ArchivesSolid Joys

12 May : आपण आपल्या वैर्‍यांवर प्रीति का करावी

Alethia4India
Alethia4India
12 May : आपण आपल्या वैर्‍यांवर प्रीति का करावी
Loading
/

“परंतु तुम्हा ऐकणार्‍यांस मी सांगतो, तुम्हीं आपल्या वैर्‍यांवर प्रीति करा; जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा.” (लूक 6:27)

ख्रिस्ती लोकांनी त्यांच्या वैर्‍यांवर प्रीति करायची आहे आणि त्यांचे बरे करायचे आहे, ह्या मागे दोन मुख्य कारणे आहेत.

त्यातील एक कारण हे कीं, त्याद्वारें देव कोण आहे हे प्रकट होईल. देव हा दयाळू आहे.

  • कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगववतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. (मत्तय 5:45)
  • आमच्या पातकांच्या मानाने त्यानें आम्हांला शासन केलें नाहीं, त्यानें आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिलें नाहीं. (स्तोत्र 103:10)
  • आणि तुम्हीं एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवानें ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केलीं आहे तशी तुम्हींही एकमेकांना क्षमा करा. (इफिसकरांस पत्र 4:32)

म्हणून, जेव्हां ख्रिस्ती लोक देवाच्या सामर्थ्याद्वारें अशा प्रकारे जीवन जगतात, तेव्हां आपण देव कसा आहे हे दाखवून देतो.

दुसरे कारण हे आहे कीं, ख्रिस्ती लोकांचे मन देवा मध्यें संतुष्ट असते आणि ते सूड उगवणे, तसेंच स्वतःचे गौरव करून घेणें किंवा संपत्ति किंवा जगिक सुरक्षिततेच्या लालसेने चालत नाहीं.

देव आपली संपूर्ण संतुष्टी करणारा ठेवा बनलेला असतो त्यामुळें आपण आपल्या वैर्‍यांना आपल्या गरजे प्रमाणे आणि आपल्या असुरक्षिततेने वागवत नाहीं, तर आपण आपल्या देवाच्या संतुष्टी करण्यार्‍या गौरवाच्या परिपूर्णतेने वागवतो.

इब्री 10:34,  “कारण बंदिवानांबरोबर तुम्हीं समदुःखी झालात आणि [स्वर्गात] आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्हीं आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. [ म्हणजेंच तुम्हीं तुमच्यां वैर्‍यांवर सूड घेतला नाहीं ].” हे जग आपले घर नाहीं आहे आणि देवच आपले संपूर्ण संतुष्टी करणारे पारितोषिक आहे, ह्या गोष्टीमधील भरवसा सूड घेण्याच्या दाट सक्तीच्या भावनेला काढून टाकतो. आपल्याला हे ठाऊक आहे कीं, “अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे.”

मग, वैर्‍यांवर प्रीति करण्याच्या ह्या दोन्ही कारणांमध्यें मुख्य गोष्ट ही पाहतो कीं, देव जसा आहे तसाच दयाळू आणि गौरवीरित्या सर्व संतुष्टी करणारा दाखवला आहे.

आपले दयाळू असण्याचे सामर्थ्य हे आहे कीं आपण आपल्यावर झालेंल्या देवाच्या दयेने तृप्ती पावलो आहोत. आणि दयाळू असण्याचे सर्वोच्च कारण, देवाला गौरव देणे हे आहे, म्हणजेंच, त्याच्या दये करिता त्याला उंच करण्यास इतरांची मदत करणे होय. आपल्याला हे दाखवायचे आहे कीं, देव हा उत्कृष्ट आहे. आपल्याला देवाच्या दयेने, आपल्या प्रीति द्वारें देव महान आहे हे इतरांना दाखवायचे आहे. 

11 May : मेजवानीस जा

Alethia4India
Alethia4India
11 May : मेजवानीस जा
Loading
/

परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा ! ( स्तोत्र 34:8 )

तुम्हीं जे असें म्हणता कीं तुम्हीं देवाच्या गौरवाची चव कधीच चाखली नाहीं, मी तुम्हाला हे सांगतो कीं तुम्हीं त्याच्या कृपेच्या चवीचा थोडासा आस्वाद निश्चित घेतला आहे.

तुम्हीं कधी वर आकाशाकडे पाहिले आहे का? तुम्हाला कोणी आलिंगन दिलें आहे का? तुम्हीं कधी गरम शेकोटीच्या पुढे बसला आहात का? तुम्हीं कधी जंगलातून चालत गेला आहात का, तलावाकाठी बसला आहात का, उन्हाळ्यात झोपाळ्यामध्यें बसलात का? गरमीच्या दिवसात तुमचे आवडीचे पेय प्यायलात का किंवा काही तरी रुचकर खाल्ले आहे का?

आपली प्रत्येक इच्छा स्वर्गातील गौरवाचा आस्थायुक्त किंवा विकृत मोह असतो.

तुम्हीं म्हणाल कीं तुम्हीं देवाच्या गौरवाचा अनुभव कधी घेतला नाहीं. मी म्हणतो, तुम्हीं त्याच्या गौरवाचा आस्वाद घेतला आहे. मग आता मेजवानीस जा. खुद्द देवाकडे जा.

तुम्हीं सावली पाहिली आहे, आता मुख्य तत्व पाहा. तुम्हीं उबदार सूर्य प्रकाशात चालला आहात, मग आता सूर्याकडेच वळा – होय, सुवार्तेच्या सौरक्षक आणि टोकदार भिंगा मधून. तुम्हीं सगळीकडे देवाच्या गौरवाचा प्रतिध्वनी ऐकलेला आहे, आता तुमचे मन त्याच्या अस्सल संगीताकडे लावा.

तुमचे मन जुळवण्यासाठीं सर्वोत्तम ठिकाण आहे, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. “आम्हीं त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता” (योहान 1:14).

तुम्हाला देवाचे गौरव सर्वाधिक एकवटलेले पाहायचे असेंल तर, शुभवर्तमानातील येशूकडे पाहा. आणि विशेषत: कृसाकडे पाहा. हे तुमचे डोळे एकाग्र करेल, तुमचे मन त्याला जुळेल आणि तुम्हाला आस्वाद घेण्यास लावेल, जेणे करून तुम्हीं देवाचे गौरव सगळीकडे, पाहू, ऐकू आणि चाखू शकाल.

ह्या करिताच तुमची निर्मिती झाली आहे. मी तुम्हाला विनंती करतो : तुमचे जीवन आभासी गोष्टींकडे व्यर्थच घालवू नका. देवानें तुम्हाला त्याचे गौरव पाहण्यासाठीं आणि त्याचा आनंद घेण्यासाठीं बनवले आहे. तुमच्यां अंत:करणाने सर्व गोष्टीं मध्यें त्याचाच शोध करा. तुम्हीं त्याची थोडीशी चव चाखली आहे. आता पूर्ण मेजवानीचा आस्वाद घ्यावयांस जा.

10 May : देवाच्या नावाकरिता लोक

Alethia4India
Alethia4India
10 May : देवाच्या नावाकरिता लोक
Loading
/

“परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरता काही लोक काढून घ्यावेत म्हणून देवानें त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनाने सांगितले आहे.” ( प्रेषितांची कृत्ये 15:14 )

देवाच्या नावाच्या केंद्रीयतेवर जास्त जोर दिला गेला असें म्हणणे क्वचितच शक्य आहे, म्हणजें मंडळीच्या सुवार्ता कार्यातील प्रेरणेसाठीं देवाच्या कींर्तीचे महत्व खूप आहे.

जेव्हां प्रेषितांची कृत्ये 10 मध्यें अशुद्ध प्राण्यांच्या दृष्टांताने पेत्राच्या जगाची उलथा पालथ झाली, आणि देवानें त्याला धडा दिला कीं त्यांने यहुदीं बरोबर परराष्ट्रीयांना देखील सुवार्ता सांगायची आहे तेव्हां तो यरूशलेमात परत गेला आणि इतर प्रेषितांना सांगू लागला कीं हे सर्व देवाच्या त्याच्या नावासाठीं असलेल्या आवेशामुळें आहे. आपल्याला हे ठाऊक आहे कारण याकोबाने त्याच्या संदेशाचा सारांश अश्या प्रकारे केला, ‘मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, “बंधुजनहो, माझे ऐका. परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरता काही लोक काढून घ्यावेत म्हणून देवानें त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनाने सांगितले आहे.” ( प्रेषितांची कृत्ये 15:13-14 ).

पेत्राचे हे म्हणणे कीं देवाच्या उद्देशासाठीं तो त्याच्या नावाकरिता लोक एकत्र करत आहे; यामध्यें आश्चर्य नाहीं कारण प्रभू येशूनें काही वर्षापूर्वी  पेत्राला कधीच विसरता न येणारा धडा दिला होता.

तुम्हाला आठवत असेंल, जेव्हां एक श्रीमंत तरुण येशूच्या मागे जाण्यांस नकार करून माघारी फिरून निघून गेला, तेव्हां पेत्राने त्याला म्हटले, “पाहा, आम्हीं सर्व सोडून आपल्यामागे आलो आहोत, [ या श्रीमंत मनुष्याप्रमाणे नाहीं ]  तर आम्हांला काय मिळणार?” (मत्तय 19:27). येशूनें सौम्य रीतीने त्याची कानउघाडणी केलीं, त्याला हे म्हणायचे होते कीं, मनुष्याच्या पुत्राच्या नावासाठीं जगत असताना कोणतेच बलिदान सर्वोत्तम नाहीं. तो म्हणाला, “आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत त्याला शंभरपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल” ( मत्तय 19:29).

येथें सत्य अगदी स्पष्ट आहे : देव त्याच्या सर्वसमर्थ आनंदानिशी विश्वव्यापी उद्देशाने, सर्व जाती, भाषा आणि  राष्ट्रांतून त्याच्या नावासाठीं लोक एकत्र करण्याच्या हेतूने शोध करीत आहे ( प्रकटीकरण 5:9; 7:9). राष्ट्रांमध्यें त्याच्या नावाची कींर्ती व्हावीं म्हणून त्याच्यामध्यें न विझणारा आवेश आहे.

म्हणून, जेव्हां आपण आपल्या प्रीतिची त्याच्या इच्छे बरोबर सांगड घालतो, आणी त्याच्या नावाकरिता जगिक प्रसिद्धी आणि सुख सोडून त्याच्या जागतिक उद्देशात सामील होतो, तेव्हां देवाची सर्वसमर्थ वचनबद्धता आपल्या पुढे एका निशाण्याप्रमाणे जाते, आणि जरी आपल्याला खूप संकटातून जावे लागले तरी आपण अपयशी होऊ शकत नाहीं ( प्रेषित 14:22; रोम 8:35-39).

9  May : देवावर प्रीति करणे म्हणजें काय

Alethia4India
Alethia4India
9  May : देवावर प्रीति करणे म्हणजें काय
Loading
/

हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठीं तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. ( स्तोत्रसंहिता 63:1-2 )

दाविदासारख्या अंत:करणाचे समाधान केवळ देवच करू शकतो. आणि दाविद हा देवाच्या अंत:करणाचा माग घेणारा पुरुष होता. आपली निर्मिती यासाठींच झाली आहे.

देवावर प्रीति करणे म्हणजें काय याचे सार हेच आहे : देवामध्यें समाधानी असणे. देवामध्यें – तो देणार्‍या भेटीं मध्यें नाहीं, पण देवामध्यें, त्याच्या गौरवी व्यक्तित्वा मध्यें!

देवावर प्रीति करणे यात त्याच्या आज्ञा पाळणे हे आलेच; त्याच बरोबर त्याच्या वचनावर विश्वास ठेवणे; तसेंच त्याच्या सर्व दानांसाठीं त्याचे उपकार मानणे. पण हे सर्वे वरवरचे आहे. देवावर प्रीति करण्याचे मुलतत्व म्हणजें तो जसा आहे त्यासाठीं त्याचे कौतुक वाटणे आणि त्याचा आनंद घेणे. आणि देवा मधील हा आनंदच आपल्या इतर प्रतिसादांना त्याच्या करिता गौरवी करतो.

आपल्याला हे सर्व अंतर्ज्ञानाने आणि वचनाद्वारें ठाऊक आहे. आपले प्रियजन जे आपले सेवा करीत असतात, तेव्हां आपल्याला कधी सन्मान मिळाल्या सारखे वाटते , जेव्हां ते एक बंधन म्हणून करत  असतात का जेव्हां ते सहभागीतेतिल आनंदाकरिता करतात तेव्हां?

माझ्या पत्नीला खूप सन्मानित तेव्हां वाटते जेव्हां मी म्हणतो, “मला तुझ्या सोबत वेळ घालवल्याने खूप आनंद होतो.” माझा आनंद हा तिच्या उत्कृष्टतेचा प्रतिध्वनि आहे. आणि देवासोबत पण असेंच आहे. आपण जेव्हां त्याच्यामध्यें सर्वाधिक समाधानी असतो, तेव्हां तो आपल्यामध्यें सर्वाधिक गौरवला जातो.

आपण कुणीच देवामध्यें परिपूर्ण समाधान प्राप्त करू शकलो नाहीं. जेव्हां मला कोणत्या भौतिक गोष्टीला किंवा समाधांनाला गमवावे लागते तेव्हां माझ्या कुरकुरण्यावर मी खूप दु:खी होतो. पण मी जाणले आहे कीं देव हा चांगला आहे. देवाच्या कृपेने आनंदाच्या सार्वकालिक झर्‍याला मी जाणतो. आणि त्यामुळें मला माझे दिवस लोकांना ह्या आनंदाचे आमिष देण्यात घालवायला आवडते, जो पर्येंत ते माझ्या बरोबर हे म्हणत नाहींत, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठीं मी झटेन; ते हे कीं, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजें मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन” ( स्तोत्रसंहिता 27:4 ).

8 May : त्याच्या नीतिनियमांमध्यें आनंद

Alethia4India
Alethia4India
8 May : त्याच्या नीतिनियमांमध्यें आनंद
Loading
/

देवावर प्रीति करणे म्हणजें त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहींत. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजें आपला विश्वास. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे? ( 1 योहन 5:3-5 ).

ह्या वचनात जें स्पष्ट केलें आहे ते म्हणजें हे कीं नवा जन्म झाल्यानंतर – देवापासून जन्मल्यानंतर – त्याच्या ज्या आज्ञा आपल्याला ओझ्याप्रमाणे वाटत होत्यां त्या आता आपला आनंद बनतांत. हा बदल कसा झाला?

नव्याने जन्मल्याने देवाच्या आज्ञा ओझं वाटण्याऐवजी आनंददायक कश्या वाटू लागतात?

प्रेषित योहन म्हणतो, “ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजें – आपला विश्वास” (1 योहन 5:4). दुसर्‍या शब्दात सांगयाचे झालें तर, जो देवापासून जन्मला आहे तो कश्या प्रकारे आज्ञापालनाच्या जगिक ओझ्यावर जय मिळवतो, तर ते विश्वासाला जन्म देऊन. याची पुष्टी 1 योहन 5:5 मध्यें केलीं आहे, तिथें आपण वाचतो, “येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो तो देवापासून जन्मला आहे.”

आपला विश्वास आपण देवापासून जन्मलेले आहोत याचा पुरावा आहे. आपण देवावर विश्वास ठेवून स्वत: चा नवा जन्म घडवत नाहीं. देव आपला नवा जन्म घडवून आणतो आणि मग आपल्यामध्यें विश्वास ठेवण्याची इच्छा निर्माण करतो. जसा पेत्र त्याच्या पहिल्या पत्रात सांगतो, “जिवंत आशा प्राप्त होण्यासाठीं आपल्याला पुन्हा जन्म दिला” (1 पेत्र 1:3). आपली जिवंत आशा, किंवा आपला भावी कृपेवरील विश्वास, हे आपल्या नवीन जन्मादवारे देवानें घडवीलेले कार्य आहे.

जेव्हां योहान म्हणतो “जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते,” आणि मग तो पुढे सांगतो कीं, “ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजें – आपला विश्वास ” (1 योहान 5:4). याचा अर्थ मी असा घेतो कीं देवानें नवीन जन्मा द्वारें आपल्याला जगावर जय मिळवण्यासाठीं समर्थ केलें – ते अश्या प्रकारे कीं, आपली आज्ञा पाळण्याच्या जगिक नाखुशीवर जय मिळवून. आपल्यामध्यें विश्वास निर्माण करून नवीन जन्म हे घडवून आणतो, ज्याचा पुरावा म्हणजें आपली प्रवृत्ती बदलून गेल्याने आपल्याला देवाच्या आज्ञा पाळणे ओझ्याप्रमाणे न वाटता, त्या आपल्याला संतोष देतात. यास्तव, तो विश्वास आहे जो आपल्यातील आणि देवामधील आणि त्याच्या इच्छांमधील जन्मजात शत्रुत्वावर जय मिळवतो, आणि त्याच्या आज्ञा पाळण्याकरिता आपल्याला मुक्त करतो, जेणे करून आपण स्तोत्रकर्त्या सोबत म्हणू शकू. “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे” ( स्तोत्र 40:8 ).

30 April : आनंदासाठीं पंधरा युक्त्या

Alethia4India
Alethia4India
30 April : आनंदासाठीं पंधरा युक्त्या
Loading
/

“जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत.” (स्तोत्र 16:11)

पाप आणि वेदना यांनी ग्रस्त असलेल्या या जीवनात आनंद मिळविणें म्हणजें एक संघर्ष. अगदी विश्वासाप्रमाणे. आणि पौल सुद्धा तीमथ्याला म्हणतो, ”विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर“ (1 तीमथ्य 6:12). तीच गोष्ट आनंदाची आहे. त्यासाठीं आपण काम केलें पाहिजे आणि त्यासाठीं संघर्ष केला पाहिजे. पौल करिंथकरांना म्हणाला, “आम्हीं तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहोत” (2 करिंथ 1:24)

तर मग आपण आनंदासाठीं कसे लढणार? येथे 15 निर्देशक आहेत.

1. हे समजून घ्या कीं देवाठायीं खरा आनंद हें दान आहे.

2. समजून घ्या कीं आनंदासाठीं अथक संघर्ष करणें अगत्याचे आहे. आणि या पहिल्या दोन निर्देशकांच्या विरोधाभासामुळे निराश होऊ नका!

3. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे, तुमच्या जीवनातील सर्व प्रगट पापांवर विजय मिळविण्याचा संकल्प करा.

4. धीट अपराधीपणाचे रहस्य जाणण्यास शिका – नीतिमान ठरलेल्या पापी मनुष्यासारखे कसे लढायचे.

5. हे समजून घ्या कीं लढा हा मुख्यतः पाहण्याचा लढा आहे – देव जो आहे हे पाहण्याचा.

6. देवाच्या वचनावर रात्रंदिवस मनन करा.

7. मोकळ्या अंतःकरणाने, डोळे उघडे ठेवून आणि देवाकडें ओढा ठेवून आग्रहाने आणि सतत प्रार्थना करा.

8. स्वतःचे ऐकण्यापेक्षा स्वतःला उपदेश करण्यास शिका.

9. देवामध्ये आनंद करणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवा जे तुम्हांला देवाकडें पाहण्यास आणि लढा लढण्यास मदत करतात.

10. देवाच्या वरकरणी अनुपस्थितीच्या रात्री धीर धरा.

11. विश्रांती घ्या, व्यायाम करा आणि योग्य आहार घ्या जे देवानें तुमच्या शरीरासाठीं ठरविले आहे.

12. निसर्गातील देवाच्या प्रकटीकरणाचा योग्य उपयोग करा – रानात फेरफटका मारा.

13. देवविषयक उत्तम पुस्तके आणि थोर संतांची जीवनचरित्रे वाचा.

14. इतरांच्या फायद्यासाठीं कठीण आणि प्रेमळ गोष्टीं करा (तुमची मौखिक साक्ष आणि दयेची कृत्ये).

15. ख्रिस्तासाठीं जागतिक दर्शन (दृष्टांत) प्राप्त करा आणि अपरिचित लोकांसाठीं स्वतःस ओतून द्या.

29 April : दिवस जवळ आला आहे

Alethia4India
Alethia4India
29 April : दिवस जवळ आला आहे
Loading
/

“रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे” (रोम 13:12)

दुःख भोगत असलेल्या ख्रिस्ती लोकांसाठीं ही आशा देणारी वचनें आहेंत. ज्या ख्रिस्ती लोकांना स्वतःच्या पापाचा तिटकारा वाटतो आणि पापापासून मुक्त होण्याची उत्कंठा बाळगत आहेत त्यांच्यासाठीं हे आशेचे अभिवचन आहे. जे इच्छा धरतात कीं अंतिम शत्रू, म्हणजें मृत्यूवर मात करून त्याला अग्नीच्या सरोवरात टाकले जावे त्या ख्रिस्ती लोकासाठीं हे आशेचे वचन आहे (प्रकटीकरण 20:14). वाह!

हें त्यां सर्वांसाठीं आशेचे अभिवचन कसे काय आहे?

“रात्र” अंधाराच्या या युगाचे आणि त्यातील सर्व पाप, दुःख आणि मरण यांचे प्रतीक आहे. आणि पौल याबद्दल काय म्हणतो? ”रात्र सरत आली आहे.” पापाचे आणि दुःखाचे आणि मृत्यूचे युग संपुष्टात येत आहे. नीतिमत्व आणि शांती आणि संपूर्ण आनंदाचा दिवस उदयास येत आहे.

तुम्हांला वाटेल कीं, “2,000 वर्षे दीर्घकालीक पहाटेसारखी वाटतात.” एका दृष्टिकोनातून हे तसेच आहे. आणि आम्हीं ओरडतो, हे परमेश्वरा, किती काळ हे असेच राहणार? परंतु पवित्र शास्त्राची विचारसरणी “किती काळ!” या विलापाच्या पलीकडें आहे. ती जगाच्या इतिहासाकडें वेगळ्या दृष्टीकोनाने पाहते.

मुख्य फरक हा आहे कीं “दिवस” – ख्रिस्ताचे नवीन युग – खरोखरच येशू ख्रिस्तामध्ये उदय पावले आहे. येशू हा या पतित युगाचा शेवट आहे. म्हणजें, या पतित युगाचा शेवट जसा त्यानें या जगात प्रवेश केला. येशू जेव्हां मेला आणि पुन्हा जिवंत झाला तेव्हां त्यानें पाप आणि वेदना आणि मृत्यू आणि सैतान यांचा पराभव केला. युगांची निर्णायक लढाई संपली आहे. राज्य आले आहे. सार्वकालिक जीवन आले आहे.

आणि जेव्हां दिवस उगवतो – जसे येशूच्या येण्याच्या वेळी होते – कोणीही दिवसाच्या येण्याबद्दल शंका करू नये. पहाटेने 2,000 वर्षे काढली तरीही नाहीं. 2 पेत्र 3:8 मध्ये पेत्राने म्हटल्याप्रमाणे, ”तरी प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्हीं विसरू नका कीं, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि ‘हजार वर्षे’ एका ‘दिवसासारखी’ आहेत.“ पहाट झालीं आहे. दिवस उगवला आहे.. सूर्य उगवून पूर्ण दिवस होण्याला कोणतीही गोष्ट रोखू शकत नाहीं.

27 April : गाणाऱ्या देवाची मुलें

Alethia4India
Alethia4India
27 April : गाणाऱ्या देवाची मुलें
Loading
/

“मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनांच्या डोंगराकडें निघून गेलें” (मार्क 14:26).

तुम्हीं येशूला स्तोत्र गातांना ऐकू शकता का?

तो खालच्या स्वरात गाऊ शकतो कीं उंच स्वरात? त्याच्या गाण्याची पद्धत ग्रामीण व्यक्ती सारखी दणकट होती का? कि तो एकदम सपष्ट सुरांत गात असें?

तो पित्याची स्तुति-गीतें गात असतांना आपले डोळे बंद करित असे का? किं तो आपल्या शिष्यांच्या डोळ्यांत पाहून आणि त्यांची खोल सौहार्द्राप्रत वाणी एकून स्मितहास्य करीत गात असे?

गीताची सुरूवात नेहमी तोंच करीत असे का? किं पेत्र वा याकोब, अथवा कदाचित मत्तय सुरूवात करीत असे?

ओह, येशूचे गाणे ऐकण्यासाठीं मी किती तळमळतोय! मला असे वाटते कीं जर त्यानें आमच्यां विश्वात त्याच्या मूळ आवाजात स्वर उंचविला असता तर ग्रह त्यांच्या कक्षेतून उसळी मारून बाहेर येतील. पण आपले एक राज्य आहे जे हलविता येत नाहीं; म्हणून, प्रभु, पुढे जा, आणि स्तोत्र गा!

ख्रिस्ती विश्वास हा स्तोत्रें गाणाराच विश्वास आहे. ख्रिस्ती विश्वासाच्या संस्थापकाने गायले. स्तोत्रें गाणे त्यानें आपल्या पित्याकडून शिकले. ते सनातन काळापासून एकत्र गात आहेत यांत शंका नाहीं. तुम्हांला असे वाटत नाहीं का? त्रिएक परमेश्वराची स्वतःमधील असलेली सहभागीता सार्वकालिक आनंदाचे स्तोत्र गाणार नाहीं का?

पवित्र शास्त्र म्हणते कीं जेव्हां आम्हीं स्तोत्रें गातो, आमचा उद्देश्य “आनंदाने उच्च स्वराने गायन करणे” हाच असतो (1 इतिहास 15:16). विश्वमंडळात परमेश्वरापेक्षा अधिक आनंद कोणालाही नाहीं. तो अतिशय आनंदित आहे. तो सनातन काळापासून त्याच्या स्वतःच्या परिपूर्णतेच्या विस्तीर्ण दृश्यात आनंदित आहे जी त्याच्या पुत्राच्या ईश्वरत्वात पूर्णपणे प्रतिबिंबित आहे.

देवाचा स्वतः मध्यें असलेला आनंद आमच्यां कल्पनेपलीकडें सामर्थ्यशाली आहे. तो परमेश्वर आहे. जेव्हां तो बोलतो, तेव्हां आकाशगंगा अस्तित्वात येतात. आणि जेव्हां तो आनंदाने गातो, तेव्हां विश्वाच्या सर्व पदार्थमात्रांत आणि गतीमध्ये अस्तित्वात असलेल्या ऊर्जेपेक्षा जास्त उर्जा मुक्त होते.

जर त्यानें आपल्यासाठीं त्याच्याठायीं आपल्या हृदयाचा आनंद व्यक्त करण्यासाठीं स्तोत्रें गाणे नेमून दिलें आहे, तर त्याचे कारण हे नाहीं का कीं तो त्याच्या आत्म्याद्वारे त्याच्या पुत्रामध्ये त्याच्या स्वतःच्या स्वरूपात त्याच्या स्वतःच्या अंतःकरणाचा आनंद गाण्याद्वारे व्यक्त करणे जाणतो? आपण स्तोत्रें गाणारे लोक आहोत कारण आपण स्तोत्रें गाणाऱ्या देवाची लेकरें आहोत.

26 April : तुमची घडण ही देवासाठीं झालीं

Alethia4India
Alethia4India
26 April : तुमची घडण ही देवासाठीं झालीं
Loading
/

“परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाहीं, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केलें आहे.” (1 शमूवेल 12:22).

देवाचे नाव कित्येकदा त्याच्या प्रतिष्ठेचा, त्याच्या ख्यातीचा, त्याच्या नावलौकिकाचा, उल्लेख करते. आपण जेव्हां असे म्हणतो कीं एखादी व्यक्ती स्वतःचे नाव कमावित आहे तेव्हां आपण अशाच प्रकारे “नाव” या शब्दाचा उपयोग करतो. किंवा आम्हीं कधी कधी म्हणतो, ती “नावाची” एक प्रत किंवा ब्रँड आहे. आमच्यां म्हणण्याचा अर्थ एक मोठी प्रतिष्ठा असलेली प्रत किंवा ब्रँड. मला असें वाटते कीं जेव्हां शमूवेल म्हणतो कीं परमेश्वराने इस्राएली लोकांस “आपले” प्रजाजन केलें आहे आणि तो “आपल्या थोर नामास्तव” त्यांचा त्याग करणार नाहीं, तेव्हां 1 शमुवेल 12:22 मध्ये शमुवेलाच्या बोलण्याचा हाच अर्थ असावा.

देवाच्या नामाप्रीत्यर्थ त्याच्या उत्साहाविषयी विचार करण्याच्या या पद्धतीची इतर अनेक शास्त्रलेखांत पुष्टी झालीं आहे.

उदाहरणार्थ, यिर्मया 13:11 मध्ये देव इस्राएलाचे वर्णन कंबरेस लटकलेला पट्टा किंवा कमरबंद असे करतो, ज्याला देवानें आपले नाम, स्तुती व भूषण ह्यांस कारण व्हावे म्हणून निवडले, जरी अशी वेळ होती जेव्हां इस्राएल काहीं काळसाठीं अयोग्य ठरला होता.”इस्राएलाचे सर्व घराणे व यहूदाचे सर्व घराणे ह्यांनी माझी प्रजा व्हावे, आणि माझे नाम, स्तुती व भूषण ह्यांना कारण व्हावे म्हणून, कमरबंद जसा मनुष्याच्या कंबरेस लगटलेला असतो तसे त्यांनी मला लगटून राहावे असे मी केलें, तरी त्यांनी मानले नाहीं, असे परमेश्वर म्हणतो.“ इस्राएलास का निवडण्यात आले होते आणि देवाचे वस्त्र का ठरविण्यात आले होते? यासाठीं कीं त्यानें देवाचे “नाम, स्तुती व भूषण ह्यांना कारण व्हावे.”

या संदर्भात “स्तुती” व “भूषण” हे शब्द आम्हांला सांगतात कीं “नावाचा” अर्थ “ख्याती” अथवा “नावलौकिकता” किंवा “प्रतिष्ठा” असा आहे. देवानें इस्राएलास निवडले यासाठीं कीं त्यांनी त्याचे गौरव (प्रतिष्ठा) प्रगट करावे. देव यशया 43:21 मध्ये म्हणतो कीं इस्राएल “मी आपल्यासाठीं निर्माण केलेंले लोक आहेत जे माझे स्तवन करतील.”

आणि जेव्हां नव्या करारात मंडळी स्वतःला खरे इस्राएल म्हणून पाहू लागली, तेव्हां पेत्राने आमच्यांसाठीं देवाच्या हेतूचे असे वर्णन केलें: “पण तुम्हीं तर ‘निवडलेला वंश… असे आहात; ह्यासाठीं कीं, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केलें ‘त्याचे गुण तुम्हीं प्रसिद्ध करावेत’” (1 पेत्र 2:9).

दुसऱ्या शब्दात, इस्राएल आणि मंडळी देवानें यासाठीं निवडले कीं त्यांने जगात त्याचा नावलौकिक अथवा गौरव करावा. म्हणूनच आम्हीं सर्वप्रथम अशी प्रार्थना करतो, “तुझे नाव पवित्र मानले जावो” (मत्तय 6:9). याच कारणास्तव आम्हीं प्रार्थना करतो, “तो माझा जीव ताजातवाना करतो; तो आपल्या नावासाठीं मला नीतिमार्गांनी चालवतो” (स्तोत्र 23:3).

जेव्हां आम्हीं परमेश्वर-केंद्रिंत लोक असण्याविषयी बोलतो, तेव्हां लक्षात ठेवा, हे या कारणास्तव आहे कीं आम्हीं देवाच्या सहभागीतेत त्याच्या ‘परमेश्वर-केंद्रिंत’ उद्देशाने सहभागी होत आहोत. आणि वधस्तंभाच्या या बाजूला, याचा अर्थ आहे ख्रिस्तावर अवलंबिलेले, ख्रिस्ताला गौरव देणारे लोक असावे. “मुलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झालीं आहे” (1 योहान 2:12). “आणि बोलणे किंवा करणे जे काहीं तुम्हीं कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा” (कलस्सै 3:17)

25 April : पौलाचे तारण तुमच्यासाठीं होते

Alethia4India
Alethia4India
25 April : पौलाचे तारण तुमच्यासाठीं होते
Loading
/

कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्यानें विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केलें ते न समजून अविश्वासामुळे केलें, म्हणून माझ्यावर दया झालीं; आणि ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीति ह्यांसह आपल्या प्रभूची कृपा विपुल झालीं. तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठीं त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झालीं“ (1 तीमथ्य 1:13-14,16).

पौलाचे परिवर्तन हे तुमच्यासाठीं होते. तुम्हीं ते ऐकले का? पुन्हा पहा: “जे युगानुयुगाच्या जीवनासाठीं त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झालीं.” ते आम्हीं आहोत – म्हणजें, तुम्हीं आणि मी.

मला आशा आहे कीं तुम्हीं हे अगदी वैय्यक्तिकरित्या घ्याल. देवानें जेव्हां पौलाला निवडले आणि ज्याप्रकारे त्यानें आपल्या सार्वभौम कृपेद्वारे त्याला तारले तेव्हां हे सर्व त्यानें तुम्हांला लक्षात ठेऊन केलें.

जर तुम्हीं सार्वकालिक जीवनासाठीं येशूवर विश्वास ठेवता – अथवा जर तुम्हीं सार्वकालिक जीवनासाठीं त्याच्यावर आजही विश्वास ठेऊ शकता – तर पौलाचे परिवर्तन तुमच्यासाठीं आहे. ज्याप्रकारे त्याचे परिवर्तन घडून आले त्याचा मुद्दा तुम्हांला ख्रिस्ताचे अविश्वसनीय धैर्य हूबेहूब प्रगट करावे हा आहे.

लक्षात ठेवा कीं परिवर्तनापूर्वी पौलाचे जीवन येशूसाठीं एक दीर्घकालीक परीक्षा होती. “माझा छळ का करतोस?” दमिश्काच्या मार्गावर येशूनें विचारले (प्रेषितांची कृत्ये 9:4). “तुझे अविश्वासाचे आणि बंडखोरीचे जीवन हा माझा छळ आहे!” आणि तरीही पौल आम्हांला गलतीकरांस 1:15 मध्ये सांगतो कीं देवानें त्याला त्याच्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून त्याचा प्रेषित होण्यासाठीं वेगळे केलें. हे अद्भुत आहे. याचा अर्थ हा कीं त्याच्या परिवर्तनाच्या क्षणापर्यंत त्याचे संपूर्ण जीवन देवाशी एक दीर्घकालीक गैरवर्तन होते, येशूचा एक दीर्घकालीक अव्हेर आणि उपहास होता – ज्याने त्याला जन्मास येण्यापूर्वी प्रेषित होण्यासाठीं निवडले होते.

म्हणून पौल म्हणतो कीं त्याचे परिवर्तन येशूच्या धैर्याचे दैदित्यमान प्रदर्शन आहे. आणि तेच तो आज आम्हास देतो.

येशूनें पौलाला तारिले, व जेव्हां आणि ज्याप्रकारे त्यानें ते केलें, ते सर्व आम्हांला उदाहरण ठरावे यासाठींच. आम्हास “आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून” (1 तीमथ्य 1:16). अन्यथा आमचे धैर्य खचेल. अन्यथा आम्हीं असा विचार करू कीं तो खरोखर आम्हास तारू शकला नसता. कदाचित आम्हीं विचार करू कीं तो रागावू शकतो. कदाचित आम्हीं विचार करू कीं आम्हीं दूर निघून गेलो आहोत. कदाचित आम्हीं विचार करू कीं आमच्यां अतिप्रिय जणांचे परिवर्तन होऊ शकत नाहीं – येशूच्या सार्वभौम, ओसंडून वाहणाऱ्या कृपेद्वारे – अचानक, अनपेक्षितपणे.