ArchivesSolid Joys

30 May : आढ्यता बाळगण्यासाठीं काही

Alethia4India
Alethia4India
30 May : आढ्यता बाळगण्यासाठीं काही
Loading
/

कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारें तुमचे तारण झालेंले आहे आणि हे तुमच्यां हातून झालें असें नाहीं, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झालें नाहीं. (इफिस 2:8-9).

नवीन करार ही खात्री करण्यासाठीं कीं आपण त्या गोष्टीविषयीं बढाई मारू नये जी केवळ कृपेनेच प्राप्त होते, विश्वास आणि कृपा यांतील परस्पर संबंध दाखवितो.

सर्वात सुपरिचित उदाहरणांपैकीं एक म्हणजें इफिस 2:8. कृपेनेच विश्वासाच्या द्वारें. या दोन तत्वांमध्यें कृपेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणारा परस्पर संबंध आहे. कृपेनेच विश्वासाच्या द्वारें.  

विश्वास आमच्यांत घडलेली बौद्धिक कृति आहे ज्याद्वारें आपण आपल्या स्वतःच्या अपुरेपणापासून परमेश्वराच्या मोफत आणि सर्वसंपन्न प्रयोजनाकडे वळते. अपात्र लोकांवर कृपा करण्याच्या परमेश्वराच्या स्वातंत्र्यावर विश्वास आपले लक्ष केंद्रित करतो. तो देवाच्या विपुलतेवर अवलंबून राहतो.

म्हणून विश्वास, स्वतःच्या व्याख्येनुसार, आढ्यता बाळगणे ठेचून टाकतो आणि कृपेस अनुकूल अशी सांगड घालतो. जेथेकोठे विश्वास पाहतो, तो प्रत्येक प्रशंसनीय कृत्यामागे कृपाच पाहतो. म्हणून विश्वास आढ्यता बाळगूशकत नाहीं, तर केवळ प्रभूमध्यें,जो कृपेचा कर्ता आहे, आढ्यता बाळगतो.

म्हणून पौल, तारण हे कृपेने विश्वासाच्या द्वारें आहे असें म्हटल्यानंतर पुढे म्हणतो, “आणि हे तुमच्यां हातून झालें असें नाहीं, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झालें नाहीं” (इफिस 2:8,9). विश्वास मानवी चांगुलपणा किंवा लायकीं किंवा बुद्धीचा अभिमान बाळगू शकत नाहीं, कारण विश्वास देवाच्या विनामूल्य, सर्व-संपन्न कृपेवर केंद्रित असतो. जो काही चांगुलपणा विश्वास पाहतो, तो त्याकडे कृपेचे फळ म्हणूनच पाहतो.

जेव्हां विश्वास आपले “ज्ञान म्हणजें नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेंली मुक्ती” यांकडे पाहते तेव्हां तो म्हणतो, “जो अभिमान बाळगतो, त्यानें परमेश्वराविषयी तो बाळगावा” (1 करिंथ. 1:30-31).

29 May : देव नियम शास्त्रांत प्रकट स्वतःच्या इच्छेविरुद्ध जातो तेव्हां

Alethia4India
Alethia4India
29 May : देव नियम शास्त्रांत प्रकट स्वतःच्या इच्छेविरुद्ध जातो तेव्हां
Loading
/

“तरीपण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते.” (1 शमुवेल 2:25)

एली याजक जेव्हां त्याच्या मुलांना त्यांच्या पापांसाठीं हटकत असें तेव्हां ते त्याच्या आज्ञेचे पालन करीत नसत. आमच्या जीवनांसाठीं ह्या वचनाचे तीन अर्थ आहेत.

1) फार काळपर्यंत आणि अतिशय गंभीरपणे पाप करणे शक्य आहे कीं स्वतः परमेश्वरहि पश्चात्तापबुद्धी देणार नाहीं.

म्हणूनच पौलाने म्हटले कीं आपण प्रार्थना आणि शिक्षण देण्याचे सर्व कार्य पार पाडल्यानंतर, “कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठीं पश्चात्तापबुद्धी देईल,” – “त्यांस पश्चातापबुद्धी देईलच” असें नाहीं (2 तीमथ्य 2:25). जेव्हां आपण पापाचे जीवन जगत असतो तेव्हां पश्चातापासाठीं “फार उशीर” झालेंला असू शकतो. इब्री 12:17 मध्यें जसे एसावाबद्दल म्हटले आहे, “त्यानें जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चात्तापाची संधी त्याला मिळाली नाहीं.” त्याचा त्याग करण्यात आला, तो पश्चाताप करू शकला नाहीं.

याचा अर्थ हा नाहीं कीं जे लोक संपूर्ण आयुष्यभर पाप केल्यानंतर खरोखर पश्चात्ताप करतात त्यांचे तारण होऊ शकत नाहीं. ते नक्कीच तारण पावू शकतात आणि पावतील! देव अत्यंत दयाळू आहे. वधस्तंभावरील चोराची आठवण करा. येशू ने त्याला म्हटले, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” (लूक 23:43).

2) कधी कधी देव पाप करणाऱ्या व्यक्तीस योग्य ते करू देत नाहीं.

“तरीपण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते.” त्यांच्या पित्याचा शब्द ऐकणे म्हणजें जे योग्य ते त्यांना करावयांस पाहिजे होते. पण ते तसें करेनात. का? “कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते.” 

त्यांनी त्यांच्या पित्याची आज्ञा पाळली नाहीं या मागे कारण हे होते कीं त्यांच्या बाबतींत देवाचे हेतू निराळे होते,  आणि त्यानें त्यांना पाप आणि मृत्यूसाठीं सोडून दिलें होते. यावरून असें दिसून येते कीं असें समय आहेत जेव्हां देवाची पूर्वनियोजित योजना ही देवाच्या नियमशास्त्रांत प्रकट झालेंल्या इच्छेपेक्षा वेगळी असते.

3) कधीकधी देवाची प्रकट इच्छा पूर्ण व्हावी यासाठीं आपल्या प्रार्थना केल्या जात नाहींत कारण देवानें आपल्या पवित्र आणि बुद्धीसम्मत हेतूंसाठीं काहीतरी वेगळे ठरवलेले असते.

मला असें वाटते कीं त्याच्या मुलांचे परिवर्तन व्हावें म्हणून एलीने प्रार्थना केलीं. आणि नक्कीच, त्याला अशाच प्रकारे प्रार्थना करणे अगत्याचे होते. पण देवानें हे योजिले होते कीं तो हफनी आणि फिनहास यांनी आज्ञा पाळू नये, तर मारले जावे.

जेव्हां असें काहीतरी घडते (जे आपल्याला सामान्यतः ती वेळ येईपर्यंत ठाऊक नसते) कीं जेव्हां एकींकडे आपण परिवर्तनासाठीं परमेश्वराचा धावा करत असतो, तेव्हां परमेश्वराचे उत्तर असें नसते:  “मी तुजवर प्रीति करीत नाहीं.” त्याऐवजी उत्तर असें असते : “या पापावर विजय न मिळविण्यामागे आणि पश्चात्ताप न करण्यामागे माझे बुद्धियुक्त आणि पवित्र हेतू आहेत. तुला हे सर्व हेतू आता दिसत नाहींत. मजवर विश्वास ठेव. मी काय करत आहे हे मला माहीत आहे. मी तुजवर प्रीति करतो.”

28 May : धीराचे प्रतिफळ

Alethia4India
Alethia4India
28 May : धीराचे प्रतिफळ
Loading
/

“तुम्हीं माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवानें ते चांगल्यासाठींच योजले होते.” (उत्पत्ति 50:20)

उत्पत्ती 37-50 मधील योसेफाची गोष्ट आम्हीं देवाच्या सार्वभौम, भविष्यातील कृपेवर विश्वास का ठेवला पाहिजे याविषयी एक मोठा धडा आहे.

योसेफाला त्याच्या भावांनी गुलाम म्हणून विकले, ज्यामुळें त्याच्या धीराची मोठी परीक्षा घेण्यांत आली असावी. पण त्याला मिसर देशात पोटीफरच्या घरात चांगली नोकरी दिली गेली. मग, जेव्हां तो आज्ञापालनाच्या अनियोजित स्थानी सरळपणाने वागत असतो, तेव्हां पोटीफरची पत्नी त्याच्या प्रामाणिकपणाविषयी खोटे बोलते आणि त्याला तुरुंगात टाकण्यात येते – त्याच्या धीराची दुसरी मोठी परीक्षा.

पण पुन्हा परिस्थिती सुधारते आणि बंदिशाळेचा अधिकारी त्याला जबाबदारी आणि आदर देतो. पण जेव्हां त्याला वाटते कीं त्याला ज्याच्या स्वप्नाचा त्यानें अर्थ सांगितला होता त्या फारोच्या प्यालेदारामुळें मुक्ती मिळणार आहे, तो प्यालेदार त्याला आणखी दोन वर्षे विसरून जातो. त्याच्या धीराची आणखी एक दुःखद परीक्षा.

शेवटी, या सर्व वळणांचा आणि विलंबांचा अर्थ स्पष्ट होतो. योसेफाला मिसर देशचा नेता म्हणून तयार केलें जाते, फारोनंतर त्याचे दुसरे स्थान आहे. ज्या भावांनी त्याला गुलाम म्हणून विकले होते त्यांना तो उपासमारीपासून वाचवतो. बऱ्याच काळपासून दुरावलेल्या या भावांना योसेफ म्हणतो, “देवानें मला तुमच्यांपुढे ह्यासाठीं पाठवले कीं तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा…तुम्हीं माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवानें ते चांगल्यासाठींच योजले होते” (उत्पत्ति 45:7;50:20).

या प्रदीर्घ वर्षांच्या निर्वासन आणि गैरवर्तनाच्या काळात योसेफाच्या धीराची गुरुकिल्ली कोणती असावी? उत्तर आहे: देवाच्या सार्वभौम, भावी कृपेवर विश्वास – अनियोजित जागा आणि अनियोजित गतीस कल्पनीय सुखद अंतात बदलणाऱ्या देवाच्या सार्वभौम, भावी कृपेवर विश्वास. हीच आपल्या धीराची गुरुकिल्ली आहे. जेव्हां आपल्या जीवनांत सर्वात विचित्र आणि सर्वात दुःखद वळण येतांत, तेव्हां देव आपल्यासाठीं कार्य करत आहे असा विश्वास तुम्हीं ठेवता का?

27 May : अस्सल विरूद्ध नकली विश्वास

Alethia4India
Alethia4India
27 May : अस्सल विरूद्ध नकली विश्वास
Loading
/

“त्या अर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठीं’ एकदाच अर्पण केला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठीं तो दुसऱ्यांदा दिसेल.” (इब्री 9:28)

आपल्या सर्वांसमोर जो प्रश्न आहे तो हा: ख्रिस्ताने ज्यांची पापे वाहून नेली त्या “पुष्कळ” लोकांमध्यें आपला समावेश आहे का? आणि तो दुसऱ्यांदा दिसेल  त्यां वेळी आपण तारले जाऊ का?

इब्री 9:28 चे उत्तर आहे, “होय,” जर आपण “त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहोत.” आपण जाणू शकतो कीं आपली पापे वाहून नेण्यात आली आहेत आणि न्यायनिवाडा होईल त्यां दिवशी आपण सुरक्षित असू, जर आपण ख्रिस्तावर अशाप्रकारे विश्वास ठेवतो कीं तो विश्वास आम्हास त्याच्या आगमनासाठीं उत्सुक करतो.

एक नकली, बनावटी विश्वास आहे जो ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचा दावा करतो, परंतु केवळ अग्नि विमा धोरण आहे. नकली विश्वास नरकापासून बचाव करण्यासाठीं “विश्वास ठेवतो.” त्याला ख्रिस्तासाठीं खरी इच्छा नसते. खरे म्हणजें, तो न आल्यास त्याला आवडेल, यासाठीं कीं आपल्याला या जगाच्या सुखांचा होईल तितका आस्वाद घेता यावा. यावरून दिसते कीं ते हृदय ख्रिस्तासोबत नाहीं, जगासोबत आहे.

तर, आपल्यासाठीं मुद्दा हा आहे कीं आपण ख्रिस्ताच्या आगमनाची उत्कंठेने वाट पाहत आहोत का? कीं जगासोबत आपले प्रेमसंबंध सुरू असताना त्यानें आमच्यापासून दूर राहावे असें आम्हास वाटते? हाच प्रश्न आहे जो विश्वासाच्या खरेपणाची पारख करतो.

“आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट” पाहत असतांना आपण करिंथकरांसारखे बनावे (1 करिंथ 1:7) आणि फिलिप्पैकरांसारखे ज्यांचे ”नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत“ (फिलिप्पै 3:20).

आमच्यासाठीं हा मुद्दा आहे. त्याचे प्रगट होणे आपल्याला आवडते का? किंवा आपले जगावर प्रेम आहे आणि आम्हीं आशा करतो कीं त्याचे प्रगट होणे आपल्या योजनांमध्यें अडखळण आणणार नाहीं? या प्रश्नावर अनंतकाळ अवलंबून आहे.

26 May : धीराने वाट पाहण्यासाठीं बळ

Alethia4India
Alethia4India
26 May : धीराने वाट पाहण्यासाठीं बळ
Loading
/

“सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हांला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्हीं सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे.” (कलस्सै 1:11).

“समर्थ व्हावे” हा योग्य शब्द आहे. प्रेषित पौलाने कलस्सै येथील मंडळीसाठीं प्रार्थना केलीं, कीं “सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हांला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्हीं सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे. (कलस्सै 1:11). धीर हा आंतरिक सामर्थ्याचा पुरावा आहे.

उतावळे लोक दुर्बळ असतात, आणि म्हणून ते बाहेरील मदतीवर अवलंबून असतात – जसे कीं वेळापत्रके जी योग्य असतात पण त्यांच्या नाजूक हृदयाला आधार देणारी परिस्थिती. त्यांच्या शपथांचा आणि धोक्यांचा आणि त्यांच्या योजनांस आड येणाऱ्या गुन्हेगारांच्या कठोर टीकांचा भडीमार दुर्बळ वाटत नाहीं. पण तो गलबला हे सर्व दुर्बलतेचे आवरण आहे. धीरासाठीं अति विशाल आंतरिक बळाची गरज भासते.

खिस्ती व्यक्तीच्या बाबतींत, हे सामर्थ्य त्याला देवाकडून प्राप्त होते. म्हणूनच पौल कलस्सैकरांसाठीं प्रार्थना करत आहे. तो देवाकडे विनंती करत आहे कीं खिस्ती जीवनासाठीं आवश्यक असलेल्या धीर व सहनशीलतेसाठीं त्यानें त्यांना सामर्थ्य द्यावे. पण जेव्हां तो म्हणतो कीं धीराचे सामर्थ्य हे “(देवाच्या) गौरवाच्या पराक्रमानुसार” आहे, तेव्हां त्याच्या बोलण्याचा अर्थ केवळ हा नाहीं कीं ख्रिस्ती व्यक्तीला धीर देण्यासाठीं दैवीय सामर्थ्याची गरज लागते.  त्याच्या बोलण्याचा अर्थ असा कीं या “गौरवाच्या पराक्रमात” विश्वास ते माध्यम आहे ज्याद्वारें धीराचे सामर्थ्य येते.

धीर खरे तर पवित्र आत्म्याचे फळ होय (गलती 5:22), परंतु पवित्र आत्मा (त्याच्या सर्व फळांसह) “विश्वासाने ऐकण्याद्वारें” (गलती 3:5) सामर्थ्य देतो. म्हणून पौल प्रार्थना करत आहे कीं परमेश्वर देव आपल्याला धीरास सामर्थ्य देणाऱ्या “गौरवाच्या पराक्रमाशी” जोडेल. आणि तो जोड म्हणजें विश्वास.

25 May : अडथळ्याच्या मार्गात देवाची योजना

Alethia4India
Alethia4India
25 May : अडथळ्याच्या मार्गात देवाची योजना
Loading
/

“आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्हीं कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारें देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.” (कलस्सै 3:17)

तुम्हीं कधी असा विचार केला आहे का कीं तुम्हीं जे गमावले आणि ज्याची तुम्हाला अतिशय गरज आहे ते तुम्हीं चुकींच्या जागी शोधत आहात? तो कोठे आहे हे त्याला नक्की माहित आहे, आणि तरीही तो तुम्हाला चुकींच्या जागी पाहू देत आहे.

एकदा मला माझ्या डिझायरिंग गॉड नावाच्या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीसाठीं एक अवतरण हवे होते. मला माहित होते कीं मी ते रिचर्ड वर्मब्रँड यांच्या पुस्तकात वाचले होते. मला वाटले कीं ते त्यांच्या रीचिंग टूवर्ड्स द हाईट्स नावाच्या भक्ती पुस्तकात होते. मला ते समोरच्या पानांच्या उजव्या बाजूला दिसत होते. पण मला ते सापडले नाहीं.

मी पहातच होतो, कीं माझे लक्ष ३० नोव्हेंबरच्या त्याच्या भक्तीपाठावर खिळले. ते वाचत असतांना मी म्हटले, “म्हणूनच देवानें मला “चुकींच्या” ठिकाणी माझे अवतरण शोधू दिलें.” येथे एक गोष्ट होती जी उत्तमरित्या स्पष्ट करते कीं आपण येशूच्या नावात जे काही करतो ते कधीही वाया जात नाहीं – काहीही नाहीं, चुकींच्या ठिकाणी अवतरण शोधत नाहीं. मी जे वाचले ते असें आहे:

मंदबुद्धी मुलांच्या घरात, कॅथरीनचे वीस वर्षे पालनपोषण करण्यात आले. ती आरंभापासूनच मानसिकदृष्ट्या अपंग, होते, आणि ती कधीही एक शब्दही बोलली नव्हती, तर फक्त वनस्पतिवत् होती. ती एकतर शांतपणे भिंतींकडे पाहत असें किंवा गोंधळलेल्या हालचाली करीत असें. तिचे जीवन म्हणजें खाणे, पिणे, झोपणे. तिच्या सभोवताली जे काही घडत असें त्यात ती भाग घेत नसल्यासारखे दिसत होते. तिचा एक पाय कापावा लागला. कर्मचाऱ्यांनी कॅथरीनला  शुभेच्छा दिल्या आणि आशा केलीं कीं प्रभु लवकरच तिला स्वतःजवळ घेऊन जाईल.

एक दिवस डॉक्टरांनी संचालकास लवकर या म्हणून बोलावले. कॅथरीन मरणाच्या लागास होती. दोघांनी खोलीत प्रवेश केला, त्यांना त्यांच्या काना-डोळ्यांवर विश्वासच बसेना. कॅथरीन ख्रिस्ती गीते गात होती जी तिने ऐकली होती आणि शिकली होती, जे मृत्यूशय्येस लागू होते. तिने पुन्हा पुन्हा जर्मन गाणे म्हटले, “आत्म्याला त्याची पितृभूमी, विश्रांती कोठे लाभते?” रूपांतरित चेहऱ्याने तिने अर्धा तास गाणे गायले, मग ती शांतपणे निघून गेली. (बेस्ट इज स्टिल टू कम, वुपरटल: सोन अँड शिल्डमधून उद्धृत)

ख्रिस्ताच्या नावाने जे काही केलें जाते ते खरोखरच वाया जाते का?

मला ज्याची गरज आहे असा माझा हताश, व्यर्थ शोध वाया गेला नाहीं. या अपंग मुलीचे गाणे व्यर्थ गेले नाहीं. आणि तुमचा वेदनादायक, अनियोजित वळसा व्यर्थ जाणार नाहीं – जर तुम्हीं परमेश्वराकडे त्याच्या अनपेक्षित कामासाठीं पाहत असाल आणि सर्वकाही त्याच्या नावाने करत असाल तर (कलस्सै 3:17).

24 May : तुमच्यांतारणाच्या खात्रीचा खडक

Alethia4India
Alethia4India
24 May : तुमच्यांतारणाच्या खात्रीचा खडक
Loading
/

“कारण आत्म्याच्या द्वारें होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवानें तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठीं निवडले आहे.” (2 थेस्सल 2:13)

पवित्र शास्त्र आपण काहीही बरे किंवा वाईट करण्यापूर्वी (रोम. 9:11) पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्ताठायी आपली निवड केलीं जाण्याविषयी बोलते – म्हणजें देवानें आम्हांला निवडले (इफिस 1:4). त्यामुळें, आमची निवड खऱ्या अर्थाने कोणत्याही अटीविरहित आहे. आमचा विश्वास किंवा आमची आज्ञाधारकता याचा आधार नाहीं. हि निवड मुक्त आणि आम्हीं पात्र नसतांना करण्यांत आलेली आहे.

दुसरीकडे, पवित्र शास्त्रातील डझनभर शास्त्रलेख आपल्या अंतिम तारणाविषयी बोलतात (सार्वकालिक जीवनासाठीं भूतकाळात झालेंल्या आपल्या निवडीच्या विपरीत) ज्याची अट आहे परिवर्तित हृदय आणि जीवन. म्हणून, प्रश्न उठतो, सार्वकालिक जीवन वतन म्हणून मिळण्यासाठीं आवश्यक असलेल्या विश्वासात आणि पावित्र्यात मी टिकून राहीन याची खात्री मला कशी प्राप्त होईल?

उत्तर हे आहे कीं ती खात्री आमची झालेंली निवड यांत मुळावलेली आहे. 2 पेत्र 1:10 यात म्हटले आहे, “ज्या संदेष्ट्यांनी तुमच्यांवर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला.” देवाची निवड हा मला तारण्याच्या देवाच्या वचनबद्धतेचा पाया आहे, आणि म्हणून त्याच्या निवडीच्या कृपेने जे सुरू झालें आहे ते पवित्र करणाऱ्या कृपेद्वारें तो मजमध्यें कार्य करील.

नव्या कराराचा हा अर्थ आहे. येशूवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण नव्या कराराचा सुरक्षित लाभार्थी आहे, कारण येशूनें लूक 22:20 मध्यें म्हटले आहे, ”हा प्याला माझ्या ‘रक्तात’ नवा ‘करार’ आहे. ते रक्त तुमच्यांसाठीं ओतले जात आहे.“ म्हणजें, माझ्या रक्ताद्वारें जे माझे आहेत त्या सर्वांसाठीं मी नवा करार प्राप्त करतो. 

नव्या करारात देव केवळ आज्ञापालनाची आज्ञा देत नाहीं, तर आज्ञापालन घडवून आणतो. “तुझा देव परमेश्वर तुझ्या हृदयाची व तुझ्या वंशजांच्या हृदयाची सुंता करील, आणि आपण जिवंत राहावे म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रेम करशील” (अनुवाद 30:6).  “मी तुमच्यां ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्हीं माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांप्रमाणे आचरण कराल असें मी करीन” (यहेजकेल 36:27; तुलना 11:20). ही नवीन कराराची अभिवचने आहेत.

निवड ही त्याच्या लोकांसाठीं हे करण्याची परमेश्वराची सार्वकालिक वचनबद्धता होय. म्हणून, निवड ही हमी देते कीं ज्यांस परमेश्वर विश्वासाने नीतिमान ठरवितो, त्यांचे तो अवश्य गौरवहि करील” (रोम 8:30). याचा अर्थ हा कीं तो आपल्यामध्यें गौरवीकरणासाठीं घालून दिलेंल्या सर्व अटी पूर्ण करण्यासाठीं अचूकपणे कार्य करेल.

आमची झालेंली निवड तारणाच्या या खात्रीचा अंतिम पाया आहे कारण देव तारण देण्यासाठीं वचनबद्ध आहे म्हणून, तारणासाठीं जे काही उपलब्ध आहे ते सर्व सक्षम करण्यासाठीं देव वचनबद्ध आहे.

23 May : येशू तितका मूल्यवान आहे का?

Alethia4India
Alethia4India
23 May : येशू तितका मूल्यवान आहे का?
Loading
/

“जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही द्वेष करणार नाहीं तर त्याला माझा शिष्य होता येणार नाहीं. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येत नाहीं त्याला माझा शिष्य होता येत नाहीं.” (लूक 14:26-27)

येशू निःसंकोचपणे आणि निर्भयपणे आम्हास स्पष्ट एक अशी गोष्ट सांगतो जी ऐकायला “सर्वात वाईट” जाणवते – खिस्ती होण्याची वेदनादायक किंमत: कुटुंबाचा द्वेष करणे (वचन 26), वधस्तंभ उचलणे (वचन 27), संपत्तीचा त्याग करणे (वचन 33). कृपेच्या करारात कुठलीही छोटी छाप नाहीं. त्यांत सर्वकाही मोठ्या अक्षरांत आणि साहसपूर्ण आहे. कृपा स्वस्त नाहीं! अतिशय महागडी! या, आणि माझे शिष्य व्हा.

पण सैतान त्याचे सर्वात वाईट ते लपवितो आणि केवळ आपले सर्वोत्तम ते दाखवितो. सैतानासोबतच्या व्यवहारात जे खरोखर महत्वाचे आहे ते मागच्या पृष्ठावर लहान अक्षरांनी छापलेले आहे.

पुढच्या पानावर मोठ्या, ठळक अक्षरांत शब्द आहेत, “तुम्हीं खरोखर मरणार नाहीं” (उत्पत्ति 3:4) आणि ”तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्वकाही तुला देईन” (मत्तय 4:9). पण मागच्या पानावर लहान छापील अक्षरात – इतके लहान कीं तुम्हीं ते केवळ पवित्र शास्त्राच्या भिंगाच्या मदतीने वाचू शकता – त्यात म्हटले आहे, “आणि क्षणिक सुखानंतर, तुम्हीं माझ्यासोबत सदाकाळ अधोलोकात दुःख सोसणार.”

जेथें सैतान आम्हाला केवळ त्याचे सर्वोत्तम दाखवितो, तेव्हां येशू आम्हाला त्याचे “सर्वात वाईट” तसेंच त्याचे सर्वोत्तम का दाखवू इच्छितो? मॅथ्यू हेनरी उत्तर देतात, “सैतान जे सर्वोत्तम ते दाखवतो, पण जे सर्वात वाईट ते लपवितो, कारण त्याचे सर्वोत्तम त्याचे सर्वात वाईट (प्रतिसंतुलित) करणार नाहीं; पण ख्रिस्ताचे सर्वोत्तम विपुलपणे करेल.”

ख्रिस्ताचे पाचारण केवळ दुःख सोसण्याचे आणि स्वतःचा नाकार करण्याचे पाचारण नाहीं; सर्वप्रथम ते पाचारण मेजवानीचे आहे. लूक 14:16-24 मधील दृष्टांताचा मुद्दा हाच आहे. येशू एक गौरवशाली पुनरुत्थानाचे अभिवचन देखील देतो जेथे या जीवनातील सर्व हानींची भरपाई केलीं जाईल (लूक 14:14). तो आम्हास हे देखील सांगतो कीं तो आम्हाला कष्ट सहन करण्यात मदत करील (लूक 22:32). तो आम्हास हे सुद्धा सांगतो कीं आमचा पिता आम्हाला पवित्र आत्मा देईल (लूक 11:13). तो असें अभिवचन देतो कीं आम्हीं जरी राज्यासाठीं मारले गेलो तरीही, “तुमच्यां डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाहीं” (लूक 21:18).

याचा अर्थ हा कीं जेव्हां आपण येशूचे अनुसरण करण्याची किंमत मोजण्यासाठीं बसतो – जेव्हां आपण “सर्वात वाईट” आणि “सर्वोत्तम” यांचे मोजमाप करतो – तेव्हां तो योग्य ठरतो. तो तितका मूल्यवान ठरतो (रोम 8:18; 2 करिंथ 4:17).

असें सैतानासोबत नाहीं. लबाडीची भाकर मनुष्याला गोड लागते, पण मग त्याच्या तोंडात माती पडते

13 May : सर्व गोष्टींच्या तळाशी

Alethia4India
Alethia4India
13 May : सर्व गोष्टींच्या तळाशी
Loading
/

त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्यानें जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. ‘त्यानें आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारें स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. (इफिसकरांस पत्र 1:4-5)

चार्ल्स स्पर्जन यांचा अनुभव सर्वसाधारण ख्रिस्ती व्यक्तीच्या अनुभवापेक्षा वेगळा नाहीं.

स्पर्जन, ज्यांचा जीवनकाळ 1834 ते 1892 हा होता, ते जॉर्ज म्युलर आणि हडसन टेलर यांचे समकालीन होते. त्यांनी लंडन येथील मेट्रोपोलिटन टॅबरनेकल येथे त्या काळात सर्वात प्रसिद्ध पाळक म्हणून तीस वर्ष सेवा केलीं.

त्यांचे उपदेश इतके सामर्थ्यशाली होते कीं दर आठवडी लोक ख्रिस्ताकडे वळत होते. त्यांचे उपदेश आज देखील छापले जातात आणि त्यांच्याकडें आज सुद्धा आदर्श आत्मे जिंकणारा व्यक्ती म्हणून पाहिले जाते.

ते जेव्हां सोळा वर्षाचे होते तेव्हां त्यांना जो अनुभव आला, ज्याने त्यांच्या सेवाकार्याला आकार दिला त्याची आठवण ते नेहमी करत असत :

मी जेव्हां ख्रिस्ताकडे येत होतो, तेव्हां मला वाटत असें कीं सर्व काही मीच करत आहे, आणि मला वाटत असें कीं मी कळकळीने देवाचा शोध करत आहे. मला या गोष्टीची कल्पना नव्हती कीं प्रभू माझा शोध करत होता. एखादा नवीन विश्वासणारा ही गोष्ट जाणून असेंल असें मला वाटत नाहीं.

मला तो दिवस, तो तास आठवतो जेव्हां पहिल्यांदा मला ही सत्ये समजली  [कृपेची सार्वभौम, मात करणारी तत्वे ] माझ्या मनात – जेव्हां त्यांनी कार्य केलें, जॉन बनयन जसे म्हणतात, माझ्या हृदयात एक अग्नि पेटली, आणि आज देखील मला कसे वाटले ते आठवते – अचानक मी एका बालकातून एक प्रौढ व्यक्ति झालो होतो- अखेरीस देवाच्या सत्याचा सुगावा लागल्याने माझी शास्त्राच्या ज्ञानात प्रगती झाली होती.

एका रात्री, मी चर्च मध्यें बसलो असताना, मी पाळकांच्या उपदेशाचा जास्त विचार करत नव्हतो, कारण मला त्यावर विश्वास नव्हता.

मला एका विचाराने घेरले, तुम्हीं ख्रिस्ती कसे झाला ? मी देवाचा शोध केला. पण तुम्हीं देवाचा शोध कसा करू लागला ? माझ्या मनात हे सत्य क्षणात उमगले – मी त्याचा शोध केला नसता, जर माझ्या मनात आधीच देवाचा शोध करण्याच्या प्रभाव पडला नसता. मी प्रार्थना केलीं होती, असा मी विचार केला, पण मी स्वत:ला विचारले, कीं मी प्रार्थना कशी करू लागलो ? शास्त्र वाचून मी प्रार्थना करण्यास प्रेरित झालो. मी शास्त्र वाचन कसे करू लागलो ?  मी ते वाचत होतो, पण मला कोणी वाचन करण्यास प्रेरित केलें ?

मग, त्या क्षणामध्यें माझ्या लक्षात आले, ह्या सर्व गोष्टीच्या तळाशी देव होता. आणि तोच माझ्या विश्वासाचा लेखक होता, आणि त्यावेळेला कृपेची तत्वे मला उमगली, आणि आज पर्येंत मी त्या पासून विभक्त झालो नाहीं आहे, आणि मी सातत्यानें हे कबूल करू इच्छितो कीं, “माझ्यात झालेंला बदल याचे सर्व श्रेय मी देवाला देतो.”

तुमच्यां विषयी काय? तुम्हीं तुमच्यां तारणाचे श्रेय देवाला देता का? ह्या सर्व गोष्टींच्या तळाशी तोच आहे का? मग ही गोष्ट तुम्हाला देवाच्या सार्वभौम, मात करणार्‍या कृपेच्या गौरवाची स्तुति करण्यास प्रवृत्त करते का?

12 May : आपण आपल्या वैर्‍यांवर प्रीति का करावी

Alethia4India
Alethia4India
12 May : आपण आपल्या वैर्‍यांवर प्रीति का करावी
Loading
/

“परंतु तुम्हा ऐकणार्‍यांस मी सांगतो, तुम्हीं आपल्या वैर्‍यांवर प्रीति करा; जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा.” (लूक 6:27)

ख्रिस्ती लोकांनी त्यांच्या वैर्‍यांवर प्रीति करायची आहे आणि त्यांचे बरे करायचे आहे, ह्या मागे दोन मुख्य कारणे आहेत.

त्यातील एक कारण हे कीं, त्याद्वारें देव कोण आहे हे प्रकट होईल. देव हा दयाळू आहे.

  • कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगववतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. (मत्तय 5:45)
  • आमच्या पातकांच्या मानाने त्यानें आम्हांला शासन केलें नाहीं, त्यानें आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिलें नाहीं. (स्तोत्र 103:10)
  • आणि तुम्हीं एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवानें ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केलीं आहे तशी तुम्हींही एकमेकांना क्षमा करा. (इफिसकरांस पत्र 4:32)

म्हणून, जेव्हां ख्रिस्ती लोक देवाच्या सामर्थ्याद्वारें अशा प्रकारे जीवन जगतात, तेव्हां आपण देव कसा आहे हे दाखवून देतो.

दुसरे कारण हे आहे कीं, ख्रिस्ती लोकांचे मन देवा मध्यें संतुष्ट असते आणि ते सूड उगवणे, तसेंच स्वतःचे गौरव करून घेणें किंवा संपत्ति किंवा जगिक सुरक्षिततेच्या लालसेने चालत नाहीं.

देव आपली संपूर्ण संतुष्टी करणारा ठेवा बनलेला असतो त्यामुळें आपण आपल्या वैर्‍यांना आपल्या गरजे प्रमाणे आणि आपल्या असुरक्षिततेने वागवत नाहीं, तर आपण आपल्या देवाच्या संतुष्टी करण्यार्‍या गौरवाच्या परिपूर्णतेने वागवतो.

इब्री 10:34,  “कारण बंदिवानांबरोबर तुम्हीं समदुःखी झालात आणि [स्वर्गात] आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्हीं आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. [ म्हणजेंच तुम्हीं तुमच्यां वैर्‍यांवर सूड घेतला नाहीं ].” हे जग आपले घर नाहीं आहे आणि देवच आपले संपूर्ण संतुष्टी करणारे पारितोषिक आहे, ह्या गोष्टीमधील भरवसा सूड घेण्याच्या दाट सक्तीच्या भावनेला काढून टाकतो. आपल्याला हे ठाऊक आहे कीं, “अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे.”

मग, वैर्‍यांवर प्रीति करण्याच्या ह्या दोन्ही कारणांमध्यें मुख्य गोष्ट ही पाहतो कीं, देव जसा आहे तसाच दयाळू आणि गौरवीरित्या सर्व संतुष्टी करणारा दाखवला आहे.

आपले दयाळू असण्याचे सामर्थ्य हे आहे कीं आपण आपल्यावर झालेंल्या देवाच्या दयेने तृप्ती पावलो आहोत. आणि दयाळू असण्याचे सर्वोच्च कारण, देवाला गौरव देणे हे आहे, म्हणजेंच, त्याच्या दये करिता त्याला उंच करण्यास इतरांची मदत करणे होय. आपल्याला हे दाखवायचे आहे कीं, देव हा उत्कृष्ट आहे. आपल्याला देवाच्या दयेने, आपल्या प्रीति द्वारें देव महान आहे हे इतरांना दाखवायचे आहे.