नवीन पाळकांना जुना आदेश
माझ्या 24 वर्षाच्या पाळकीय सेवेमध्ये मी मंडळी कशी वाढवावी ह्या बाबत अनेक जाहिराती बघितल्या. जवळपास 50 वर्षांच्या उपदेश आणि शिक्षण सेवेमध्ये मी सुवार्ताप्रसार, मिशन्स आणि मंडळीची वाढ ह्यावर डझनावारी उपदेश ऐकलेत. तरीही ह्या जाहिराती किंवा संदेशांमध्ये “असे करा, आणि तुम्हाला लोकांचे तारण झालेले दिसेल” अशा आशयाच्या वचनांचा उल्लेख केलेला मी एका हातावर मोजू शकेन इतक्या वेळेलाच ऐकलेला आठवतो.
हे वचन प्रेषित पौलाकरिता इतके महत्त्वाचे होते की तो नवीन करारातील वडिलांना संबोधताना त्याचा सार कळवतो. आणि माझ्या स्मरणानुसार हे एकच वचन पवित्र शास्त्रामध्ये आढळते जे तीन वेळा सारखाच बोध करते. म्हणून त्याच्या महत्त्वाबाबत विचार करता येतो का?
हे कुठले वचन आहे? 1 तीमथ्य 4:16,
“आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वत:चे व तुझे ऐकणार्यांचेही तारण साधशील.” 28 वर्षे मी ह्या वचनाकडे प्रत्येक सत्रामध्ये शेवटच्या दिवसाच्या वर्गात वळलेलो आहे. ह्या दोन वाक्यांच्या लहानशा जागेत, तीन आज्ञा आणि दोन अभिवचने आहेत. अभिवचनांकडे वळण्या आधी आपण आज्ञांनी सुरुवात करूया.
1. ‘आपणाकडे नीट लक्ष ठेव.’
सेवक स्वत: कडे “नीट लक्ष कसा ठेवतो? ख्रिस्ताशी विश्वासूपणाचे संगोपण आणि त्याच्याप्रती असणार्या भक्तीची झीज न होऊ देण्याने. तो हे कसे करतो? ह्या अध्यायात अगोदर दिलेल्या आज्ञेचे पालन करण्याद्वारे : “सुभक्तीविषयी कसरत कर” (1 तीमथ्य 4:7). आणि ते तो कसे करतो? सातत्याने आणि संपूर्ण अंत:करणाने पवित्र शास्त्रोक्त शिस्ती पाळण्याने, विशेषत: त्या शिस्ती ज्या देवाचे वचन आणि प्रार्थनेशी संबंधीत आहेत, कारण त्या देवाने दिलेले सुभक्तीचे माध्यम आहे.
सुभक्ती हा पवित्र शास्त्रोक्त शब्द प्रामुख्याने ख्रिस्तसादृष्यता, पवित्रता, आणि पवित्रीकरण ह्यांशी समानार्थी आहे, आणि त्याचे संगोपन वैयक्तिक आणि परस्पर आध्यात्मिक शिस्तींनी होते. सकारात्मक (संजीवन) व नकारात्मक (इंद्रियदमन) दोन्ही प्रकारे. दुसर्या शब्दांमध्ये, ह्या पवित्र शास्त्रोक्त सवयींद्वारे पवित्र आत्मा आम्हाला देवाचा अनुभव घेण्यास आणि कृपेत वाढण्यास आणि पापाला पराजित करण्यास मदत करतो.
आठवण ठेवा की ही आज्ञा प्रथम सेवकाला (तीमथ्य) आणि मग विस्ताराद्वारे सर्व ख्रिस्ती लोकांना देण्यात आलेली आहे. म्हणून पाळक साहेब, असा विचार करू नका की तुमचे लोक आध्यात्मिक शिस्तींचे पालन करून अधिक देवभिरू होतील, आणि तुम्ही केवळ सेवेमध्ये असण्याने ख्रिस्तसादृष्य व्हाल. तुम्ही स्वत:ला सुभक्तीमध्ये प्रशिक्षित केले नाही तर सेवेतील मोहपाश आणि तणाव तुम्हाला अधिक दुष्ट बनविण्याकरिता कट करतील. मानसिकरीत्या तुमच्या जीवनातील सेवेशी संबंधीत सर्वस्व काढून टाकल्यावर, जे उरते, तेव्हा तुम्ही अधिक ख्रिस्तासारखे वाढत आहात असे म्हटले जाऊ शकेल का?
रिचर्ड बॅक्स्टरद्वारे लिखित पाळकीय साहित्य दी रिफॉर्म्ड पास्टर The Reformed Pastor मधून 1 तीमथ्य 4:16 बाबत स्पष्टीकरण तुम्ही निश्चित वाचावे अशी मी शिफारस करेन, प्रामुख्याने तुम्ही स्वत:कडे नीट लक्ष द्यावे ह्याबाबत त्याची आठ कारणे. विशेषत: तिसरे कारण : आपण इतरांपेक्षा जास्त मोहांना सामोरे जाता. सैतान हा मूर्ख नाही. त्याला माहीत आहे की त्याने तुम्हाला जर पाडले तर त्याचा मंडळीवर त्याने महिन्यातून एकदाच येणार्या आणि मागच्या बाकावर बसणार्या व्यक्तीला पाडल्यावर होणार्या परिणामापेक्षा अधिक हानीकारक परिणाम होईल.
जुने असो की नवीन, पाळकांनी स्वत:ला सुभक्तीच्या साधनांच्या शिस्तींना समर्पण केल्याशिवाय, ते देवभिरू व्यक्ती राहू शकणार नाहीत. आणि मंडळीला देवभिरू नसलेला पाळक हवा असतो का?
2. ‘आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव.’
पाळकीय आज्ञांमध्ये, “शिक्षण” हे सिद्धान्तांना संबोधते, म्हणजे असे शिक्षण जे “देवाच्या पूर्ण मनोदयामध्ये” सापडते ते (प्रेषित 20:27). दुसर्या शब्दांमध्ये, “पाळकसाहेब, ईश्वरविज्ञानाचा अभ्यास करा!”
पौल त्याच्या जीवनाच्या शेवटपर्यंत सतत अभ्यास करत राहण्याचा कित्ता होता. त्याच्या पवित्र शास्त्राच्या संपूर्ण ज्ञान आणि प्रेषित ह्या नात्याने त्याने जे सर्व अनुवभवले आणि बघितले होते, त्याव्यतिरिक्त तो तीमथ्याला त्याच्या शेवटच्या प्रेरित पत्रामध्ये विनंती करतो की, “आणि पुस्तके, विशेषेकरून चर्मपत्रेही आण” (2 तीमथ्य 4:13). ज्या व्यक्तीला अजून ईश्वरविज्ञानाचा अभ्यास करण्याची गरज नाही असा तुम्ही विचार केल्यास, तुम्ही तो व्यक्ती पौल आहे असा विचार करणार नाही का? आणि त्याच्या शिक्षणावर नीट लक्ष न ठेवण्याच्या एका काळाबद्दल तुम्ही विचार केल्यास, तो त्याच्या मरणापूर्वीचा काळ आहे असा तुम्ही विचार करणार नाही का? परंतु त्याला माहीत होते की जोपर्यंत त्याचे मन कार्यरत आहे, तोवर त्यामध्ये देवाच्या वचनाचे सत्य घालण्यापेक्षा दुसरे काही उत्तम नाही.
अनेक दशकांमध्ये माझे निरीक्षण असे आहे की काही सेवक ईश्वरविज्ञानाच्या अभ्यासामध्ये टिकून राहतात. अनेक जण त्यांच्या ईश्वरविज्ञानात्मक विचारसरणीला धार लावणार्या आणि त्यांच्या सैद्धान्तिक समजेला सखोल करण्यासाठी विकसित पुस्तकांचे वाचन, पॉडकास्टचे श्रवण, किंवा परिषदांना उपस्थित राहणे हे थांबवून टाकतात. ह्यातून काय निष्पन्न झाले आहे? डेव्हीड वेल्स ह्यांच्या 1994 मधील पुस्तक नो प्लेस फॉर ट्रुथ No Place for Truth ह्या पुस्तकातील शब्द आज अधिक खरे आहेत : “आमची पिढी अगोदरच जो विचार करते त्याला पर्याय देणारे देवाचे वचन देण्याकरिता आमच्याकडे कमी विश्वासूपण, सत्यामध्ये कमी रस, कमी गंभीरता, आणि कमी क्षमता आहे” (12). 30 वर्षांपूर्वीपेक्षा आज अधिक गुंतागुंतीच्या काळामध्ये, मंडळी आणि तिच्या पुढार्यांना अधिक ईश्वरविज्ञानाची आवश्यकता आहे.
मंडळ्या ह्या त्यांच्या पाळकाची धार्मिकता आणि ईश्वरविज्ञानाच्या स्तरापेक्षा देवभिरूपणामध्ये आणि पवित्र शास्त्रोक्त परिपक्वतेमध्ये अधिक वाढू शकत नाही.
3. ‘त्यातच टिकून राहा.’
दुसर्या शब्दांमध्ये, “आपणाकडे आणि आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष देण्यामध्ये टिकून राहा.” पाळक साहेब, आपल्या जीवनाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आपली धार्मिकता आणि ईश्वरविज्ञान ह्या दोन्हींकडे नीट लक्ष द्या. तुम्हाला अशा दक्षतेची गरज पडणार नाही अशा स्तरावरील परिपक्वतेपर्यंत किंवा वेळेपर्यंत तुमच्या जीवनात तुम्ही कधीच पोहचणार नाही.
पुन्हा, पौल जेव्हा प्रामुख्याने सेवकांना संबोधतो, तेव्हा तो तीमथ्याला जे बोलतो त्याचा पुनरुच्चार करतो. इफिस येथील मंडळीच्या वडिलांना तो म्हणतो, “तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या” (प्रेषित 20:28). तो जेव्हा, “कळपाकडे,” असे म्हणतो तेव्हा आपणास माहीत आहे की तो “शिक्षणाकडे नीट लक्ष देण्याबाबत” बोलत आहे, कारण पुढच्याच वचनात तो वडिलांना सांगतो की “कळपाची दयामाया न करणारे क्रूर” खोटे शिक्षक येऊन “शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील” (वचन 29–30).
तीत, जो पाळकीय पत्र प्राप्त करणारा दुसरा व्यक्ती होता, त्यालाही पौल त्याच शब्दांमध्ये सांगतो, “सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा [म्हणजे धार्मिकतेचा] कित्ता असे स्वतःला दाखव; शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण ह्यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे; ह्यासाठी की, विरोध करणार्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी.” (तीत 2:7–8). पाळकांबाबत त्याची काळजी सारखीच राहते : “आपण आणि आपले शिक्षण.” जीवन आणि सिद्धान्त. अंत:करण आणि डोके. अग्नी व प्रकाश. आत्मा आणि सत्य. धार्मिकता आणि ईश्वरविज्ञान.
आपल्यापैकी बहुतांश ह्यातील एक किंवा दुसर्याकडे जास्त झुकतात, धार्मिकता किंवा ईश्वरविज्ञान. तुमची वृत्ती कशी आहे? ह्याबाबत जागृक असा आणि तुमचे एकामागे लागणे हे दुसर्याला सुकण्याची परवानगी देणार नाही ह्याकडे “तुमचे लक्ष आहे” ह्याची काळजी घ्या.
तुम्हाला भरपूर सेवकीय अनुभव मिळाल्यावर तुम्हाला दक्षतेची गरज नाही अशा मोहाबाबत जागृक असा. मी जवळपास अर्धे दशक सेवेमध्ये आहे, मला आधिपेक्षाही अधिक लक्ष देण्यामध्ये टिकून राहणे अगत्याचे आहे.
देव पाळकांना देत असलेली अभिवचने.
प्रथम, “तू स्वत:चे तारण साधशील.” तीमथ्याचे तारण झालेले होते असे पौलाने गृहीत धरले होते असे म्हणणे योग्य होईल, म्हणून प्रेषित ह्या ठिकाणी तीमथ्याला ह्याची आठवण करून देत आहे की खर्या ख्रिस्ती पाळकाला त्याच्या अंतिम तारणाची हमी हवी असेल तर त्याने, “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेवले” पाहिजे. परंतु पाळक साहेब, त्यामागे असताना ह्याची आठवण ठेवणे अगत्याचे आहे की सातत्यपूर्ण भक्तीमय जीवन किंवा कर्मठ ईश्वरविज्ञान हे तुमचे तारण करणार नाही. आयुष्यभराची विश्वासू पाळकीय सेवा सुद्धा तुम्हाला तारू शकत नाही. पाळक लोकांचे सुद्धा तारण केवळ ख्रिस्ताच्या कार्यामुळे झालेले आहे.
आणि कुठल्याही इतर ख्रिस्ती व्यक्तीप्रमाणे, पाळकांनी सुद्धा 2 करिंथ. 13:5 मधील आज्ञेकडे लक्ष दिले पाहिजे, “तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा.” परंतु इतर कुठल्याही ख्रिस्ती व्यक्तीप्रमाणेच, कुठलेही पाळक त्यांचे संपूर्ण आयुष्य पवित्र शास्त्रोक्त शिस्ती आणि सत्य ह्याद्वारे विश्वासूरीत्या ख्रिस्तामागे चालत असताना त्यांचे तारण झालेले आहे ह्याचे बळकट पुरावे देतात.
दुसरे, “तुझे ऐकणार्यांचेही तारण साधशील.” तारणाच्या आत्म्याने सबळ केलेल्या पैलूसोबतच, हे अभिवचन सुद्धा फार महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, गांधीजीच्या शिक्षणाचे शिष्य बनविणारा कोण असू शकेल? निश्चितच तो व्यक्ती जो गांधीजींसारखा आणि त्यांच्या शिक्षणाप्रमाणे जगतो तो. त्याचप्रमाणे, जो येशू प्रमाणे आणि येशूच्या शिक्षणाप्रमाणे जगतो त्यापेक्षा अधिक येशूचे शिष्य बनत असलेले बघणारा कोण असू शकेल?
लक्ष द्या, तो तुम्हाला हवे तितके लोक तारण पावलेले बघा असे अभिवचन देत नाही, किंवा लोक तारण पावले हे तुम्हाला नेहमी समजेल असेही म्हणत नाही, परंतु तो असे निश्चित म्हणत आहे की तुमच्या सेवेचा परिणाम खर्या परिवर्तनांमध्ये होईल. आणि मला तर शंभर लोक जे परिवर्तित नाहीत परंतु आहे असे म्हणतात, त्यापेक्षा दहा खरे परिवर्तित झालेले बघायला आवडेल. तुम्हाला आवडणार नाही का?
तुमचे प्रथम पाचारण
1 तीमथ्य 4:16 ह्यातील “पद्धती” ह्या सुवार्ताप्रसारकीय, मिशनरी आणि मंडळीवाढीच्या पौलाच्या योजनांचे हृदय होत्या. देवभिरू माणूस असणे, म्हणजे येशू सारखे जगणारे व कृती करणारे असणे, हे लोकांना येशूकडे आणण्याकरिता अत्यावश्यक आहे. ख्रिस्त आणि तारणाचे सिद्धान्त माहीत असणे आणि गाजवणे, म्हणजेच शुभवर्तमान, हे असे माध्यम आहे ज्याद्वारे देव लोकांचे तारण करतो (रोम. 1:16). आणि तो ह्या वचनामध्ये अभिवचन देतो की तुम्ही ह्या गोष्टी करण्यामध्ये टिकून राहिल्यास, तुम्ही ख्रिस्ताकडे लोक आलेले बघाल. पाळकसाहेब, तुम्ही प्रथम आणि फार महत्त्वाचे म्हणजे देवाचा माणूस असण्यासाठी पाचारलेले आहात. म्हणून, “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा.”
लेख
डॉन व्हिटनी