3 June :अशक्य गोष्टींसाठीं विश्वास

Alethia4India
Alethia4India
3 June :अशक्य गोष्टींसाठीं विश्वास
Loading
/

परंतु देवाच्या अभिवचनाकडें पाहून तो अविश्वासामुळें डळमळला नाहीं, तर विश्वासानें सबळ होऊन त्यानें देवाचा गौरव केला; ‘आणि देव आपण दिलेलें अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती. ( रोम 4:20-21).

विश्वास भविष्यातील देवाच्या कृपेचा गौरव करितो हे मानण्याकरिता पौलाकडें विशेष कारण होते. सरळ शब्दात सांगायचे झालें तर, याचे कारण म्हणजें देवाला गौरव देणारा विश्वास हा भविष्यातील अभिवचनांविषयीं देवाचा विश्वासूपणा आणि त्याचे सामर्थ्य आणि त्याचे ज्ञान यांत असणारी खात्री आहे.

अब्राहामानें देवाच्या अभिवचनांना कसा प्रतिसाद दिला याचे उदाहरण देऊन पौल हे स्पष्ट करतो : कीं तो अनेक राष्ट्रांचा पिता होणार जरी तो वयस्कर झाला होता आणि त्याची पत्नी वांझ होती तरीही. ‘“तशी तुझी संतती होईल,” ह्या वचनाप्रमाणें त्यानें ‘बहुत राष्ट्रांचा बाप’ व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्यानें आशेनें विश्वास ठेवला. (रोम 4:18) म्हणजेंच देवाच्या अभिवचनांत असलेंल्या भविष्यातील कृपेवर त्याचा विश्वास होता, जरी सर्व भौतिक पुरावे प्रतिकूल असलें तरी.

तथापि विश्वासानें दुर्बळ न होता, आपलें निर्जीव झालेलें शरीर (तो सुमारे शंभर वर्षांचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्यानें लक्षात घेतली; आणि देव आपण दिलेलें अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती. परंतु देवाच्या अभिवचनाकडें पाहून तो अविश्वासामुळें डळमळला नाहीं, तर विश्वासानें सबळ होऊन त्यानें देवाचा गौरव केला; ‘आणि देव आपण दिलेलें अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती.  ( रोम 4:19-20)

अब्राहामाचा विश्वास देवाच्या या अभिवचनांवर होता कीं देव त्याला अनेक राष्ट्रांचा पिता बनविल. हा विश्वास देवाला गौरवणारा विश्वास होता कारण त्याद्वारें देवाच्या सर्वसमर्थ, अलौकिक संसाधंनें जे तो सर्व अभिवचनें पूर्ण करण्यासाठीं पुरवणार होता त्याच्यावर लक्ष केंद्रीत करणारा होता.

अब्राहाम हा वयस्कर झाला होता आणि सारा वांझ होती. इतकेच नाहीं तर : तुम्हीं एक किंवा दोन मुलां द्वारें “अनेक राष्ट्र” कशी बनवू शकता, ज्या बद्दल देवानें अब्राहमाला वचन दिलें होते? हे सर्व अशक्यप्राय होते.

त्यामुळें, अब्राहामाचा विश्वास देवाचा गौरव करणारा विश्वास होता, कीं देव जे मनुष्याला अशक्य ते शक्य करूं शकतो आणि तो ते करणार. आपल्यांला देखील अश्याप्रकारे विश्वास ठेवण्यास बोलावलें आहे. आपण जे आपल्यांसाठीं करूं शकत नाहीं ते देव आपल्यांसाठीं करील.  

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *