ArchivesSolid Joys

11 August : कृपेचे भिन्न काळ

Alethia4India
Alethia4India
11 August : कृपेचे भिन्न काळ
Loading
/

ह्याकरता तर आम्हीं तुमच्यासाठीं सर्वदा अशी प्रार्थना करतो कीं, आपल्या देवानें तुम्हांला झालेंल्या ह्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे; ह्यासाठीं कीं, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायीं व तुम्हांला त्याच्या ठायीं गौरव मिळावा. (2 थेस्सलनीका 1:11-12)

कृपा ही देवाची केवळ अशी प्रवृत्ती नाहीं कीं आपण पात्र नसतांनाहि तो आपलें कल्याण करतो – आपण तिला “आमच्या प्रतिकूलतेंत पात्र नसतांनाहि आम्हांसाठीं देवाची अनुकूलता” असे म्हणतो; तर देवाची कृपा ही देवाकडून येणारे सामर्थ्य देखील आहे जे आपल्या जीवनात कार्य करते आणि आपल्यामध्यें आणि आपल्यासाठीं चांगल्या गोष्टी घडवते – आणि ह्या कृपेस देखील आपण पात्र नसतो.

पौलाने म्हटले कीं आपल्यात चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय हा देवाच्या “सामर्थ्याने” पूर्ण होतो (वचन 11). आणि मग तो वचन 12 च्या शेवटी असे म्हणतो, “आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने.”  हे सामर्थ्य जे आमच्यांत ख्रिस्ताला उंचविणारी आज्ञाधारकता निर्माण करण्यासाठीं आमच्या जीवनात प्रत्यक्षात कार्य करते, देवाच्या कृपेने घडून येणारे परिश्रम आहे.

आपण हे 1 करिंथ 15:10 मध्यें देखील पाहू शकता:

तरी जो काहीं मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाहीं; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केलें, ते मी केलें असे नाहीं, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेने केलें.

तर मग, कृपा ही एक सक्रिय, सदैव उपस्थित, जीवन बदलून टाकणारी, आज्ञाधारक शक्ती आहे.

म्हणून, ही कृपा, जी वेळोवेळी देवाकडून तुमच्याकडें सामर्थ्याने वाहत येते, ती गतकालीन व भावी अशी दोन्ही स्वरुपाची आहे. ज्याअर्थी तिच्याद्वारे आपल्यासाठीं किंवा आपल्या अंतकरणात पूर्वी काहींतरी घडवून आणिले गेलें, म्हणून ती गतकालीन कृपा म्हटली जाते. आणि ज्याअर्थी आता त्यांच कृपेद्वारे आपल्यासाठीं किंवा आपल्या अंतकरणात वर्तमान समयी काहींतरी घडवून आणिले जात आहे म्हणून, तिला भावी कृपा म्हटले जाते – आतापासून पुढे पाच सेकंद आणि आतापासून पुढे पाच दशलक्ष वर्षे, दोनहि.

देवाची कृपा ही कृपेच्या अक्षय झऱ्यातून वाहणाऱ्या वर्तमानाच्या धबधब्यावरून सतत झिरपत असते जी आमच्यावर भूतकाळात झालेंल्या कृपेच्या सतत वाढत जाणाऱ्या जलाशयातून भविष्याकडून आमच्याकडें वाहत येत आहे. पुढच्या पाच मिनिटांत, तुम्हांला भविष्याकडून येणारी सांभाळ करणारी कृपा प्राप्त होईल — तुमचा यावर विश्वास आहे; तसेच भूतकाळात झालेंल्या कृपेच्या जलाशयाकडून आणखी पाच मिनिटांची कृपा तुमच्या खाती जमा होईल – यासाठीं तुम्हीं देवाचे आभार मानता.

10 August : हे देवा, माझ्यावर कृपा कर

Alethia4India
Alethia4India
10 August : हे देवा, माझ्यावर कृपा कर
Loading
/

हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेंला अनुसरून माझे अपराध काढून टाक. (स्तोत्र 51:1)

तीनदा : “कृपा कर,” ” आपल्या वात्सल्याला अनुसरून,” आणि ” आपल्या विपुल करुणेंला अनुसरून.”

निर्गम 34:6-7 मध्यें देवानें हे अभिवचन दिलें होते:

“परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर1 दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.”

दाविदाला ठाऊक होते कीं काहीं अपराधी असे आहेंत कीं त्यांना क्षमा केलीं जाणार नाहीं. त्याचप्रमाणें, त्याला हेही ठाऊक होते कीं काहीं अपराधी असे आहेंत कीं ज्यांच्या तारणासाठीं केलेंल्या काहीं गूढ कार्यामुळें त्यांचे अपराध गणिले जाणार नाहींत, तर त्यांना क्षमा केलीं जाईल. स्तोत्र 51 मध्यें तो देवाच्या कृपेच्या यांच रहस्याला दृढ धरून ठेवत आहे.

“हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेंला अनुसरून माझे अपराध काढून टाक.” दाविदाला या मुक्तीच्या रहस्याचे जितके गूढ ठाऊक होते, त्यापेक्षा अधिक आता आपल्याला या मुक्तीच्या रहस्याचे गूढ ठाऊक आहे. आम्हीं ख्रिस्ताला ओळखतो. तरी त्या करुणेंला मात्र आपण त्याच्याप्रमाणेंच दृढ धरून ठेवतो.

आपल्या असहाय स्थितींत एक निर्णायक गोष्ट जी तो करतो ती म्हणजें देवाची करुणा व प्रीति ह्यांकडें वळणें. आज याचा अर्थ आपल्या असहाय स्थितींत ख्रिस्ताकडें वळणें असा होतो, ज्याने त्याच्या स्वतःच्या रक्ताने आपल्याला आवश्यक असलेली सर्व करुणा प्राप्त करून घेतलीं.

9 August : शुभवर्तमानाचा शेवट

Alethia4India
Alethia4India
9 August : शुभवर्तमानाचा शेवट
Loading
/

तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळें आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहोत; इतकेच केवळ नाहीं, तर ज्याच्या द्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायीं अभिमान बाळगतो. (रोमकरांस 5:9-11)

आपल्याला कशापासून तारले जाण्याची गरज आहे? वचन 9 ह्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देते : देवाच्या क्रोधापासून. “तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळें आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत.” पण शुभवर्तमानाचा सर्वोच्च, सर्वोत्कृष्ट, पूर्ण, व सर्वात समाधानकारक पुरस्कार केवळ हाच आहे का?

नाहीं, कारण पुढे वचन 10 असें म्हणते, “तर आता….त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहोत.” मग पुढे वचन 11 निष्कर्षावर येऊन सुवार्तेचा परम शेवट आणि उद्देश काय ते सांगते : “इतकेच केवळ नाहीं… तर… आपण देवाच्या ठायीं अभिमान बाळगतो.”

शुभवर्तमानाचा अंतिम आणि सर्वोच्च चांगुलपणा हांच आहे. “इतकेच केवळ नाहीं” ह्यानंतर काहींही शिल्लक किंवा अपूर्ण असे काहींही नाहीं. आपलें हे तारण कसे घडून येते हे सांगणें येथें पौलाचा मुख्य हेतू आहे, “ज्याच्या द्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे.”

सुवार्तेचा शेवट हा कीं “आपण देवाच्या ठायीं अभिमान बाळगतो.” शुभवर्तमानांत जाहिर केलेंलीं सर्वोच्च, पूर्ण, सखोल, गोड अशी जी गोष्ट आहे ती म्हणजें देव स्वतः, ज्याच्या ठायीं तारलेले सर्व लोग अभिमान बाळगतांत.

परमेश्वर ख्रिस्तामध्यें खंडणी झाला (रोमकरांस 5:6-8), आणि परमेश्वर ख्रिस्तामध्यें पुरस्कारहि बनला (रोमकरांस 5:11).

सुवार्ता ही आनंदाची बातमी आहे कीं देवानें आपल्यासाठीं देवाचा सार्वकालिक आनंद खंडणी देऊन विकत घेतला आहे.

8 August : सर्व सृष्टीचा अधिपती

Alethia4India
Alethia4India
8 August : सर्व सृष्टीचा अधिपती
Loading
/

पदरात चिठ्ठ्या टाकतांत, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून होतो. (नीतिसूत्रे 16:33)

आधुनिक भाषेत आपण ते ह्या शब्दांत मांडू शकतो, “फासा तर टेबलावर टाकला जातो, पण प्रत्येक बाजी व तिचा शेवट सर्वस्वी परमेश्वराकडून होतो.”

दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यांस, ह्या जगांत घडणारी अशी कोणतीही लहानांत लहान घटना नाहीं ज्यामागे देवाचा हेतूं नसावा वा जी तो स्वतः घडवून आणत नाहीं. “दोन चिमण्या दमडीला विकतांत कीं नाहीं? तथापि तुमच्या पित्याच्या आज्ञेवाचून त्यांतून एकही भूमीवर पडणार नाहीं. तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील मोजलेलें आहेत” (मत्तय 10:29-30).

तुमच्या शहरातील प्रत्येक फास, हजारो जंगलात भूमीवर पडणारी प्रत्येक लहानात लहान चिमणी – हे सर्व देवाच्या आज्ञेनुसार आहेंत.

योनाच्या पुस्तकात आपण वाचतो कीं परमेश्वर एका प्रचंड माशाला आज्ञा देतो कीं त्यानें एका पुरुषाला गिळंकृत करावें (1:17), तो एका झाडाला सावली द्यावयांस उगविण्याची आज्ञा देतो (4:6), व मग तो एका किड्याला ते झाड सुकविण्याची आज्ञा देतो (4:7).

मासे व किडे यांची सृष्टीच काय, तर तो याहीपेक्षा मोठ-मोठी कृत्यें आज्ञा देऊन करतो, जसे कीं आकाशातील तारे हें देवाच्या आज्ञेनुसार बाहेर येतांत व ते सर्व आपापल्या ठिकाणी स्थिर राहतांत.

आपलें डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केलें? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो; तो त्या सर्वांना नावांनी हाक मारतो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकीं कोणी उणा पडत नाहीं. (यशया 40:26)

तर मग, या जगात घडणाऱ्या नैसर्गिक घटना किती विशेषकरून त्याच्या आज्ञेप्रमाणें घडून येत असतील– मग ते हवामान असो, विपत्ती असोत वा रोगराई, मनुष्याचे अपंगत्व असो वा मरण.

आपली व्यवस्था तो अंमलात आणतो;

सर्व तारे त्याच्या आज्ञेने गतिमान

सूर्य आपल्या कक्षेत त्याची आज्ञा पाळून चमकतो;

टेकड्या व पर्वत,

नद्या व झरे,

महासागराच्या खोलीही

त्याचे परमेश्वरत्व जाहिर करतांत.

(“ज्यांत काहीं जीवन आहे, ते सर्व,” कॅथरीन डेव्हिस)

यास्तव, ज्याअर्थी आपल्याला हे ठाऊक आहे कीं कोणतीही नैसर्गिक घटना देवाचे ज्ञान व त्याच्या सत्संकल्पानुसार असून त्यां त्याच्या आज्ञेच्या बाहेर नाहींत,  तर आपण परम आदराने भयभीत होऊन शांत राहू या.

7 August : निर्मितीचा उद्देश्य

Alethia4India
Alethia4India
7 August : निर्मितीचा उद्देश्य
Loading
/

देवानें आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केलीं. (उत्पत्ति 1:27)

देवानें मनुष्यांना यासाठीं आपल्या प्रतिरूपाचे निर्माण केलें कीं हे संपूर्ण जग देवाचे प्रतिबिंब दाखविणाऱ्या परिवर्तकांनी भरून जावें. म्हणजें देवाच्या प्रतिरूपांनी भरून जावें. देवाच्या सात अब्ज प्रतिरूपांनी भरून जावें. हेतू हा कीं कोणीही निर्मितीचा उद्देश्य पूर्ण करण्यांस चुकू नये.

कोणीही मनुष्य (जोपर्यंत काहींना पाषाणरूपी अंतकरणामुळें आंधळे करून सोडून दिलें जात नाहीं) मानव-अस्तित्वाचा उद्देश्य समजण्यांस चुकू शकत नाहीं, म्हणजें देव — त्याला ओळखणें, त्याजवर प्रीति करणें, व तो कसा आहे हे त्याच्या प्रतिरूपावरून दाखवून देणें. यशया 6:3 मध्यें देवाचे दूत जल्लोष करतांत, “पवित्र, पवित्र, पवित्र, सेनाधीश परमेश्वर! त्याच्या गौरवाने सर्व पृथ्वी भरून गेली आहे!” पृथ्वी अशा कोट्यवधी मनुष्यांनी भरलेली आहे ज्यांना देवाच्या प्रतिरूपाचा निर्माण करण्यांत आलें होते. गौरवाने सुशोभित.

पण फक्त मानवच नाहीं, तर निसर्गहि! आपल्या वास्तव्यासाठीं असे चित्तथरारक जग अस्तित्वांत का आहे? हे इतके अफाट विश्व कशासाठीं?

एकदा माझ्या असें वाचण्यांत आलें कीं मानवांनी जितके शब्द आजवर बोललें असतील त्यापेक्षा असंख्य तारे व ग्रह या विश्वात आहेत. इतके का आहेत? हे विश्व इतके अफाट का आहे? इतके तेजस्वी का आहे? आणि ते एकमेकांपासून इतक्या अकल्पनीय अंतरावर का आहेंत? बायबल याविषयी निर्विवादपणें स्पष्ट उत्तर देते: “आकाश देवाचा महिमा वर्णिते” (स्तोत्र 19:1).

जर कोणी असा प्रश्न विचारला कीं, “पृथ्वी हाच जर एकमेव लोकवस्ती असलेला ग्रह आहे आणि ताऱ्यांमध्यें केवळ मनुष्य हाच एकमेव बुद्धिमान प्राणी आहे, तर एवढे मोठे आणि रिकामे विश्व का?” उत्तर आहे: विषयवस्तु आपण स्वतः नाहीं. देव मुख्य विषयवस्तु आहे. यावर अधिक जोर देऊन भाष्य केलें जाऊ शकत नाहीं. तो सर्वांत गौरवी आहे. महापराक्रमी आहे. तो सर्वत्र आहे. सर्व आकाशगंगा एकत्रित करण्यांत आल्या तरी त्याचे तेज अद्वितीय आहे. कोणी एका ज्ञानी मनुष्यानें असे म्हटलें, कीं विश्व हे शेंगदाणासारखे आहे जे देव खिशात घेऊन फिरतो.

देवानें आपल्याला यासाठीं निर्माण केलें कीं आपण त्याला ओळखावें, त्याच्यावर प्रीति करावीं व त्याचे वैभव दाखवून द्यावें. मग त्यानें आपल्याला तो कसा आहे याविषयीचा संकेत दिला : म्हणजें हे विश्व.

6 August : येशूनें तुमची विश्वासाची चिकाटी विकत घेतलीं

Alethia4India
Alethia4India
6 August : येशूनें तुमची विश्वासाची चिकाटी विकत घेतलीं
Loading
/

“हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जो तुमच्यासाठीं ओतला जात आहे.” (लूक 22:20)

या शास्त्रपाठाचा अर्थ असा कीं, नवा करार, ज्याचे अभिवचन यिर्मया 31 आणि 32 मध्यें अगदी स्पष्टपणें देण्यांत आलेंलें आहे, हा येशूच्या रक्ताने साध्य केला गेला व शिक्कामोर्तब केला गेला. नवा करार देवाच्या त्यां लोकांसाठीं खरा ठरतो जे मशीहा, म्हणजें ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवतांत, कारण तो करार स्थापित करण्यासाठीं येशू मरण पावला.

आणि जें ख्रिस्ताचे आहेत त्यां सर्वांसाठीं हा नवा करार काय साध्य करतो? शेवटपर्यंत विश्वासात टिकून ठेवणारी चिकाटी.

यिर्मया 32:40 मध्यें काय म्हणतों, ऐका,

“आणि मी त्यांच्याशी सर्वकाळचा करार करीन; तो असा कीं मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाहीं; मी आपलें भय त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजें ते माझ्यापासून माघार घेणार नाहींत.”

सार्वकालिक करार — नवा करार — ह्यामध्यें हे अनुल्लंघनीय व अविनाशी अभिवचन समाविष्ट आहे, “मी आपलें भय त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजें ते माझ्यापासून माघार घेणार नाहींत.” ते माघार घेऊं शकणार नाहींत. ते माघार घेणारहि नाहींत. ख्रिस्तानें आपल्या रक्ताने या करारावर शिक्कामोर्तब केलें. जर तुम्हीं विश्वासाद्वारे येशू ख्रिस्तामध्यें आहांत तर त्यानें तुमची विश्वासाची चिकाटी विकत घेतली आहे.

जर तुम्हीं आज विश्वासात टिकून आहांत तर त्याचे संपूर्ण श्रेय येशूच्या रक्ताला जाते. तुमचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठीं तुमच्यामध्यें कार्यरत असलेला पवित्र आत्मा, येशूनें जे विकत घेतलें आहे त्याचा सर्वदा सन्मान करतो. देव जो पुत्र ह्याने आपल्यासाठीं जे साध्य केलें ते देव जो आत्मा हा आपल्यामध्यें तें घडवून आणतो. देव-पित्यानें ते योजिलें. येशूनें ते विकत घेतले. आत्मा ते लागू करतो – त्यांपैकीं प्रत्येक न चुकता.

देव रक्ताने विकत घेतलेल्या त्याच्या सर्व लेकरांची चिकाटी आणि सार्वकालिक सुरक्षा यांसाठीं पूर्णपणें वचनबद्ध आहे.

5 August : “याव्हे” ला परिभाषित करणाऱ्या 10 गोष्टी

Alethia4India
Alethia4India
5 August : “याव्हे” ला परिभाषित करणाऱ्या 10 गोष्टी
Loading
/

आणखी देवानें मोशेला सांगितले, “तू इस्राएल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला तुमच्याकडें पाठवले आहे; हेच माझे सनातन नाव आहे व ह्याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल..” (निर्गम 3:15)

इंग्रजी बायबलमध्यें देवाचे हिब्रू मधील नाव जवळजवळ नेहमीच लॉर्ड (LORD) असे भाषांतरित केलें जाते. पण हिब्रूचा उच्चार “याव्हे” असा आहे आणि त्याचे मूळ “मी आहे” ही अभिव्यक्ती आहे.

म्हणून जेव्हां जेव्हां आपण यहोवा किंवा याव्हे हा शब्द ऐकतो किंवा इंग्रजी बायबलमध्यें जेव्हां जेव्हां आपण LORD हा शब्द पाहतो त्यां प्रत्येक वेळी आपण हे लक्षांत ठेवावें : हे एक विशेषनाम आहे (जसे कीं पेत्रस किंवा योहान) जो “मी आहे” या अभिव्यक्तीपासून बनलेला आहे आणि हे विशेषनाम (संज्ञा) प्रत्येक वेळी आपल्याला याची आठवण करून देते कीं देव हांच अंतीम व परम आहे.

“मी आहे” हे विशेषनाम (संज्ञा) देवाविषयी किमान 10 गोष्टींची अभिव्यक्ती करते :

1. त्याला कधीही प्रारंभ नव्हता. जवळजवळ सर्वच मुले आपल्या आई-वडिलांना हा प्रश्न विचारतांत, “देवाला कोणी बनवले?” आणि प्रत्येक सुजाण आई-वडील उत्तर देतांत, “देवाला कोणीहि बनवले नाहीं. देव फक्त आहे, तो सर्वदा होता, त्याचा कधीही आरंभ झाला नव्हता.”

2. देवाचा कधीही अंत होणार नाहीं. त्याला जर आरंभ नव्हताच तर त्याला अंत देखील नसणार, कारण तो आहे.

3. देव हे अद्वितीय वास्तव आहे. त्याच्याबरोबरीचा दुसरा असा वास्तव कोणी नाहीं. त्याच्या बाहेर कोणतेही वास्तव अस्तित्वात नाहीं जोपर्यंत तो स्वतः ते अस्तित्वांत आणू इच्छित नाहीं व त्याची निर्मिती करित नाहीं. सनातन काळापासून तोच आहे. अंतरीक्ष नव्हते, विश्व नव्हते, शून्यता नव्हती. फक्त देव.

4. देव पूर्णपणें स्वतंत्र आहे. त्याला अस्तित्वात आणण्यासाठीं किंवा त्याला पाठिंबा देण्यासाठीं किंवा त्याला सल्ला-मसलत देण्यासाठीं किंवा तो जो आहे असे त्याला बनवण्यासाठीं तो कशावरही अवलंबून नाहीं.

5. जे काहीं देव नाहीं ते सर्व पूर्णपणें देवावर अवलंबून आहे. संपूर्ण विश्व हे पूर्णपणें निर्माण केलेंलें असे दुय्यम दर्जाचे अस्तित्व आहे. ते देवानें अस्तित्वात आणलें व आपलें अस्तित्व कायम ठेवण्यासाठीं ते क्षणोक्षणी देवाच्या निर्णयावर अवलंबून राहते.

6. देवाबरोबर जर तुलना केलीं तर संपूर्ण विश्व हे काहींच नाहीं. ज्याप्रमाणें सावली ही वस्तूमुळें अस्तित्वात येते त्याप्रमाणें प्रत्येक संभाव्य व अवलंबून असलेलें वास्तव हे परम व स्वतंत्र वास्तवामुळें अस्तित्वांत येते. ज्याप्रमाणें प्रतिध्वनी ही गडगडाटामुळें आहे अगदी त्याप्रमाणें. जगात आणि आकाशगंगांमध्यें जे काहीं आहे व जें पाहून आपण आश्चर्यचकित होतो, ते सर्व देवाच्या तुलनेत काहींच नाहीं.

7. देव स्थिर आहे. तो काल, आज आणि सर्वकाळ सारखाच आहे. त्याचा विकास होत नाहीं. तो पुढे वाढत जाऊन वेगळं काहीं बनत नाहीं. तो जो आहे तो आहे.

8. देव सत्य आणि चांगुलपणा आणि सौंदर्य यांचा परिपूर्ण मानक व परिभाषक आहे. असे कोणतेही कायद्याचे पुस्तक नाहीं जें वाचून तो योग्य काय आहे हे जाणून घेतो. सत्याची स्थापना करण्यासाठीं त्याजकडें कोणतीही गुरुकिल्ली नाहीं. उत्तम काय होईल किंवा योग्य काय होईल हे ठरवण्यासाठीं त्याच्याकडें कोणतीही समिती नाहीं. काय बरोबर आहे, काय सत्य आहे, काय सुंदर आहे हे सर्व तो स्वतः ठरवतो, आणि तोच त्यां सर्वांचा परिभाषक आहे.

9. देवाच्या इच्छेस जे येते तेच तो करतो आणि ते नेहमीच बरोबर, नेहमीच सुंदर व नेहमी सत्यनुरूप असते. त्याच्या बाहेर असलेली सर्व वास्तविकता त्यानें तयार केलीं आणि घडवली, आणि परम व अंतीम सत्य म्हणून तोच त्यावर सार्वभौम आहे. म्हणून तो आपल्या सुइच्छेच्या संकल्पानुसार नसलेली कोणतीही गोष्ट अस्तित्वांत आणण्याच्या प्रत्येक बंधनांपासून पूर्णपणें मुक्त आहे.

10. देव हा विश्वातील सर्वात महत्वाचे आणि सर्वात मौल्यवान सत्य आणि व्यक्ती आहे. तो इतर सर्व वास्तविकतेच्या तुलनेंत आपल्या स्वारस्य आणि केंद्र आणि प्रशंसा आणि आनंद यांस अधिक पात्र आहे, संपूर्ण विश्वाच्या तुलनेंत देखील.

4 August : देवाच्या विश्वासूपणा इतकेंच सुरक्षित

Alethia4India
Alethia4India
4 August : देवाच्या विश्वासूपणा इतकेंच सुरक्षित
Loading
/

ज्यांना त्यानें आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्यानें पाचारणही केलें. ज्यांना त्यानें पाचारण केलें त्यांना त्यानें नीतिमानही ठरवले; आणि ज्यांना त्यानें नीतिमान ठरवले त्यांचा त्यानें गौरवही केला. (रोमकरांस 8:30)

देवानें ज्यांना सनातनकाळांत आगाऊ नेमून ठेवले आणि जेव्हां देव येणाऱ्या अनंतकाळांत ज्यांचे गौरव करील या दरम्यान कोणीही गमावला जाणार नाहीं.

जो कोणी देवाची संतती होण्यासाठीं आगाऊ नेमून ठेवण्यांत आलेंला आहे तो त्यासाठींच्या पाचारणांस मुकणार नाहीं. आणि ज्या कोणाला पाचारण केलें जाते तो नीतिमान ठरविल्यावांचून राहणार नाहीं, आणि जो कोणी नीतिमान ठरविला जातो त्याचे गौरव झाल्यावांचून राहणार नाहीं. ही देवाचा आपल्या कराराशी असलेल्या विश्वासूपणाची अतूट पोलादी साखळी आहे.

यास्तव पौल म्हणतो,

ज्याने तुमच्या ठायीं चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे. (फिलिप्पै 1:6)

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्हीं निर्दोष ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हांला दृढ राखील. ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे. (1 करिंथ 1:8-9)

ही आपल्या देवाची अभिवचने आहेत ज्याला खोटे बोलणें अशक्य आहे. ज्यांचा नव्याने जन्म होतो ते सर्व तितकेंच सुरक्षित आहेंत जितका कीं देवाचा विश्वासूपणा.

3 August : तुमच्या शरीराचा हेतू

Alethia4India
Alethia4India
3 August : तुमच्या शरीराचा हेतू
Loading
/

कारण तुम्हीं मोलाने विकत घेतलेले आहात; म्हणून तुम्हीं आपलें शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा. (1 करिंथ 6:20)

देवानें या भौतिक विश्वाची निर्मिती अविचाराने केलीं नाहीं. त्यामागे त्याचा उद्देश होता, तो म्हणजें, असे निरनिराळे निमित्त उदयांस आणणें जेणेंकरून त्याचा महिमा वाढावा आणि तो अधिक तेजस्वीपणें प्रकट केला जावा. “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते” (स्तोत्र 19:1).

देवानें याच कारणासाठीं निर्माण केलेंल्या इतर सर्व भौतिक गोष्टींच्या त्याच श्रेणीत आपली शरीरे देखील सुसंगतपणें बसतांत. मानव प्राणी व मानव शरीर यांद्वारे स्वतःचा गौरव करून घेण्याच्या मूळ आपल्या उद्देशापासून तो माघार घेणार नाहीं.

देव आपल्या कुजलेल्या, पापाने डागाळलेल्या शरीराला पुनरुत्थान पावलेले शरीर बनविण्यासाठीं, जेणेंकरून त्या शरीराने गौरव आणि अमरत्व धारण करावे, तो त्याचे हात घाण करणारे कष्ट का घेतो? उत्तर : कारण त्याच्या पुत्राने मृत्यूची खंडणी दिली जेणेंकरून या भौतिक विश्वासाठीं त्याच्या पित्याचा उद्देश पूर्णतेस जावा, तो म्हणजें, त्यां भौतिक वस्तूंमध्यें ज्यांत आपली शरीरेही आहेत, अनंतकाळासाठीं त्याचा महिमा व्हावा.

यास्तव आपला शास्त्रलेख असे म्हणतो : “कारण तुम्हीं मोलाने विकत घेतलेले आहात [म्हणजें, त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे]. म्हणून तुम्हीं आपलें शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा.” देव त्याच्या पुत्राने जें केलें त्याकडें दुर्लक्ष करणार नाहीं वा अनादर करणार नाहीं. आपली शरीरे मेलेल्यांतून उठवून देव त्याच्या पुत्राच्या कार्याचा गौरव करेल आणि आपण आपल्या शरीराचा उपयोग सर्वकाळ त्याचे गौरव करण्यासाठीं करू.

म्हणूनच आता तुम्हांला शरीर आहे. आणि म्हणूनच ते ख्रिस्ताच्या गौरवी शरीराचे स्वरूप धारण करण्यासाठीं पुन्हा उठविले जाईल.

2 August : यापुढे मरणाचे भय नाहीं

Alethia4India
Alethia4India
2 August : यापुढे मरणाचे भय नाहीं
Loading
/

ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. (इब्री 2:14-15)

ख्रिस्त आपल्याला मृत्यूच्या भीतीपासून बंधमुक्त करून “धन-वैभव नाहींसे हो, कीं सोडून जावोत सर्व आप्तजन, कीं नश्वर जीवनहि लयास जावो” अशा प्रीतियुक्त त्यागाच्या मानसिकतेचे जीवन जगण्यांस कसे स्वतंत्र करतो?

ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती

“मुले” हा शब्द यापूर्वीच्या वचनातून घेतलेला आहे जो मुक्तिदाता ख्रिस्ताच्या आध्यात्मिक संततीचे सूचक आहे. ही “देवाची लेकरें” देखील आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झालें तर, देवानें ख्रिस्ताला पाठविले तेव्हां त्याचा मुख्य उद्देश्य आपल्या “मुलांचे” तारण करणें हाच होता. “ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती. . . “

त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला.

देवाचा पुत्र, जो देही होण्यापूर्वी सनातन शब्द म्हणून होता (योहान 1:1), तो रक्तमांसाचा झाला व त्याच्या देवपणाने मानवरूप परिधान केलें. तो पूर्ण मनुष्य बनला, त्याचवेळी पूर्णतः देव म्हणूनही कायम होता.

कीं मरणाने. . .

ख्रिस्त मानव झाला तो मरण्यासाठीं. देही होण्यापूर्वी, देव म्हणून पापी लोकांसाठीं मरणें त्याला शक्य नव्हतें. पण रक्तमांसाचा झाल्यावर, त्याला ते शक्य झालें. मरण हेच त्याचे ध्येय होते. त्यामुळें त्याला नश्वर मानव रूपांत जन्म घ्यावा लागला.

हेतू हा कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला…..शून्यवत करावे. . .

ख्रिस्त मेला तेव्हां त्यानें सैतानाचा पराभव केला. तो कसा? आपली सर्व पापें दूर करून (इब्री 10:12). याचा अर्थ असा कीं देवासमोर आपल्यावर दोषारोप ठेवण्यासाठीं सैतानाकडें कोणतीही कायदेशीर तर्कबुद्धी नाहीं. “देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे” (रोमकरांस 8:33). तो कोणत्या आधारावर आम्हांला नीतिमान ठरवतो? येशूच्या रक्ताद्वारे (इब्री 9:14; रोमकरांस 5:9).

सैतान आपल्याविरुद्ध जें शेवटचे शस्त्र उपयोगांत आणतो तें म्हणजें आमची स्वतःची पापें. येशूच्या मृत्यूने जर ते दूर केलें गेलें आहे तर सैतानाचे मुख्य शस्त्र त्याच्या हातातून हिसकावून त्याला निशस्त्र करण्यांत आलें आहे. त्या अर्थाने, तो शून्यवत झाला आहे.

आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे.

तर मग, आता आपण मरणाच्या भयापासून मुक्त झालेंलें असें आहोत. देवानें आपल्याला नीतिमान ठरवले आहे. आपल्यासमोर आहे ती फक्त भावी कृपा. सैतान देवाचा हा विधिलेख रद्द करू शकत नाहीं. ही सार्वकालिक सुरक्षा लगेच आपल्या जीवनावर कार्यकारी व्हावी अशी देवाची इच्छा आहे. हेतू हा कीं, त्यानें वर्तमान समयी आपल्याला दास्याच्या व भीतीच्या बंधनातून मुक्त करावे व शेवट पूर्णानंदाने  व्हावा.