्री देवो, म्हणजे असें कीं जेव्हां तुम्हीं रक्तानें विकत घेतलेल्या क्षमेचा नव्याने अनुभव घेण्यासाठीं देवाकडे जाल, तेव्हां तुम्हीं जाणून घ्यावें कीं तो तुम्हांकडे स्वतःची एक अशी संतती म्हणून पाहतो जिच्या पापांची क्षमा झाली आहे व जी स्वतःहि इतरांना त्यांचे अपराध क्षमा करते.

1 फेब्रुवारी : करारांत सामावून घेतलेलें

Alethia4India
Alethia4India
1 फेब्रुवारी : करारांत सामावून घेतलेलें
Loading
/

तेथें दाविदाच्या शृंगास अंकुर फुटेल असे मी करीन; मी आपल्या अभिषिक्तासाठीं दीप मांडला आहे. मी त्याच्या वैर्‍यांस लज्जेने वेष्टित करीन; पण त्याच्या शिरीं त्याचा मुकुट झळकेल.” (स्तोत्र 132:17-18)

देवानें दाविदाला दिलेल्या अभिवचनांचा लाभ कोणाला होईल?

आपण स्तोत्र 132:17-18 पुन्हा वाचूं: “तेथें दाविदाच्या शृंगास अंकुर फुटेल असे मी करीन; मी आपल्या अभिषिक्तासाठीं दीप मांडला आहे. मी त्याच्या वैर्‍यांस लज्जेने वेष्टित करीन; पण त्याच्या शिरीं त्याचा मुकुट झळकेल.”

आता त्याची यशया 55:1,3 बरोंबर सांगड घाला, “अहो तान्हेल्यांनो, तुम्हीं सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्हीं या; सौदा करा, खा! . . . आणि मी तुम्हांबरोबर सर्वकाळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हांला देईन.”

वधस्तंभाच्या या बाजूने, म्हणजे ख्रिस्ताचे मरण, पुरले जाणें, व पुनरुत्थानाच्या घटनांनंतर, मी त्या वचनाचा अर्थ असा घेईन: जो कोणी देवाकडे पुत्राच्या म्हणजे येशू ख्रिस्ता द्वारे येतो, आणि आपण कोण आहोत किंवा आपण काय करतो यावर विसंबून न राहता, ख्रिस्तामध्ये देवा बरोबर आपले जे नाते जुळले आहे ती तहान भागविण्यासाठीं येतो, देव त्याच्याशी एक करार करील.

प्रकटीकरण 22:17 मध्ये बायबलचा शेवट कसा होतो हे तुमच्या लक्षात आहे का? “तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो.” हे अभिवचन केवळ यशयाच्या काळातील यहुदी मनुष्यासाठीं नव्हतें. हे अभिवचन त्या प्रत्येकासाठीं आहे जो आपल्या आत्म्याची तहान भागवण्यासाठीं ख्रिस्ताकडे येतो. “मी [त्याच्याशी] सर्वकाळचा करार करीन!”

कोणता करार? हा तो करार आहे ज्याचे मूळ देवानें “दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद” यां अभिवचनामध्ये आहे आणि जो सर्वकाळासाठीं स्थिर आहे. यशया 55: 3, “आणि मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हांला देईन.” मी याचा अर्थ असा घेतो कीं दाविदासोबत केलेल्या करारात माझाहि समावेश आहे. दाविदाला जे मिळेल ते मलाहि ख्रिस्त येशूमध्ये मिळेल.

आणि त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे?

माझ्यासाठीं शृंगातून अंकुर फुटेल. म्हणजेच, एक महासामर्थ्य माझ्यासाठीं लढा देईल आणि माझे रक्षण करेल. माझ्यासाठीं देवानें मांडलेला दीप उदयांस येईल. म्हणजेच माझ्या चोहींकडे प्रकाश असेल आणि यापुढे अंधकाराची सत्ता माझ्यावर चालणार नाही. माझ्या शिरीं एक मुकुट झळकेल. म्हणजे, मी दाविदाच्या पुत्रासोबत राज्य करीन आणि त्याच्यासोबत त्याच्या राजासनावर बसेन. “जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन” (प्रकटीकरण 3:21).

दाविदाला जे अभिवचन देण्यांत आलें त्याचा लाभ आपल्याला देखील व्हावा ही गोष्ट आम्हांला आश्चर्याने भारावून टाकणारी आहे. आणि देव खरेंच आम्हांला थक्क करूं इच्छितो. देवाची इच्छा आहे कीं आजचे आपले हे मनन संपण्यापूर्वी आपण तें सामर्थ्य आणि अधिकार आणि खात्री पाहून ज्यां द्वारें त्यानें आपल्यावर प्रीति केलीं, चकित व्हावें.

21 जानेवारी : आनंदाचा नांगर

Alethia4India
Alethia4India
21 जानेवारी : आनंदाचा नांगर
Loading
/

माझ्यामुळें जेव्हां लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचें वाईट लबाडीनें बोलतील तेव्हां तुम्हीं धन्य.” (मत्तय 5:11)

थापि भुतें तुम्हांला वश होतात ह्याचा आनंद मानूं नका; तर तुमची नांवे स्वर्गांत लिहिलेलीं आहेत ह्याचा आनंद माना.” (लूक 10:20)

येशूनें या शास्त्रपाठांत एक असें रहस्य प्रकट केलें जें आपल्या आनंदाचे दुःखाच्या भीतीपासून आणि यशाच्या गर्वापासून संरक्षण करते. आणि तें रहस्य म्हणजे हें: स्वर्गांत तुमचें प्रतिफळ मोठें आहे. आणि त्या प्रतिफळाचें मूल्य म्हणजे येशू ख्रिस्ताच्या गौरवाचा पूर्णानंद घेणें (योहान 17:24).

जेव्हां येशू असें म्हणतो,

“माझ्यामुळें जेव्हां लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचें वाईट लबाडीनें बोलतील तेव्हां तुम्हीं धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गांत तुमचें प्रतिफळ मोठें आहे; कारण तुमच्यापूर्वीं जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनीं तसाच छळ केला” (मत्तय 5:11-12),

तेव्हां तो दुःखापासून  आपल्या आनंदाचें संरक्षण करतो.

स्वर्गांत असलेलें आपलें मोठें प्रतिफळ आपल्या आनंदाला मनुष्यांकडून होणारा छळ आणि निंदा यांपासून भयमुक्त करते.

जेव्हां तो असें म्हणतो,

थापि भुतें तुम्हांला वश होतात ह्याचा आनंद मानूं नका; तर तुमची नांवे स्वर्गांत लिहिलेलीं आहेत ह्याचा आनंद माना” (लूक 10:20),

तेव्हां तो यशाच्या  गर्वापासून सुद्धा आपल्या आनंदाचे संरक्षण करतो.

शिष्य आपला आनंद सेवेंत मिळालेल्या त्यांच्या यशांत शोधत होतें. “आपल्या नावानें भुतें देखील आम्हांला वश होतात!” (लूक 10:17). पण त्यामुळें त्यांचा खरा आनंद जो एकमेव अशा स्थिर व अढळ नांगराला बांधलेला आहे, त्यापासून तुटला असता.

म्हणून, येशू स्वर्गांत असलेल्या त्याहूनही मोठ्या प्रतिफळाचे अभिवचन देऊन यशाच्या गर्वापासून त्यांच्या आनंदाचे संरक्षण करतो. आनंद मानायचांच असेल तर ह्याचा माना: तुमची नांवे स्वर्गांत लिहिलेलीं आहेत. तुमचा वारसा आकलना पलीकडे, सार्वकालिक, स्थिर व अढळ आहे.

आपला आनंद सुरक्षित आहे. दु:ख  असो वा यश, यांपैकीं कांहीच त्यां नांगराला नष्ट करू शकत नाहीं. स्वर्गांत तुमचें प्रतिफळ मोठें आहे. तिथे तुमचे नांव लिहिलेलें आहे. ते एकदम सुरक्षित आहे.

येशूनें दु:ख भोगत असलेल्या आपल्या पवित्र प्रजेच्या आनंदाचा नांगर स्वर्गांत असलेल्या प्रतिफळाच्या समुद्रांत टाकला आहे. आणि तसेंच, यशस्वी पवित्र प्रजेच्या आनंदाचा नांगर देखील त्यानें तिथेंच टाकला आहे.

आणि अशा प्रकारे, त्यानें आपल्याला ऐहिक पीडा आणि ऐहिक सुख – ऐहिक दुःख आणि ऐहिक यश, यांच्या जुलूमशाहीपासून बंधमुक्त केलें.

20 जानेवारी : आठवण करून द्यावें असे युद्ध

Alethia4India
Alethia4India
20 जानेवारी : आठवण करून द्यावें असे युद्ध
Loading
/

हें मींनांत आणितों म्हणून मला आशा आहे. आम्हीं भस्म झालों नाहीं ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणें खंड पडत नाहीं.” (विलापगीत 3:21-22)

आशेचा एक मोठा शत्रू म्हणजे देवाच्या अभिवचनांचा विसर पडणें. आठवण करून देणें ही एक मोठ्या जबाबदारीची सेवा आहे. पेत्र व पौल हें दोघेंहि म्हणतात कीं त्यांनी त्यांची पत्रें आठवण करून देण्याच्या उद्देशानेंच लिहिलींत (2 पेत्र 1:13; रोमकरांस 15:15).

आपल्याला जें ठाऊक असणें आवश्यक आहे तें सर्वकांही आठवण करून द्यावायांस आपला प्रमुख कैवारी हा पवित्र आत्मा आहे (योहान 14:26). परंतु याचा अर्थ असा नाहीं कीं तुम्हीं निकामी बसून रहावें. तुमच्यावर केवळ तुम्हां स्वतःला आठवण करून  देण्याच्या सेवेची जबाबदारी आहे. आणि सर्वांत पहिली व्यक्ती जिला तुम्हीं आठवण करून देण्याची गरज आहे, ती तुम्हीं स्वतः आहां.

मनाचें सर्वांत मोठें सामर्थ्य हें आहे: ते आठवण करून देऊन स्वतःशी संवाद साधू शकते. जसं कीं शास्त्रपाठ सांगते, आपलं मन स्वतःहून गोष्टींना “मनांत आणूं” शकते: हें मींनांत आणितों म्हणून मला आशा आहे. आम्हीं भस्म झालों नाहीं ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणें खंड पडत नाहीं.” (विलाप 3:21-22).

देवानें स्वतःविषयीं आणि आपल्यांविषयीं जें कांही सांगितलें आहे तेंच जर आपण “मनात आणत नाहीं” तर आपण अशक्त किंवा क्षीण होऊं. अरे, मला इतक्या वेदनादायक अनुभवांतून गेल्यावर हें कसें समजलें! तुमच्या स्वतःच्या मनांत उद्भवणाऱ्या अधर्मी विचारांच्या चिखलांत लोळत बसूं नका, म्हणजे असे विचार: “हें तर माझ्यासाठीं अशक्य आहे. . .” “ती तें करणार नाहींच. . .” “तीं माणसें तें कधीच करूं शकणार नाहींत. . .” “यांत कधीच यश मिळालें नाहीं. . .”

यां सबबी खऱ्या कीं खोट्या, मुद्दा हा नाहीं. पण जोपर्यंत तुम्हीं यां गोष्टींपेक्षाहि मोठं असं कांहीतरी तुमच्या “मनांत आणित” नाहीं, तोपर्यंत तुमचं मन मात्र यां सबबी खऱ्याच आहेत हें दाखवीण्याचा नेहमीच कुठलातरी मार्ग शोधेल. देव हा सर्व गोष्टींना शक्य करणारा देव आहे. कठीण परिस्थितींतून पळ काढण्यापेक्षा देव अशक्य गोष्टी करतो याची स्वतःला आठवण करून देणें अधिक सार्थक ठरेल.

आपण जर स्वतःला देवाची महानता आणि कृपा आणि सामर्थ्य आणि शहाणपण याची आठवण करून देत नाहीं, तर मग आपण पिळून टाकणाऱ्या क्रूर निराशेंत बुडतो. “मी तर मूढ व अज्ञानी होतों; तुझ्यापुढें मी पशुवत होतों” (स्तोत्र 73:22).

स्तोत्र 77 मध्ये निराशेंकडून आशेकडे जें मोठें वळण येतें तें यां शब्दांमध्यें: “मी परमेशाचीं महात्कृत्यें वर्णीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचें स्मरण  करीन. मी तुझ्या सर्व कृत्यांचें मननहि  करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार  करीन” (स्तोत्र 77:11-12).

हें माझ्या जीवनांतील सर्वांत मोठें युद्ध आहे. आणि तुमचेंहि हेंच युद्ध असेल असें मी गृहीत धरतों. आठवण करून देण्याचें युद्ध! प्रथम स्वतःला. त्यानंतर दुसऱ्यांना.

19 जानेवारी: दुष्ट धन्याची सेवा कशी करावी

Alethia4India
Alethia4India
19 जानेवारी: दुष्ट धन्याची सेवा कशी करावी
Loading
/

ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असें मानून ती सद्भावानें करा; कारण तुम्हांला माहीत आहे कीं, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जें कांही चांगले करितो, तेंच तो प्रभूकडून भरून पावेल. (इफिस 6:7-8)

तुमच्या नोकरीशी संबंधित इफिसकरांस 6:7-8 मधील पुढील पाच गोष्टींचा विचार करा.

1) मुळांत प्रभु-केंद्रित जीवन जगण्यासाठीं पाचारण.

आपण सामन्यपणें ज्या पद्धतीनें जगतो ती लक्षांत घेतां आमच्या मूळ पाचारणाचा हा विषय थक्क करणारा आहे. पौल म्हणतो कीं आपण आपली सर्व चाकरी आपल्यावर लक्ष ठेवणाऱ्या कोणा मनुष्यासाठीं नव्हें, तर ख्रिस्ताची चाकरी करित आहों असें मानून ती करावीं : माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा.

याचा अर्थ असा कीं, आपण आपल्या नौकरीच्या ठिकाणी जें कांही काम करितो तें आपण आपल्या प्रभूचा विचार करूनच करणार. आपण स्वतःला प्रश्न विचारूं कीं, प्रभूला हे काम माझ्यांकडून का  करून घ्यावयाचे आहे? हे काम मीं कसें  करावें म्हणून प्रभूची इच्छा आहे? हे काम मीं केव्हां  पूर्ण करावें म्हणून प्रभूची इच्छा आहे? हे पूर्ण करण्यांस प्रभू मला सहाय्य पुरवेल का? यां कामामुळें  प्रभूचा कसा आदर होईल? दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ख्रिस्ती असणें म्हणजे आमचे जगणें व नौकरी/कामधंदा करणें ह्यांत पूर्णपणें प्रभु-केंद्रित असणें.

2) उत्तम व्यक्ती होण्यासाठीं पाचारण.

प्रभु-केंद्रित जगणें म्हणजे उत्तम व्यक्ती बनणें आणि ज्यां कांही गोष्टीं चांगल्या आहेत त्यांच करणें. पौल म्हणतो, प्रत्येक जण जें काही चांगले [चाकरी] रितो” तें “सद्भावानें करा. येशूनें म्हटलें कीं जेव्हां आपण आपला प्रकाश लोकांसमोर पडू देतो, लोक आपली “सत्कृत्यें” पाहून आपल्या स्वर्गातील पित्याचा गौरव करतील (मत्तय 5:16).

3) आपल्या देहदशेंतील पाषाणहृदयी धन्यांसाठीं चांगले काम करण्यांस बळ.

ख्रिस्ती दासांना आपल्या पाषाणहृदयी धन्यांसाठीं, प्रभु-केंद्रित राहूनच, चांगले काम करित राहावें यांसाठीं सबळ बनविणें हा पौलाचा हेतूं आहे. जेव्हां तुमचा बॉस  तुमच्याकडे सतत दुर्लक्ष करतो किंवा तुमच्या कामासंबंधाने तुमची टीका करित राहतो, त्यावेळीं सुद्धा तुम्हीं तुमचें काम उत्तमपणें कसे चालू ठेवतां? पौलाचे उत्तर आहे: तुमचा बॉस हांच तुमचा मुख्य धनी आहे असा विचार करणें थांबवा आणि यांपुढें ते काम प्रभूचे आहे असें मानून करा. हींच चित्तवृत्ती ठेऊन तुमच्या देहदशेंतील धन्यानें जें काम तुम्हांला सोपविलें आहे त्यांत आपलें कर्तव्य पूर्ण करा.

4) उत्तेजन कीं तुम्हीं केलेलें कोणतेहि चांगले काम वाया जात नाहीं.

या शास्त्र-पाठांत असलेलें सर्वांत अद्भुत शब्द कदाचित हें आहेत : “प्रत्येक जण…… जें कांही चांगले करितो, तेंच तो प्रभूकडून भरून पावेल.” ही बाब अद्भुत आहे. जें काही! “प्रत्येक जण.. जे कांही चांगलं करितो तेंच.” तुम्हीं केलेल्या प्रत्येक छोट्यां चांगल्या कामाकडे प्रभू लक्ष्य ठेवतो, आणि तें तो मूल्यवान समजतो, आणि त्याचे प्रतिफळ देतो.

आणि तुम्हीं त्याच्याकडून पूर्णपणे भरून पावाल. तुम्हीं कांहीतरी कमावलें आहे या अर्थाने नव्हें — जणू कांही तुम्हीं त्याला आपला ऋणी बनवू शकता. तो तुमचा आणि यां विश्वातील प्रत्येक गोष्टीचा धनी आहे. तो कोणत्याहि गोष्टीसाठीं आमचा ऋणी नाहीं. परंतु विश्वासानें केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी तो स्वेच्छेनें व कृपेनें आपल्याला प्रतिफळ देण्याचे ठरवितो.

5) प्रोत्साहन कीं पृथ्वीवरील क्षुल्लक काम सुद्धा स्वर्गातील महान प्रतिफळ मिळवून द्यावयांस अडथळा नाहीं.

तुम्हीं केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाचे प्रतिफळ प्रभू स्वतः देईल – “मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो.” तुमचा बॉस कदाचित असा विचार करील कीं तुम्हीं कोणीही नाहीं —नावाला, फक्त एक दास. किंवा तुम्हीं तिथें काम करित आहां हे सुद्धा त्याला कदाचित ठाऊक नसेल. पण त्यानें काही फरक पडत नाहीं. तुम्हीं तिथें काम करता हे प्रभूला ठाऊक आहे. आणि सरतेशेवटी, विश्वासूपणें केलेलीं कोणतीही चाकरी व्यर्थ जाणार नाहीं.

18 जानेवारी: गर्विष्ठपणावर उपाय

Alethia4India
Alethia4India
18 जानेवारी: गर्विष्ठपणावर उपाय
Loading
/

अहो! जे  तुम्हीं म्हणतां कीं, “आपण आज किंवा उद्यां अमुक एका शहरीं जाऊ, तेथें एक वर्ष घालवूं आणि व्यापारांत कमाई करू,” त्या तुम्हांला उद्याचें समजत नाहीं; तुमचें आयुष्य तें काय? तुम्हीं वाफ आहां, ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता, “प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू,” असे म्हणा. आता तुम्हीं गर्विष्ठ आहां म्हणून फुशारकी मारतां; अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे. (याकोब 4:1316)

याकोब गर्विष्ठपणा आणि फुशारकी मारणेंआणि ज्यां धूर्तपणाने तें आपली डोकें वर काढतात यांविषयी बोलत आहेत. “तुम्हीं गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता; अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे.”

जेव्हां तुम्हीं शहाणपण, शक्ती आणि धन-संपत्ती या तीन गोष्टींसंबंधाने आत्मनिर्भर बनता, तेव्हां त्यां मिळून गर्विष्ठपणाच्या अंतिम टप्याकडे घेऊन जाणाऱ्या एका शक्तिशाली प्रेरणेला जन्म देतात; म्हणजेच, नास्तिकता. आम्हांला स्वतःच्या बाबतींत असलेला मोठेपणा जर कायम ठेवायचा असेल तर त्याचा सर्वात सुरक्षित उपाय म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी वर आकाशांत मोठा आहे या गोष्टीला नाकारणे.

म्हणूनच गर्विष्ठ लोकांमध्यें इतरांना स्वतःपेक्षा कमी लेखून त्यांच्याकडे हीन भावनेनें पाहण्याची जन्मजात प्रवृत्ती असते. सी.एस. लुईस असें म्हणतात, “गर्विष्ठ माणूस नेहमी त्याच्या आजूबाजूच्या गोष्टींकडे आणि लोकांकडे खालच्या नजरेनें पाहतो: आणि, अर्थातच, ज्याअर्थी तुम्हीं इतरांना खालच्या नजरेनें पाहता त्याअर्थी तुम्हीं तुमच्यापेक्षाहि वर कोणीतरी आहे हे पाहूंच शकत नाहीं” (Mere Christianity).

परंतु गर्वाचे भरण-पुरण करण्यांसाठीं, ज्याच्याकडे वर दृष्टि करून पाहावें असा स्वर्गात कोणीहि नाहीं असें सरळ जग-जाहिर करणें अधिक सोपे असूं शकते. “दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही;” “देव नाही” असेच त्याचे सर्व विचार असतात” (स्तोत्र 10:4). शेवटी, देव नाहींच हे स्वतःला पटवून देणें गर्विष्ठांला अगत्याचे आहे.

याचे एक कारण असें, कीं देवाचें वास्तव जीवनाच्या एकएका आणि अगदी लहान-लहान घटनेंत अनिवारपणे उघड आहे जे नाकारले जाऊ शकत नाहीं. मनुष्याचा गर्विष्ठपणा इतका उंच आहे कीं देवानें हे विश्व चालवण्यांत इतक्या व्यक्तीगतपणे हस्तक्षेप करावा हे सुद्धा तो सहन करू शकत नाहीं, तर मग जीवनाच्या एकएका तपशीलवार आणि लहान-लहान गोष्टींचा तर विषयच नको.

गर्व देवाच्या सार्वभौमत्वाचा द्वेष करतो. म्हणून, गर्वाला देवाचे अस्तित्व आवडत नाहीं, कारण देव सार्वभौम आहे. आणि ही बाब तो “देव नाहीं” असें जाहिर करून व्यक्त करू शकते. किंवा ही बाब तो “मीं नाताळाच्या सुटीत गोव्याला जात आहे” असें जाहिर करून व्यक्त करू शकते.

याकोब म्हणतो, “इतकी खात्री बाळगू नका.” असे न म्हणता, “प्रभूची इच्छा असेल तरआम्हीं जगू आणि नाताळाच्या सुटीत गोव्याला जाऊ”, असें म्हणा.

याकोबाला असें म्हणायचे आहे कीं तुम्हीं गोव्याला जावें कीं नाहीं आणि तुम्हीं हा सुभक्तीपर बोध वाचून होईपर्यंत जगता कीं नाहीं हे देवच ठरवितो. गर्विष्ठपणानें भरलेल्यां आत्मनिर्भर लोकांसाठीं हे सत्य अत्यंत आक्षेपार्ह आहे — हा सुभक्तीपर बोध वाचून होईपर्यंत आपण जिवंत राहणार कीं नाहीं यावर सुद्धा आमचे कांहींच चालत नाहीं म्हणजे काय!

याकोब असें म्हणतो कीं तुमच्या भविष्यातील एक एक, व लहान-सहान अशा सर्व गोष्टींवर देवाच्या सार्वभौम अधिकारांवर विश्वास न ठेवणें म्हणजे गर्विष्ठपणा आहे.

या गर्वाशी लढण्याचा उपाय म्हणजे जीवनांत होणाऱ्या सर्व गोष्टींमध्यें देवाच्या सार्वभौमत्वाला मान्य करून आत्म-समर्पण करणें आणि आपले सहाय्य करण्यांत तोच आपले सामर्थ्य प्रकट करील (2 इतिहास 16:9), आम्हांला दररोज कल्याण व दया ही लाभूं देईल (स्तोत्र 23:6), त्याची आशा धरून राहणार्‍यांचे इष्ट करील (यशया 64:4), आणि आपल्याला त्याच्या गौरवासाठीं जगण्यांस आवश्यक असलेल्या प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करील  (इब्री 13:21) या त्याच्या कधीहि विफळ न होणाऱ्या अभिवचनांमध्यें विसावा घेणे.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, देवाच्या सार्वभौम भावी कृपेवर अढळ विश्वास हांच गर्विष्ठपणावर उपाय आहे.

17 जानेवारी : अस्सल विश्वास ख्रिस्ताच्या दुसर्‍यांदा प्रकट होण्याची उत्कंठेनें वाट पाहतो

Alethia4India
Alethia4India
17 जानेवारी : अस्सल विश्वास ख्रिस्ताच्या दुसर्‍यांदा प्रकट होण्याची उत्कंठेनें वाट पाहतो
Loading
/

त्याअर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांचीं पापें स्वतःवर घेण्यासाठीं’ एकदांच अर्पिला गेला, आणि जे त्याची (उत्कंठेनें) वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठीं तो दुसर्‍यांदा दिसेल. (इब्रीलोकांस 9:28)

तुमची पापें ख्रिस्ताच्या रक्तानें दूर केलीं गेलीं आहेत आणि तो दुसर्‍यांदा दिसेल तेव्हां तो तुम्हांला देवाच्या क्रोधापासून वाचवेल आणि तुम्हांला सार्वकालिक जीवन देईल याची तुम्हांला खात्री पटावी म्हणून तुम्हीं काय करावें? उत्तर असें आहे: ख्रिस्तावरील तुमचा विश्वास असा असूं द्या कीं ज्यामुळें तुम्हीं त्याच्या दुसर्‍यांदा प्रकट होण्याची आतुरतेनें वाट पाहाल.

वरील वचन असें सांगते कीं जे “त्याची उत्कंठेनें वाट पाहतात” त्यांच्या तारणासाठीं तो दुसऱ्यांदा येत आहे. मग तुम्हीं त्यासाठीं कशी तयारी करावीं? देवानें ख्रिस्तामध्यें तुम्हांला तुमच्या पापांची क्षमा केलीं आहे याची जाणीव तुम्हांला कशी होते? आणि त्याला भेटण्यासाठीं तुम्हीं कशी तयारी करता? त्याच्यावर अशा प्रकारे विश्वास ठेवून कीं ज्यामुळें तुम्हीं त्याच्या दुसर्‍यांदा प्रकट होण्याची आतुरतेनें वाट पाहाल.

ख्रिस्ताच्या दुसर्‍यांदा प्रकट होण्याची अशा आतुरतेनें भरलेलीं प्रतीक्षा म्हणजे या गोष्टीचें प्रमाण आहे कीं आपण त्याच्यावर प्रीति करतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो – त्याच्यावर खरा विश्वास, अस्सल विश्वास ठेवतो.

एक बनावटी विश्वास सुद्धा आहे, आणि हा असा विश्वास आहे जो फक्त नरकापासून सुटका करून घेण्याइतकाच मर्यादित असतो, परंतु ख्रिस्तासाठीं त्यांत कोणतीहि उत्कंठा नसतें. अशा प्रकारचा विश्वास तारत नाही. असा विश्वास ख्रिस्ताच्या दुसर्‍यांदा प्रकट होण्यासाठीं आतुरता निर्माण करत नाही. या उलट, असा विश्वास ठेवणारा मनुष्य ख्रिस्तानें दुसऱ्यांदा येण्यासाठीं शक्य तितका काळ उशीर करावा अशीच अपेक्षा करतो, जेणेंकरुन त्याला या जगाचा जास्तीत जास्त उपभोग घेता यांवा.

परंतु असा विश्वास जो ख्रिस्ताला आपला तारणारा व प्रभू आणि आपले धन आणि आपली आशा व आपला आनंद म्हणून दृढनिश्चयानें धरून ठेवतो तोच हा विश्वास आहे जो आपणांला ख्रिस्ताच्या दुसर्‍यांदा प्रकट होण्याची आतुरतेनें वाट पाहण्यांस भाग पाडतो. आणि हाच विश्वास आपणांला तारतो.

म्हणून, मीं तुम्हांला विनवितो कीं, या जगाकडे आणि तुमच्या पापांकडे आपली पाठ फिरवा. ख्रिस्ताकडे वळा. त्याचा स्वीकार करा, त्याचें स्वागत करा, ख्रिस्ताला केवळ तुमचा आरोग्य विमा म्हणून नव्हे तर तुमचे असें धन आणि मित्र आणि प्रभु म्हणून कवटाळा ज्याच्या प्रकट होण्याची तुम्हीं मोठ्या उत्कंठेनें वाट पाहत आहां.

16 जानेवारी : वायफळ शब्द

Alethia4India
Alethia4India
16 जानेवारी : वायफळ शब्द
Loading
/

“तुम्हीं शब्दाशब्दाला धरावयाला पाहतां काय? निराश मनुष्याचे उद्‍गार केवळ वायफळ आहेत? (ईयोब 6:26)

लोक दु:ख, वेदना आणि निराशेमध्यें असतांत, तेव्हां तें नको त्यां गोष्टीं  बोलतांत. ते उद्याची वाट न बघतां, आजंच परिस्थितीचे  अतिशयोक्तीनें वर्णन करतांत. तें खालच्या पट्टीवर गातांत आणि तेंच संगीत असल्यासारखें बोलतात. तें फक्त ढगांकडे बघतांत आणि अशा गोष्टीं बोलतांत कीं जणू आकाशाचे अस्तित्वच नाहीं.

तें कुरकुर करत म्हणतांत , “देव कुठे आहे?” किंवा: “आता पुढे जाण्यांत कांही अर्थ नाहीं.” किंवा: “सर्व गोष्टीं निरर्थक आहेत.” किंवा: “माझ्यासाठीं कोणतीही आशा नाहीं.” किंवा: “जर देव चांगला असता तर असलें कांही वाईट घडले नसतें.”

या अशा उद्‍गारांना आपण काय आणि कसें उत्तर द्यावें?

ईयोब म्हणतो कीं आपण त्यांना दोष देण्याची गरज नाहीं. त्यांचे असें उद्‍गार निव्वळ वारा आहे किंवा अक्षरशः “वायफळ” आहेत. तें लवकरच भुसासारखें वार्‍यानें उडविलें जातील. परिस्थितीं पालटून जाईल, आणि नैराश्यानें विव्हळ झालेलीं व्यक्ती अंधकाराच्या रात्रींतून जागे होईल आणि आपल्या अविचारी उद्‍गारांवर पश्चात्ताप करील.

म्हणून, मुख्य विषय असा आहे कीं, अशा शब्दांसाठीं मनुष्याला दोष देत बसून आपला वेळ आणि शक्ती खर्च करूं नये. ते वायफळ असल्यामुळें, वाऱ्यानें आपोंआपच उडून जातील. शरद ऋतूंत झाडाची पानें कापण्याची आपणांला गरज नाहीं. तें परिश्रम वायाफळ आहे. तें लवकरच स्वतःहून उडून जातील.

अरेरे, असें वायफळ शब्द ऐकतांच आपण लगेच किती आवेशानें देवाचा, तर कधी-कधी सत्याचा बचाव करण्यांसाठीं सरसावतो. जर आपल्यामध्यें समंजसपणा असतां तर आपण मूळ असलेलें शब्द आणि भुसासारखें वाऱ्यानें उडून जाणारे शब्द यांतील फरक ओळखू शकलो असतों, नाहीं का?.

खोटे शिक्षण आणि वाईट गोष्टींनी भरलेलें असें उद्‍गार आहेत ज्यांची मुळें खूप खोलवर गेलेली असतांत. परंतु सर्वंच उद्‍गार कांडवळलेल्यां मनांतून निघत नाहीत. कांही शब्द मुख्यतः वेदना आणि निराशेनें डागाळलेलें असतात. तुम्हीं जें ऐकतां तें नेहमींच अत्यंत आतल्या गाभाऱ्यांतून येत नसते. ते जिथून निघतांत तिथे खरेंच काहीतरी वास्तविक आणि काळोखमय आहे. परंतु ते तात्पुरते आहे, एखाद्या अशा संसर्गजन्य रोगासारखें —वास्तविक आणि वेदनादायक- ज्याची साथ कालांतराने नाहीशी होईल, परंतु वास्तविक असलेली ती व्यक्ती नाहीशी होणार नाहीं.

तर मग, जें उद्‍गार आपल्याविरुद्ध, देवाविरुद्ध, किंवा सत्याविरुद्ध बोललें जातांत तें केवळ वाऱ्यासारखे आहेत कीं काय हे आधी आपण समजून घ्यायला शिकूं या– म्हणजे तें अंत:करणातून नव्हें, तर वेदनेंतून बोलले जातात हे. जर तें वायफळ असतील तर आपण दोष न लावता तें उडून जाईपर्यंत शांत राहूं. भग्नावस्थेत असलेल्या जीवाला दोष लावणे नव्हें, तर पून्हा उभें करणें, हेंच ख्रिस्ती प्रीतिचे ध्येय आहे.

15 जानेवारी : कृपेची मुक्तता

Alethia4India
Alethia4India
15 जानेवारी : कृपेची मुक्तता
Loading
/

तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळें मृत झालेलें असतांहि त्यानें आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळें, ख्रिस्ताबरोबर आपणांला जिवंत केलें, (कृपेनें तुमचें तारण झालेलें आहे); आणि ख्रिस्त येशूच्या ठायीं त्याच्याच बरोबर उठविलें व त्याच्याचबरोबर स्वर्गांत बसविलें. (इफिसकरांस 2:4-6)

आम्हांला स्वत:कडे वळवितांना देवानें जीं प्रभावोत्पादक कृती केलीं तीं म्हणजे ही कीं “आपण आपल्या अपराधांमुळें मृत झालेलें असतांहि त्यानें……..ख्रिस्ताबरोबर आपणांला जिवंत केलें”. म्हणजे, आपण देवाकरिता मृत होतो. आम्हीं प्रतिक्रिया देण्यासंबंधानें निर्जीव होतो; आमच्यांत आध्यात्मिक गोष्टींसाठीं कोणतीहि आवड नव्हती वा रस नव्हता; ख्रिस्ताचे सौंदर्य दिसावें असें आमचे आध्यात्मिक डोळे नव्हतें. ज्यां गोष्टीं अंतिमरीत्या सर्वांत महत्त्वाच्या आहेत त्यांच सर्व गोष्टींसाठीं आम्हीं केवळ मृत असें होतो.

मग देवानें कृती केलीं – कोणतीहि अट न ठेवता – म्हणजे, त्याच्या उपस्थितींत जाण्यांस पात्रता कमविण्यासाठीं आपण कांहीतरी कृति करण्यांस समर्थ व्हावें त्यांपूर्वीच. त्यानें आपणांला जिवंत केलें. आपणांला ख्रिस्ताचे वैभव पाहता यावें म्हणून त्यानें सार्वभौमपणे आपणांला आध्यात्मिक मृत्यूच्या कबरेंतून उठविलें (2 करिंथकरांस 4:4). आध्यात्मिक गोष्टींसंबंधानें आमची मृत झालेलीं सर्व जाणीव, किंबहुना ज्ञानेंद्रियेंच त्या अद्भुत कृत्यामुळें जिवंत झालीं.   

इफिसकरांस 2:4 म्हणते कीं ही कृति “दयेचे” कार्य होते. म्हणजेच, देवानें आम्हांला आमच्या मृतावस्थेत पाहिलें आणि आम्हांवर दया केलीं. ज्यामुळें सार्वकालिक मरण येते व आमची दुर्दशा होते तें पापाचें भयंकर वेतन देवानें पाहिलें. “देव दयासंपन्न आहे म्हणून. . . आपणांला जिवंत केलें.” आणि त्याची दयासंपन्नता अगदी आमच्या गरजेच्या वेळीं आपणांवर विपुलतेने वाहत आली. पण या शास्त्रपाठांत एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ही कीं, “कृपेनें तुमचें तारण झालेलें आहे” ही गोष्ट जोडण्यासाठीं पौल स्वतःच्या वाक्यप्रवाहांत खंड आणतो, तें असें, “देव दयासंपन्न आहे म्हणून… त्यानें ….. ख्रिस्ताबरोबर आपणांला जिवंत केलें, –कृपेनें तुमचें तारण झालेलें आहे– आणि…त्याच्याच बरोबर उठविलें.”

पौल हींच गोष्ट 8 व्या वचनांत पुन्हा सांगणार होता. मग तो त्यांच गोष्टीला तेथें जोडण्यासाठीं स्वतःच्याच वाक्यप्रवाहांत खंड का आणतो? त्यांहीपेक्षा अधिक हे कीं, ह्या वचनांत देवाच्या दयासंपन्नतेंवर भर टाकण्यांत येत आहे जीं आपणांवर आपल्या मृतावस्थेच्या दयनीय अवस्थेत विपुलपणें झालीं; तर मग पौल कृपेनें तुमचें तारण झालेलें आहे असें सांगण्यांसाठीं विषयाच्या बाहेर का येतो?

माझ्या मतें त्याचें उत्तर हे आहे कीं पौलाला जाणीव होतें कीं येथे फुकटपणें झालेल्या कृपेवर भर देण्याची एक उत्तम संधी आहे. देवानें आम्हांला स्वत:कडे वळविलें त्यापूर्वीच्या आमच्या मृत स्थितीचे वर्णन करित असतांना, त्याच्या लक्षांत येते कीं मृत असलेलें लोक तारणाच्या अटी पूर्ण करू शकत नाहीत. जर त्यांचे तारण व्हावयाचे असेल तर त्यांना तारण्यासाठीं देवालांच कोणत्यांहि अटीशिवाय आणि पूर्णपणे फुकट अशी कृती करणें अगत्याचे आहे. ही स्वतंत्र कृति कृपेचे मर्म आहे.

एका व्यक्तीनें दुसर्‍या व्यक्तीला मेलेल्यांतून उठवावें यापेक्षा एकतर्फी फुकट आणि वाटाघाटीस अयोग्य अशी कृती कोणती असूं शकते! कृपेचा हांच अर्थ आहे.