आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. (इफिस 4:24).
ख्रिस्ती विश्वास म्हणजें बदल शक्य आहे. खोल, मूलभूत बदल. कधीकाळी तुम्हीं निष्ठुर आणि असंवेदनशील होता पण आता अंत:करणाने सौम्य बनणें शक्य आहे. कडूपण आणि राग यांच्या वर्चस्वाखालून बाहेर निघणें शक्य आहे. तुमची पार्श्वभूमी कांहींही असेंना, एक प्रेमळ व्यक्ती बनणें शक्य आहे.
पवित्र शास्त्र असें गृहित धरते की आम्हांला जसे लोक असायला पाहिजें तसे लोग आम्हांला बनविण्यात परमेश्वराचा विचार निर्णायक आहे. पवित्र शास्त्र अत्यंत स्पष्टपणें म्हणते, “सर्व प्रकारचे कडूपण… तुमच्यांपासून दूर करण्यात येवोत” आणि “कनवाळू व्हा” (इफिस 4:31-32). ते असें म्हणत नाहीं, “जर तुम्हांला करता येत असेल तर . . किंवा, “जर तुमचे आईवडिल अंत:करणाने सौम्य असतील तर . . . ” किंवा, “जर तुमच्यांशी भयंकर दुर्व्यवहार झाला नसेल तर . . . ” ते म्हणते, “कनवाळू व्हा.”
हे अद्भुतरित्या स्वतंत्र करणारे सत्य आहे. बदल माझ्यासाठीं अशक्य आहे ह्या भयानक नशीबवादातून हे आम्हास मुक्त करते. हे मला त्या मानसिकतेपासून मुक्त करते जी म्हणते कीं माझे भवितव्य माझ्या पार्श्वभूमीवर अवलंबून आहे.
शिवाय, परमेश्वराच्या आज्ञा ह्या नेहमी स्वतंत्र करणाऱ्या, जीवन बदलणाऱ्या सत्याचे प्रकटीकरण देतांत ज्यांवर आम्हांला विश्वास ठेवायचा असतो. उदाहरणार्थ,
- परमेश्वराने आम्हास आपली लेकरें म्हणून दत्तक घेतले आहे. आता आमचा एक नवीन पिता आणि आमचे एक नवीन कुटुंब आहे. हे “मूळ-कुटुंबाच्या” दैववादी बळांना पाडून टाकते. “पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे.” (मत्तय 23:9).
- परमेश्वर आमच्यावर आपल्या मुलांप्रमाणें प्रीति करतो. आम्हीं “प्रिय मुले” आहोत (इफिस 5:1). देवानें जशी तुम्हांवर प्रीति केलीं तशीच तुम्हींही एकमेकांवर प्रीति करा ही आज्ञा हवेत उडून जाणारा भुसा नाहीं, ती सामर्थ्यानें येते: “देवाची प्रिय मुले ह्या नात्यानें तुम्हीं त्याचे अनुकरण करणारे व्हा.“ “प्रीति” आज्ञा आहे आणि देवानें आम्हांवर प्रीति करणें हे सामर्थ्य आहे.
- देवानें आम्हास ख्रिस्ताठायीं क्षमा केली आहे. तुम्हीं एकमेकांबरोबर कनवाळू व्हा; जशी देवानें ख्रिस्ताच्या ठायीं तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हींही एकमेकांना क्षमा करा. (इफिस 4:32). परमेश्वराने ख्रिस्ताठायीं जे केले ते सामर्थ्यशाली आहे. त्याद्वारे बदल शक्य होतो. सौम्य मनाचे व्हां ह्या आज्ञेचा संबंध तुमच्यां आईने अथवा तुमच्यां वडिलांनी तुमच्यांसाठीं जे कांहीं केले त्यापेक्षा परमेश्वराने तुमच्यांसाठीं जे कांहीं केले त्याच्याशी आहे. या प्रकारच्या आज्ञेचा अर्थ आहे तुम्हीं बदलू शकता.
- आणि ख्रिस्तानें तुमच्यांवर प्रीति केली आणि स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिलें, “आणि ख्रिस्तानें तुमच्यांवर प्रीति केली त्याप्रमाणें तुम्हींही प्रीतिने चाला” (इफिस 5:2). ही आज्ञा जीवन बदलणारे सत्य घेऊन येते. “ख्रिस्तानें तुमच्यांवर प्रीति केली.” त्या क्षणी जेव्हा प्रीति करण्याची संधी असते, आणि कुठलातरी स्वर म्हणतो, “तुम्हीं प्रेमळ व्यक्ती नाहीं,” तुम्हीं म्हणू शकता, “माझ्यावरील ख्रिस्ताची प्रीति मला एक नवीन प्रकारची व्यक्ती बनवते. प्रीति करण्याची त्याची आज्ञा माझ्यासाठीं निश्चितच शक्य आहे कारण त्याच्या प्रीतिचे अभिवचन माझ्यासाठीं खरे आहे.”
दैववादी नशिबाला मानणारे असू नका. ख्रिस्ती असा. बदल शक्य आहे. परमेश्वर जिवंत आहे. ख्रिस्त मेलेल्यांतून जिवंत झाला आहे. अभिवचने खरी आहेत.