ArchivesSolid Joys

12 June : माझा अविश्वास घालवून टाका

Alethia4India
Alethia4India
12 June : माझा अविश्वास घालवून टाका
Loading
/

कारण मला प्राप्त झालेंल्या कृपादानांवरून मी तुमच्यांपैकीं प्रत्येक जणाला असें सांगतो कीं, आपल्यां योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानूं नकां, तर देवानें प्रत्येकाला वाटून दिलेंल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेनें स्वतःला माना. (रोम 12:3)

ह्या वचनाच्या पार्श्वभूमी मध्यें पौलाला काळजी वाटत होती कीं काहीं लोक स्वत:ला “त्यांच्या योग्यते पेक्षा अधिक समजत होते”. ह्या गर्वाचा शेवटचा उपाय म्हणजें ही गोष्ट जाणणें कीं आपल्यांला प्राप्त झालेंली आत्मिक दानेंच केवळ देवाच्या मोफत कृपेमुळें नाहींत तर ती दानें वापरण्यासाठींचा विश्वास देखील देवाच्या कृपेमुळें आहे. “तर देवानें प्रत्येकाला वाटून दिलेंल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेनें स्वतःला माना.”

याचा अर्थ असा कीं स्वत:विषयीं फुशारकीं मारावी असा प्रत्येक संभाव्य निकष आपल्यांतून काढून टाकण्यांत येतो. आपण कशी आढ्यता मिरवू शकतो जेव्हां ती आत्मिक कृपादानें घेण्याकरिता लागणारी पात्रता सुद्धा आपल्यांला कृपादान म्हणूनच मिळाली आहे?

ह्या सत्याचा आपल्यां प्रार्थनें वर गाढ परिणाम होतो. येशू आपल्यांला लूक 22:31-32 उदाहरण देतो. पेत्रानें येशूचा तीन वेळा नकार केला त्यापूर्वी येशूनें त्याला म्हटलें, “शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानानें मागणी केली; ‘परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठीं मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजें तुझ्या भावांना स्थिर कर.”

येशू पेत्राच्या नकाराच्या पापा नंतर सुद्धा त्याचा विश्वास टिकून रहावा म्हणून प्रार्थना करतो, कारण त्याला ठाऊक आहे कीं आपल्यांला देवच विश्वास देऊ करतो. म्हणून येशूनें जशी प्रार्थना केली तशी आपण देखील केली पाहिजे – आपल्यां स्वतःकरिता आणि इतरांच्या करिता, कीं देव आपला विश्वास टिकवून ठेवील. 

या करिताच त्या भूतग्रस्त मुलाच्या पित्यानें डोळ्यांत आसवे आणून अशी विनंती केली कीं, “प्रभूजी, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका” (मार्क 9:24). ही एक चांगली प्रार्थना आहे. ती हे मान्य करते कीं आपण जसा विश्वास ठेवायला पाहिजे तसा विश्वास आपण देवाच्या कृपादानावांचून ठेऊ शकत नाहीं.

तर मग, आपण रोज ही प्रार्थना करूंया, “हे परमेश्वरा, माझ्यांत देऊं केलेंल्या विश्वासाबद्दल मी तुझा आभारी आहे. त्याला टिकवून ठेव. बळकट कर. अधिक ढृढ कर. अपयशी होऊ देऊ नकोस. त्याला माझ्या जीवनाचे सामर्थ्य कर, अशासाठीं कीं मी जे काहीं करीन त्याचा गौरव, सर्व गोष्टींचा दाता म्हणून तुलाच मिळेल. आमेन.”

11  June : भावी काळाकरिता विश्वास

Alethia4India
Alethia4India
11  June : भावी काळाकरिता विश्वास
Loading
/

देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्हीं देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो. (2 करिंथ 1:20)

जर “देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या [येशूच्या] ठायी होय हे आहे” तर मग आता वर्तमानसमयी त्याच्यावर भरवसा ठेवणें म्हणजें हा विश्वास ठेवणें कीं त्याची अभिवचनें पूर्ण होऊन ती खरी सिद्ध होतील.

त्याच्यावर भरवसा ठेवणें आणि त्याच्या अभिवचनांवर विश्वास ठेवणें – हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे विश्वास नाहींत. येशू वर विश्वास ठेवणें – तारणासाठीं त्याच्यावर विश्वास ठेवणें – म्हणजेंच विश्वास ठेवणें कीं तो त्याचा शब्द पाळतो. वधस्तंभावर खिळलेंला आणि मरणातून पुन्हा उठलेंल्या ख्रिस्तामध्यें समाधानी असणें म्हणजें असा विश्वास ठेवणें कीं भावी काळातील प्रत्येक क्षणापासून ते  सर्वकालिकते पर्येंत त्याच्या प्रीति पासून आपल्यांला कोणतीही गोष्ट विभक्त करूं शकणार नाहीं, आणि सर्व गोष्टी आपल्यां कल्याणाकरिता कार्य करण्यापासून त्याला कोणीच थांबवू शकणार नाहीं. आणि ते “कल्याण” म्हणजें परमेश्वराला ख्रिस्तामध्यें आपलें सर्वोच्च धन मानणें व त्याचे सौंदर्य न्याहाळणें होय.

आमचे हे सर्व-समाधानकारक कल्याण सर्वकाळासाठीं आहे हा विश्वास आम्हांवर झालेंल्या गतकाळातील गौरवी कृपेवर आधारलेंला आहे, विशेषत: त्यां कृपेवर कीं देवानें आपल्यां स्वतःच्या पुत्राला राखून न ठेवता त्याला आपल्यां सर्वांकरिता दिलें (रोमकरांस 8:32).

आता आपण देवानें भूतकाळात जें जें साध्य केलें – विशेषकरून आपल्यां पापांकरिता ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान या द्वारें- आणि त्याच्या सर्व अभिवचनांमध्यें त्याचे अध्यात्मिक सौंदर्य चाखलें पाहिजे. भूतकाळात झालेंल्या कृपेत मुळावलेंला आपला देवावरील भरवसा या गोष्टीना दृढ धरून राहतो कीं देव पुढल्या क्षणी आम्हांबरोबर राहील, व तो तसाच पुढच्या महिन्यात आणि अनंत सार्वकालिकतेसाठीं आम्हांबरोबर असेल.

तोच आणि केवळ तोच आपल्यां आत्म्याचे भावी समयामध्यें समाधान करील. आणि जर आपण मुळावलेलें ख्रिस्ती म्हणून जगण्याकरिता ख्रिस्त आपल्यांला बोलवत असेल तर आपल्यांला आपल्यां भावी जीवनाबद्दल हींच खात्री वाटायला हवी.

ख्रिस्तांत असलेंला आमचा वर्तमान समयीचा आनंद– म्हणजें आमचा वर्तमान विश्वास- जर देवाच्या सर्व अभिवचनांना होय व आमेन म्हणत नसेल, तर मग देव (भविष्यातील प्रत्येक क्षणी) जे सामर्थ्य पुरवेल त्या सामर्थ्यात मुळावलेंली सेवा घडू शकणार नाहीं (1 पेत्र 4:11).

माझी प्रार्थना अशी आहे कीं आपल्यांवर जी भावी कृपा केलीं जाईल तिच्या विश्वासाचे स्वरूप काय आहे यावर अशाप्रकारे चिंतन केल्यांनें आपल्यांला देवाच्या वचनांवर जो विश्वास ठेवायचा आहे त्याविषयींची वरवरची, अतिसरळ विधानें टाळण्यास त्यानें सहाय्य पुरवावें. ही खूप गहन आणि सुंदर गोष्ट आहे.  

10  June : जेव्हां निमित्त बंडखोरीला वाव देतात

Alethia4India
Alethia4India
10  June : जेव्हां निमित्त बंडखोरीला वाव देतात
Loading
/

आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे! भर रस्त्यावर मी ठार होईन!” (नीतिसूत्रे 22:13)

मी अपेक्षा केली नव्हती कीं नीतिसूत्र असें म्हणेंल. मी अपेक्षा केली होती कीं ते असें म्हणेंल, “भेकड व्यक्ति म्हणतो, “बाहेर सिंह आहे! भर रस्त्यावर मी ठार होईन!” पण इथे “आळशी” म्हंटलें आहे “भेकड” नाहीं. त्यामुळें इथे नियंत्रित करणारी (विल्हेवाट लावणारी) भावना आळशीपणा आहे, भीती नाहीं.

पण आळशीपणाचा आणि रस्त्यावर असणार्‍या सिंहाच्या धोक्याच्या काय संबंध? आपण नेंहमी असें म्हणत नाहीं कीं, “हा माणूस इतका आळशी आहे कीं तो बाहेर कामं करायला जाऊ शकत नाहीं, कारण रस्त्यात सिंह आहे.”

मुद्दा हा आहे कीं, आळशी माणूस आपल्यांला काम करावे लागू नये म्हणून, मनात काल्पनिक परिस्थिति निर्माण करतो, आणि त्याच्या आळशीपणा वरून लक्ष विचलित करण्यासाठीं सिंहाचा धोका असल्याचे कारण देतो. त्याचे दिवसभर घरी बसणें कोणीच मान्य करणार नाहीं. पण रस्त्यात सिंह आहे म्हंटल्यावर ते त्याची परिस्थिती समजू शकतील.

इथे एक गहन पवित्र शास्त्रीय शिकवण जी आपण शिकायला पहिजे ती ही कीं, आपलें मन त्याला जे हवे आहे ते साध्य करण्यासाठीं आपल्यां बुद्धीला भ्रष्ट करते. आपल्यां अंतकरणातील खोल इच्छा आपल्यां बुद्धीच्या तर्कशुद्धपणाच्या गाभाऱ्यात जातात आणि आपल्यां इच्छा जरी चुकींच्या असल्या, तरी त्या चांगल्या आहेत असें आपल्यां बुद्धीला पटवतात.

हेच आळशी व्यक्ति करत आहे. त्याची हीच इच्छा आहे कीं, आपण काहीं काम न करता घरीच बसायचे. पण घरी बसायला त्याच्याकडें काहींच योग्य कारण नसते. मग, तो काय करतो? तो त्याच्या चुकींच्या इच्छांवर, आळशी पणावर मात करतो का? नाहीं, तो त्याच्या इच्छांचे समर्थन करण्यासाठीं मनात खोट्या परिस्थिति निर्माण करतो.

येशू म्हणाला, “निवाडा हाच आहे कीं, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती” (योहान 3:19). आपल्यांला अंधकार प्रिय आहे कारण आपण न उघडकींस येता आपल्यांला जे हवे ते करूं शकतो. ह्या परिस्थिति मध्यें आपलें मन हे अंधकाराचा कारखाना बनून जातो – अर्ध्यसत्य, शंका, दिशाभूल, कुचराई आणि असत्याचा झरा बनतो – आणि आपल्यां मनातील दुष्ट विचार उघडकींस येण्यापासून आणि नाश होण्यापासून रक्षण करूं पाहतो.

विचार करा आणि सुज्ञ व्हा.

9  June : प्रार्थना करणें हे पापी लोकांकरिताच आहे

Alethia4India
Alethia4India
9  June : प्रार्थना करणें हे पापी लोकांकरिताच आहे
Loading
/

” प्रभुजी, आम्हांला प्रार्थना करण्यास शिकवा.” ( लूक 11:1)

देव पापी लोकांच्या प्रार्थनांचे उत्तर देतो, परिपूर्ण लोकांच्या नाहीं. आणि तुमच्यां प्रार्थनां दुर्बळ असूं शकतात, जर तुम्हीं तुमचे लक्ष क्रूसाकडें करून याची जाणीव केली नाहीं तर. 

मी तुम्हांला जुन्या करारातून अनेक उदाहरणं देऊन हे सिद्ध करूं शकतो जिथे देव त्याच्या पापी प्रजेच्या प्रार्थना ऐकत आहे, जे लोक त्यांचाच पापामुळें संकटात सापडलें आहेत आणि आता ते त्यातून सुटण्याकरिता देवाकडें धावा करत आहेत (उदा., स्तोत्र 38:4, 15; 40:12-13; 107:11-13). पण मी तुम्हांला हे लूक 11 मधून दोन प्रकारे दाखवू शकतो :

प्रभूच्या प्रार्थनें मध्यें (लूक 11:2-4), येशू म्हणतो, “तुम्हीं प्रार्थना कराल तेव्हां असें म्हणा ….” आणि पुढे वचन 4 मध्यें अशी विनंती आहे कीं, “आम्हांला आमच्यां पापांची क्षमा कर.” मग जर तुम्हीं प्रार्थनेंचे सुरूवातीचे वाक्य या मधल्या वाक्या सोबत जोडलें तर, तो म्हणतो कीं, “तुम्हीं प्रार्थना कराल तेव्हां असें म्हणा….. आम्हांला आमच्यां पापांची क्षमा कर.”

मी याचा अर्थ असा घेतो कीं, आपण जसे तुझें नाम पवित्र मानिलें जावो म्हणतो, तितक्याच वेळा आपण हे देखील म्हटलें पाहिजे. म्हणजेंच येशू हे गृहीत धरत आहे कीं, आपण प्रत्येक वेळी प्रार्थना करतो तेव्हां आपण आपल्यां पापांची क्षमा मागितली पाहिजे.

दुसर्‍या शब्दात सांगायचे झालें तर, आपण सर्वदा मूळ पापाच्या अवस्थेंत असतो. आपण जे काहीं करतो ते परिपूर्ण नसते. जसे मार्टिन लुथर यांनी त्यांच्या मृत्यूशय्ये वर असताना म्हटलें, “आपण सर्वजण भिकारी आहोत, हेच सत्य आहे.” जरी आपण प्रार्थना करण्यापूर्वी काहीं अंशी आज्ञापालन केलें असेल तरी, आपण देवाकडें पापी म्हणूनच येतो- सर्वजणच. आणि देव अशा पापी लोकांच्या प्रार्थना ऐकण्यापासून पाठमोरा होत नाहीं, जेव्हां ते अशा प्रकारे प्रार्थना करतात.

दुसरे ठिकाण जिथे आपण हे पाहू शकतो ते लूक 11:13 मध्यें आहे, ‘तुम्हीं वाईट असताही तुम्हांला आपल्यां मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?”  

येशू त्याच्या शिष्यानां “वाईट” म्हणतो. खूपच कठोर भाषा आहे ही. आणि तो असें म्हणत नव्हता कीं ते त्याच्या सहभागितेमध्यें नव्हतें. तो असें म्हणत नाहीं कीं त्यांच्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाहींत.

तो असें म्हणत होता कीं, जो पर्यंत हे पतित जग राहील, त्याचे शिष्य देखील जे काहीं करतील, त्यांचा ओढा भ्रष्टतेकडें राहील, पण जो पर्यंत ते त्याच्या कृपेवर व त्याच्या सामर्थ्यावर अवलंबून आहेत तो पर्यंत ते जें चांगलें तें करत राहतील.

आपण एकाच वेळी दुष्ट आणि तारलेलें असें आहोत. आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानें हळूहळू दुष्टते वर मात करत आहोत. पण आपली पापीवृत्ती तारणानंतर देखील नष्ट झालेंली नाहीं.

आपण पापी आहोत आणि भिकारी आहोत. आणि आपल्यांला ह्या पापाची ओळख पटली तर आपण त्याचा त्याग करायचा, त्याच्याशी लढायचे आणि ख्रिस्ताच्या क्रूसाला आपली आशा समजून बिलगुन राहावें, मग देव आपल्यां प्रार्थना ऐकेल आणि त्यांचे उत्तर देईल. 

8  June : तुमच्यां शरीराद्वारें देवाचा गौरव करा

Alethia4India
Alethia4India
8  June : तुमच्यां शरीराद्वारें देवाचा गौरव करा
Loading
/

कारण तुम्हीं मोलानें विकत घेतलेलें आहात; म्हणून तुम्हीं आपलें शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारें देवाचा गौरव करा. ( 1 करिंथ 6:20)

“भक्ती” हा तो शब्द आहे ज्याचा उपयोग आपण अंतकरण, मन आणि शरीराची सर्व कार्य दर्शविण्यासाठीं करतो, ज्याचा हेतु देवाचे असीम मोल व्यक्त करणें आहे. आपण यासाठींच बनवलें गेलें आहोत. ते काम मंडळीमध्यें गीते गाणें असूं शकते. ते स्वयंपाक करणें किंवा लादी पुसणें असूं शकते.

भक्ती किंवा उपासना म्हंटल्यावर केवळ मंडळीमध्यें दर रविवारी सामूहिकरीत्या होणाऱ्या भक्तीचा विचार करूं नका. हा एक मोठा गैरसमज किंवा “भक्ती” या शब्दाची मर्यादित व्याख्या आहे जी पवित्र शास्त्रात नाहीं. आपलें सर्व जीवनच देवाची भक्ती असायला हवे.

तुमच्यां न्याहारीचाच विचार करा, 1 करिंथ 10:31 सांगते, “म्हणून तुम्हीं खाता, पिता किंवा जे काहीं करता ते सर्व देवाच्या गौरवासाठीं करा.” आता खाणें किंवा पिणें हे सर्वात मूलभूत आहे. खाणें आणि पिणें याच्यापेक्षा खरे किंवा साधे काय असू शकते? आणि पौल असें म्हणतो कीं आपलें सर्व खाणें आणि पिणें भक्ती प्रमाणें असावे.

किंवा पती-पत्नी मधील परस्पर शारीरिक संबंधच पहा, पौल असें म्हणतो कीं जारकर्माला पर्याय भक्ती आहे,

जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते; परंतु जो जारकर्म करतो तो आपल्यां शरीराबाबत पाप करतो. (1 करिंथ 6:18-20)

म्हणजें, तुम्हीं तुमच्यां शरीराद्वारें तुमची लैंगिक इच्छा कशी हाताळता त्यातून तुमची भक्ती व्यक्त होते.

किंवा मरणाकडें एक शेवटचे उदाहरण म्हणून पाहा. आपल्यांला शरीरामध्यें मरणाचा अनुभव होणार आहे. तस पहायला गेलें तर, आपल्यां शरीराद्वारें घडणारे ते शेवटचे कार्य आहे. आपलें शरीर जगाचा निरोप घेते. मग आपण आपल्यां ह्या शेवटच्या कृती द्वारें भक्ती कशी करणार? याचे उत्तर फिलिप्पै 1:20-21 मध्यें आहे. पौल म्हणतो कीं त्याची आशा आहे कीं ख्रिस्त गौरवला जावा – त्याच्या मरणाच्या शरीराद्वारें त्याची भक्ती व्हावी, आणि तोच योग्य आहे हेच प्रतीत व्हावे. मग तो पुढे म्हणतो, “माझ्यासाठीं …. मरणें हे लाभ आहे.” आपण आपलें मरण हे लाभ आहे असें जेव्हां म्हणतो तेव्हांच ख्रिस्ताचे अनंत मोल व्यक्त करतो.

होय तुम्हांला शरीर आहे. पण ते तुमचे नाहीं. “तुम्हीं मोलानें विकत घेतलेलें आहात; म्हणून तुम्हीं आपलें शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारें देवाचा गौरव करा”

तुम्हीं नेंहमीच मंदिरात आहात. नेंहमी भक्ति करा.

7 June : आम्हीं विश्वासानें जगतो

Alethia4India
Alethia4India
7 June : आम्हीं विश्वासानें जगतो
Loading
/

मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेंला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असें नाहीं, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्यें जे माझें जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगानें आहे; त्यानें माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिलें. (गलती 2:20)

विश्वास हा देवाच्या भावी कृपे बरोबर तंतोतंत सुसंगत आहे. तो कृपेचा पुरेसेपणा आणि त्याद्वारें मिळालेलें स्वातंत्र यांबरोबर अनुरूप आहे. तो देवाच्या गौरवी विश्वासार्हतेकडें आपली दृष्टि लावण्यांस सांगतो.

या निष्कर्षाचा एक महत्वपूर्ण संकेत म्हणजें हा कीं जो विश्वास आम्हांला नीतिमान ठरवतो आणि जो विश्वास आमचे पवित्रीकरण करतो तो वेग-वेगळा विश्वास नाहीं. “पवित्र केलें जाण्याचा” सरळ अर्थ म्हणजें पवित्र होणें किंवा ख्रिस्ताच्या स्वरूपाचे होणें. हे सर्व कृपे मुळें आहे.

म्हणून, हे देखील विश्वासाद्वारें असलें पाहिजे. कारण विश्वास हा आमच्यां अंतकरणाची कृती आहे, आणि तो कृपे बरोबर जोडला जातो, तिला मान्य करतो, आणि तिच्याद्वारें आज्ञाधारकतेचे सामर्थ्य मिळवितो, आणि कृपेला मानवी आढ्यतेमुळें रद्द होण्यापासून सुरक्षित ठेवतो .

पौल विश्वास आणि पवित्रीकरण यांमधील संबंध गलती 2:20 मध्यें स्पष्ट करतो (“मी विश्वासानें जगतो”). पवित्रीकरण हे आत्म्याचे आणि विश्वासचे कार्य आहे. म्हणजें हे कृपा आणि विश्वासाद्वारें आहे असें म्हणण्या प्रमाणें आहे. आत्मा हा “कृपेचा आत्मा आहे” (इब्रि 10:29). देव आपल्यांला ज्यां मार्गानें पवित्र करतो तो मार्ग आत्म्याद्वारें आहे; पण आत्मा सुवार्ते वरील विश्वासाद्वारें कार्य करतो.

विश्वास जो नीतिमान ठरवतो आणि विश्वास जो पवित्रीकरण करतो तो एकच आहे आहे स्पष्ट कारण हे कीं नीतिमान ठरवलें जाणें आणि पवित्रीकरण हे दोन्ही सार्वभौम कृपेची कार्ये आहेत. आणि हा विश्वास कृपेबरोबर कार्य करतो. नीतिमान घोषित करणें आणि पवित्रीकरण हे दोन्ही एकाच प्रकारचे कार्य नाहींत (कारण नीतिमान घोषित केलें जाणें हे नीतिमान गणिलें जाणें आहे, तर पवित्रीकरण हे त्या नीतीमत्वाचे दर्शक आहे) आणि ही दोन्ही कृपेची कार्ये आहेत. पवित्रीकरण आणि नीतिमान ठरवलें जाणें ही “कृपे वर कृपा आहे” ( योहान 1:16).  

विश्वास हा देवाच्या विनामूल्य कृपेचा मनुष्यामध्यें घडून येणारा परिणाम आहे. जर नीतिमान घोषित केलें जाणें आणि पवित्रीकरण ही दोन्ही कृपेची कार्य आहेत तर, ती दोन्हीही विश्वासाद्वारेंच आहेत हे स्पष्ट आहे.  

6   June : सर्वच देवाचे वैरी

Alethia4India
Alethia4India
6   June : सर्वच देवाचे वैरी
Loading
/

जे तुम्हीं पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनानें वैरी झाला होता, ‘त्या तुमचा आता त्यानें स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारें समेट केला आहे, ह्यासाठीं कीं त्यानें तुम्हांला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असें आपणासमोर उभे करावे. (कलसै 1:21-22)

 जगातील सर्वात चांगली बातमी ही आहे कीं देवा बरोबर असलेंला आमचा परकेपणा व वैर संपलेलें आहे आणि आता आपला या विश्वाच्या न्यायाधीशा सोबत समेट झाला आहे. देव आता आपल्यां विरुद्ध नाहीं तर, आपल्यां सोबत आहे. सर्वसमर्थाची प्रीति आपल्यां बाजूनें असल्यानें आपल्यां आत्म्याला कवच प्राप्त होते. जीवन हे स्वतंत्र आणि धाडसी बनते जेव्हां विश्वातली सर्वात सामर्थ्यवान व्यक्ती आपल्यां बाजूनें असतो.

पण जे कलस्सै 1:21 मध्यें सांगण्यांत आलेलें रोग-निदान नकारतात, पौलाचा तारणाचा संदेश त्यांच्यासाठीं चांगली बातमी नाहीं. तो म्हणतो, “तुम्हीं परके व दुष्कर्मे करत मनानें वैरी झाला होता.”

तुम्हीं अशा किती लोकांना ओळखता जे असें म्हणतात कीं, “मजवर जर देवानें कृपा केली नाहीं तर मग मी मनानें देवाचा वैरी आहे”? , “मी देवाचा द्वेष करतो. असें क्वचितच लोक म्हणतात. मग पौलाचे काय म्हणणें आहे जेव्हां तो म्हणतो कीं येशूच्या रक्ताद्वारें समेट होण्यापूर्वी सर्व लोक”देवाचे वैरी आहेत”?

मला वाटते कीं खर्‍या देवाबद्दल लोकांच्या मनात वैर आहे, पण लोक खर्‍या देवाचा विचार करण्याचा प्रयत्न करत नाहींत. त्यांना वाटते कीं देव अगदी त्यांच्या कल्पनेंप्रमाणें आहे, ज्या मध्यें आपण देवाचे वैरी आहोत असा विचार त्यांना क्वचितच पडत असेल.

पण खरा देव जो अस्तित्वात आहे त्याच्याविषयीं विचार करायचा झाल्यास – तो देव जो सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवतो, आजार आणि आपत्तीवर ही -आपण सर्व त्याचे वैरी होतो, पौल म्हणतो आपण मनानें त्याचे सामर्थ्य आणि अधिकार याचा द्वेष करत होतो.

आणि जे आपलें तारण झालें आहे ते या अढ्भुत सत्यामुळें कीं ख्रिस्तानें त्याच्या मरणानें आम्हांसाठीं कृपा प्राप्त केलीं आहे ज्या द्वारें देवानें आपल्यां मनाचा ताबा घेतला आणि एकेकाळी ज्याचा आपण द्वेष करत होतो, ते आपण आता त्याच्यावर प्रीति करण्यास प्रवृत्त झालो.

आज पुष्कळ लोग असें आहेत जें देवाबरोबर आपलें कसेही वैर नसावे हे शिकत आहेत. हे चांगलें आहे कीं तो एक असा रोगी आहे ज्याच्या वाट्याला शेवटी गौरव आहे.

5 June : ऐहिक गरजांसाठीं देवावर अवलंबून राहणें

Alethia4India
Alethia4India
5 June : ऐहिक गरजांसाठीं देवावर अवलंबून राहणें
Loading
/

“तर तुम्हीं पहिल्यानें देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजें त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.” (मत्तय 6:33)

देवाच्या संपन्न भावी कृपे विषयीं असलेंल्या सर्वात सामर्थ्यशाली साक्षींपैकीं एक म्हणजें “विश्वासाचा नियम” ज्यांवर पुष्कळ मिशनऱ्यांच्या जीवनाची वाटचाल आधारलेंली होती, विशेषता: ओवर्सीज मिशनरी फेलोशिप (ओ एम एफ) या संस्थेच्या मिशनऱ्यांचे जीवन.

इतरांच्या कार्य-पद्धतीचा निषेध न करता, विश्वासाचा हा नियम त्यां लोकांचे जीवन-तत्व होते जे हडसन टेलर आणि जॉर्ज मुलर यांच्या पथ-चिन्हांवर चालून, लोकांकडें निधि न मागता थेट देवाकडें विनवणी करित असत कीं दान देण्याकरिता लोकांच्या मनात त्यानेंच कार्य करावें.

जेम्स एच, टेलर जे ओ एम एफ च्या संस्थापकांचे पणतू होते, स्पष्ट करतांत कीं भावी काळातील कृपेवर असलेंला हा विश्वास, जो गत काळात झालेंल्या कृपेत मूळांवलेंला असतो, तो कसा देवाचे गौरव करतो.

“आम्हीं ….. विश्वासापासून सुरुवात करतो. आम्हीं विश्वास ठेवतो कीं देव आहे. अनेक मार्गानी आम्हांला याची खात्री पटली आहे, पण आम्हीं सर्वांनी देवाच्या कृपेचा अनुभव घेतला आहे कीं आम्हीं येशू ख्रिस्ता द्वारें आणि आत्म्याच्या नवीन जन्माद्वारें त्याला ओळखू  शकतो. येशू ख्रिस्ताच्या मरणातून पुनरुत्थानाचा इतिहासातील पुरावा हा त्याच्यावर विश्वास ठेवण्यास भक्कम पाया आहे; जो बोलला कीं तो मरेल आणि पुन्हा जीवंत होईल आणि तो झाला, तो सर्वच बाबतीत विश्वासार्ह आहे. त्यामुळें, आम्हीं त्याच्यावर विश्वास ठेवण्यास तयार आहोत, केवळ आमच्यां आत्म्याच्या सार्वकालिक तारणासाठींच नाहीं तर, आमच्यां रोजच्या भाकरीसाठीं आणि आर्थिक पुरवठयासाठीं सुद्धा.

ओ एम एफ नें आपल्यां मासिकांत देवाच्या अढ्भुत भावी पुरवठा करणार्‍या त्याच्या गौरवीपणा बद्दल आणि त्याच्या विश्वासूपणा बद्दल अशी साक्ष प्रकाशित केली : “आम्हांला हे दर्शवायचे आहे कीं देव जे सांगतो कीं तो जे करील, ते करण्याबाबत तो विश्वासू आहे. तो सामान्य गरजा जसे कीं विमानाचे टिकिट, अन्न, दवाखान्याचा खर्च आणि ख्रिस्ती गटाच्या नेंहमीच्या गरजांचा पुरवठा शंभर वर्षाहून अधिक काळ तो करत आला आहे.”

ओ एम एफ त्यांच्या संदेशामधून आणि त्यांच्या पद्धतीमधून, देवाच्या विश्वासूपणाचा गौरव करण्यात समर्पित आहे. हडसन टेलर असें म्हणतात : “एक जीवंत देव आहे. आणि तो पवित्र शास्त्रात आपल्यांशी बोललेंला आहे. आणि तो ज्या गोष्टींचे अभिवचन देतो, त्या गोष्टी तो पूर्णहि करतो.”

विश्वासावर चालणारे जीवन हे देवाच्या भरवश्याचा आरसा आहे.

4 June : देवाला ज्यां गोष्टीचा अभिमान वाटतो

Alethia4India
Alethia4India
4 June : देवाला ज्यां गोष्टीचा अभिमान वाटतो
Loading
/

पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजें स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात; ह्यामुळें आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला देवाला त्यांची लाज वाटत नाहीं; कारण त्यानें त्यांच्यासाठीं नगर तयार केलें आहे. (इब्री 11:16)

देव जे अब्राहाम, इसहाक व याकोबाबद्दल बोलला ते त्यानें माझ्या बद्दल देखील बोलावे असें मला खूप वाटते, कीं “मला तुमचा देव म्हणवून घ्यायलालाज वाटत नाहीं “

हे जरी जोखमीचे वाटत असलें तरी, याचा अर्थ असा नाहीं आहे का, कीं देवाला तो माझा देव असण्याबद्दल खरेच “गर्व” वाटत असावा? सुदैवानें ही अद्भुत शक्यता (इब्री 11:16 मध्यें) त्याच्या कारणांनी वेढलेंली आहे : एक आधी आणि एक नंतर.

पहिलं कारण म्हणजें : “आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला देवाला त्यांची लाज वाटत नाहीं; कारण त्यानें त्यांच्यासाठीं नगर तयार केलें आहे.”

त्याला आपला देव म्हणून घेण्यास लाज वाटत नाहीं याचे पहिलें कारण जे तो देतो ते हे कीं त्यानें त्यांच्यासाठीं काहीं तरी केलें आहे. त्यानी त्यांच्यासाठीं एक नगर बनवलें आहे – स्वर्गीय नगर जे “देवानें योजलेलें व बांधलेलें आहे ” (इब्री 11:10). यास्तव त्याला त्यांचा देव म्हणवून घेण्यास लाज वाटत नाहीं याचे पहिलें कारण हे कीं त्यानें त्यांच्यासाठीं कार्य केलें आहे. ना कीं आपण त्याच्यासाठीं काहींतरी केलें आहे.

आता, तो पुढे काय कारण देतो ते पहा. ते अश्या प्रकारे आहे : “पण ते अधिक चांगल्या देशाची म्हणजें स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. त्यामुळें देवाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला लाज वाटत नाहीं.”

“ह्यामुळें” निर्देशित करते कीं, आताच कारण दिलें गेलें आहे कीं का देवाला आमचा देव म्हणवून घेण्यास लाज वाटत नाहीं. याचे कारण आहे कीं ते उत्कंठा धरतात. ते चांगल्या देशाची इच्छा करतात – म्हणजेंच ते आता ज्या भौतिक राष्ट्रात राहत आहेत त्यापेक्षा जास्त चांगल्या देशाची ते उत्कंठा धरतात, स्वर्गीय शहर जेथे देव आहे.

जेव्हां आपण हे जग आपल्यांला जे देईल त्यापेक्षा, त्या स्वर्गीय नगराची उत्कंठा धरतो – जे देवाचे निवासस्थान आहे – तेव्हां देवाला आपला देव म्हणवून घेण्यास लाज वाटत नाहीं. देव आपल्यांला जे काहीं देऊ करणार आहे त्या अभिवचनांना आपण जेव्हां महत्व देतो तेव्हां, देवाला आपला गर्व वाटतो. ही चांगली बातमी आहे.

म्हणून, एका चांगल्या देशाकडें तुमची नजर वळवा, जे नगर देवानें आपल्यांकरिता बनवलें आहे, आणि पूर्ण अंत:करणनें त्याची उत्कंठा धरा. देवाला तुमचा देव म्हणवून घेण्यास लाज वाटणार नाहीं.

3 June :अशक्य गोष्टींसाठीं विश्वास

Alethia4India
Alethia4India
3 June :अशक्य गोष्टींसाठीं विश्वास
Loading
/

परंतु देवाच्या अभिवचनाकडें पाहून तो अविश्वासामुळें डळमळला नाहीं, तर विश्वासानें सबळ होऊन त्यानें देवाचा गौरव केला; ‘आणि देव आपण दिलेलें अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती. ( रोम 4:20-21).

विश्वास भविष्यातील देवाच्या कृपेचा गौरव करितो हे मानण्याकरिता पौलाकडें विशेष कारण होते. सरळ शब्दात सांगायचे झालें तर, याचे कारण म्हणजें देवाला गौरव देणारा विश्वास हा भविष्यातील अभिवचनांविषयीं देवाचा विश्वासूपणा आणि त्याचे सामर्थ्य आणि त्याचे ज्ञान यांत असणारी खात्री आहे.

अब्राहामानें देवाच्या अभिवचनांना कसा प्रतिसाद दिला याचे उदाहरण देऊन पौल हे स्पष्ट करतो : कीं तो अनेक राष्ट्रांचा पिता होणार जरी तो वयस्कर झाला होता आणि त्याची पत्नी वांझ होती तरीही. ‘“तशी तुझी संतती होईल,” ह्या वचनाप्रमाणें त्यानें ‘बहुत राष्ट्रांचा बाप’ व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्यानें आशेनें विश्वास ठेवला. (रोम 4:18) म्हणजेंच देवाच्या अभिवचनांत असलेंल्या भविष्यातील कृपेवर त्याचा विश्वास होता, जरी सर्व भौतिक पुरावे प्रतिकूल असलें तरी.

तथापि विश्वासानें दुर्बळ न होता, आपलें निर्जीव झालेलें शरीर (तो सुमारे शंभर वर्षांचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्यानें लक्षात घेतली; आणि देव आपण दिलेलें अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती. परंतु देवाच्या अभिवचनाकडें पाहून तो अविश्वासामुळें डळमळला नाहीं, तर विश्वासानें सबळ होऊन त्यानें देवाचा गौरव केला; ‘आणि देव आपण दिलेलें अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती.  ( रोम 4:19-20)

अब्राहामाचा विश्वास देवाच्या या अभिवचनांवर होता कीं देव त्याला अनेक राष्ट्रांचा पिता बनविल. हा विश्वास देवाला गौरवणारा विश्वास होता कारण त्याद्वारें देवाच्या सर्वसमर्थ, अलौकिक संसाधंनें जे तो सर्व अभिवचनें पूर्ण करण्यासाठीं पुरवणार होता त्याच्यावर लक्ष केंद्रीत करणारा होता.

अब्राहाम हा वयस्कर झाला होता आणि सारा वांझ होती. इतकेच नाहीं तर : तुम्हीं एक किंवा दोन मुलां द्वारें “अनेक राष्ट्र” कशी बनवू शकता, ज्या बद्दल देवानें अब्राहमाला वचन दिलें होते? हे सर्व अशक्यप्राय होते.

त्यामुळें, अब्राहामाचा विश्वास देवाचा गौरव करणारा विश्वास होता, कीं देव जे मनुष्याला अशक्य ते शक्य करूं शकतो आणि तो ते करणार. आपल्यांला देखील अश्याप्रकारे विश्वास ठेवण्यास बोलावलें आहे. आपण जे आपल्यांसाठीं करूं शकत नाहीं ते देव आपल्यांसाठीं करील.