ArchivesSolid Joys

31 October : दुःखाचे धर्म-विद्यालय

Alethia4India
Alethia4India
31 October : दुःखाचे धर्म-विद्यालय
Loading
/

 “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” (2 करिंथ 12:9)

ख्रिस्ती म्हणून आम्हांवर जी सर्व नाना प्रकारची संकटें व दुःखें येतांत त्यांमागे देवाचा सार्वत्रिक उद्देश हा आहे : देवामध्यें प्रगतीशील समाधान आणि स्वतःवर आणि जगावर ऱ्हासशील अवलंबन. “आयुष्यातील वास्तविक कठीण धडे मीं अगदी सहज आणि अनुकूल काळांतच शिकलो आहें” असे कोणी म्हटलेंलें मी कधीच ऐकले नाहीं.

उलट मी सशक्त पवित्र जनांना असे म्हणताना ऐकलें आहे कीं, “देवाच्या प्रीतिची खोली काय आहे ती जाणून घेण्यात आणि त्याच्याबरोबरचा माझा खोलवर सहवास यांत मी केलेंलीं प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण प्रगती ही दुःखांच्या माध्यमातूनच झालीं आहे.”

सर्वात मौल्यवान मोती म्हणजें ख्रिस्ताचा गौरव पाहणें.

अशाप्रकारे, पौल मोठ्या कळकळीने सांगतो कीं जेव्हां आपल्यावर दुःखें येतांत, तेव्हां ख्रिस्ताची पुरेशी जी कृपा ती पूर्णतेस येऊन तिचा गौरव वाढतो. जर आपण आपल्या सर्व संकटांत त्याच्यावर विसंबून राहतो, आणि आमचा जो “आशेचा हर्ष”  त्यांस तोच बळकट करतो, तर तो कृपा आणि सामर्थ्य यांचा संतोषकारक पुरवठा करणारा देव आहे हे प्रदर्शित केलें जाते.

जर आपण त्याला बळकटपणें धरून राहतो तर, “जेव्हा ह्या जगातील सर्व आशा सोडून जातांत,” तेव्हां आपण दाखवून देतो कीं आपण गमावलेल्या सर्व जगिक गोष्टींपेक्षा आपल्याला तो अधिक हवा हवासा आहे.

ख्रिस्ताने दुःख सहन करित असलेल्या ह्या प्रेषिताला म्हटलें, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठीं दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यांत मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे” (2 करिंथ 12:9-10).

अशाप्रकारे देवानें दु:ख हे ख्रिस्ती विश्वासनार्यांनी स्वतःवर अवलंबून न राहता केवळ कृपेवर अवलंबून राहावें म्हणून केवळ नव्हें, तर त्या कृपेवर जोर द्यावा आणि तिला तेजस्वी स्वरूप द्यावें ह्या हेतूनें देखील त्यानें ते योजिलें आहे. विश्वास आम्हांमध्यें हीच कृति घडवून आणतो : तो ख्रिस्ताच्या भावी कृपेला उंचवितो.

देवामध्यें असलेल्या आपल्या जीवनाच्या खोल गोष्टींचा शोध आपल्याला दुःखातच लागतो आणि त्यांचा गौरव करतो.

30 October : वाहवत जाण्याचा धोका

Alethia4India
Alethia4India
30 October : वाहवत जाण्याचा धोका
Loading
/

ह्या कारणामुळें ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीं तर आपण त्यांपासून वाहवत जाऊ. (इब्री 2:1)

आपल्यांपैकीं प्रत्येकाला हे ठाऊकच आहे कीं वाहवत जाण्याच्या घटना झाल्यां आहेत. कोणतीही तत्परता नाहीं. दक्षता घेणें नाहीं. लक्ष लावून ऐकणें किंवा ऐकलेल्या गोष्टींवर काळजीपूर्वक विचार करणें नाहीं, कीं येशू ह्याच्यावर आपलें लक्ष केंद्रित करणें नाहीं, आणि परिणामी विश्वासांत टिकाव धरून उभें न राहता त्यांपासून वाहवत जाणें.

येथे तोच मुद्दा आहे : ते विश्वासांत टिकाव धरून राहत नाहींत. जगिक जीवन म्हणजें काहीं सरोवर नाहीं. ते एका नदीप्रमाणें आहे. आणि ते विनाशाकडे वाहवत जात आहे. येशू काय म्हणतो त्याकडे जर तुम्हीं विशेष लक्ष लावत नाहीं आणि प्रती दिवशी त्याजवर चिंतन-मनन करित नाहीं आणि क्षणोक्षणी त्याच्याकडे आपली दृष्टि लावलेली ठेवित नाहीं तर तुम्हीं टिकाव धरणार नाहीं; तुम्हीं मागे जाल. तुम्हीं ख्रिस्तापासून दूर जाल.

वाहवत जाणें ही ख्रिस्ती जीवनासाठीं विनाशकारक गोष्ट आहे. आणि जसे इब्री 2:1 सांगते, यावर एकच उपाय आहे : तुम्हीं ऐकलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष लावा. म्हणजेंच, देव त्याचा पुत्र येशू ह्याच्याद्वारें काय म्हणत आहे त्यावर काळजीपूर्वक विचार करा. देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारें देव जें बोलत आहे आणि जें करत आहे त्यावर आपले लक्ष केंद्रित करा (किंवा पाहत असावे).

हे कौशल शिकणें म्हणजें नदींत पोहण्यासाठीं हात-पाय मारण्याचे कौशल शिकण्याइतके कठीण नाहीं. फक्त एक गोष्ट जी आपल्याला ह्या पापी संस्कृतीच्या विपरीत दिशेनें पोहण्यास प्रतिरोध करते ती म्हणजें पोहण्यासाठीं हात-पाय मारण्यांस लागणारे परिश्रम नाहीं तर प्रवाहाबरोबर जाण्याची आपली पापी प्रवृत्ती, ही मूळ समस्या आहे.

देवानें आपल्याला कठीण काम दिलें, अशी तक्रार आपण करू नये. ऐका, त्यावर काळजीपूर्वक विचार करा, आपले लक्ष केंद्रित करा (किंवा पाहत असा)— याला तुम्हीं कठीण कामाचे विवरण म्हणू शकत नाहीं. खरे पाहता, हे कामाच्या स्वरूपाचे वर्णन नाहीं. आपण येशूनें केलेंल्या कामामध्यें संतुष्ट असावे यासाठीं हे एक निकडीचे पाचारण आहे जेणेंकरून आपण आपल्या फसव्या इच्छांनी बहकून जाऊ नये.

जर तुम्हीं आज वाहवत जात असाल, तर तुमचा नव्याने जन्म झाला आहे या आशेच्या लक्षणांपैकीं एक म्हणजें हे वाचल्यावर तुम्हांला तुमच्या अं:तकरणात टोचल्यासारखे जाणवत आहे आणि आपण येशूकडे आपली दृष्टि फिरवावी आणि त्याच्याकडे आपलें लक्ष्य केंद्रित करावें आणि दिवसोंदिवस, महिनोन्महिने, आणि वर्षानुवर्षे त्याचे पूर्ण लक्ष देऊन ऐकावें अशी कळकळीची उत्कंठा तुमच्यांत वाढत चालली आहे.

29 October : पाप, सैतान, आजार किंवा विध्वंस

Alethia4India
Alethia4India
29 October : पाप, सैतान, आजार किंवा विध्वंस
Loading
/

“हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केलीं; परंतु त्यानें मला म्हटलें आहे, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. (2 करिंथ 12:8-9)

ख्रिस्ती लोकांना छळवणूकमुळें उद्भवणारी संकटें व दुःखें यांमुळें ज्यां वेदना सोसाव्या लागतांत त्यां कर्करोगामुळें सोसाव्या लागणाऱ्या वेदनांसारख्यांच असतांत का? जर देवानें एखाद्या गोष्टी संदर्भात काहीं अभिवचनें दिलीं तर ती दुसऱ्या गोष्टींवर देखील लागू होतांत का? माझे उत्तर होय आहे. संपूर्ण जीवन, जेव्हां ते देवाच्या गौरवासाठीं आणि इतरांचे तारण व्हावें या कळकळीने विश्वासाद्वारें जगले जाते, तर अशा जीवनांत कोणती ना कोणती अडखळणें आणि दुःखें येतीलच. आज्ञाधारक जीवन जगण्यासाठीं ख्रिस्ती लोकांना जी किंमत मोजावी लागते, दुःखें ही त्याचा एक अविभाज्य भाग आहे जी सोसून तुम्हीं देवानें केलेंलें पाचारण अनुसरत असतां.

ख्रिस्त ज्या मार्गाने घेऊन जातो त्या मार्गाने त्याच्या मागे मागे जाण्याचा निर्धार करून, आपण या मार्गात त्यानें त्याच्या सार्वभौम इच्छेने ज्यां ज्यां गोष्टीं नेमून दिल्यां आहें त्या सर्व गोष्टी निवडतो. अशाप्रकारे, आज्ञाधारकतेच्या मार्गात येणारी सर्व दुःखें व संकटें ही ख्रिस्तासोबत आणि ख्रिस्तासाठीं सोसलेलीं दुःखें व संकटें असतांत- मग ती घरातच झालेला कर्करोग असो किंवा बाहेर अविश्वासणाऱ्यांनी मांडलेला आपला करणारा छळ असो.

शिवाय, ती आपण “निवडलेलीं” असतांत — म्हणजें, जिथें जिथें दुःख आपल्यावर येतांत तिथें तिथें आपण स्वेच्छेने आज्ञाधारकतेचा मार्ग निवडतो आणि आपण देवाविरुद्ध कुरकुर करत नाहीं. आपण अशी प्रार्थना करूं — जशी पौलाने केलीं — कीं हे दुःख माझ्यापासून दूर व्हावे (2 करिंथ 12:8); परंतु जर देवाची इच्छा असेल, तर स्वर्गाच्या मार्गावर असतांना आज्ञाधारक शिष्य म्हणून आम्हांला जी किंमत मोजावी लागते तिचा एक भाग म्हणून आम्हीं ती स्वीकारतो.

ख्रिस्ती आज्ञाधारकतेच्या मार्गात सोसावी लागणारी सर्व संकटें व दुःखें, मग ती छळामुळें उद्भवोत किंवा आजार किंवा अपघात यांमुळें उद्भवोत, त्यां सर्वांचा स्वभावगुण हा एकच आहे : ती सर्व देवाच्या चांगुलपणावर आपल्या विश्वासाला धोका निर्माण करतांत आणि आपण आज्ञाधारकतेचा मार्ग सोडून द्यावा म्हणून प्रवृत्त करतांत.

म्हणून, विश्वासाचा आपला प्रत्येक विजय, आणि आज्ञाधारकतेमध्यें आपली सर्व चिकाटी, ही सर्व देवाच्या चांगुलपणाची आणि ख्रिस्तच आमच्यासाठीं सर्वकाही आहे याची साक्ष देतांत – मग तो शत्रू आजार, सैतान, पाप असो किंवा विध्वंस असो. म्हणून, आपल्या ख्रिस्ती पाचारणाच्या मार्गात आपण सहन करत असलेलीं सर्व दुःखें, नाना प्रकारची सर्व दुःखें ही “ख्रिस्ताबरोबर” आणि “ख्रिस्तासाठीं” आहेंत.

त्याच्याबरोबर  या अर्थाने कीं आपण त्याच्याबरोबर विश्वासाने चालत असताना दुःखें आपल्यावर येतांत, आणि या अर्थाने देखील कीं आपण ती सर्व दु:खें त्यां सामर्थ्याने सहन करतो जो तो आपल्याला त्याच्या सहानुभूतीपूर्ण महायाजकीय सेवेद्वारे पुरवतो (इब्री 4:15).

आणि त्याच्यासाठीं  या अर्थाने कीं ही दुःखें आपण त्याचा चांगुलपणा आणि सामर्थ्य यांवर किती विश्वास ठेवितो याची कसौटी घेऊन तो प्रमाणित केला जातो, आणि या अर्थाने देखील कीं ही दुःखें तोंच सर्वांमध्यें सर्वकाही भरून काढतो याबाबतींत त्याची योग्यता प्रकट करतांत.

28 October : शंभर पटीनें परत फेड

Alethia4India
Alethia4India
28 October : शंभर पटीनें परत फेड
Loading
/

“मी तुम्हास खरे सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घरदार, बहिण, भाऊ, आईवडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला शेवटच्या काळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाहीं.” (मार्क 10:29-30)

येथें येशूच्या बोलण्याचा अर्थ असा आहे कीं तुमच्या प्रत्येक बलिदानाची परतफेड तो स्वतःने भरून काढील.

  • जर तुम्हीं तुमच्याशी घनिष्ठ असलेल्या तुमच्या ममताळू आईचा आणि तिच्या सान्निध्याचा त्याग करतां, तर तुम्हांबरोबर सर्वकाळ उपस्थित राहणारा जो ख्रिस्त याजकडून तुम्हांला शंभरपटीने ममता आणि सान्निध्य प्राप्त होईल.
  • जर तुम्हीं तुमच्या जिवलग भावाबरोबर असलेल्या उदार व प्रेमळ सहचर्याचा त्याग करतां, तर तुम्हाला ख्रिस्ताकडून  शंभरपटीने उदार व प्रेमळ सहचर्य प्राप्त होईल.
  • जर तुम्हीं तुम्हांला तुमच्या घरात मिळत असलेली विश्रांती व सुरक्षितपणाची भावना सोडून देतां, तर जेव्हां तुम्हाला कळेल कीं तुमचा प्रभू हाच प्रत्येक घराचा स्वामी आहे, तेव्हां तुम्हाला शंभरपटीने विश्रांती आणि सुरक्षितता प्राप्त होईल.

जें तरुण मिशनरी होऊं पाहत आहें, त्यांना येशू म्हणतो, “मी अभिचचन देतों कीं मीं तुमचे सर्व श्रम साध्य करीन, आणि तुम्हांबरोबर असा राहीन कीं तुम्हीं कधी कोणत्या गोष्टीचा त्याग केला असे तुम्हीं म्हणूंच शकणार नाहीं.”

पेत्रानें आपली “त्याग” करण्याची भावना व्यक्त केलीं त्यावेळी येशूचा विरोधी-पवित्रा काय होता? पेत्र म्हणाला, “पाहा, आम्हीं सर्व सोडले आहे आणि आपल्यामागे आलो आहोत” (मार्क 10:28). येशूनें “आत्मत्याग” करण्याची जी आज्ञा आम्हांला दिलीं त्या आत्मत्यागाची ही भावना आहे का? नाहीं, त्यानें अशा भावनेला फटकारलें.

येशू पेत्राला म्हणाला, “ज्याची मी शंभरपटीने परतफेड करणार नाहीं असा त्याग माझ्यासाठीं कोणीही कधीच करूं शकत नाहीं- होय, एका अर्थाने या जीवनातच, येणाऱ्या युगात जे सार्वकालिक जीवन मिळेल त्याची तर बातच नको.”

27 October : देवाला शक्य आहे

Alethia4India
Alethia4India
27 October : देवाला शक्य आहे
Loading
/

“ह्या मेंढवाड्यातली नाहींत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत……” (योहान 10:16)

जगातील प्रत्येक लोकगटांत देवाचे निवडलेलें लोक आहेत. ज्यां सामर्थ्यानें त्यानें हे विश्व निर्माण केलें त्याच सामर्थ्यानें तो त्यांना सुवार्तेद्वारें हाक मारून बोलावितो, आणि ते विश्वास ठेवतांत! पृथ्वीच्या सीमांवर असलेल्या आव्हानात्मक प्रांतांत नैराश्येवर मात करण्यासाठीं सामर्थ्य मिळावे म्हणून या शब्दांमध्यें किती ताकद आहे!

पीटर कॅमेरॉन स्कॉट यांचा मिशनरी इतिहास या बाबतींत एक चांगले उदाहरण आहे. स्कॉट यांचा जन्म 1867 मध्यें ग्लासगो येथे झाला. त्यांनी आफ्रिका-इनलँड मिशनची स्थापना केलीं. पण आफ्रिकेत सुवार्ता प्रसाराची त्यांची सुरुवात ही मुळीच अनुकूल किंवा आशादायक नव्हतीं.

आफ्रिकेला त्यांचा पहिला प्रवास मलेरियाच्या तीव्र आक्रमणामुळें अर्ध्यावर संपुष्टात आला आणि त्यांना घरी परतावे लागलें. आजारातून बरे होतांच त्यांनी पुन्हां आफ्रिकेला जाण्याचा बेत केला. हा दुसरा प्रवास त्यांच्यासाठीं विशेष समाधान देणारा होता कारण यावेळी त्यांचा भाऊ जॉन सुद्धा त्यांच्यासोबत सामील झाला. पण कांहीं दिवसातच जॉन आजारी पडला.

असहाय झालेंल्यां पीटरनें आपल्या भावाला आफ्रिकन भूमीत पुरलें आणि अशा दु:खाच्या प्रसंगी देखील त्यांनी आफ्रिकेत सुवार्ता सांगण्यासाठीं स्वतःला पुन्हा समर्पित केलें. परंतु त्यांची प्रकृती पुन्हा बिघडलीं आणि विवश होऊन त्यांना इंग्लंडला परतावे लागलें.

त्या दिवसांत ते ज्यां उजाडपणा आणि नैराश्यांमुळें विव्हळ झालें त्यांतून ते कसे बाहेर निघणार होते? त्यांनी देवासाठीं समर्पित होण्याचा निश्चय केलेंला होता. पण आफ्रिकेला परत जाण्याचे सामर्थ्य त्यांना कुठून प्राप्त होणार होते? मनुष्याला हे अशक्य होते!

त्यांना हे सामर्थ्य वेस्टमिन्स्टर ॲबे याठिकाणी मिळालें. डेव्हिड लिव्हिंगस्टोनची कबर आजही तिथें आहे. स्कॉट यांनी शांतपणें वेस्टमिन्स्टर ॲबे मध्यें प्रवेश केला, त्यांना ती कबर आढळलीं आणि प्रार्थना करण्यासाठीं त्यांनी कबरेसमोर गुडघे टेकले. त्यावर असा शिलालेख होता:

ह्या मेंढवाड्यातली नाहींत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत

ते एका नव्या आशेनें उत्तुंग होऊन उभें झालें, आणि आफ्रिकेला परतलें. आणि आज, शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ उलटूनही, त्यांनी स्थापन केलेंलीं मिशनरी संस्था आफ्रिकेत सुवार्तेसाठीं संजीवनाचे कार्य करणारे व वाढत चाललेलें कार्यदल आहे.

जर तुम्हांला सर्वात मोठा आनंद देवाच्या भरभरून वाहणाऱ्या कृपेचा अनुभव घेण्यात असेल, कीं जेणेंकरून ती इतरांच्या कल्याणार्थ तुमच्याकडून ओसंडून वाहावी, तर जगातील सर्वात शुभ वृत्त हे आहे कीं देव सुवार्ताविरहित लोकांपर्यंत त्यांच्या तारणानिमित्त पोहोचावे म्हणून तुमच्यासाठीं अशक्य असलेल्यां गोष्टीं तुमच्याठायीं शक्य करील.

26 October : सुवार्तीकांसाठीं औषध

Alethia4India
Alethia4India
26 October : सुवार्तीकांसाठीं औषध
Loading
/

देवाला सर्वकाही शक्य आहे.” (मार्क 10:27)

देवाची सार्वभौम कृपा ही ख्रिस्ती पूर्णानंदासाठीं जीवनाचा झरा आहे. कारण ख्रिस्ती पूर्णानंदाच्या शोधांत असलेल्या व्यक्तीला सर्वात अधिक प्रिय असलेली गोष्ट म्हणजें ही कीं देवाच्या सार्वभौम कृपेचा आस्वाद त्याला भरून काढतो आणि त्याच्याद्वारे इतरांचेहि कल्याण व्हावे म्हणून तो झरा त्याच्यांतून विपुलपणें वाहतो.

ख्रिस्ती पूर्णानंदाच्या शोधांत असलेला प्रत्येक सुवार्तिक “ते मी केलें असे नाहीं, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेनें केलें” (1 करिंथ 15:10) ह्या सत्याचा आस्वाद घेण्यांस आतुर असतो. त्यांनी सुवार्तेसाठीं घेतलेल्यां श्रमाचे फळ हे पूर्णपणें देवाकडून आहे या सत्यांत ते आनंद करतांत (1 करिंथ 3:7; रोम 11:36).

जेव्हा प्रभू म्हणतो, “माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाहीं” (योहान 15:5) तेव्हा या गोष्टीचा त्यांना अति आनंद होतो. एका नव्या सृष्टीची निर्मिती करण्याचा अशक्य भार देवानें त्यांच्या खांद्यावर न टाकता तो त्यानें स्वतःवर घेतला आहे हे सत्य जाणून घेतल्यावर ते निरागस कोकऱ्यांप्रमाणें आनंदाने उडी मारतात. आपल्या मनांत न गोंधळता, ते म्हणतात, “आम्हीं स्वत: कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे” (2 करिंथ 3:5).

जेव्हा ते काहीं काळ रजा घेऊन विश्रांतीसाठीं घरी येतात, तेव्हां ते मोठ्या आनंदाने भारावून जाऊन पाठवणाऱ्या मंडळीला आपल्या यशाचा समाचार या शब्दांत देतांत, “ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाहीं; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्यानें माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या सामर्थ्याने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो” (रोम 15:18).

“देवाला सर्वकाही शक्य आहे!” –हे शब्द समोरून आपल्याला आशा देतांत, तर पाठीमागून आम्हांला दीन अं:तकरणाचे बनवितांत. ते आमच्या नैराश्यासाठीं रोगप्रतिकारक आणि अभिमानासाठीं रोगप्रतिकारक असे आहेत – म्हणजें सुवार्तीकांसाठीं एक सार्थक व परिपूर्ण औषध.

25 October : महान प्रेषितीय (मिशनरी) आशा

Alethia4India
Alethia4India
25 October : महान प्रेषितीय (मिशनरी) आशा
Loading
/

पण आपल्यां अपराधांमध्यें मृत झालों असतांहि (देवानें) ख्रिस्तामध्यें आपणांस जीवंत केलें व कृपेनेच तुमचें तारण झालें आहे. (इफिस 2:5)

महान प्रेषितीय किंवा मिशनरी आशा ही आहे कीं जेव्हां पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानें सुवार्ता सांगितली जाते, तेव्हां जे मनुष्याला करणें अशक्य आहे ते देव स्वत: करतो : तो आम्हांमध्यें तारणदायी विश्वास निर्माण करतो. मनुष्याचे पाचारण जे करू शकत नाहीं ते देवाचे पाचारण करते. त्याची पाचारण मृतांना जिवंत करते. ती आध्यात्मिक जीवन उत्पन्न करते. येशूनें कबरेंत मृत पडलेल्या लाजराला “बाहेर ये” अशी जी हाक मारली त्याच हाकेसारखी ही हाक आहे. आणि मृत पडलेल्या माणसाने त्याची आज्ञा पाळली आणि बाहेर आला. ह्या हाकेने जीवन उत्पन्न करून आज्ञाधारकपणा उत्पन्न केला (योहान 11:43). प्रत्येक मनुष्य असाच तारला जातो.

आपण हाक मारून एखाद्याला झोपेतून उठवू शकतो, परंतु देवाचे पाचारण (हाक) ज्यां गोष्टीं नाहीं त्यां गोष्टीं अस्तित्वात आणावयांस समर्थ आहे (रोमकरांस 4:17). देवाचे पाचारण या अर्थाने अप्रतीरोध्य आहे कीं ते सर्व प्रतिकारांवर मात करण्यांस समर्थ आहे. देवाच्या सत्संकल्पानुसार हे पाचारण चमत्कारीकरित्या प्रभावी आहे – इतके कीं पौलानें म्हटलें, “आणि [देवानें]  ज्यांना पाचारण केलें त्यांना त्यानें नीतिमानहि ठरवलें” (रोमकरांस 8:30), तथापि आपण केवळ विश्वासाने नीतिमान ठरविलें जातो.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यांस, देवाचे पाचारण इतके प्रभावी असते कीं ते न चुकता आम्हांमध्यें तो विश्वास निर्माण करते ज्याद्वारे आपण नीतिमान ठरविले जातो. रोमकरांस 8:30 च्या प्रमाणें पाचारण करण्यांत आलेल्यां सर्वांना नीतिमान ठरविले जाते. परंतु विश्वासावांचून कोणीही नीतिमान ठरविला जात नाहीं (रोमकरांस 5:1). म्हणून देव ज्यां हेतूनें पाचारण करतो त्याचा तो हेतू पूर्ण झाल्यावांचून राहत नाहीं. तो अप्रतीरोध्यपणें असा विश्वास अस्तित्वात आणतो ज्या द्वारे तो आम्हांला नीतिमान ठरवतो.

मनुष्य हे करू शकत नाहीं. हे त्याच्यासाठीं अशक्य आहे. पाषाणरुपी-हृदय फक्त देवच काढू शकतो (यहेज्केल 36:26). केवळ देवच लोकांना पुत्राकडे आकर्षित करू शकतो (योहान 6:44, 65). केवळ देवच आध्यात्मिकरित्या मृतावस्थेंत असलेलें अंत: करण उघडू शकतो जेणेंकरून ते सुवार्तेच्या सांगण्याकडे लक्ष देईल (प्रेषितांची कृत्ये 16:14). केवळ उत्तम मेंढपाळ, जो ख्रिस्त, आपल्या मेंढरांना ओळखतो, आणि त्यांना नावाने एका अशा आकर्षक शक्तीने हाक मारतो कीं ते सर्व त्याच्या मागे येतांत – आणि त्यांचा कधीही नाश होत नाहीं (योहान 10:3-4, 14).

देवाची सर्वोच्च सार्वभौम कृपा, जी गोष्ट येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेद्वारे मनुष्याला अशक्य असलेली गोष्ट अस्तित्वात आणते, ही महान प्रेषितीय किंवा मिशनरी आशा आहे.

22 October : पती-पत्नींसाठीं पूर्णानंद

Alethia4India
Alethia4India
22 October : पती-पत्नींसाठीं पूर्णानंद
Loading
/

री मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टींत आपापल्या पतीच्या अधीन असावे.पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केलीं तशी तुम्हींही आपापल्या पत्नीवर प्रीति करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केलीं आणि स्वतःस तिच्यासाठीं समर्पण केलें. (इफिस 5:24-25)

देवानें वैवाहिक जीवनासाठीं प्रीतिचा एक अनुकरणीय आदर्श नेमून दिलेला आहे.

पती-पत्नीच्या भूमिका सारख्या नसतांत. पतीने मंडळीचा मस्तक असलेल्या ख्रिस्ताकडून त्याच्यासाठीं ठरविलेलें सुत्रे घायची आहें. तर पत्नीने ख्रिस्ताच्या अधीन असलेल्या मंडळीसाठीं देवानें जो नमुना दिला आहे त्यापासून तिनें तिचे सुत्रे घायची आहें.

असे केल्यानें, पापांत झालेंल्या पतनाची दुष्टायी आणि त्याचे विनाशकारी परिणाम पालटू लागतांत. पापांत झालेंल्यां पतनामुळें स्त्रीचे मस्तक म्हणून पुरुषाची वात्सल्यमय भूमिका पालटून काही पुरुषांमध्यें तिने जुलूमशाही वर्चस्वाचे विकृत रूप घेतलें आहे, तर इतर पुष्कळ पुरुषांमध्यें तिचे रुपांतर आपल्या कर्तव्याशी हलगर्जीपणा बाळगण्यांत झाला. या पतनामुळें स्त्रीचे शहाणपण आणि ऐच्छिक अधीनता विकृत होऊन तिचे रुपांतर काहीं स्त्रियांमध्यें कावेबाज व कारस्थानी वृत्तीत झालें आहे तर इतर काहीं स्त्रियांमध्यें निर्लज्ज मुजोरी आणि दबंगपणाची वृत्ती निर्माण झालीं आहें.

पापाच्या या बंधनापासून सोडविणारा मशीहा काळाची पूर्णता झाल्यावर जेव्हां येशू ख्रिस्तामध्यें प्रकट होणार होता तेव्हा आम्हीं ज्या मुक्तीची प्रतीक्षा करित होतो ती मुक्ती म्हणजें स्त्रीचे मस्तक म्हणून पुरुषाची वात्सल्यमय भूमिका आणि स्त्रीची ऐच्छिक अधीनता ह्या व्यवस्थेचा विध्वंस करण्यासाठीं नव्हती तर ती पुन्हा स्थापित व्हावी म्हणून होती. पत्नींनो, आनंदी मंडळीसाठीं देवानें जो कित्ता घालून दिला आहे त्याचे अनुकरण करून तुम्हीं तुमच्या पतन पावलेल्या अधिनस्थ भूमिकेची पुनर्स्थापना करा! पतींनो, प्रीतिनें भरलेला ख्रिस्त असा जो मंडळीचा प्रेमळ मस्तक म्हणून देवानें जो आदर्श तुमच्यापुढे मांडीला त्याचे अनुकरण करून तुम्हीं तुमच्या पतन पावलेल्या मस्तकपणाच्या भूमिकेची पुनर्स्थापना करा!

मी इफिस 5:21-33 मध्यें या दोन गोष्टी पाहतो: (1) वैवाहिक जीवनांत ख्रिस्ती पूर्णानंद काय आहे याचे दर्शन आणि (2) आणि त्याच्या प्रेरक-शक्तीचा उद्गम.

पत्नींनो, तुमच्या वैवाहिक नात्यातील “मस्तक” किंवा पुढारी म्हणून देवानें तुमच्या पतींना जी भूमिका नेमून दिलीं आहे ती मान्य करून आणि त्याला पूर्ण सन्मान देऊन तुमच्या पतीच्या आनंदात तुमचा आनंद शोधा. पतींनो, जसे ख्रिस्तानें मंडळीचे पुढारपण केलें आणि स्वतःस तिच्यासाठीं समर्पण केलें अगदी तसेच पुढारपण करण्याची आपली जबाबदारी स्वीकारून तुमच्या पत्नीच्या आनंदात तुमचा आनंद शोधा.

मी आनंदाने माझ्या आयुष्यात देवाच्या चांगुलपणाची साक्ष देऊं इच्छितो. 1968 मध्यें माझे लग्न झालें त्याच वर्षी मला ख्रिस्ती पूर्णानंदाचा शोध लागला. तेव्हापासून, नोएल आणि मी, येशू ख्रिस्ताच्या आज्ञेत राहून, आम्हीं शक्य तितक्या आवेशाने, पूर्णपणें चिरस्थायी असलेल्या आनंदाचा एकमेकांमध्यें शोध करित आलेले आहों. जरी अपूर्णपणें, तर पुष्कळ प्रसंगी अर्ध्या मनाने का होईना, आम्हीं एकमेकांच्या आनंदातच स्वतःचा आनंद लुटला आहे.

आणि आम्हीं लग्नाच्या जवळजवळ 50 वर्षांनंतर एक मनानें अशी साक्ष देऊ शकतो : जे लग्न करण्याचा विचार करित आहेत त्यांना आमचा संदेश हा कीं तुमचा मनोरथ साध्य करण्याचा हाच मार्ग आहे. माझ्या आणि नोएलच्या बाबतींत, विवाह म्हणजें ख्रिस्ती पूर्णानंदाचा आवश्यक घटक आहे. जेव्हां एक जोडीदार आपल्या दुसऱ्या जोडीदाराच्या आनंदात आपल्या आनंदाचा शोध घेतो आणि देवानें नेमून दिलेली आपली भूमिका पार पाडतो, तेव्हा ख्रिस्त आणि मंडळी यांच्यातील नात्याचा दृष्टांत म्हणून विवाहाचे रहस्य त्याच्या महान गौरवासाठीं आणि आपल्या महान आनंदासाठीं प्रकट होते.

21 October : विवाहाचे मोठे रहस्य

Alethia4India
Alethia4India
21 October : विवाहाचे मोठे रहस्य
Loading
/

म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील; आणि ती उभयता एकदेह होतील.” हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी ह्यांच्यासंबंधाने बोलतो आहे. (इफिस 5:31-32)

येथे इफिस 5:31 मध्यें पौल उत्पत्ति 2:24 चा संदर्भ घेत आहे, जे मोशे बोलला – आणि येशूनें म्हटलें कीं ही वचनें मोशेद्वारे देव बोलला (मत्तय 19:5) – “ह्यास्तव पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.” पौल म्हणतो कीं देवाचे हे वचन, जे देव मनुष्याचे पापात पडण्यापूर्वी बोलला, ख्रिस्त आणि मंडळीला संबोधून आहे आणि म्हणून यांत एक मोठे रहस्य दडलेलें आहे.

याचा अर्थ असा आहे कीं जेव्हां देवानें पुरुष आणि स्त्री यांना बनवलें आणि विवाहाद्वारे त्यांनी एकदेह व्हावें हे ठरविलें, तेव्हा त्यानें फासा टाकून किंवा एक रुपयाचे नाणें हवेत फेकून ते एकमेकांशी कसे संबंधित असावेंत असा नशिबी खेळ खेळला नाहीं. देवानें आपला पुत्र आणि मंडळी यांच्यातील नातेसंबंधाचा नमुना सादर करून अतिशय हेतुपुरस्सर विवाहाचा आदर्श आपल्या समोर ठेवला आहे, ज्याची योजना त्यानें जगाचा पाया घालण्यापूर्वी केलीं होती.

म्हणून, विवाह हे रहस्य मोठे आहे – आपण जे बाह्यरूपाने पाहतो त्यापेक्षा कितीतरी मोठा असा गूढ अर्थ त्यात सामावलेला आहे. देवानें पुरुष आणि स्त्री यांना बनवलें आणि विवाह संस्थेची स्थापना केलीं ती यासाठींच कीं ख्रिस्त आणि त्याची मंडळी यांच्यातील सार्वकालिक करार-बद्ध नात्याचे प्रतिबिंब त्यांच्या वैवाहिक एकदेहाद्वारे दिसून यावें.

पौलानें या रहस्यातून काढलेला निष्कर्ष असा कीं वैवाहिक जीवनांत पती-पत्नींची एकमेकांप्रत असलेली कर्तव्यें ही अहेतुकपणाने किंवा स्वैराचाराने ठरवली जात नाहींत, तर ती ख्रिस्त आणि त्याची मंडळी यांची एकमेकांप्रत असलेली अद्वितीय कर्तव्यें यांत मुळावलेली आहेत.

आपल्यांपैकीं जे विवाहित आहेत त्यांनी वारंवार यावर चिंतन करण्याची गरज आहे कीं आपण आपल्या वैवाहिक जीवनातून वैवाहिक संबंधात असलेल्या आपल्यापेक्षा प्रचंड मोठ्या आणि महान अशा अद्भुत दैवीय वास्तविकतेचे प्रतिबिंब दाखवावे असा विशेषाधिकार देव आपल्याला देतो ही गोष्ट किती रहस्यमय आणि आश्चर्यकारक आहे.

हेंच ते ख्रिस्त आणि मंडळी यांचे रहस्यमय नाते आहे जे आमच्यासाठीं प्रीतिच्या नमुन्याचा पाया आहे ज्याविषयी पौल बोलत आहे. प्रत्येक जोडीदाराने आपल्या जोडीदाराच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधला पाहिजे असे म्हणणें पुरेसे नाहीं. हे खरे आहे. पण ते पुरेसे नाहीं. हे सांगणें देखील तितकेच महत्त्वाचे आहे कीं पती-पत्नींनी आपल्या वैवाहिक जीवनातून जाणीवपूर्वक ख्रिस्त आणि मंडळी यांच्यासाठीं देवानें ठरविलेल्या नातेसंबंधाचे प्रतिबिंब प्रदर्शित केलें पाहिजे. म्हणजेंच, प्रत्येक जोडप्याने ख्रिस्त आणि मंडळीसाठीं देवानें तयार केलेंल्या शुद्ध आणि आनंदी आलेखाच्या विशिष्ट नमुन्यानुसार आपले वैवाहिक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आपण अविवाहित असा अगर विवाहित, वृद्ध असा अगर तरुण, मला आशा आहे कीं तुम्हीं हे गांभीर्याने घ्याल. करार-पाळणारा ख्रिस्त आणि त्याचा करार-पाळणारी मंडळी यांच्या रहस्याचे प्रकटीकरण त्यावर टिकलेले आहे.

20 October : प्रार्थनेचा प्रथम हेतू

Alethia4India
Alethia4India
20 October : प्रार्थनेचा प्रथम हेतू
Loading
/

ह्यास्तव तुम्हीं ह्या प्रकारे प्रार्थना करा :‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.” (मत्तय 6:9)

प्रभूनें शिकविलेल्यां प्रार्थनेत, येशूनें शिकवलें कीं प्रार्थना करताना प्रथम प्राधान्य म्हणजें आपल्या स्वर्गीय पित्याला त्याचे नाव पवित्र मानले जावो अशी प्रार्थना करणें : आम्हांमध्यें, मंडळीत, जगात आणि सर्वत्र.

लक्षात घ्या कीं ही एक याचिका आहे, विनंती आहे. ही घोषणा किंवा भव्य स्वागत नाहीं. ही स्तुतीची अभिव्यक्ती नाहीं, तर याचना आहे. वर्षानुवर्षे मी प्रभूच्या प्रार्थनेचे चुकीचे वाचन करत आलेला आहे कीं जणू तिची सुरुवात स्तुतीने होते : “देवाची स्तुती करा, परमेश्वराचे नाव पवित्र, आदरणीय, व पराक्रमी आहे!” पण ती स्तुती नाहीं. ती प्रार्थना आहे. ती देवाला विनवणी आहे कीं त्याचे स्वतःचे नाव पवित्र मानले जात आहे ह्याची त्यानें खात्री करून घ्यावीं.

हे अगदी मत्तय 9:38 मधील एका आणखी शास्त्रलेखाप्रमाणें आहे, जिथे येशू आपल्याला पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करावयास सांगतो. आपण जे कामकरी आहों त्यां आम्हीं पिकाच्या धन्याला, ज्याला कापणीचे ज्ञान आमच्यापेक्षा जास्त आहे, त्यानें आपल्या कापणीस आणखी कामकरी पाठवून द्यावेत अशी प्रार्थना आपण त्याला करावीं असा बोध आम्हांला करण्यांत यावा ही गोष्ट मला नेहमीच आश्चर्यचकित करून सोडते.

पण इथे प्रभूच्या प्रार्थनेत हीच गोष्ट नाहीं का—येशू आपल्याला सांगत आहे कीं देवाला, जो आपल्या नावाच्या प्रतिष्ठेसाठीं इतका इर्ष्यावान आहे, त्याचे नाव पवित्र मानले जावे याची त्यानें स्वतः खात्री करून घावीं अशी आपण प्रार्थना करावीं, ज्याचा अर्थ आहे प्रतिष्ठित मानलें जावें, आदरणीय मानलें जावें, अति मौल्यवान म्हणून गौरविले जावें?

कदाचित आपल्याला याचे आश्चर्य वाटेल, परंतु ते असेच आहे. आणि यातून आपण दोन गोष्टी शिकतो.

1. पहिली ही कीं प्रार्थना देवाला त्यां गोष्टी करण्यास प्रवृत्त करत नाहीं ज्यां त्याला करायच्या नसतांत, किंवा ज्या करण्यांस तो नाखूष आहे. त्याचे नाव पवित्र मानलें जावें हा त्याचा पावित्राच (अगदी मूळ उद्देश) आहे. देवानें ज्यां ज्यां गोष्टींना प्राधान्य दिलें आहे त्यांत ह्यापेक्षा सर्वप्रथम असें काहीही नाहीं. पण तरीही आपण तशी प्रार्थना करावीं.

2. दुसरी म्हणजें ही कीं प्रार्थना हा देवाचा तो मार्ग आहे ज्याद्वारे तो आपलें प्राधान्य त्याच्या प्रधान्याशी सुसंगत बनवितो. जेव्हा आमच्या प्रार्थना त्याच्या महान उद्देष्ट्याशी सुसंगत परिणाम म्हणून समोर येतांत तेव्हा आपल्या प्रार्थनेने उद्भवणारे परिणाम याद्वारे महान गोष्टी घडवून आणाव्यात ही देवाची इच्छा आहे.

आपले नांव पवित्र मानले जावें अशी जी देवाची ईर्ष्या आहे त्याशी तुमचे अंतःकरण सुसंगत करा म्हणजें तुमच्या प्रार्थना मोठ्या परिणामकारक ठरतील. तुमची पहिली आणि खात्रीदायक प्रार्थना देवाचे नांव पवित्र मानलें जावें यासाठींच असू द्या म्हणजें तुमच्या प्रार्थना त्याला त्याच्या नावासाठीं असलेल्या सामर्थ्यवान ईर्षेबरोबर सुसंगत होतील.