ArchivesSolid Joys

13 November : तुमचे अंतःकरण कठोर करू नका

Alethia4India
Alethia4India
13 November : तुमचे अंतःकरण कठोर करू नका
Loading
/

आणि ‘शपथ वाहून’ तो (परमेश्वर) कोणाला म्हणाला की, ‘तुम्हीं माझ्या विसाव्यात येणार नाहीं’? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाहीं? तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की, अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाहीं. (इब्री 3:18-19)

जरी इस्राएली लोकांनी तांबड्या समुद्राचे पाणी दुभागतांना पाहिले आणि ते कोरड्या भूमीवरून चालत गेले, तरीही ज्या क्षणी त्यांना तहान लागली, त्या क्षणी त्यांची अंतःकरणें परमेश्वराविरुद्ध कठोर झालीं आणि तो त्यांची काळजी घेईल असा भरवंसा त्यांनी केला नाहीं. ते त्याच्याविरुद्ध आरडाओरड करू लागले आणि म्हणाले की मिसर देशातील जीवन चांगले होते. 

अंत:करणाच्या अशा कठोरतेवर आळा घालणेंच इब्रीकरांस पत्र लिहिण्या मागचा हेतू होता. किती तथाकथित ख्रिस्ती परमेश्वरावर विश्वासाची सुरूवात करतात. ते ऐकतात की त्यांची पापे क्षमा केली जाऊ शकतात आणि नरकापासून त्यांचा बचाव होऊन ते स्वर्गात जाऊ शकतात. आणि ते म्हणतात: “यांत तर मी काहींच गमावत नाहीं? मग मी विश्वास ठेवायला काय जाते.”

मग एका आठवड्यात किंवा महिन्यात किंवा वर्षात अथवा दहा वर्षानंतर, परीक्षा येते – अरण्यात पाणी नसण्याचा काळ. मन्ना खाऊन-खाऊन आलेला किळस. आणि मिसर देशातल्या क्षणीक सुखांसाठीं मनांत गुप्तपणें वावरणारी इच्छा, जसे गणना 11:5-6 म्हणते, “मिसर देशात आम्हांला मासे फुकट खायला मिळत असत त्याची आठवण आम्हांला येते. त्याचप्रमाणें काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण ह्यांचीही आम्हांला आठवण येते; पण आता आमचा जीव सुकून गेला आहे; येथे ह्या मान्न्याशिवाय आमच्या दृष्टीस कांहींच पडत नाहीं.”

या परिस्थितीत राहणें भयावह आहे – ख्रिस्ताठायीं आणि त्याच्या वचनात आणि प्रार्थनेत आणि उपासनेत आणि सुवार्ता प्रचारात आणि परमेश्वराच्या गौरवासाठीं जगण्यात आता तुम्हांला कुठलीही रूचि वाटत नाहीं असें तुम्हांला दिसून येते. आत्म्याच्या गोष्टींपेक्षा या जगाची क्षणिक सुखे जास्त आकर्षक आहेत असें आता दिसून येते.

जर ही तुमची परिस्थिती असेल, तर मी तुम्हांला विनंती करतो की या वचनात पवित्र आत्मा जे बोलत आहे ते तुम्हीं ऐकावे. “ते अविश्वासामुळे प्रवेश करू शकले नाहींत!” परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. तुमचे अंतःकरण कठोर करू नका. पापाच्या धोक्याबाबत जागृत व्हा. तुम्हीं पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक ख्रिस्त येशू ह्याच्याकडे लक्ष लावा, आणि त्याच्यामध्ये तुम्हीं जो पत्कर केलेला आहे वा जी आशा धरली आहे ते दृढ धरून राहा.

आणि जर तुम्हीं अजूनही देवावर विश्वास ठेविलेला नसेल, तर त्याच्यावर तुमची आशा धरा. पापापासून आणि स्वतःवर अवलंबून राहण्यापासून मागे फिरा आणि थोर तारणकर्त्यावर तुमचा विश्वास असू द्या. यां गोष्टी यासाठीं लिहिण्यात आल्या आहेत की तुम्हीं विश्वास धरावा आणि धीर धरावा, आणि जिवंत राहावें.

12 November : सैतान हा देवाच्या संकल्पानुसार कसे कार्य करतो.

Alethia4India
Alethia4India
12 November : सैतान हा देवाच्या संकल्पानुसार कसे कार्य करतो.
Loading
/

पाहा, ‘ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.’ तुम्हीं ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्हीं पाहिला आहे; ह्यावरून ‘प्रभू फार कनवाळू व दयाळू’ आहे हे तुम्हांला दिसून आले. (याकोब 5:11)

सर्व रोग आणि अपंगत्वामागे निर्णायक भूमिका ही परमेश्वराची असते. यात सैतानाचा सहभाग नाहीं असें नाहीं – विध्वंसकारक हेतूंमध्ये कुठल्याना कुठल्याप्रकारे तो संभवतः नेहमीच सहभागी असतो (प्रेषित 10:38). पण त्याचे सामर्थ्य निर्णयाक नाहीं. तो परमेश्वराच्या परवानगीवाचून कांहींएक करू शकत नाहीं.

ईयोबाचा आजारपणाद्वारें ज्यां ज्यां गोष्टीं सूचित होतांत त्यांपैकी एक ही आहे. वचनात हे स्पष्टपणें सांगण्यात आले आहे की जेव्हा ईयोबावर आजारांचा मारा झाला तेव्हा, “सैतानाने ईयोबाला मोठमोठ्या गळवांनी नखशिखान्त अतिशय पिडले” (ईयोब 2:7). त्याच्या पत्नीने त्याला आग्रह केला की त्यानें परमेश्वराला शाप देऊन मरून जावे. पण ईयोब म्हणाला, “देवापासून सुखच घ्यावे, आणि दुःख घेऊ नये काय?” (ईयोब 2:10). आणि पुन्हा या पुस्तकाचा परमेश्वर प्रेरित लेखक असें म्हणून ईयोबाची प्रशंसा करतो (जसे त्यानें 1:22 मध्ये केले), “ह्या सर्व प्रसंगी ईयोबाने आपल्या वाचेने कांहीं पाप केले नाहीं.”

दुसऱ्या शब्दात सांगायचे तर : सैतानावर परमेश्वराच्या प्रभुत्वाचा हा योग्य दृष्टिकोण आहे. सैतान वास्तविक आहे आणि आमच्या संकटांत त्याचा हात असू शकतो, पण शेवटचा हात नाहीं, आणि निर्णायक हात तर नाहीं. याकोब स्पष्ट करतो की ईयोबाच्या सर्व कष्टांत परमेश्वराचा चांगला हेतू होता: “पाहा, ‘ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.’ तुम्हीं ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्हीं पाहिला आहे; ह्यावरून ‘प्रभू फार कनवाळू व दयाळू’ आहे हे तुम्हांला दिसून आले” (याकोब 5:11).

म्हणून जरी इयोबाला पीडण्यांत सैतानाचा हाथ होता, तरी अंतिम हेतू परमेश्वराचा होता, आणि तो “कनवाळू व दयाळू” होता.

हाच धडा आपल्याला 2 करिंथ 12:7 वरून शिकावयास मिळतो, जेथे पौल म्हणतो की त्याच्या शरीरातील काटा “सैतानाचा एक दूत” होता आणि त्याच्या स्वतःच्या पवित्रतेच्या निमित्ताने तो देण्यात आला होता – त्यानें फार चढून जाऊ नये म्हणून. “प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजें मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे!”

पण लक्षांत घ्यां, आपण हे क्लेश भोगतो ते आपण क्लेशात नम्र व्हावें हा सैतानाचा हेतू नसतो. म्हणून, हेतू हा परमेश्वराचा असतो. याचा अर्थ येथे हा आहे की परमेश्वराचे उत्तम हेतू पौलाच्या जीवनात साध्य करण्यासाठीं परमेश्वर सैतानाचा उपयोग करीत आहे. खरे म्हणजें, परमेश्वराच्या निवडलेल्यांच्या बाबतींत, सैतान आमचा नाश करू शकत नाहीं, आणि शेवटी परमेश्वर त्याचे सर्व हल्ले आमच्यासाठीं सर्व कल्याणार्थ व्हावें म्हणून त्याच्यावरच उलथून टाकतो.

11 November : आपण तर त्याचे घर आहोत

Alethia4India
Alethia4India
11 November : आपण तर त्याचे घर आहोत
Loading
/

कारण ज्या मानाने घर बांधणाऱ्याला सबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे त्या मानाने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे. कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्वकांहीं बांधणारा देवच आहे. जे पुढे विदित होणार होते याविषयीच्या साक्षीसाठीं ‘त्याच्या सबंध घरात मोशे सेवक ह्या नात्यानें विश्वासू होता.’ ख्रिस्त तर ‘देवाच्या घरावर’ नेमलेला पुत्र ह्या नात्यानें विश्वासू होता, आणि आपण आपला भरवसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहोत. (इब्री 3:3-6)

जे लोक येशू ख्रिस्ताठायीं अभिमान बाळगतात आणि त्याची आशा धरतात ते परमेश्वराचे घर आहेत. याचा अर्थ असा की येशू हा  केवळ मोशेच्या काळांत किंवा जेव्हां तो ह्या पृथ्वीवर प्रकट झाला केवळ त्यां दिवसातच नव्हे – तर अगदी आज, म्हणजें संप्रतकाळीही आपला उत्पन्नकर्ता, आपला स्वामी, आपला शासक आणि आपल्याला सर्वकांहीं पुरविणारा आपला प्रदाता (पोशिंदा) आहे.

येशूला या घराचा “बांधणारा” म्हटलेले आहे. मोशे हा ‘बांधणारा’ नव्हता. तो घराचा सदस्य होता. म्हणून असें म्हटलेले आहे की, “येशू मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे – ज्या मानाने घर बांधणाऱ्याला सबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे त्या मानाने.”  म्हणून मोशे, घराचे नेतृत्व करण्याच्या बाबतींत, आणि घरास परमेश्वराचे वचन देण्याच्या बाबतींत महान असला, तरीही तो घराचा केवळ एक सदस्य होता. पण घर येशूनें बांधले.

म्हणून जर आपण येशूठायीं अभिमान बाळगतो आणि येशूठायीं आशा धरतो तर आपण घर आहोत, आणि येशू हा आपला घर बनविणारा आणि स्वामी आणि शासक आणि पोशिंदा आहे. तो त्याच्या घराचा नाश होऊ देत नाहीं किंवा ते उध्वस्तही होऊ देत नाहीं.

मग लेखक आपले कल्पनाचित्र बांधणारा आणि घर या पासून, पुत्र आणि सेवक याकडे वळवतो. ”त्याच्या सबंध घरात मोशे सेवक ह्या नात्यानें विश्वासू होता.’ ख्रिस्त तर ‘देवाच्या घरावर’ नेमलेला पुत्र ह्या नात्यानें विश्वासू होता.” म्हणून ख्रिस्त त्यानें बनविलेल्या घराचा भाग बनला – घराण्याचा भाग बनला. पण तरीही, त्याचा आदर मोशेपेक्षा कितीतरी अधिक वरचा आहे. मोशे सेवक होता. ख्रिस्त पुत्र आहे. वारस आहे.

आणि आपण या घराचे सदस्य आहोत. इब्री 3:6: “आपण आपला भरवसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहोत.” सर्वप्रकारे, आपण मोशेचा आदर करावा या आणि जे त्याचे आहे ते आपण त्यास द्यावे. परंतु इब्रीकरांस लिहिलेल्या संपूर्ण पुस्तकांचा मुद्दा हा आहे : ख्रिस्त हा अधिक श्रेष्ठ आहे. प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ. तो परमेश्वराच्या लोकांच्या घराचा बांधणारा आहे. परमेश्वराच्या लोकांच्या घरात तो पुत्र आहे. आपण मोशेचा आदर करू या. पण आपण येशूची उपासना करू या – जो आमचा कर्ता, आमचा बंधू आहे.

10 November : तुमची भीती दूर करा

Alethia4India
Alethia4India
10 November : तुमची भीती दूर करा
Loading
/

मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन. (स्तोत्र 56:3)

आपल्यां सर्व चिंता ह्यांचे मूळ आमचा अविश्वास आहे या सत्याचे एक संभाव्य स्पष्टीकरण अशाप्रकारे असूं शकते: “मला जवळजवळ दररोज चिंतेच्या भावनांस तोंड द्यावे लागते; आणि म्हणून मला असें वाटते की परमेश्वराच्या कृपेवर माझा विश्वास पूर्णतः अपुरा आहे. म्हणून माझे खरोखर तारण झालें आहे याची मला खात्रीच पटत नाहीं.”

या भीतीला माझे हे उत्तर आहे : समजा तुम्हीं कारस्पर्धेत भाग घेतला आणि तुमचा शत्रू, ज्याला असें वाटते की तुम्हीं तुमची ही शर्यत पूर्ण करू नये, तुमच्यां कारच्या विंडशील्डवर चिखल फेकतो. आणि तात्पुरते तुमचे लक्ष तुमच्यां लक्ष्य रेषेवरून विचलित होऊन जाते आणि तुमची कार अचानक दुसऱ्या दिशेने जाऊ लागते, तेव्हां त्याचा अर्थ असा होत नाहीं की तुम्हीं तुमची शर्यत अर्ध्यावर सोडणार आहात.

आणि निश्चितच याचा अर्थ असाहि नाहीं की तुम्हीं चुकीच्या रेसट्रॅकवर आहात. नाहीं तर, तुमच्यां प्रतिस्पर्धीने –  तुमच्यां शत्रूने – तुम्हांला मुळीच अडथळा आणला नसता. याचा अर्थ असा आहे की तुम्हांला ताबडतोब तुमच्यां विंडशील्डचे वाइपर सुरू करायचे आहे.

जेव्हा तुमच्यां मनात चिंता आक्रमण करते आणि परमेश्वराचे गौरव आणि त्यानें आमच्यासाठीं जे वैभवी भविष्य योजून ठेविलें त्यापासून आपली दृष्टी अंधुक होऊ लागते, तेव्हां त्याचा अर्थ असा होत नाहीं की आपण विश्वासहीन आहोत, अथवा हा की आपण स्वर्गात जाणार नाहीं. याचा अर्थ हा आहे की आपल्या विश्वासावर आक्रमण केलें जात आहे.

पहिला प्रहार होताच, परमेश्वराच्या अभिवचनांवरील आमचा विश्वास डळमळू शकतो आणि विचलित होऊ शकतो. परंतु आपण रेसट्रॅकवर राहून अंतिम रेखा पार करणार किंवा नाहीं हे यावर अवलंबून आहे की, कृपेने, आपण प्रतिरोधाची प्रक्रिया सुरू केली आहे किंवा नाहीं – आपण चिंतेच्या अविश्वासाविरुद्ध प्रतिघात करित आहों किंवा नाहीं. आपण विंडशील्ड वाइपर सुरू करणार आहोत का?

स्तोत्र 56:3 म्हणते, “मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन.”

लक्ष द्या: हे वचन असं म्हणत नाहीं की “माझा भीतीशी कधीही संघर्ष होत नाहीं.” भीती आक्रमण करते, आणि एक सुयुद्ध सुरू होते. म्हणून खऱ्या विश्वासणाऱ्यांस कुठलीही चिंता नसते असें पवित्र शास्त्र गृहित धरत नाहीं. त्याऐवजी, पवित्र शास्त्र आम्हास सांगते की जेव्हां चिंता आम्हांवर आक्रमण करतांत तेव्हां आम्हांला कसें सुयुद्ध करायचे आहे. ते आम्हांला सांगते की विंडशील्ड वाइपर कसे सुरू करावे.

9 November : इतिहासाच्या शेवटाविषयी आश्‍चर्यपात्र  होणें.

Alethia4India
Alethia4India
9 November : इतिहासाच्या शेवटाविषयी आश्‍चर्यपात्र  होणें.
Loading
/

संकट सोसणाऱ्या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणें, हे देवाच्या दृष्टीनें न्याय्य आहे… म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेंसहित प्रकट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहींत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहींत त्यांचा तो सूड उगवील. आपल्या पवित्र जनांच्या ठायीं गौरव मिळावा म्हणून, आणि त्या दिवशी विश्वास ठेवणार्‍या सर्वांच्या ठायीं आश्‍चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्हीं दिलेल्या साक्षीवर तुम्हीं विश्वास ठेवला आहे. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल (2 थेस्सल 1:7-10).

प्रभू येशूनें अभिवचन दिल्याप्रमाणें जेव्हां तो या जगांत परत येईल, त्यावेळी ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला नाहीं त्यांच्याविषयी पौल म्हणतो, “त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.” हे एक असें भयानक दृश्य असणार आहे कीं ज्यामुळें हे सत्य ऐकणाऱ्या सर्वांचा थरकांप उडायला पाहिजें.

आणि हो, आम्हीं जे विश्वास ठेवणारे आहों त्यां आम्हांला यांपासून किती सांत्वन मिळायला पाहिजें आणि कोणती गोष्ट पणास लागली आहे याविषयी आम्हांला किती गंभीर व्हावयाला पाहिजें. आह, जे सुवार्तेवर विश्वास ठेवीत नाहींत आणि सुवार्ता ज्यांच्या कानीही पडत नाहीं अशा लोकांविषयी आपली अंतःकरणें किती कळवळ्याने भरून गेलीं पाहिजेंत.

पण आमच्या सर्व संकटांत आम्हीं धीर धरावा म्हणून येथे पौल आम्हांला उत्तेजन आणि आशेचे दोन शब्द देतो. “संकट सोसणाऱ्या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणें, हे देवाच्या दृष्टीनें न्याय्य आहे.” जर आपल्याला इतिहासाच्या शेवटाजवळ दुःखाची भयानक तीव्रता अनुभवास येत असेल, तर परमेश्वराचे वचन हे आहे: खंबीर असां: तारण जवळ आहे. तुमची संकटे शेवट हा नाहीं. आणि बाह्यरूपाने सामर्थ्यवान दिसणारे तुमचें शत्रू त्या दिवसावर पश्चाताप करून आक्रांत करतील ज्या दिवशी त्यांनी प्रभूच्या लोकांस स्पर्श केला होता.

पण मग उत्तेजन आणि आशेचा उत्तम शब्द येतो. प्रभू आल्यावर आपल्याला केवळ विश्रांती देणार नाहीं, तर आपल्याला सर्वप्रथम ज्यासाठीं उत्पन्न करण्यात आलें आहे, त्याचा सर्वात मोठा अनुभवहि आम्हांस प्राप्त होईल. आपण त्याचे गौरव पाहूं, आणि आपल्यामध्यें त्याचा गौरव होईल यासाठीं कीं सर्व जगानें ते पाहावें हे जाणून आपण आश्चर्यपात्र होऊं.

वचन 10: “आपल्याला पवित्र जनांच्या ठायीं गौरव मिळावा म्हणून, आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठायीं आश्चर्यपात्र व्हावें म्हणून तो येईल,” आपण आश्चर्यपात्र व्हावें यासाठींच आपल्याला घडविण्यात आलें होते. ज्याला वधस्तंभावर खिळण्यांत आले, जो मरणातून पुन्हां उठला, व जो परत येणार आहे असा जो गौरवी राजा, येशू ख्रिस्त ह्याच्यापेक्षा अधिक अद्भुत कांहींही नाहीं आणि कोणीही नाहीं. तो त्याचे गौरव प्राप्त करील, आणि आम्हांला परिपूर्ण, पापरहित, असें होण्याच्या आनंदाची प्राप्ती होईल व आपण सर्वात अद्भुत अशा गोष्टीचे आश्चर्यपात्र होऊं जिचा कधीच शेवट होणार नाहीं.

8 November : ज्या गोष्टीचा आम्हीं आनंद घेतो, तिचा आम्हीं आदरहि करतो

Alethia4India
Alethia4India
8 November : ज्या गोष्टीचा आम्हीं आनंद घेतो, तिचा आम्हीं आदरहि करतो
Loading
/

“तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहींस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहींस, शब्बाथ आनंददिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असें म्हणून त्याचा आदर करशील; व त्या दिवशी आपलें कामकाज करणार नाहींस, आपला धंदा चालवणार नाहींस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहींस. तर तू परमेश्वराच्या ठायीं हर्ष पावशील; तू देशाच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील, असें मी करीन” (यशया 58:13)

देवाचे गौरव न करता देवाचा शोध घेणें शक्य आहे. जर तुम्हांला असें वाटते कीं तुम्हीं देवाचा जो शोध घेतां त्यांत त्याचे गौरव व्हावें, तर मग तुम्हीं त्याचा शोध घ्यावा तो तुम्हांला त्याच्या सहभागितेचा आनंद मिळावा म्हणून घ्या.

याचे उदाहरण म्हणून शब्बाथावर विचार करा. देवाचे लोक देवाचा पवित्र दिवस न पाळतां आपल्याच सुखविलासाचा शोध घेऊं पाहतांत म्हणून तो त्यांची कानउघाडणी करतो. “तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहींस. माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहींस.” पण त्याच्या बोलण्याचा अर्थ काय? प्रभूच्या दिवशी आपण आपल्या आनंदविलासात मग्न होऊ नये हा त्याचा अर्थ आहे का? नाहीं, कारण पुढे तो म्हणतो, “शब्बाथ आनंददिन आहे.” आणि 14 व्या वचनात तो म्हणतो, “तू त्याचा आदर करशील.” म्हणून तो त्यांना ज्या गोष्टीसाठीं दोष लावतोय ती ही कीं ते शब्बाथ दिवशी आपल्यां परमेश्वराच्या वैभवाठायीं आणि विश्रांतीठायीं आणि पावित्र्याठायीं, ज्याचा तो दिवस द्योतक आहे, हर्ष करण्याऐवजी स्वतःच्या कामकाजात रममाण होत आहेत.

ते पूर्णानंदाचा शोध घेतांत या गोष्टीसाठीं तो त्यांची कान-उघाडणी करित नाहींये. तर तें किती वायफळ गोष्टींत त्याचा शोध घेताहेत या साठीं तो त्यांची कानउघाडणी करत आहे. सी. एस. लुईस यांनी म्हटल्याप्रमाणें, “आम्हीं अगदी क्षुल्लक गोष्टींत आनंदी होतो.” त्यांनी आपला आनंद व समाधान यांचा शोध जगीक गोष्टींमध्यें घेऊ पाहिला आहे, आणि त्यामुळे त्यांनी त्यां गोष्टींचा परमेश्वरापेक्षा अधिक आदर केला आहे.

लक्ष द्या कीं शब्बाथाला “आनंद दिन” म्हणणें हे प्रभूच्या पवित्र दिवसाला “सन्मान्य दिन” म्हणण्यासारखे आहे. जर तू “शब्बाथ आनंददिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असें म्हणून त्याचा आदर करशील.” याचा अर्थ असा आहे कीं तुम्हांला ज्या गोष्टीमध्यें आनंद वाटतो तुम्हीं त्यां गोष्टींचा आदर करता. किंवा तुम्हांला ज्या गोष्टीमध्यें आनंद वाटतो त्यांचा तुम्हीं गौरव करता.

परमेश्वरामध्यें आनंद घेणें आणि परमेश्वराचा गौरव करणें ह्यां दोन्ही गोष्टीं एकच आहेत. त्याचा सनातन सत्संकल्प आणि आपला सनातन आनंद उपासनेच्या अनुभवात एक होतो. परमेश्वराचा दिवस यासाठींच आहे. खरोखर, संपूर्ण जीवनाचा उद्देश्य हाच आहे.

7 November : देवाची प्रीति सशर्त आहे का?

Alethia4India
Alethia4India
7 November : देवाची प्रीति सशर्त आहे का?
Loading
/

“तो अधिक ‘कृपा करतो;’ म्हणून शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.” म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजें तो तुमच्यांपासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजें तो तुमच्यांजवळ येईल.” (यशया 58:13)

याकोब येथें आम्हास शिकवतो कीं असा एक गोड किंवा मौल्यवान अनुभव आहे ज्याला “अधिक कृपा” पावणें आणि देवाचे “आमच्याजवळ येणें” असें म्हटलें जाते. नक्कीच हा एक अद्भुत अनुभव आहे – अधिक कृपा आणि देवाची विशेष अशी जवळीक. पण मी विचारतो : परमेश्वराच्या प्रीतिचा हा अनुभव बिनशर्त आहे का? नाहीं. असें नाहीं. आमचे स्वतःला लीन करणें आणि देवाजवळ येणें या दृष्टीने प्रीतिचा हा अनुभव सशर्त आहे. परमेश्वर “लीनांवर कृपा करतो… देवाजवळ या म्हणजें तो तुमच्यांजवळ येईल.”

देवाच्या प्रीतिचे अनमोल असें अनुभव आहेत ज्यांच्या प्राप्तीसाठीं आपणास गर्वाशी लढा देण्याची, लीन होण्याची आणि पूर्ण मनाने देवाच्या जवळ येण्याची गरज आहे. ह्यां अटी आहेत. म्हणजें, अशा अटी ज्यां पूर्ण व्हाव्यांत अशी कृति स्वतः देवच आमच्यामध्ये साधून देतो. पण तरी त्यां अशा अटी आहेंत ज्या आमच्यांत पूर्ण होतांत.

जर हे खरे असेल, तर माझ्या चिंतेचे प्रमुख कारण म्हणजें हे कीं देवाची प्रीति ही पूर्णपणें बिनशर्त आहे याविषयीची अशास्त्रीय आणि पवित्र शास्त्राच्या दृष्टीनें गाफील अशी आश्वासनें लोकांना त्या सर्व गोष्टी करण्यापासून थांबवू शकतांत ज्यां करण्यांस पवित्र शास्त्र त्यांना आज्ञा देते ज्यां पूर्ण केल्यानें त्यांना त्यां सर्व शांतीचा आनंद प्राप्त होतो जो प्राप्त करण्याची त्यांना तळमळ असते. आपण जर लोकांना “अटीविरहित” शांतीचे आश्वासन देण्याचा प्रयत्न करतो, तर आपण कदाचित त्यांना त्यां निरोगी आध्यात्मिक जीवनापासूनच दूर करून बसणार ज्याच उल्लेख पवित्र शास्त्रांत केलेला आहे.

निश्चितच, देवानें आपली प्रीतिने केलेली निवड, आणि ख्रिस्ताच्या मरणाद्वारे देवाची प्रकट झालेली प्रीति आणि त्याच प्रीतिने त्यानें आपल्याला दिलेला नवा जन्म, या सर्व गोष्टीं पूर्णपणें बिनशर्त आहेत या सत्याची आपण उच्च आणि अगदी स्पष्ट स्वरात घोषणा केली पाहिजें, यांत शंका नाहीं.

शिवाय, आपण अथकपणें या सुवार्तेची घोषणा केलीं पाहिजें कीं आमचे नीतिमान ठरविले जाणें हे ख्रिस्ताचे आज्ञापालन आणि त्यानें स्वतःचे केलेलें अर्पण यांवर आधारित आहे, आपल्या कर्मावर नाहीं (रोम 5:19, “कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगानें पुष्कळ जण पापी ठरलें होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनानें पुष्कळ जण नीतिमान ठरतील.”)

परंतु त्यांच बरोबर, आपण पवित्रशास्त्राच्या या सत्याची घोषणाहि करणें आवश्यक आहे कीं जो कोणी स्वतःला आपल्या दैनदिन जीवनांत लीन करतो आणि देवाजवळ येतो, त्याला देवाची कृपा आणि देवाचा जवळीकपणा यांचा परिपूर्ण आणि मधुर अशा आनंदाचा अनुभव प्राप्त होईल.

6 November : एकमेकांवर आनंदानें प्रीति करा

Alethia4India
Alethia4India
6 November : एकमेकांवर आनंदानें प्रीति करा
Loading
/

“हे मनुष्या, बरें काय ते त्यानें तुला दाखवलें आहे; नीतीनें वागणें, आवडीनें दया करणें व आपल्या देवासमागमें राहून नम्रपणें चालणें ह्यांवाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?” (मीखा 6:8)

एखाद्या व्यक्तीला असें सांगण्यात आल्यामुळें कीं जेव्हां त्याला आनंद प्राप्त होतो तेव्हा दुसऱ्या व्यक्तीस आनंदाची प्राप्ती होईल , म्हणून आपण प्रेमास पात्र नाहीं असें कोणालाही कधीही वाटलें नाहीं. आवडीनें दया करणें मला आनंद देतो या आधारावर दयाळूपणाचे समर्थन करत असतांना माझ्यावर कधीही स्वार्थीपणाचा आरोप करण्यात आलेला नाहीं. या उलट, कुरकुर न करता करण्यात आलेंली प्रीतिची कृत्ये अस्सल असतांत.

आणि नाखुशीनें दया करणें चा योग्य पर्याय तटस्थपणें किंवा कर्तव्यबुद्धीनें दया करणें नसून, तर आनंदानें दया करणें हा आहे. अस्सल प्रीतिनें भरलेलें परिपूर्ण अंतःकरण दयाळूपणामध्यें आनंद करते (मीखा 6:8); ते फक्त दया करत नाहीं. ख्रिस्ती पूर्णानंद हे सत्य विचारात घेण्यास भाग पाडते.

“आपण देवावर प्रीति करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हां त्यावरून आपल्याला कळून येते कीं, आपण देवाच्या मुलांवर प्रीति करतो. देवावर प्रीति करणें म्हणजें त्याच्या आज्ञा पाळणें होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहींत. कारण जे कांहीं देवापासून जन्मलेलें आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्यानें जगावर जय मिळवला तो म्हणजें आपला विश्वास.” (1 योहान 5:2-4)

ही वाक्ये उलट् क्रमानें वाचा आणि तर्कावर लक्ष द्या. प्रथम, जेव्हां आपण देवापासून जन्मलेलें असतो, तेव्हां आपल्याला ह्या जगावर जय मिळविण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. देवाच्या आज्ञा कठीण नाहींत या कथनासाठीं पार्श्वभूमी किंवा आधार म्हणून ही गोष्ट आपल्या निदर्शनास आणण्यांत आली आहे (“कारण” या शब्दावर लक्ष द्या).

तर मग, देवापासून जन्मलेलें असल्यामुळेच आम्हास असें सामर्थ्य प्राप्त होते ज्याद्वारें आपण जगाच्या तिरस्कारावर विजय मिळवितो आणि देवाची इच्छा पाळतो. यापुढे आपल्यासाठीं त्याच्या आज्ञा “कठीण” नाहींत, तर त्यां आपल्या अंतःकरणाचे मनोदय व आनंद आहेत. ही परमेश्वराची खरी प्रीति आहे : केवळ आपण त्याच्या आज्ञांचे पालन करतो असें नाहीं, तर आता त्या कठीणहि नाहींत.

मग दुसऱ्या वचनांत असें सांगितलें आहे कीं देवाच्या मुलांवर आपण जी प्रीति करतो तिच्या खरेपणाचा पुरावा म्हणजें देवावर प्रीति करणें हा आहे. देवाच्या मुलांवर प्रीतिविषयी हे आपल्याला काय शिकवते?

ज्याअर्थी देवावर प्रीति हे कठीण काम जाणवत नसून आनंदानें त्याची इच्छा पूर्ण करणें आहे, आणि देवावर प्रीति ही देवाच्या मुलांवरील आमच्या प्रीतिचे मोजमाप आहे, त्याअर्थी देवाच्या मुलांवरील आपली प्रीति ही देखील नाखुशीनें नव्हे तर आनंदानें केली गेलेली असलीं पाहिजे.

ख्रिस्ती पूर्णानंद म्हणजें प्रामाणिकपणें केलेल्या प्रीतिची सेवा, कारण तो पूर्णानंद आम्हास नाखुशीनें आज्ञापालन करण्यांस नाहीं, तर आनंदानें आज्ञापालन करण्यास आवरून धरतो.

5 November : तुम्हीं तुमच्यां तारणाकडे दुर्लक्ष करतां का?

Alethia4India
Alethia4India
5 November : तुम्हीं तुमच्यां तारणाकडे दुर्लक्ष करतां का?
Loading
/

“तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल?” (इब्री 2:3)

तुमचे तारण किती मोठे आहे ह्याची जाणीव तुम्हांला आहे का? कीं तुम्हीं त्याकडे दुर्लक्ष करतां?

तुम्हीं तुमच्यां ह्या मोठ्या तारणाकडे कसे पाहतां? कीं तुम्हीं त्याच्याशी तुमची अंतिम इच्छा आणि मृत्युपत्र, किंवा तुमच्यां कारचा अधिकार किंवा तुमच्यां घराचे विक्रीपत्र यांशी व्यवहार करावा तसे वागता? तुम्हीं त्यावर एकदा स्वाक्षरी केली आणि ते आता कुठेतरी फाईलच्या एका कपाटात आहे, पण तुमच्यां दृष्टीनें ती खरें पाहतां इतकी पण मोठी गोष्ट नाहीं. तुम्हीं त्या विषयीं क्वचितच विचार करता. रोज पडावा तसा त्याचा तुमच्यांवर काहीं फरक पडत नाहीं. मुळांत तुम्हीं त्याकडे दुर्लक्ष करता.

पण जेव्हां तुम्हीं तुमच्यां अशा मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करता तेव्हां तुम्हीं खरोखर कशाकडे दुर्लक्ष करत असतां? “तुमच्यां मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करूं नका!“ असें जेव्हां तो म्हणतो तेव्हां त्याला हेंच म्हणायचे आहे.

  • देवानें तुमच्यांवर प्रीति केलीं याकडे दुर्लक्ष करूं नका.
  • सर्वशक्तिमान परमेश्वरानें तुम्हांला तुमच्यां पापांची क्षमा प्राप्त केलीं आणि तुम्हांला आपलें केलें आणि सुरक्षित केलें आणि तुम्हांला बळ दिलें व तो तुमचे मार्गदर्शनहि करित आहे याकडे दुर्लक्ष करूं नका.
  • वधस्तंभावर ख्रिस्तानें त्याचे जीवन अर्पण केलें याकडे दुर्लक्ष करूं नका.
  • विश्वासाद्वारें गणिले गेलेले जे नीतिमत्व त्याच्या विनामूल्य देणगीकडे दुर्लक्ष करूं नका.
  • देवाचा कोप तुमच्यांपासून दूर करण्यांत आला आणि देवाबरोबर तुमचा सुखद समेट करण्यांत आला त्याकडे दुर्लक्ष करूं नका.
  • तुमच्यांत पवित्र आत्म्याचा निवास आणि जिवंत ख्रिस्ताची सहभागिता व तसेच त्याशी तुमचे सौख्य याकडे दुर्लक्ष करूं नका.
  • येशू ख्रिस्ताच्या मुखावर प्रकट झालेल्या देवाच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप याकडे दुर्लक्ष करूं नका.
  • कृपेच्या सिंहासनासमोर तुम्हांला जो विनामूल्य प्रवेंश दिला गेला आहे याकडे दुर्लक्ष करूं नका.
  • परमेश्वराच्या अभिवचनाच्या अफाट खजिन्याकडे दुर्लक्ष करूं नका.

हे खरोखर मोठे तारण आहे. त्याकडे दुर्लक्ष करणें म्हणजें अति दुष्टपणाच. इतक्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करूं नका. कारण जर तुम्हीं दुर्लक्ष्य केलें तर न्यायाच्या दिवशी तुमचा कसा निभाव लागेल? लेखक हांच प्रश्न विचारत आहे: “एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल?”

म्हणून, ख्रिस्ती असणें ही एक अतिशय गंभीर बाब आहे – ही सामान्य गोष्ट नाहीं तर एक गंभीर विषय आहे. आपल्या मोठ्या तारणात आनंद करण्याविषयी आपल्याला कळकळ असली पाहिजे.

आपण या जगाद्वारें पापाच्या क्षणिक आणि आत्मघाती सुखविलासाकडे ओढले जाऊ नये. आपण परमेश्वराठायीं आमच्या सनातन आनंदाकडे दुर्लक्ष करूं नये – हेंच या तारणाचे ध्येय होय. एवढ्या मोठ्या तारणापासून दूर वाहवत जाण्यापेक्षा आपण आपलें डोळे उपटून काढलें तर बरे होईल.

4 November : चिंतेची वास्तविक समस्या

Alethia4India
Alethia4India
4 November : चिंतेची वास्तविक समस्या
Loading
/

“जे रानातलें गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर, अहो तुम्हीं अल्पविश्वासी, तो विशेषेकरूंन तुम्हांला पोशाख घालणार नाहीं काय?” (मत्तय 6:30).

येशू म्हणतो कीं आमचा अल्पविश्वास हा आमच्यां चिंतेचे मूळ आहे – आमचा पिता आम्हांला भविष्यांत जी कृपा पुरविणार असतो त्याविषयी “अल्पविश्वास”.

ह्याला आम्हीं कदाचित अशी प्रतिक्रिया देऊं: “ही सुवार्ता नाहीं! वस्तुतः, हे ऐकून फार निराशा होते कीं जो विचार मी केला होता तो चिंताग्रस्त स्वभावाशी असलेला संघर्ष मात्र होता तो खरे पाहता मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो कीं नाहीं याविषयीच एक अतिशय गंभीर संघर्ष होता.”

या निराशेला मीं आधी होय, हें खरे आहे असें म्हणतो, पण नंतर असहमत होतो.

समजां तुमच्यां पोटात दुखत असेल आणि तुम्हीं सर्व प्रकारची औषधे आणि आहार घेत असाल, पण कांहीं फायदा होत नाहीं. आणि मग समजा कीं तुमचा डॉक्टर तुम्हांला तुमच्यां नियमित भेटीनंतर सांगतो, कीं तुमच्यां लहान आतड्यात कँसर झाला आहे. आता, तुम्हीं तिला चांगली बातमी म्हणणार का? तुम्हीं ठामपणें म्हणाल, नाहीं! आणि मला ते मान्य आहे.

पण आता मी तुम्हांला हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीनें विचारतो: डॉक्टरांनी कँसरचा उपचार करता येईल अशा वेंळी त्याचे निदान केलें, आणि खरोखरच त्यावर यशस्वीपणें इलाज केला जाऊ शकतो याचा तुम्हांला आनंद झाला का? तुम्हीं म्हणाल, होय, मला खूप आनंद झाला कीं डॉक्टरांना खरी समस्या आढळून आली. मीं तेहि मान्य करतो.

तर मग, ही बातमी कीं तुम्हांला कॅन्सर आहे चांगली बातमी नाहीं. परंतु, दुसऱ्या अर्थानें पाहता, ही चांगली बातमी आहे, कारण तुमच्यांत खरी व्याधी काय आहे हे जाणून घेणें कधीही योग्यच, विशेषतः जेव्हां तुमच्यां त्यां व्याधीचा इलाज यशस्वीरित्या करता येऊ शकतो.

म्हणजें (येशूनें म्हटल्याप्रमाणें) आमच्या चिंतेमागील खरी समस्या ही परमेश्वराच्या भावी कृपेविषयी त्यानें दिलेल्यां अभिवचनांवर आमचा असलेला “अल्प विश्वास” आहे हे आम्हीं शिकतो. आणि जेव्हां आपण आक्रोश करतो, “प्रभूजी, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका!” (मार्क 9:24) – तेव्हां तो अद्भुतरित्या आमचे रोग बरे करण्यास समर्थ आहे.