31 October : दुःखाचे धर्म-विद्यालय

Alethia4India
Alethia4India
31 October : दुःखाचे धर्म-विद्यालय
Loading
/

 “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” (2 करिंथ 12:9)

ख्रिस्ती म्हणून आम्हांवर जी सर्व नाना प्रकारची संकटें व दुःखें येतांत त्यांमागे देवाचा सार्वत्रिक उद्देश हा आहे : देवामध्यें प्रगतीशील समाधान आणि स्वतःवर आणि जगावर ऱ्हासशील अवलंबन. “आयुष्यातील वास्तविक कठीण धडे मीं अगदी सहज आणि अनुकूल काळांतच शिकलो आहें” असे कोणी म्हटलेंलें मी कधीच ऐकले नाहीं.

उलट मी सशक्त पवित्र जनांना असे म्हणताना ऐकलें आहे कीं, “देवाच्या प्रीतिची खोली काय आहे ती जाणून घेण्यात आणि त्याच्याबरोबरचा माझा खोलवर सहवास यांत मी केलेंलीं प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण प्रगती ही दुःखांच्या माध्यमातूनच झालीं आहे.”

सर्वात मौल्यवान मोती म्हणजें ख्रिस्ताचा गौरव पाहणें.

अशाप्रकारे, पौल मोठ्या कळकळीने सांगतो कीं जेव्हां आपल्यावर दुःखें येतांत, तेव्हां ख्रिस्ताची पुरेशी जी कृपा ती पूर्णतेस येऊन तिचा गौरव वाढतो. जर आपण आपल्या सर्व संकटांत त्याच्यावर विसंबून राहतो, आणि आमचा जो “आशेचा हर्ष”  त्यांस तोच बळकट करतो, तर तो कृपा आणि सामर्थ्य यांचा संतोषकारक पुरवठा करणारा देव आहे हे प्रदर्शित केलें जाते.

जर आपण त्याला बळकटपणें धरून राहतो तर, “जेव्हा ह्या जगातील सर्व आशा सोडून जातांत,” तेव्हां आपण दाखवून देतो कीं आपण गमावलेल्या सर्व जगिक गोष्टींपेक्षा आपल्याला तो अधिक हवा हवासा आहे.

ख्रिस्ताने दुःख सहन करित असलेल्या ह्या प्रेषिताला म्हटलें, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठीं दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यांत मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे” (2 करिंथ 12:9-10).

अशाप्रकारे देवानें दु:ख हे ख्रिस्ती विश्वासनार्यांनी स्वतःवर अवलंबून न राहता केवळ कृपेवर अवलंबून राहावें म्हणून केवळ नव्हें, तर त्या कृपेवर जोर द्यावा आणि तिला तेजस्वी स्वरूप द्यावें ह्या हेतूनें देखील त्यानें ते योजिलें आहे. विश्वास आम्हांमध्यें हीच कृति घडवून आणतो : तो ख्रिस्ताच्या भावी कृपेला उंचवितो.

देवामध्यें असलेल्या आपल्या जीवनाच्या खोल गोष्टींचा शोध आपल्याला दुःखातच लागतो आणि त्यांचा गौरव करतो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *