ArchivesSolid Joys

19 September : आम्हांला मिळालेला अवर्णनीय विशेषाधिकार

Alethia4India
Alethia4India
19 September : आम्हांला मिळालेला अवर्णनीय विशेषाधिकार
Loading
/

देव मोशेला म्हणाला, “मीं आहें तो आहें.” (निर्गम 3:14)

“मीं आहें तो आहें” (I AM WHO I AM) या पराक्रमी नावाची एक अभिव्यक्ती म्हणजें ही कीं हा अविनाशी, अद्वितीय, सर्वकाहीं पूर्वनियोजित करणारा देव येशू ख्रिस्तामध्यें प्रकट होऊन आपल्याजवळ आला आहे.

योहान 8:56-58 मध्यें येशू यहुदी पुढाऱ्यांनी त्याच्या केलेंल्यां टीकेला उत्तर देत आहे. तो म्हणतो, “तुमचा बाप अब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठीं उल्लसित झाला; तो त्यानें पाहिला व त्याला हर्ष झाला.” तेव्हा यहूदी त्याला म्हणाले, “तुम्हांला अजून पन्नास वर्षे झाली नाहींत आणि तुम्हीं अब्राहामाला पाहिले आहे काय?” येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे.”

येशू ह्याहीपेक्षा गौरवी शब्द बोलू शकला असता का? जेव्हा येशू म्हणाला, “अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे,” तेव्हा त्यानें देवाच्या नावाला लागू होणारे असें महान परम सत्य स्वतःसाठीं वापरलें, जो नम्र होऊन दासाचे स्वरूप घेऊन आला, ज्याने आमच्या सर्व अपराधांसाठीं प्रायश्चित करण्यासाठीं स्वतःला अर्पण केलें, आणि आपल्यासाठीं मार्ग मोकळा केला, जेणेंकरून आपल्याला यापुढे कोणतीही भीती न बाळगता या अविनाशी, अद्वितीय, सर्वसमर्थ देवाचा महिमा पाहता यावा.

आपण जें देवापासून जन्मलेलें आहों त्यां आपणाला येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वर – जो महान “मीं आहें तो आहें” म्हणजें प्रत्यक्ष देव – त्याला आपला पिता म्हणून ओळखण्याचा अवर्णनीय विशेषाधिकार मिळाला आहे :

  • जो आहे
  • जो स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आणि सामर्थ्याचा कर्ता आहे
  • जो कधीही बदलत नाहीं
  • जो या विश्वात असलेल्या सर्व शक्तींचा आणि सर्व उर्जेंचा प्रवाह आहे
  • आणि ज्याचे प्रतिबिंब या संपूर्ण सृष्टीला आपल्या जीवनातून प्रकट करणें अगत्याचे आहे.

देव करो, ज्यांना देवाच्या नावाची ओळख झालेंली आहे त्यांनी त्याजवर आपला भाव ठेवावा (स्तोत्र 9:10).

18 September : एकमेव खरे स्वातंत्र्य

Alethia4India
Alethia4India
18 September : एकमेव खरे स्वातंत्र्य
Loading
/

“जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल. . . त्यानें वाइटाकडें पाठ फिरवून बरे ते करावे.” (1 पेत्र 3:10-11)

खरे स्वातंत्र्य म्हणजें काय? तुम्हीं स्वतंत्र आहांत का?

जर तुम्हीं पूर्णपणें स्वतंत्र आहांत, तर येथे अशा चार गोष्टी आहेंत ज्यां तुमच्या बाबतींत सत्य असायला पाहिजेत.

  1. जर तुम्हांला एखादी गोष्ट करण्याची इच्छा नसेल, तर तुम्हीं ती करण्यास पूर्णपणें स्वतंत्र नाहीं. ओह, तुम्हांला जे करावेसे वाटत नाहीं ते करण्याची इच्छाशक्ती तुमच्याकडें असू शकते, परंतु आपण याला खरे स्वातंत्र्य म्हणत नाहीं. आपल्याला ज्या प्रकारे जीवन जगायचे आहे हे ते नाहीं. आपण एका अशा बंधनांत आणि दबावात असतो जे आपल्याला नको आहे.
  2. आणि जर तुम्हांला एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल, परंतु ती साध्य करण्याची शक्ती मात्र नसेल, तर तुम्हीं ती करण्यास पूर्णपणें स्वतंत्र नाहीं.
  3. आणि जर तुम्हांला एखादी गोष्ट करण्याची इच्छा आणि शक्ती ह्या दोन्ही असतील, परंतु ती करण्याची संधीच जर नसेल, तर तुम्हीं ती करण्यास पूर्णपणें स्वतंत्र नाहीं.
  4. आणि जर तुम्हांला एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल, आणि ती करण्याची शक्ती असेल, आणि ती करण्याची संधीही असेल, परंतु शेवटी ती तुमचा नाश करत असेल, तर जेव्हां तुम्हीं ती करता, तुम्हीं पूर्णपणें स्वतंत्र नाहीं —जे खरे स्वात्यंत्र आहे, त्यानुसार नक्कीच स्वतंत्र नाहीं.

जर पूर्णपणें स्वतंत्र व्हावयाचे असेल, तर आपल्याजवळ ती इच्छा, ती शक्ती आणि ती संधी आवश्यक आहे ज्यां द्वारे साध्य केलेंल्यां गोष्टीं आपल्याला सर्वकाळचा आनंद देतील. म्हणजें पश्चात्ताप होणार नाहीं. आणि केवळ येशू, जो देवाचा पुत्र जो मरण पावला आणि आपल्यासाठीं पुन्हा उठला, तोच हे शक्य करू शकतो.

जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्हीं खरेखुरे बंधमुक्त व्हाल (योहान 8:36).

17 September : गडगडाटी वादळांत देवाची उपासना करा.

Alethia4India
Alethia4India
17 September : गडगडाटी वादळांत देवाची उपासना करा.
Loading
/

“कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसर्‍या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल.” (लूक 17:24)

मी एकदा रात्री शिकागोहून मिनियापोलिसला जात होतो, आणि विमानात जवळजवळ एकटाच होतो. पायलटने जाहीर केलें कीं मिशिगन सरोवर आणि विस्कॉन्सिनमध्यें गडगडाटी वादळ आहे. गोंधळ होऊं नये म्हणून तो विमान पश्चिमेकडें स्कर्ट करायचा.

मी विमानाच्या पूर्वेकडें असलेल्या घनदाट काळोखाकडें पाहत बसलो असताना, अचानक संपूर्ण आकाश प्रकाशाने चकाकले आणि विमानाच्या खाली चार मैलांवर पांढऱ्या ढगांची एक पोकळ पडली व लगेच नाहींशी झाली.

एका सेकंदानंतर, क्षितिजावर उत्तरेकडून दक्षिणेंकडें प्रकाशाचा एक विशाल पांढरा बोगदा फुटला आणि पुन्हा घनदाट काळोखांत नाहींसा झाला. लगेच त्या गडगडाटी विजांची सर स्थिरावली , ज्यामुळें ढगांच्या अथांगातून आणि ढगांच्या दूरच्या पांढऱ्या पर्वतांच्या मागे प्रकाशाचे ज्वालामुखी फुटलेलें दिसू लागलें.

मी अक्षरशः अविश्वासाने डोके हलवत बसलो, आणि ओरडू लागलो, हे परमेश्वरा, जर या तुझ्या तलवारीला धारदार करतांना उडणाऱ्या केवळ ठिणग्यामात्र असतील, तर तुझ्या प्रकट होण्याचा दिवस कसा असेल! आणि मला ख्रिस्ताचे शब्द आठवले : “जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसर्‍या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल” (लूक 17:24).

आताही ते दृश्य आठवत असताना माझे मुख त्याच्या गौरवाच्या शब्दांनी भरून जाते. मी देवाचे आभार मानतो कीं त्यानें माझ्या अंतःकरणात त्याच्या प्रकट होण्याची, त्याला पाहण्याची आणि ख्रिस्ती परमानंदाच्या मेजवानीला बसून गौरवाच्या राजाची उपासना करण्याची इच्छा वारंवार जागृत केलीं आहे. तो मैफिल हॉल खूप मोठा आहे. या.

16 September : जिवाची अंतिम मेजवानी

Alethia4India
Alethia4India
16 September : जिवाची अंतिम मेजवानी
Loading
/

परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठीं मी झटेन; ते हे कीं, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजें मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. (स्तोत्र 27:4)

भग्न व अनुतप्त आत्म्याला देव प्रतिसाद देणार नाहीं हे अशक्य आहे. तो धाव घेतो आणि आमचे पापाचे ओझे उचलतो आणि आमची अंत:करणें आनंद व उपकारस्तुतीनें भरतो. “तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस; तू माझे गोणताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेस; ह्यासाठीं कीं माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे, गप्प राहू नये; हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्वकाळ तुझे उपकारस्मरण करीन!” (स्तोत्र 30:11-12).

पण आपला हा आनंद आम्हांवर केवळ पूर्वी झालेंल्यां कृपेच्या कृतज्ञतेतून येत नाहीं. तर हा आनंद आम्हीं ज्यां भावी कृपेवर आशा ठेवितो त्यांतून सुद्धा येतो : “हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन.” (स्तोत्र 42:5-6).

“मी याहवेहची वाट पाहतो, मोठ्या अपेक्षेने माझा जीव वाट पाहतो, आणि मी माझी आशा त्याच्या वचनावर टाकली आहे” (स्तोत्र 130:5-अनुवादक).

शेवटी, भग्न व अनुतप्त हृदय हे देवाकडून मिळणाऱ्या कोणत्याही चांगल्या दानांसाठीं नाहीं तर स्वतः देवासाठीं लुसलुसते. त्याचे दर्शन घेणें आणि त्याला ओळखणें व त्याच्या उपस्थितीत राहणें ही आमच्या जिवाची अंतिम मेजवानी आहे. यापलीकडें कोणताही शोधाशोध शिल्लक राहत नाहीं. माझ्याकडें शब्द नाहीं. आपण आपल्या शब्दांत ह्याला आनंद, हर्ष, सुख म्हणतो. परंतु हे केवळ त्या अकथनीय अनुभवाचे दुर्बळ सूचकमात्र आहेत :

“परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठीं मी झटेन; ते हे कीं, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजें मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन.” (स्तोत्र 27:4)

“तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातांत सौख्ये सदोदित आहेत” (स्तोत्र 16:11).

“परमेश्वराच्या ठायीं तुला आनंद होईल” (स्तोत्र 37:4).

15 September : एकमेव अक्षय आनंद

Alethia4India
Alethia4India
15 September : एकमेव अक्षय आनंद
Loading
/

“ह्याप्रमाणें तुम्हांला आता दुःख झालें आहे; तरी मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाहीं.” (योहान 16:22)

“तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाहीं” कारण तुमचा आनंद हा येशूच्या सहवासातून येतो, आणि येशूच्या पुनरुत्थानाचा अर्थ असा कीं तुम्हांला कधीही मरण येणार नाहीं; तुम्हांला त्याच्यापासून कधीही विभक्त केलें जाणार नाहीं. 

तर मग, तुमचा आनंद तुमच्यापासून कधीही काढून घेतला जाणार नाहीं असे जर आहे तर दोन गोष्टी खऱ्या असणें साहजिक आहे. एक म्हणजें तुमच्या आनंदाचा झरा सर्वकाळासाठीं अक्षय आहे, आणि दुसरे म्हणजें तुम्हीं देखील अक्षय आहांत. जर तुम्हीं किंवा तुमच्या आनंदाचा झरा जर नश्वर आहांत तर तुमचा आनंद तुमच्यापासून काढून घेतला जाईल.

आणि हो, किती लोक असे आहेत जे नुसता नश्वरतेंत समाधानी होऊन बसले आहेत! ते म्हणतांत, खा, प्या आणि आनंद करा, कारण उद्या तर आपण मरणारच आहोत, बस, हेच आयुष्य आहे (लूक 12:19). अन्न हे अक्षय नाहीं आणि मीही अक्षय नाहीं. तेव्हा आपल्याला शक्य होईल तितका आपण खाण्या-पिण्याचा पुरेपूर फायदा घेऊ या. काय ही शोकांतिका!

जर तुम्हीं अशा विचारसरणीच्या परीक्षेत पडत असाल, तर मग माझी तुम्हांला कळकळीची विनंती आहे कीं तुम्हीं शक्य तितक्या गांभीर्याने यावर विचार करा कीं जर तुमचा आनंद हा येशूच्या सहवासातून येत आहे तर, “तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाहीं” – या जीवनातही नाहीं, व येण्याऱ्या जीवनातही नाहीं.

मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्यें असलेल्या आनंदपासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाहीं (रोमकरांस 8:38-39).

येशूच्या सहवासांत असण्याचा जो आनंद आहे त्याची साखळी आतापासून अनंतकाळापर्यंत अखंड अशी आहे; ती तोडली जाऊ शकत नाहीं – त्याच्या मरणानेही नाहीं, वा आमच्या मरणानेही नाहीं.

14 September : देव तुमची सर्व गरज भागवील

Alethia4India
Alethia4India
14 September : देव तुमची सर्व गरज भागवील
Loading
/

माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील. (फिलिप्पै 4:19 RV-BSI)

फिलिप्पैकर 4:6 मध्यें, पौल म्हणतो, “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” आणि मग (केवळ 13 वचनांनंतर), फिलिप्पै 4:19 मध्यें तो चिंतामुक्त करणारे असे भावी कृपेविषयीचे अभिवचन देतो : “माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील.”

जर आपण भावी कृपेच्या या अभिवचनावरील विश्वासाने जगतो, तर चिंतेला निभाव करणें खूप कठीण होईल. देवाची “वैभवशाली समृद्धी” अक्षय आहे. आपण आपल्या भविष्याविषयी चिंताक्रांत होऊ नये अशी त्याची खरोखर इच्छा आहे.

पौलाने आपल्यासाठीं मांडलेल्या ह्या धोरणावर आपण चालावें. आपण भावी कृपेचे हे अभिवचन दृढ धरूनच चिंतारूपी अविश्वासाशी सुयुद्ध केलें पाहिजे.

जेव्हा मी एखादी धोकादायक नवी सेवा किंवा सार्वजनिक सभा यांविषयी चिंताक्रांत होऊन जातो, तेव्हा मी नेहमीच माझी जी सर्वात जास्त उपयोगांत आणली जाणारी अभिवचने आहेंत त्यांपैकीं एक म्हणजें यशया 41:10 हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढा देतो.

ज्या दिवशी मी पुढील तीन वर्षे जर्मनीत जाऊन राहण्यासाठीं अमेरिकेहून निघालो त्यावेळी माझ्या वडिलांनी मला दूरध्वनीवरून फोन करून हेच अभिवचन दिलें होते. प्रचंड ताणतणावातून बाहेर निघण्यासाठीं मी सलग तीन वर्षें हेच अभिवचन स्वतःला पाचशे वेळा तरी वाचून दाखविले असेल. “तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.”

मी हे अभिवचन घेऊन इतक्या वेळा चिंतेशी लढा दिला आहे कीं जेव्हा माझे मन कोणताही विचार करित नसते, तेव्हा जो आवाज मला माझ्या मनांत ऐकू येतो तो यशया 41:10 चा आवाज असतो.

13 September : चिंता न करण्याची 7 कारणें, भाग 3

Alethia4India
Alethia4India
13 September : चिंता न करण्याची 7 कारणें, भाग 3
Loading
/

“ह्यास्तव ‘काय खावे? काय प्यावे? काय पांघरावे?’ असे म्हणत चिंता करत बसू नका. (कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतांत.) तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्हीं पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजें त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” (मत्तय 6:31-34)

आपण गेल्या दोन दिवसांत पाहिले आहे कीं मत्तय 6:25-34 मध्यें येशूनें योजिलेली अशी किमान सात अभिवचनें आहेंत, जी आम्हांला विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते लढण्यास आणि चिंतामुक्त होण्यास मोठे सहाय्य पुरवितांत. आज आपण अंतिम तीन अभिवचने पाहूं.

अभिवचन #5: “ह्यास्तव ‘काय खावे? काय प्यावे? काय पांघरावे?’ असे म्हणत चिंता करत बसू नका. (कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतांत.) तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” (मत्तय 6:31-32)

देवाला तुमच्या गरजां माहित नाहीं असे समजू नका. तो त्यां सर्व गरजां जाणून आहे. शिवाय तो “तुमचा स्वर्गीय पिता” आहे. तो तटस्थ किंवा बेपर्वा अशी भूमिका घेऊन दुरू उभा राहून पाहत नाहीं. तो काळजी करतो. त्यानें ठरविलेल्या योग्य वेळी तो तुमच्या गरजां भागविल.

अभिवचन # 6: “तर तुम्हीं पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजें त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.” (मत्तय 6:33)

जर तुम्हीं तुमच्या खाजगी भौतिक गरजांविषयी चिंता करित बसण्याऐवजी, या जगात त्याचा उद्देश्य सिद्धीस न्यावयांस त्याच्या नामास्तव स्वतःचे जीवन ओतून द्याल तर त्याचा उद्देश्य सिद्धीस न्यावयांस आणि त्याचे गौरव व्हावे म्हणून तुमच्याकडें सर्व काहीं आहे याची खात्री तो स्वतः करून घेईल. “ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.” म्हणजें काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे त्यां सर्व गरजां- आणि त्याचबरोबर इतर गरजां देखील – ज्यां तुम्हांला त्याची इच्छा पूर्ण करण्यांसाठीं आणि त्याचे गौरव करण्यासाठीं आवश्यक आहेत. याचा अर्थ असा असू शकतो कीं तुम्हीं त्याच्यासाठीं मरावे हा त्याचा उद्देश आहे, परंतु तो त्याच्या गौरवासाठीं तुम्हांला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवील.

हे अगदी रोमकरांस 8:32 मध्यें असलेल्या अभिवचनासारखे आहे, “[देव] त्याच्या [ख्रिस्ता] बरोबर आपल्याला सर्वकाहीं कसे देणार नाहीं?” मग पुढे असे लिहिले आहे, “ख्रिस्ताच्या प्रीतिपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तलवार करील काय?  कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे कीं, ‘तुझ्याकरता आम्हीं दिवसभर मारले जात आहोत, आम्हीं वधाच्या मेंढराप्रमाणें गणलेले आहोत.’ पण ज्याने आपल्यावर प्रीति केलीं, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.” (रोमकरांस 8:35-37). भूक किंवा नग्नता यां येऊ शकतांत. परंतु आपल्याला यां सर्व गोष्टींत महाविजयी होण्यासाठीं आवश्यक असलेल्यां सर्व वस्तु आपल्याकडें असतील.

अभिवचन # 7: “ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” (मत्तय 6:34)

तुमची कसोटी तुमच्या शक्तीपलीकडें कधीही होऊं नये याची देव खात्री करून घेतो (1 करिंथ 10:13). तो तुमच्याठायीं आपलें कार्य सिद्धीस नेईल, जेणेंकरून तुमचे “सामर्थ्य आयुष्यभर कायम” राहावे (अनुवाद 33:25).

प्रत्येक दिवसाचे दुःख हे त्या दिवसाला ठरविलेले आहे. परंतु त्याच्या करुणेंमुळें ते दुख तुमच्या शक्तीपलीकडें कधीही जात नाहीं. आमच्यावर दररोज करुणा केलीं जाईल जी रोज सकाळी नवी होते – आणि ती त्या दिवसाच्या दुखासाठीं पुरे आहे (विलाप 3:22-23). तो तुमच्याकडून असे कोणतेही चांगले काम करून घेणार नाहीं जे सिद्धीस नेण्यांस तो स्वतः तुम्हांला आवश्यक असलेली सर्व कृपा पुरवणार नाहीं (2 करिंथ 9:8).

12 September : चिंता न करण्याची 7 कारणें, भाग 2

Alethia4India
Alethia4India
12 September : चिंता न करण्याची 7 कारणें, भाग 2
Loading
/

“चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकीं कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतांत? ती कष्ट करत नाहींत व सूत कातत नाहींत; तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर, अहो तुम्हीं अल्पविश्वासी, तो विशेषेकरून तुम्हांला पोशाख घालणार नाहीं काय?” (मत्तय 6:27-30)

मत्तय 6:25-34 मध्यें येशूनें योजिलेली अशी किमान सात अभिवचनें आहेंत, जी आम्हांला विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते लढण्यास आणि चिंतामुक्त होण्यास मोठे सहाय्य पुरवितांत. काल आपण अभिवचन क्र.1 आणि अभिवचन क्र.2 ही पहिली; आज आपण अभिववचन क्र.3 आणि अभिवचन क्र.4 ही पाहूं.

अभिवचन क्र.3: “चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकीं कोण समर्थ आहे?” (मत्तय 6:27)

हे स्वतःमध्यें एक विशिष्ठ प्रकारचे अभिवचन आहे — वास्तविकतेविषयी एक सामान्य ज्ञान देणारे अभिवचन जे तुम्हीं तुमच्या अनुभवातून शिकू शकता : चिंता करून तुमचा काहींही फायदा होणार नाहीं. हेंच ते अभिवचन आहे. हा मुख्य युक्तिवाद नाहीं, परंतु काहींवेळा आपल्याला स्वतःशी कठोरपणें वागावे लागते आणि हे मान्य करावें लागते, कीं “हे जिवा, तुझी ही कुरकुर पूर्णपणें निरुपयोगी आहे. ती तुला कसलीही खात्री देत नाहीं. तू केवळ तुझाच नाहीं तर इतर लोकांचाही दिवस वाया घालवत आहेंस. चिंता करणें सोड. ती सर्व देवावर टाक. आणि आपला नित्यक्रम सुरू ठेव.”

ज्यामुळें आपलें कल्याण होईल असे काहींही चिंता साध्य करत नाहीं. ह्याविषयीचे ते अभिवचन आहे. यावर विश्वास ठेवा. त्याप्रमाणें वागा.

अभिवचन क्र 4: “रानातील फुले पाहा, ती कशी वाढतांत? ती कष्ट करत नाहींत व सूत कातत नाहींत; तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर, अहो तुम्हीं अल्पविश्वासी, तो विशेषेकरून तुम्हांला पोशाख घालणार नाहीं काय?” (मत्तय 6:28-30)

देवाच्या दृष्टित तुमचे मूल्य हे रानातील फुलांपेक्षा अधिक आहे, कारण तुम्हीं सर्वकाळ जिवंत राहाल, आणि अशा प्रकारे त्याची प्रिय मुले म्हणून सर्वकाळ त्याची उपासना करू शकाल.

तरीसुद्धा, देवाकडें व्यवस्थापणाची उर्जा आणि खबरदारीचा असा भरभरून वाहणारा पुरवठा आहे, जो तो फक्त मोजके दिवस टिकणाऱ्या फुलांवर ओततो. म्हणून, तो नक्कीच तीच ऊर्जा आणि व्यवस्थापणाचे तेच कौशल्य यांचा उपयोग आपल्या त्या लेकरांची काळजी घेण्यासाठीं करावयांस समर्थ आहे जे सर्वकाळ जिवंत राहतील. आता प्रश्न हा आहे : आपण या अभिवचनावर विश्वास ठेऊन स्वतःला चिंतामुक्त करणार आहों का?

11 September : चिंता न करण्याची 7 कारणें, भाग 1

Alethia4India
Alethia4India
11 September : चिंता न करण्याची 7 कारणें, भाग 1
Loading
/

“ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो कीं, आपल्या जिवाविषयी, म्हणजें आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजें आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे कीं नाहीं? आकाशातील पाखरांकडें निरखून पाहा; ती पेरणी करत नाहींत, कापणी करत नाहींत कीं कोठारात साठवत नाहींत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो; तुम्हीं त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात कीं नाहीं?” (मत्तय 6:25-26)

आपण येशूच्या डोंगरावरील प्रवचनाच्या या भागावर तीन दिवस मनन करणार आहों. मत्तय 6:25-34 मध्यें येशू विशेषतः अन्न आणि वस्त्रांविषयी आम्हांला असलेल्या चिंतेचा विषय हाताळत आहे. पण, खरे पाहता, हा विषय सर्व प्रकारच्या चिंतेंशी संबंधित आहे.

अमेरिकेतही, जरी तिथें व्यापक प्रमाणांत कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्यां, तरी, अन्न वस्त्र व निवारा यांशी संबंधित मूलभूत गरजांसाठीं तीव्र चिंता असू शकतांत. त्यां ख्रिस्ती बांधवांचा तर विचारच नको जे अशा परिस्थितीत राहतांत जिथे अति दारिद्रयामुळें जीवन जगणें कठीण आहे. परंतु येशू 30 व्या वचनात म्हणतो कीं आपली चिंता खरे पाहता पित्यानें आपल्याला जी भावी कृपा पुरविण्याचे अभिवचन दिलें त्यावर असलेल्या आमच्या अल्प विश्वासामुळें उद्भवते : “अहो तुम्हीं अल्पविश्वासी.”

या वचनांत (25-34) किमान सात अशी अभिवचनें आहेत जीं येशूनें आम्हांला अविश्वासाविरुद्ध सुयुद्ध लढण्यास आणि चिंतामुक्त राहण्यास मदत करण्याच्या उद्देशाने योजिलेली आहेत. (आज आपण त्यांपैकीं पहिल्यां आणि दुसऱ्या अभिवचनाकडें पाहूं – आणि उर्वरित अभिवचनें येत्यां दोन दिवसांत.)

अभिवचन # 1: “ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो कीं, आपल्या जिवाविषयी, म्हणजें आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजें आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे कीं नाहीं?” (मत्तय 6:25)

ज्याअर्थी तुमचे शरीर आणि तुमचा जीव हे अन्न आणि वस्त्र यांचा पुरवठा करण्यापेक्षाही अति गुंतागुंतीनें बनविलेले आहे आणि गरज भागविण्याच्या दृष्टिने कठीण आहेंत आणि तरीही देवानें खरे पाहता तुमचे शरीर आणि तुमचा जीव दोन्ही निर्माण केलें आहे आणि तुम्हांला दिलेंत, मग त्याअर्थी तो नक्कीच तुम्हांला अन्न आणि वस्त्र यांचा पुरवठा करण्यास समर्थ आणि तत्पर आहे.

शिवाय, काहींही झालें तरी, एक दिवस येईल जेव्हां देव तुमची शरीरें मेलेल्यांतून उठवेल आणि तुमचा जीव आणि तुमची शरीरें ही स्वतः बरोबर सर्वकाळच्या सहवासासाठीं राखून ठेवील.

अभिवचन # 2: “आकाशातील पाखरांकडें निरखून पाहा; ती पेरणी करत नाहींत, कापणी करत नाहींत कीं कोठारात साठवत नाहींत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो; तुम्हीं त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात कीं नाहीं?” (मत्तय 6:26)

जर देव पाखरांसारख्या अति क्षुल्लक जिवांना जें आपलें अन्न मिळविण्यासाठीं काहींही करू शकत नाहींत- जसे तुम्हीं शेती करतां – खायला देतो आणि तसे करावयांस तो समर्थही आहे, तर तो नक्कीच तुम्हांला तुमच्या गरजेच्या सर्व वस्तु पुरवील, कारण तुम्हीं त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहां. तुमच्यात देवावर विश्वास ठेवून व त्याच्या आज्ञा पाळत व त्याचे आभार मानून देवाचे गौरव करण्याची अद्भुत क्षमता आहे जी पाखरांमध्यें नाहीं.

10 September : चिंतेशी सुयुद्ध कसे करावे

Alethia4India
Alethia4India
10 September : चिंतेशी सुयुद्ध कसे करावे
Loading
/

त्याच्यावर तुम्हीं ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो. (1 पेत्र 5:7)

स्तोत्र 56:3 म्हणते, “मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकींन.”

लक्ष द्या: हे वचन “मला कधीही भीती वाटणार नाहीं” असे म्हणत नाहीं. भीती हल्ला करते आणि मग एक संघर्ष सुरू होतो. त्यामुळें खऱ्या विश्वासणाऱ्यांना कोणतीही चिंता नसते असे बायबल गृहीत धरत नाहीं. तर, जेव्हा चिंता प्रहार करतांत तेव्हा त्यांशी कसे सुयुद्ध करावे ते बायबल आपल्याला सांगते.

जसे कीं 1 पेत्र 5:7 म्हणते, “त्याच्यावर तुम्हीं ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो.” हे वचन असे म्हणत नाहीं कीं तुम्हांला कधीही चिंता वाटणार नाहीं. ते म्हणते, जेव्हा तुम्हांला चिंता वाटतील तेव्हा तुम्हीं त्यां सर्व देवावर टाका. तुम्हीं गाडी चालवत असतांना जर अचानक चिखल तुमच्या कारच्या समोरील काचेवर (विंडशील्डवर) उडून येतो आणि लगेच समोरचे दृश्य तात्पुरते अस्पष्ट होऊन जाते, आणि तुम्हीं चिंतेने हडबडू लागता, तेव्हा तुम्हीं त्वरित तुमचे वायपर चालू करता आणि कारचे विंडशील्ड वॉशर देखील सुरु करता, व चिखलाने माखलेली काच स्वच्छ करता.

म्हणून एखादी व्यक्ती जिला दररोज चिंतेच्या भावनांशी संघर्ष करावा लागतो तिला माझे उत्तर हेच आहे: चिंता ह्या सामान्य आहेत. कमीतकमी माझ्याबाबतींत तरी ते खरे आहे, विशेषकरून माझ्या किशोरवयीन काळापासूनच प्रश्न     आहे: आपण त्यांच्याशी कसे सुयुद्ध करतो?

या प्रश्नाचे उत्तर आहे : आपण अविश्वासाविरुद्ध लढा देत व भावी काळातील कृपेवर विश्वासाची धाव धावीत आपल्या चिंतेंशी सुयुद्ध करतो. आणि ज्या प्रकारे तुम्हीं हे “विश्वासासंबंधीचे सुयुद्ध” लढता (1 तीमथ्य 6:12; 2 तीमथ्य 4:7) ते म्हणजें भविष्यातील कृपेच्या देवाच्या अभिवचनांवर मनन करित व त्याच्या आत्म्याच्या सहाय्यासाठीं प्रार्थना करित.

विंडशील्ड वाइपर ही देवाची वचने आहेत जी अविश्वासाचा चिखल स्वच्छ करतांत आणि विंडशील्डवर आपण जे पाण्याचे फव्वारे मारतो ते पवित्र आत्म्याचे साहाय्य आहे. आपण पापापासून – त्यांत चिंतेचे देखील पाप आहे – मुक्तीचे सुयुद्ध “आत्म्याच्या द्वारे व सत्यावरच्या विश्वासात” लढतो (2 थेस्सलनीकाकर 2:13).

आत्म्याचे कार्य आणि सत्याचे वचन. ही दोन्ही मिळून मोठा विश्वास निर्माण करतांत. चिखल मऊ करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या कार्याशिवाय, वचनाचे वाइपर केवळ विंडशील्डवरील अविश्वासाच्या आंधळ्या गुच्छांवर खरवडतांत.

दोन्ही आवश्यक आहेत : आत्मा व वचन. आपण देवाची वचने वाचतो आणि त्याच्या आत्म्याच्या सहाय्यासाठीं प्रार्थना करतो. आणि जसजसे विंडशील्ड स्वच्छ होत जाते, जेणेंकरून देवानें आपल्यासाठीं जे कल्याणाची योजना आखली आहे ती आपण पाहू शकू (यिर्मया 29:11), तसतसा आपला विश्वास बळकट होत जातो आणि चिंता ह्या नाहींश्या होऊं लागतांत.