काही आठवड्यांपूर्वी, नरकाच्या अस्तित्वावर माझा किती कमी विश्वास आहे, हे माझ्या लक्षात आले. हे शब्दात कसे मांडावे हे मला कळत नाही. माझ्या तीन लहान मुलांना खेळाच्या मैदानावर खेळताना, उड्या मारताना आणि बागडताना पाहून मला ह्याची जाणीव झाली.
तेथेच दुसऱ्या बाजूला एक तरुण लॅटिन गृहस्थ बसलेला होता, तो त्याच्या फोनमध्ये अगदीच मग्न होता. त्याला अनेक मुले होती आणि त्याच्या हातावर अनेक प्रकारचे गोंदण होते; पण त्याच्या हातात लग्नाची अंगठी नव्हती. त्याने घातलेल्या पेहराव्यावरून, मला माझ्या लहानपणीच्या मित्रांची आठवण झाली, किंबहुना, त्याच्या वयात मी जसा होतो, तो तसाच दिसत होता. मी पवित्र शास्त्राचा अभ्यासक होतो आणि त्या भागात लहानाचा मोठा झाल्यामुळे, मी असा अंदाज लावला की तो मनुष्य प्रभूला ओळखत नसावा. किंबुहना, त्याने खरी सुवार्ता कधीच ऐकली नसावी आणि त्याने देखील ऐकण्याची तयारी दाखवलेली नसावी.
त्या क्षणी, मी स्वतःला त्याच्याकडे ख्रिस्ताचा संदेश सांगण्यासाठी जात असल्याची कल्पना केली, परंतु त्याने मला केवळ एक साधा, धार्मिक, आणि उपदेशक समजून नकार दिला असता (जसे कदाचित त्याच्या वयात मीही केले असते). तेथे आम्ही बसलो असतो — मी, माझ्या मनात विचार करत बसलो की, मी कशाला तेथे गेलो? आणि तोही तसाच विचार करत असावा.
तेथून उठण्याऐवजी, मी डोके मागे टेकवले आणि डोळे मिटले आणि तेव्हाच मला ठामपणे जाणवले: सध्या तरी, मी खरोखर नरकावर विश्वास ठेवत नाही. मी ठेवूच कसा? माझी करुणा फक्त एका साध्या कारणामुळे नाहीशी झाली होती. येशूचा अनंतकाळचा, चेतनात्मक यातनेचा सिद्धांत माझ्यासाठी खरा नव्हता, तसेच स्वर्गाचे अनंत आशीर्वादित सुखही माझ्यासाठी काहीच नव्हते. ख्रिस्ती धर्मप्रचारक मोठे-मोठे महासागर पार करून, कुटुंब सोडून, स्वतःचे शवपेटिका बरोबर घेऊन परदेशी भूमीवर गेले; आणि मी मात्र तेथेच बसलो होतो, नुसत्या नकाराच्या विचारानेच मागे फिरलो होतो, हाच का माझा विश्वास?
माझ्या लक्षात आले की भीतीदायक गोष्ट म्हणजे त्याच क्षणी मी नरकावर एक लेख लिहिण्यास सुरुवात करू शकलो असतो, अचानक एक प्रचार करू शकलो असतो, किंवा नरकावर एखाद्या नास्तिकाशी वाद घालू शकलो असतो; तरीही, तेथे गरज पवित्र शास्त्राची वचने उद्धृत करण्याची नव्हती—तर त्यांच्यावर खरोखर विश्वास ठेवण्याची गरज होती. माझ्यासमोर एक अमर आत्मा बसला होता, आणि तरीही मी तेथेच बसलो होतो, फक्त काही पावले चालून जाऊन एक सुसंगत संवाद साधण्यासही मी तयार नव्हतो, जो कदाचित त्या मनुष्याला अनंत जीवनाकडे नेऊ शकला असता.
माझ्या मनात आले की, जर मी उठलो असतो आणि प्रचार सुरू केला असता तर मी त्या तरुणाकडे चालत गेलो असतो आणि प्रार्थनेने त्याच्या आत्म्याला जीवनाचे शब्द सांगितले असते. पण तसे झाले नाही. त्यात लाजिरवाणी गोष्ट अशी की, मी त्या अंतःप्रेरणेला दाबून टाकले, अविश्वासाला थारा दिला आणि हृदय शून्य करून माझी मुले एकत्र केली आणि त्या व्यक्तीला तेथेच सोडून निघून गेलो. हे परमेश्वरा, आम्हा दोघांवर दया कर!
चमकदार रक्तवर्णी अक्षरे
नरक खरोखर अस्तित्वात आहे ह्यावर जर आपण विश्वास ठेवला असता तर आपल्या जीवनाचे चित्र किती वेगळे दिसले असते? कितीतरी तुच्छ गोष्टी, कितीतरी तुच्छ चिंता, कितीतरी क्षुल्लक प्रयत्न आगीच्या ज्वालेमध्ये जळून खाक झाल्या असत्या? कितीतरी स्वार्थी भावना, असुरक्षितेची भावना, कितीतरी बोथट आणि उथळ दिवस, कितीतरी तुच्छ मनोरंजन, मध्यम विचारसरणीचे कार्यकाळ आणि भीतीने केलेली निष्क्रियता केवळ येशूने सांगितलेल्या अंतिम न्यायावर खरे विश्वास ठेवून तुकडे-तुकडे झाले असते?
कधी-कधी आपला ख्रिस्तीपणा निवडकही असू शकतो, नाही का? येशूपेक्षा कोणी अधिक नरकाविषयी सांगितले आणि त्यावर भाष्य केले असा कोण आहे? प्रतिदिन दुष्टांच्याविरुद्ध उद्दिष्ट केलेल्या कठोर दंडाचा निश्चयाचा कोण विचार करत होते? सर्व प्रेषितांची शिकवण ही ख्रिस्ताचीच शिकवण आहे, परंतु येशूने स्वतः नरकाबद्दल काय सांगितले? त्याच्या शिक्षणातील सर्वात तीव्र किंवा भयभीत करणारे शब्द कोणते होते? पाहा, केवळ पहिल्या शुभवर्तमानातून घेतलेला हा लहान नमुना तुमचा आत्मा ग्रहण करू शकतो का:
जर तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे (मत्तय. 5:29–30; मत्तय.18:8–9)
मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील, आणि ते सर्व ‘अडखळवणार्यांना व अनाचार करणार्यांना’ त्याच्या राज्यातून जमा करून, त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल. तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.” (मत्तय.13:41–42, 49–50).
मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा… ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील” (मत्तय. 25:41, 46).
जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या (मत्तय.10:28). अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; (मत्तय.7:13). अनेकदा येशूची प्रवचने नापलमसारखी (एक ज्वलनशील रासायनिक अस्त्र) तीव्र वाटत असत, कारण त्याचे मनुष्यांच्या आत्म्यांवर अत्यंत प्रेम होते.
नरकाच्या अस्तित्वावर आपण विश्वास ठेवला असता तर आपले जीवन नक्कीच वेगळे दिसले असते?
येशूने न्यायाची तीव्र आणि रक्तवर्णी अक्षरांतून काही धक्कादायक झलक दिली आहे, त्याचे पवित्रशास्त्रात असे अनेक दाखले आढळतात. हे दाखले आपल्याला प्रेम, क्षमा, पावित्र्य, संयम, आणि देवाकरवी जागृत करायला आवश्यक आहेत. आपण त्यांना फक्त मान डोलावून ऐकणार आहोत की, पुस्तक बंद करून कपाटावर ठेवणार आहोत? ही वचने आपल्याला राष्ट्रांपर्यंत, पापाचा सामना करण्यासाठी, मैदानावर चालण्यासाठी प्रेरित करणार नाहीत का? ख्रिस्ताने आपल्याला अविश्वासूंना फक्त लोटण्यासाठी येथे ठेवले आहे का, जेव्हा ते आपल्या समोरून एका खोल कड्यावर धावत जातात? हेच आपले देवासाठी आणि शेजाऱ्यांसाठी खरे प्रेम आहे का?
मित्रहीन खोलवरता
आपण येशू ख्रिस्ताच्या संदेशात नरकाचा उल्लेख निर्भयपणे करू शकतो; कारण हा संदेश फक्त नरकाबद्दल नाही, तर त्यापेक्षा अधिक गोष्टींबद्दल आहे. हा संदेश त्या देवाबद्दल आहे, ज्याने मानवी रूप धारण केले, ज्याने आपल्या लोकांना मिळणाऱ्या क्रोधाचा प्याला स्वतःच प्राशन केला.
नरकाची संपूर्ण भीषणता जाणूनसुद्धा, त्या वीर आणि साहसी देवाने आपल्याजवळ येऊन मानवी रूप धारण केले, आमचा उद्धार करण्यासाठी तो प्रकट झाला. आमच्यासमोर उभा राहिला, त्याने स्वतः नरक अनुभवला नाही—नरकाचा प्रारंभ पुनरुत्थानानंतर आणि अंतिम न्यायानंतर होतो. परंतु त्याने आगीचा सरोवर म्हटलेल्या त्या क्रोधाचा सामना केला, ज्याला कदाचित तो आदरमय ज्वालेच्या तळ्यात रूपांतरित करतो. नरकातील दुष्ट कधीच संपूर्ण भार अनुभवत नाहीत, कधीच संपूर्ण किंमत भोगत नाहीत, त्यांच्या पापांसाठी आवश्यक असलेल्या दैवी शिक्षा पूर्णपणे भोगत नाहीत. पण एका आत्म्याचाही उद्धार करण्यासाठी, मानवरूपी परमेश्वराने संपूर्ण देयक भरले, संपूर्ण यातना भोगल्या, आणि सार्वकालिक दुःखाचा प्याला रिकामा केला. दुसऱ्या शब्दांत, जेथे दुष्टांनी अंशतः दु:ख भोगायचे (जरी भयंकरच) पण कायमचे दुःख भोगायचे आहे, त्याने त्या भव्य क्रोधाच्या सरोवरात स्वत: उडी मारून आपल्याला सोडवले आहे.
हे विश्वासूजनहो, त्याला पाहा, तो खोल, अधिक खोल, आत्म्याला भस्म करणाऱ्या खोल खळग्यात एकटाच दु:खाने अवतरीत होतो आणि अधिकच खोल व आणखी खोलवर जातो.
तळाशी हात लांबवून, ‘त्याने आपला जीव मृत्यूपर्यंत ओतला’(यशया 53:12). मित्रहीनतेच्या खोलात आणि मोजता येणार नाही अशा दुःखात, तो दु:खाचा पुत्र त्या तळाशी निर्धाराने पोहतो—सर्वशक्तिमान क्रोध त्याला चिरडत आहे. त्या समुद्राच्या तळाशी तो हात फिरवतो, तेव्हा अहो, त्याला एक हरवलेला मोती सापडतो. थोडे पुढे, दुसरा आणि अजून पुढे, तिसरा. हादाब असह्य होण्यापलीकडे वाढत असताना तो ओरडतो, ‘मला तहान लागली आहे!’ तरीही तो पुढे जातो, जरी स्वर्गीय सैन्य त्याच्या हाकेला उभे आहे. त्याला त्याचा खजिना मिळणार आहे, त्याचे लोक, एका मागून एक, तो त्या भयाण उष्णतेत आणि क्रोधाच्या भयानक कल्पनेतून निघून पुढे जातो, ख्रिस्त तुला धरतो आणि स्वत:चा म्हणवून घेतो. देवदूत स्तब्ध होतात. ‘माझ्या देवा, माझ्या देवा, तू मला का सोडलेस?’ असे तो ओरडतो (मत्तय 27:46). सहा असह्य तासांनंतर, तो आपला शेवटचा मोती गोळा करतो आणि विजयी स्वरात घोषणा करतो, ‘हे पूर्ण झाले’ (योहान 19:30).
फक्त येशूच, संपूर्ण अनंतकाळासाठी देवाच्या पापावरील योग्य रागाच्या तळाशी पोहोचला. त्याने एकट्यानेच पित्याचा संपूर्ण क्रोधाचा सामना केला. ‘तो आपल्यासाठी पाप बनला, ज्याला पापाचा अनुभवही नव्हता’ (2 करिंथ. 5:21 पाहा). कोणताही पापी हा त्याने केलेल्या ह्या अनंतकाळाच्या क्रोधाचा त्याच्या पातळीवर जाऊन सामना करू शकणार नाही. यहूदाच्या वंशातील सिंहाशिवाय अन्य कोणीही जिंकू शकत नव्हता. हे पापी एका पात्रातून थोडे-थोडे सार्वकालिक घोट घेत राहतील, आणि ते संपवण्याची आशा करू शकत नाहीत— किंवा ते हे सहन करून शकत नाहीत. पण त्याने हे केले.
क्रूर दयाळूपणा
ख्रिस्ती वाचकहो, तुम्ही खरोखर हे मानता का?
आपण सर्वांनी जर हे मान्य केले असते, तर आपली शहरे ख्रिस्ताच्या ज्ञानाने भरून गेली नसती का? मागील काही दिवसांत मी आपल्या रोजच्या आयुष्यातील लोकांची एक नजर केली नाही. आपले स्थानिक उद्याने, धोब्याची व चहाची दुकाने, उपहारगृह आणि क्रीडा कार्यक्रम ख्रिस्ताच्या नावाने गाजत राहिले असते.
आपल्याला सुसमाचाराचा असभ्यपणा थोडा अधिक शिकण्याची गरज आहे: निमंत्रण नसताना देखील तेथे जाणे, बोलावयास सांगितले नसताना देखील बोलणे, आणि त्या नावाचा प्रचार करणे — ते एकमेव नाव जे स्वर्गाखाली दिले गेले आहे— ज्याद्वारे मनुष्याचे तारण होऊ शकते. स्पर्जनचे शब्द आपले हृदय भेदून जाऊ देत.
आपण इतके सौम्य आणि शांत आहोत की, दुसऱ्यांच्या मतांविषयी कठोर भाषा वापरत नाही; परंतु केवळ त्यांच्याशी दयाळूपणाचा आव आणून लोकांना नष्ट होऊ देतो. आपण अत्यंत कट्टर नाही, आणि आपण जे काही करतो, त्यात जुन्या शत्रूला फार आरामशीर वेळ मिळतो. जो पापी स्वतःहून तारण घेऊ इच्छित नाही, त्याला आम्ही तारण देण्यासाठी फारसे इच्छुक नसतो. आम्ही त्यांच्याशी सौम्य भाषेत काही शब्द बोलण्यास तयार आहोत, परंतु आपल्या डोळ्यातून थेंबभरही अश्रू वाहत नाहीत, आपण देवासमोर त्यांच्यासाठी आक्रोश करत नाही, दु:ख अनुभवत नाही; त्यांना ख्रिस्ताचा क्रूसावरील संदेश नसल्यामुळे ते नाश पावत आहेत हे माहिती असूनही, त्यांच्यावर आपल्या मतांचा आग्रह धरत नाही. (वर्ड्स ऑफ काऊन्सल फॉर ख्रिश्चन वर्कर,32-33/Words of Counsel for Christian Workers, 32–33).
मानवी दृष्टिकोनातून पाहता, मी त्या व्यक्तीला एक प्रकारच्या गडद दयेमुळे नाशाला सोडण्यास तयार होतो (माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी). त्याला कदाचित ख्रिस्ताविषयी ऐकायचे नसेल (खूप जणांना ऐकायचे नसते). त्याने नाकारले असते (जसे अनेक करतात). परंतु असे भ्याड निर्णय माझे किंवा तुमचे नाहीत. आणि सार्वकालिक चेतनेत राहणारा, पाप्यांच्या योग्य शिक्षेच्या त्या थंड पावलेल्या शारीरिक उदासीनतेला पवित्र शास्त्रामधील शास्त्रीय सिद्धांतांनी नष्ट करायला हवे — ज्याला साध्या शब्दांत भेकडपणा किंवा द्वेष म्हटले जाते.
आपल्या शहरांत काय घडले असते, जर प्रत्येक ख्रिस्ती (आणि प्रत्येक मंडळी) नरकाच्या भयावहतेवर आणि येशू ख्रिस्ताची प्रत्येक आत्म्याला असलेली तातडीची गरज यावर खरोखर विश्वास ठेवत असते?
लेखक
ग्रेग मोर्स