तरुण पुरुष त्यांच्या भावी जीवनात कसे असतील, हे प्रामुख्याने त्यांच्या वर्तमान दशेवर अवलंबून असते. तरुणांना ह्या गोष्टीचा विसर पडलेला दिसतो.
मी एक पाळक आहे, आणि पाळकीय सेवेचे माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी मला नेहमी वाचन करावे लागते. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून मी अक्षरशः शेकडो पुस्तके जमवली आहेत. माझे कार्यालय, माझे घर आणि अगदी माझ्या झोपण्याची खोलीसुद्धा पुस्तकांनी भरलेली आहे. काही पुस्तके ही मी खरेदी केल्याचे आठवते आणि काही मला भेटवस्तू म्हणून मिळाल्याचे आठवते. जे. सी. रायल यांचे थॉट्स फॉर यंग मेन (J.C. Ryle’s Thoughts for Young Men) हे पुस्तक मला भेट म्हणून मिळाले किंवा मी ते विकत घेतले, हे मला आठवत नाही, परंतु मला हे माहित आहे: माझ्यात कायमचाच बदल घडवून आणण्यासाठी देवाने त्या पुस्तकाचा उपयोग केला.
ते पुस्तक मी वाचले आणि पुन्हा पुन्हा, वारंवार वाचले. ते मी इतरांना देखील वाचण्यासाठी वारंवार दिले आहे. हे संपूर्ण पुस्तक मला आवडते, विशेष करून, “तरुण त्यांच्या भावी जीवनात कसे असतील हे प्रामुख्याने त्यांच्या वर्तमान दशेवर अवलंबून असते (How Young Men Turn Out Depends Largely on What They are Now.)” हा धडा. किमान वीस वर्षाचा असतांनाच देवाला जाणून घेण्याची आणि त्याला प्रसन्न करण्याच्या मला असलेल्या उत्कट इच्छेमुळेच, मी त्यांत जे वाचले त्याने मला पूर्णपणे बदलून टाकले.
आणखी एक कारण ज्यामुळे मी तुम्हाला ते वाचण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छितो ते आहे: तरुण पुरुष त्यांच्या भावी जीवनात कसे असतील, हे प्रामुख्याने त्यांच्या वर्तमान दशेवर अवलंबून असते. तरुणांना ह्या गोष्टीचा विसर पडलेला दिसतो… . . .! मी हे सर्व का सांगतोय? मी यासाठी सांगतोय कारण सवयींना मोडणे हे कठीण असते. . . . सवयींची मूळे ही खोलवर गेलेली असतात. जर तुम्ही पापाला तुमच्या अंत:करणात घर करू दिले तर ते तुमच्या इच्छेनुसार तुमच्यातून परत निघणार नाही. मग अशी सवय हा तुमचा दुसरा स्वभाव बनून बसतो; अशा सवयीची बंधने जसा “तीनपदरी दोर सहजपणे तुटत नाही” (उपदेशक ४:१२) त्या प्रमाणे घट्ट जखडलेली असतात … सवयी ह्या झाडाप्रमाणे वयानुसार बळकट होत जातात. एक लहान मूल एखादे झाड रोपटे असताना वाकवू शकते; परंतु पूर्णपणे वाढलेल्या झाडाला शंभर माणसे मिळूनही उपटून काढू शकत नाहीत. चांगल्या किंवा वाईटाच्या सवयी तुमच्या अंतःकरणात दिवसेंदिवस बळकट होत जातात. तुम्ही प्रतिदिवशी एकतर देवाच्या जवळ जाता किंवा त्यापासून आणखी दूर होत जाता. दरवर्षी तुम्ही पश्चात्ताप न करता राहिलात, तर तुम्हाला स्वर्गापासून विभक्त करणारी भिंत अधिक उंच आणि रुंद होत जाते; ज्या खाडीला तुम्हाला पार करायचे असते ती अधिक खोल आणि अफाट होत जाते. दिवसेंदिवस पापात रेंगाळत राहिल्यामुळे अंत:करण कठीण करून टाकणाऱ्या परिणामाची भीती बाळगा! ह्याबद्दल आत्ताच काहीतरी करण्याची वेळ आली आहे. (जे. सी. रायल, थॉट्स फॉर यंग मेन पृष्ठ 15, 17-18)
रायल यांच्या लिखाणाद्वारे, देवाने माझ्यामध्ये दोन उत्कंठा प्रज्वलित केल्या ज्या माझ्या पवित्र ख्रिस्ती वाटचालीत सवयीं म्हणून विकसित होत गेल्या – पहिली उत्कंठा होती, माझ्या पापाविषयी योग्य ते भय धरणे, आणि दुसरी उत्कंठा होती, देवाला संतुष्ट करण्याची तळमळ.
पापी सवयींपासून पळ काढा
जीवन हे दिशादर्शक असते, आणि चुकीच्या मार्गाने चालणे म्हणजे पापात खोलवर आणि खोलवर फसत जाणे. मला, हरवून जाण्याच्या भीतीने घाबरलेल्या एका लहान मुलाप्रमाणे, माझ्या बापाच्या हातातून हात निसटून जाण्याची आणि त्याच्यापासून दूर जाऊन पापात जाण्याची भीती वाटायची. देवाने रायल यांच्या विचारांद्वारे मला मूर्खपणापासून दूर राहण्याच्या आणि शहाणपणाचा, जे देवाचे भय बाळगल्याने प्राप्त होते, शोध घेण्याच्या सवयींना विकसित करण्यास प्रवृत्त केले.
“पवित्र सवयी ही ती कृपेची साधने आहेत जी देवावरील तुमच्या प्रेमाच्या ज्योतिला प्रज्वलित करतात आणि तुमच्यावर असलेल्या त्याच्या प्रेमाला सतत तुमच्या डोळ्यांसमोर ठेवतात.”
देवाच्या कृपेने, मी खरे पारदर्शक असे नाते आणि मैत्री विकसित केली ज्यामध्ये जबाबदारी अपेक्षित होती आणि ती पारही पाडली जायची. माझ्या पूर्व-आयुष्यात ज्या ज्या पापी सवयी होत्या, त्यांच्याशी तडजोड करण्याऐवजी, त्यापासून दूर पळून जाण्यासाठी देवाने माझे हृदय उत्तेजित केले. त्याने मला वयस्कर आणि ज्ञानी ख्रिस्ती लोकांकडून सल्ला घेण्यास, शोधण्यास आणि त्यांचे ऐकण्यास माझे मार्गदर्शन केले.
हा लेख वाचणारे तुम्ही जर वयस्कर पुरुष किंवा वयस्कर स्त्री असाल, तर मी तुम्हाला प्रोत्साहित करेल की तुम्ही तरुण पुरुष आणि तरुण स्त्रियांचा शोध घ्यावा आणि त्यांना ह्या सत्याचे शिक्षण द्यावे. आपल्या आत्म्याचे सार्वकालिक कल्याण हे देवाच्या कृपेने पापाशी झुंज देण्यावर अवलंबून आहे, त्यांच्या आहारी जाणे आणि मग असे गृहीत धरणे की पाप करण्यासाठी देवच परवानगीची कृपा पुरवितो, यावर ते अवलंबून नाही. (रोम. ६:१-२; १ थेस्स. ४:१-८). सैतान प्रत्येक तरुण विश्वासणाऱ्याच्या कानात खोटी फुत्कार मारतो की, देवाचे नियम हे खूप कठोर आहेत आणि पाप इतके आनंददायक आहे की ज्याला तुम्ही नाकारू शकत नाही. त्यांना जे खरे आहे ते सांगा! पाप गुलाम बनवते आणि मृत्यूकडे नेते, परंतु ख्रिस्ताद्वारे देवाला जाणून घेतल्याने आपल्याला कोणत्याही ऐहिक लाभापासून होणार नाही असे संपुर्ण समाधान प्राप्त होईल (फिलि. 3:8). म्हणून, पापाद्वारे मृत्यूकडे घेऊन जाणाऱ्या सवयींना जीवे मारणाच्या बाबतीत एखादी व्यक्ती अतिवादी आहे असे आपण म्हणू शकत नाही (मत्त. ५:२९-३०; कलस्सै ३:५).
पवित्र सवयी विकसित करा
देवाने मला पवित्र सवयींच्या पवित्रीकरण करण्याऱ्या शक्तीविषयी शिकवण देण्यासाठी देखील रायल यांचा उपयोग केला. आम्ही आमच्या सर्व नातेसंबंधांमध्ये ह्या सक्रीय शक्तीला अनुभवतो. आपण आपल्या सवयींद्वारे आणि त्यांच्या व्यवहारिक उपयोगाच्या द्वारे एखाद्या व्यक्तीच्या जवळीकतेत राहतो किंवा तिच्यापासून दूर जातो. पवित्र सवयी ही ती कृपेची साधने आहेत जी देवावरील तुमच्या प्रेमाच्या ज्योतिला प्रज्वलित करतात आणि तुमच्यावर असलेल्या त्याच्या प्रेमाला सतत तुमच्या डोळ्यांसमोर ठेवतात. सोप्या भाषेत सांगायचे ठरले तर, देवाने मला त्याच्या पवित्र करणाऱ्या कृपेने त्याचा अनुभव घेण्याची एक उत्कट इच्छा दिली.
रोज सकाळी उठल्याबरोबर प्रार्थना करण्याची सवय मी विकसित केली. माझ्या कामकाजाचे वेळापत्रक हे कितीही व्यस्त असले तरीही बायबल वाचण्यासाठी मी स्वतःला वचनबद्ध केले. त्यामुळे शाळेचे मोठे प्रोजेक्ट्स जरी बाकी असले, साहमाही परीक्षा जरी जवळ आलेल्या असायच्या आणि शेवटची वार्षिक परीक्षा जरी तोंडावर आलेल्या असायच्या, तरी देखील, मी जेवणाच्या सुट्टीत लायब्ररीमध्ये माझे बायबल वाचायचो. जस-जसे आठवड्यांचे महिन्यांत, महिन्यांचे वर्षांमध्ये आणि आता वर्षांचे दशकात रुपांतर झाले, माझ्या वचनबद्धतेचे आयुष्यभराच्या सवयींमध्ये रूपांतर झाले. देवाच्या कृपेने, त्या पवित्र सवयींमुळे मी देवाच्या आणि तो माझ्यावर किती प्रेम करतो याविषयीच्या ज्ञानात वाढत गेलो.
“ख्रिस्ती लोक त्यांच्या जीवनात सहभागितेला एक आधारभूत सवय बनविण्याकडे किती सहजपणे दुर्लक्ष करतात ह्याचे मला आश्चर्य वाटते.”
रविवारच्या सकाळच्या उपासनेव्यतिरिक्त, मी संडे स्कूलला आणि बुधवारच्या शास्त्र अभ्यासाला देखील उपस्थित राहण्यासाठी स्वतःला वचनबद्ध केले. तिथे मी माझ्या बायबलचा अभ्यास कसा करावा हे शिकलो. मी ईश्वरविज्ञान शास्त्र शिकलो. बायबलच्या महत्त्वाच्या पुस्तकांविषयी शिकलो. व्यावहारिक सैद्धांतिक सेवाकार्याविषयी शिकलो, जसे की सुवार्ता कशी सांगावी आणि एका लहान समुहाला कसे शिकवावे किंवा त्यांचे नेतृत्व हे कसे करावे. ख्रिस्ती लोक त्यांच्या जीवनात सहभागितेला एक आधारभूत सवय बनविण्याकडे किती सहजपणे दुर्लक्ष करतात, ह्याचे मला आश्चर्य वाटते.
२ तीमथ्य २:२२ विचारात घ्या: “तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि….नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती, शांती ह्यांच्या पाठीस लाग.” एकीकडे, पौल तीमथ्याला एक तरुण म्हणून तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळून जाण्याची आणि दैवी सद्गुणांच्या पाठीस लागण्याची आज्ञा देतो. आणि त्यानंतर तो तीमथ्याला हे सर्व एकाकीपणे करायला नव्हे, तर “जे शुद्ध मनाने प्रभूचा धावा करतात” त्यांबरोबर असे करण्यास प्रोत्साहित करतो. तो नेमके काय म्हणत आहे हे तुम्ही पाहता. देवभक्त विश्वासूंसोबत सहभागितेत राहण्यास, जी तुम्हाला पापाविरुद्ध लढण्यास आणि देवभक्तीचा पाठलाग करण्यास मदत करते, अयशस्वी होणे म्हणजे कृपेचे एक शक्तिशाली साधन गमावण्याची ताठर सवय बाळगणे होय. तरुण वाचकहो, जसे की मी माझी साक्ष रायल यांनी केलेल्या उपदेशासोबत जोडतो, मी अशी प्रार्थना करतो की तुम्ही सुज्ञ व्हावे आणि ऐकावे.
एका मरण पावलेल्या माणसाकडून शिका
या सवयींबद्दल मी जे काही सांगत आहे ते एक रहस्यमय किंवा कठीण असे अंतर्ज्ञान नाही. आपल्याला पवित्र करणारी ही कृपेची साधने, जे ख्रिस्तामध्ये बालक आहेत त्यांसाठी समजण्यास आणि लागू करण्यास खूप क्लिष्ट आहेत, अशी अपेक्षा आपण का ठेवावी? परमेश्वर आम्हाला त्याच्या मुलांप्रमाणे वागवतो आणि त्यानुसार आपले पोषण करतो जेणेकरून आपली वाढ व्हावी. रायल आपल्या तरुण वाचकांना तेच करण्यास प्रोत्साहित करतात जे पवित्र शास्त्रात नमूद प्रारंभीच्या विश्वासणाऱ्यांनी देखील केले, “ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत.” (प्रेषितांची कृत्ये २:४२).
ज्यावेळेस मी त्यांचे जीवन बदलणारे पुस्तक पहिल्यांदा वाचले त्यावेळेस रायलला प्रभूकडे जाऊन शंभर वर्षे उलटली होती. त्यामुळे UCLA मधील धर्मनिरपेक्ष शाळेच्या वर्गात बसलेल्या ह्या नव्याने तारण पावलेल्या शहरी मुलाला शिष्य करण्यासाठी देवाला त्याच्या उत्कटतेने तयार केलेल्या वचनांचा वापर करण्यात अडथळा आला नाही. ख्रिस्ताला यायला जर आणखी शंभर वर्षे लागली, तर मला खात्री आहे की, बाहेर आणखी असंख्य तरुण बॉबी स्कॉट्स हे मिळून येतील ज्यांना तरुण विश्वासणारे म्हणून, त्यांच्या पापाविषयीच्या दोषारोपणाचा सामना करावा लागेल आणि आवर्जून उपदेश करावे लागतील. मी अशी प्रार्थना करतो की, तरुणांना या पवित्र सवयींकडे बोलावण्यास त्याच्यासोबत तुम्ही आणि मी विश्वासनिय राहू.