4 November : चिंतेची वास्तविक समस्या

Alethia4India
Alethia4India
4 November : चिंतेची वास्तविक समस्या
Loading
/

“जे रानातलें गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर, अहो तुम्हीं अल्पविश्वासी, तो विशेषेकरूंन तुम्हांला पोशाख घालणार नाहीं काय?” (मत्तय 6:30).

येशू म्हणतो कीं आमचा अल्पविश्वास हा आमच्यां चिंतेचे मूळ आहे – आमचा पिता आम्हांला भविष्यांत जी कृपा पुरविणार असतो त्याविषयी “अल्पविश्वास”.

ह्याला आम्हीं कदाचित अशी प्रतिक्रिया देऊं: “ही सुवार्ता नाहीं! वस्तुतः, हे ऐकून फार निराशा होते कीं जो विचार मी केला होता तो चिंताग्रस्त स्वभावाशी असलेला संघर्ष मात्र होता तो खरे पाहता मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो कीं नाहीं याविषयीच एक अतिशय गंभीर संघर्ष होता.”

या निराशेला मीं आधी होय, हें खरे आहे असें म्हणतो, पण नंतर असहमत होतो.

समजां तुमच्यां पोटात दुखत असेल आणि तुम्हीं सर्व प्रकारची औषधे आणि आहार घेत असाल, पण कांहीं फायदा होत नाहीं. आणि मग समजा कीं तुमचा डॉक्टर तुम्हांला तुमच्यां नियमित भेटीनंतर सांगतो, कीं तुमच्यां लहान आतड्यात कँसर झाला आहे. आता, तुम्हीं तिला चांगली बातमी म्हणणार का? तुम्हीं ठामपणें म्हणाल, नाहीं! आणि मला ते मान्य आहे.

पण आता मी तुम्हांला हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीनें विचारतो: डॉक्टरांनी कँसरचा उपचार करता येईल अशा वेंळी त्याचे निदान केलें, आणि खरोखरच त्यावर यशस्वीपणें इलाज केला जाऊ शकतो याचा तुम्हांला आनंद झाला का? तुम्हीं म्हणाल, होय, मला खूप आनंद झाला कीं डॉक्टरांना खरी समस्या आढळून आली. मीं तेहि मान्य करतो.

तर मग, ही बातमी कीं तुम्हांला कॅन्सर आहे चांगली बातमी नाहीं. परंतु, दुसऱ्या अर्थानें पाहता, ही चांगली बातमी आहे, कारण तुमच्यांत खरी व्याधी काय आहे हे जाणून घेणें कधीही योग्यच, विशेषतः जेव्हां तुमच्यां त्यां व्याधीचा इलाज यशस्वीरित्या करता येऊ शकतो.

म्हणजें (येशूनें म्हटल्याप्रमाणें) आमच्या चिंतेमागील खरी समस्या ही परमेश्वराच्या भावी कृपेविषयी त्यानें दिलेल्यां अभिवचनांवर आमचा असलेला “अल्प विश्वास” आहे हे आम्हीं शिकतो. आणि जेव्हां आपण आक्रोश करतो, “प्रभूजी, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका!” (मार्क 9:24) – तेव्हां तो अद्भुतरित्या आमचे रोग बरे करण्यास समर्थ आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *