26 December : विपत्तीचा खोलवर विचार कसा करावा

Alethia4India
Alethia4India
26 December : विपत्तीचा खोलवर विचार कसा करावा
Loading
/

मृत्युतरंगानी मला वेष्टिले अधर्माच्या पुरांनी मला घाबरे केलें…. देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे ( 2 शमुवेल 22:5,31)

नैसर्गिक विपत्तीमुळें दहा मुलांचा मृत्यू झाल्यानंतर (ईयोब 1:19), ईयोब म्हणाला, “परमेश्वराने दिलें आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम” (ईयोब 1:21). जे घडले त्यासंबंधी ईयोबाचा जो समज होता त्यासंबंधी पुस्तकाच्या शेवटी, देव-प्रेरित लेखकाने पुष्टी केली. तो म्हणतो कीं ईयोबाच्या भावा आणि बहिणींनी ‘‘परमेश्वराने त्याजवर जी विपत्ती आणिली होती तीविषयी त्याचे समाधान केलें.’’ (ईयोब 42:11).

जगातील आणि आपल्या जीवनातील विपत्तीबद्दल विचार करीत असताना  – 26 डिसेंबर 2004 रोजी हिंद महासागरात घडलेली मोठी विपत्ती ज्यामध्यें  – 1.7 दशलक्ष लोक बेघर झालें, अर्धा दशलक्ष जखमी झालें, आणि 230,000 हून अधिक मारल्या गेलें, या गोष्टी ध्यानात ठेवून आज नवीन वर्षाच्या पहाटे आपल्याकरिता ह्यासंबंधी अनेक महत्वपूर्ण ध्वन्यर्थ धडे आहेत.

धडा: 1. सैतान हा अंतिम नाहीं; देव आहे.

ईयोबाच्या दुःखात सैतानाचा हात होता, परंतु तो हात निर्णायक नव्हता. ईयोबाला त्रास देण्याची परवानगी देवानें सैतानाला दिली होती (ईयोब 1:12; 2:6). परंतु ईयोब आणि ह्या पुस्तकाचा लेखक हे दोघेही देवालाच निर्णायक कारण असे समजतात. जेव्हां सैतान ईयोबाला मोठमोठ्या गळव्यांची पिडा देतो, तेव्हां ईयोब आपल्या बायकोला म्हणतो, “देवापासून सुखच घ्यावे, आणि दुःख घेऊ नये काय?” (ईयोब 2:10), आणि लेखक या सैतानी गळव्यांना “परमेश्वराने आणलेली विपत्ती’’ असे म्हणतो (ईयोब 42:11). तर, सैतान खरोखर आहे. सैतान विपत्ती आणतो. पण सैतान अंतिम किंवा निर्णायक नाहीं. तो ताब्यात ठेवल्या गेला आहे. देवानें निर्णायकपणें परवानगी दिल्याशिवाय तो पुढे जात नाहीं.

धडा: 2.  जरी सैतानाने 2004 च्या नाताळाच्या दुसर्‍या दिवशी हिंद महासागरात त्सुनामी आणली, तेव्हां सैतान हा 200,000 पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचे निर्णायक कारण नव्हता, तर देव होता.

ईयोब 38:8 आणि 11 मध्यें देव जेव्हां ईयोबाला अलंकारिकपणें विचारतो, “समुद्र उफळून गर्भााशयातून पडावा असा बाहेर पडला तेव्हां त्यास कवाडे लावून तो कोणी अडविला?… आणि म्हणाला, तू येथवरच ये; यापलीकडें तू येतां कामा नये; येथे तुझ्या उन्मत्त लहरी थांबल्या पाहिजेत”, तेव्हां तो सुनामीवर आपल्या अधिकाराचा दावा करतो. स्तोत्र 89:8-9 म्हणते, “हे सेनाधीश देवा, परमेश्वरा… समुद्राच्या खळबटावर तू अधिकार चालवितो; तो उचंबळतो तेव्हां त्याच्या लाटा तू शांत करितोस.’’ आणि आज येशू तेच नियंत्रण ठेवितो. एकदा त्यानें जीव घेणार्‍या लाटांना शांत केलें, ‘‘तेव्हां त्यानें उठून वार्‍याच्या व पाण्याच्या कल्होळास धमकाविले आणि ती बंद होऊन निवांत झालें (लूक 8:24). दुसर्‍या शब्दांत, सैतानाने जरी समुद्रात भूकंप घडवून आणला, तरी देव त्या लाटा थांबवू शकला असता. पण त्यानें तसे केलें नाहीं.

धडा: 3. या जगातील विध्वंसक विपत्ती ह्या न्याय आणि दयेला एकत्र करतात.

देवाचे हेतु साधे नाहींत. ईयोब देवभिरू मनुष्य होता आणि त्याचे दुःख देवानें दिलेंला दंड नव्हते (ईयोब 1:1, 8). त्यांची रचना शुद्ध करणारी होती, दंडात्मक नव्हती (ईयोब 42:6). याकोब 5:11 मध्यें वचन म्हणते, ‘‘तुम्हीं ईयोबाच्या धीराविषयीं ऐकलें आहे, आणि त्याच्याविषयींचा प्रभूचा जो हेतु होता तो तुम्हीं पाहिला आहे; ह्यावरून ‘प्रभू फार कनवाळू व दयाळू’ आहे हें तुम्हांस दिसून आलें.’’

परंतु ईयोबाच्या मरण पावलेल्या मुलांची आध्यात्मिक स्थिती आपल्याला माहीत नाहीं. ईयोबाला त्यांच्याबद्दल नक्कीच कळकळ होती (ईयोब 1:5). देवानें न्यायामुळें त्यांचा जीव घेतला असावा. आपल्याला याविषयी माहीत नाहीं.

जर ते खरे असेल, तर तीच विपत्ती शेवटी ईयोबासाठीं दया आणि त्याच्या मुलांवर न्याय म्हणून सिद्ध झाली. हा दुहेरी हेतू सर्व विपत्ती संबंधी खरा आहे. ते न्याय आणि दया यांना एकत्र करतात. ते शिक्षा आणि शुद्धीकरण दोन्ही आहेत. दुःख आणि मृत्यूसुद्धा एकाच वेळी न्याय आणि दया दोन्ही असू शकतात.

याचे सर्वात स्पष्ट उदाहरण म्हणजें येशूचा मृत्यू. तो न्याय आणि दया दोन्ही होता. तो येशूवर न्याय होता कारण त्यानें आमची पापे स्वतःवर घेतली होती (ती पापे त्याची स्वतःची नव्हती), आणि ज्या आम्हीं त्याच्यावर विश्वास ठेवला कीं तो आमच्या पापांची शिक्षा सहन करेल त्या आम्हाकरिता देवानें केलेंली ती दया होती (गलती 3:13; 1 पेत्र 2:24) आणि आपण त्याच्याद्वारे देवाचे नीतिमत्व असे व्हावे (2 करिंथ 5:21).

दुसरे उदाहरण म्हणजें आदाम आणि हव्वा यांच्या पतनामुळें या पृथ्वीवर आलेला शाप आणि दुःख. जे ख्रिस्तावर कधीच विश्वास ठेवीत नाहींत ते या शापाला व दुःखाला न्याय म्हणून अनुभवतात, परंतु विश्वासणारे त्याला दयाळूपणा म्हणतात, मग ते पीडा देणारे असले तरी त्याला ते गौरवाची तयारी असे अनुभवतात. ‘‘कारण सृष्टि व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यांत आली ती आपखुशीनें नव्हे, तर ती स्वाधीन करणार्‍यामुळें’’ (रोम 8:20). ही देवाची अधीनता आहे. त्यामुळेंच सुनामी आली. पण निरर्थकतेची ही अधीनता “आशेमध्यें” आहे.

धडा: 4. दुःखातून जात असलेल्या इतर लोकांचा विश्वास कसाही असला तरी, ख्रिस्त आपल्या लोकांना जे हृदय देतो त्या हृदयात दुःख सहन करणार्‍या त्या लोकांबद्दल सहानुभूती असते.

जेव्हां बायबल म्हणते, ‘‘शोक करणार्‍यांबरोबर शोक करा’’ (रोम 12:15), तेव्हां त्या वचनात असे शब्द जोडल्या गेलें नाहीं, ‘‘जर देव त्यांच्या रडण्याचे कारण नाहीं तर’’. ईयोबाचे सांत्वनकर्ते खूप जास्त बोलण्यापेक्षा ईयोबाबरोबर रडले असते तर ते बरे झालें असते. ईयोबाचे दुःख शेवटी देवाकडूनच होते हे जेव्हां आपल्याला कळते तेव्हां ते बदलत नाहीं. नाहीं, जे त्रास सहन करीत आहेत त्यांच्यासोबत रडणें योग्य आहे. वेदना ही वेदना असते, मग ती कोणाचीही असो. आपण सर्व पापी आहोत. सहानुभूती वेदनांच्या कारणातून नाहीं तर वेदनांच्या सहवासातून वाहते. आणि आम्हीं सर्व यात एकत्र आहोत.

धडा: 5. शेवटी, जे दुःख भोगत आहेत ते जरी पात्र नसले तरी देखील ख्रिस्त आपल्याला त्यांच्यावर दया दाखवण्यासाठीं पाचारण करतो.

हाच दयेचा अर्थ आहे – पात्र नसताना केलेलें सहाय्य. ‘‘वैर्‍यांवर प्रीति करा; जे तुमचा द्वेष करितात त्यांचें बरें करा’’ (लूक 6:27). ख्रिस्तहि आपल्यासोबत असेच वागला (रोमकरांस 5:10), जेव्हां आपण त्याचे वैरी होतो तेव्हां त्यानें आपल्यासाठीं स्वतःचा प्राण दिला. त्याच सामर्थ्याने, आणि त्याचाच आदर्श घेऊन, आपणहि तेच करावे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *