ArchivesSolid Joys

30 August : मंडळीची वाढ ही देवाच्या पद्धतीने होते

Alethia4India
Alethia4India
30 August : मंडळीची वाढ ही देवाच्या पद्धतीने होते
Loading
/

म्हणजें देहाद्वारे झालेंली मुले देवाची मुले आहेत असे नाहीं तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतांत. (रोम 9:8)

कल्पना करा कीं जुन्या करारातील अब्राहाम एक पाळक आहे. परमेश्वर म्हणतो, “मी तुला आशीर्वाद देईन आणि तुझ्या सेवेची भरभराट करीन.” पण मंडळी मात्र मुलबाळ नसलेली अशा वांझ अवस्थेतआहे.

अब्राहाम काय करतो? तो स्वर्गाच्या अलौकिक हस्तक्षेपाचा बेत हाणून पाडण्याचा प्रयत्न करू लागतो. तो म्हातारा होत आहे. त्याची पत्नी अजूनही वांझ आहे. म्हणून तो स्वर्गाच्या अलौकिक हस्तक्षेपावाचूनच देवाच्या अभिवचनानुसार असलेल्या पुत्राला जन्मास घालण्याचे ठरवतो. तो त्याच्या बायकोची दासी हागार हिच्याशी लैंगिक संबंध स्थापित करतो (उत्पत्ति 16:4). परंतु परिणामी “अभिवचनानुसार असलेल्या मुलाऐवजी” “देहाद्वारे झालेंले मुल” म्हणजें इश्माएल ह्याचा जन्म होतो.

देव अब्राहामाला आश्चर्याचा धक्का देत असे म्हणतो, “[तुझी पत्नी सारा] तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन” (उत्पत्ति 17:16). हे ऐकून अब्राहाम देवाचा धावा करून म्हणतो, “इश्माएल तुझ्यासमोर जगला म्हणजें झालें!” (उत्पत्ति 17:18). त्याच्या स्वतःच्या नैसर्गिक, मानवी प्रयत्नांद्वारे असलेले काम ह्याद्वारे देवाचे अभिवचन पूर्णत्वास यावें अशी त्याची इच्छा आहे. पण देव म्हणतो, “नाहीं, नाहीं, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल” (उत्पत्ति 17:19).

पण सारा 90 वर्षांची झाली आहे. तिचे आतापर्यंतचे आयुष्य वांझ अवस्थेंतच आहे, शिवाय ती आधीच रजोनिवृत्तीतून गेलेली आहे (उत्पत्ति 18:11). अब्राहाम 100 वर्षांचा झाला आहे. अभिवचनानुसार मुलासाठीं एकमात्र आशा जर असेल तर ती म्हणजें अद्भुत, अलौकिक हस्तक्षेपच.

“अभिवचनानुसार मूल” होण्याचा अर्थ असा आहे – त्याचा “जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून” होत नाहीं; तर देवापासून” होतो (योहान 1:13). या जगात देवाची मुलें तिच गणली जातांत जीं अलौकिकरित्या अभिवचनानुसार जन्मलेलीं आहेत. गलतीकरांस 4:28 मध्यें पौल म्हणतो, “बंधुजनहो, इसहाकाप्रमाणें तुम्हीं [ख्रिस्ती लोक], अभिवचनाची संतती आहात.” तुमचा जन्म “देहस्वभावानुसार” नाहीं, तर “आत्म्यानुसार” झाला आहे (गलती 4:29).

परत एकदा कल्पना करा कीं अब्राहाम एक पाळक आहे. त्याला जसे वाटते कीं मंडळीची वाढ ही देवानें दिलेंल्या अभिवचनानुसार व्हावीं त्याप्रमाणें ती वाढत नाहींये. तो अलौकिक हस्तक्षेपाची वाट पाहत थकला आहे. म्हणून तो केवळ मानवी माध्यम असलेल्या “हागारे” कडें वळतो आणि पवित्र आत्म्याच्या अलौकिक कार्यावाचून आपण “लोकांना आकर्षित” करू शकतो असे ठरवतो.

तथापि, ही इसहाकीं मंडळी नसून इश्माएली मंडळी असेल- म्हणजें देहाद्वारे झालेंली मुले, देवाची मुले नाहीं. देव आम्हांला अशा घातक यशापासून वाचवो. सर्व प्रकारे कष्ट करा. परंतु निर्णायक, अलौकिक कार्यासाठीं नेहमी परमेश्वराकडें पहा. “लढाईच्या दिवसासाठीं घोडा सज्ज करतांत, पण यश देणें परमेश्वराकडें असते” (नीतिसूत्रे 21:31).

29 August : ख्रिस्त येशूमध्यें असणें म्हणजें सहा गोष्टीं

Alethia4India
Alethia4India
29 August : ख्रिस्त येशूमध्यें असणें म्हणजें सहा गोष्टीं
Loading
/

[देवानें] आमच्या कृत्यांप्रमाणें नव्हे तर स्वत:च्या संकल्पाप्रमाणें व कृपेप्रमाणें आम्हांला तारले व पवित्र पाचारणाने पाचारले आहे; ही कृपा युगांच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायीं आपल्यावर करण्यात आली होती. (2 तीमथ्य 1:9)

“ख्रिस्त येशूमध्यें” असणें हे एक अद्भुत सत्य आहे. ख्रिस्ताशी एकरूप होणें चित्तथरारक आहे. ख्रिस्ताशी बांधलेलें.

जर तुम्हीं “ख्रिस्तात” आहांत तर तुमच्या बाबतींत ते काय आहे हे ऐका:

1. जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायीं तुम्हांवर कृपा करण्यात आली होती. दुसरा तीमथ्य 1:9, “ही कृपा युगांच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायीं आपल्यावर करण्यात आली होती.”

2. देवानें जगाच्या स्थापनेपूर्वी तुम्हांला ख्रिस्ताच्या ठायीं निवडून घेतले. इफिस 1:4, “[देवानें] जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायीं निवडून घेतले.”

3. ख्रिस्त येशूमध्यें देवानें तुमच्यावर अशी प्रीति केलीं जिच्यापासून तुम्हांला कोणतीही गोष्ट विभक्त करू शकणार नाहीं. रोमकरांस 8:38-39, “कारण माझी खातरी आहे कीं, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्यें देवाची आपल्यावरील जी प्रीति आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाहीं.”

4. ख्रिस्त येशूमध्यें तुम्हांला मुक्ती आणि तुमच्या सर्व अपराधांची क्षमा मिळाली आहे. इफिस 1:7, “[ख्रिस्तात] त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजें आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे.”

5. ख्रिस्त येशूमध्यें तुम्हीं देवासमोर नीतिमान ठरला आहांत आणि ख्रिस्ताच्या ठायीं देवाचे नीतिमत्व हे तुमचे नीतिमत्त्व गणण्यात आलें आहे. दुसरे करिंथ 5:21, “[ख्रिस्ताला] पाप ठाऊक नव्हते त्याला [देवानें]  तुमच्या-आमच्याकरता पाप असे केलें; ह्यासाठीं कीं, आपण त्याच्या ठायीं देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.”

6. ख्रिस्त येशूमध्यें तुम्हीं नवी उत्पत्ती आणि देवाचे पुत्र झाला आहांत. दुसरे करिंथ 5:17, “म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायीं असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झालें आहे.” गलती 3:26, “तुम्हीं सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात.”

माझी तुमच्यासाठीं अशी प्रार्थना आहे कीं “ख्रिस्त येशूमध्यें” असण्याचा जो अतुल्य विशेषाधिकार तुम्हांला प्राप्त झाला आहे त्यावर चिंतन करण्यापासून आणि त्याचा आनंद घेण्यापासून तुम्हीं कधीही खचून जाऊ नये.

28 August : येशूच्या नावामुळेंमाझ्या दुष्टाईची क्षमा झालीं

Alethia4India
Alethia4India
28 August : येशूच्या नावामुळेंमाझ्या दुष्टाईची क्षमा झालीं
Loading
/

हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठीं माझ्या दुष्टाईची क्षमा कर; कारण ती फार झाली आहे. (स्तोत्र 25:11)

न्याय्य काय आहे हे जाणून घेण्यासाठीं, देव स्वतःहून ऊंच अशा कोणत्याही अधिकाराशी मसलत करत नाहीं. त्याचा आपला अधिकारच या विश्वातील अंतिम अधिकार आहे. म्हणून, देवासाठीं जे योग्य आहे ते करणें म्हणजें त्याच्या या अंतिम अधिकाराशी जे सुसंगत आहे तेच करणें.

देवाला ज्यांविषयी अमर्याद आवेश आहे आणि जी त्याला परम आनंद आणि प्रसन्नता देणारी आहे ती एक अति मोलवान गोष्ट म्हणजें त्याचे स्वतःचे नीतिमत्व, जो त्याची स्वतःची परिपूर्णता व त्याचा सन्मान आहे. आणि आपल्या परिपूर्णतेसाठीं त्याला असलेल्या या अमर्याद  आवेशाच्या विरुद्ध जर तो कधी गेला तर तो अनीतिमान ठरेल – तो एक मूर्तिपूजक ठरेल.  

असा नीतिमान देव आपल्यासारख्या देव-निंदक अशा पापी लोकांवर कशी प्रीति करू शकतो? परंतु सुवार्तेच्या बाबतींत थक्क करून टाकणारी गोष्ट म्हणजें हीच आहे कीं जे तारण तो आम्हांला देऊ करतो त्याचा पाया त्याचे स्वतःचे दिव्य नीतिमत्त्व आहे.

पित्याला आपल्या प्रिय पुत्राबद्दल असलेला अमर्याद आदर तोच माझ्यासारख्या एका दुष्ट पाप्यावर त्यां पुत्रामध्यें अशी प्रीति करणें व माझा स्वीकार करणें हे त्याच्यासाठीं शक्य करतो, कारण त्यानें आपल्या मरणाने आपल्या पित्याचा अधिकार आणि गौरव प्रमाणित केला आहे.

ख्रिस्तानें जें केलें त्यामुळें, आपण स्तोत्रकर्त्याच्या प्रार्थनेला नाविन्याने समजून तीच प्रार्थना करू शकतो, “हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठीं माझ्या दुष्टाईची क्षमा कर; कारण ती फार झाली आहे” (स्तोत्र 25:11). या प्रार्थनेविषयी नवी समज ही आहे कीं, आपण फक्त अशी प्रार्थना करण्याऐवजी कीं “तू आपल्या नावासाठीं माझ्या दुष्टाईची क्षमा कर,” आपण ख्रिस्तामुळें आता अशी प्रार्थना करतो, “हे परमेश्वरा, तू येशूच्या नावासाठीं माझ्या दुष्टाईची क्षमा कर.”

पहिले योहान 2:12 येशूला उद्देशून म्हणते, “मुलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण त्याच्या नावामुळें तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झाली आहे,”. येशूनें आता पापाचे प्रायश्चित्त केलें आहे आणि पित्याचे गौरव प्रमाणित केलें आहे जेणेंकरून “त्याच्या नावामुळें” आपल्या “दुष्टाईची क्षमा” केलीं जावीं.

देव नीतिमान आहे. तो पापाला दंड दिल्यावाचून ते असेच झाकत नाहीं. जर कोण्या पापी मनुष्याला दोषमुक्त करण्यांत आलें तर, कोणी असा आहे जो देवानें त्या पापी व्यक्तीला असेच क्षमा केलें हा डाग त्याजवर लागू नये म्हून देवाच्या गौरवाचे असीम मूल्य प्रमाणित करण्यासाठीं मरण पावतो. ख्रिस्तानें तेच केलें. म्हणून, “हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठीं” आणि “येशूच्या नावामुळें” ही दोन्ही संबोधणें एकच आहेत. आणि म्हणूनच आम्हीं पापांच्या क्षमेसाठीं मोठ्या खात्रीने प्रार्थना करतो.

27 August : येशू आपल्या सर्व शत्रूंना तुडवील

Alethia4India
Alethia4India
27 August : येशू आपल्या सर्व शत्रूंना तुडवील
Loading
/

नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपवून देईल. (1 करिंथ 15:24)

ख्रिस्ताच्या राज्याची व्याप्ती किती आहे?

पुढील वचन, 1 करिंथ 15:25 सांगते, “कारण आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केलें पाहिजे.” येथें प्रयुक्त केलेंला शब्द “सर्व” त्याच्या राज्याची व्याप्ती सूचित करतो.

त्याचप्रमाणें वचन 24 मध्यें प्रयुक्त केलेंला शब्द “सर्व” देखील तेंच सूचित करतो : “नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपवून देईल.”

असा कोणताही रोग नाहीं, व्यसन नाहीं, महाकाय नाहीं, वाईट सवय नाहीं, दोष नाहीं, दुर्गुण नाहीं, दुर्बलता नाहीं, स्वभाव नाहीं, मन:स्थिती नाहीं, गर्व नाहीं, आत्म-दया नाहीं, कलह नाहीं, मत्सर नाहीं, विकृती नाहीं, लोभ नाहीं, आळशीपणा नाहीं कीं ज्यांवर ख्रिस्त आपल्या प्रतिष्ठेचा शत्रू म्हणून विजय मिळविणार नाहीं.

आणि या अभिवचनांत असलेले उत्तेजन असें कीं जेव्हा तुम्हीं तुमच्या विश्वासाच्या आणि तुमच्या पवित्रतेच्या शत्रूंशी युद्ध करण्यासाठीं सज्ज होता तेव्हा युद्ध लढणारे तुम्हीं एकटे नाहीं.

येशू ख्रिस्त हा वर्तमान समयी, या युगातच, त्याच्या सर्व शत्रूंना आपल्या पायाखाली ठेवत आहे. सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य यांवर विजय मिळविला जाईल.

म्हणून, लक्षात ठेवा कीं ख्रिस्ताच्या राज्याचा प्रसार हा तुमच्या जीवनात आणि या विश्वात असलेल्या त्याच्या गौरवाच्या सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या शत्रूपर्यंत पोहोचतो. सर्व शत्रूंचा पराभव केला जाईल.

26 August : छाया आणि झरे

Alethia4India
Alethia4India
26 August : छाया आणि झरे
Loading
/

परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो! परमेश्वराला आपल्या कृतींपासून आनंद होवो! तो पृथ्वीकडें पाहतो तेव्हा ती कापते; तो पर्वतांना स्पर्श करतो तेव्हा ते धुमसतांत. माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचे गुणगान गाईन; मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. मी केलेंले त्याचे मनन त्याला गोड वाटो; परमेश्वराच्या ठायीं मला हर्ष होईल.. (स्तोत्र 104:31-34)

परमेश्वराला आपल्या कृतींपासून आनंद होतो कारण त्यां कृती आपल्याला त्यांच्या पलीकडें म्हणजें प्रत्यक्ष देवाकडें पाहण्याचा संकेत देतांत.

देवाची इच्छा ही आहे कीं आपण या सृष्टीत दिसून येणारी त्याची हस्तकृती पाहून थक्क व भयभीत व्हावें. पण आपण त्यां कृतींचे कौतुक करावें म्हणून नाहीं. त्याची इच्छा अशी आहे कीं आपण त्याच्या सृष्टीकडें पाहून असे म्हणावें : जर त्याचे फक्त अंगुलीकार्य (स्तोत्र 8:3) इतके शहाणपण आणि सामर्थ्य आणि भव्यता आणि वैभव आणि सौंदर्य यांनी परिपूर्ण आहे, तर हा परमेश्वर स्वतः कसा असावा!

ही अंगुलीकार्ये फक्त त्याच्या वैभवाची केवळ मागची बाजू आहेत, कीं जणू आपण ती काचातून खोल अंधकारांत पाहत आहों. मग या सर्वांचा जो निर्माणकर्ता, प्रत्यक्षात त्याचा महिमा पाहणें म्हणजें काय असेल! फक्त त्याच्या हस्तकृतीच नाहीं! अब्ज आकाशगंगा देखील मनुष्याच्या जिवाला संतुष्ट करू शकणार नाहींत. परमेश्वर आणि केवळ परमेश्वर हाच आमच्या आत्म्याची तहान तृप्त करू शकतो.

जोनाथन एडवर्ड्स यांनी ही गोष्ट पुढीलप्रमाणें अभिव्यक्त केलीं :

परमेश्वरापासून आनंद हे ते एकमेव सुख आहे जे आपल्या आत्म्यांची तहान तृप्त करू शकते. स्वर्गात जावून देवाचा पूर्ण आनंद घेणें हे येथें असलेल्यां सर्व-सुखांच्या निवासस्थानांपेक्षा अमर्यादपणें श्रेष्ठ आहे. . . . [ह्यां] फक्त छाया मात्र आहेत. पण देव हा वास्तविक रूप आहे. ह्यां गोष्टी केवळ विखुरलेला प्रकाश आहे; पण देव हा सूर्य आहे. हे फक्त झरे आहेत; पण देव हा महासागर आहे.

म्हणूनच स्तोत्र 104 ची शेवटची 31-34 ही वचनें प्रत्यक्षांत देवावर लक्ष केंद्रित करून या स्तोत्राचा समारोप करतांत. “माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचे गुणगान गाईन. . . परमेश्वराच्या ठायीं मला हर्ष होईल.” शेवटी ज्यां गोष्टीं आपली अंतःकरणें आश्चर्याने भरून टाकतील आणि आपल्या मुखांत सार्वकालिक स्तुती भरतील त्यां गोष्टीं हा समुद्र किंवा हे पर्वत किंवा दऱ्याखोरी किंवा पाण्याचे झरे किंवा ढग किंवा मोठमोठ्या आकाशगंगा नसतील, तर तो स्वतः देव असेल जो सर्वांमध्यें सर्वकाहीं पूर्ण करतो.

25 August : जेव्हा देवाची प्रीति सर्वात गोड असते

Alethia4India
Alethia4India
25 August : जेव्हा देवाची प्रीति सर्वात गोड असते
Loading
/

पतींनो, जशी ख्रिस्तानें मंडळीवर प्रीति केलीं तशी तुम्हींही आपापल्या पत्नीवर प्रीति करा; ख्रिस्तानें मंडळीवर प्रीति केलीं आणि स्वतःस तिच्यासाठीं समर्पण केलें, अशासाठीं कीं, तिला त्यानें वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. (इफिस 5:25-26)

देवानें तुमच्यावर कोणतीही अट न ठेवता प्रीति करावीं अशी जर तुम्हीं केवळ त्याच्याकडून अपेक्षा करत असाल, तर तुमची आशा मोठी तर आहे, पण खूप संकुचित मनाची.

देवाची अट-विरहित प्रीति त्याच्या प्रीतिचा एकमात्र गोड अनुभव नाहीं. सर्वात गोड अनुभव तो असतो जेव्हा त्याची प्रीति असे म्हणते, “मी तुला माझ्या पुत्राच्या प्रतिमेसारखे अशा रीतीने बनवले आहे कीं तुला पाहून व तुझ्या सहभागीतेत राहून मला आनंद होतो. तुझ्याठाई माझा आनंद आहे, कारण तू माझ्या गौरवाने इतका तेजस्वी झाला आहेस.”

हा अति गोड अनुभव आमच्यात परिवर्तन घडवून आणून आम्हांला असे लोक बनविण्याच्या दृष्टिने सशर्त आहे ज्यांच्या भावना आणि निवडी आणि कृती ह्या देवाला आनंद देतांत.

अटीविरहित प्रीति ही मनुष्यांत परिवर्तन घडवून आणणारा तो उगम आणि तो पाया आहे ज्यामुळें सशर्त प्रीतिचा गोडवा शक्य होतो. जर देवानें आपल्यावर अटीविरहित प्रीति केलीं नसती, तर त्यानें आपल्या कुरूप जीवनात प्रवेश केला नसता, आपल्याला विश्वासात आणले नसते, आपल्याला ख्रिस्ताशी जोडले नसते, आपल्याला त्याचा आत्मा देऊ केला नसता आणि आपल्याला अंशा-अंशाने येशूसारखे घडवले नसते.

पण जेव्हा देव कोणतीही अट न ठेवता आपली निवड करतो, आणि ख्रिस्तानें आपल्यासाठीं मरण सोसावे म्हणून त्याला पाठवतो, आणि आपल्याला नव्याने जन्म देतो, तेव्हा तो परिवर्तनाची एक न थांबणारी प्रक्रिया सुरु करतो जी आपल्याला अंशा-अंशाने तेजस्वी बनवत जाते. त्याला ज्या स्वरूपाचा मनुष्य आवडतो त्याशी आपल्याला समरूप करण्यासाठीं तो आपल्याला एक तेज देतो : त्याचे स्वतःचे तेज.

हे आपण इफिसकर 5:25-27 मध्यें पाहतो. “ख्रिस्तानें मंडळीवर प्रीति केलीं आणि स्वतःस तिच्यासाठीं समर्पण केलें (अटी-विरहित प्रीति), अशासाठीं कीं, तिला त्यानें…पवित्र करावे. . . आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी” – म्हणजें ते स्वरूप ज्यांत त्याला आनंद होतो.

आपण अविश्वासात असलेलें पापी असताना देखील देवानें आपल्यावर त्याची अटी-विरहित कृपा केलीं हे ‘अद्भुत’ अवर्णनीय आहे. हे अद्भुत आहे याचे प्रमुख कारण म्हणजें हे कीं ही अटी-विरहित प्रीति आपल्याला त्याच्या गौरवशाली उपस्थितीच्या सार्वकालिक आनंदात घेऊन येते.

पण त्या आनंदाचा शिखर म्हणजें आपण केवळ त्याचे वैभव पाहतच नाहीं तर आपण त्या वैभवाला प्रतिबिंबित सुद्धा करतो. “प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायीं व तुम्हांला त्याच्या ठायीं गौरव मिळावा” (2 थेस्सलनीकाकर 1:12).

24 August : निर्मिलेल्यां पदार्थांचा संदेश

Alethia4India
Alethia4India
24 August : निर्मिलेल्यां पदार्थांचा संदेश
Loading
/

स्वतःला शहाणें म्हणता म्हणता ते मूर्ख बनले; आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केलीं. (रोमकरांस 1:22-23)

जर एखाद्या मनुष्य त्याच्या वधूपेक्षा त्याच्या लग्नाच्या अंगठीवर जास्त प्रेम करत असेल तर हा एक मोठा मूर्खपणा ठरेल आणि मोठी शोकांतिका किंवा अति दुर्दैवी प्रसंग ठरेल. परंतु हा शास्त्रपाठ नेमके तेच घडल्याचे सांगत आहे.

मनुष्यजातिने देवाऐवजी निर्मिलेल्यां वस्तूंमध्यें दिसून येणारे त्याचे सर्वश्रेष्ठ सनातन सामर्थ्य व देवपण याच्या प्रतीबिम्बावर प्रीति केलीं आणि खरी प्रीति आणि सामर्थ्य आणि गौरव ह्याची जी अतुलनीय व मूळ प्रतिध्वनी आहे ती ऐकण्यापासून बहिरी झाली.

निर्मिलेल्यां पदार्थांचा संदेश असा आहे :

या संपूर्ण चित्तथरारक विश्वाच्या निर्मितीमागे एक असा महान परमेश्वर आहे जो वैभव आणि सामर्थ्य आणि औदार्य ह्यानें परिपूर्ण आहे; तुम्हीं त्याचे आहांत कारण त्यानें तुम्हांला बनवले आहे. बंडखोरीने भरलेले तुमचे जीवन कायम ठेवण्यासाठीं तो तुमच्याविषयी धीर धरतो. त्याच्याकडें फिरा आणि त्याजवर तुमची आशा ठेवा आणि त्यानें निर्मिलेल्यां पदार्थांवरून दिसून येणाऱ्या त्याच्या हस्तकलेवरच केवळ नव्हे तर प्रत्यक्षात त्याजमध्यें आपला आनंद शोधा.

स्तोत्र 19:1-2 सांगते त्याप्रमाणें, दिवस त्या संदेशाचा “संवाद” जे दिवसाचे आहेंत त्यां सर्वांसाठीं करतो, आणि दिवस तो संवाद आंधळे करणारा तेजस्वी सूर्य आणि निळे आकाश व  ढग आणि ज्ञात व अज्ञात असे असंख्य ग्रह आणि रंग आणि सर्व दृश्यमान गोष्टींची सुंदर रचना यांच्या द्वारे करतो. रात्र देखील त्याच संदेशाचे “ज्ञान” जें रात्रीचे आहेंत त्या सर्वांसाठीं ओतते, रात्र हे ज्ञान अथांग खोल शून्यता आणि उन्हाळ्यातील चंद्र आणि असंख्य तारे आणि विलक्षण ध्वनी आणि थंड वारा आणि उत्तरेकडील तारे यांद्वारे प्रकट करते.

दिवस व रात्र या एकाच गोष्टीचा संदेश देत आहेत : परमेश्वर वैभवशाली आहे! परमेश्वर वैभवशाली आहे!! परमेश्वर वैभवशाली आहे! निर्मिलेल्यां पदार्थांमध्यें आपलें परम समाधान शोधण्यापासून आपलें मन फिरवा आणि ह्या वैभवशाली परमेश्वरामध्यें हर्षानंद करा.

23 August : देव मूर्तिपूजक नाहीं

Alethia4India
Alethia4India
23 August : देव मूर्तिपूजक नाहीं
Loading
/

आपल्या पवित्र जनांच्या ठायीं गौरव मिळावा म्हणून, आणि त्या दिवशी विश्वास ठेवणार्‍या सर्वांच्या ठायीं आश्‍चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्हीं दिलेंल्या साक्षीवर तुम्हीं विश्वास ठेवला आहे. (2 थेस्सलनीका 1:10)

पौल म्हणतो कीं ख्रिस्त हा मुख्यता त्याला गौरव मिळावा म्हणून आणि आश्‍चर्यपात्र व्हावे म्हणून येत आहे. तो येत आहे त्यामागचे कारण हेच.

देव स्वतःचे गौरव करू पाहतो आणि त्याच्या लोकांकडून त्याची स्तुती व्हावी या शोधांत असतो हे शिक्षण ऐकून बरेच लोक अडखळतांत कारण आपण स्वतःचे गौरव करून घेणारे होऊं नये किंवा स्वतःची स्तुती करून घावयांस पाहूं नये असे बायबल आपल्याला शिक्षण देते. उदाहरणार्थ, बायबल सांगते कीं प्रेम “स्वार्थ पाहत नाहीं” (1 करिंथ 13:5).

देव इतका प्रेमळ असूनही त्याचवेळी पूर्णपणें “स्वतःचे” गौरव (स्वार्थ) व स्तुती करू पाहणारा आणि पूर्णपणें आपलाच आनंद शोधणारा कसा असू शकतो? जर देव स्वतःमध्येंच इतका पूर्णपणें गुंतलेला असेल तर मग तो आमच्या कल्याणार्थ कसा असू शकतो?

मी याचे उत्तर पुढीलप्रमाणें मांडतो : कारण वैभव व परम-स्वयंपूर्णता यांबाबतींत देव हाच एकमेव अद्वितीय आहे, म्हणून जर तो आमचे गौरव करणार असेल तर मग त्याला स्वत:मध्यें गौरवी असणें अगत्याचे आहे. दीन व नम्रपणाचे जें नियम मानव-प्राणी म्हणून आमच्यावर लागू होतांत तें आमचा निर्माणकर्ता म्हणून देवावर लागू होऊ शकत नाहींत.

सार्वकालिक आनंदाचा उगम म्हणून जर देव स्वतःपासूनच विभक्त झाला तर तो देव नाहीं. त्यासाठीं त्याला आपल्या स्वत:च्या अमर्याद वैभवाचे मूल्य नाकारावे लागेल. असे केल्यानें तो हे सूचित करेल कीं त्याच्या स्वतःच्या बाहेर असे काहींतरी आहे जें त्याच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. अशाने तो मूर्तिपूजक ठरेल.

हे आमच्या कोणत्याही लाभाचे नाहीं. कारण आपला देवच जर अनीतिमान झाला आहे तर आपण कोठे जायचे? जें असीम मोलवान त्यालाच जर देवानें असीम महत्त्व देणें थांबविले तर आपण या विश्वात शुद्धतेचा खडक कोठे शोधावा? देव स्वतःविषयीचे जें अमर्याद मूल्य आणि सौंदर्याचे दावे करतो तें त्यानें स्वतःच जर नाकारले तर आपण कोणाची उपासना करावीं?

नाहीं, देवानें आपलें देवपण सोडून द्यावे अशी मागणी करून आपण देवाचे स्वतःचे गौरव करणें ह्याला आपल्या प्रीत्यर्थ प्रीति म्हणूं शकत नाहीं.

उलट, देव अद्वितीय प्रीति आहे हे आपण पाहावें कारण आपल्या पवित्र जनांच्या ठायीं त्याच्या नावाला गौरव मिळावा म्हणून तो अखंडपणें शोध करीत असतो. आपल्या ठायीं त्याच्या महानतेच्या गौरवाची स्तुती व्हावी हाच आपल्या परमानंदाचा आणि त्याच्या महानतेचा शिखर आहे.

22 August : स्तुती करण्यात आनंदी

Alethia4India
Alethia4India
22 August : स्तुती करण्यात आनंदी
Loading
/

देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत! (स्तोत्र 67:3, 5)

आपण देवाची स्तुती करावी अशी देव आपल्याकडून मागणी का करतो?

सी.एस. लुईस :

लोक जितक्या मोठ्या आवेशाने त्यांना किंमत असलेल्यां कोणत्याही गोष्टीची स्वाभाविकरित्या स्तुती करतांत, तितक्याच स्वाभाविक आवेशाने ते आम्हांला देखील त्यांच्या भक्तींत सहभागी होण्याचा आग्रह करतांत : “ती किती सुंदर आहे, नाहीं का? ती गोष्ट किती वैभवी होती, नाहीं का? ती गोष्ट किती विलक्षण आहे, असे तुम्हांला वाटत नाहीं का?”

जेव्हां स्तोत्रकर्ते प्रत्येकाला देवाची स्तुती करण्याचे आव्हान करतांत, तेव्हां तें देखील तेच करत आहेंत जे सर्व लोक स्वाभाविकरित्या मोठ्या आवेशाने त्यांना किंमत असलेल्यां कोणत्याही गोष्टीच्या बाबतींत बोलतांत. देवाची स्तुती करण्याच्या बाबतींत असलेली माझी संपूर्ण, अति सामान्य अडचण ही कीं ती स्तुति आपल्या दृष्टित अति मोलवान असलेल्या व्यक्तीसाठीं जी गोष्ट करण्यात आपल्याला आनंद होतो, तीच आपल्याला करू दिलीं जात नाहीं या माझ्या मूर्खपणाच्या विचारावर अवलंबून आहे, जे खरे पाहता आपण स्वत:हून करू शकत नाहीं.

माझ्या मते, आपल्याला त्याची स्तुती करण्यात आनंद होतो ज्याच्यात आपला सर्व आनंद असतो, कारण स्तुती ही केवळ आपल्याला अभिव्यक्तच करत नाहीं तर ती आपला आनंद देखील भरून काढते; हाच तिचा ठराविक शेवट. एकमेकांवर प्रेम करणारे जोडपे तू किती सुंदर आहेत अशी एकमेकांची स्तुतीसुमने करतांत हा कौतुकाच्या बाहेरचा विषय नाहीं; स्तुती जोपर्यंत व्यक्त होत नाहीं तोपर्यंत आनंद हा अपूर्णच असतो.

येथें उत्तर आहे – देव आपल्याकडून त्याची स्तुती करण्याची मागणी करतो त्यामागे आभासीपणें दिसून येणाऱ्या देवाच्या अहंकारावर उपाय! म्हणजें असें कीं, मुळांत ही आज्ञा आमच्या परम आनंदासाठीं आहे. आपण ज्याचा आनंद घेतो त्याची आपण स्तुतीही करतो कारण तो आनंद जोपर्यंत स्तुती करण्याद्वारे व्यक्त होत नाहीं तोपर्यंत तो अपूर्ण असतो. आपण ज्याला महत्त्व देतो त्याच्याविषयी जर आपल्याला बोलू दिलें नाहीं आणि आपल्याला जे आवडते त्याचा उत्सव साजरा करण्याची आपल्याला परवानगी दिली गेलीं नाहीं आणि ज्याचे आपल्याला कौतुक वाटते किंवा ज्याचा आपण सम्मान करतो त्याची जर आपल्याला स्तुती करू दिली नाहीं तर आपला आनंद पूर्ण होणार नाहीं.

म्हणून, आपला आनंद पूर्ण करण्याइतपत जर देव आपल्यावर प्रीति करत असेल, तर मग त्यानें स्वतःला भेट म्हणून आपल्याला द्यावे इतके पुरे नाहीं; त्यानें आपल्याकडून आपल्या अंतःकरणातून उसळणारी स्तुती देखील जिंकली पाहिजे – त्याला स्वतःमध्यें असलेला काहीं कमकुवतपणा दूर करायचा आहे किंवा त्याच्यात असलेला काहीं अपुरेपणा भरून काढायचा आहे म्हणून नव्हें, तर तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपला आनंद पूर्ण व्हावा अशी उत्कंठा बाळगतो आणि ती उत्कंठा केवळ तेव्हांच पूर्ण होते जेव्हा आपण त्याला ओळखते व त्याची स्तुती करतो, जो सर्वांमध्यें अति महान व गौरवी आहे.

जर तो खरोखर आपला आहे, तर तो तसा स्वतःसाठींच असला पाहिजे! सर्व विश्वात केवळ हाच परमेश्वर असा आहे ज्याच्यासाठीं स्वतःची स्तुती करून घेण्यामध्यें त्याच्या सर्वोच्च प्रीतिचे कार्य प्रकट होते. त्याच्या बाबतींत, स्वतःला उंचविणें हा सर्वोच्च सद्गुण आहे. जेव्हा तो “त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून” सर्व गोष्टी करतो (इफिस 1:12, 14), तेव्हा तो या जगातील अशी एकमेव गोष्ट आपल्यासाठीं राखून ठेवतो व आपल्याला देतो जी आपली संपूर्ण तळमळ संतुष्ट करू शकते.

देव आमच्यासाठीं आहे! परंतु या प्रीतिचा पाया म्हणजें देव हा स्वतःसाठीं होता, आजही स्वतःसाठीं आहे आणि युगानुयुग स्वतःसाठीं राहील.

21 August : अखंड आनंदी देव

Alethia4India
Alethia4India
21 August : अखंड आनंदी देव
Loading
/

“माझा आनंद तुमच्यामध्यें असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.” (योहान 15:11)

परमेश्वर हा निखालस सार्वभौम आहे.

“आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो” (स्तोत्र 115:3).

त्यामुळें तो कधीही निराश होऊ शकत नाहीं. त्यानें मोशेच्या द्वारे इस्रायलाला ज्या पराक्रमाने सोडविले त्याविषयीच्या विविध रंगांवर तो विचार करतो, तेव्हां त्याला आपल्या कृतींपासून आनंद होतो. त्याच्या आनंदाला खंड पडत नाहीं.

त्याचा आनंद हा मुळांत त्याला स्वतःमध्यें असलेली आत्मसंतुष्टी आहे. सृष्टीची उत्पत्ती करण्यापूर्वी, तो त्याच्या पुत्राच्या व्यक्तीत्वात असलेल्या त्याच्या गौरवाच्या प्रतिमेपासून आंनदी होता– म्हणजें त्याच्या प्रिय पुत्रामध्यें ज्याच्याविषयी तो संतुष्ट होता (मत्तय 3:17). नंतर देवाचा हा आनंद त्यानें सृष्टीची उत्पत्ती केलीं व तारणाचे गौरवी कार्य केलें त्यावेळी सर्व “जगासमोर उघड झाला”.

ह्या कृतींपासून देवाच्या मनाला आनंद होतो कारण ती त्याच्या वैभवाचे प्रतिबिंब आहेंत. आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते (स्तोत्र 19:1). “परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो! परमेश्वराला आपल्या कृतींपासून आनंद होवो!” (स्तोत्र 104:31). तो जें काहीं करतो ते सर्व तो आपलें हे वैभव टिकवून ठेवण्यासाठीं व ते जगासमोर उघड करण्यासाठीं करतो, कारण यापासूनच त्याच्या जिवाला आनंद होतो.

देवाच्या सर्व कृतींचा कळस तारण पावलेलें त्याचे लोक त्याची थोरवी वर्णितांत त्यांत आहे. “त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा; त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा!” (स्तोत्र 150:2). त्याच्या आनंदाचा कळस म्हणजें जेव्हा तो पवित्र केलेंल्या आपल्या सर्व लोकांच्या स्तवनाची ललकारपूर्ण प्रतिध्वनी ऐकतो त्यापासून त्याला होणारा आनंद घेतो. “तो घोड्याच्या बलाने आनंदित होत नाहीं, मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाहीं. जे परमेश्वराचे भय धरतांत, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतांत त्यांच्यावर तो संतुष्ट होतो” (स्तोत्र 147:10-11).

परंतु त्याच्या थोरवीचा प्रतिध्वनी म्हणून जेव्हा देव आपली स्तवने ऐकतो तेव्हां त्यापासून केवळ त्यालाच आनंद होत नाहीं; त्याच्या थोरवीचे हे स्तवन आपल्या आनंदाचा देखील कळस आहे. स्तवन म्हणजें जेव्हां आपण देवाची थोरवी पाहतो व तिचा आस्वाद घेतो तेव्हां त्यांत आपल्याला जो आनंद मिळतो त्यात आपल्याला मिळणारी संतुष्टी

म्हणून, आपल्याकडून त्याचे स्तवन व्हावे हा देवाचा शोधाशोध आणि त्यांत आनंद मिळवण्याचा आपला शोधाशोध हा शोधाशोध आहे. ख्रिस्तात प्रकट झालेंल्या देवाच्या कृपेच्या गौरवाच्या सुवार्तेचा हा अग्रगण्य परिणाम आहे!