जो ख्रिस्ती पुरुष स्त्रीया आणि मंडळीला सुरक्षित करतो, तो पुरुष भुतांना आणि दुष्टांना अस्वस्थ करतो. मेंढपाळाची आकडी व काठी त्यांना सांत्वन देतात. “सभ्य,” “सौम्य,” आणि “दयाळू” यांना अर्थ यामुळे आहे कारण तो केवळ तेवढाच नाही. प्राचीन लढवय्या नायकाप्रमाणे, ख्रिस्ती पुरुष “ज्या राक्षसांवर विजय मिळवतो, तो त्यांच्यावर विजय मिळवायचा असेल तर त्यांच्यासारखेच काही गुणधर्म सुद्धा बाळगतो” (लिऑन पॉडल्स, दी चर्च इम्पोटेंट, 95 – Leon Podles, The Church Impotent, 95). दुसर्‍या शब्दांमध्ये, ख्रिस्ती पुरुष बळकट असला पाहिजे.

स्त्रीवादाची देवी केवळ ह्या अवतरणाने किंचाळते : “सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा; खंबीर व्हा” (1 करिंथ. 16:13). पुरुष “पुरुषासारखे” वागलेले तिला आवडत नाही (आणि तुम्हाला सुद्धा आवडून नये म्हणून ती तुम्हाला धमकावेल). ती पुरुषांना निर्दयी बनवू शकत नसेल, तर ती त्यांच्या जिवांना अश्लिल चित्रफितींद्वारे नामर्द बनवेल, आणि वर्चस्वा बाबत उदासीन बनवून, खोलिच्या कोपर्‍यात बसून एका खोक्याकडे बघत त्यांचे गतिशिल जीवन व्यर्थ घालवेल. पौल देवाच्या प्रेरणेने, तुम्हाला कुठल्यातरी कारणासाठी जगायला लावेल, उठून खंबीर उभे राहायला आणि कशासाठी तरी मरायला लावेल, तो तुम्हाला कबरीतून पुन्हा उठऊन राज्य करायला लावेल. तो जुन्या भाषेत म्हणतात तसे “तुम्ही माणसांसारखे माणसं, थांबा” आणि बळकट व्हा.

ही आज्ञा म्हणजे काही नवा शोध नाही. पौल जुन्या करारामध्ये भिजून, आब्राहाम आणि नोहा, मोशे आणि यहोशवा, दावीद आणि योनाथान, एलीया आणि नहेम्या, शद्रख, मेशाख, आणि अबेदनगो ह्यांच्या गोष्टी ऐकत मोठा झाला. जेव्हा पौल संपूर्ण मंडळीला “मर्दासारखे वागा” असे म्हणतो तेव्हा तो आंद्रिझोमाई andrizomai हा जुन्या कराराचे ग्रीक भाषांतर वाचणार्‍यांना परिचित शब्द वापरतो. मर्दासारखे वागणे ह्याचा अर्थ काय आहे ह्याच्या स्पष्ट वर्गिकरणांसोबत इस्राएली लोक वाढले, त्याचा अर्थ होता विश्वासात खंबीर उभे राहणे, बळकट असणे.

ज्या पुरुषांना भुते ओळखतात

“मर्दासारखे वागा” हा वचनदत्त देशात प्रवेश करणार्‍या पिढीला दिलेला एक सर्वसामान्य आदेश होता. माझ्या माघार घेणार्‍या आत्म्याला किती वेळेस यहोशवाच्या प्याल्यातून प्यावे लागलेले आहे हे तर मी मोजू सुद्धा शकत नाही. त्याच्या देवाने त्याला आदेश दिला,

मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिम्मत धर [आंद्रिझोमाई andrizomai], घाबरू नकोस, कचरू नकोस; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. (यहोशवा 1:9)

यहोशवा, आणि निश्चितच संपूर्ण इस्राएलाला, “पुरुषाची भूमिका” निभवण्याची गरज होती जेणेकरून ते त्यांच्या स्वत:च्या भयांवर विजय मिळवून अशा भूमीमध्ये प्रवेश करू शकतील जेथे शत्रूंचे भयंकर व सशस्त्र थवे होते (अनुवाद 31:6). देवाने भित्रट हेरांचा आत्मा असणार्‍यांना चाळीस वर्षाच्या अरण्यवासात नष्ट करून टाकले होते. केवळ दोन सैनिकी आत्मा असणारे तरुण ज्यांनी त्यांच्या देवावर भरवसा ठेवला ते जगले : कालेब आणि यहोशवा. यहोशवाला मोशेने आणि देवाने लोकांसमोर वारंवार असा आदेश दिलेला आहे : मर्दासारखे वागा आणि खंबीर व्हा (अनुवाद 31:6–8, 23; यहोशवा 1:1–9, 16–18).

आंद्रिझोमाई ह्या शब्दामध्ये आत्म्याची शक्ती सामावलेली आहे. पुरुष त्यांच्या सैनिकी आत्म्याने, आणि त्यांच्या देवावर भरवसा ठेऊन ज्यांचे संरक्षण करायचे आहे त्यांच्यासाठी मर्दासारखे वागतात. ते प्रीती द्वारे प्रशासित असतात (1 करिंथ. 16:14), आणि तो प्रीतीचा आत्मा बळकट, परत उठून उभा राहणार्‍या आत्म्याचा नकार करत नाही; तो योग्य शेवट होण्याकडे लक्ष केंद्रित करतो. “खरा शिपाई त्याच्यासमोर उभे असलेल्यांचा तिरस्कार करतो म्हणून लढत नाही, तर त्याच्या मागे जे आहेत त्यांच्यावर तो प्रीती करतो म्हणून लढतो” (जी.के. चेस्टरटन, इलस्ट्रेटेड लंडन न्युज, 1911 – G.K. Chesterton, Illustrated London News, 1911). असा शिपाई युद्ध सुरू असताना, दोन्ही बाजूने हल्ला होता असताना, आणि त्याचे लोक त्याच्या मनावर असताना, त्याच्या भावाकडे वळतो आणि म्हणतो,

“अरामी माझ्याहून प्रबल होऊ लागले तर तू माझे साहाय्य कर, पण अम्मोनी तुझ्याहून प्रबल झाले तर मी तुझे साहाय्य करीन. हिंमत धर [आंद्रिझोमाई], आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरांसाठी लढाईची शिकस्त करू, मग परमेश्वर त्याच्या मर्जीस येईल तसे करो.” (2 शमुवेल 10:11–12)

भुते अशा माणसाला ओळखतात. त्याची पत्नी त्याचा सन्मान करते. त्याचे पुत्र त्याच्याकडे बघतात. त्याची मुलगी त्याच्यासोबत सुरक्षित असते. त्याचे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. तो त्याच्या राजाचा सैनिक आहे, त्याच्या पित्याचा पुत्र आहे, एक ख्रिस्ती पुरुष आहे.

भित्रेपणाचे पाप

मग हे असे कसे आहे की, तुम्ही काही ख्रिस्ती घरांना आज भेट दिल्यावर पौलाने पुढीलप्रमाणे बोध केला असे गृहीत धराल की, “आपल्या भावनांवर स्थिर उभे राहा, सहज घ्या, केवळ पौरुषीय असल्यासारखे वागा, तुमच्या न बदलणार्‍या (आणि कधीच न बदलु शकणार्‍या) दुर्बळतेचा स्वीकार करा”?

ह्या प्रकरणांमध्ये “सभ्यतेकरिता” असणारे पाचारण हे ख्रिस्ती पुरुषाच्या बळकटीला वाढवत नाही तर ते कमी करते. प्रीतीने बळकट आत्म्याची मागणी केलेली नाही तर तिची माघार घोषित केलेली आहे. दावीद राजा हा त्याच्या वाद्याने दु:खशमन करू शकत होता आणि त्याच्या गोफणीने इजा सुद्धा करू शकत होता. आपल्या प्रभूने देखील लेकरांना येऊ देण्यास सांगितले आणि तरी त्याने त्याच्या पित्याच्या घराकरिता ईर्ष्यावान होऊन त्यात विक्री करणार्‍यांना त्याने बाहेर घालवून दिले. आम्ही त्यांच्याच वंशाचे आहोत का? “अधिक सौम्य व्हा” हा केवळ एकच संदेश ज्यांना आग्रही, खारती बाळगणारे, आणि पराक्रमी होण्याबाबत शिक्षण मिळालेले नाही, अशा वाढत्या पिढीकरिता असू शकत नाही.

चार्ल्स स्पर्जनने त्याच्या काळातील सौम्य आणि भित्रट आत्म्याबद्दल शोक व्यक्त केला. मे 1866 द स्वोर्ड अँड द टॉवेल The Sword and the Trowel ह्या आवृत्तीमध्ये तो त्याच्या पिढीचे वर्णन करतो, जे आमच्या काळाकरिता दु:खदायकरीत्या संयुक्तीक आहे :

ख्रिस्ती कामकर्‍यांमध्ये भित्रटपणा हा सर्वसामान्य दोष नाही का? … ख्रिस्ती युद्धासाठी अपात्र होतील अशा सवयींमध्ये देवाच्या लोकांना शिक्षित करणे पाप नाही का? विश्वासणार्‍यांकडून त्यातील बहुतांश लोक आज व्यक्त करतात त्यापेक्षा अधिक पौरुषीय वागणुकिची अपेक्षा करण्याचे हे दिवस नाहीत का? (दी वॉर हॉर्स – The War Horse)

भित्रटपणा हा दोष आहे, परंतु सभ्यतेसारखे “सौम्य” गुणधर्म ज्यांचा उत्साह ख्रिस्ती लोक साजरा करतात त्याबाबत काय? तो पुढे म्हणतो,

तुम्ही मला आठवण देत आहात की सभ्यता हा महान गुणधर्म आहे; माझा विश्वास आहे की तो आहे, परंतु माझा असा विश्वास आहे की सैनिकाकरिता त्याशी तुल्यबळ असणारे अजूनही आवश्यक असे गुणधर्म आहेत. युद्धाच्या दिवशी सैनिकाला मागच्या भागात ठेवणारी सभ्यता त्याला थोडा आदर मिळवून देईल; परंतु त्याला पुढे जाण्याची आज्ञा दिल्यावर त्याच्या माघार घेण्याच्या वृत्तीला धैर्यवान पुरुष दुसर्‍या नावाने हाक मारतात.

स्पर्जन त्याच्या संदेशांना नेहमी सैनिकी पोशाख नेसवत असत. त्यांची सेवा पौरुषीय होती, जी त्यांच्या काळात त्यांनी पुलपिटावर अनुभवलेल्या लाजीरवाणेपणाचा विरोध करत असे :

ह्या फसव्या सभ्यतेचा स्वाद आजही सेवेमध्ये चाखायला मिळतो, आणि काहींना त्या स्वादाची अधिक ओढ आहे. आम्ही आमच्या श्रोत्यांपुढे आमचा मताहग्रहीपणा नाकारणार्‍या, आणि सुनावनीचा दावा भिक मागणार्‍या भिकार्‍याप्रमाणे करत, मधूर लाजाळूपणाने यावे अशी अपेक्षा केली जाते. देवाच्या राजदूताने खरोखर धूळ चाटून त्याच्या स्वामिचा संदेश असा सादर करावा जणूकाही त्याने रजा मागितली आहे, अशी अपेक्षा केली जाते.

दुसर्‍या शब्दांमध्ये, पाळक ह्या नात्याने त्याने शेख्सपीअर चा लढवैया कोरिओलानस कडून शब्द घेतले, “मी सौम्य असावे अशी इच्छा तू का केलीस? मी माझ्या स्वभावाविरुद्ध असावे अशी तुझी इच्छा आहे का? त्याऐवजी मी असे म्हणेन, मी जो पुरुष आहे त्याची भूमिका निभावेन” (कोरिओलानस Coriolanus, 3.2.15). “देवाचा माणूस हा मर्द माणूस असतो,” स्पर्जन ह्यांनी घोषित केले. “खरा माणूस तेच करतो जे त्याला योग्य वाटते, मग डुकरे रेकत असो किंवा कुत्रे केकाटत असोत” (“ए मॅन ऑफ गॉड इझ ए मॅनली मान,” मॅस्क्युलिनिटी अँड स्पिरिच्युआलिटी इन व्हिक्टोरियन कल्चर, 211 – “A Man of God Is a Manly Man,” Masculinity and Spirituality in Victorian Culture, 211).

आत्म्याचा नाश करणारा शिष्टाचार

परंतु स्पर्जनचे म्हणणे नेमके काय आहे, आम्ही ते आजच्याकरिता कसे लागू करू शकतो? आधुनिकतेतील पाखंडी धर्म (त्याच्या काळातही जिवंत होता) आम्हाला देवांच्या मंडळाला नमन करण्यास सांगेल. “तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास त्याचे समर्थन” मनुष्याने करू नये (यहूदा 3). मनुष्याकडे त्याचा वैयक्तिक येशू असेल, परंतु जो सार्वजनिक प्रभू प्रत्येक राष्ट्रावर अधिकार बाळगतो, ज्याच्यासमोर प्रत्येक पाप्याने झुकले पाहिजे, तो नाही. हा बहुत्ववाद जरी लवकरच प्रभूच्या कोशासमोर पडलेल्या दागोनाप्रमाणे शीर वेगळे होऊन पडणार आहे, तरी ते प्रभूचा तिरस्कार करते.

मग आमचे युद्ध, त्या काळी आणि आजही (आणि पहिल्या शतकात), आत्म्यांच्या भल्याकरिता ख्रिस्ताचे सरळ सत्य गाजविण्याबाबत आहे. आम्ही आध्यात्मिक शस्त्रास्रे जोडतो, किल्ले नष्ट करतो ते प्रामुख्याने आपल्या भाषणाद्वारे, “कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो” (2 करिंथ. 10:4–5).

जर आम्ही जुन्या कराराच्या धर्मात असतो, आणि भौगोलिकतेने देवाच्या राज्याच्या सिमा ठरवल्या असत्या, जर देवाचे राहण्याचे ठिकाण यरुशलेमेच्या भिंतींमागे असते आणि देवाचा कोश मंदिरामध्ये असता, जर आम्ही ख्रिस्ताच्या राष्ट्रामध्ये असतो, तर मग देवाच्या माणसें आज अशा आदेशाची कल्पना करू शकतात : “माणसा आपली तलवार उचल, आणि मंडळीकरिता तिच्या शत्रूंशी लढ!”

आणि जरी सर्वसाधारण मनुष्य तलवार उचलू शकेल आणि दंड मारू शकेल, तरी आम्हाला माहीत आहे की आमच्या ख्रिस्तातील युद्धाचा स्तर हा फार उंच असा करण्यात आलेला आहे. किंवा न थकणार्‍या आणि अदृष्य शत्रूंविरुद्ध दररोज लढणे, आमच्या स्वत:च्या लोकांमधील द्रोह्यांविरुद्ध जागृत असणे, आमच्या अंत:करणाला झोंबणारे जळते बाण सोडणार्‍या आत्म्यांशी झगडणे, अविनाशी आत्म्यांना आपल्या जबड्यात धरून ठेवणार्‍या गडद आणि शक्तिशाली कोल्ह्याला चिडवणे ही लहान बाब आहे का? बळकट माणसे, विश्वासात मजबूत असणारे, प्रभूमध्ये बळकट असणारे, जग, मांस, आणि सैतानाला धुडकावून लावतात.

सी.एस. लुईस ह्यांनी त्यांच्या दिवसांमध्ये लिहिले, “ज्यांना माहीत आहे ते बोलण्यास भित्रे झालेले आहेत. म्हणून जी दु:खे शुद्ध करत असत ती आता केवळ चिडवतात” (दी ग्रेट डिव्होर्स, 106 – The Great Divorce, 106). निरर्थकतेमध्ये जगणार्‍या अविश्वासणार्‍यांना त्यांचा मार्ग नरकात जातो, त्यांचा देव केवळ मूर्ती आहे, आणि त्यांची आशा नशेत असलेल्यांची स्वप्न आहेत असे सांगण्यास आम्ही आमची शक्ती एकवटू का?

स्पर्जन आरोळी मारतो, “माणसे नाश पावत आहेत, आणि त्यांना ते सांगणे हे असभ्यतेचे असेल, तर मग ते केवळ तेथेच होऊ शकते जेथे सैतान हा सोहळ्याचा स्वामी आहे. आत्म्यांचा नाश करणार्‍या तुमच्या शिष्टाचाराचा धिक्कार असो; प्रभू आम्हाला लहानशी प्रामाणिक प्रीती देतो, आणि ही औपचारिक सभ्यता लवकरच नष्ट होईल” (दी वॉर हॉर्स – The War Horse). एकेकाळी शुद्धता आणणारे दु:ख, आता ख्रिस्ती माणसे बोलण्यास भीतात, किंवा ज्याला क्षमावाद म्हणतात त्यास्तव, चिडवणारे होईल का?

बंधूंना धार लावणे

कदाचित आम्ही शमशोनाचे केस ह्याकरिता कापलेत, कारण बंधूंना धार लावणारे बंधूत्व हरवल्यामुळे आम्ही माणसांना एकटेच नायक होण्यास सोडलेले आहे. कदाचित ख्रिस्ती माणसं त्यांच्या शेजार्‍यांशी धैर्याने बोलत नाहीत कारण ते एकमेकांसोबत धैर्याने बोलत नाहीत. ते जेथे आहेत तेथे माणसांचा जबाबदारपणा त्वरित धर्मनिरपेक्ष उपचार सत्रांमध्ये बुडून जातो, तेथे ऐकणारे केवळ सहानुभुती देऊन मनुष्य खालावत असल्याची पुष्टी करतात. आम्ही झगडणे, आणि लोखंडाला धार लावणे, आणि माणसांमध्ये माणसांसारखे वागणे विसरलो आहोत.

आज अनेकजण अशा अबोल नियमाने चालविले जातात की आम्ही शिष्यत्वामध्ये प्रथम पाऊले उचलणारे डगमगते बोकड असू शकतो, असे माझे निरीक्षण करणे फार कठोर आहे का? पुढ्यात असणार्‍यांनी पुढे जावे का? देवाकडे (आणि बंधूंकडे) आम्हाला अधिक बळकट करण्याची कळकळीची विनंती करण्याऐवजी चिंताक्रांत झालेल्या मेंढरांचे एकत्र येऊन आपण किती भग्न आहोत ह्याबाबत बँ बँ करणे हा वेळ घालवण्याचा एक प्रकार बनत चाललेला नाही का? आशा करतो ते तसे नसावे.

ख्रिस्ती जीवनाकरिता पेत्राचे दर्शन आठवा. त्याचे दर्शन विश्वाणार्‍याने दैवी सामर्थ्याने पावित्र्यात वाढण्यास प्रयत्न करण्याचे आहे, देवाच्या गौरवासाठी आणि सर्वोत्कृष्ठतेसाठी असलेल्या पाचारणाचे आहे, प्रगतीचे आणि मौल्यवान व फार महान अभिवचनांचे आहे, आमच्या पाचरणाची आणि निवडीची खातरी(खात्री) करून घेऊन संतांसोबत स्वर्गिय शहराकडे जाण्याचे आहे (2 पेत्र 1:3–11). अडखळणे? निश्चित? पाप? त्याचा कोण नकार करेल? परंतु वाढ? संपूर्णत:. पुढे जाणारे ख्रिस्ती सैनिक हा आमचा वारसा आहे. विजयी मंडळी विजयी ख्रिस्ताच्या मागे चालते, आणि आमच्या स्वत:च्या आत्म्यामध्ये युद्ध सुरू होऊन गौरवात त्यावर प्रक्रिया होते.

ख्रिस्ती मनुष्यासारखे वागा

हे आम्हाला अंतिम मुद्याकडे आणते : पौरुषीय बळकटीकरिता देवाचे पाचारण हे विशेषत: ख्रिस्ती आहे. ख्रिस्ती माणूस स्वत:वर किंवा रथांवर अवलंबून राहत नाही. तो काल्पनिक चरित्र गॅस्टन सारखा गर्वाने चालून असे गीत म्हणत नाही, “एक नमुना म्हणून, होय, मी भीतीदायक आहे!” यहोशवाच्या गोष्टीतून इब्री लोकांस पत्राचा लेखक आपणास योग्य वागणुक करण्यास बोलावतो (इब्री 13:5–6), आणि त्यातून हे शिकवतो की देवाचा माणूस बळकट आणि धैर्यवान आहे कारण तो मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही, ह्या देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवणारा असतो. ताकतवर माणसांना माहीत आहे की देवाशिवाय त्यांची ताकत केवळ दुर्बळता आहे.  “प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा.” (इफिस. 6:10).

लाल रक्ताच्या आणि जोमदार मनुष्यासारखे वागणे म्हणजे हे कबूल करणे की आम्ही केवळ मानव आहोत. जाहिरात म्हणते त्याप्रमाणे, “सर्वोत्कृष्ठ माणसे त्यांच्या सर्वोत्कृष्ठतेत असतात.” जर देवबाप आपल्यासोबत जात नाही, तर आमची ताकत व्यर्थ आहे. देवासोबत, आम्ही सिंहासारखे धैर्यवान असे उभे राहतो. त्याच्याशिवाय आम्ही जणूकाही तलावात विरघळून जातो. परंतु देवाने आम्हाला न सोडण्याचे अभिवचन दिलेले आहे. म्हणून गुणधर्माच्या आड असलेली अपौरुषीयता बाजूला सारावी. ख्रिस्त जसा ऐकला गेला पाहिजे तसे त्याच्याबाबत बोला. नौकरी शोधा, पत्नी शोधा, लेकरं वाढवा. मंडळीची सेवा करा. येशूच्या नावामध्ये शेजार्‍यांवर प्रीती करा. घाम गाळण्यास शिका, क्षमता वाढवा, आणि त्यांचा उपयोग करा. देवासमोर आणि त्याच्या वचनासमोर नम्रतेने चाला; लोकांसमोर उंच उभे राहा. पवित्र हात उंच करून प्रार्थना करा. अभ्यास करा. एकदुसर्‍याला धार लावा. ठाम उभे राहा. जे करता ते सर्व प्रीतीमध्ये केलेले असू द्या. प्रभूमध्ये बळकट व्हा. ख्रिस्ती माणसांसारखे वागा.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *