23 November : जेव्हा परमेश्वर आपलीच शपथ वाहतो

Alethia4India
Alethia4India
23 November : जेव्हा परमेश्वर आपलीच शपथ वाहतो
Loading
/

त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळें त्यानें ‘आपलीच शपथ वाहून’ म्हटलें कीं, “मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन.” (इब्री 6:13-14)

एक आत्मा आहे ज्याचे मोल आणि आदर आणि प्रतिष्ठा आणि महानता आणि थोरवी आणि सौंदर्य आणि ख्याती ही इतर सर्व संयुक्त केलेंल्या मूल्यांपेक्षा अमूल्य असें आहे – दहा हजार पटींपेक्षा जास्त – तो म्हणजें स्वतः परमेश्वर. म्हणून, जेव्हा परमेश्वर शपथ वाहतो, तो ती स्वतःची शपथ वाहतो.

जर तो आणखी उंच जाऊ शकला असता, तर तो आणखी उंच गेला असता. का? यासाठीं कीं त्यानें तुम्हांला तुमच्यां आशेविषयी अधिक बळकटी व उत्तेजन द्यावें. स्वतःची शपथ वाहतांना परमेश्वर असें म्हणतो कीं आम्हांला आशीर्वाद देण्याचे आपलें अभिवचन मोडणें त्याच्यासाठीं तितकेच अशक्य आहे जितके कीं त्याच्यासाठीं स्वतःला तुच्छ मानणें अशक्य आहे.

या विश्वात देवाचे मोल सर्वाधिक आहे. परमेश्वरापेक्षा अधिक मौल्यवान किंवा अद्भुत असा कोणी नाहीं. म्हणून, परमेश्वर परमेश्वराचीच शपथ वाहतो. आणि असें करतांना तो म्हणतो, “तुमच्यांसाठीं माझा हेतू हा आहे कीं तुम्हीं शक्य होईल तितका माझ्याठायीं विश्वास ठेवावा.” कारण जर यापेक्षा अधिक शक्य असते, तर इब्री 6:13 म्हणते कीं त्यानें आम्हास तेहि दिलें असते. “त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळें त्यानें ‘आपलीच शपथ वाहून’ म्हटलें.”

लक्षांत घ्या, हा आमचा परमेश्वर आहे, असा परमेश्वर जो तुम्हांला त्याच्याठायीं अढळ आशा ठेवण्यास प्रेरणा देण्यासाठीं जितके उंच जाता येईल तितके उंच जातो. म्हणून, आश्रयाला परमेश्वराकडे धाव घ्या. जगाच्या सर्व बाह्य आणि स्वतःहून अपयशी ठरणाऱ्या आशांपासून दूर व्हा, आणि परमेश्वरावर आपला भाव ठेवा. आश्रय आणि आशेचा खडक म्हणून परमेश्वरासारखा कोणी नाहीं आणि कांहींही नाहीं.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *