ArchivesSolid Joys

March 10 : आपण कोकर्‍याची भक्ति करूया

Alethia4India
Alethia4India
March 10 : आपण कोकर्‍याची भक्ति करूया
Loading
/

ही गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाहीं म्हणून मला फार रडू आले “. (प्रकटीकरण 5:4)

तुम्हीं कधी असा विचार केला आहे का, कीं तुमच्या प्रार्थना स्वर्गामधील सुवासा सारख्या आहेत?  प्रकटीकरण 5 वाचल्यांवर हेच चित्र समोर तयार होते. स्वर्गामधील जीवनाची ही एक झलक आहे.

प्रकटीकरण 5 मध्यें आपण पाहतो कीं, सर्वसमर्थ देव हातामध्यें गुंडाळी घेऊन राजासनावर बसला आहे. या गुंडाळीवर सात शिक्के आहेत. ती गुंडाळी उघडण्यासाठीं हे सात शिक्के फोडावे लागणार आहेत.

मला असे वाटते कीं गुंडाळीचे उघडणे हे मुक्तिच्या इतिहासाच्या शेवटच्या दिवसाचे दर्शक आहे, आणि शिक्क्यांचे फोडले जाणे हे आपली त्या दिवसाकडील वाटचालीच्या इतिहासाचे दर्शक आहे.

प्रकटीकरण 5:4 मध्यें सुरवातीला, योहान रडत असतो कारण ती गुंडाळी उघडण्यास कोणी योग्य नाहीं. तेव्हां स्वर्गातील वडीलमंडळापैकीं एक जण योहानाला म्हणतो कीं, “रडू नकोस; पाहा, ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’, दाविदाचा ‘अंकुर’ ह्याने जय मिळवला; म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे” ( प्रकटीकरण 5:5).

क्रूसावरील मरण स्वीकारून, येशूनें  मुक्तिच्या इतिहिसातील होऊ घातलेल्यां घटनां उघडण्याचा व त्याच्या लोकांना त्यातून विजयी वाटचाल करीत नेण्याचा अधिकार मिळवला.

पुढच्या वचनामध्यें, सिंहाचे चित्रण कोक-या प्रमाणे करण्यात आले आहे, “ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता, असा कोकरा उभा राहिलेला मी पहिला” (प्रकटीकरण 5:6). येशूच्या क्रूसावरील विजयाचे हे सुंदर चित्रण आहे, नाहीं का? वधला असला तरी, उभा असलेला, खाली झोपलेला नाहीं!

हे तितक्याच खात्रीचे आहे जसे सिंहाने त्याच्या शत्रूला गिळंकृत केलें आहे – पण त्यानें हा विजय त्याच्या शत्रूंकडून स्वत:चा वध करून प्राप्त केला आहे !

त्यामुळे, कोकरा आता देवाच्या हातातून मुक्तीच्या इतिहासाची गुंडाळी घेऊन उघडण्यास समर्थ झाला आहे. हा किती राजेशाही क्षण आहे, जेव्हां स्वर्गामधील चोवीस वडील भक्ति करण्यास त्याच्या पाया पडत आहेत.

तुम्हांला ठाऊक आहे का, कीं धुपाने भरलेल्यां सोन्याच्या वाट्या काय आहेत? प्रकटीकरण 5:8 सांगते कीं “त्या पवित्र जनांच्या ‘प्रार्थना’ होत.” याचा अर्थ असा होत नाहीं का, कीं आपल्यां प्रार्थना स्वर्गातल्यां सुगंधा प्रमाणे आहेत, देवाच्या राजासना समोर व कोक-या समोर एका सुवासा प्रमाणे आहेत?

जेव्हां मी विचार करतो कीं माझ्या प्रार्थना साठवून ख्रिस्ताच्या स्वर्गातील भक्तिमध्यें सादर केल्यां जातात, तेव्हां मला अधिक जोमाने प्रार्थना करण्याचे सामर्थ्य व उत्तेजन प्राप्त होते.

तर आपण खाली आपल्यां प्रार्थनांद्वारें ख्रिस्ताला मान, गौरव व आपली भक्ति सादर करू, आणि आपल्यां प्रार्थना स्वर्गीय मंडळीद्वारें ख्रिस्त, जो वधला गेला होता, त्याला सुंगधी धुपाप्रमाणे सादर केल्यां जातात यात दुहेरी आनंद मानू.

March 9 : देव तुमची काळजी घेतो

Alethia4India
Alethia4India
March 9 : देव तुमची काळजी घेतो
Loading
/

“म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठीं कीं, त्यानें योग्य वेळी तुम्हांला उंच करावे. त्याच्या वर तुम्हीं आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.” (1 पेत्र 5:6-7)

भविष्याबद्दल काळजी करणे हे गर्व करण्यासारखे का आहे ?

देव अशा प्रकारे उत्तर देईल ( यशया 51:12  – दुसर्‍या शब्दात ):

मी- परमेश्वर, तुझा निर्माणकर्ता – तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे, तुझी काळजी घ्यायचे मी वचन देतो; जे तुला धमकावतात, ते तर मर्त्य लोक आहेत. त्यामुळे तुझ्या भयाचा असा अर्थ होतो कीं तुझा माझ्यावर विश्वास नाहीं – आणि तुझी काळजी घेण्याकरिता तुझा, तुझ्या स्वत:च्या संसाधनांवर देखील विश्वास नाहीं, तरी तू माझ्या भविष्यातील कृपेवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत: च्या कमकुवत स्वयंपूर्णेतेवर अवलंबून आहेस. त्यामुळे तुझे सर्व थऱथऱ कापणे- कितीही कमकुवत असेल तरी – ते तुझा गर्व प्रकट करते.

यावर उपाय? स्वतावर विसंबून राहण्याऐवजी देवावर विसंबून रहा, आणि भविष्यातील कृपेसाठीं देवाच्या स्वयंसिद्ध अभिवचनांच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवा.

1 पेत्र 5:6-7 मध्यें, तुम्हीं पाहू शकता कीं, चिंता करणे हे एक प्रकारच्या गर्वा प्रमाणे आहे, “देवा च्या…. पराक्रमी हाताखाली…. लीन व्हा” (आणि वचन 7)” त्याच्यावर तुम्हीं आपली सर्व चिंता टाका”  यातील व्याकरण पहा. वचन 7 हे नवीन वाक्य नाहीं, ते संयुक्त वाक्य आहे, ते एकमेकाला जोडलेले आहे. ते आपण अशा शब्दांत मांडू शकतो : “त्याच्यावर तुम्हीं ‘आपली’ सर्व ‘चिंता टाकून लीन व्हा.”

याचा अर्थ देवावर आपल्यां सर्व चिंता टाकणे म्हणजे त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन होणे असा होतो. हे असे म्हणण्यासारखे आहे कीं, “नम्रपणे जेव…. आपले तोंड बंद ठेवून,” किंवा, “लक्षंपूर्वक गाडी चालव …. तुझी दृष्टि रस्त्यावर ठेवून,” किंवा, “दानशूर हो…. कोणाला तरी घरी भोजनाला आमंत्रित करून,” किंवा,  स्वत:ला लीन कर…. सर्व भय देवावर टाकून.”

स्वत:ला नम्र करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्यां सर्व चिंता देवावर टाकणे. याचा अर्थ, देवावर सर्व चिंता टाकण्यामध्यें आपला गर्व अडथळा निर्माण करतो. याचा अर्थ, आपली गैरवाजवी चिंता एक प्रकारचा गर्वच आहे. कितीही कमकुवत वाटला किंवा दिसला तरी.

तर मग, आपली चिंता देवावर टाकणे हे गर्वाच्या विपरीत कसे आहे ? कारण गर्व हे मान्य करीत नाहीं कीं त्याला चिंता आहेत. किंवा आपण त्यांची काळजी स्वत: घेऊ शकत नाहीं. जर गर्वाला हे मान्य करायचे असेल कीं आपले भयावर नियंत्रण नाहीं, तरी देखील त्याला यावरील उपाय, कीं आपण दुसर्‍या कोणावर तरी विसंबून राहायचे जो आपल्यांपेक्षा जास्त सामर्थ्यशाली आणि ज्ञानी आहे, ते मान्य करायचे नसते.  

दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले तर, गर्व हा एक प्रकारचा अविश्वास आहे, ज्याला देवाच्या भविष्यातील कृपेवर विश्वास ठेवायचा नसतो. पण याउलट, विश्वास हे मान्य करतो कीं त्याला सहाय्याची गरज आहे. गर्व हे मान्य करीत नाहीं. विश्वास देवाच्या सहाय्यावर भरवसा ठेवून राहतो, गर्व हे नाहीं करत. विश्वास सर्व चिंता देवावर टाकतो, गर्व टाकींत नाहीं.

ह्यास्तव, गर्वाच्या अविश्वासावर लढा द्यायचा असेल तर हे कबूल करावें कीं मला चिंता आहेत, आणि देवाचे भविष्यातील कृपेचे अभिवचन “तो तुमची काळजी करतो” याचे मनात जतन करा. आणि मग सर्व चिंता त्याच्या सामर्थ्यशाली बाहुंवर सोपवून द्या.

March 8 : तुमच्या मनाची कवाडे उघडा

Alethia4India
Alethia4India
March 8 : तुमच्या मनाची कवाडे उघडा
Loading
/

 “चेपलेला बोरू तो मोडणार नाहीं, मिणमिणती वात तो विझविणार नाहीं.” (यशया 42:3)

 बर्‍याच आठवड्यानंतर मनाला उत्तेजन देणारे शब्द माझ्या वाचनात आले, जे यशया 42:1-3 यातून होते, जे येशू त्याच्या आत्मिक शक्तीचा वापर कशाप्रकारे करेल याविषयीं सांगतात. 

तुम्हांला एखाद्या चेपलेल्यां बोरू प्रमाणे वाटते का – ईस्टर लिलीच्या फुलाप्रमाणे, ज्याची फांदी चेपलेली आहे व त्यामुळे काहींच सत्व न मिळाल्यांमुळे ते फूल खाली पडले आहे. तुम्हांला कधी असे वाटते का, कीं तुमचा विश्वास जळत्या ज्वालेमध्यें एका लहान ठिणगी प्रमाणे आहे- वाढदिवसाच्या विझवीलेल्यां मेणबत्तीच्या वातेतील लहानश्या ठिणगी प्रमाणे?

धीर धरा! ख्रिस्ताचा आत्मा हा उत्तेजनाचा आत्मा आहे, तो तुमचे फूल तोडून टाकणार नाहीं, तो तुमच्यातील ठिणगी विझविणार नाहीं.

“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्यानें मला अभिषेक केला” (लूक 4:18). “तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल” (मलाखी 4:2). “[तो] मनाचा सौम्य व लीन आहे……‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल” (मत्तय 11:29). “परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर” (स्तोत्र 27:14).

आपल्यांला दु:ख वाटू शकते कीं, आपण एक मोठी ज्वाला नसून, केवळ एक ठिणगी आहोंत. पण ऐका! आणि उत्तेजन प्राप्त करून घ्या: होय, मोठ्या आगीमध्यें व ठिणगीमध्यें खूप मोठा फरक आहे. पण ठिणगी असण्यामध्यें आणि ठिणगी नसण्यामध्यें देखील खूप मोठा फरक आहे. विश्वासच नसणे या पेक्षा मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास, हा डोंगरा एवढा विश्वास होण्यापेक्षा जास्त सोयीस्कर आहे.

देवाच्या अभिवचनाची कवाडे उघडा आणि पवित्र आत्म्याला तुमच्या मनाच्या प्रत्येक खोलीमध्यें फुंकर घालू द्या. देवाचा पवित्र आत्मा कधीच मोडणार नाहीं किंवा विझवीणार नाहीं. तो तुमचे मस्तक उंच करील, व तुमच्यातील ठिणगीला वारा देऊन एक ज्वाला बनवेल. तो उत्तेजनाचा आत्मा आहे.

7  March : मी पवित्र आत्म्याने स्वत:ला कसे भरू शकतो?

Alethia4India
Alethia4India
7  March : मी पवित्र आत्म्याने स्वत:ला कसे भरू शकतो?
Loading
/

“धीराच्या व शास्त्रापासून मिळणार्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काहीं शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्यां शिक्षणाकरिता लिहिले “ ( रोम 15:4)

आपण पवित्र आत्म्याने कसे भरले जाऊ शकतो? आपण आपल्यां मंडळीवर व स्वत:वर पवित्र आत्म्याचा वर्षाव कसा अनूभवू शकतो, कीं जेणेकरून तो आपल्यांला अदम्य अश्या आनंदाने भरून टाकींल आणि आपल्यांला स्वतंत्र करील, सामर्थ्य देईल ज्याच्या द्वारें आपण इतरांवर अश्याप्रकारे प्रीति करू शकू कीं त्यांना आपण ख्रिस्तासाठीं जिंकून घेऊं?

उत्तर : यासाठीं देवाच्या अतुलनीय, आशा देणार्‍या वचनांवर दिवस-रात्र मनन करा. जसे रोमकरास पत्र 15:4 सांगते, “धीराच्या व शास्त्रापासून मिळणार्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काहीं शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्यां शिक्षणाकरिता लिहिले” ह्याच्याद्वारें पौल त्याचें अंत:करण आशा, आनंद आणि प्रीतिने भरत असे.

आपल्यांला आशेची संपूर्ण खात्री देवाच्या अभिवचनांवर मनन केल्यांने येते. आणि रोम 15:13 मध्यें सांगितल्यां प्रमाणे पवित्र आत्मा आशा देऊ करतो, या वचनाबरोबर विरोधाभास होत नाहीं. याचे कारण हे कीं, पवित्र आत्मा हा शास्त्राचा दैवी लेखक आहे. त्याचें कार्य हे त्याच्या शब्दाद्वारें होते. आपल्यांला त्याच्या अभिवचनांनी भरून तो आपल्यांला आशेने भरतो ह्या त्याच्या पद्धतीमध्यें कुठेच विरोधाभास नाहीं.

आशा ही एखादी संदिग्ध भावना नाहीं, जी पोटदुखी प्रमाणे अचानक उदभवेल. आशा हा एक प्रकारचा भरवसा आहे कीं पवित्र आत्म्याने त्याच्या वचनाद्वारें आपल्यां उज्ज्वल भविष्याबद्दल जे अभिवचन दिले आहे, ते खरे होईल. तर पवित्र आत्म्याने भरण्याचा मार्ग म्हणजे त्याच्या वचनाने भरणे. आणि आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवणे.

कारण देवाचे वचनच आहे जें आपल्यांला आशेने भरते, आणि आशा आपल्यांला आनंदाने भरते, आणि आनंद आपल्यां शेजार्‍यावर प्रीति करण्याच्या सामर्थ्याने आणि स्वातंत्र्याने ओसंडून वाहतो. आणि हेंच पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणे आहे.   

6 March : देव दीनांकडें लक्ष्य देतो

Alethia4India
Alethia4India
6 March : देव दीनांकडें लक्ष्य देतो
Loading
/

“अनादि देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहुंचा तुला आधार आहे.”  (अनुवाद 33:27)

तुम्हीं कदाचित ह्या क्षणी अश्या काहीं परिस्थितीतून जात असाल जी तुम्हांला वेदनादायक रीतीने येशूच्या व त्याच्या लोकांच्या मौल्यवान सेवेकरिता तयार करत असेल. जेव्हां एखादा व्यक्ति शून्यतेने किंवा असहाय्यपणे रसातळास जातो, तेव्हां त्याला ह्या गोष्टीची जाणीव होईल कीं तो अनादि आश्रय दुर्गाला येऊन पोचला आहे.

मला माझ्या कुटुंबासोबतच्या सकाळच्या भक्तिच्या वेळी वाचलेले स्त्रोत्र 138:6 यातील एका सुंदर वचनाची आठवण झाली, “परमेश्वर थोर आहे, तरी तो दीनांकडें लक्ष देतो.”

तुम्हीं निराशेमध्यें इतकेपण खोल बुडून जाऊ शकत नाहीं कीं देव तुम्हांला पाहत नाहीं किंवा तुमची काळजी करत नाहीं. खरं तर, तो त्या तळाशी तुम्हांला धरण्याकरिता वाट पहात असतो. जसा मोशे म्हणाला, “अनादि देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहुंचा तुला आधार आहे” ( अनुवाद 33:27 ), अगदी त्या प्रमाणे.

होय, तो तुम्हांला थरथरतांना व घसरतांना पहात असतो. तुम्हीं तळाशी पोचण्यापूर्वी तो तुम्हांला पकडू शकतो ( जे तो नेहमी करतो ). पण या वेळी त्याला तुम्हांला कदाचित काहीं नवीन गोष्टी शिकवायच्या असतील.

स्त्रोत्रकर्ता स्त्रोत्र 119:71 मध्यें म्हणतो, “मी पीडित झाल्यांमुळे माझे बरे झाले; कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो.”  तो असे म्हणत नाहीं कीं त्याला त्यात आनंद वाटला किंवा त्याला बरे वाटले. गत गोष्टींचा विचार करून तो केवळ हे म्हणतो कीं, “त्यामुळे माझे बरे झाले.”

मागील आठवडी मी जेम्स स्टुअर्ट ह्या स्कॉटलँड मधील पाळकाचे पुस्तक वाचत होतो. ते असे म्हणतात कीं, “प्रीतिच्या सेवेमध्यें, केवळ जखमी सैनिकच सेवा करू शकतात.” यासाठींच माझा असा विश्वास आहे कीं तुमच्या पैकीं काहीं जणांची कोणत्या तरी प्रीतिच्या मौल्यवान सेवेकरिता तयारी होत आहे. कारण तुम्हीं जखमी आहात.

असे समजू नका कीं तुमची जखम ही देवाच्या कृपेच्या रचने शिवाय आली आहे. ह्या वचनाचे स्मरण करा, “आता पाहा, मी, मीच तो आहे, माझ्याशिवाय कोणी देव नाहीं; प्राण हरण व प्राण दान करणारा मीच आहे.”  ( अनुवाद 32:39 )

जे तुम्हीं कोणत्या तरी ओझ्या खाली दु:ख सोसत आहात, त्यां तुम्हांला देव विशेष कृपा देऊ करो. देव तुम्हांला सौम्यतेने जी नवी प्रीति देऊ करत आहे तिचा आतुरतेने शोध करा.

5 March : तुमच्या आनंदाकरिता येशूकडें पहा

Alethia4India
Alethia4India
5 March : तुमच्या आनंदाकरिता येशूकडें पहा
Loading
/

“आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात….जेवणावळतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थांनातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यांना आवडते.” ( मत्तय 23 : 57)

लोकांकडून स्वतःचे वाखाण करून घेण्याच्या लालसेला शमवण्यासाठीं केवळ स्वीकृतीचा लोभ असतो. जर आपल्यांला स्वावलंबी बनून आनंद मिळत असेल तर, इतरांनी आपल्यां स्वावलंबीपणाची प्रशंसा केल्यांशिवाय देखील आपल्यांला आनंद वाटणार नाहीं.

यासाठीं मत्तय 23:5 मध्यें येशू परुशी लोकांचे वर्णन करित असें म्हणतो, “आपली सर्व कामे लोकांनी पहावीत म्हणून ते ती करतात.”

हा चेष्टेखोरपणा आहे. आपल्यांला असे वाटत नाहीं का कीं स्वावलंबीपणा हा गर्विष्ठ व्यक्तिला इतरांच्या मतांपासून मुक्त करायला पाहिजे? यालाच “स्वत: मध्यें संतुष्ट” म्हणतात. तसे पहायाला गेले तर या आत्मसंतुष्टीमध्यें किंवा स्वावलंबीपणामध्यें एक रिक्तता आहे.

स्वत्वाची निर्मिती स्वत: मध्यें संतुष्ट होण्यात किंवा स्वत: वर अवलंबून राहण्याकरिता केलीं गेली नव्हती. स्वत्व कधीच स्वयंपूर्ण होवू शकत नाहीं. आपण परमेश्वर नाहीं. आपण परमेश्वराच्या प्रतिमेमध्यें बनवले गेलोय. आणि जी गोष्ट आपल्यांला देवाची “प्रतिमा” बनवते ती गोष्ट म्हणजे आपण स्वतःमध्यें संतुष्ट राहणे ही नाहीं. आपण सावली व प्रतिध्वनि आहोंत. त्यामुळे जो आत्मा स्वत: मध्येंच संतुष्टी शोधण्याकरिता झटत असेल,  तर त्यात एक रिक्तपणा असणारच.

इतरांकडून प्रशंसा मिळविण्याची ही भूक गर्वाचे अपयश व देवाच्या सतत मिळत असलेल्यां कृपेच्या कार्यावरील अविश्वासाचे चिन्ह आहे. येशूनें  मनुष्याचा स्व-गौरवाच्या लोभाचा अनिष्ट परिणाम पाहिला. त्यानें योहान 5:44 मध्यें ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे, “जे तुम्हीं एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याचाकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाहीं, त्या तुम्हांला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?” याचे उत्तर आहे, तुम्हीं विश्वास ठेवू शकत नाहीं. जे इतरांकडून प्रशंसेची लालसा करीत असतांत त्यांना विश्वास ठेवणे शक्य नाहीं. का?

कारण विश्वास स्वत:कडून दृष्टी हटवून देवाकडें पाहतो. कारण विश्वास म्हणजे येशूमध्यें देव जे सर्व काहीं आहे त्यात संतुष्ट असणे. आणि जर तुम्हीं तुमची लालसा इतरांच्या प्रशंसेद्वारें शमवण्याचा हट्ट करीत असाल तर, तुम्हीं येशूपासून दूर जाणार. येशू असा नाहीं. तो त्याच्या पित्याच्या गौरवा करिता जगतो. आणि आपल्यांला पण तो हेच करण्यास सांगतो.

पण जर तुम्हीं तुमच्या स्वतःमध्यें संतुष्ट राहण्यापासून वळाल (पश्चाताप कराल), आणि येशूकडें, देव जे सर्व काहीं आहे त्या सर्वाचा आनंद घेण्याकरिता येशूकडें (विश्वासाने) याल, मग त्या लालसेच्या रिक्ततेची बदल पूर्णतेने होईल- यालाच येशू “सार्वकालिक जीवनासाठीं उपळत्या पाण्याचा झरा” असे संबोधतो.   ( योहान 4:14).

4 March : देवाला तुमचे हित करण्यात आनंद मिळतो

Alethia4India
Alethia4India
4 March : देवाला तुमचे हित करण्यात आनंद मिळतो
Loading
/

मी त्यांजशी सर्वकाळचा करार करी; तो असा कीं मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाहीं …. मी त्यांचे हित करण्यांत आनंद पावीन.(यिर्मया 32 :4041 )

जेव्हां जेव्हां मी निराश होतो, तेव्हां तेव्हां मी देवाच्या ज्यां अनेक वचनांकडें पुन्हा पुन्हा परत येतों, त्यांपैकींच हें एक वचन आहे. देवाला तुमचे हित करण्यात आनंद मिळतो, यापेक्षा उत्तजेन देणा-या  कोणत्या गोष्टीचा तुम्हीं विचार करू शकता का ? देव केवळ तुमचे हित करतो म्हणून नव्हे. केवळ तुमचे हित करण्याचे आश्वासनच नव्हे – हे कितीही गौरवी असेल तरीही, तर हें कीं देवाला तुमचे हित करण्यात आनंद मिळतो,”मी त्यांचे हित करण्यांत आनंद पावीन. ” अहाहा!

रोम 8:28 यातील सर्व काहीं आपल्यां भल्यांसाठीं करण्याच्या अभिवचनाची पूर्तता तो नाखुशीनी करत नाहीं. आपले हित करण्यात त्याला आनंद मिळतो. आणि तो आनंद केवळ कधीतरीच नाहीं – तर सर्वदा! ” मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाहीं.” जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याबाबतींत तो त्याचें अभिवचन रद्द करत नाहीं किंवा त्याच्या लेकरांचे कल्यांण करण्याविषयीं आपला आनंद गमावत नाहीं.

ह्या गोष्टीने आपल्यांला आनंद व्हावयाला पाहिजे!

पण कधी कधी आनंद वाटणे अवघड होतं. आपली परिस्थिति आपल्यां सहनशीलते पलीकडें होते ज्यांमुळें आनंद पावणे शक्य होत नाहीं. माझ्या बरोबर जेव्हां असे होते तेव्हां मी अब्राहमाचे अनुकरण करतो : “आशेला जागा नसताही त्यानें आशेने विश्वास ठेवला” (रोम 4:18). दुसर्‍या शब्दांत, जेव्हां तुम्हीं तुमच्या आशाहीन परिस्थितिकडें पाहतां, तेव्हां तुम्हांला असें म्हणायचे आहे, “तू माझ्या देवाइतका सामर्थ्यशाली नाहींस! तो तर जें अशक्य ते करू शकतो. आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याकरिता तो प्रीतिने हे करतो, यासाठींच निराशेकडें अंतिम अधिकार नाहीं. मी देवावर विश्वास ठेवतो.

माझ्या मधील असलेल्यां विश्वासाच्या लहानश्या ठिणगीचे रक्षण करण्यास देव विश्वासू आहे आणि (लगेचच नाहीं) तर अखेरीस तो आनंदाच्या व विश्वासाच्या भावना चेतवतो. आणि त्याचा तो आनंद यिर्मया 32:41 मध्यें दडलेला आहे.

मी किती आनंदी आहे कीं देवाच्या अंतकरणाला तुमचे आणि माझे कल्यांण करण्यात देखील आनंद प्राप्त होतो! मी त्यांचे हित करण्यांत आनंद पावीन.

3 March : चांगुलपणाच्या मनोदयाद्वारें देवाचे कार्य

Alethia4India
Alethia4India
3 March : चांगुलपणाच्या मनोदयाद्वारें देवाचे कार्य
Loading
/

ह्याकरता तर आम्हीं तुमच्यासाठीं सर्वदा अशी प्रार्थना करतो कीं, आपल्यां देवानें तुम्हांला झालेल्यां ह्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे. 2 थेस्सलनी 1:11

आपले चांगुलपणाचे मनोदय पूर्ण करण्याकरिता देवाच्या सामर्थ्याचा शोध करणे याच अर्थ असा होत नाहीं कीं आपण संकल्पच (मनोदय) करत नाहीं किंवा आपण आपल्यां इच्छाशक्तीचा वापर करत नाहीं.

देवाच्या सामर्थ्याची बाजू आपल्यां इच्छेच्या बाजूची जागा कधीच घेत नाहीं, आपल्यां पवित्रीकरणातील देवाचे सामर्थ्य आपल्यांला निष्क्रिय बनवत नाहीं! देवाच्या इच्छेचे सामर्थ्य आपल्यां इच्छेची जागा न घेता, ते आपल्यां इच्छेच्या मुळाशी किंवा मागे आणि इच्छेमध्यें राहून कार्य करते.

आपल्यांतील इच्छेचा अभाव हा देवाच्या सामर्थ्याचा पुरावा नसून, आपल्यां इच्छेचे सामर्थ्य व आपले आनंदाने इच्छा करणे याचा पुरावा आहे.

जर कोणी म्हणत असेल कीं, “माझा देवाच्या सार्वभौमतेवर विश्वास आहे आणि म्हणून मी नुसतं बसून राहणार,  काहींच करणार नाहीं, तर त्याचा देवाच्या सार्वभौमतेवर विश्वास नाहीं आहे. कारण जर कोणी देवाच्या सार्वभौमतेवर विश्वास ठेवत असेल तर तो का बरं उघडपणे देवाची आज्ञा मोडेल?

जेव्हां तुम्हीं काहींच न करण्याचा निर्णय घेता, तेव्हां तुम्हीं काहींच करत नाहीं असे होत नाहीं. तुम्हीं तुमची इच्छाशक्ती सक्रियपणे काहींच न करण्यासाठीं वापरत आहात. आणि जर तुम्हीं अशाप्रकारे तुमच्या जीवनात येणारे पाप आणि मोहाला हाताळत असाल तर ते देवाची आज्ञा मोडण्यासारखे आहे, कारण आपल्यांला आज्ञा दिली आहे कीं, सुयुद्ध कर (1 तिमथ्य 1:18), सैतानाला अडवा ( याकोब 4:7), पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा ( इब्री 12:14) आणि शरीराची कर्मे ठार मारा ( रोम 8:13).

2 थेस्सलनी 1:11असे म्हणते कीं, आपले चांगुलपणाचे मनोदय आणि विश्वासाचे कार्य हें देवाच्या सामर्थ्याने पूर्ण होतात. म्हणून “चांगुलपणाचे मनोदय” आणि “कार्य” या शब्दाचे महत्व रद्द होत नाहीं. आम्हांला झालेल्यां ह्या पाचारणाला योग्य असे चालण्याकरिता, नीतीमत्वाला शोभेसे कृत्य करण्याच्या सत्संकल्पामध्यें आपल्यां इच्छेला सक्रियपणे सहभागी करणे आवश्यक असते.

जर तुमच्या जीवनात प्रदीर्घ काळापासून काहीं पाप आहे, किंवा तुम्हीं काहीं तरी चांगले कर्म करण्याकडें दुर्लक्ष करत आहात कारण तुम्हीं त्याच्याशी लढा न देताच विजय मिळवू पाहता, तर तुम्हीं तुमच्या आज्ञाभंगामध्यें वाढ करीत आहात. देव त्याच्या सामर्थ्याचा वापर तेव्हांच करतो, जेव्हां आपण आपल्यां इच्छेचा वापर करतो, व आपल्यां इच्छेद्वारें देवाचे सामर्थ्य आपल्यां चांगुलपणाच्या मनोदयातून – आपल्यां सदभावातून आणि योजना आणि उद्देश यातून कार्य करते.

यासाठींच, जे लोक देवाच्या सार्वभौमतेमध्यें विश्वास ठेवतात त्यांनी त्यांच्या इच्छांना पावित्र्यासाठीं झटण्याकरिता सहभागी करण्यास भिऊ नये. “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हांला सांगतो कीं, पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाहीं.” (लुक 13:24). केवळ विश्वासाने प्रयत्न करीत रहा, व आपल्यां प्रयत्नाद्वारें इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्यां सत्यसंकल्पासाठीं साधून देणारा तो देव आहे (फिलिप्पै 2:13).

2 March : अभिवचनांनी आपणांस सज्ज करा

Alethia4India
Alethia4India
2 March : अभिवचनांनी आपणांस सज्ज करा
Loading
/

” जे आत्म्याने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. ” ( मत्तय 5:8 )

जेव्हां पौल म्हणतो कीं “आत्म्याने” शरीराची कर्मे ठार मारा ( रोम 8:13 ), याचा अर्थ मी अश्या प्रकारे घेतो कीं, आत्म्याच्या शस्त्रसामग्रीमधील एक शस्त्र ज्याचा उपयोग आपण ठार मारण्यासाठीं केला पाहिजे तें शस्त्र म्हणजे “तलवार‘, जे “देवाचे वचन होय” (इफिस 6:17 ).

तर मग, जेव्हां आपले शरीर एखाद्या भयामुळे किंवा मोहामुळे पाप करण्यास प्रवृत्त होते तेव्हां आपण आत्म्याच्या तलवारीने त्या भयाला आणि त्या मोहाला मारून टाकायचे आहे. माझ्या अनुभवा नुसार, पाप ज्या गोष्टीचे अभिवचन देते आपण त्याचापेक्षा उच्च अभिवचनाद्वारें त्या अभिवचनाच्या मुळावर प्रहार करतो.

उदारणार्थ, जेव्हां मला निषिद्ध अश्या शारीरिक वासनेची लालसा होत असते, तेव्हां या पापाच्या आनंदाच्या मुळावर प्रहार करण्यासाठीं मी “आत्म्याने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील” (मत्तय 5:8),  या वचनाचा वापर तलवारी प्रमाणे करतो. शुद्ध अंतकरणाने देवाला पाहण्याचा जो आनंद आहे त्याचें मी स्मरण करतो, आणि पापाच्या क्षणिक, उथळ आणि पीडा देणार्‍या परिणामांची आठवण ठेवतो, आणि त्याच्याद्वारें देव मला पापाच्या मोहावर विजय मिळविण्यांस सहाय्य करतो.

पापासोबत यशस्वीरित्या युद्ध करण्याकरिता, येणार्‍या मोहांवर विजय मिळवण्यासाठीं त्या क्षणाला लागू पडतील अशी देवाची अभिवचनें हाताशी असणें हे एक महत्वाचे शस्त्र आहे.

तथापि, असेहि प्रसंग असतांत जेव्हां आपल्यांला त्या प्रसंगाशी संबंधित अशी वचनें आठवत नाहींत. आणि पवित्र शास्त्रामधून आपल्यांकरिता अनुरूप असे वचन बघण्यासाठीं वेळ नसतो. अश्या वेळेला त्या भयाला किंवा मोहाला बळी पडून भरकटण्यापासून वाचण्यासाठीं आपल्यां मनाच्या भांडारात देवाच्या वचनांची सर्वसाधारण माहिती तयार असने गरजेचे आहे.

खाली ती चार अभिवचनें आहेत ज्यांचा पापाविरुद्ध लढा देण्यासाठीं मी सर्वाधिक उपयोग केलेंला आहें :

यशया 41:10, “तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्यां नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.”

फिलिप्पैकरांस 4:19, “माझा देव आपल्यां संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारें पुरवील.”

आणि फिलिप्पैकरांस 3:8 मधील स्पष्ट अभिवचन, “तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाहीं हानी असे समजतो.”

आणि अर्थातच, मत्तय 5:8, “जे आत्म्याने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.”

आपल्यां ज्ञानाच्या भांडारात सतत देवाच्या अभिवचनांची भर टाकींत जा. पण तुमच्या जीवनात देवानें आशीर्वादित केलेलीं जी मोजकीं अभिवचनें आहेत त्यांचा विसर पडू देऊ नका. दोन्हीकडें लक्ष्य ठेवा. जुन्या अभिवचनांनिशी सदैव तयार असा. आणि प्रत्येक पहाटे नव्या दिवसाला सामोरे जाण्याकरीता नवीन अभिवचनांचा शोध करा.

31 जानेवारी : दु:खाचे पाच उद्देश

Alethia4India
Alethia4India
31 जानेवारी : दु:खाचे पाच उद्देश
Loading
/

परंतु आपल्याला ठाऊक आहे कीं, देवावर प्रीति करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. (रोमकरांस 8:28)

आमच्यावर येणाऱ्या तात्कालिक व हलक्या संकटाची लहान लहान कारणे आम्हांला क्वचितच माहीत असतात, परंतु तरी आपण विश्वासांत का टिकून राहतो याची लहान लहान कारणे बायबल आपल्याला सांगते.

त्यांपैकी काही कारणें लक्षात ठेवण्याचा एखादा मार्ग शोधून काढणे बरे राहील जेणेकरुन ज्यां ज्यां प्रसंगी आपल्यावर अचानक संकट किंवा दु:ख येते किंवा विश्वासांतील आपल्या प्रिय जनांना त्यांच्या दुःखात मदत करण्याची संधी मिळते, त्यां त्यां प्रसंगी आपण देवाने आपल्याला दिलेल्या काही सत्यांची आठवण करू शकतो ह्यासाठी कीं आपण आशा सोडू नये.

ती कारणें लक्षात ठेवण्याचा एक मार्ग आहे: इंग्रजी शब्दांचे 5 R’ (किंवा उपयुक्त असल्यांस त्यांपैकी फक्त तीन निवडा आणि त्यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा).

आपल्याला जें दु:ख होतांत त्यांमागे असलेले देवाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत:

Repentance: म्हणजे पश्‍चात्ताप – दुःख हे आपल्यासाठी आणि इतरांसाठीं देवाची हाक आहे कीं आपण पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीला देवाच्या वर ठेवण्यापासून वळावे. लूक 13:4-5:

“किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणार्‍या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नव्हते; पण जर तुम्हीं पश्‍चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल.”

Reliance  म्हणजे भिस्त : दुःख या गोष्टीची हाक आहे कीं आपण ह्या जगाच्या जीवन-रक्षक साधनांवर नव्हे तर देवावर भरवसा ठेवावा. 2 करिंथकरांस1:8-9:

आम्हीं आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो; इतके की आम्हीं जगतो की मरतो असे आम्हांला झाले. फार तर काय, आम्हीं मरणारच असे आमचे मन आम्हांला सांगत होते; आम्हीं स्वत:वर नव्हे तर मृतांना सजीव करणार्‍या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे झाले

Righteousness म्हणजे नीतिमत्त्व : दुःख हे आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याची शिस्त आहे जी तो आपण त्याच्या नीतिमत्वाचे आणि पवित्रतेचे वाटेकरी व्हावें म्हणून लावतो. इब्री 12:6, 10-11:

“कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीति करतो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो.” . . . तो करतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.

Reward म्हणजे प्रतिफळ : दुःख आपल्यासाठी स्वर्गात एक मोठे प्रतिफळ उत्पन्न करत आहे जे आपल्याला इथें होत असलेल्या प्रत्येक दुखाच्या तुलनेने हजारपट मोठे आहे. 2 करिंथकरांस 4:17:

कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते.

शेवटी, Reminder म्हणजे स्मरणपत्र: दु:ख आपल्याला याची आठवण करून देते की देवाने आपल्या पुत्राला दु:ख भोगण्यासाठी जगात पाठवले ह्यासाठी की आपल्यावर येणारे दुःख हे देवाचा न्याय नसून त्याचे शुद्धीकरणाचे कार्य असावें. फिलिप्पैकरांस 3:10:

. . . हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी.

यास्तव, ख्रिस्ती अंत:करण दुःखात जर ओरडत असेल, “का?” तर हे समजण्यासारखे आहे कारण आपल्या जी दु:खे होतांत त्यांची  तात्कालिक व हलकी कारणे आपल्याला माहित नसल्यामुळे – म्हणजे, आताच का, असे का, इतक्या दिवसांपासून का? परंतु ह्या लहान लहान कारणांविषयी आपल्याला असलेल्या या अज्ञानामुळे आपण देवाच्या त्या मोठ्या मदतीकडे दुर्लक्ष करूं नये जी तो आमची त्याच्या वचनांत ह्या दुखामागे असलेला त्याचा हेतू प्रकट करून करतो.

“तुम्हीं ईयोबाच्या धीराविषयी ऐकलें आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्हीं पाहिला आहे; ह्यावरून ‘प्रभू फार कनवाळू व दयाळू’ आहे हे तुम्हांला दिसून आले” (याकोब 5:11).