ArchivesSolid Joys

2 July : तुम्हांला देवाची किती चांगल्याप्रकारे ओळख आहे?

Alethia4India
Alethia4India
2 July : तुम्हांला देवाची किती चांगल्याप्रकारे ओळख आहे?
Loading
/

“पाहा, देव थोर आहे, तो आम्हांला अगम्य आहे; त्याच्या वर्षांची संख्या अगण्य आहे.” (ईयोब 36:26)

देवाला अतिशय चांगल्याप्रकारे जाणणें किंवा ओळखणें अशक्य आहे.

तो अस्तित्वात असलेला सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती आहे. आणि याचे कारण हे कीं त्यानें इतर सर्वांना घडविले, आणि त्यांना जर कुठले महत्व असेल तर ते त्याच्यामुळें आहे.

इतर जिवांस जे बळ अथवा बुद्धी अथवा कौशल्य अथवा सौंदर्य मिळाले आहे ते सर्व त्याच्याकडून येते. उत्तमतेच्या प्रत्येक पातळीवर, तो तुम्हीं ओळखत असलेल्या किंवा ज्याच्याविषयी तुम्हीं ऐकलें आहे अशा सर्वोत्तम व्यक्तीपेक्षा अमर्यादपणें श्रेष्ठ आहे.

अनंत, अपरंपार असल्याने, त्याच्यांत असलेली चित्तवेधकता अमर्याद आहे. म्हणून देव कंटाळवाणा असणें अशक्य आहे. अत्यंत बुद्धिमत्तापूर्ण आणि चित्तवेधक कृत्यांचे त्याचे सतत प्रदर्शन स्फोटक आहे.

प्रत्येक उत्तम आनंदाचा उगम म्हणून, तो स्वतःमध्यें पूर्णपणें आणि कायमचा प्रसन्न राहतो. जर आपण त्याला तशाप्रकारे ओळखत नाहीं, तर आपण एकतर मृत आहोत, अथवा आंधळे आहोत किंवा निद्रेत चालत आहोत.

म्हणून या जगात परमेश्वरास जाणून घेण्यासाठीं किती कमी कष्ट केलें जातांत ही बाब म्हणजें धक्कादायकच.

हे जणू काहीं असे आहे कीं देशाचे राष्ट्रपती तुमच्यासोबत महिनाभर राहाण्यासाठीं आलें आणि तुम्हीं दररोज येता जाता त्यांना फक्त सलाम म्हणतां. किंवा जणूकाहीं तुम्हीं प्रकाशाच्या गतीने काहीं तास सूर्य आणि सौरमंडलाभोवती उडत होता, आणि खिडकींतून बाहेर पाहण्याऐवजी तुम्हीं कंप्यूटर गेम खेळत बसला. किंवा जणूकाहीं तुम्हांला सर्वोत्कृष्ट अभिनेते, गायक, क्रीडापटू, संशोधक आणि विद्वान लोकांचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन पाहण्यासाठीं आमंत्रित करण्यात आलें होते, परंतु तुम्हीं जाण्यास नकार दिला, यासाठीं कीं तुम्हांला टीव्ही वरील तुमच्या आवडत्या मालिकेचा शेवटचा भाग पाहता यावा.

आपण एकत्र मिळून प्रार्थना करू या कीं आपला अमर्यादितरित्या थोर परमेश्वर त्याला आम्हास शक्य तितके पूर्णपणें पाहता यावें आणि त्याला आणखी जाणून घेण्यासाठीं त्याचा शोध घ्यावा म्हणून त्यानेंच आमचे अंतःकरण वळवावे, आणि आमचे डोळे उघडावे.

1 July : तुमचे चांगले करण्यात देवाचा आनंद

Alethia4India
Alethia4India
1 July : तुमचे चांगले करण्यात देवाचा आनंद
Loading
/

हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. (लूक 12:32)

येशू बाजूला बसून लढा न देता आम्हांला अविश्वासांत सोडून देणार नाहीं. तो वचनरुपी शस्त्र हाती घेतो आणि जे विश्वास ठेवण्यास संघर्ष करतांत त्या सर्वांसाठीं ते तो आपल्या सामर्थ्याने बोलतो.

देव तशाप्रकारचा देव नाहीं जो खरोखर आमच्यासाठीं चांगला बनू इच्छितो ही भिती घालवून देणें हा त्याचा उद्देश्य आहे – म्हणजें ही भीती कीं तो खरोखर उदार आणि सहाय्यक आणि दयाळू आणि कोमल नाहीं, तर मुळांत आमच्यावर चिडलेला आहे – त्याची मनःस्थिती चांगली नाहीं आणि तो क्रोधाविष्ठ आहे.

कधी कधी, जरी आम्हीं आपल्या मनात हा विश्वास ठेवतो कीं देव आमच्यासाठीं चांगला आहे, तरीही आम्हांला आमच्या अंतःकरणात असे वाटू शकते कीं त्याचा चांगलुपणा बळजबरीने आहे किंवा चांगुलपणा दाखविण्यासाठीं त्याला भाग पाडण्यात आलें आहे, कदाचित एखाद्या न्यायाधिशाप्रमाणें ज्याला न्यायालयाच्या कार्यवाहीच्या कुठल्या तरी तांत्रिकतेविषयी सांगून एखादा चतुर वकींल युक्तीने कोपऱ्यांत नेतो, जेणेंकरून त्याला एखाद्या कैदाविरुद्ध असलेले आरोप खारीज करावे लागतांत ज्याला खरे पाहता त्यानें तुरुंगवास द्यावयास हवा होता.

पण परमेश्वराविषयी आम्हांला असे वाटता कामा नये म्हणून येशूला कळकळीने आमचे सहाय्य करायची आहे. तो लूक 12:32 मध्यें आपल्याला राज्य देण्यात त्याला जो पराकोटीचा आनंद होतो तो दाखविण्याद्वारे आपल्यासाठीं देवाच्या आत्म्याचे अवर्णनीय मूल्य आणि उत्कृष्टतेचे वर्णन करण्याचा तो प्रयत्न करत आहे.

“हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” ह्या अद्भुत वाक्यातील प्रत्येक लहान शब्दाचा हेतू ती भिती काढून घेण्यास आपली मदत करणें आहे ज्याविषयी येशूला माहीत आहे कीं आपण त्याविषयी संघर्ष करित आहोंत, म्हणजें ही भीती कीं देव त्याचे लाभ आपल्याला देण्याच्या बाबतींत जळफळो; कीं त्याला भाग पडते म्हणून तो चांगल्या गोष्टी करतो आणि हे त्याच्या स्वभावानुसार नाहीं; कीं आतल्या आत तो रागावलेला आहे आणि आपल्या रागाला वाट करून देणें त्याला आवडते.

लूक 12:32 हे वाक्य देवाच्या स्वभावाविषयी आहे. ते अशाप्रकारच्या अंतःकरणाचे वर्णन आहे जे देवाजवळ आहे. देवाला कोणती गोष्ट आनंदित करते, त्याला काय करणें आवडते आणि त्याला काय करण्यात आनंद वाटतो याविषयी हे वाक्य आहे. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. “हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” (लूक 12:32)

30 June : येणाऱ्या क्रोधात स्वर्गाची विश्रांती

Alethia4India
Alethia4India
30 June : येणाऱ्या क्रोधात स्वर्गाची विश्रांती
Loading
/

तुमच्यांवर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटानें फेड करणें आणि संकट सोसणाऱ्या तुम्हांला आमच्यांबरोबर विश्रांती देणें, हे देवाच्या दृष्टीनें न्याय्य आहे, म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयीं ते होईल; तो आपल्यां सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेंसहित प्रकट होईल; तेव्हां जे देवाला ओळखत नाहींत व आपल्यां प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहींत त्यांचा तो सूड उगवील. (2 थिस्सल 1:6-8)

अशी वेळ येईल जेव्हां देवाचा धीर समाप्त होईल. जेव्हां देव ठरविलेंल्या समयापर्यन्त त्याच्या लोकांना दुःख सोसतांना पाहून चुकेल, आणि रक्तसाक्षींची ठरविलेंली संख्या पूर्ण होईल (प्रकटीकरण 6:11), तेव्हां न्याय व पवित्र सूड स्वर्गातून प्रकट होईल.

लक्ष द्या कीं जे लोग देवाच्या लोकांवर जुलूम करतांत त्यां लोकांवर जेव्हां देवाचा सूड येतो त्याला आपण “विश्रांती” म्हणून साजरा करूं. “तुमच्यांवर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटानें फेड करणें आणि संकट सोसणाऱ्या तुम्हांला आमच्यांबरोबर विश्रांती देणें, हे देवाच्या दृष्टीनें न्याय्य आहे.” दुसऱ्या शब्दांत, “आमच्यांवर संकट आणणाऱ्या लोकांवर” न्याय आमच्यांसाठीं कृपेचेच एक स्वरूप आहे.

कदाचित कृपेच्या रूपात न्यायाचे अतिशय अप्रतीम चित्र प्रकटीकरण 18 मध्यें बाबेलच्या विनाशाचे चित्र आहे. तिच्या नाशाच्या वेळी, स्वर्गातून एक मोठी वाणी ऐकू येते, ‘हे स्वर्गा’, आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयीं ‘आनंद करा;’ कारण देवानें तिला दंड करून तुम्हांला ‘न्याय दिला आहे”’ (प्रकटीकरण 18:20). ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘हालेंलूया!’ तारण, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही प्रभू जो आमचा देव ह्याची आहेत; कारण ‘त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे’ व ‘नीतीचे’ आहेत; ज्या मोठ्या कलावंतिणीनें आपल्यां जारकर्मानें पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्यानें केला आहे, आणि आपल्यां ‘दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे” (प्रकटीकरण 19:1-2).

जेव्हां देवाचा धीर व त्याची सहनशीलता संपुष्टात येईल, आणि हे युग समाप्त होईल, आणि देवाच्या लोकांच्या शत्रूंवर न्याय ओढवेल, तेव्हां पवित्र लोक देवाचा न्याय अमान्य करणार नाहींत.

याचा अर्थ हा आहे कीं पश्चात्ताप न करणाऱ्यांचा अंतिम नाश देवाच्या लोकांसाठीं दुखाचा अनुभव नसेल.

इतरांची पश्चात्ताप न करण्याची इच्छा संतांचे प्रेम ओलीस ठेवणार नाहीं. नरक स्वर्गाला धमकीं देऊन दुःखी करूं शकणार नाहीं. देवाचा न्याय मान्य केला जाईल आणि संतांना मोठी कृपा म्हणून सत्याचे प्रमाणीकरण अनुभवता येईल.

29 June : व्यावहारिक प्रीतीचे सामर्थ्यवान मूळ

Alethia4India
Alethia4India
29 June : व्यावहारिक प्रीतीचे सामर्थ्यवान मूळ
Loading
/

आपण बंधुजनांवर प्रीती करतो ह्यावरून आपल्यांला कळून येते कीं, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. (1 योहान 3:14).

म्हणून, प्रीती या गोष्टीचा पुरावा आहे कीं आमचा नवा जन्म झाला आहे – कीं आम्हीं ख्रिस्ती आहोत, कीं आमचे तारण झालें आहे.

कधी कधी पवित्र शास्त्र आमच्यां पावित्र्यास आणि लोकांसाठीं आमच्यां प्रीतीस आमच्यां अंतिम तारणाची अट ठरविते. दुसऱ्या शब्दात, जर आपण पवित्र नाहीं आणि प्रेमळ नाहीं, तर आपण न्यायाच्या दिवशी बचावणार नाहीं (उदाहरण, इब्री 12:14; गलती 5:21; 1 करिंथ 6:10). याचा अर्थ असा होत नाहीं कीं आपण प्रीतीच्या कर्मांनी देवासमोर नीतिमान ठरविलें जातो. नाहीं, बायबल पुन्हा पुन्हा स्पष्टपणें सांगते, जसे इफिस 2:8-9 मध्यें म्हटलें आहे, “कारण कृपेनेंच विश्वासाच्या द्वारें तुमचे तारण झालेलें आहे आणि हे तुमच्यां हातून झालें असें नाहीं, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्यांनें हे झालें नाहीं.” नाहीं, जेव्हां बायबल म्हणते कीं विश्वासाच्याद्वारें आमचे तारण झालेलें आहे, पण हे कीं शेवटी तारण प्राप्त करण्यासाठीं आपण लोकांवर प्रीती केली पाहिजे, तेव्हां त्याचा अर्थ हा आहे कीं देवाच्या अभिवचनांत विश्वास इतका वास्तविक असला पाहिजे कीं त्याद्वारें जी प्रीती उत्पन्न होते ती विश्वासाची वास्तविकता सिद्ध करते.

म्हणून, इतरांसाठीं प्रीती ही भविष्यातील कृपेची या अर्थानें अट आहे कीं ती या गोष्टीची पुष्टी करते कीं मूळ अट, विश्वास, अस्सल आहे. आपण इतरांसाठीं असलेंल्या प्रीतीला दुसऱ्या स्थानी असलेंली अट म्हणू शकतो, जी विश्वासाच्या मूळ आणि आवश्यक अटीच्या यथार्थतेची पुष्टी करते, असा विश्वास केवळ जो आम्हांला ख्रिस्ताशी जोडतो आणि त्याचे सामर्थ्य प्राप्त करतो.

विश्वास भविष्यातील कृपेच्या अभिवचनांत देवाचे कसे गौरव होते तें ओळखतो आणि येशूमध्यें देव आमच्यांसाठीं जो आहे हे जे काहीं अभिवचनांद्वारें प्रकट होते त्या सर्व गोष्टी स्वीकारतो. देवाच्या गौरवाची ती आत्मिक दृष्टी आणि त्यात आमचा आनंद, स्वतःस प्रमाणित करणारा पुरावा आहे कीं देवानें आम्हास त्याच्या कृपेचे लाभार्थी होण्यासाठीं पाचारण केलें आहे.  हा पुरावा आम्हास स्वतंत्र करतो कीं आम्हीं आपलें स्वतःचे म्हणून देवाच्या अभिवचनावर अवलंबून राहावे. आणि अभिवचनावर हे अवलंबून राहणें आम्हांला प्रेम करण्याचे सामर्थ्य देते. जे बदल्यात या गोष्टीची पुष्टी करते कीं आमचा विश्वास खरा आहे.

जग त्या विश्वासासाठीं आतुर आहे जो दोन गोष्टींना परस्पर जोडते: अढळ ईश्वरीय सत्याचे विस्मयकारक दर्शन आणि झालेंल्या तारणा द्वारें जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठीं अत्यंत व्यावहारिक, चोवीस तास सामर्थ्य.. मलाही तेच हवे आहे. याच कारणास्तव मी ख्रिस्ती आहे.

एक कृपाळू महान परमेश्वर आहे जो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असहाय लोकांना दिलेंली आपली अभिवचनें पूर्ण करून स्वतःचे असीम सौंदर्य आणि आत्मनिर्भरता यांचे गौरव करतो. आणि या देवाला मौल्यवान समजण्यापासून एक सामर्थ्य येते जे आमच्यां जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करते. ते आम्हांला अत्यंत व्यावहारिक पद्धतीनें प्रेम करण्यास समर्थ करते.

28 June : आज्ञापालनामुळें येणाऱ्या संकटांत धीर धरणें

Alethia4India
Alethia4India
28 June : आज्ञापालनामुळें येणाऱ्या संकटांत धीर धरणें
Loading
/

आपण आपल्यां विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडें पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्यानें लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. (इब्री 12:2).

विश्वास जे करतो ते कधी कधी अतिशय कठीण असते.

मिरेकल ऑन द रिव्हर क्वाई नावाच्या आपल्यां पुस्तकात अर्नेस्ट गॉर्डन द्वितीय विश्व युद्धादरम्यान बर्मा रेल्वेत काम करणाऱ्या पीओडब्लूच्या एका समूहाची खरी गोष्ट सांगतात.

प्रत्येक दिवसाच्या शेवटी काम करणार्यांकडून औजारे गोळा केली जात. एकदा एका जपानी पहारेकरूंनें एक फावडे गायब झाल्याचा आक्रोश केला आणि ते कोणत्या माणसानें घेतलें हे जाणून घेण्याची मागणी केली. तो आरडाओरड आणि शिवीगाळ करूं लागला, तो विक्षिप्त संतापानें ओरडू लागला आणि जो दोषी असेल त्यानें पुढे यावे असा आदेश त्यानें दिला. कोणीही हललें नाहीं. “सर्व मरतील! सर्व मरतील!” कैद्यांकडें आपली लहान बंदूकीं उंचावत आणि निशाणा साधत, तो किंचाळला. त्याच क्षणी एक माणूस पुढे आला आणि तो शांतपणें उभा असतांना पहारेकरूंनें त्याच्या रायफलनें त्याला ठार केलें. जेव्हां ते छावणीत परतलें, तेव्हां औजारे पुन्हा मोजली गेली आणि एकही फावडा गहाळ झालेंला नव्हता.

तुम्हीं निर्दोष असताना, इतरांसाठीं मरण्याची इच्छा कशामुळें टिकून राहू शकते? “जो आनंद त्याच्यापुढे होता” त्याद्वारें येशूनें आमच्यांवर प्रीती केली आणि त्या प्रेमात तो टिकून राहिला. तो भविष्यातील गौरवशाली आशीर्वाद आणि आनंदावर अवलंबून होता आणि त्यानें त्याला त्याच्या दुःखातूनही त्याच्या प्रेमात राखलें आणि टिकवून ठेवलें.

आम्हास धिक्कार असो जर आम्हीं असा विचार करतो कीं जो आनंद आमच्यांपुढें आहे त्यापेक्षा कुठल्यातरी उच्च हेतूनें आम्हीं मूलगामी, जीवघेण्या आज्ञापालनासाठीं प्रेरित झालें पाहिजे आणि बळ प्राप्त केलें पाहिजे. जेव्हां येशूनें मूल्यवान आज्ञापालनाची गरज व्यक्त केली ज्यासाठीं या जीवनात बलिदानाची आवश्यकता भासणार होती, तेव्हां त्यानें लूक 14:14 मध्यें असें म्हटलें, “म्हणजें तुम्हीं धन्य व्हाल, कारण तुमची फेड करण्यास त्यांच्याजवळ काहीं नाहीं; तरी नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल.” दुसऱ्या शब्दांत, जो आनंद तुमच्यांपुढे आहे, त्यासाठीं ख्रिस्तासाठीं तुम्हीं जें कांही गमावता त्यामध्यें आज दृढ व्हा.

पेत्रानें म्हटलें कीं, जेव्हां येशूनें सूड न घेता दुःख सोसलें, तेव्हां तो आपल्यांला अनुसरण करण्यासाठीं एक उदाहरण सोडून जात होता – आणि त्यात त्याच्यापुढे असलेंल्या आनंदात येशूचा भरवंसा समाविष्ट आहे. त्यानें त्याचे कार्य देवाच्या हाती सोपवलें (1 पेत्र 2:21) आणि सूडबुद्धीनें हिशेब चुकविण्याचा प्रयत्न केला नाहीं. त्यानें पुनरुत्थान आणि त्याच्या पित्यासोबत पुनर्मिलन आणि त्याच्या लोकांच्या मुक्तीच्या सर्व आनंदांवर आपली आशा आधारित केली. तसेच आपणही केलें पाहिजे.

27 June : लाचार व्यक्तीसाठींआश्रयाचे ठिकाण

Alethia4India
Alethia4India
27 June : लाचार व्यक्तीसाठींआश्रयाचे ठिकाण
Loading
/

तुझें चांगुलपण किती थोर आहे! तुझें भय धरणाऱ्यांकरता तू ते साठवून ठेवलें आहेस, तुझा आश्रय करणाऱ्यांसाठीं मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केलें आहेस. (स्तोत्र 31:19).

भविष्यातील कृपेचा अनुभव अनेकदा या गोष्टीवर अवलंबून असतो कीं आपण परमेश्वरामध्यें आश्रय घेणार आहोत, कीं आपण त्याला आपल्यांविषयीं  असलेंल्या काळजीबद्दल शंका घेणार व आश्रय मिळविण्यासाठीं दुसऱ्यां कोणत्या ठिकाणी निवारा शोधणार.

जे देवाच्या पंखाखाली आश्रय घेतात त्यांच्यासाठीं, भविष्यातील कृपेची अभिवचनें अनेक आणि संपन्न आहेत.

  •  त्याचा आश्रय धरणाऱ्या कोणावरही दंडाज्ञा नाहीं. (स्तोत्र 34:22)
  • त्याचा आश्रय करणाऱ्या सर्वांची तो ढाल आहे. (2 शमुवेल 22:31)
  • त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत. (स्तोत्र 2:12)
  • परमेश्वर चांगला आहे, विपत्काली तो शरणदुर्ग आहे; जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यांना तो ओळखतो. (नहूम 1:7)

परमेश्वराठायी शरण घेण्याद्वारें आम्हीं काहींही कमावत नाहीं अथवा आम्हीं कुठल्याही गोष्टीसाठीं पात्र ठरत नाहीं. आम्हीं दुर्बळ आहोत आणि आम्हांला संरक्षणाची गरज आहे म्हणून, लपणें हे आमच्यां आत्मनिर्भरतेची प्रशंसा करणारे कार्य नाहीं. त्याद्वारें फक्त हे दिसून येते कीं आम्हीं स्वतःला लाचार समजतो आणि लपण्याच्या ठिकाणास बचावाचे ठिकाण समजतो.

मीं आताच वर जीं जीं अभिवचनें नमूद केलीं आहेंत त्यां सर्व अभिवचनांमध्यें, देवाकडून मोठ्या आशीर्वादाची अट ही आहे कीं आम्हीं त्याच्याठायी शरण घ्यावी. ही अट गुणसंपन्नतेची नाहीं; ही अट आतुरतेची आणि मान्य केलेंल्या दुर्बळतेची आणि गरजेची व भरवश्याची अभिव्यक्ती आहे.

आतुरता मागणी करीत नाहीं किंवा आम्हांस पात्र ठरवीत नाहीं. ती दयेची याचना करते आणि कृपा मिळविण्यासाठीं झटते.

26 June : भीती जी आम्हास आत ओढून घेते

Alethia4India
Alethia4India
26 June : भीती जी आम्हास आत ओढून घेते
Loading
/

“भिऊ नका. कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्यां मनात राहून तुम्हीं पाप करूं नये ह्यासाठीं देव आला आहे.” (निर्गम 20:20)

एक अशी भीती आहे जी गुलाम बनविते आणि आम्हांला देवापासून दूर करते, आणि अशी भीती आहे जी गोड आहे आणि आम्हांला देवाकडें ओढते. मोशेनें एकाविरूद्ध ताकींद दिली आणि त्याच वचनात दुसरीची मागणी केली, निर्गम 20:20: “तेव्हां मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्यां मनात राहून तुम्हीं पाप करूं नये ह्यासाठीं देव आला आहे.”

अशाप्रकारच्या चांगल्या भीतीचे सर्वात स्पष्ट उदाहरण जे मी कधी पाहिलें आहे ते ती वेळ होती जेव्हां माझ्या मुलांपैकीं एकानें जर्मन शेफर्डच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलें. आमच्यां मंडळीतील एका कुटुंबास आम्हीं भेट देत होतो. माझा मुलगा कार्स्टेन सुमारे सात वर्षांचा होता. त्यांच्याजवळ एक मोठा कुत्रा होता जो सात वर्षाच्या मुलाच्या डोळ्यात डोळे घालून उभा होता.

तो मित्रभावी होता आणि कार्स्टेनला मित्र बनविण्यात काहीं समस्या नव्हती. पण जेव्हां आम्हीं कार्स्टेनला आम्हीं विसरलेंली काहीं वस्तू आणण्यासाठीं परत कारजवळ पाठविलें, तेव्हां तो धावू लागला, आणि कुत्रा त्याच्या मागे हळूहळू गुरगुरत धावत होता. आणि अर्थातच, यामुळें कार्स्टेन घाबरून गेला. पण मालकानें म्हटलें, “कार्स्टेन, तू चालत का जात नाहींस? लोक त्याच्यापासून पळावे  ही गोष्ट कुत्र्याला आवडत नाहीं.”

जर कार्स्टेननें कुत्र्याला मिठी मारली, तर तो मित्रभावी होईल आणि त्याच्या चेहऱ्याला चाटत असें. पण जर तो कुत्र्यापासून पळ काढायचा, तर कुत्रा गुरगुर करूं लागत असें आणि यामुळें कार्स्टेन घाबरून जात असें.

परमेश्वराचे भय धरण्याचा अर्थ काय आहे याचे हे चित्र आहे. देव त्याच्या सामर्थ्यासाठीं पावित्र्यासाठीं आमच्यांमध्यें भीती जागृत करतो, आम्हांला त्याच्यापासून दूर पळविण्यासाठीं नाहीं, पण आम्हांला त्याच्याजवळ ओढण्यासाठीं. देवाला भिण्याचा अर्थ, प्रथमतः, अशा विचाराची भीती कीं आमची सर्वात मोठी सुरक्षा व समाधान म्हणून त्याचा त्याग करून जाणें.

दुसऱ्या शब्दात म्हणायचे झाल्यास, आपण अविश्वासाची भीती बाळगली पाहिजे. देवाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवण्यास भिऊ नका. रोम 11:20 चा हाच मुद्दा नाहीं का? “बरे, अविश्वासामुळें त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासानें तुला स्थिरता आली, तर अहंकार बाळगू नकोस, भीती बाळग.” अर्थात, ज्याची भीती बाळगली पाहिजे ते आहे विश्वास न करणें, विश्वास न बाळगणें. देवापासून दूर पळून जाण्याची भीती. पण जर आपण त्याच्यासोबत चालत असू आणि त्याच्या गळ्याला मिठी मारत असू, तर तो सदैव आपला मित्र आणि संरक्षक ठरेल.

25 June : लोभ म्हटलेला मृत्यूचा सापळा

Alethia4India
Alethia4India
25 June : लोभ म्हटलेला मृत्यूचा सापळा
Loading
/

परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात. (1 तीमथ्य 6:9).

लोभ मनुष्याला सर्वकाळासाठीं नरकात नाश करूं शकतो.

मला खात्री आहे कीं हा नाश अस्थायी आर्थिक संकट नसून, नरकात होणारा अंतिम विनाश आहे याचे कारण तीन वचनांनंतर 1 तीमथ्य 6:12 मध्यें पौल जे काहीं म्हणतो ते आहे. तो म्हणतो कीं लोभाचा प्रतिकार विश्वासाद्वारें लढा देऊन केला गेला पाहिजे. मग तो पुढे म्हणतो, “युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर; त्यासाठींच तुला पाचारण झालें आहे, आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तो चांगला पत्कर केला आहेस.” लोभापासून पळ काढण्यात आणि भविष्यातील कृपेवर विश्वास ठेवून समाधानासाठीं लढण्यात जे पणास लागत असेल ते म्हणजें सार्वकालिक जीवन.

म्हणून, जेव्हां पौल 1 तीमथ्य 6:9 मध्यें म्हणतो कीं धनवान होण्याची परीक्षा लोकांचा नाश करते, तो असें म्हणत नाहीं कीं लोभ तुमच्यां वैवाहिक जीवनाचा अथवा उद्योगाचा (जे तो नक्कीच करूं शकतो!) नाश करतो. तो म्हणत आहे कीं लोभ तुमच्यां सार्वकालिक जीवनाचा नाश करूं शकतो. किंवा, जसे 1 तीमथ्य 6:10 मध्यें शेवटी म्हटलें आहे, “कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकलें आहेत; आणि त्यांनी स्वतांस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतलें आहे” (अक्षरशः “स्वतःला अनेक दुःखांनी क्रुसावर चढविलें आहे”).

बायबलमध्यें देवानें अतिरिक्त मैल पुढे जाऊन आम्हास अत्यंत दयाळूपणें ताकींद दिली आहे कीं लोभाची मूर्तिपूजा प्रतिकूल परिस्थिती आहे. शब्दाच्या दुसऱ्या अर्थानें सांगितलें झाल्यास तेथून पुढे जाण्याचा मार्ग नाहीं. ती एक युक्ती आणि प्राणघातक सापळा आहे.

म्हणून, तुम्हास माझा शब्द आहे 1 तीमथ्य 6:11 चे हे वचन: “तू ह्यांपासून पळ काढ.” जेव्हां तुम्हीं ते येतांना पाहता (टेलीविजनच्या जाहिरातीत अथवा ख्रिसमसच्या कॅटलॉगमध्यें अथवा इंटरनेंट पॉप-अप अथवा शेजाऱ्याच्या खरेदीमध्यें), तेव्हां त्यापासून असा पळ काढा जसे तुम्हीं प्राणी संग्रहालयातून सुटलेंल्या गरजणाऱ्या, भूकेल्यां सिंहापासून पळ काढाल. “युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर.”

24 June : मी सर्व परिस्थितीत समाधानी राहू शकतो

Alethia4India
Alethia4India
24 June : मी सर्व परिस्थितीत समाधानी राहू शकतो
Loading
/

मला काहीं कमी पडल्यामुळें मी बोलतो असें नाहीं; कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणें मला समजते, संपन्नतेतही राहणें समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणें व क्षुधित असणें, संपन्न असणें व विपन्न असणें, ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आलें आहे. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाहीं करण्यास शक्तिमान आहे. (फिलिप्पै 4:11-13)

भविष्यातील कृपेची देवाची रोजची तरतूद पौलास अन्नतृप्त असण्यास किंवा क्षुधित असण्यास, संपन्न असण्यास किंवा दुःख सोसण्यास, विपुलता मिळविण्यास किंवा विपन्नावस्थेत जगण्यास सामर्थ्य पुरविते.

“मी सर्वकाहीं करण्यास शक्तीमान आहे” याचा अर्थ खरोखर “सर्वकाहीं” असा होतो, केवळ सोप्या गोष्टी नव्हे. “सर्वकाहीं” चा अर्थ आहे, ख्रिस्ताद्वारें मी उपासमार सहन करूं शकतो, दुःख सोसू शकतो आणि दैन्यावस्थेत राहू शकतो.” हे फिलिप्पै 4:19 मधील प्रभावशाली वचनास त्याच्या योग्य प्रकाशात मांडते: “माझा देव आपल्यां संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारें पुरवील.”

फिलिप्पै 4:11-12च्या दृष्टिकोनात “तुमची सर्व गरज” चा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ “त्या सर्व गोष्टी ज्याची गरज तुम्हांला देवाला गौरविणाऱ्या समाधानासाठीं भासते.” ज्यात भूक आणि गरजेच्या वेळांचा समावेश आहे. फिलिप्पैकरांसाठीं पौलाची प्रीती देवामधील त्याच्या समाधानापासून प्रवाहित होत असें, आणि त्याचे समाधान विपुलतेच्या आणि अभावाच्या वेळेत त्याला ज्या सर्व गोष्टींची गरज असें ती पुरविणाऱ्या देवाच्या खात्रीपूर्ण तरतुदीच्या भविष्यातील कृपेवरील त्याच्या विश्वासातून प्रवाहित होत असें.

तर हे स्पष्ट आहे कीं लोभ हा विश्वासाच्या अगदी विरुद्ध आहे. ही ख्रिस्तामधील समाधानाची हानी आहे यासाठीं कीं आपण आपल्यां हृदयाच्या अभिलाषा पूर्ण करण्यासाठीं इतर गोष्टींची इच्छा धरू लागतो ज्याचे समाधान केवळ देवाचे सान्निध्य करूं शकते. आणि यात काहीं चूक नाहीं कीं लोभाविरुद्धची लढाई ही देवाचे अभिवचन प्रत्येक परिस्थितीत आम्हास आवश्यक असलेंल्या गोष्टींत सर्वप्रकारे तरतूद करूं शकते याविषयीं अविश्वास करण्याविरुद्धची लढाई आहे.

हे इब्री 13:5 मध्यें पूर्णपणें स्पष्ट आहे. द्रव्यलोभापासून आमच्यां सुटकेबद्दल  – लोभापासून सुटकेबद्दल – देवामध्यें असलेंल्या समाधानाच्या स्वातंत्र्याबद्दल लेंखक कसा युक्तिवाद मांडतो ते पहा : “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्हीं तृप्त असावे; कारण त्यानें स्वतः म्हटलें आहे, “मी तुला सोडून जाणार नाहीं व तुला टाकणार नाहीं” या अभिवचनावरील विश्वास – “मी तुला सोडून जाणार नाहीं व तुला टाकणार नाहीं” देवाचा अनादर करणाऱ्या सर्व इच्छेचे – सर्व लोभाचे – सामर्थ्य तोडते

जेव्हां जेव्हां आपल्यांला आपल्यां अंतःकरणात लोभाचा थोडा देखील उदय झाल्याचे जाणवते तेव्हां तेव्हां आपण त्याकडें वळून या विश्वासाच्या शस्त्रास्त्रांचा उपयोग करून आपली सर्व शक्ती पणास लावून त्याच्याशी लढा दिला पाहिजे.

23 June : विश्वास त्याचा आदर करतो ज्याच्यावर तो विश्वास ठेवतो

Alethia4India
Alethia4India
23 June : विश्वास त्याचा आदर करतो ज्याच्यावर तो विश्वास ठेवतो
Loading
/

परंतु देवाच्या अभिवचनाकडें पाहून तो अविश्वासामुळें डळमळला नाहीं, तर विश्वासानें सबळ होऊन त्यानें देवाचा गौरव केला. (रोम 4:20)

ओह, पवित्रता आणि प्रीतीचा आम्हीं पाठपुरावा करीत असतांना देवाचे गौरव व्हावे अशी माझी किती इच्छा आहे. पण जोवर आमचा पाठपुरावा देवाच्या अभिवचनांवरील विश्वासानें समर्थ होत नाहीं तोवर देवाचे गौरव होणें शक्य नाहीं.

आणि ज्या देवानें स्वतःला येशू ख्रिस्तामध्यें अत्यंत परिपूर्णपणें प्रकट केलें, जो आमच्यां पापांसाठीं वधस्तंभावर खिळला गेला आणि आम्हीं नीतिमान ठरावे म्हणून पुनरुत्थित झाला (रोम 4:25), त्याचे त्यावेळी अत्यंत गौरव होते जेव्हां आम्हीं अत्यंत आनंदानें त्याच्या अभिवचनांचा स्वीकार करतो कारण ती अभिवचनें त्याच्या पुत्राच्या रक्तानें विकत घेण्यात आली आहेत.

जेव्हां आपण आपला दुर्बळपणा आणि अपयश यांमुळें आपलें अंतकरण दीन करतो, आणि भविष्याच्या कृपेसाठीं त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हां देवाचा आदर होतो. रोम 4:20 चा हाच मुद्दा आहे जेथे पौल अब्राहामाच्या विश्वासाचे वर्णन करतो. “परंतु देवाच्या अभिवचनाकडें पाहून तो अविश्वासामुळें डळमळला नाहीं, तर विश्वासानें सबळ होऊन त्यानें देवाचा गौरव केला.

तो त्याच्या विश्वासात सबळ झाला, आणि त्यांद्वारें त्यानें देवाचा गौरव केला. देवाच्या अभिवचनांत विश्वासाद्वारें त्याला अत्यंत बुद्धीमान आणि बलवान आणि चांगला आणि विश्वसनीय म्हणून गौरव प्राप्त होते. म्हणून, जोवर आपण देवाच्या भविष्यातील कृपेच्या अभिवचनांत विश्वासानें कसे जगावे हे शिकत नाहीं, तोवर आपण उल्लेखनीय धार्मिक तपस्या करीत असू, पण त्याद्वारें देवाचे गौरव होत नाहीं.

त्याचे गौरव तेव्हां होते जेव्हां पवित्र होण्याचे सामर्थ्य भविष्यातील कृपेतील विनम्र विश्वासाद्वारें येते.

मार्टिन लूथर यांनी म्हटलें, “विश्वास, त्याचा आदर करतो ज्याच्यावर तो अत्यंत निष्ठेनें आणि अतिशय आदरानें विश्वास ठेवतो, कारण तो त्याला सत्य आणि विश्वासार्ह मानतो.” अशा ह्या विश्वसनीय दात्याचे गौरव होते.

आपण देवाच्या आदरासाठीं कसे जगावे हे आपण शिकावे अशी माझी उत्कंठा आहे. आणि याचा अर्थ भविष्यातील कृपेत विश्वासानें जगणें, ज्याचा अर्थ, त्याच्या मोबदल्यात त्या सर्व बाबतीत अविश्वासाशी लढा देणें ज्यात तो आपलें डोके वर काढतो.