मूर्ख पुरुषांचे पाच गुणधर्म
आपण त्याच्या शेजारी राहिलात तर आपणास थोडीतरी ईर्ष्या न होणे कठीण आहे. रस्त्यावरील सर्वसाधारण मनुष्याला हवे असेल ते सर्व त्याच्याकडे आहे. एखाद्या मनुष्याला हवी असेल असे सुंदर घर असलेली मालमत्ता, यशस्वी व्यवसाय आणि भरपूर कामकरी, जगातील सर्व सुखसोई आणि ऐशोआराम.
तो श्रीमंत कुटुंबामध्ये जन्मलेला असल्यामुळे गरज काय असते हे त्याला कधी समजलेच नाही. तो बोलू लागण्याआधीच श्रीमंत होता आणि त्याचा वारसा पुरे नसेल तर त्यांचा कौटुंबिक व्यवसाय जोरात सुरू आहे. त्याने अशा स्तरावरची समृद्धी प्राप्त केली होती जिच्यासाठी अनेक पुरुष आयुष्यभर घाम गाळून भरडले जातात, परंतु त्यांना ती चाखता येत नाही. तुम्ही त्याच्या वाहनतळात बघितल्यास लक्षात येईल की एखाद्या घराच्या किंमती एवढी वाहने कदाचित त्याच्याकडे असतील.
या सर्वांच्या वर, त्याने एका अद्भुत, सुज्ञ, सुंदर, आनंदी, आणि दुर्मिळ असणार्या स्त्रीशी विवाह केलेला आहे. आपण जितके तिच्या अवतीभोवती असाल तितके जास्त आपणास तिच्या अवतीभोवती असावेसे वाटेल. काय बोलावे आणि काय नाही हे तिला माहीत आहे. ती लोकांना विचार करायला लावते की एखाद्या मनुष्याच्या जाळ्यात तिच्यासारखा हिरा कसा काय अडकला असेल. त्यांचे जीवन असल्याप्रकारचे आहे जे लक्षावधींना नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करायला आवडेल. अनेकजण त्याच्याकडे दुरून बघून असे गृहीत धरतील की तो आशीर्वादित पतीचे चित्र आहे.
परंतु जेव्हा देव त्याच मनुष्याकडे बघतो, तेव्हा तो त्याला कुचकामी असे म्हणतो.
देवाच्या हृदयाविरुद्ध असणारा मनुष्य
जेव्हा आम्ही नाबालाला भेटतो तेव्हा (त्याच्या नावाचा शब्दश: अर्थ “मूर्ख” असा आहे आणि ते त्याच्या संगोपनाविषयी काही वास्तविक प्रश्न उभे करतो), दावीद शौल राजापासून पळत असताना त्याच्या शेतांमध्ये येतो. दावीद व त्याचे सवंगडी ह्यांना भूक लागते, म्हणून तो अभिषिक्त पुढारी नम्रतेने वाकून अन्नाची मागणी करतो. तो किती नम्रतेने आणि सन्मानाने आपली विनंती सादर करतो हे लक्षात घ्या :
त्या सुखसंपन्न पुरुषाला म्हणा की, ‘आपले आपल्या घराण्याचे व आपल्या सर्वस्वाचे कुशल असो. मी असे ऐकले की आपण लोकर कातरणारे लावले आहेत; आपले धनगर आमच्यामध्ये होते; आम्ही त्यांना काही उपद्रव दिला नाही, आणि ते कर्मेलात असताना त्यांची काहीएक हानी झाली नाही. आपल्या चाकरांना विचारा म्हणजे ते आपणाला सांगतील; तर ह्या तरुण पुरुषांवर कृपादृष्टी करा; आम्ही आनंदाच्या दिवशी आलो आहोत, तर आपला हात चालेल तेवढे आपल्या दासांना व आपला पुत्र दावीद ह्याला द्या.’ (1 शमुवेल 25:6–8)
नाबालाचे चाकर नंतर दाविदाच्या गोष्टीची पुष्टी करतात : “हे लोक आमच्याशी चांगल्या रीतीने वागले आणि आम्ही मैदानात होतो तोवर त्यांचे-आमचे दळणवळण होते; त्या वेळी त्यांनी आम्हांला काही उपद्रव केला नाही व आमची काही हानी झाली नाही. आम्ही त्यांच्याबरोबर शेरडेमेंढरे राखत होतो तोवर ते रात्रंदिवस आम्हांला तटबंदीसारखे होते.” (1 शमुवेल 25:15–16). दाविदाच्या लोकांनी नाबालाच्या धनगरांना काही उपद्रव केला नाही इतकेच नाही, तर त्यांनी त्यांचे संरक्षण केले आणि त्यांना आशीर्वादित सुद्धा केले. त्याचे स्वत:चे लोक असा विचार करतात की त्याने त्यांना अन्न द्यावे.
प्रतिसादामध्ये, नाबाल त्याच्या नावाच्या अर्थाला जागतो :
नाबालाने दाविदाच्या सेवकांना म्हटले, “दावीद कोण? हा इशायाचा पुत्र कोण? आजकाल बहुत दास आपापल्या धन्याला सोडून पळून जातात. माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरणार्यांसाठी मारलेल्या पशूंचे मांस जे कोण, कोठले, हे मला ठाऊक नाही असल्या लोकांना मी देऊ काय?” (1 शमुवेल 25:10–11)
त्याला दावीद कोण आहे हे निश्चित माहीत आहे. अन्यथा तो त्याला “इशायाचा पुत्र” असे का म्हणेल (शौल हे नाव द्वेषपूर्णरीत्या पुन्हा आणि पुन्हा वापरतो, 1 शमुवेल 20:27, 30–31; 22:13)? दावीद रिकाम्या हाताने गुडघे टेकतो, तेव्हा नाबाल त्याच्या तोंडावर थुंकून त्याला परत पाठवतो. त्याची पत्नी अबीगईल नसती तर त्याला त्याचा जीव तेथे आणि तेव्हांच गमवावा लागला असता (1 शमुवेल 25:13).
मूर्ख पतींचे पाच गुणधर्म
ख्रिस्ती पतींनी नाबालाकडून काय शिकावे? आम्ही त्याच्याकडून वाईट मनुष्य असण्याचे आणि मूर्ख पती असण्याचे कमितकमी पाच मार्ग शिकतो.
प्रीतीविना सामर्थ्य
नाबालाकडे असे सामर्थ्य होते जे दुर्बळांना प्रभावित आणि घाबरे करू शकेल. तो शेतात आपल्या हातांनी काम करणारा आणि लोकर कातरणारा होता, तथापि त्याने त्याच्या शक्तीचा उपयोग नीच पद्धतीने केला. जेव्हा पवित्र शास्त्र ह्या जोडीचा परिचय करून देते, तेव्हा लेखक म्हणतो, “ती स्त्री बुद्धिमान व रूपवती होती; परंतु तो पुरुष कठोर व वाईट चालीचा होता” (1 शमुवेल 25:3). कठोर हा एक शब्द पुरुष ह्या नात्याने त्याच्या अपयशाचा सारांश मांडतो. त्याने त्याच्या देवाने दिलेल्या शक्तीचा उपयोग बरे करण्याऐवजी जखमी करण्यासाठी; आणि सरंक्षण करण्याऐवजी भय दाखविण्यासाठी केला. प्रीतीने जे केले पाहिजे ते करण्यासाठी तो जबरदस्तीवर अवलंबून राहीला. तो क्रुर होता.
त्याची शक्ती ही समस्या नव्हती. नाही, देवभिरू पती हे मजबूत पुरुष असतात. देव त्यांना जे करण्यास बोलावतो ते त्यांनी केले पाहिजे, देव त्यांना जे वाहण्यास बोलावतो ते त्यांनी वाहिले पाहिजे, आणि देव ज्याचा सामना करावायास लावतो त्याचा त्यांनी सामना केला पाहिजे. ख्रिस्तामध्ये पुरुष आपले आळशीपण, आपली भीती, आणि नाजूकपणा टाकून देतात. आम्ही देवाच्या शक्तीने, देवाची युद्धे लढण्यास देवाची शस्त्रसामग्री धारण करतो. आणि आम्ही त्या शक्तीचा उपयोग जेव्हा करतो तेव्हा आमच्या घरातील आणि मंडळीतील लोकांची (जसे की नाबालाच्या जवळच्या लोक) काळजी घेतली जाते आणि त्यांना संरक्षण मिळते. कुठल्याही समंजस पत्नीला अशा मजबूत आणि प्रीती करणार्या मानसाद्वारे चालविले जाण्यास आवडते.
सुज्ञतेविना धैर्य
तुम्ही अशी गोष्ट वाचून नाबालाच्या धैर्याविषयी प्रश्न विचारणार नाही असे होऊ शकत नाही. जेव्हा देवाचा अभिषिक्त, शसस्त्र आणि घातक, व्यक्ती आपल्या लहान सैनिकांच्या तुकडीसह त्याच्या घरासमोर उभा राहून अन्नाची मागणी करत आहे, तेव्हा हा मनुष्य त्यांना पाठवून देतो. “दावीद कोण? हा इशायाचा पुत्र कोण?” असे म्हणून त्याने खरेतर जळता बाण ओढून भुकेल्या लढवय्याच्या छातीवर नेम साधला, आणि चेतावनी धुडकावून हिंसेला आमंत्रण दिले. त्याच्याकडे जमिनीवर उभे राहण्याचा कणा होता खरा परंतु त्याने चुकीच्या जागेवर उभे राहण्याचे निवडले होते. त्याने मूर्खत्वावर त्याचा झेंडा रोवला आणि आपल्या गर्वाखातर सर्वच बाबतीत जोखीम उचलली.
पुन्हा, धैर्य ही त्याची समस्या नव्हती. देवभिरू पुरुष हे बहुतांश पुरुषांपेक्षा इतरांच्या भल्याकरिता स्वत:चे बलिदान करण्यास तयार असतात. ते यशया 41:10 सारखी अभिवचने धारण करतात, “तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करतो, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.” आणि त्यांच्या धैर्यवानतेचा स्रोत आणि उद्देश ते स्वत: नव्हे तर देव असल्यामुळे ते चुकीचे युद्ध निवडत नाहीत (विशेषत: त्यांच्या पत्नींसोबत). त्यांच्या अंहंभावाखातर त्यांना ज्यांचे संरक्षण करण्यास पाचारलेले आहे त्यांना ते धोक्यात घालत नाहीत. ते स्वत:ला सुज्ञतेने आणि प्रीतीने जोखमेत घालतात. त्यांच्या कुटुंबांसाठी, मंडळीसाठी, त्यांच्या देवासाठी कधी उभे ठाकायचे आणि कधी आपला दुसरा गाल पुढे करायचा हे त्यांना समजते.
औदार्याविना संपत्ती
नाबाल जे सर्व वाईट करू शकत होता आणि ते त्याने केले, तरी देवाने काही काळ त्याला समृद्ध होण्याची परवानगी दिली. त्याच्याजवळ असल्याप्रकारची कोठारे होती जी एखाद्या लहान सैन्याला सहज अन्न पुरवू शकत होती. तो केवळ श्रीमंत नव्हता. तो फार श्रीमंत होता. देव आम्हाला सांगतो. “त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकर्या होत्या” (1 शमुवेल 25:2). ह्या मनुष्याची संपत्ती केवढी होती आणि त्याने तिचा उपयोग किती वाईट केला हे आम्हास समजावे. तो दावीद आणि त्याच्या सवंगड्यांना सहज अन्न पुरवू शकला असता आणि त्याचा काहीच तोटा झाला नसता. पण त्याने तसे केले नाही. तो शंभर गरजा भागवू शकला असता, परंतु त्याने त्याला जे पाहिजे होते त्यावर खर्च करण्याचे निवडले. तो स्वत:ची सोडून इतर प्रत्येकाच्या भुकेप्रती स्वार्थी आणि चिकट होता.
नाबालाने मोठी कोठारे बांधली होती. त्याने मूर्खाचे घोषवाक्य परिधान केले होते : “हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर” (लूक 12:19). आणि देव त्या मनुष्याला काय म्हणतो? “अरे, मूर्खा! आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस, ते कोणाचे होईल?” (व. 20). त्यामध्ये येशू भर घालतो, “जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे” (व. 21). आणि देवाप्रती धनवान होणे म्हणजे सामान्यत: इतरांप्रती उदार होणे. त्याचा अर्थ असा आहे की आमच्या खर्चाने (किंवा कुठल्यातरी महत्त्वाच्या बाबीने) इतरांच्या गरजा भागविण्याकरिता संपत्ती साठवणे. देवभिरू पती हे आमच्या पित्याप्रमाणे देणारे असतात, राखून ठेवणारे किंवा घेणारे नव्हे.
कृतज्ञतेविना यश
नाबाल तेजीत असलेला व्यवसाय चालवत होता. त्याचा निधी वाढत होता. त्याचे विश्वस्थ होणार्या नफ्याद्वारे आनंदी होते. सर्वच दृष्टिकोणातून ह्या मनुष्याची कारकिर्द भयंकर यश संपादन करत होती. एक सोडून सर्व दृष्टिकोणातून, नाबालाने जे सर्व साध्य आणि प्राप्त केले होते ते देवाने बघितले, आणि त्याला अपयश दिसले. त्याने दिवाळे बघितले. त्याने त्या व्यवसायाला कुचकामी असे संबोधले. आमच्या मंडळ्यांमधील किती लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणांवर भयंकर यशस्वी होत आहेत, आणि तरीही इतर सर्व ठिकाणी गमावत आहेत? किती लोक त्यांच्या सोबत्यांद्वारे आणि स्पर्धकांद्वारे सन्मानित आहेत आणि स्वत:च्या घरामध्ये मात्र त्यांना मोठ्या मुष्किलिने सहन केले जात आहेत? आमच्या पैकी किती लोकांना कुटुंब आणि मंडळीच्या बाहेर अनंत महत्वाकांक्षा आहेत, परंतु जेथे सर्वात महत्त्वाचे आहे तेथे देण्यास त्यांच्याजवळ फार थोडे उरलेले असते?
देवभिरू पुरुष जे काही करतात ते माणसांसाठी नव्हे तर प्रभूसाठी म्हणून करतात (कलस्सै. 3:23). ख्रिस्ती पुरुष त्यांचे काम विलक्षण उत्कृष्ठतेने करतात, परंतु विलक्षण कृतज्ञेने करतात. नाबाल कसा बोलतो त्याकडे लक्ष द्या : “माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरणार्यांसाठी मारलेल्या पशूंचे मांस जे कोण, कोठले, हे मला ठाऊक नाही असल्या लोकांना मी देऊ काय?” देवाने त्याला सर्वकाही दिले परंतु त्याला कशाबद्दल कृतज्ञता मिळाली नाही. जेव्हा देवाने त्याच्या कामकर्यांचे आणि मेंढरांचे संरक्षण केले, तेव्हा त्या करुणेला त्याने वाईटाने प्रतिसाद दिला (1 शमुवेल 25:21). चांगले पती अविरत नम्र आणि कृतज्ञ असतात, अगदी लहानसहान प्राप्ती आणि यशांमध्ये सुद्धा. ते थोडक्याविषयी विश्वासू असल्यामुळे, देव नेहमी त्यांना अधिक देतो (लूक 19:17, 24–26).
स्वनियंत्रणाविना भूक
शेवटी, नाबाल त्याच्या भुकेचा गुलाम होता. त्याच्या शरीराच्या आवेगाने आत्म्याशी युद्ध छेडले आणि त्याच्या आत्म्याने लवकरच पांढरा झेंडा फडकवला. जेव्हा अबीगईल त्याला शोधण्यास आली, “त्याने आपल्या घरी राजाच्यासारखी मेजवानी केली आहे असे तिने पाहिले; त्याचे चित्त रमून गेले होते. तो फार झिंगला होता” (1 शमुवेल 25:36). बाहेर त्याच्याशी लढण्यास सैन्य उभे असताना सुद्धा त्याने बाटलीकडे धाव घेऊन आपल्यासाठी अजून एक प्याला ओतला. जेव्हा त्याच्या घरातील लोकांना त्याने उभे राहून पुरुषाची भूमिका निभावण्याची गरज होती, तेव्हा त्याने ते करण्याऐवजी बुध्दिहीन, मूर्खत्वाचे, आणि मंद करणारे सुख निवडले. त्याने स्वत:चे लाड पुरवले आणि इतरांना सोडून दिले.
आम्ही त्याचा लगेच तिरस्कार करण्याआधी, आपणही कधीकधी तसेच करत नाही का, अगदी सुक्ष्म मार्गांनी? आम्ही पती आणि पिता ह्या नात्याने आमची जागा अगदी सहजरीत्या मोकळी सोडून जातो का? आमच्या जीवनातील कुठला सुखोपभोग आमच्या आध्यात्मिक आणि नात्यात्मक निकड आणि जबाबदारीच्या जाणिवेला बधिर करतो?
जेव्हा प्रेषित पौल मंडळीतल्या प्रौढ लोकांकडे येतो, तेव्हा तो त्यांना बोध करतो, “वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यांमध्ये दृढ राहावे” (तीत 2:2). आणि काही वचनांनंतर तो तरुणांकडे येतो आणि म्हणतो, “तसेच तरुण पुरुषांनी मर्यादशील असावे म्हणून त्यांना बोध कर” (तीत 2:6). आनंदहीन नाही, देवभिरू पती हे आनंदी पुरुष असतात, मात्र कुठल्यातरी स्वस्त, सहज आणि वरवरच्या मार्गांनी नव्हे.
ज्या पुरुषांवर कृपेचे स्वमित्व असते ते स्वत:वर स्वामित्व करतात. आम्ही अनेक पुरुषांसारखे फुटबॉलचा खेळ, भाजलेले मटण, व्हिडिओ गेम्स, किंवा मिश्र पेयांवर आमच्या पिडानिवारण आणि उल्हासासाठी अवलंबून नसतो. आम्ही देवाचे निवडलेले पुत्र, ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले बंधू, सृष्टीचे भविष्यात्मक राजे असण्यास रोमांचित आहोत. आणि अन्न व पेय, विवाह आणि संभोग, फुटबॉल आणि नेटफ्लिक्स सारख्या ऐहिक सुखांचा आनंद सभ्यतेने करतो जेणे करून आम्ही आमचा सर्वोच्च, संपूर्ण, सर्वात मजबूत असा आनंद म्हणजे देव हा टिकवून ठेऊ शकू.
पात्र मनुष्यांचे मुल्य
पवित्र शास्त्रातील इतर अनेक पतींप्रमाणे, नाबाल पतींना कसे नसावे आणि काय करू नये हे शिकवतो. तथापि, त्याची अपयशे आमच्याकरिता बांधणित्मक नकाशा मांडतात. ते आम्हा पुरुषांना हे शिकवतात की देवाने आमच्यावर ज्याची आणि ज्यांची जबाबदारी दिलेली आहे त्यांना आम्ही कसे वागवतो ह्यावर आमचे मुल्यमापन होईल.
आम्ही आमच्या बाबी, म्हणजे आमची मेंढरे, आमच्या बकर्या आणि आमचे मासिक उत्पन्न कसे हाताळतो ह्यावर आमचे मुल्यमापन होईल. आम्ही निस्वार्थी आणि मर्यादशील आहोत का, की स्वार्थी आणि स्वसुख बघणारे आहोत? आम्हाला देण्यात आलेला वेळ, पैसा आणि देणग्या सातत्याने आमच्या भोवतीच्या खर्या गरजा भागवतात का? कारण जगातील मनुष्ये, त्यांच्याजवळ जे आहे ते त्यांचा देव असल्यामुळे, ते जे प्राप्त करतात ते त्याची उधळण भयकंररीत्या करतात. ज्यांचा देव स्वर्गात आहे, ते मात्र त्यांच्या समृद्धीचे दैवत्व मागत नाहीत, ते त्यांची मिळकत सैल धरतात आणि विनामुल्य वाटतात. त्यांना माहीत आहे की देवामध्ये, “मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे” (इब्री 10:34).
आमच्या जीवनातील लोकांना आम्ही कसे वागवतो ह्याद्वारे सुद्धा आमचे मुल्यमापन केले जाईल, म्हणजे आमच्या जवळ असणारी पत्नी, आमच्या मागे असणारी लेकरं, आमचे शेजारी, आमच्याभोवतीचे मंडळीचे कुटुंब, जे आम्हाला आदर्श मानतात (आणि कदाचित आपणास अहवाल देतात) ते लोक. मनुष्ये अशी इच्छा करून मरत नाहीत की त्यांनी ऑफिसमध्ये अधिक तास घालविले असते किंवा बढतीसाठी अजून कठोर परिश्रम केले असते तर बरे झाले असते. ते नेहमी ही इच्छा घेऊन मरतात की त्यांची घरी किंवा पुढच्या बाकावर बसून वाट बघणार्या लोकांना प्राधान्य दिले असते तर बरे झाले असते. देवाच्या कृपेने, जेथे सर्वात महत्त्वाचे आहे तेथे सर्वात जास्त फलदृप होण्यास झटा. तुम्ही कसे काम करता आणि तुमच्याजवळ काय आहे ह्याद्वारे नव्हे तर तुम्ही कशी प्रीती करता आणि तुम्ही काय देता ह्याद्वारे ओळखले जा.
आणि शेवटी, आम्ही देवाच्या अभिषिक्ताला कसे वागवतो ह्याद्वारे आमचे मुल्यमापन होईल. नाबालाने निवडलेल्या राजाला भुकेले पाठवून दिले, आणि त्या जखमेत अपमानाची भर घातली. तेव्हा पासून देवाने नवीन आणि महान दावीद पाठवलेला आहे. त्याने त्याच्या स्वत:च्या पुत्राला जगात पाठवले, आमच्या शहरात आणि अगदी आमच्या पुढच्या दारात पाठवले आहे. तर मग आम्ही त्याचा स्वीकार कसा करणार? आणि केवळ रविवारी सकाळीच नाही, तर सोमवारच्या दुपारी आणि शुक्रवारच्या संध्याकाळी सुद्धा. नाबालाने दाविदाकडे त्या दिवशी दिले त्यापेक्षा अधिक लक्ष आम्ही त्याच्याकडे देऊ का? आम्ही त्याच्याकडे धाव घेऊन, त्याला प्राधान्य देऊन, त्याची स्तुती करून, त्याला वाटू का? आणि सर्वात शेवटी, एका चांगल्या पतीला वाईट पतीपासून जे वेगळे करते, एका विश्वासू पतीला अविश्वासू पतीपासून जे वेगळे करते, ते म्हणजे, आम्ही येशूला दिलेली वागणूक.
लेख
मार्शल सिगल