ArchivesSolid Joys

9 September : कृपा ही विनामूल्य असावी हे आवश्यक आहे

Alethia4India
Alethia4India
9 September : कृपा ही विनामूल्य असावी हे आवश्यक आहे
Loading
/

तुला निराळेपण कोणी दिलें? आणि जे तुला दिलेंले नाहीं असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेंले असता, दिलेंले नाहीं असा अभिमान तू का बाळगतोस? (1 करिंथ 4:7)

तुम्हीं ज्या घरांत राहता त्या घराप्रमाणें तारणाचे चित्रण उभारा.

ते तुमचे संरक्षण करते. त्यात तुम्हीं आपल्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंचा साठा ठेवता ज्यामुळें त्यां वस्तू टिकून राहतांत. ते कधीही कुजत नाहीं किंवा त्याचा चुराडाही होत नाहीं. त्याच्या खिडक्या अशा दिशेनें उघडतांत जिथून तुम्हांला अशा वैभवाचा कळस दिसून येतो जो पाहून तुम्हांला सार्वकालिक संतुष्टी मिळते.

देवानें ते खुद्द स्वतःचे आणि त्याचा प्रिय पुत्र याचे प्रचंड मोल देऊन ते बांधले आणि त्यानें ते तुम्हांला विनामूल्य आणि लखलखीत अशा अवस्थेत दिलें.

या घराच्या “खरेदी” कराराला “नवा करार” म्हणतांत. त्यां कराराच्या अटींमध्यें असे लिहिले आहे: “जर तुम्हीं हे घर भेटवस्तू स्वरूपात स्वीकार करतां आणि पिता व पुत्र जे या घरात तुमच्याबरोबर वस्ती करतील त्यांच्याठायीं आनंद करतां तर हे घर तुमचे होईल आणि सर्वकाळासाठीं तुमचेच राहील. तुम्हीं इतर देवतांना आश्रय देऊन देवाच्या घराला अपवित्र करणार नाहीं किंवा इतर वस्तूंकडें आपलें मन वळवणार नाहीं, तर या घरात देवाच्या सहवासात आपलें सर्व समाधान शोधणार.”

या कराराला हो म्हणणें, पण नंतर मात्र त्या घराचे मासिक हप्ते भरण्यासाठीं या आशेने बँकेतून कर्ज घेणें कीं तुम्हीं या घरासाठीं किंमत मोजाल, हे मूर्खपणाचे ठरणार नाहीं का?

तुम्हीं त्यां घराला भेटवस्तू म्हणून मिळालेले नाहीं तर खरेदी करून मिळविलेले घर म्हणून मानाल. देव यापुढे विनामूल्य उपकार करणारा राहणार नाहीं. आणि तुम्हीं स्वतःला अशा विचित्र मागण्यांचे गुलाम बनवून घ्याल ज्यां त्यानें तुमच्यावर टाकण्याचे स्वप्नही पाहिले नव्हते.

जर कृपा ही विनामूल्य व्हावयाची असेल – जो कृपेचा खरा अर्थ आहे – तर आपल्याला त्या कृपेची परतफेड करावी लागेल अशी वागणूक आपण तिला देऊ शकत नाहीं.

8 September : देवाची परतफेड कशी करावी

Alethia4India
Alethia4India
8 September : देवाची परतफेड कशी करावी
Loading
/

परमेश्वराने माझ्यावर केलेंल्यां सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू? मी तारणाचा प्याला उंचावून परमेश्वराच्या नावाने हाक मारीन. त्याच्या सर्व लोकांसमोर, मी परमेश्वरास केलेंले नवस पूर्ण करीन. (स्तोत्र 116:12-14)

“परमेश्वराने माझ्यावर केलेंल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू” ही भाषा मला अस्वस्थ करते. “उपकाराची परतफेड” हे शब्द इतक्या सहजपणें असे सूचित करत असल्यासारखे जाणवतांत कीं कृपा जणू अशी आहे जिला देव आपल्याकडें गहाण ठेवतो. ती खरोखर औदार्यपूर्ण तर आहे, परंतु तुम्हांला तिची परतफेड करावी लागेल.

पौलाने प्रेषितांची कृत्ये 17:25 मध्यें असे म्हटले आहे, कीं “माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाहीं; कारण जीवन, प्राण व सर्वकाहीं तो स्वतः सर्वांना देतो.” दुसऱ्या शब्दांत सांगायचे झालें तर, तुम्हीं देवाला असे काहींही देऊ शकत नाहीं किंवा देवासाठीं असे काहींही करू शकत नाहीं जे त्यानें तुम्हांला आधीच दिलें नाहीं आणि जे त्यानें तुमच्यासाठीं आधीच केलें नाहीं.

1 करिंथ 15:10 मध्यें तुम्हीं हीच गोष्ट पुन्हा पाहूं शकतां, “तरी जो काहीं मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाहीं; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केलें, ते मी केलें असे नाहीं, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेने केलें.” तर मग आपलें कोणतेही काम देवाची परतफेड कधीही करू शकत नाहीं, कारण ते काम देखील देवाचे एक कृपादानच आहे. आपण देवासाठीं करत असलेले प्रत्येक काम आपल्यावर त्याच्या कृपेचे ऋण अधिकच वाढवत जाते.

ह्याप्रमाणें स्तोत्र 116 मध्यें नवस पूर्ण करण्याच्या कृतीला जी गोष्ट कर्जाची परतफेड केलीं जात आहे असा गैरसमज होण्याच्या धोक्यांपासून मुक्त ठेवते ती म्हणजें ही कीं “नवस पूर्ण करणें” ही खरे पाहता एक सामान्य परतफेड नाहीं, तर प्राप्त करून घेण्याची आणखी एक कृती आहे जी देवाच्या वर्तमान समयी होत असलेल्या कृपेला उंचाविते. नवस पूर्ण करणें हे आपल्या साधनसंपत्तीला उंचावत नाहीं.

“परमेश्वराने माझ्यावर केलेंल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू” या स्तोत्रकर्त्याने स्वतःला केलेंल्या प्रश्नाचे उत्तर “मी तारणाचा प्याला उंचावून परमेश्वराच्या नावाने हाक मारीन” हे आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, माझा तारणाचा प्याला भरून वाहावा अशी मी देवाकडें हाक मारतो. परमेश्वराची परतफेड करणें म्हणजें परमेश्वराकडून अधिक प्राप्त करत जाणें कीं जेणेंकरून परमेश्वराच्या अक्षय चांगुलपणाचे गौरव अधिकाधिक होईल.

तारणाचा प्याला उंचावून धरणें हे परमेश्वराचे संतुष्टीदायक तारण हातांत घेणें आणि त्यातुन पिणें आणि त्याची अधिक अभिलाषा धरणें होय. आपण हे पुढील वाक्यप्रयोगामुळें समजतो: “मी . . . परमेश्वराच्या नावाने हाक मारीन.” मी अधिक साहाय्यासाठीं धावा करीन. परमेश्वराने दया करून माझ्या हाकेकडें आपलें कान लाविलें त्या उपकाराची मी कशी परतफेड करू? उत्तरः मी पुन्हा त्याला हाक मारीन. मी देवाचे या गोष्टीसाठीं स्तवन करीन व त्याचा सम्मान करीन कीं त्याला माझ्याकडून कधीच कोणत्याही वस्तूची, कींबहुंना माझी देखील गरज पडत नाहीं, तर उलट जेव्हा मला त्याची गरज असते (जी माझी नित्य गरज आहे) तेव्हा तो सर्व वेळी माझे कल्याणच करत असतो.

मग स्तोत्रकर्ता आपलें तिसरे वक्तव्य बोलतो, “मी परमेश्वरास केलेंले नवस पूर्ण करीन.” पण तो आपलें केलेंले नवस पूर्ण कसे करील? ते नवस तो तारणाचा प्याला उंचावून व परमेश्वराच्या नावाने हाक मारून पूर्ण करील. म्हणजेंच, आपल्याला कायमस्वरूपी कृपेवर कृपा मिळत जाईल- सर्व भरून काढणारी अशी पुरेशी कृपा – या अभिवचनावरील विश्वासाने ते नवस पूर्ण केलें जातील.

7 September : देवानें दिलेंलें विरोधक आणि देवानें दिलेंला विश्वास

Alethia4India
Alethia4India
7 September : देवानें दिलेंलें विरोधक आणि देवानें दिलेंला विश्वास
Loading
/

सांगायचे ते इतकेच कीं, ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा……आणि विरोध करणार्‍या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाहींत;….कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. (फिलिप्पै 1:27-29)

पौलाने फिलिप्पैकरांना सांगितले कीं ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवणें म्हणजें आपल्या शत्रूंपुढे निर्भय असणें होय. त्यानंतर तो त्या निर्भयपणामागे असलेलें तर्कशुद्ध कारण सांगतो.

तर्कशुद्ध कारण हे आहे : देवानें तुम्हांला फक्त एक नाहीं तर दोन अशी कृपादानें दिलीं आहेत, विश्वास आणि दुःख. 29 वे वचन नेमके हेच सांगत आहे. “कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.” तुम्हीं विश्वास ठेवावा असे कृपादान तुम्हांला देण्यांत आलें, आणि तुम्हीं दुःखही सोसावे हे कृपादान देखील तुम्हांला देण्यांत आलें.

या संदर्भात याचा अर्थ असा होतो : दुःखाचे प्रसंग येतांत तेव्हां तुमचा ‘विश्वास’ आणि तुमचे ‘दुःख’ ही दोन्ही देवाची कृपादानें आहेत. जेव्हा पॉल म्हणतो, विरोध करणार्‍या लोकांकडून कशाविषयीही भयभीत होऊं नका, तेव्हा त्यांनी भयभीत का होऊं नये यामागची त्याच्या मनात दोन कारणें होती :

1. पहिले कारण म्हणजें विरोधक हें देवाच्या हातांत आहेत. ते विरोध करतांत हे देवानें तुम्हांला दिलेंलें कृपादान आहे. विरोध हा त्याच्या अधिपत्याखाली होतो. हा 29 व्या वचनाचा पहिला मुद्दा आहे.

2. आणि भयभीत न होण्यामागचे दुसरे कारण म्हणजें तुमची निर्भयता, म्हणजेंच तुमचा विश्वास हा सुद्धा देवाच्या हातांत आहे. ते सुद्धा देवानें दिलेंलें कृपादानच आहे. हा 29 व्या वचनाचा दुसरा मुद्दा आहे.

त्यामुळें संकटे येतांत त्यावेळी निर्भय असण्यामागे असलेलें तर्कशुद्ध कारण हे दोन पदरी सत्य आहे : तुमची संकटे आणि संकटाच्या वेळी टिकाव धरणारा तुमचा विश्वास ही दोन्ही देवाची कृपादानें आहेत.

अशा जगण्याला “ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण” का म्हटले जाते? कारण सुवार्ता ही ह्या चांगल्या गोष्टींची बातमी आहे कीं ख्रिस्तानें आपल्या नव्या कराराच्या रक्ताद्वारे त्याच्या सर्व लोकांना विश्वासाचे कृपादान प्राप्त व्हावे आणि त्यांनी आपल्या वैऱ्यांवर प्रभूत्व करावें हे आपल्यात घडून येणारे देवाचे सार्वभौम कार्य साध्य केलें आहे – आणि हे सर्व त्यानें आपलें सार्वकालिक कल्याण व्हावे म्हणून केलें. हेच सुवार्तेने साध्य केलें आहे. म्हणून, सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेऊन जगणें हे सुवार्तेचे सामर्थ्य आणि चांगुलपण प्रमाणित करते.

म्हणून, भयभीत होऊं नका. तुमचे विरोधक देवानें त्यांना जी सीमा ठरविली आहे त्यापलीकडें जास्त काहीं करू शकत नाहींत. आणि तो तुम्हांला आवश्यक असलेला सर्व विश्वास देईल. ही अभिवचनें रक्ताने विकत घेतलेली आहेत आणि त्यावर शिक्कामोर्तब करण्यांत आलें आहे. ही सुवार्तेची अभिवचनें आहेत.

6 September : विद्यमान आणि सर्वसमर्थ अशी प्रीति

Alethia4India
Alethia4India
6 September : विद्यमान आणि सर्वसमर्थ अशी प्रीति
Loading
/

ख्रिस्ताच्या प्रीतिपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? (रोमकरांस 8:35)

रोमकरांस 8:35 मध्यें प्रकट तीन गोष्टींकडें लक्ष द्या.

  1. ख्रिस्त सांप्रतकाळी आम्हांवर प्रीति करतो.

एखादी स्त्री कदाचित् तिच्या हयात नसलेल्या पतीविषयी म्हणेंल: कोणतीही वस्तू मला त्याच्या प्रीतिपासून विभक्त करायला समर्थ होणार नाहीं. तिच्या या वक्तव्याचा अर्थ असा असू शकतो कीं तिच्या अंत:करणांत त्याच्या प्रीतिच्या आठवणी तिला आयुष्यभर गोडवा देणारी आणि शक्तिवर्धक अशा असतील. पण पौल इथे जें म्हणत आहे त्याचा अर्थ तो होत नाहीं.

रोमकरांस 8:34 मध्यें स्पष्टपणें असे म्हटले आहे कीं, “जो मेला इतकेच नाहीं, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडें आहे आणि जो आपल्यासाठीं मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे.” कोणतीही वस्तू आपल्याला ख्रिस्ताच्या प्रीतिपासून विभक्त करायला समर्थ होणार नाहीं असे पौल म्हणू शकतो याचे कारण हे कीं ख्रिस्त जिवंत आहे आणि आत्ताही तो आपल्यावर प्रीति करतो.

तो देवाच्या उजवीकडें आहे आणि म्हणून तो आम्हांसाठीं सर्व वस्तूंवर राज्य करत आहे. एवढेच नाहीं, तर तो आपल्यासाठीं मध्यस्थी देखील करत आहे, याचा अर्थ असा कीं त्यानें आमच्या मुक्तीसाठीं जे कार्य साध्य केलें ते आम्हांला क्षणोक्षणी तारून नेत आहे आणि सार्वकालिक असा जो आनंद त्यांत आपल्याला सुरक्षितपणें घेऊन येत आहे, याकडें तो पुरेपूर लक्ष्य देतोय. त्याची प्रीति फक्त आठवणी नाहींत. ही सर्वसमर्थ, देवाच्या जिवंत पुत्राची क्षणोक्षणी जिवंत असलेली एक क्रिया आहे, जी आपल्याला सार्वकालिक आनंद देते.

2. ख्रिस्ताची ही प्रीति आम्हांला विभक्त होण्यापासून वाचवण्यात प्रबळ आहे, आणि म्हणून ही प्रीति सर्वांवर असलेली सामान्य वैश्विक प्रीति नाहीं तर त्याच्या लोकांसाठीं असलेली विशिष्ट अशी वैयक्तिक प्रीति आहे – म्हणजें रोमकरांस 8:28 म्हणते त्याप्रमाणें, त्यांच्यावर असलेली प्रीति जे देवावर प्रीति करतांत आणि त्याच्या संकल्पाप्रमाणें बोलाविलेलें आहेत.

ही इफिस 5:25 मध्यें वर्णिलेली प्रीति आहे, “पतींनो, जशी ख्रिस्तानें मंडळीवर प्रीति केलीं तशी तुम्हींही आपापल्या पत्नीवर प्रीति करा; ख्रिस्तानें मंडळीवर प्रीति केलीं आणि स्वतःस तिच्यासाठीं समर्पण केलें.” ही ख्रिस्ताची आपल्या मंडळीवर, जी त्याची नवरी आहे, प्रीति आहे. ख्रिस्ताची सर्वांवर प्रीति आहे, आणि जी प्रीति त्याला आपल्या वधूसाठीं आहे ती विशेष, तारणदायी, राखणारी प्रीति आहे. जर तुमचा ख्रिस्तावर विश्वास असेल तर तुम्हीं त्या वधूचा भाग आहात हे आपल्याला ठाऊक आहे. जो कोणी – यांत अपवाद नाहींच – जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो हे म्हणू शकतो कीं, मी त्याच्या वधूचा, त्याच्या मंडळीचा भाग आहे; जें त्याचे बोलाविलेले आणि निवडलेलें आहेंत त्यांपैकीं एक आहे, म्हणजें त्यांपैकीं ज्यांची रोमकरांस 8:35 मध्यें सांगितल्याप्रमाणें, काहींही झालें तरी, युगानुयुग राखण केलीं जाते आणि ज्यांचे संरक्षण केलें जाते.

3. ही सर्वसमर्थ, प्रबळ, राखून ठेवणारी प्रीति आपल्याला या जीवनातील संकटांपासून वाचवत नाहीं, तर त्यां संकटांद्वारे आपल्याला सुरक्षितपणें देवासोबत सार्वकालिक आनंदात घेऊन येते.

आपण सर्वांना मरण येईल, परंतु ते मरण आपल्याला विभक्त करण्यांस समर्थ होणार नाहीं. म्हणून जेव्हा पौल वचन 35 मध्यें म्हणतो कीं “तलवार” आपल्याला ख्रिस्ताच्या प्रीतिप्रेमापासून विभक्त करण्यांस समर्थ होणार नाहीं, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे : जरी आपण जिवे मारिलें गेलो तरी आपण ख्रिस्ताच्या प्रीतिप्रेमापासून विभक्त केलें जाणार नाहीं.

ह्याप्रमाणें वचन 35 चा सारांश असा आहे : येशू ख्रिस्त सांप्रतकाळी आपल्या लोकांवर अशा प्रीतिने प्रेम करतो जी सर्वसमर्थ, क्षणोक्षणी वर्तमान अशी आहे, जी आपल्याला नेहमीच संकटांतून सोडवत नाहीं, तर दुःख व मरण यांतूनही त्याच्या उपस्थितीत आम्हांला सार्वकालिक आनंद प्राप्त व्हावा म्हणून आम्हांला राखून ठेविते.

5 September : ख्रिस्ताच्या प्रेमाचे ध्येय

“हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे कीं, तू जे मला दिलें आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे; ह्यासाठीं कीं, जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा” (योहान 17:24).

येशूवर विश्वास ठेवणारे देवाच्या दृष्टित मौल्यवान आहेत (आम्हीं त्याची वधू आहोत!). आणि तो आम्हांवर इतकीं प्रीति करतो कीं आमची जी मौल्यवानता आहे तिला तो आमच्यासाठीं भजनीय दैवत बनू देणार नाहीं.

अर्थातच, देवानें आपल्यासाठीं बरेच काहीं केलें आहे (तो आपल्याला दत्तक घेऊन त्याचे कुटुंबीय बनवतो!), परंतु तो असे करतो याचे कारण म्हणजें हे कीं आपण त्याच्या महानतेचा (गौरवाचा) आनंद घ्यावा म्हणून तो आधी आपल्याला आमच्या स्व:पणातून बाहेर काढतो.

आपापले परीक्षण करा. कल्पना करा, कीं जर येशू तुमच्यासोबत दिवस घालवण्यासाठीं येतो, तुमच्या शेजारी पलंगावर बसतो आणि म्हणतो, “माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे,” तर आता ज्याअर्थी तुम्हीं त्याच्याबरोबर दिवस घालविला, तर उर्वरित दिवस तुम्हीं कशावर लक्ष केंद्रित करून घालवाल?

मला असे वाटते कीं अशी बरीच गीतें आणि प्रवचने आहेत जी आपल्याला चुकींचे उत्तर देऊन सोडतांत. त्यांचे उत्तर आमच्या अंत:करणांत अशी छाप सोडतांत कीं आमचा आनंद तेव्हां काठोकाठ भरतो जेव्हां आमच्यावर प्रीति केल्याची भावना आम्हांला वारंवार जाणवते. “तो माझ्यावर प्रेम करतो!” “तो माझ्यावर प्रेम करतो!” निश्चितच, हा आनंद खरा आहे यांत शंका नाहीं. पण हा आनंद काठोकाठ नाहीं, आणि हा त्या मागचा मुख्य हेतूही नाहीं.

जेव्हां आपण म्हणतो “मजवर प्रीति केलीं गेलीं” तेव्हां आपण काय म्हणत आहोत? आम्हांला काय म्हणायचे आहे? “मजवर प्रीति केलीं गेलीं” ह्याचे खरे औचित्य काय आहे?

दिवसभर येशूला निरक्षून आणि “अहाहा तू किती गौरवी आहेस!” “अहाहा! काय तुझे ते गौरव!” असे मोठ्याने उद्गार काढण्यात सर्वात मोठा, व ख्रिस्ताला उंचवणारा आनंद मिळणार नाहीं का?

  • तो सर्वात अवघड अशा प्रश्नाचे उत्तर देतो म्हणजें त्याचे शहाणपण गौरवी आहे.
  • तो घाणेंरड्या, रक्तस्त्राव होणाऱ्या फोडाला स्पर्श करतो, म्हणजें त्याचा कळवळा गौरवी आहे.
  • तो वैद्यकींय परीक्षकांच्या कार्यालयात जाऊन मृत झालेंल्या एका महिलेला उठवतो म्हणजें त्याचे सामर्थ्य गौरवी आहे.
  • तो दुपारच्या घडामोडींचे भाकींत करतो म्हणजें त्याचे पूर्वज्ञान गौरवी आहे.
  • भूकंपाच्या वेळी तो शांत झोप घेतो म्हणजें त्याची निर्भयता गौरवी आहे.
  • तो म्हणतो, “अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे” (योहान 8:58), म्हणजें त्याची वचनें गौरवी आहेत.

आम्हीं दिवसभर त्याच्याबरोबर चालतो-फिरतो, आणि जे आम्हांला दिसते ते पाहून त्याच्या गौरवाने भारावून जातो.

त्याला आपल्यासाठीं जे काहीं करणें अगत्याचे आहे (ज्यात आमच्यासाठीं मरण सोसणें देखील आहे) ते तो आपल्यासाठीं करावयास आवेशी आहे जेणेंकरुन आपण त्याला पाहून आश्चर्य करावें आणि त्यानें आम्हांस भस्म करू नये, ही त्याची आपल्यासाठीं प्रीति नाहीं का? पापमुक्ती, प्रायश्चित्त, अपराधांची क्षमा, नीतिमान ठरविले जाणें, देवाबरोबर समेट – हे सर्व होणें अगत्याचे होते. ही सर्व प्रीतिची कार्य आहेत.

परंतु जी प्रीति त्या कृत्यांना प्रीतिचे स्वरूप देते त्या प्रीतिचे ध्येय हे कीं आपण त्याच्याबरोबर असावे आणि थक्क करणारे असे जे त्याचे गौरव ते आम्हीं पाहावे आणि चकित व्हावे. हे असे क्षण आहेत जेव्हां आपण स्वतःला विसरून जातो आणि देव त्याच्याद्वारे आम्हांबरोबर आहे हे पाहण्यांस समर्थ होतो.

म्हणून मी पाळकांना आणि शिक्षकांना विनंती करतो : ख्रिस्तानें त्याचे प्रीतिचे जे कार्य केलें तेंच त्याच्या प्रीतिचे ध्येय आहे हे मंडळीला आवर्जून सांगा आणि प्रीतिच्या बाबतींत त्यांच्या विचारसरणीत बदल घडवून आणा. जर पापमुक्ती, प्रायश्चित्त, अपराधांची क्षमा, नीतिमान ठरविले जाणें, देवाबरोबर समेट – हे सर्व आपल्याला स्वतः येशूमध्यें आनंद करण्याकडें घेऊन जात नसतील तर ही प्रीतिची कार्यें नाहींत.

तुमचा संदेश व शिक्षण यावर केंद्रित असू द्या. योहान 17:24 मध्यें येशूनें याचसाठींच प्रार्थना केलीं होती, “हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे कीं, तू जे मला दिलें आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे; ह्यासाठीं कीं, जो माझा गौरव…तो त्यांनी पाहावा.”

4 September : नव्या कराराविषयी नवे असे काय आहे

Alethia4India
Alethia4India
4 September : नव्या कराराविषयी नवे असे काय आहे
Loading
/

“त्या दिवसांनंतर मी इस्राएलच्या घराण्याशी हा करार करीन, असे परमेश्वर म्हणतो: मी माझा नियम त्यांच्यामध्यें ठेवीन आणि मी ते त्यांच्या हृदयावर लिहीन. आणि मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.” (यिर्मया 31:33)

येशू आज्ञा आणि प्रीति यांमध्यें असलेली कोणतीही अजोड आडभिंत उद्ध्वस्त करून टाकतो.

तो म्हणतो, “माझ्यावर तुमची प्रीति असली तर तुम्हीं माझ्या आज्ञा पाळाल. . . . ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीति करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीति करतो त्याच्यावर माझा पिता प्रीति करील” (योहान 14:15, 21). “जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतित राहतो तसे तुम्हीं माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतित राहाल” (योहान 15:10).

आज्ञा आणि आज्ञापालन या दृष्टीने विचार केला, तर ह्या दोन्हीं गोष्टी येशूला त्याच्या पित्याच्या प्रीतिचा आनंद घेण्यापासून थांबवू शकल्या नाहीं. म्हणून त्याला अशी अपेक्षा आहे कीं आपण जेव्हां त्याच्याकडें आज्ञा देणारा प्रभू म्हणून पाहतो तेव्हां त्याच्याबरोबरचे असलेले आपलेंही प्रीतिचे नाते धोक्यात येणार नाहींत.

हे लक्षात घेणें अत्यंत महत्त्वाचे आहे कारण येशू ख्रिस्ताद्वारे देवाबरोबर असलेले आपलें नव्या कराराचे नाते म्हणजें असा करार नाहीं जो आज्ञांविरहित असेल. देवानें मोशेच्या द्वारे देऊ केलेंला जुना करार आणि देवानें ख्रिस्ताद्वारे देऊ केलेंला नवा करार यातील मूलभूत फरक हा नाहीं कीं एका करारात आज्ञा होत्या आणि दुसऱ्या करारात आज्ञा नाहींत.

यां दोन करारातील मुख्य फरक पुढीलप्रमाणें आहे: (1) मशीहा, म्हणजें येशू प्रकट झाला आणि त्यानें नव्या कराराचे रक्त ओतले (मत्तय 26:28; इब्री 10:29) जेणेंकरून यापुढे त्यानें ह्या नव्या कराराचा मध्यस्थ व्हावे, जेणेंकरून सर्वांचे तारण व्हावे, करार पाळणारा विश्वास हा त्याच्यावर जाणीवपूर्वक विश्वास आहे; (2) त्यामुळें जुना करार “जीर्ण” झाला आहे (इब्री 8:13) आणि नव्या कराराचे म्हटलेले जें देवाचे लोक त्यांच्यावर यापुढे त्याचे आधिपत्य चालत नाहीं (2 करिंथ 3:7-18; रोम 7:4,6; गलती 3:19) ; आणि (3) वचनदत्त नवे हृदय आणि पवित्र आत्म्याचे समर्थ बनविणारे सामर्थ्य हे विश्वासाद्वारे देण्यांत आलेंले आहेंत.

जुन्या करारात, आम्हांला देवाची आज्ञा पाळण्यास समर्थ बनविणारे कृपेचे सामर्थ्य त्या पूर्णतेने ओतले गेलें नव्हते ज्या पूर्णतेने ते येशू प्रकट झाल्यापासून ओतण्यांत आलें आहे. “पण आजपर्यंत परमेश्वराने तुम्हांला समजायला मन, पाहायला डोळे व ऐकायला कान दिलें नाहींत.” (अनुवाद 29:4). नव्या कराराविषयी जे नवे आहे त्याच्या अर्थ असा होत नाहीं कीं त्या करारात कोणत्याही आज्ञा नाहींत, तर हे कीं देवानें जी अभिवचने दिली होती ती पूर्णत्वास आलीं आहेत! “मी माझा नियम त्यांच्यामध्यें ठेवीन आणि मी ते त्यांच्या हृदयावर लिहीन” (यिर्मया 31:33). “मी तुमच्या ठायीं माझा आत्मा घालीन आणि तुम्हीं माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांप्रमाणें आचरण कराल असे मी करीन ” (यहेज्केल 36:27).

3 September : परमेश्वराच्या “मी करीन” अभिव्यक्तीं

Alethia4India
Alethia4India
3 September : परमेश्वराच्या "मी करीन" अभिव्यक्तीं
Loading
/

“यरुशलेमेत माणसे व गुरेढोरे फार झाल्यामुळें भिंती नसलेल्या खेड्यांप्रमाणें तिच्यात वस्ती होईल. परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन, व तिच्या ठायीं मी तेजोरूप होईन.” (जखऱ्या 2:4-5)

असे काहीं पहाटेचे प्रसंग आहेत जेव्हा मला बिछान्यावरून उठताच दुर्बळपणा जाणवतो. म्हणजें असहाय. असे का हे अनेकदा कळत नाहीं. धोका कसलाही नसतो. कसलीही कमजोरी नसते. असते ती केवळ एक अशी स्वरूप नसलेली भावना कीं काहींतरी वाईट होणार आहे आणि त्यासाठीं मीच जबाबदार असेल.

असे सहसा तेव्हां होते जेव्हां माझी बरीच टीका झालेंलीं असते. किंवा कदाचित तेव्हां जेव्हां माझ्याकडून बऱ्याच अपेक्षां केल्यां जातांत ज्यांच्या मुदती ठराविक आहेत आणि त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनें खूप मोठ्या आणि खूप जास्त वाटतांत.

जेव्हां मी अशा नियतकालिक पहाटे झालेंल्या प्रसंगावर विचार करतांना  सुमारे 50 वर्षांहून अधिक काळ मागे वळून पाहतो, तेव्हां मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते कीं कशाप्रकारे प्रभु येशूनें माझ्या जीवनाचा व सेवेचा सांभाळ केला आहे. अशा तणावापासून दूर पळण्याच्या ज्यां परीक्षा माझ्यावर आल्या त्यां कधीही विजयी होऊं शकल्या नाहीं- आजवर तर नाहीं. हे अद्भुत आहे. यासाठीं मी माझ्या महान देवाची उपासना व गौरव करतो.

मला भीतीच्या अर्धांगवायूमध्यें बुडू देण्याऐवजी किंवा मला हिरव्या गवताच्या मृगजळात पळून जाऊ देण्याऐवजी, तो मला जागे करायचा कीं अशा वेळी मी त्याच्याकडें मदतीसाठीं धावा केला पाहिजे आणि नंतर तो मला आपल्या ठोस अभिवचनांची आठवण देऊन उत्तरही द्यायचा.

मी एक उदाहरण देतो. आणि हा प्रसंग नुकताच घडला. मी एका पहाटे उठलो तेव्हां मला भावनिकदृष्ट्या दुर्बळपणा जाणवत होता. असहाय. असुरक्षित. मी प्रार्थना केलीं: “प्रभु मला मदत कर. प्रार्थना कशी करावी हेही मला कळत नाहींये.”

एका तासानंतर मी जखऱ्याचे पुस्तक वाचू लागलो आणि ज्या मदतीसाठीं मी धावा केला होता तिचा शोध घेऊ लागलो. आणि मला ते सहाय्य या वचनांत पुरविण्यात आलें :-

“यरुशलेमेत माणसे व गुरेढोरे फार झाल्यामुळें भिंती नसलेल्या खेड्यांप्रमाणें तिच्यात वस्ती होईल. परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन, व तिच्या ठायीं मी तेजोरूप होईन.” (जखऱ्या 2:4-5)

देवाच्या लोकांची अशी समृद्धी आणि वाढ होईल कीं यरुशलेमेला स्वतः भोवती यापुढे तटबंदी देखील उभारता येणार नाहीं. “माणसे व गुरेढोरे” इतके वाढतील कीं यरुशलेम भिंती नसलेल्या अनेक खेड्यांप्रमाणें होईल.

समृद्धी तर ठीक आहे, पण संरक्षणाचे काय?

वचन 5 मध्यें परमेश्वर याचे उत्तर देतो, “परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन.” होय. बस इतके पुरे आहे. हेच ते अभिवचन आहे. परमेश्वराच्या “मी करीन” यां अभिव्यक्तीं. मला त्याचीच गरज आहे.

आणि जर ते यरुशलेमेच्या असुरक्षित खेड्यांच्या बाबतींत खरे आहे तर मग मी जो देवाचे मुल आहे, ते माझ्या बाबतींत देखील सत्य आहे. मी जुन्या करारातील ही अशी अभिवचनें देवाच्या लोकांवर या  पद्धतीनेच लागू करतो. सर्व अभिवचने मला ख्रिस्ताठायीं होय हेच आहेत (2 करिंथ 1:20). जे ख्रिस्तामध्यें आहेत त्यांच्यासाठीं प्रत्येक वचनानंतर “किती विशेषकरून” अशी घोषणा आहे. देव माझ्या सभोवार “अग्नीचा कोट” होईन. होय. तो होईल. तो झाला आहे. आणि तो पुढेही होईल. 

आणि हे अंशा-अंशाने अधिक चांगले होत जाते. संरक्षणाच्या त्या अग्नी-कोटातून तो म्हणतो, “तिच्या ठायीं मी तेजोरूप होईन.” देव आपलें संरक्षण करण्यासाठीं आपला केवळ अग्नी-कोट बनून तिथेच थांबत नाहीं; तर आपल्याला त्याच्या उपस्थितीचा सुखद आनंद द्यावा हा त्याचा अंतीम हेतू. मला देवाची “मी करीन” ह्या अभिव्यक्तीं खूप आवडतांत!

2 September : उद्ध्वस्त आणि आनंदित

Alethia4India
Alethia4India
2 September : उद्ध्वस्त आणि आनंदित
Loading
/

“कारण तू आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहेस, तू त्याची खास प्रजा व्हावेस म्हणून सार्‍या पृथ्वीवरील राष्ट्रांतून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला निवडून घेतले आहे.” (अनुवाद 7:6)

कृपेचे सिद्धांत – कीं आमचे तारण हे केवळ देवाच्या सार्वभौम कृपेनेच होते ह्या कॅल्विनवादी शिकवणीसाठीं पारंपारिकरित्या उपयोगांत आणलेली जुनी प्युरिटन संज्ञा (TULIP) – ह्या झाडातील प्रत्येक फांदी जर संत ऑगस्टीन यांच्या आनंदाशी समतुल्य  अशा आनंदाच्या भरात (ज्याला “ख्रिस्ती विश्वासाचा परमानंद म्हणतांत”) डोलत असेल तर या कृपेच्या सिद्धांतांची अनुभूती काय असेल बरे?

  • सार्वत्रिक नैतिक अध:पात (Total depravity) म्हणजें केवळ स्वभावात असलेला वाईटपणा नव्हे, तर देवाचे वैभव पाहण्यापासून आंधळेपण आणि परम आनंद याविषयी मृतावस्था.
  • अटविरहित निवड (Unconditional election)  म्हणजें ख्रिस्तांत असलेला आपला परम आनंद, म्हणजें त्रिएक देव स्वतःमध्यें घेतो तो काठोकाठ आनंद, आपण अस्तित्वात येण्यापूर्वीच आपल्यासाठीं नियोजित करण्यात आला होता.
  • (लोकसंख्येच्या दृष्टिने) मर्यादित प्रायश्चित्त (Limited atonement)  हे या गोष्टीची खात्री आहे कीं देवामध्यें असलेला अविनाशी आनंद नव्या कराराच्या रक्ताद्वारे देवाच्या लोकांसाठीं निर्णायकपणें साध्य करण्यांत आला आहे.
  • अप्रतिकारक कृपा (Irresistible grace)  ही देवाच्या प्रीतिची वचनबद्धता आणि सामर्थ्य आहे ज्याद्वारे आपल्याला ह्या जगातील आत्मघातकीं सुखांना बिलगून राहण्यापासून व अविनाशी असा जो आनंद त्याच्या प्राप्तीसाठीं आपल्याला सार्वभौम सामर्थ्याने बंधमुक्त केलें जाते.
  • पवित्रजनांच्या विश्वासाची चिकाटी (Perseverance of the saints)  हे सर्वसमर्थ देवाचे कार्य आहे जे आपल्याला अति निकृष्ट दर्जाच्या आनंदाच्या कायमस्वरूपी बंधनात पडू देत नाहीं, तर आपल्याला त्याच्या सान्निध्यात विपुल आनंदाचा वारसा मिळावा म्हणून व आपल्याला त्याच्या उजवीकडें असलेले सार्वकालिक सुख प्राप्त व्हावें म्हणून आपल्याला सर्व संकटे व दु:खें यांमध्यें राखून ठेवते.

या पाच मुद्द्यांपैकीं, अटविरहित निवड हा मुद्दा माझ्या जिवाच्या बाबतींत सर्वात कठोर आणि अति गोड असे दोन न्यायनिवाडे देतो. ही निवड अटविरहित आहे हे सत्य माझा सर्व गर्विष्ठपणा उद्ध्वस्त करते (कठोर बाजू); आणि हे कीं ही निवड  मला त्याचे अनमोल धन बनवते (अति गोड बाजू).

यां बायबलसम्मत कृपेच्या सिद्धांतांची एक वैभवी बाजू ही आहे : जे सिद्धांत आमचा  गर्विष्ठपणा उद्ध्वस्त करतांत, तेंच खरे पाहता आपल्याला परम आनंदासाठीं सज्ज करतांत.

जर ही निवड कोणत्याही प्रकारे आमच्यातील सद्गुणांवर अवलंबून असती तर यां वचनाच्या प्रकाशांत जिथें देव म्हणतो कीं “कारण तू आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहेस, तू त्याची खास प्रजा व्हावेस म्हणून सार्‍या पृथ्वीवरील राष्ट्रांतून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला निवडून घेतले आहे” (अनुवाद 7:6), आपण स्वतःला कसे श्रेष्ठ समजू शकतो? परंतु आढ्यता बाळगण्यापासून आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठीं, परमेश्वर आपल्याला शिकवतो कीं आपली निवड ही पूर्णपणें अट-विरहित आहे (अनुवाद 7:7-9). “त्यानें एक दयनीय जिवाला आपलें धन असे केलें” असे जे आपण एक भजन गातो अगदी त्याप्रमाणें.

कृपेने झालेंल्या ह्या निवडीची अटविरहित बाजूच आहे — ज्या पाठोपाठ ह्या तारणदायी कृपेचा इतर सर्व अनुक्रम येतो — जी आपल्याला कोणतीही आढ्यता न बाळगू देता अशा दानांचा आनंद घ्यावयांस समर्थ बनविते.

1 September : त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो

Alethia4India
Alethia4India
1 September : त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो
Loading
/

आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो. (स्तोत्र 115:3)

हे वचन शिकवते कीं देव ज्या ज्यावेळी एखादे कार्य करतो, तो ते त्याला योग्य दिसते त्याप्रमाणें करतो.

देवाला ज्या गोष्टीचा तिटकारा वाटतो ती करण्यास तो बंधनकारक नाहीं. त्याच्यावर असला प्रसंग कधीही येत नाहीं जिथे त्याला एखाद्या गोष्टीचा एकमात्र तोडगा काढण्यासाठीं असे काहींतरी करणें भाग पडते जे त्याला योग्य दिसत नाहीं.

त्याच्या इच्छेस येईल ते तो करतो. आणि म्हणूनच, एका अर्थाने, तो जे काहीं करतो त्यापासून  त्याला आनंद होतो.

हे असे ज्ञान आहे कीं आपण देवासमोर नतमस्तक होऊन त्याच्या सार्वभौम स्वातंत्र्याची स्तुती करण्यास प्रवृत्त झालों पाहिजे – म्हणजें असे कीं, त्याला जे योग्य व संतुष्टीदायक आहे त्यावर अंमलबजावणी करून तो नेहमी आपल्या स्वतंत्र इच्छेनुसार  स्वत: च्या “सत्संकल्पाप्रमाणें” सर्वकाहीं करतो.

देव कधीच कुठल्याही परिस्थितीला बळी पडत नाहीं. त्याच्यावर अशी परिस्थिती कधीही उद्भवत नाहीं जी त्याला असे काहींतरी करण्यांस आवरून धरते ज्यामध्यें तो आनंद करू शकत नाहीं. त्याचा उपहास व्हायचा नाहीं. गुप्तपणें फासा मांडून त्याला अडकविले जाऊ शकत नाहीं, किंवा त्याच्या इच्छे विरुद्ध काहीं करण्यांस त्याच्यावर दबाव टाकला जाऊ शकत नाहीं.

देवासाठीं एका अर्थाने सर्वात कठीण जर एखादी गोष्ट असेल जी त्यानें इतिहासात एका समयी केलीं तर ती म्हणजें, जेव्हां त्यानें “आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून” ठेविले नाहीं (रोम 8:32). देव स्वतंत्र होता आणि त्याला जे योग्य दिसायचे ते सर्व तो करत असे. पौल म्हणतो कीं ख्रिस्तानें मरण सोसून जेव्हां स्वतःला अर्पण केलें, ते त्यानें “देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिलें” होते (इफिस 5:2). जगात घडलेले हे महापाप, आणि हे महामरण, व सर्वात कठीण अशी देवाची ही कृती, हे सर्व गोपनीय दृष्ट्या पित्याला जे योग्य दिसते त्याप्रमाणेंच झालें.

आणि कॅल्वरीच्या कृसाकडें जात असतांना, साक्षांत देवदूतांचे सैन्य त्याची सेवा करीत होते. “कोणी [माझा जीव]  माझ्यापासून घेत नाहीं, तर मी होऊनच तो देतो” (योहान 10:18) — त्याला जे योग्य दिसले — आणि इब्री 12:2 म्हणते त्याप्रमाणें हे सर्व त्यानें “जो आनंद त्याच्यापुढे होता” त्यासाठीं केलें. विश्व-इतिहासाची ही वेळ जिथे असें दिसत होते कीं जणू येशूला फासा मांडून अडकविले गेलें, त्या सर्व घटनाक्रमावर पूर्णपणें त्याचेच आधिपत्य होते आणि त्याला जे योग्य दिसलें तेच तो करत होता – म्हणजें आम्हां अनीतिमानांना नीतिमान ठरविण्यात देवाच्या नीतिमत्वाचे गौरव व्हावें म्हणून त्यानें मरण पत्करले.

तर, आपण भय व आदर मानूं. आणि “आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो” यावर देवाच्या सार्वभौमत्वाविषयी आपल्या स्तुतीचाच नाहीं तर आम्हांसाठीं ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे जे तारण साध्य करणांत आलें त्याचा पाया देखील यावरच बांधलेला आहे, हे जाणून आपण थरथर कापूं:

31 August : सिंह आणि कोकरा

Alethia4India
Alethia4India
31 August : सिंह आणि कोकरा
Loading
/

“पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे; तो मला परमप्रिय आहे; त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन, तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील. तो भांडणार नाहीं व ओरडणार नाहीं, व रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाहीं. चेपलेला बोरू तो मोडणार नाहीं, व मिणमिणती वात तो विझवणार नाहीं; तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल, आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.” (मत्तय 12:18-21, यशया 42 मधून अवतरण)

आपल्या पुत्राची सेवक-सदृश्य नम्रता आणि करुणा पाहून पित्याचा जीव आनंदाने उल्लासतो.

जेव्हा बोरू चेपलेला असतो व तो मोडणार तोच हा सेवक तो बरा होईपर्यंत त्याला आपल्या करुणेंने सरळ धरून ठेवतो. जेव्हा एखादी वात मिणमिणती असते आणि विझणारच असते तेव्हां हा सेवक ती वात बाहेर उपटून काढत नाहीं, तर आपला हात तिच्या सभोताल ठेवतो व जोवर ती पुन्हा जळू लागत नाहीं तोवर तिजवर हळूवारपणें फुंकर मारतो.

त्यामुळें पिता घोषणा करतो, “पाहा, हा माझा सेवक, त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे!” पुत्राची ही योग्यता आणि त्याचे हे तेज केवळ त्याच्या वैभवीपणातून किंवा केवळ त्याच्या सौम्यतेतून येत नाहीं, तर ह्या दोन्ही गुणविशेषांच्या सिद्ध एकात्मतेतून उफळून येतांत.

प्रकटीकरण 5:2 मध्यें एक देवदूत, “गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?” असे मोठ्याने पुकारतो, तेव्हां उत्तर आलें, “रडू नकोस; पाहा, ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’, दाविदाचा ‘अंकुर’ ह्याने जय मिळवला; म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे” (प्रकटीकरण 5:5).

‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’ याच्या सामर्थ्यात देव उल्लासतो. म्हणूनच तो इतिहासाच्या गुंडाळीवरचे शिक्के फोडून शेवटच्या दिवसाचा उलगडा करण्यासाठीं देवाच्या दृष्टित पात्र आहे.

पण हे चित्र पूर्ण नाहीं. या सिंहाने जय कसा मिळवला? पुढील वचन त्याच्या स्वरूपाचे वर्णन करते: “तेव्हा राजासन व चार प्राणी ह्यांच्यामध्यें व वडीलमंडळ ह्यांच्यामध्यें, ज्याचा जणू काय ‘वध करण्यात’ आला होता, असा ‘कोकरा’ उभा राहिलेला मी पाहिला” (प्रकटीकरण 5:6). येशू केवळ ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’ म्हणूनच नव्हे तर ‘वध करण्यात’ आला होता, असा ‘कोकरा’ म्हणूनही पित्याच्या आनंदास पात्र ठरला आहे.

देवाचा देहधारी झालेंला पुत्र येशू ख्रिस्ता याच्या गौरवाचे हेच वैशिष्ट आहे – वैभव आणि सौम्यता या अद्भुत मिश्रणातून उद्भवलेली एकात्मता.