माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील. (फिलिप्पै 4:19 RV-BSI)
फिलिप्पैकर 4:6 मध्यें, पौल म्हणतो, “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” आणि मग (केवळ 13 वचनांनंतर), फिलिप्पै 4:19 मध्यें तो चिंतामुक्त करणारे असे भावी कृपेविषयीचे अभिवचन देतो : “माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील.”
जर आपण भावी कृपेच्या या अभिवचनावरील विश्वासाने जगतो, तर चिंतेला निभाव करणें खूप कठीण होईल. देवाची “वैभवशाली समृद्धी” अक्षय आहे. आपण आपल्या भविष्याविषयी चिंताक्रांत होऊ नये अशी त्याची खरोखर इच्छा आहे.
पौलाने आपल्यासाठीं मांडलेल्या ह्या धोरणावर आपण चालावें. आपण भावी कृपेचे हे अभिवचन दृढ धरूनच चिंतारूपी अविश्वासाशी सुयुद्ध केलें पाहिजे.
जेव्हा मी एखादी धोकादायक नवी सेवा किंवा सार्वजनिक सभा यांविषयी चिंताक्रांत होऊन जातो, तेव्हा मी नेहमीच माझी जी सर्वात जास्त उपयोगांत आणली जाणारी अभिवचने आहेंत त्यांपैकीं एक म्हणजें यशया 41:10 हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढा देतो.
ज्या दिवशी मी पुढील तीन वर्षे जर्मनीत जाऊन राहण्यासाठीं अमेरिकेहून निघालो त्यावेळी माझ्या वडिलांनी मला दूरध्वनीवरून फोन करून हेच अभिवचन दिलें होते. प्रचंड ताणतणावातून बाहेर निघण्यासाठीं मी सलग तीन वर्षें हेच अभिवचन स्वतःला पाचशे वेळा तरी वाचून दाखविले असेल. “तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.”
मी हे अभिवचन घेऊन इतक्या वेळा चिंतेशी लढा दिला आहे कीं जेव्हा माझे मन कोणताही विचार करित नसते, तेव्हा जो आवाज मला माझ्या मनांत ऐकू येतो तो यशया 41:10 चा आवाज असतो.