मला काहीं कमी पडल्यामुळें मी बोलतो असें नाहीं; कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणें मला समजते, संपन्नतेतही राहणें समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणें व क्षुधित असणें, संपन्न असणें व विपन्न असणें, ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आलें आहे. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाहीं करण्यास शक्तिमान आहे. (फिलिप्पै 4:11-13)
भविष्यातील कृपेची देवाची रोजची तरतूद पौलास अन्नतृप्त असण्यास किंवा क्षुधित असण्यास, संपन्न असण्यास किंवा दुःख सोसण्यास, विपुलता मिळविण्यास किंवा विपन्नावस्थेत जगण्यास सामर्थ्य पुरविते.
“मी सर्वकाहीं करण्यास शक्तीमान आहे” याचा अर्थ खरोखर “सर्वकाहीं” असा होतो, केवळ सोप्या गोष्टी नव्हे. “सर्वकाहीं” चा अर्थ आहे, ख्रिस्ताद्वारें मी उपासमार सहन करूं शकतो, दुःख सोसू शकतो आणि दैन्यावस्थेत राहू शकतो.” हे फिलिप्पै 4:19 मधील प्रभावशाली वचनास त्याच्या योग्य प्रकाशात मांडते: “माझा देव आपल्यां संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारें पुरवील.”
फिलिप्पै 4:11-12च्या दृष्टिकोनात “तुमची सर्व गरज” चा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ “त्या सर्व गोष्टी ज्याची गरज तुम्हांला देवाला गौरविणाऱ्या समाधानासाठीं भासते.” ज्यात भूक आणि गरजेच्या वेळांचा समावेश आहे. फिलिप्पैकरांसाठीं पौलाची प्रीती देवामधील त्याच्या समाधानापासून प्रवाहित होत असें, आणि त्याचे समाधान विपुलतेच्या आणि अभावाच्या वेळेत त्याला ज्या सर्व गोष्टींची गरज असें ती पुरविणाऱ्या देवाच्या खात्रीपूर्ण तरतुदीच्या भविष्यातील कृपेवरील त्याच्या विश्वासातून प्रवाहित होत असें.
तर हे स्पष्ट आहे कीं लोभ हा विश्वासाच्या अगदी विरुद्ध आहे. ही ख्रिस्तामधील समाधानाची हानी आहे यासाठीं कीं आपण आपल्यां हृदयाच्या अभिलाषा पूर्ण करण्यासाठीं इतर गोष्टींची इच्छा धरू लागतो ज्याचे समाधान केवळ देवाचे सान्निध्य करूं शकते. आणि यात काहीं चूक नाहीं कीं लोभाविरुद्धची लढाई ही देवाचे अभिवचन प्रत्येक परिस्थितीत आम्हास आवश्यक असलेंल्या गोष्टींत सर्वप्रकारे तरतूद करूं शकते याविषयीं अविश्वास करण्याविरुद्धची लढाई आहे.
हे इब्री 13:5 मध्यें पूर्णपणें स्पष्ट आहे. द्रव्यलोभापासून आमच्यां सुटकेबद्दल – लोभापासून सुटकेबद्दल – देवामध्यें असलेंल्या समाधानाच्या स्वातंत्र्याबद्दल लेंखक कसा युक्तिवाद मांडतो ते पहा : “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्हीं तृप्त असावे; कारण त्यानें स्वतः म्हटलें आहे, “मी तुला सोडून जाणार नाहीं व तुला टाकणार नाहीं” या अभिवचनावरील विश्वास – “मी तुला सोडून जाणार नाहीं व तुला टाकणार नाहीं” देवाचा अनादर करणाऱ्या सर्व इच्छेचे – सर्व लोभाचे – सामर्थ्य तोडते
जेव्हां जेव्हां आपल्यांला आपल्यां अंतःकरणात लोभाचा थोडा देखील उदय झाल्याचे जाणवते तेव्हां तेव्हां आपण त्याकडें वळून या विश्वासाच्या शस्त्रास्त्रांचा उपयोग करून आपली सर्व शक्ती पणास लावून त्याच्याशी लढा दिला पाहिजे.