“मी तुम्हास खरे सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घरदार, बहिण, भाऊ, आईवडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला शेवटच्या काळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाहीं.” (मार्क 10:29-30)
येथें येशूच्या बोलण्याचा अर्थ असा आहे कीं तुमच्या प्रत्येक बलिदानाची परतफेड तो स्वतःने भरून काढील.
- जर तुम्हीं तुमच्याशी घनिष्ठ असलेल्या तुमच्या ममताळू आईचा आणि तिच्या सान्निध्याचा त्याग करतां, तर तुम्हांबरोबर सर्वकाळ उपस्थित राहणारा जो ख्रिस्त याजकडून तुम्हांला शंभरपटीने ममता आणि सान्निध्य प्राप्त होईल.
- जर तुम्हीं तुमच्या जिवलग भावाबरोबर असलेल्या उदार व प्रेमळ सहचर्याचा त्याग करतां, तर तुम्हाला ख्रिस्ताकडून शंभरपटीने उदार व प्रेमळ सहचर्य प्राप्त होईल.
- जर तुम्हीं तुम्हांला तुमच्या घरात मिळत असलेली विश्रांती व सुरक्षितपणाची भावना सोडून देतां, तर जेव्हां तुम्हाला कळेल कीं तुमचा प्रभू हाच प्रत्येक घराचा स्वामी आहे, तेव्हां तुम्हाला शंभरपटीने विश्रांती आणि सुरक्षितता प्राप्त होईल.
जें तरुण मिशनरी होऊं पाहत आहें, त्यांना येशू म्हणतो, “मी अभिचचन देतों कीं मीं तुमचे सर्व श्रम साध्य करीन, आणि तुम्हांबरोबर असा राहीन कीं तुम्हीं कधी कोणत्या गोष्टीचा त्याग केला असे तुम्हीं म्हणूंच शकणार नाहीं.”
पेत्रानें आपली “त्याग” करण्याची भावना व्यक्त केलीं त्यावेळी येशूचा विरोधी-पवित्रा काय होता? पेत्र म्हणाला, “पाहा, आम्हीं सर्व सोडले आहे आणि आपल्यामागे आलो आहोत” (मार्क 10:28). येशूनें “आत्मत्याग” करण्याची जी आज्ञा आम्हांला दिलीं त्या आत्मत्यागाची ही भावना आहे का? नाहीं, त्यानें अशा भावनेला फटकारलें.
येशू पेत्राला म्हणाला, “ज्याची मी शंभरपटीने परतफेड करणार नाहीं असा त्याग माझ्यासाठीं कोणीही कधीच करूं शकत नाहीं- होय, एका अर्थाने या जीवनातच, येणाऱ्या युगात जे सार्वकालिक जीवन मिळेल त्याची तर बातच नको.”