कारण मला तर जगणें हे ख्रिस्त आणि मरणें हा लाभ आहे. (फिलिप्पै 1:21)
मरणें हे “लाभ” कसे आहे?
- आमचे आत्मे सिद्ध केले जातील (फिलिप्पै 1:21).
पण तुम्हीं सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजें स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात;
आमच्याठायीं आणखी पाप नसेल. आमचे आंतरिक युद्ध आणि ज्याने आमच्यावर प्रीति केली आणि स्वतःस आमच्यासाठीं दिलें त्या प्रभूस दुखविणाऱ्या हृदयविदारक निराशा समाप्त होतील.
- आम्हास या जगाच्या दुःखापासून सुटका मिळेल (लूक 16:24-25).
आम्हांला पुनरुत्थानाचा आनंद जरी त्वरित मिळणार नसला, तरी वेदनांपासून मुक्तीचा आनंद आम्हास लाभेल. मृत्यूच्या वेळी घडून येणारे एक मोठे परावर्तन दाखविण्यासाठीं येशूनें लाजर आणि श्रीमंत माणसाची गोष्ट सांगतली.
तेव्हा [श्रीमंत माणसानें] हाक मारून म्हटले, ‘हे बापा अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, ह्यासाठीं की त्यानें आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे.’ अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस.
- आमच्या जीवनास भरपूर विश्रांती दिली जाईल (प्रकटी 6:9-11).
डोळ्याखाली एक धीरगंभीरपणा आणि परमेश्वराची जपणूक असेल जी सर्वात शांत जलाशयाजवळील सर्वात कोमल उन्हाळ्याच्या सायंकाळी आम्हांला लाभणाऱ्या कोणत्याही सर्वात मोठ्या आनंदाच्या क्षणापेक्षा श्रेष्ठ असेल.
त्यानें पाचवा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले; ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहींस आणि पृथ्वीवर राहणार्या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहींस?” तेव्हा त्या प्रत्येकाला एकेक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना असें सांगण्यात आले की……तुम्हीं आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या.
- प्रभूसह गृहवास करणें हे आम्हीं अनुभवू करू (2 करिंथ 5:8).
आम्हीं धैर्य धरतो, आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणें हे आम्हांला अधिक बरे वाटते.
संपूर्ण मानवजातीस परमेश्वराच्या घराची आस लागलेली आहे. जेव्हा आपण ख्रिस्ताकडे घरी जाऊ तेव्हा कधी जाणली नाहीं अशी सुरक्षा आणि शांती यांच्या पलीकडे समाधान असेल.
- आपण ख्रिस्तासोबत असू (फिलिप्पै 1:21-23).
ख्रिस्त पृथ्वीवरील कोणत्याही व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. तो त्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा अधिक बुद्धिमान, अधिक बलवान, आणि अधिक दयाळू आहे ज्याच्यासोबत वेळ घालविण्यात तुम्हांला आनंद येतो. तो अतिशय चित्तवेधक आहे. त्याच्या निमंत्रित पाहुण्यांस शक्य तितका आनंद देण्यासाठीं दर क्षणी काय केले पाहिजे आणि काय म्हटले पाहिजे हे तो निश्चितपणें जाणतो. त्याची प्रीति ओसंडून वाहते आणि त्याच्या प्रियजनांनी ती प्रीति जाणावी म्हणून त्या प्रीतिचा कसा उपयोग करावा याचे त्याला अमर्याद ज्ञान आहे. यास्तव पौलाने म्हटले,
कारण मला तर जगणें हे ख्रिस्त आणि मरणें हा लाभ आहे. पण जर देहात जगणें हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाहीं. मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे.