येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहींत ह्याविषयीं चर्चा का करितां? तुम्हीं अजून ध्यानांत आणीत नाहीं व समजतहि नाहीं काय? तुमचें अंतःकरण कठीण झालें आहे काय?” (मार्क 8:17)
येशूनें 5,000 आणि 4,000 जनसंख्या असलेल्यां लोकांना केवळ कांही भाकरी आणि मासें यांतून पोट भरून खाऊ घातल्यानंतर, शिष्य स्वतःसाठीं पुरेशा भाकरी न घेतांच नावेंत बसलें.
जेव्हां तें बिनभाकरीच्या आपल्या दैनावस्थेवर आपसांत चर्चा करूं लागले, येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहींत ह्याविषयीं चर्चा का करितां? तुम्हीं अजून ध्यानांत आणीत नाहीं व समजतहि नाहीं काय?” (मार्क 8:17). त्यांना काय समजलें नव्हतें?
त्यांना उरलेंल्या भाकरीचा अर्थ समजला नव्हतां, म्हणजे असें कीं जेव्हां ते इतरांची काळजी घेतांत तेव्हां येशू त्यांची देखील काळजी घेईल. येशू त्यांना विचारतो,
“मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटून दिल्या तेव्हां तुम्हीं तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” तें त्याला म्हणालें, “बारा.” “तसेच चार हजारांसाठीं सात भाकरी मोडल्या तेव्हां तुम्हीं किती पाट्या तुकडे भरून घेतलें?” ते म्हणालें, “सात.” तेव्हां तो त्यांना म्हणाला, “अजून तुम्हांला समजत नाही काय?” (मार्क 8:19-21)
तें कोणती गोष्ट समजत नव्हतें? उरलेंल्या भाकरीचा अर्थ.
उरलेंल्या भाकरी सेवा करणाऱ्यांसाठीं होत्यां. खरं तर, जेव्हां येशूनें पहिल्यांदा 5000 लोकांना जेवूं घातलें तेव्हां भाकरी वाटणारे बारा जन होतें आणि बारा टोपल्या भाकरी उरल्या होत्यां (मार्क 6:43) — म्हणजे भाकरी वाटणाऱ्या प्रत्येकासाठीं एक संपूर्ण टोपलीं. दुसऱ्यांदा, म्हणजे जेव्हां येशूनें 4000 लोकांना जेवूं घातलें तेव्हां सात टोपल्या उरल्या होत्यां – सात, म्हणजे विपुलतेची पूर्णता दर्शविणारी संख्या.
त्यांना काय समजलें नव्हतें? कीं येशू त्यांची काळजी घेईल. तुम्हीं येशूला कमी लेखू शकत नाहीं. जेव्हां तुम्हीं तुमचें जीवन इतरांसाठीं खर्च करतां तेव्हां तुमच्याहि गरजा पूर्ण केल्यां जातील. “माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमचीं सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायीं गौरवाच्या द्वारें पुरवील” (फिलिप्पैकरांस 4:19).