त्याच्यावर तुम्हीं ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो. (1 पेत्र 5:7).
तुम्हांला जे जे पाप करण्याचा मोह होतो त्या प्रत्येक पापासाठीं आणि तुमच्यांवर अचानक येऊन पडणाऱ्या आणि तुम्हांला घाबरवून टाकणाऱ्या अविश्वासाच्या प्रत्येक स्वरूपासाठीं एक अभिवचन आहे. उदाहरणार्थ:
जेव्हा मी आजारी पडण्याविषयी घाबरून जातो, तेव्हा मी स्तोत्र 34:19 मधील अभिवचन घेऊन अविश्वासाला लढा देतो. नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो स्तोत्र 34:19. आणि मी भीत भीत व कापत कापत हे अभिवचन घेतो, “आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते; आणि ‘आशा लाजवत नाहीं;’ कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतिचा वर्षाव झाला आहे” (रोमकरांस 5:3-5).
जेव्हा मी म्हातारा होत चाललोय याविषयी चिंतातूर होतो, तेव्हा मी यशया 46:4 मधील हे अभिवचन घेऊन अविश्वासाला लढा देतो : “तुमच्यां वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांला वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागवणारा मीच आहे, मी खांद्यांवर वागवून तुमचा बचाव करीन.”
जेव्हा मला मरणाची भीती वाटते, तेव्हा मी रोमकरांस 14:7-9 मधील हे अभिवचन घेऊन अविश्वासाला लढा देतो : “कारण आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाहीं आणि कोणी स्वतःकरता मरत नाहीं. कारण जर आपण जगतो तर प्रभूकरता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. कारण ख्रिस्त ह्यासाठीं मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की, त्यानें मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.”
जेव्हा मला चिंता वाटते की माझ्या विश्वासाचे जहाज बुडून जाईल व मी देवापासून मागे फिरून जाऊ शकतो तेव्हा मी फिलिप्पै 1:6 आणि इब्री 7:25 मधील ही अभिवचनें घेऊन अविश्वासाला लढा देतो : “ज्याने तुमच्यां ठायीं चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे.” “ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्यांना पूर्णपणें तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठीं मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.”
म्हणून, चला तर आपण विश्वासाचे जे सुयुद्ध ते लढू या, इतर लोकांशी नव्हे, तर आपल्या स्वतःच्या अविश्वासाशी. हे चिंतेचे मूळ आहे, जे परिणामी इतर पुष्कळ पापांना जन्म देते.
म्हणून, परमेश्वराच्या बहुमूल्य आणि थोर अभिवचनांवर आपण आपली दृष्टी लावू. पवित्र शास्त्र घ्या, पवित्र आत्म्याचे सहाय्य मागा, ती अभिवचने तुमच्यां अंतःकरणात साठवून ठेवा आणि उत्तम लढा द्या – जेणेंकरून तुम्हीं भविष्यातील कृपेत विश्वास ठेऊन जिवंत असावें.