ArchivesSolid Joys

29 September : अविश्वासाशी सुयुद्ध करा

Alethia4India
Alethia4India
29 September : अविश्वासाशी सुयुद्ध करा
Loading
/

आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजें देवाचे वचन, ही घ्या. (इफिस 6:16-17)

जेव्हा जेव्हा मला म्हातारपणाची भीती वाटते, तेव्हा तेव्हां मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी सुयुद्ध करतो, “तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांला वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागवणारा मीच आहे, मी खांद्यांवर वागवून तुमचा बचाव करीन” (यशया 46:4).

जेव्हा जेव्हा मला मरणाची भीती वाटते, तेव्हा तेव्हा मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी सुयुद्ध करतो “कारण आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाहीं आणि कोणी स्वतःकरता मरत नाहीं. कारण जर आपण जगतो तर प्रभूकरता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. कारण ख्रिस्त ह्यासाठीं मरण पावला व पुन्हा जिवंत झाला कीं, त्यानें मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे” (रोमकरांस 14:7-9).

माझ्या विश्वासाचा नाश होऊन मीं देवापासून दूर जात आहे अशी भीती मला वाटते, तेव्हा तेव्हां मी ही अभिवचनें घेऊन अविश्वासाशी सुयुद्ध करतो, “ज्याने तुमच्या ठायीं चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल” (फिलिप्पैकर 1:6) ); आणि, “ह्यामुळें ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्‍यांना पूर्णपणें तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठीं मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे” (इब्री 7:25).

या युद्धांत मजबरोबर सहभागी व्हां! चला, आपण युद्ध करू, इतर लोकांशी नाहीं तर आपल्या स्वतःच्या अविश्वासाशी. देवाच्या अभिवचनांवर अविश्वास हे सर्व भीतीचे मूळ आहे, आणि हे इतर पुष्कळ पापांचे देखील मूळ आहे. आत्म्याची तलवार हे देवाचे वचन आहे, असे पौलाने इफिस 6:17 मध्यें म्हटले आहे : जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या (वचन 16) – म्हणजें देवाच्या त्याच वचनावर विश्वास. तर मग, आपल्या डाव्या हातांत ढाल आणि उजव्या हातांत तलवार घ्या आणि आपण विश्वासाचे जे सुयुद्ध ते करूया.

बायबल हाती घ्या व उभे राहा, व पवित्र आत्म्याकडें मदतीसाठीं आरोळी मारा, त्याची अभिवचने तुमच्या हृदयात ठेवा आणि चांगली लढाई लढा – जेणेंकरून तुम्हीं भावी कृपेवर विश्वास ठेवीत जिवंत राहावें.

28 September : आमचे कल्याण हेच त्याचे गौरव आहे

Alethia4India
Alethia4India
28 September : आमचे कल्याण हेच त्याचे गौरव आहे
Loading
/

“तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा ‘आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन’ आपल्या गुप्तवासी पित्याची ‘प्रार्थना कर’ म्हणजें तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणें तिचे फळ देईल.” (मत्तय 6:6)

ख्रिस्ती हेडोनिझम -म्हणजें सुख हेच अंतिम उद्दिष्ट- या सिद्धांतावर एक सामान्य आक्षेप हा घेतला जातो कीं हा सिद्धांत मनुष्याच्या हितांना देवाच्या गौरवापेक्षा अधिक महत्व देतो – म्हणजें हे शिक्षण माझ्या आनंदाला देवाच्या सन्मानाच्या वर स्थान देते. परंतु खरे पाहता, ख्रिस्ती हेडोनिझमचा हा अर्थ नाहीं हे मीं ठामपणें सांगतो.

ठामपणें सांगायचे तर, आम्हीं ख्रिस्ती हेडोनिस्ट म्हणून आमच्या सर्व शक्तीने आमचे हित आणि आमच्या आनंदाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो. आम्हीं तरुण जोनाथन एडवर्ड्स यांच्या पुढील संकल्पाचे समर्थन करतो : “संकल्प : मी माझ्यासाठीं दुसऱ्या जगात शक्य तितका आनंद मिळवण्याचा प्रयत्न करीन -सर्व शक्तीने, सामर्थ्याने, श्रमाने आणि आवेशाने, किबहुंना आक्रमक वृत्तीनेहि, माझ्याकडून शक्य होईल तितके, किंवा माझ्या मनांत येईल तितके, मीं अनुसरू शकतो अशा कोणत्याही मार्गाने.”

परंतु आपल्याला बायबलमधून (आणि एडवर्ड्सकडून!) ही ज्ञानप्राप्ती झालीं आहे कीं देवाला आपल्यावर -आम्हा पापी लोकांवर, ज्यांना त्याची नितांत गरज आहे- त्याची कृपा ओतण्याद्वारे त्याच्या गौरवाच्या परिपूर्णतेचा महिमा वाढवणें आवडते.

म्हणून, आपल्या हितांचा आणि आपल्या आनंदाचा पाठलाग करणें, मग त्यासाठीं आपल्याला आपलें जीवन गमवावे लागलें तरी, हे देवाचा सम्मान आणि त्याचा आनंद यांपेक्षा आणि देवाचे जे गौरव यापेक्षा कधीही वर नाहीं, तर हा पाठलाग नेहमीच देवामध्यें असतो. बायबलमधील सर्वात मौल्यवान सत्यांपैकीं एक हे आहे कीं देवाच्या कृपेच्या विपुलतेचा महिमा करणें हे पापी लोकांचे त्याच्यामध्यें आणि केवळ त्याच्यामध्यें आपला आनंद शोधणें आहे!

जेव्हा आपण लहान बालकांसारखे स्वतःला लीन-दीन करतो आणि मी माझा समर्थ या वृत्तीचे कुपोषण करतो, तर आपल्या पित्याच्या मिठीत असलेल्या आनंदाकडें हर्षाने धाव घेतो, तेव्हा त्याच्या कृपेचा महिमा वाढतो आणि आपल्या जिवाची तळमळ तृप्त होते. आपलें कल्याण आणि त्याचे गौरव परस्पर विलीन झालें.

जेव्हा येशू मत्तय 6: 6 मध्यें असे अभिवचन देतो, “तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणें तिचे फळ देईल,” तेव्हां हे ते फळ आहे ज्याच्या पाठीस आपण लागावें अशी देव आपल्याठायीं इच्छा बाळगतो. तो आपल्याला अशा आनंदाचे आमिष देत नाहीं जो तो आपल्याला देऊ करत नाहीं! पण हे फळ – हा आनंद –जेव्हां आम्हीं लोकांनी आपलें गौरव करावें या वृत्तीपासून दूर जातो आणि देवाचा शोध घेण्यासाठीं आपल्या खोलीत जातो तेव्हां काठोकाठ वाहणारा तो हा आनंद आहे.

यास्तव, ख्रिस्ती हेडोनिस्ट, म्हणजें सुख हेच अंतिम उद्दिष्ट या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे लोक, हे त्यांच्या आनंदाला देवाच्या गौरवावर उंच स्थान देत नाहींत. तर ते आपल्या आनंदाचा शोध प्रत्यक्ष देवामध्यें घेतांत, आणि ‘जेव्हा आपण देवामध्यें सर्वात जास्त तृप्त असतो, तेव्हा देव आपल्यामध्यें सर्वात जास्त गौरव पावतो’ हे महान सत्य शोधून काढतांत.

27 September : अधिक उत्तम अभिवचनाचे सामर्थ्य

Alethia4India
Alethia4India
27 September : अधिक उत्तम अभिवचनाचे सामर्थ्य
Loading
/

मी मोकळेपणाने चालेन, कारण मी तुझ्या नीतिनियमांचा आश्रय केला आहे. (स्तोत्र 119:45, माझे भाषांतर)

स्वातंत्र्य हे पूर्णानंदाचा एक आवश्यक घटक आहे. आपल्याला ज्या गोष्टीचा तिटकारा वाटतो तिजपासून जर आपण बंधमुक्त नाहीं आणि ज्यां गोष्टीवर आपण प्रीति करतो ती करण्यासाठीं जर आपण स्वतंत्र नाहीं तर आपल्यापैकीं कोणीही आनंदी असणार नाहीं.

आपल्याला हे खरे स्वातंत्र्य कुठे मिळते? स्तोत्र 119:45 म्हणते, “मी मोकळेपणाने चालेन, कारण मी तुझ्या नीतिनियमांचा आश्रय केला आहे.”

येथें जे चित्र आहे ते मोकळेपणाने वावरण्यासंबंधीचे आहे. वचन आपल्याला क्षुल्लक शहाणपणापासून बंधमुक्त करते. “परमेश्वराने शलोमोनला……समुद्रकाठच्या वाळूप्रमाणें मोजमाप काढता येत नाहीं इतके फार मोठे शहाणपण व अगाध समज दिली होती” (1 राजे 4:29). वचन आपल्याला आपल्या जिवावर उठलेल्या बंदिवासातून बंधमुक्त करते. “त्यांनी मला प्रशस्त ठिकाणी आणले” (स्तोत्र 18:19).

येशूनें म्हटलें, “तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील” (योहान 8:32). तो हे बोलत असतांना त्याच्या मनात जे स्वातंत्र्य होते ते पापाच्या गुलामगिरीपासून मुक्तीचे स्वातंत्र्य होते (योहान 8:34). किंवा, सकारात्मक दृष्टिने सांगायचे तर, ते स्वातंत्र्य पवित्रतेसाठीं असलेले स्वातंत्र्य आहे.

देवाच्या कृपेची अभिवचने ते सामर्थ्य देतांत ज्यामुळें देवानें आम्हांकडून पवित्र जीवनाविषयी केलेंली अपेक्षा आम्हांला भीतीदायक आणि बंधन वाटण्या ऐवजी स्वातंत्र्याचा अनुभव बनवते. पेत्राने देवाच्या अभिवचनांच्या बंधमुक्त करणाऱ्या सामर्थ्याचे वर्णन यां शब्दांत केलें : “त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठीं कीं, त्यांच्या द्वारे तुम्हीं वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे” (2 पेत्र 1:4 ).

याचा अर्थ असा कीं, आपण देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवतो, तेव्हा आपण अधिक उत्तम अभिवचनाच्या सामर्थ्याने भ्रष्टता व कामवासना यांचे मूळ उपटून काढतो.

काल्पनिक खोट्या सुखांचे सामर्थ्य मोडून टाकणारे हे वचन किती आवश्यक आहे! तर मग, देवाच्या वचनाने आपला मार्ग प्रकाशित व्हावा आणि ते आपल्या मनात जपून राहावे म्हणून आपण किती जागरूक असले पाहिजे!

“तुझे वचन माझ्या पावलांसाठीं दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे” (स्तोत्र 119:105). “मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे” (स्तोत्र 119:11).

26 September : देवाच्या सार्वभौम सामर्थ्यावर विश्वास ठेवत जगणें

Alethia4India
Alethia4India
26 September : देवाच्या सार्वभौम सामर्थ्यावर विश्वास ठेवत जगणें
Loading
/

जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व. . . (इफिस 1:19)

देवाचे अपार सामर्थ्य हे देवाच्या सार्वकालिक गौरवांत असलेले युगानुयुगाचे व खंबीर आश्रयस्थान आहे मग या पृथ्वीवर कोणत्याही परिस्थिती उद्भवल्या तरी त्यानें काहीं फरक पडत नाहीं. आणि हाच दृढ विश्वास देवानें केलेंले पाचारण पूर्ण आज्ञाधारकपणें अनुसरण्याचा स्रोत आणि सामर्थ्य आहे.

सर्वसमर्थ देव हा तुमचा आश्रय आहे या सत्यापेक्षा अधिक स्वतंत्र करणारे, अधिक पराक्रमी किंवा अधिक बळकट करणारे काहीं आहे का — तेहि दिवसभर, दररोज, जीवनातील सर्वसामान्य आणि असामान्य अशा सर्व घडामोडींमध्यें?

जर आपण यावर विश्वास ठेवला, जर आपण खरोखरच देवाच्या सर्वसमर्थपणाचे हे सत्य समजून घेतले तर आपल्या वैयक्तिक जीवनात आणि आपल्या सेवाकार्यात किती बदल घडून येतील! तारण करण्याच्या देवाच्या संकल्पांसाठीं आपण किती नम्र आणि सामर्थ्यवान बनू!

देवाचा सर्वसमर्थपणाचा गुणविशेष हा देवाच्या लोकांसाठीं आश्रयस्थान आहे. आणि सर्वसमर्थ देवाचा हा सर्वसमर्थपणाचा गुणविशेष तुमचे आश्रयस्थान आहे असा विश्वास तुम्हीं ठेवतां, तेव्हा तुम्हांला असा आनंद, असे एक स्वातंत्र्य आणि असे सामर्थ्य प्राप्त होते जे आमच्या जीवनाला येशू ख्रिस्ताप्रत मौलिक आज्ञाधारकपणाने व्यापून टाकते.

देवाचा सर्वसमर्थपणाचा गुणविशेष हा त्याच्या कराराच्या लोकांसाठीं आदर, शत्रूकडून सूड आणि आश्रयस्थान आहे.

मी तुम्हांला त्याच्या कृपेच्या कराराच्या अटी स्वीकारण्यासाठीं आव्हाहन करतो : आपल्या पापापासून वळा आणि प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा; आणि सर्वसमर्थ देवाचा सर्वसमर्थपणाचा जो गुणविशेष आहे तो तुमच्या जिवासाठीं आदर, तुमच्या शत्रूंकडून सूड आणि तुमच्या जीवनाचा आश्रय ठरेल – सर्वकाळासाठीं.

25 September : देवाचे वचन जीवनाधार आहे

Alethia4India
Alethia4India
25 September : देवाचे वचन जीवनाधार आहे
Loading
/

तेव्हा तो त्यांना म्हणाला: “आज मी ज्या नियमशास्त्रामधील आज्ञा तुमच्यापुढे जाहीर केल्या आहेत, त्याला हृदयात साठवून ठेवा आणि तुमच्या मुलाबाळांना काळजीपूर्वक रीतीने त्यांचे पालन करण्यास शिकवा. कारण हे केवळ पोकळ शब्द नाहींत—तर ते तुमचे जीवन आहे. त्याद्वारे यार्देनेच्या पलीकडें असलेला जो देश तुम्हीं ताब्यात घेणार आहात, त्या देशात तुम्हीं दीर्घकाल जगाल.” (अनुवाद 32:46-47)

देवाचे वचन म्हणजें थट्टामस्करी नाहीं; हा जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे. जर तुम्हीं शास्त्रवचनांना खेळ किंवा पोकळ शब्द समजता तर तुम्हीं खऱ्या जीवनास मुकाल.

आपलें हे भौतिक जीवन देवाच्या वचनावर अवलंबून आहे, कारण त्याच्या शब्दाने आपल्याला निर्माण केलें गेले होते (स्तोत्र 33:6; इब्री 11:3), आणि “आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे” (इब्री 1:3).

आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाचा आरम्भ देवाच्या वचनाने होतो : “त्यानें स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्यवचनाने जन्म दिला.” (याकोब 1:18). “देवाच्या जिवंत व सर्वकाल टिकणार्‍या’ शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात” (1 पेत्र 1:23).

आपण देवाच्या वचनाद्वारे केवळ पुन्हा जन्म पावलेले नाहीं, तर आपण जगतो तेही केवळ देवाच्या वचनाने : “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या वचनाने जगेल” (मत्तय 4:4; अनुवाद 8 :3).

तर मग आपलें भौतिक जीवन देवाच्या वचनाद्वारे निर्माण झालें आहे आणि त्याद्वारेच टिकून राहते, त्याचप्रमाणें आपलें आध्यात्मिक जीवन देखील देवाच्या वचनाने नव्याने जन्मलेले आहे आणि टिकून राहते. देवाच्या वचनाच्या जीवन देणाऱ्या सामर्थ्याची साक्ष देण्यासाठीं अशा किती तरी गोष्टी सांगता येतील!

खरंच, बायबल “हे केवळ पोकळ शब्द नाहींत” — ते तुमचे जीवन आहे! सर्व आनंदाचा पाया जीवन आहे. जे चिरकाळ टिकून राहते, म्हणजें ज्याद्वारे आपली निर्मिती झालीं आणि आपल्याला राखले जाते, त्यापेक्षा मूलभूत व महत्वाचे काहींही नाहीं.

हे सर्व केवळ देवाच्या सामर्थ्यवान वचनामुळें आहे. त्याच सामर्थ्याने, तो आमचे आध्यात्मिक जीवन अस्तित्वात आणण्यासाठीं आणि त्याचे पालनपोषण करण्यासाठीं पवित्र शास्त्रात बोलला आहे. म्हणून, बायबल हे केवळ पोकळ शब्द नाहींत, तर तुमचे जीवन आहे – तुमच्या आनंदाचा पाया आणि प्रकाश!

24 September : येशूचा आनंदाचा पाठलाग

Alethia4India
Alethia4India
24 September : येशूचा आनंदाचा पाठलाग
Loading
/

आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडें पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्यानें लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडें बसला आहे. (इब्री 12:2)

येशूचे उदाहरण ख्रिस्ती पूर्णानंदाच्या तत्त्वाशी विरोधक आहे का? म्हणजें हे कीं, प्रीति आनंदाचा मार्ग आहे आणि हे कीं मनुष्यानें याच कारणामुळें हा मार्ग निवडला पाहिजे, असे न होवो कीं कोणी सर्वशक्तिमान देवाची आज्ञा पाळण्याच्या बाबतींत गोंधळात पडलेला किंवा कृपेचे साधन बनण्याच्या विशेषाधिकाराशी असंतुष्ट असलेला किंवा प्रतिज्ञेच्या  प्रतिफळांना कमी लेखताना आढळून येवो.

इब्री लोकांस 12:2 अगदी स्पष्टपणें सांगतांना दिसून येते कीं येशूनें या तत्त्वावर आक्षेप घेतला नाहीं वा त्याचा नकार केला नाहीं.

आजवर घडलेले प्रीतिचे सर्वात मोठे परिश्रम शक्य झालें कारण येशूनें जो सर्वात मोठा आनंद त्याच्यापुढे होता त्याकडें आपली दृष्टि लावली, म्हणजें, लोकांच्या सभेत देवाच्या राजासनाच्या उजवीकडें उंच केलेंल्याचा आनंद : म्हणजें तो आनंद ज्याकरता “त्यानें लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला!”

हे सांगताना, लेखक येशूचे आणखी एक उदाहरण देतो, आणि त्यांत तो इब्री 11 मध्यें वर्णिलेल्या इतर पवित्रजनांचाहि उल्लेख करतो, म्हणजें त्यांचे उदाहरण जें त्यांच्यापुढे देवानें ठेविलेल्या आनंदासाठीं इतके आवेशी आणि विश्वासाने भरलेले होते कीं त्यांनी “पापाचे क्षणिक सुख भोगणें” सुद्धा नाकारले (इब्री 11: 25) आणि देवाच्या इच्छेशी एकरूप होण्यासाठीं दुःख सोसणें पसंत करून घेतले.

म्हणून, गेथसेमानेच्या त्या काळोख्या रात्री ख्रिस्ताला ज्या गोष्टीने दुख सहनांत टिकवून ठेवले तिचे किमान एक पक्ष त्या आनंदाची आशा होती जो वधस्तंभाच्या पलीकडें त्याच्यासाठीं ठेविलेला होता असे म्हणणें बायबल-विरोधी कथन होणार नाहीं. त्यामुळें आपल्यावरील त्याच्या प्रीतिची वास्तविकता आणि महानता कमी होत नाहीं, कारण ज्या आनंदाची त्याला आशा होती तो आनंद पुष्कळ पुत्रांना गौरवात आणण्याचा आनंद होता (इब्री 2:10).

त्याचा आनंद आपल्याला मुक्ती मिळावी यांत होता, जिचा परिणाम देवाचे गौरव आहे. आम्हीं येशूबरोबर त्याच्या आनंदाचे  भागीदार बनतो आणि गौरव देवाचे होते.

23 September : अति वाईट पाप्यांसाठीं तारणाची आशा

Alethia4India
Alethia4India
23 September : अति वाईट पाप्यांसाठीं तारणाची आशा
Loading
/

“ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन.” (निर्गम 33:19)

ताठ मानेच्या ह्या लोकांवर ज्यांनी नुकतीच मूर्तिपूजा केलीं आणि ज्या देवानें त्यांना मिसर देशातून बाहेर काढले त्याची निंदा केलीं तोच देव खरोखरच दया करील या आशेची मोशेला गरज होती.

मोशेला आवश्यक असलेली आशा आणि खात्री देण्यासाठीं, देव म्हणाला, “ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन.” दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, “मी जी निवड करतो ती मनुष्यांच्या दुर्गुणांवर किंवा सद्गुणांवर अवलंबून नसून केवळ माझ्या स्वतंत्र, सार्वभौम इच्छेवर अवलंबून आहे. म्हणून कोणीही असे म्हणू शकत नाहीं कीं तो मनुष्य इतका वाईट आहे कीं त्याच्यावर कृपा केलीं जाऊच शकत नाहीं.” जर निवड ही मनुष्यांच्या दुर्गुणांवर किंवा सद्गुणांवर अवलंबून असती तर देव स्वतंत्र नाहीं आणि त्याची निवड अटविरहित नाहीं असा याचा अर्थ होईल.

अटविरहित निवडलें ज्याण्याचा  सिद्धांत हा सर्वात वाईट पापी लोकांसाठीं आशेचा महान सिद्धांत आहे. म्हणजें जेव्हा कृपेसाठीं पात्र होण्याचा विचार येतो तेव्हा तुमच्या पार्श्वभूमीचा देवानें केलेंल्या तुमच्या निवडीशी काहींही संबंध नाहीं. हे तर शुभवर्तमानाचेच एक स्वरूप आहे.

जर तुमचा नव्याने जन्म झाला नसेल आणि येशू ख्रिस्तावर जो तारणहार विश्वास तो जर तुम्हांला दिला गेलेला नसेल, तर तुमचा पूर्वायुष्यातील अत्याधिक दुष्टपणा किंवा मनाची कठोरता ही तुमच्या जीवनात देवाच्या कृपेंत मोठा अडथळा बनत आहे असा विचार करून नैराश्याच्या डोहांत बुडू नका. अति वाईट पापी लोकांवर कृपा करून त्यांच्या तारणांत आपल्या कृपेच्या स्वातंत्र्याचा गौरव करणें देवाला आवडते.

आपल्या पापापासून वळा; परमेश्वराला हाक मारा. या दैनंदिन भक्तीमध्येंही, जे तुम्हीं वाचत आहात किंवा ऐकत आहात, तो तुमच्यावर कृपा करत आहे, आणि तुम्हीं दयेसाठीं त्याच्याकडें यावें असे उत्तेजन तो तुम्हांला देत आहे.

“परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील” (यशया 1:18).

22 September : ऐहिक मालमत्ताजाओ, जाओ आप्तजनही सोडूनी

Alethia4India
Alethia4India
22 September : ऐहिक मालमत्ताजाओ, जाओ आप्तजनही सोडूनी
Loading
/

पूर्वीचे दिवस आठवा; त्यांमध्यें तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्हीं दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केलीं; कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा तमाशा झाला; तर कधी अशी दया झालेंल्यांचे तुम्हीं सहभागी झालात. कारण बंदिवानांबरोबर तुम्हीं समदुःखी झालात आणि [स्वर्गात]आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्हीं आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. म्हणून आपलें धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. (इब्री 10:32-35)

इब्री 10:32-35 मध्यें उल्लेख केलेंल्यां ख्रिस्ती बांधवांना आपल्याला मौल्यवान प्रीति काय आहे हे शिकवण्याचा पूर्ण अधिकार आहे.

परिस्थिती अशी दिसते : त्यांच्या विश्वासातील सुरुवातीच्या दिवसांत, त्यांच्यापैकीं काहींना त्यांच्या विश्वासामुळें तुरुंगात टाकण्यात आलें. तर काहींवर मोठा कठीण निर्णय घेण्याचा प्रसंग ओढवला : आपण भूमिगत होऊन “सुरक्षित” असावें, कीं आपण तुरुंगात असलेल्या आपल्या बंधू-भगिनींची भेट घेऊन आपला जीव व मालमत्ता धोक्यात घालावींत? त्यांनी प्रीतिचा मार्ग निवडला आणि त्यासाठीं त्यांना जी किंमत मोजावी लागणार होती ती त्यांनी मान्य केलीं.

“कारण बंदिवानांबरोबर तुम्हीं समदुःखी झालात…..आणि तुम्हीं आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.”

तरी त्यांना खरेच हानी झाली का? नाहीं. त्यांनी आपल्या मालमत्तेची हानी सोसली परंतु त्यांतून त्यांना आनंदच प्राप्त झाला! त्यांनी मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.

एका अर्थाने, त्यांनी स्वतःचा नकार केला. त्यांचा तो नकार खरा आणि मौल्यवान होता. पण दुसऱ्या अर्थाने त्यांनी कसलीही हानी सोसली नव्हती. तर त्यांनी आनंदाचा मार्ग निवडला होता. म्हणजें ज्याप्रमाणें मासेदोनियातील मंडळ्यांना औदार्यपणाची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी गोरगरीबांना आपल्या दारिद्य्रातही मदत पुरविली, त्याप्रमाणें ह्या ख्रिस्ती लोकांना देखील तुरुंगात असलेल्यांची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली होती (2 करिंथ 8:1-9. देवामध्यें असलेला त्यांचा आनंद इतरांवरील प्रीति-प्रदर्शनाने ओसंडून वाहत होता.

त्यांनी आपल्या जीवनाकडें पाहिले आणि म्हटले, “परमेश्वराचे टिकाऊ वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे” (स्तोत्र 63:3 पहा).

त्यांनी आपल्या सर्व मालमत्तेकडें पाहिले आणि म्हटले, “आमच्याकडें स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आहे व ती यापैकीं कोणत्याही मालमत्तेपेक्षा टिकाऊ आहे” (इब्री 10:34 पहा).

मग त्यांनी एकमेकांकडें पाहिले आणि म्हटले, कदाचित मार्टिन ल्यूथरच्या या लोकप्रिय महान गीतासारखे काहींतरी गायले असेल :

ऐहिक मालमत्ता जाओ,

जाओ आप्तजनही सोडूनी

हे नश्वर जीवन देखील जाओ,

शरीराचा घात ते करतील

तरी देवाचे सत्य कायम राहती

त्याचे राज्य सार्वकालिक

21 September : चिंते विरुद्ध लढण्यासाठीं शस्त्रसामग्री किंवा  दारूगोळा

Alethia4India
Alethia4India
21 September : चिंते विरुद्ध लढण्यासाठीं शस्त्रसामग्री किंवा  दारूगोळा
Loading
/

कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. (फिलिप्पै 4:6)

आपण आपल्या विनंत्या देवाला कळवतो तेव्हा आपण ज्या गोष्टींसाठीं आभारप्रदर्शन करतो त्यांपैकीं एक म्हणजें त्यानें आम्हांला दिलेंली त्याची अभिवचनें. ही अभिवचनें तोफेत वापरला जाणारा दारूगोळा आहेत जीं चिंतेला जन्म देणाऱ्या अविश्वासाला ध्वस्त करतांत. म्हणून, मी कसा युद्ध करतो ती नीति येथे आहे.

माझी सेवा निरुपयोगी आणि व्यर्थ आहे या विषयीं मी चिंताक्रांत होऊन जातो तेव्हां मी यशया 55:11 मध्यें असलेले अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो. “त्याप्रमाणें माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्यासाठीं मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडें विफल होऊन परत येणार नाहीं.”

मी माझे कार्य करण्याच्या बाबतीत अशक्त आहे अशी मला चिंता वाटू लागते, तेव्हा मी ख्रिस्तानें दिलेंलें हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते” (2 करिंथ 12:9).

मला भविष्याविषयी निर्णय घ्यायचे असतांत आणि मी त्यांविषयी चिंताग्रस्त असतो, तेव्हा मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो, “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन” (स्तोत्र 32:8).

जेव्हां मीं माझ्या विरोधकांना तोंड देण्याविषयीं चिंताक्रांत असतो, तेव्हा मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो, “देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?” (रोमकरांस 8:31).

मी ज्यांच्यावर प्रीति करतो त्यांच्या कल्याणासाठीं मीं चिंताक्रांत असतो, तेव्हा मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो कीं, मीं वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणें मला समजते, “तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतांत त्यांना तो किती विशेषेकरून चांगल्या देणग्या देईल!” (मत्तय 7:11).

आणि मी माझे आध्यात्मिक जीवन स्थिर राखण्यासाठीं स्वतःला हे अभिवचन स्मरण देऊन लढतो कीं ज्याने ज्याने ख्रिस्ताकरितां आपलें घर किंवा भाऊ किंवा बहिणी किंवा आई किंवा वडील किंवा मुले किंवा शेती सोडली आहे, “अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकींबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणार्‍या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाहीं” (मार्क 10:29-30).

जेव्हा मी आजारी असण्याविषयीं चिंताक्रांत होतो, तेव्हा मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो, “नीतिमानाला फार कष्ट होतांत, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो” (स्तोत्र 34:19).

आणि मी थरथर कापत हे अभिवचन स्मरण करतो : “कीं, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते; आणि ‘आशा लाजवत नाहीं;’ कारण आपल्याला दिलेंल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतिचा वर्षाव झाला आहे” (रोमकरांस 5:3-5).

20 September : खरेखुरे सौख्यवादी नाहीं

Alethia4India
Alethia4India
20 September : खरेखुरे सौख्यवादी नाहीं
Loading
/

“पृथ्वीवर आपल्यासाठीं संपत्ती साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करतांत आणि चोर घर फोडून चोरी करतांत; तर स्वर्गात आपल्यासाठीं संपत्ती साठवा; तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाहींत व चोर घरफोडी करत नाहींत व चोरीही करत नाहींत.” (मत्तय 6:19-20)

देशाच्या राष्ट्रीय बँकांतून मोठ्याने ओरडून सांगणें आवश्यक असलेला संदेश हा आहे: जगिक मनुष्या, तू खराखुरा सौख्यवादी नाहींस!

ज्यां वाढत्या महागाईचे भक्ष बनतांत आणि ज्यांना मृत्यूचा जंग लागतो अशा किरकोळ आनंद देणाऱ्या गोष्टींत समाधानी राहणें सोडा. गुंतवणूक करायची असेल तर ती उच्च-उत्पन्न देणाऱ्या स्वर्गातील दैवी विम्यात करा जिथें तुमचे धन पूर्णपणें सुरक्षित राहते.

भौतिक सुखसोयी आणि सुरक्षितता आणि रोमांचक आनंद अशा नश्वर गोष्टींसाठीं आपलें आयुष्य घालवणें म्हणजें पैसे उंदराच्या छिद्रांत टाकण्यासारखे आहे. परंतु प्रीतिचे जे श्रम त्यांत जर आपण आपलें आयुष्य गुंतवतो तर शेवटी अतुल्य आणि सार्वकालिक अश्या मोठ्या आनंदाचा लाभांश मिळतो:

“जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा; तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणार्‍या थैल्या आपणांसाठीं करून ठेवा; तेथे चोर येत नाहीं व कसर लागत नाहीं” (लूक 12:33).

हा उपदेश उत्तम गोष्टींची बातमी आहे : ख्रिस्ताकडें या, ज्याच्या सान्निध्यात पूर्णानंद आणि सौख्ये सदोदित आहेत. खरे ख्रिस्ती सौख्यवादी बनण्यासाठीं श्रम घ्या. कारण परमेश्वर बोलला आहे: ऐशोआरामात जगण्यापेक्षा प्रीति करणें अधिक धन्य आहे! सांप्रतकाळी अति धन्य आणि येणाऱ्या युगात सर्वकाळासाठीं धन्य.