ArchivesSolid Joys

3 March : चांगुलपणाच्या मनोदयाद्वारें देवाचे कार्य

Alethia4India
Alethia4India
3 March : चांगुलपणाच्या मनोदयाद्वारें देवाचे कार्य
Loading
/

ह्याकरता तर आम्हीं तुमच्यासाठीं सर्वदा अशी प्रार्थना करतो कीं, आपल्यां देवानें तुम्हांला झालेल्यां ह्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे. 2 थेस्सलनी 1:11

आपले चांगुलपणाचे मनोदय पूर्ण करण्याकरिता देवाच्या सामर्थ्याचा शोध करणे याच अर्थ असा होत नाहीं कीं आपण संकल्पच (मनोदय) करत नाहीं किंवा आपण आपल्यां इच्छाशक्तीचा वापर करत नाहीं.

देवाच्या सामर्थ्याची बाजू आपल्यां इच्छेच्या बाजूची जागा कधीच घेत नाहीं, आपल्यां पवित्रीकरणातील देवाचे सामर्थ्य आपल्यांला निष्क्रिय बनवत नाहीं! देवाच्या इच्छेचे सामर्थ्य आपल्यां इच्छेची जागा न घेता, ते आपल्यां इच्छेच्या मुळाशी किंवा मागे आणि इच्छेमध्यें राहून कार्य करते.

आपल्यांतील इच्छेचा अभाव हा देवाच्या सामर्थ्याचा पुरावा नसून, आपल्यां इच्छेचे सामर्थ्य व आपले आनंदाने इच्छा करणे याचा पुरावा आहे.

जर कोणी म्हणत असेल कीं, “माझा देवाच्या सार्वभौमतेवर विश्वास आहे आणि म्हणून मी नुसतं बसून राहणार,  काहींच करणार नाहीं, तर त्याचा देवाच्या सार्वभौमतेवर विश्वास नाहीं आहे. कारण जर कोणी देवाच्या सार्वभौमतेवर विश्वास ठेवत असेल तर तो का बरं उघडपणे देवाची आज्ञा मोडेल?

जेव्हां तुम्हीं काहींच न करण्याचा निर्णय घेता, तेव्हां तुम्हीं काहींच करत नाहीं असे होत नाहीं. तुम्हीं तुमची इच्छाशक्ती सक्रियपणे काहींच न करण्यासाठीं वापरत आहात. आणि जर तुम्हीं अशाप्रकारे तुमच्या जीवनात येणारे पाप आणि मोहाला हाताळत असाल तर ते देवाची आज्ञा मोडण्यासारखे आहे, कारण आपल्यांला आज्ञा दिली आहे कीं, सुयुद्ध कर (1 तिमथ्य 1:18), सैतानाला अडवा ( याकोब 4:7), पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा ( इब्री 12:14) आणि शरीराची कर्मे ठार मारा ( रोम 8:13).

2 थेस्सलनी 1:11असे म्हणते कीं, आपले चांगुलपणाचे मनोदय आणि विश्वासाचे कार्य हें देवाच्या सामर्थ्याने पूर्ण होतात. म्हणून “चांगुलपणाचे मनोदय” आणि “कार्य” या शब्दाचे महत्व रद्द होत नाहीं. आम्हांला झालेल्यां ह्या पाचारणाला योग्य असे चालण्याकरिता, नीतीमत्वाला शोभेसे कृत्य करण्याच्या सत्संकल्पामध्यें आपल्यां इच्छेला सक्रियपणे सहभागी करणे आवश्यक असते.

जर तुमच्या जीवनात प्रदीर्घ काळापासून काहीं पाप आहे, किंवा तुम्हीं काहीं तरी चांगले कर्म करण्याकडें दुर्लक्ष करत आहात कारण तुम्हीं त्याच्याशी लढा न देताच विजय मिळवू पाहता, तर तुम्हीं तुमच्या आज्ञाभंगामध्यें वाढ करीत आहात. देव त्याच्या सामर्थ्याचा वापर तेव्हांच करतो, जेव्हां आपण आपल्यां इच्छेचा वापर करतो, व आपल्यां इच्छेद्वारें देवाचे सामर्थ्य आपल्यां चांगुलपणाच्या मनोदयातून – आपल्यां सदभावातून आणि योजना आणि उद्देश यातून कार्य करते.

यासाठींच, जे लोक देवाच्या सार्वभौमतेमध्यें विश्वास ठेवतात त्यांनी त्यांच्या इच्छांना पावित्र्यासाठीं झटण्याकरिता सहभागी करण्यास भिऊ नये. “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हांला सांगतो कीं, पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाहीं.” (लुक 13:24). केवळ विश्वासाने प्रयत्न करीत रहा, व आपल्यां प्रयत्नाद्वारें इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्यां सत्यसंकल्पासाठीं साधून देणारा तो देव आहे (फिलिप्पै 2:13).

2 March : अभिवचनांनी आपणांस सज्ज करा

Alethia4India
Alethia4India
2 March : अभिवचनांनी आपणांस सज्ज करा
Loading
/

” जे आत्म्याने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. ” ( मत्तय 5:8 )

जेव्हां पौल म्हणतो कीं “आत्म्याने” शरीराची कर्मे ठार मारा ( रोम 8:13 ), याचा अर्थ मी अश्या प्रकारे घेतो कीं, आत्म्याच्या शस्त्रसामग्रीमधील एक शस्त्र ज्याचा उपयोग आपण ठार मारण्यासाठीं केला पाहिजे तें शस्त्र म्हणजे “तलवार‘, जे “देवाचे वचन होय” (इफिस 6:17 ).

तर मग, जेव्हां आपले शरीर एखाद्या भयामुळे किंवा मोहामुळे पाप करण्यास प्रवृत्त होते तेव्हां आपण आत्म्याच्या तलवारीने त्या भयाला आणि त्या मोहाला मारून टाकायचे आहे. माझ्या अनुभवा नुसार, पाप ज्या गोष्टीचे अभिवचन देते आपण त्याचापेक्षा उच्च अभिवचनाद्वारें त्या अभिवचनाच्या मुळावर प्रहार करतो.

उदारणार्थ, जेव्हां मला निषिद्ध अश्या शारीरिक वासनेची लालसा होत असते, तेव्हां या पापाच्या आनंदाच्या मुळावर प्रहार करण्यासाठीं मी “आत्म्याने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील” (मत्तय 5:8),  या वचनाचा वापर तलवारी प्रमाणे करतो. शुद्ध अंतकरणाने देवाला पाहण्याचा जो आनंद आहे त्याचें मी स्मरण करतो, आणि पापाच्या क्षणिक, उथळ आणि पीडा देणार्‍या परिणामांची आठवण ठेवतो, आणि त्याच्याद्वारें देव मला पापाच्या मोहावर विजय मिळविण्यांस सहाय्य करतो.

पापासोबत यशस्वीरित्या युद्ध करण्याकरिता, येणार्‍या मोहांवर विजय मिळवण्यासाठीं त्या क्षणाला लागू पडतील अशी देवाची अभिवचनें हाताशी असणें हे एक महत्वाचे शस्त्र आहे.

तथापि, असेहि प्रसंग असतांत जेव्हां आपल्यांला त्या प्रसंगाशी संबंधित अशी वचनें आठवत नाहींत. आणि पवित्र शास्त्रामधून आपल्यांकरिता अनुरूप असे वचन बघण्यासाठीं वेळ नसतो. अश्या वेळेला त्या भयाला किंवा मोहाला बळी पडून भरकटण्यापासून वाचण्यासाठीं आपल्यां मनाच्या भांडारात देवाच्या वचनांची सर्वसाधारण माहिती तयार असने गरजेचे आहे.

खाली ती चार अभिवचनें आहेत ज्यांचा पापाविरुद्ध लढा देण्यासाठीं मी सर्वाधिक उपयोग केलेंला आहें :

यशया 41:10, “तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्यां नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.”

फिलिप्पैकरांस 4:19, “माझा देव आपल्यां संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारें पुरवील.”

आणि फिलिप्पैकरांस 3:8 मधील स्पष्ट अभिवचन, “तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाहीं हानी असे समजतो.”

आणि अर्थातच, मत्तय 5:8, “जे आत्म्याने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.”

आपल्यां ज्ञानाच्या भांडारात सतत देवाच्या अभिवचनांची भर टाकींत जा. पण तुमच्या जीवनात देवानें आशीर्वादित केलेलीं जी मोजकीं अभिवचनें आहेत त्यांचा विसर पडू देऊ नका. दोन्हीकडें लक्ष्य ठेवा. जुन्या अभिवचनांनिशी सदैव तयार असा. आणि प्रत्येक पहाटे नव्या दिवसाला सामोरे जाण्याकरीता नवीन अभिवचनांचा शोध करा.

31 जानेवारी : दु:खाचे पाच उद्देश

Alethia4India
Alethia4India
31 जानेवारी : दु:खाचे पाच उद्देश
Loading
/

परंतु आपल्याला ठाऊक आहे कीं, देवावर प्रीति करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. (रोमकरांस 8:28)

आमच्यावर येणाऱ्या तात्कालिक व हलक्या संकटाची लहान लहान कारणे आम्हांला क्वचितच माहीत असतात, परंतु तरी आपण विश्वासांत का टिकून राहतो याची लहान लहान कारणे बायबल आपल्याला सांगते.

त्यांपैकी काही कारणें लक्षात ठेवण्याचा एखादा मार्ग शोधून काढणे बरे राहील जेणेकरुन ज्यां ज्यां प्रसंगी आपल्यावर अचानक संकट किंवा दु:ख येते किंवा विश्वासांतील आपल्या प्रिय जनांना त्यांच्या दुःखात मदत करण्याची संधी मिळते, त्यां त्यां प्रसंगी आपण देवाने आपल्याला दिलेल्या काही सत्यांची आठवण करू शकतो ह्यासाठी कीं आपण आशा सोडू नये.

ती कारणें लक्षात ठेवण्याचा एक मार्ग आहे: इंग्रजी शब्दांचे 5 R’ (किंवा उपयुक्त असल्यांस त्यांपैकी फक्त तीन निवडा आणि त्यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा).

आपल्याला जें दु:ख होतांत त्यांमागे असलेले देवाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत:

Repentance: म्हणजे पश्‍चात्ताप – दुःख हे आपल्यासाठी आणि इतरांसाठीं देवाची हाक आहे कीं आपण पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीला देवाच्या वर ठेवण्यापासून वळावे. लूक 13:4-5:

“किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणार्‍या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नव्हते; पण जर तुम्हीं पश्‍चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल.”

Reliance  म्हणजे भिस्त : दुःख या गोष्टीची हाक आहे कीं आपण ह्या जगाच्या जीवन-रक्षक साधनांवर नव्हे तर देवावर भरवसा ठेवावा. 2 करिंथकरांस1:8-9:

आम्हीं आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो; इतके की आम्हीं जगतो की मरतो असे आम्हांला झाले. फार तर काय, आम्हीं मरणारच असे आमचे मन आम्हांला सांगत होते; आम्हीं स्वत:वर नव्हे तर मृतांना सजीव करणार्‍या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे झाले

Righteousness म्हणजे नीतिमत्त्व : दुःख हे आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याची शिस्त आहे जी तो आपण त्याच्या नीतिमत्वाचे आणि पवित्रतेचे वाटेकरी व्हावें म्हणून लावतो. इब्री 12:6, 10-11:

“कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीति करतो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो.” . . . तो करतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.

Reward म्हणजे प्रतिफळ : दुःख आपल्यासाठी स्वर्गात एक मोठे प्रतिफळ उत्पन्न करत आहे जे आपल्याला इथें होत असलेल्या प्रत्येक दुखाच्या तुलनेने हजारपट मोठे आहे. 2 करिंथकरांस 4:17:

कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते.

शेवटी, Reminder म्हणजे स्मरणपत्र: दु:ख आपल्याला याची आठवण करून देते की देवाने आपल्या पुत्राला दु:ख भोगण्यासाठी जगात पाठवले ह्यासाठी की आपल्यावर येणारे दुःख हे देवाचा न्याय नसून त्याचे शुद्धीकरणाचे कार्य असावें. फिलिप्पैकरांस 3:10:

. . . हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी.

यास्तव, ख्रिस्ती अंत:करण दुःखात जर ओरडत असेल, “का?” तर हे समजण्यासारखे आहे कारण आपल्या जी दु:खे होतांत त्यांची  तात्कालिक व हलकी कारणे आपल्याला माहित नसल्यामुळे – म्हणजे, आताच का, असे का, इतक्या दिवसांपासून का? परंतु ह्या लहान लहान कारणांविषयी आपल्याला असलेल्या या अज्ञानामुळे आपण देवाच्या त्या मोठ्या मदतीकडे दुर्लक्ष करूं नये जी तो आमची त्याच्या वचनांत ह्या दुखामागे असलेला त्याचा हेतू प्रकट करून करतो.

“तुम्हीं ईयोबाच्या धीराविषयी ऐकलें आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्हीं पाहिला आहे; ह्यावरून ‘प्रभू फार कनवाळू व दयाळू’ आहे हे तुम्हांला दिसून आले” (याकोब 5:11).

30 जानेवारी : विजय मिळविणारी कृपा

Alethia4India
Alethia4India
30 जानेवारी : विजय मिळविणारी कृपा
Loading
/

मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन.” (यशया 57:18)

ईश्वर-ज्ञानाचे सुशिक्षण (सिद्धांत) पवित्र शास्त्रातून जाणून घ्या. ते जर पवित्र शास्त्रातून असेल तरच ते स्थिर राहते, आणि आत्म्याचे पोषण करते.

उदाहरणार्थ, जर तुम्हांला अप्रतिकारजन्य कृपा म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचे असेल तर ते सुशिक्षण पवित्र शास्त्रातून शिका. अशा पद्धतीने शोध केल्यांस, तुम्हांला कळेल की अप्रतिकारक कृपेचा अर्थ असा नाही की कृपेचा प्रतिकार केला जाऊ शकत नाही; तर त्याचा अर्थ असा की जेव्हा देव निर्णय घेतो तेव्हा तो त्या प्रतिकाराचा पराभव करण्यांस समर्थ आहे आणि तो  पराभव करेल.

उदाहरणार्थ, यशया 57:17-19 मध्ये देव त्याच्या बंडखोर लोकांना ताडन करून आणि त्यांच्याशी विन्मुख होऊन शिक्षा देतो: “त्याच्या स्वार्थमूलक अधर्मामुळे मी रागावून त्याला ताडन केले, मी विन्मुख झालो, मी त्याच्यावर कोपलो” (वचन 17).

तरी त्यांनी पश्चात्ताप केला नाही. उलट ते विश्वासापासून अजूनहि बहकत गेलें. त्यांनी विरोध केला: “पण तो आपल्या मनाच्या कलाप्रमाणे वागत गेला” (वचन 17).

तर मग कृपेचा विरोध केला जाऊ शकतो. वास्तविकता पाहता, स्तेफन यहूदी अधिकाऱ्यांना म्हणाला, “तुम्हीं तर ‘पवित्र आत्म्याला’ सर्वदा ‘विरोध करता” (प्रेषितांची कृत्ये 7:51).

मग देव काय करतो? जें पश्चात्ताप करत नाहींत तर विरोध करतांत अशांना तो आपल्याकडे वळवू शकणार नाहीं इतका तो अशक्त आहे का? नाही. तो अशक्त नाही. पुढील वचन म्हणते, “मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन” (यशया 57:18).

तर मग, देवाला प्रतिकूल असलेल्या आणि कृपेचा विरोध करणाऱ्यांविषयीं, देव म्हणतो, “मी त्याला सुधारीन.” तो “मार्ग दाखवील”. तो समाधान करील.”समाधान करीन” या शब्दांचा अर्थ “पूर्ण करणें किंवा बरे करणे” असा होतो. हा शब्द ‘शालोम” म्हणजे “शांती.” ह्या शब्दाशी संबंधित आहे. पुढील वचन त्या संपूर्णतेचा आणि शांतीचा उल्लेख करते, आणि स्पष्ट करते की देव कसा कृपेचा विरोध करणाऱ्या हट्टी मनुष्याला आपणाकडे वळवतो.

तो हे अशा प्रकारे करतो “मी त्याच्या तोंडून आभारवचन उच्चारवीन, जे दूर आहेत व जे जवळ आहेत, त्यांना शांती असो, शांती असो (शालोम, शालोम); मी त्यांना सुधारीन असे परमेश्वर म्हणतो” (यशया 57:19). देव जे अस्तित्वांत नाही ते निर्माण करतो – म्हणजे समाधान, शांती, पूर्णता. अशा प्रकारे आपण तारले जातो. आणि अशा प्रकारे आपल्याला फिरवून मागे देवाकडे परत आणले जाते.

जिथे आभारवचन अस्तित्वात नाहींत तिथे त्यां आभारवचनांची निर्मिती करून देवाची कृपा आपल्या विरोधीपनावर विजय मिळवते. तो जें जवळ आहेत आणि जें दूर आहेत त्यांना शालोम, शालोम देतो. तो जें जवळ आहेत आणि जें दूर आहेत त्यांना पूर्णता देतो. तो असें “समाधान” देऊन करतो, म्हणजेच तो आम्हांला आमच्या विरोधीपनाच्या आजारापासून बरे करतो आणि त्या ठिकाणी आमच्यांत एक दृढ शरणागती शरण निर्माण करतो.

अप्रतिकारजन्य कृपेचा अर्थ असा होत नाही की आपण प्रतिकार किंवा विरोध करू शकत नाही. आपण विरोध करू शकतो, आणि आम्हीं विरोध करू. विषय हा आहे की जेव्हा देव निर्णय घेतो, तेव्हा तो आपल्या विरोधावर मात करतो आणि एक नम्र आत्मा पुनर्स्थापित करतो. तो निर्माण करतो. तो म्हणतो, “प्रकाश होवो!” तो बरा करतो. तो मार्ग दाखवितो. तो सुधारतो. तो समाधान देतो.

म्हणून आपण स्वतः त्याच्याकडे परत वळलो असा अभिमान आम्हीं बाळगत नाही. आणि ज्याने आमच्या सर्व विरोधीपनावर विजय मिळवला त्यां परमेश्वराच्या पायांजवळ आम्हीं पडतो आणि थरथरत आनंदाने त्याचे आभारवचन उच्चारितो.

29 जानेवारी : आम्हांला परत वळविलें

Alethia4India
Alethia4India
29 जानेवारी : आम्हांला परत वळविलें
Loading
/

हे परमेश्वरा, तू आम्हांला तुझ्याकडे परत वळव, म्हणजे आम्हीं वळू. (विलाप 5:21, माझे भाषांतर)

जोपर्यंत देव स्वतः आपल्या लोकांना त्यांचे पाप व अविश्वासामुळें उद्भवणाऱ्या धर्मत्यागापासून आपणांकडे परत वळवित नाहीं तोपर्यंत देवाच्या लोकांसाठीं कोणतीही आशा नाहीं.

विलापगीताचे पुस्तक हे बायबलमधील असे पुस्तक आहे जें सर्वात उदासीपूर्ण अशा विचारांनी भरलेलें पुस्तक आहे. देवानें स्वत: त्याच्या डोळ्याच्या बाहुलीला, म्हणजे यरुशलेमेला ओसाड केलें होते.

  • परमेश्वराने आपला क्रोध पूर्ण प्रकट केला आहे; त्यानें आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे त्यानें सीयोनेत अग्नी पेटवला आहे, त्या अग्नीने तिचे पाये भस्म केले आहेत. (विलाप 4:11)
  • दृष्टीस रम्य असे सर्व त्यानें मारून टाकले आहेत. (विलाप 2:4)
  • तिच्या बहुत अपराधांमुळे परमेश्वराने तिला पिडले आहे. (विलाप 1:5)

तर मग पुस्तकाचा शेवट कसा होतो?

यां पुस्तकाचा शेवट फक्त एकाच आशेनें होतो:

हे परमेश्वरा, तू आम्हांला तुझ्याकडे परत वळव, म्हणजे आम्हीं वळू. (विलाप 5:21)

माझ्यासाठीं हींच एकमेव आशा आहे – आणि तुमच्यासाठीं सुद्धा हींच एकमेव आशा आहे!

येशू पेत्राला म्हणाला, “शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली; परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.” (लूक 22:31-32).

‘जर  तू वळलास तरच’  असें तो म्हणत नाहीं. पण तू वळलास म्हणजे. कारण मी तुझ्यासाठीं विनंती केलीं आहे, कीं तू परत वळावे. आणि जेव्हा तू वळतोस तेव्हा ही कृती माझ्या सार्वभौम कृपाचे कार्य असेल जी तुला धर्मत्यागाच्या कचाट्यातून परत घेऊन येईल.

ख्रिस्ती बंधू, हे तुमच्याबाबतींत सत्य आहे. विश्वासात टिकून राहण्यासाठीं हींच तुमची एकमेव आशा आहे. ह्याची प्रौढी मिरवा.

जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे. (रोमकरांस 8:34)

तोच आम्हांला स्वतःकडे परत वळविल. म्हणून, “तुम्हांला पतनापासून राखण्यास जो समर्थ आहे…….अशा आपल्या उद्धारक एकाच ज्ञानी देवाला गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार युगारंभापूर्वी, आता व युगानुयुग आहेत” (यहूदा 1:24-25). आमेन!

28 जानेवारी : पश्चात्ताप कसा करावा

Alethia4India
Alethia4India
28 जानेवारी : पश्चात्ताप कसा करावा
Loading
/

जर आपण आपली पापें पदरी घेतलीं, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. (1 योहान 1:9)

तुमच्या मनाची ही अंधुक, दुर्दैवी भावना कीं तुम्हीं एक अपूर्ण व्यक्ती आहां खरे पाहता पापाची खात्री पटविणारी भावना नाहीं. स्वतःविषयीं वाईट भावना जोपासणें म्हणजे पश्चात्ताप करणें असें होत नाहीं.

आज सकाळी मी प्रार्थना करूं लागलो, आणि लगेच मीं स्वतःला या जगाच्या निर्माणकर्त्याबरोबर संभाषण करण्यांस अयोग्य समजूं लागलो. आणि अर्थातच, ती स्वतःला अयोग्य समजण्याची एक अंधुक, दुर्दैवी भावना होती. आणि मी माझी ती अगोग्यता कबूलही केलीं. पण आता यापुढें काय?

जोपर्यन्त मी माझ्या पापांविषयीं योग्य आणि स्पष्ट वास्तविकता लक्षांत घेतली नाहीं, तोपर्यंत खरेंच कांहीहि बदललें नाहीं. मनाच्या अशा दुर्दैवी भावना योग्यच आहेत जर त्यां मला एखाद्या अशा विशिष्ट पापाविषयीं दोषी ठरवितांत जे मीं माझ्या सवयींमुळें सज्ञानाने वारंवार करतो. पण खरें पाहता, मी एक पापी मनुष्य आहे ह्या अस्पष्ट भावना सहसा फारशा लाभाच्या ठरत नाहीं.

मी अयोग्य आहे ही अंधुक व दुर्दैवी भावना केवळ तेव्हांच योग्य ठरते जेव्हां मी स्वत:कडे आज्ञा न पाळणारा मनुष्य म्हणून पाहतो. अशी खात्री पटल्यावर तुम्हीं तुमची पापें कबूल करून पश्चात्ताप करू शकता आणि देवाला क्षमा मागू शकता आणि ज्यां शुभवर्तमानावर तुम्हीं विश्वास ठेविला आहे त्याचे स्मरण करून तुम्हीं तुमची पापें जणूं नाहीशी करूं शकता.

मग मी त्यां सर्व आज्ञा ज्यां मीं वारंवार मोडतो, स्मरण करूं लागलो. तेव्हा ज्यां आज्ञा मी तोडल्याचे माझ्या लक्ष्यांत येते  त्यां ह्यां :

  • तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर. म्हणजे 95% नाहीं, तर 100%. (मत्तय 22:37)
  • आपल्या शेजार्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर. म्हणजे ज्या ज्या चांगल्या गोष्टीं तुमच्याकडे असाव्यांत अशी तुम्हीं आतुरतेने उत्कंठा करता त्यां त्यां वस्तु तुमच्या शेजार्यांकडेहि असाव्यांत अशी तितक्यांच आतुरतेणें उत्कंठा बाळगा. (मत्तय 22:39)
  • जे काही तुम्हीं कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा; – मग ते आंतरिक असों वा बाह्य (फिलिप्पैकर 2:14)
  • त्याच्यावर तुम्हीं ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’- म्हणजे यापुढे तुम्हीं त्यांच्या ओझ्याने भारावून जाणार नाहीं. (1 पेत्र 5:7)
  • तुमच्या मुखातून जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की ऐकणार्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे — विशेषत: तुमच्या जवळच्या लोकांना. (इफिस 4:29)
  • वेळेचा सदुपयोग करा. म्हणजे वेळ वाया घालवू नका, किंवा दिरंगाई करू नका. (इफिस 5:16)

हाय हाय! मीं खूप पवित्र आहों अशी फुशारकी मारणें कोठे! माझा ढोंगीपणा तर उघड झाला आहे.

माझी ही अवस्था तर त्यां अंधुक, दुर्दैवी भावनांपेक्षाहि अति वाईट आहे. अहाहा, पण आता मला माझा शत्रू स्पष्टपणे दिसतोय. माझी पापें विशिष्ट आहेत. ती आता अस्पष्ट धुक्यातुन उघड झाली आहेत. ती अगदी माझ्या समोर आहेंत. मी ह्या अपराध भावनेवर कुरकुर करत बसत नाहीं. त्या ऐवजी, मी ख्रिस्तानें मला आज्ञापिलेल्या गोष्टींचे पालन न केल्याबद्दल त्याला क्षमा मागतो.

माझे हृदय भग्न झालें व मी माझ्याच पापावर क्रोधाविष्ट झालों आहे. मला ते जिवे मारायचे आहे, नाहीं नाहीं, मी आत्महत्या करणार असें नाहीं. मी आत्मघातकीं नाहीं. तर मी पापाचा द्वेष करणारा आणि पाप-घातकी असा आहे. (“पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ…..हे जिवे मारा,” कलस्सै 3:5; “शरीराची कर्मे ठार मारा,” रोमकरांस 8:13.) मला जिवंत राहावयाचे आहे. म्हणूनच मी आत्म-रक्षक मारेकरी आहे — माझ्या स्वतःच्या पापाचा मारेकरी!

मी पापाबरोबर माझ्या ह्या संघर्षात असतांना, माझ्या कानावर हें अभिवचन येते, “जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील” (1 योहान 1:9). मनांत शांती उदय पावते.

आता प्रार्थना करणे पुन्हा शक्य होते, आणि प्रार्थना करणे योग्य आहे आणि सामर्थ्याने भरलेली असें जाणवते.

27 जानेवारी : त्याला तुमची गरज माहीत आहे

Alethia4India
Alethia4India
27 जानेवारी : त्याला तुमची गरज माहीत आहे
Loading
/

ह्यास्तव ‘काय खावे? काय प्यावे? काय पांघरावे?’ असे म्हणत चिंता करत बसू नका. कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” (मत्तय  6:31-32)

आपल्या शिष्यांनी चिंतामुक्त असावें अशी येशूची इच्छा आहे. मत्तय 6:25-34 मध्ये, तो आपलीं चिंता दूर करण्याच्या उद्देशाने तयार केलेंलें किमान सात तर्क देतो. त्यापैकीं एक तर्क देतांना तो खाणे, पिणे व वस्त्र यांचा उल्लेख करतो आणि लगेच म्हणतो, “तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे” (मत्तय 6:32).

येशूला खचितच असे म्हणायचे होते कीं देवाला आमच्या गरजा ठाऊक असणें  ही गोष्ट त्या गरजा पूर्ण करण्याच्या त्याच्या इच्छेशी अनुकूल आहे. आमचा स्वर्गीय पिता आहे असें तो जोर देऊन म्हणतो. आणि हा पिता आमच्या ऐहिक पित्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

मला पाच लेकरं आहेत. मला त्यांच्या गरजा पूर्ण करणं आवडतं. परंतु मला त्यांच्या गरजांची असलेली जाणीव ही देवाला आमच्या गरजांची असलेल्यां जाणीवेपेक्षा कमीतकमी तीन प्रकारे उणी पडते.

सर्व प्रथम, आता ह्या क्षणी मला ठाऊक नाहीं कीं माझी मुलें कुठे आहेत. मी केवळ अंदाजाने सांगू शकतो. ते कदाचित आपापल्या घरी असतील किंवा ऑफिस मध्यें असतील किंवा शाळेत जात असतील, तें सर्व निरोगी आणि सुरक्षित आहेत. पण जर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असेल, तर तें कुठेतरी रस्त्यावर पडलेलें सुद्धा असूं शकतात.

दुसरे, कोणत्या वेळी ते काय विचार करतात हें मला ठाऊक नाहीं. मी कधी कधी केवळ एक अंदाज लावू शकतो. पण कदाचित त्यांना कुठल्यातरी गोष्टीची भीती वाटत असेल, किंवा त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला असेल, किंवा त्यांना राग आलेला असेल किंवा त्यांना कुठल्यातरी गोष्टीची इच्छा किंवा तिचा लोभ असू शकतो, किंवा ते आनंदी असतील किंवा एखाद्या गोष्टीची आशा करत असतील. मी त्यांच्या मनांत काय चाललय ते पाहू शकत नाहीं. त्यांना तर स्वतःच्या अंत:करानातील गोष्टीं देखील पूर्णपणे ठाऊक नसतील.

तिसरे, मला त्यांचे भविष्य ठाऊक नाहीं. आज तें मला एकदम निरोगी आणि ठणठणीत दिसत आहेत. पण उद्या मात्र त्यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळू शकतो.

याचा अर्थ असा कीं मला त्यांच्याविषयीं असलेली जाणीव त्यांना स्वतःची काळजी न करण्याचे मोठे निमित्त देऊं शकत नाहीं. त्यांच्या जीवनांत या क्षणी काहीं तरी घडामोडी होत असतील किंवा उद्या घडून येतील ज्यांविषयीं आज मला तिळमात्रहि कल्पना नाहीं. परंतु जेव्हा हींच बाब त्यांच्या स्वर्गातील पित्याच्या बाबतींत येते, तेव्हा दृश्य पूर्णपणे वेगळे आहे. “तुमचा स्वर्गीय पिता!” त्याला आपल्याबद्दल सर्व ठाऊक आहे, म्हणजे आपण कुठे आहों, आणि उद्या कुठे असणार, आपलं मन कसं आहे आणि बाहेरून आपण कसे वागतो, तें सर्वकांही तो जाणून आहे. त्याला आपली प्रत्येक गरज ठाऊक आहे.

याशिवाय, त्याला आपल्या गरजा पूर्ण करावयांची नेहमीच मोठी उत्कंठा लागलेली असते. मत्तय 6:30 मधील विशेषेकरून”  या शब्दाची आठवण ठेवा “जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर, अहो तुम्हीं अल्पविश्वासी, तो विशेषेकरून  तुम्हांला पोशाख घालणार नाही काय?”

या व्यतिरिक्त, जे करण्याची त्याला उत्कंठा लागलेली आहे ते करण्यांस तो पूर्णपणे समर्थ देखील आहे (तो एकांच वेळी जगभरातील कोट्यवधी पक्ष्यांना खाऊं घालतो, मत्तय 6:26).

यास्तव, येशू आमच्या सर्व गरजा पूर्ण करतो ह्या त्याच्या वचनावर मजबरोबर विश्वास ठेवा, “तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे” असें जेव्हा येशू म्हणतो तेव्हा तो हेंच आवाहन करत आहे.

26 जानेवारी : देणाऱ्याला गौरव मिळतो

Alethia4India
Alethia4India
26 जानेवारी : देणाऱ्याला गौरव मिळतो
Loading
/

ह्याकरता तर आम्हीं तुमच्यासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हांला झालेल्या ह्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे; ह्यासाठी की, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायी व तुम्हांला त्याच्या ठायी गौरव मिळावा. (2 थेस्सलनीकाकर 1:11-12)

देव त्याच्या कृपेच्याद्वारें  त्याच्या गौरवाची  स्तुति करून घेण्याची योजना आखतो ही अत्यंत चांगलीं बातमी आहे.

नक्कीच, जेव्हां देव आपल्या क्रोधाचे सामर्थ्य व्यक्त करतो तेव्हां देखील त्याचा गौरव होतो (रोमकरांस 9:22), परंतु नवा करार (आणि जुना करारहि, उदाहरणार्थ, यशया 30:18) पुन्हा पुन्हा सांगतो की आपल्याला देवाची कृपा अनुभवाने जाणून घेणे अगत्याचे आहे, ह्यासाठी की देवाला आपल्या ठायी गौरव  मिळावा.

2 थेस्सलनीकाकर 1:11-12 मध्यें पौलाने केलेल्या प्रार्थनेंत हे प्रत्यक्षांत कसे घडून येते यावर विचार करा.

पौल प्रार्थना करतो कीं देवानें चांगुलपणाचा आमचा प्रत्येक मनोदय पूर्ण करावा.

कशा प्रकारे? तो अशी प्रार्थना करतो कीं तो मनोदय “[देवाच्या] सामर्थ्यानें” पूर्ण करण्यांत यावा. म्हणजे, ते “विश्वासाची [कार्ये]” असावी.

का? ह्यासाठी की प्रभू येशू ह्याच्या नावाला आमच्याठायी गौरव मिळावा.

म्हणजे देणाऱ्याला गौरव मिळतो. सामर्थ्य देवानें दिलें, म्हणून गौरव देखील देवालाच मिळतो. आमचा  विश्वास आहे; तो  सामर्थ्य देतो. आमचे साहाय्य करण्यांत येतें; त्याला गौरव मिळतो. हेंच तें कृपेचें कार्य आहे ज्यामुळें आपली अंतकरणनें नम्र राहतांत व ज्यामुळें आम्हीं आनंदी राहतो व त्याला सर्वोपरी ठेऊन त्याचे गौरव करतो.

मग पुढे पौल म्हणतो कीं ख्रिस्ताचे हें गौरव “आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने” आहे.

चांगुलपणाचा आपला प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य करण्यासाठीं आपल्याला देवाने सामर्थ्य द्यावे या पौलाच्या प्रार्थनेंला देवाचे उत्तर म्हणजे आम्हांवर होणारी कृपा. तुम्हीं जे कांही चांगले करण्याचा मनोदय  (किंवा संकल्प) करता तो सिद्धीस न्यावयांस तुम्हांला सक्षम करण्यासाठी देवाच्या ज्या सामर्थ्याची गरज लागते ती गरज पूर्ण केलीं जाणे म्हणजेच कृपा.

नवीन करारानुसार ही कृपा अशा प्रकारे पुन्हा पुन्हा कार्य करते. देव तुम्हांला आपल्या कृपेद्वारे सामर्थ्य देईल असा विश्वास ठेवा आणि जेव्हा आपल्याला असें साहाय्य पुरविले जातें तेव्हा त्याला गौरव मिळतो.

आम्हांला साहाय्य पुरविले जातें. त्याला गौरव मिळतो.

म्हणूनच ख्रिस्ती जीवन, हे केवळ ख्रिस्ती परिवर्तन नव्हें, तर हें एक शुभवर्तमान देखील आहे.

25 जानेवारी : विलंबित झालेल्यां सुटका

Alethia4India
Alethia4India
25 जानेवारी : विलंबित झालेल्यां सुटका
Loading
/

सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. (प्रेषित 16:26)

या युगांत देव त्याच्यां लोकांना निरनिराळ्या संकटांतून सोडवितो, पण सर्वच सर्व संकटांतून नाहीं. हे जाणून घेणें मनाला सांत्वन देणारें आहे, कारण त्यांशिवाय आपण आपल्यांवर येत असलेल्यां संकटांचा असा निष्कर्ष काढून बसणार कीं जणूं त्याला आपला विसर पडला आहे किंवा आपल्याला नाकारलें आहे.

तर मग, आपण स्वतःला या गोष्टीची स्पष्ट आठवण करून देऊन उत्तेजन प्राप्त करूयां कीं प्रेषितांची कृत्ये 16:19-24 मध्यें पौल आणि सीला यांची सुटका तर केलीं गेलीं नव्हतीं, तरी 25-26 यां वचनांमध्यें त्यांची सुटका करण्यांत आलीं.

प्रथमत:, सुटका करण्यांत आलीं नाहीं:

  • “पौल व सीला ह्यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले.” (वचन 19)
  • “अधिकार्‍यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली.” (वचन 22)
  • त्यांनी “पुष्कळ फटकें” मारलें. (वचन 23)
  • बंदिशाळेच्या नायकानें “त्यांना आतल्या बंदिखान्यांत घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकवलें.” (वचन 24)

पण नंतर, सुटका करण्यांत आलीं: मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.

तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले; सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. (वचन 25-26)

देव विलंब न करता हस्तक्षेप करू शकला असता. पण त्यानें हस्तक्षेप केला नाहीं. त्यामागची कारणें तोंच जाणों. पण त्यानें पौल  व सीला यांच्यावर प्रीति केलीं.

तुमच्यासाठीं प्रश्न हा: जर तुम्हीं तुमचे जीवन पौलाला सुरुवातीला झालेलें दुःख आणि त्यानंतर त्याची झालेलीं सुटका या कायमस्वरूपी होणाऱ्या घडामोडींना लक्ष्यांत ठेऊन रचलें असेल तर मग तुम्हीं कोणत्या टप्प्यांत आहां? तुम्हीं बंदिस्त आणि फटके खात असलेल्यां टप्प्यांत आहां, कीं तुमच्या बंदिवासाचे सर्व दरवाजे अचानक उघडले गेलें व बंधने तुटली गेलीं अशा टप्प्यांत आहां?

हें दोन्हींहि टप्पे असें आहेत ज्यांत देव तुमची काळजी घेत आहेच. त्यानें तुम्हाला सोडून दिलें नाहीं वा तुम्हाला टाकून दिलें नाहीं (इब्री 13:5).

जर तुम्हीं बेडींत अडकलेंल्या टप्प्यांत असाल तर निराश होऊ नका. गाणी गा. बंधनें तुटणारच आहेत. मुक्तता निश्चित आहे, पण ती कधी आणि कशी होईल हे तुम्हांला ठाऊक नाहीं. ती मुक्तता मरणाद्वारें देखील होवूं शकते. “मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन” (प्रकटीकरण 2:10).

24 जानेवारी : तुम्हीं इतरांसाठीं प्रयोजन करतां, तेव्हां तुमच्यासाठींहि प्रयोजन केलें जातें

Alethia4India
Alethia4India
24 जानेवारी : तुम्हीं इतरांसाठीं प्रयोजन करतां, तेव्हां तुमच्यासाठींहि प्रयोजन केलें जातें
Loading
/

येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहींत ह्याविषयीं चर्चा का करितां? तुम्हीं अजून ध्यानांत आणीत नाहीं व समजतहि नाहीं काय? तुमचें अंतःकरण कठीण झालें आहे काय? (मार्क 8:17)

येशूनें 5,000 आणि 4,000 जनसंख्या असलेल्यां लोकांना केवळ कांही भाकरी आणि मासें यांतून पोट भरून खाऊ घातल्यानंतर, शिष्य स्वतःसाठीं पुरेशा भाकरी न घेतांच नावेंत बसलें.

जेव्हां तें बिनभाकरीच्या आपल्या दैनावस्थेवर आपसांत चर्चा करूं लागले, येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहींत ह्याविषयीं चर्चा का करितां? तुम्हीं अजून ध्यानांत आणीत नाहीं व समजतहि नाहीं काय?” (मार्क 8:17). त्यांना काय समजलें नव्हतें?

त्यांना उरलेंल्या भाकरीचा अर्थ समजला नव्हतां, म्हणजे असें कीं जेव्हां ते इतरांची काळजी घेतांत तेव्हां येशू त्यांची देखील काळजी घेईल. येशू त्यांना विचारतो,

“मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटून दिल्या तेव्हां तुम्हीं तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” तें त्याला म्हणालें, “बारा.” “तसेच चार हजारांसाठीं  सात भाकरी मोडल्या तेव्हां तुम्हीं किती पाट्या तुकडे भरून घेतलें?” ते म्हणालें, “सात.” तेव्हां तो त्यांना म्हणाला, “अजून तुम्हांला समजत नाही काय?” (मार्क 8:19-21)

तें कोणती गोष्ट समजत नव्हतें? उरलेंल्या भाकरीचा अर्थ.

उरलेंल्या भाकरी सेवा करणाऱ्यांसाठीं होत्यां. खरं तर, जेव्हां येशूनें पहिल्यांदा 5000 लोकांना जेवूं घातलें तेव्हां भाकरी वाटणारे बारा जन होतें आणि बारा टोपल्या भाकरी उरल्या होत्यां (मार्क 6:43) — म्हणजे भाकरी वाटणाऱ्या प्रत्येकासाठीं एक संपूर्ण टोपलीं. दुसऱ्यांदा, म्हणजे जेव्हां येशूनें 4000 लोकांना जेवूं घातलें तेव्हां सात टोपल्या उरल्या होत्यां – सात, म्हणजे विपुलतेची पूर्णता दर्शविणारी  संख्या.

त्यांना काय समजलें नव्हतें? कीं येशू त्यांची काळजी घेईल. तुम्हीं येशूला कमी लेखू शकत नाहीं. जेव्हां तुम्हीं तुमचें जीवन इतरांसाठीं खर्च करतां तेव्हां तुमच्याहि गरजा पूर्ण केल्यां जातील. “माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमचीं सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायीं गौरवाच्या द्वारें पुरवील” (फिलिप्पैकरांस 4:19).