26 October : सुवार्तीकांसाठीं औषध

Alethia4India
Alethia4India
26 October : सुवार्तीकांसाठीं औषध
Loading
/

देवाला सर्वकाही शक्य आहे.” (मार्क 10:27)

देवाची सार्वभौम कृपा ही ख्रिस्ती पूर्णानंदासाठीं जीवनाचा झरा आहे. कारण ख्रिस्ती पूर्णानंदाच्या शोधांत असलेल्या व्यक्तीला सर्वात अधिक प्रिय असलेली गोष्ट म्हणजें ही कीं देवाच्या सार्वभौम कृपेचा आस्वाद त्याला भरून काढतो आणि त्याच्याद्वारे इतरांचेहि कल्याण व्हावे म्हणून तो झरा त्याच्यांतून विपुलपणें वाहतो.

ख्रिस्ती पूर्णानंदाच्या शोधांत असलेला प्रत्येक सुवार्तिक “ते मी केलें असे नाहीं, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेनें केलें” (1 करिंथ 15:10) ह्या सत्याचा आस्वाद घेण्यांस आतुर असतो. त्यांनी सुवार्तेसाठीं घेतलेल्यां श्रमाचे फळ हे पूर्णपणें देवाकडून आहे या सत्यांत ते आनंद करतांत (1 करिंथ 3:7; रोम 11:36).

जेव्हा प्रभू म्हणतो, “माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाहीं” (योहान 15:5) तेव्हा या गोष्टीचा त्यांना अति आनंद होतो. एका नव्या सृष्टीची निर्मिती करण्याचा अशक्य भार देवानें त्यांच्या खांद्यावर न टाकता तो त्यानें स्वतःवर घेतला आहे हे सत्य जाणून घेतल्यावर ते निरागस कोकऱ्यांप्रमाणें आनंदाने उडी मारतात. आपल्या मनांत न गोंधळता, ते म्हणतात, “आम्हीं स्वत: कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे” (2 करिंथ 3:5).

जेव्हा ते काहीं काळ रजा घेऊन विश्रांतीसाठीं घरी येतात, तेव्हां ते मोठ्या आनंदाने भारावून जाऊन पाठवणाऱ्या मंडळीला आपल्या यशाचा समाचार या शब्दांत देतांत, “ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाहीं; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्यानें माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या सामर्थ्याने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो” (रोम 15:18).

“देवाला सर्वकाही शक्य आहे!” –हे शब्द समोरून आपल्याला आशा देतांत, तर पाठीमागून आम्हांला दीन अं:तकरणाचे बनवितांत. ते आमच्या नैराश्यासाठीं रोगप्रतिकारक आणि अभिमानासाठीं रोगप्रतिकारक असे आहेत – म्हणजें सुवार्तीकांसाठीं एक सार्थक व परिपूर्ण औषध.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *