ArchivesSolid Joys

23 August : देव मूर्तिपूजक नाहीं

Alethia4India
Alethia4India
23 August : देव मूर्तिपूजक नाहीं
Loading
/

आपल्या पवित्र जनांच्या ठायीं गौरव मिळावा म्हणून, आणि त्या दिवशी विश्वास ठेवणार्‍या सर्वांच्या ठायीं आश्‍चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्हीं दिलेंल्या साक्षीवर तुम्हीं विश्वास ठेवला आहे. (2 थेस्सलनीका 1:10)

पौल म्हणतो कीं ख्रिस्त हा मुख्यता त्याला गौरव मिळावा म्हणून आणि आश्‍चर्यपात्र व्हावे म्हणून येत आहे. तो येत आहे त्यामागचे कारण हेच.

देव स्वतःचे गौरव करू पाहतो आणि त्याच्या लोकांकडून त्याची स्तुती व्हावी या शोधांत असतो हे शिक्षण ऐकून बरेच लोक अडखळतांत कारण आपण स्वतःचे गौरव करून घेणारे होऊं नये किंवा स्वतःची स्तुती करून घावयांस पाहूं नये असे बायबल आपल्याला शिक्षण देते. उदाहरणार्थ, बायबल सांगते कीं प्रेम “स्वार्थ पाहत नाहीं” (1 करिंथ 13:5).

देव इतका प्रेमळ असूनही त्याचवेळी पूर्णपणें “स्वतःचे” गौरव (स्वार्थ) व स्तुती करू पाहणारा आणि पूर्णपणें आपलाच आनंद शोधणारा कसा असू शकतो? जर देव स्वतःमध्येंच इतका पूर्णपणें गुंतलेला असेल तर मग तो आमच्या कल्याणार्थ कसा असू शकतो?

मी याचे उत्तर पुढीलप्रमाणें मांडतो : कारण वैभव व परम-स्वयंपूर्णता यांबाबतींत देव हाच एकमेव अद्वितीय आहे, म्हणून जर तो आमचे गौरव करणार असेल तर मग त्याला स्वत:मध्यें गौरवी असणें अगत्याचे आहे. दीन व नम्रपणाचे जें नियम मानव-प्राणी म्हणून आमच्यावर लागू होतांत तें आमचा निर्माणकर्ता म्हणून देवावर लागू होऊ शकत नाहींत.

सार्वकालिक आनंदाचा उगम म्हणून जर देव स्वतःपासूनच विभक्त झाला तर तो देव नाहीं. त्यासाठीं त्याला आपल्या स्वत:च्या अमर्याद वैभवाचे मूल्य नाकारावे लागेल. असे केल्यानें तो हे सूचित करेल कीं त्याच्या स्वतःच्या बाहेर असे काहींतरी आहे जें त्याच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. अशाने तो मूर्तिपूजक ठरेल.

हे आमच्या कोणत्याही लाभाचे नाहीं. कारण आपला देवच जर अनीतिमान झाला आहे तर आपण कोठे जायचे? जें असीम मोलवान त्यालाच जर देवानें असीम महत्त्व देणें थांबविले तर आपण या विश्वात शुद्धतेचा खडक कोठे शोधावा? देव स्वतःविषयीचे जें अमर्याद मूल्य आणि सौंदर्याचे दावे करतो तें त्यानें स्वतःच जर नाकारले तर आपण कोणाची उपासना करावीं?

नाहीं, देवानें आपलें देवपण सोडून द्यावे अशी मागणी करून आपण देवाचे स्वतःचे गौरव करणें ह्याला आपल्या प्रीत्यर्थ प्रीति म्हणूं शकत नाहीं.

उलट, देव अद्वितीय प्रीति आहे हे आपण पाहावें कारण आपल्या पवित्र जनांच्या ठायीं त्याच्या नावाला गौरव मिळावा म्हणून तो अखंडपणें शोध करीत असतो. आपल्या ठायीं त्याच्या महानतेच्या गौरवाची स्तुती व्हावी हाच आपल्या परमानंदाचा आणि त्याच्या महानतेचा शिखर आहे.

22 August : स्तुती करण्यात आनंदी

Alethia4India
Alethia4India
22 August : स्तुती करण्यात आनंदी
Loading
/

देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत! (स्तोत्र 67:3, 5)

आपण देवाची स्तुती करावी अशी देव आपल्याकडून मागणी का करतो?

सी.एस. लुईस :

लोक जितक्या मोठ्या आवेशाने त्यांना किंमत असलेल्यां कोणत्याही गोष्टीची स्वाभाविकरित्या स्तुती करतांत, तितक्याच स्वाभाविक आवेशाने ते आम्हांला देखील त्यांच्या भक्तींत सहभागी होण्याचा आग्रह करतांत : “ती किती सुंदर आहे, नाहीं का? ती गोष्ट किती वैभवी होती, नाहीं का? ती गोष्ट किती विलक्षण आहे, असे तुम्हांला वाटत नाहीं का?”

जेव्हां स्तोत्रकर्ते प्रत्येकाला देवाची स्तुती करण्याचे आव्हान करतांत, तेव्हां तें देखील तेच करत आहेंत जे सर्व लोक स्वाभाविकरित्या मोठ्या आवेशाने त्यांना किंमत असलेल्यां कोणत्याही गोष्टीच्या बाबतींत बोलतांत. देवाची स्तुती करण्याच्या बाबतींत असलेली माझी संपूर्ण, अति सामान्य अडचण ही कीं ती स्तुति आपल्या दृष्टित अति मोलवान असलेल्या व्यक्तीसाठीं जी गोष्ट करण्यात आपल्याला आनंद होतो, तीच आपल्याला करू दिलीं जात नाहीं या माझ्या मूर्खपणाच्या विचारावर अवलंबून आहे, जे खरे पाहता आपण स्वत:हून करू शकत नाहीं.

माझ्या मते, आपल्याला त्याची स्तुती करण्यात आनंद होतो ज्याच्यात आपला सर्व आनंद असतो, कारण स्तुती ही केवळ आपल्याला अभिव्यक्तच करत नाहीं तर ती आपला आनंद देखील भरून काढते; हाच तिचा ठराविक शेवट. एकमेकांवर प्रेम करणारे जोडपे तू किती सुंदर आहेत अशी एकमेकांची स्तुतीसुमने करतांत हा कौतुकाच्या बाहेरचा विषय नाहीं; स्तुती जोपर्यंत व्यक्त होत नाहीं तोपर्यंत आनंद हा अपूर्णच असतो.

येथें उत्तर आहे – देव आपल्याकडून त्याची स्तुती करण्याची मागणी करतो त्यामागे आभासीपणें दिसून येणाऱ्या देवाच्या अहंकारावर उपाय! म्हणजें असें कीं, मुळांत ही आज्ञा आमच्या परम आनंदासाठीं आहे. आपण ज्याचा आनंद घेतो त्याची आपण स्तुतीही करतो कारण तो आनंद जोपर्यंत स्तुती करण्याद्वारे व्यक्त होत नाहीं तोपर्यंत तो अपूर्ण असतो. आपण ज्याला महत्त्व देतो त्याच्याविषयी जर आपल्याला बोलू दिलें नाहीं आणि आपल्याला जे आवडते त्याचा उत्सव साजरा करण्याची आपल्याला परवानगी दिली गेलीं नाहीं आणि ज्याचे आपल्याला कौतुक वाटते किंवा ज्याचा आपण सम्मान करतो त्याची जर आपल्याला स्तुती करू दिली नाहीं तर आपला आनंद पूर्ण होणार नाहीं.

म्हणून, आपला आनंद पूर्ण करण्याइतपत जर देव आपल्यावर प्रीति करत असेल, तर मग त्यानें स्वतःला भेट म्हणून आपल्याला द्यावे इतके पुरे नाहीं; त्यानें आपल्याकडून आपल्या अंतःकरणातून उसळणारी स्तुती देखील जिंकली पाहिजे – त्याला स्वतःमध्यें असलेला काहीं कमकुवतपणा दूर करायचा आहे किंवा त्याच्यात असलेला काहीं अपुरेपणा भरून काढायचा आहे म्हणून नव्हें, तर तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपला आनंद पूर्ण व्हावा अशी उत्कंठा बाळगतो आणि ती उत्कंठा केवळ तेव्हांच पूर्ण होते जेव्हा आपण त्याला ओळखते व त्याची स्तुती करतो, जो सर्वांमध्यें अति महान व गौरवी आहे.

जर तो खरोखर आपला आहे, तर तो तसा स्वतःसाठींच असला पाहिजे! सर्व विश्वात केवळ हाच परमेश्वर असा आहे ज्याच्यासाठीं स्वतःची स्तुती करून घेण्यामध्यें त्याच्या सर्वोच्च प्रीतिचे कार्य प्रकट होते. त्याच्या बाबतींत, स्वतःला उंचविणें हा सर्वोच्च सद्गुण आहे. जेव्हा तो “त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून” सर्व गोष्टी करतो (इफिस 1:12, 14), तेव्हा तो या जगातील अशी एकमेव गोष्ट आपल्यासाठीं राखून ठेवतो व आपल्याला देतो जी आपली संपूर्ण तळमळ संतुष्ट करू शकते.

देव आमच्यासाठीं आहे! परंतु या प्रीतिचा पाया म्हणजें देव हा स्वतःसाठीं होता, आजही स्वतःसाठीं आहे आणि युगानुयुग स्वतःसाठीं राहील.

21 August : अखंड आनंदी देव

Alethia4India
Alethia4India
21 August : अखंड आनंदी देव
Loading
/

“माझा आनंद तुमच्यामध्यें असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.” (योहान 15:11)

परमेश्वर हा निखालस सार्वभौम आहे.

“आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो” (स्तोत्र 115:3).

त्यामुळें तो कधीही निराश होऊ शकत नाहीं. त्यानें मोशेच्या द्वारे इस्रायलाला ज्या पराक्रमाने सोडविले त्याविषयीच्या विविध रंगांवर तो विचार करतो, तेव्हां त्याला आपल्या कृतींपासून आनंद होतो. त्याच्या आनंदाला खंड पडत नाहीं.

त्याचा आनंद हा मुळांत त्याला स्वतःमध्यें असलेली आत्मसंतुष्टी आहे. सृष्टीची उत्पत्ती करण्यापूर्वी, तो त्याच्या पुत्राच्या व्यक्तीत्वात असलेल्या त्याच्या गौरवाच्या प्रतिमेपासून आंनदी होता– म्हणजें त्याच्या प्रिय पुत्रामध्यें ज्याच्याविषयी तो संतुष्ट होता (मत्तय 3:17). नंतर देवाचा हा आनंद त्यानें सृष्टीची उत्पत्ती केलीं व तारणाचे गौरवी कार्य केलें त्यावेळी सर्व “जगासमोर उघड झाला”.

ह्या कृतींपासून देवाच्या मनाला आनंद होतो कारण ती त्याच्या वैभवाचे प्रतिबिंब आहेंत. आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते (स्तोत्र 19:1). “परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो! परमेश्वराला आपल्या कृतींपासून आनंद होवो!” (स्तोत्र 104:31). तो जें काहीं करतो ते सर्व तो आपलें हे वैभव टिकवून ठेवण्यासाठीं व ते जगासमोर उघड करण्यासाठीं करतो, कारण यापासूनच त्याच्या जिवाला आनंद होतो.

देवाच्या सर्व कृतींचा कळस तारण पावलेलें त्याचे लोक त्याची थोरवी वर्णितांत त्यांत आहे. “त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा; त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा!” (स्तोत्र 150:2). त्याच्या आनंदाचा कळस म्हणजें जेव्हा तो पवित्र केलेंल्या आपल्या सर्व लोकांच्या स्तवनाची ललकारपूर्ण प्रतिध्वनी ऐकतो त्यापासून त्याला होणारा आनंद घेतो. “तो घोड्याच्या बलाने आनंदित होत नाहीं, मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाहीं. जे परमेश्वराचे भय धरतांत, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतांत त्यांच्यावर तो संतुष्ट होतो” (स्तोत्र 147:10-11).

परंतु त्याच्या थोरवीचा प्रतिध्वनी म्हणून जेव्हा देव आपली स्तवने ऐकतो तेव्हां त्यापासून केवळ त्यालाच आनंद होत नाहीं; त्याच्या थोरवीचे हे स्तवन आपल्या आनंदाचा देखील कळस आहे. स्तवन म्हणजें जेव्हां आपण देवाची थोरवी पाहतो व तिचा आस्वाद घेतो तेव्हां त्यांत आपल्याला जो आनंद मिळतो त्यात आपल्याला मिळणारी संतुष्टी

म्हणून, आपल्याकडून त्याचे स्तवन व्हावे हा देवाचा शोधाशोध आणि त्यांत आनंद मिळवण्याचा आपला शोधाशोध हा शोधाशोध आहे. ख्रिस्तात प्रकट झालेंल्या देवाच्या कृपेच्या गौरवाच्या सुवार्तेचा हा अग्रगण्य परिणाम आहे!

20 August : तुम्हीं ज्या पराक्रमी मनुष्याला शोधत आहात तो येशू आहे

Alethia4India
Alethia4India
20 August : तुम्हीं ज्या पराक्रमी मनुष्याला शोधत आहात तो येशू आहे
Loading
/

“स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेंला आहे. तेव्हा तुम्हीं जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काहीं मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय 28:18-20)

मत्तयाचा शेवटचा अध्याय ही ती खिडकीं आहे जी मरणांतून उठलेला ख्रिस्त ह्याच्या गौरवी सूर्योदयाच्या दिशेने उघडते. त्या खिडकींतून तुम्हीं ख्रिस्ताच्या चारित्र्याच्या पर्वतरांगेत अणकुचीदार असलेले किमान तीन असे भव्य शिखरे पाहू शकता : त्याच्या सामर्थ्याचा शिखर; त्याच्या दयेचा शिखर; आणि त्याचा संकल्प-सिद्धीचा शिखर.

सर्व अधिकार त्याला दिलेंला आहे – त्याची इच्छा पूर्ण करण्याचा सर्व अधिकार व सामर्थ्य. आणि या सामर्थ्याचा उपयोग तो सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य बनवण्याचा आपला खंबीर उद्देश साध्य करून घेण्यासाठीं करतो. हे करत असतांना, तो आपल्या प्रत्येकावर वैयक्तिकरित्या दया करतो, ती अशी कीं, युगाच्या समाप्तीपर्यंत तो सर्व दिवस आमच्याबरोबर आहे असे तो आपल्याला अभिवचन देतो.

आपण सर्वांना आपल्या अंतःकरणात हे ठाऊक आहे कीं मरणांतून उठलेला ख्रिस्त हा आपण त्याच्या पराक्रमाचे कौतुक करावें  ही आमची अभिलाषा जर पूर्ण करणार असेल तर ह्या सर्व गोष्टीं अशाच असणें अगत्याचे आहे. सामर्थ्याने पराक्रमी. दयाळूपणामघ्ये पराक्रमी. आपला संकल्प सिद्धींस नेण्यांत पराक्रमी.

जे लोक त्यांचे संकल्प पूर्ण करण्याच्या बाबतींत अत्यंत दुर्बळ असतांत, ते पराक्रमाचे कौतुक करण्याची आमची अभिलाषा पूर्ण करू शकत नाहींत. ज्यांच्या जीवनात कोणतेही उद्दिष्ट नाहीं अशा लोकांचे कौतुक आपण कदाचितच करतो. आणि ज्यांचे संकल्प केवळ स्वार्थी आणि निर्दयी आहेत त्यांचे कौतुक करणें तर अशक्यच.

आपल्याला एखाद्या अशा पुरुषाला पाहण्याची आणि जाणून घेण्याची अभिलाषा असते ज्याचे सामर्थ्य अमर्याद, ज्याची दया सौम्य आणि ज्याचा संकल्प शुद्ध आणि निश्चयी असा आहे.

कादंबरीकार आणि कवी व चित्रपट निर्माते आणि विविध विषयाचे लेखक अधूनमधून अशा पराक्रमी व्यक्तीचे चित्र आपल्यापुढे रेखाटत असतांत. परंतु अशा मनुष्याची उपासना करण्याइतपत माझी जी तळमळ आहे ती ते भरून काढू शकत नाहींत.

आपल्याला काहींतरी असे आवश्यक असते जें वास्तविक आहे. आपल्याला सर्व सामर्थ्य आणि दया आणि संकल्प साध्य करण्याचे अस्सल मूळ पाहण्याची तळमळ असते. यास्तव आपण मरणातून उठलेला ख्रिस्त ह्याच्याकडें पहावें आणि त्याची उपासना करावीं.

19August : आमच्या बाबतींत पुनरुत्थान म्हणजें काय

Alethia4India
Alethia4India
19August : आमच्या बाबतींत पुनरुत्थान म्हणजें काय
Loading
/

कीं, येशू प्रभू आहे असे जर ‘तू आपल्या मुखाने’ कबूल करशील आणि देवानें त्याला मेलेल्यांतून उठवले असा ‘आपल्या अंत:करणात’ विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. (रोमकरांस 10:9)

“देवानें त्याला मेलेल्यांतून उठवले असा ‘आपल्या अंत:करणात’ विश्वास ठेवशील” म्हणजें काय? देवानें येशूला मेलेल्यांतून उठवले असा विश्वास सैतान देखील ठेवतो. त्यानें ते घडताना पाहिले आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठीं, आपल्याला देवाच्या लोकांच्या बाबतींत पुनरुत्थानाचा अर्थ काय आहे यावर विचार करावा लागेल.

पुनरुत्थान म्हणजें देव आपल्या पक्षाचा झाला आहे. स्वतःला आमच्या जवळ आणावे हांच त्याचा मुख्य हेतू. आपल्या सर्व परित्यक्तपणाच्या आणि परकेपणाच्या भावनांवर मात करणें हे त्याचे ध्येय आहे.

येशूचे पुनरुत्थान हे इस्रायलापुढे आणि जगापुढे देवानें केलेंलीं अशी घोषणा आहे कीं आपण आपल्या कर्मांनी गौरवांत प्रवेश करू शकत नाहीं, म्हणून जिथें जाणें आपल्यासाठीं अशक्य आहे तिथें आपल्याला पोहोचवण्यासाठीं आवश्यक असलेली अशक्य गोष्ट त्यानें स्वतःच करावी असा त्याचा संकल्प आहे.

पुनरुत्थान हे देवानें याविषयी दिलेंले अभिवचन आहे कीं जें येशूवर विश्वास ठेवतांत त्यां सर्वांना देवाचे सामर्थ्य दिलें जाईल जेणेंकरून त्यांनी नीतिमत्वाच्या मार्गावर चालण्यास आणि मृत्यूच्या दरीतूनहि सुरक्षित निघण्यांस समर्थ व्हावें.

म्हणून, देवानें येशूला मेलेल्यांतून उठवले असा ‘आपल्या अंत:करणात’ विश्वास ठेवणें ही गोष्ट केवळ घडलेल्या वस्तुस्थितीला मान्य करण्यापर्यंत मर्यादित नाहीं. याचा अर्थ असा विश्वास ठेवणें आहे कीं देव तुमच्या बाजूने आहे, कीं त्याचे तुमच्यासोबत घनिष्ठ नाते जुळले आहे, कीं तो तुमच्या जीवनांत बदल घडवून आणत आहे आणि शेवटी तो तुम्हांला सार्वकालिक जीवनाचा आनंद मिळावा म्हणून तुम्हांला तारेल.

पुनरुत्थानावर विश्वास ठेवणें म्हणजें त्यानें जीवन, आणि आशा आणि नीतिमत्व यांविषयी जी जी अभिवचने दिलींत त्यांवर जशाचा तसा विश्वास ठेवणें.

याचा अर्थ देवाच्या सामर्थ्यावर आणि त्यानें आपल्यावर केलेंल्या प्रीतिवर इतका विश्वास ठेवणें कीं ऐहिक लाभाचा मोह असो वा ऐहिक नुकसानाची भीती, यांपैकीं कोणतीही गोष्ट आपल्याला त्याच्या इच्छेविरुद्ध बंड करण्यांस प्रवृत्त करणार नाहीं.

सैतानाचा विश्वास आणि पवित्र जनांचा विश्वास यांत हाच फरक आहे. हे देवा, आम्हीं तुझ्यावर प्रीति करावी आणि तुझा पुत्र ख्रिस्त येशू ह्याच्या पुनरुत्थानात विश्रांती घ्यावी म्हणून तू आमच्या अंतःकरणाची सुंता कर (अनुवाद 30:6).

18 August : कठीण आज्ञां पाळण्याची आशा धरा

Alethia4India
Alethia4India
18 August : कठीण आज्ञां पाळण्याची आशा धरा
Loading
/

“जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल. . . त्यानें वाइटाकडें पाठ फिरवून बरे ते करावे.” (1 पेत्र 3:10-11)

आपण येशूच्या आज्ञा का पाळत नाहीं याचे एकच मूळ कारण आहे : ते म्हणजें हे कीं आज्ञा न मानण्यापेक्षा आज्ञा पाळल्याने आम्हांला अधिक आशीर्वाद प्राप्त होईल यावर आपला मनापासून विश्वास नसतो. आपण देवाच्या अभिवचनावर पूर्ण आशा ठेवीत जगत नाहीं.

पेत्र येथें कोणते अभिवचन नमूद करतो? येशूनें जे शिक्षण दिलें, पेत्र ते पुढीलप्रमाणें आपल्याला सोपवितो :

वाइटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका; तर उलट आशीर्वाद द्या; कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठीं तुम्हांला पाचारण करण्यात आलें आहे. कारण,“जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल….त्यानें वाइटाकडें पाठ फिरवून बरे ते करावे. त्यानें शांतीच्या प्राप्तीसाठीं झटावे व तिचा मार्ग धरावा.” (1 पेत्र 3:9-11)

पेत्र, जो येशूचे अनुकरण करत होता, त्यानें आम्हांला कठीण आज्ञां पाळण्यास — जसे कीं वाइटाबद्दल वाईट असे करू नका —प्रवृत्त करण्यास कसलीही लाज धरली नाहीं, आणि त्याबरोबर त्यानें एका मोठ्या हर्षाचे अभिवचनही दिलें. “निंदेबद्दल निंदा असे करू नका, जेणेंकरून तुम्हांला आशीर्वाद प्राप्त व्हावा!” तुम्हांला येणार्‍या युगात सार्वकालिक जीवनाचा आनंद घ्यायचा आहे का? तर वाइटाकडें पाठ फिरवून बरे ते करा! तुमच्यासाठीं युगानुयुगाचा आनंद राखून ठेविलेला आहे! तर मग आता सूड घेण्यांत जो आनंद मिळतो त्यापेक्षा ते प्रतिफळ जर आपण सूड घेणें टाळते तर, अधिक मोठे नाहीं का?

येशूची आज्ञा मोडण्याऐवजी जर तुम्हीं त्याची आज्ञा पाळता तर तुमचे नेहमी कल्याणच होईल, मग त्या आज्ञापालनामुळें तुम्हांला तुमचा जीवहि गमवावा लागला तरी योग्यच. येशूनें म्हटलें,

मी तुम्हांला खचीत सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता व सुवार्तेकरता घर-दार, बहीण-भाऊ, आई-बाप, मुले-बाळे किंवा शेती-वाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकींबरोबर शंभरपटीने….येणार्‍या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाहीं. (मार्क 10:29-30)

प्रीतिचे मौल्यवान अर्पण देऊन ख्रिस्ताचे अनुकरण करण्यासाठीं लागणारे सामर्थ्य मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजें आपण दृढ विश्वासाने ही आशा बाळगावी कीं, जर आपण त्याचे आज्ञापालन करतांना आपला जीवही गमावला, तरी आपण तो पुन्हा मिळवू आणि सर्वकाळासाठीं गौरवाच्या प्रतिफळाची कापणी करूं.

17 August : परमेश्वराचा धन्यवाद करणें म्हणजें काय

Alethia4India
Alethia4India
17 August : परमेश्वराचा धन्यवाद करणें म्हणजें काय
Loading
/

माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. (स्तोत्र 103:1)

या स्तोत्राच्या सुरुवातीला आणि शेवटी स्तोत्रकर्ता त्याच्या जिवाला आव्हानात्मक उपदेश देऊन परमेश्वराचा धन्यवाद करण्यास सांगतो— “हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर” — शिवाय, तो देवदूतांना आणि स्वर्गातील सैन्यांना आणि देवाच्या सर्व हस्तकृतींना देखील तेच करण्याचे आव्हान करतो.

अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्हीं बलसंपन्न आहात,

आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणें चालता

ते तुम्हीं त्याचा धन्यवाद करा.

अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो,

जे तुम्हीं त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता,

ती तुम्हीं त्याचा धन्यवाद करा.

परमेश्वराच्या सर्व कृत्यांनो,

त्याच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणी त्याचा धन्यवाद करा;

हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर! (स्तोत्र 103:20-22)

या स्तोत्राचा मुख्य विषय परमेश्वराचा धन्यवाद करण्यावर केंद्रित आहे. परमेश्वराचा धन्यवाद करणें म्हणजें काय?

याचा अर्थ त्याची महानता व चांगुलपण यांविषयी प्रशंसनीय शब्द बोलणें – आणि खरं तर त्याचा अर्थ म्हणजें ती प्रशंसा आपल्या जीवाने व अंतर्यामाने करणें.

दावीद या स्तोत्राच्या पहिल्या आणि शेवटच्या वचनांमध्यें जेव्हां असें म्हणतो, “हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर,” तेव्हां तो असे म्हणत आहे कीं देवाचे चांगुलपण आणि त्याची महानता यांविषयी प्रामाणिकपणाचे शब्द हें आत्म्याच्या खोलीतून आलें पाहिजे.

जीव व अंतर्याम यांवाचून मुखाने परमेश्वराचा धन्यवाद करणें हे ढोंगीपणाचे ठरेल. येशूनें म्हटलें, “हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतांत. पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.” (मत्तय 15:8). ही गोष्ट किती भयप्रद आहे याची दाविदाला जाणीव आहे, म्हणून तो स्वतःलाच आव्हानात्मक उपदेश करतो. तो आपल्या जिवाला सांगत आहे कीं त्यानें असले ढोंग करू नये.

“हे माझ्या जिवा, ये आणि देवाचे वैभव व त्याचे चांगुलपण पाहा. माझ्या मुखाबरोबर स्वर-सांगड घाल म्हणजें आपण आपल्या संपूर्ण व्यक्तित्वाने परमेश्वराचा धन्यवाद करूं. हे माझ्या जिवा, आपण ढोंगीपणा करणार नाहीं!”

16 August : आपण लैंगिक पापात का पडतो

Alethia4India
Alethia4India
16 August : आपण लैंगिक पापात का पडतो
Loading
/

आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे; म्हणजें तू मोडलेली माझी हाडे उल्लासतील. . . . तू केलेंल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. (स्तोत्र 51:8, 12)

दावीद त्याला लैंगिक दुराचारी प्रवृत्तीवर शक्ती मिळावी असा धावा का करत नाहीं? लोकांनी आपल्याला जाब विचारावा अशी तो लोकांकडें जाऊन मागणी का करत नाहीं? स्त्रीकडें वासनेने पाहण्यापासून देवानें त्याच्या डोळ्यांचे रक्षण करावें व त्याला वासना-मुक्त असे विचार द्यावेंत अशी प्रार्थना तो का करत नाहीं? खरे पाहता, बेथशेबेवर जणू बलात्कारच केल्यानंतर त्यानें पापाचा अंगीकार आणि पश्चात्तापाचे हे जे स्तोत्र लिहिलें, त्यांत दाविदाने अशीच काहींतरी विनवणी करायला पाहिजे होती अशी तुम्हीं अपेक्षा करत असाल.

याचे कारण असे कीं लैंगिक पाप हे एक लक्षण आहे, रोग नाहीं, हे त्याला ठाऊक आहे.

लोक लैंगिक पापं करतांत कारण त्यांना ख्रिस्तामध्यें आनंद व हर्षाची पूर्णता प्राप्त झालेंलीं नसते. त्यांची अंत:करणें स्थिर, खंबीर, आणि घट्ट पायावर उभारलेली नाहींत. ते अडखळतांत. परीक्षा आली कीं ते लगेच पापांत पडतांत कारण त्यांच्या भावना आणि विचार यांमध्यें देवाला ते सर्वोच्च स्थान नाहीं जे त्यांनी त्याला द्यायला पाहिजे.

दावीद हे स्वतःविषयी जाणून होता. आमच्याबाबतही ते खरे आहे. म्हणून दावीद जी विषयवस्तू घेऊन प्रार्थना करतो त्याद्वारे तो आम्हांला दाखवून देत आहे कीं, जे लोग लैंगिक पापांत पडतांत त्यांना खरी गरज कशाची आहे: देवाची! देवामध्यें असलेला आनंद व हर्ष.

हे शहाणपण आपल्यासाठीं अफाट आहे.

15 August : आम्हांला मुळांत कोणत्या उद्देश्याने बनविले होते

Alethia4India
Alethia4India
15 August : आम्हांला मुळांत कोणत्या उद्देश्याने बनविले होते
Loading
/

कारण, आपल्याला देवाकडें आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठीं, नीतिमान अनीतिमान लोकांसाठीं, एकदा मरण पावला. (1 पेत्र 3:18)

सुवार्तेची- म्हणजें शुभवर्तमानाची –  सर्वात मोठ्या आनंदाची बाजू म्हणजें स्वतः देवाबरोबर सहभागीतेचा आनंद घेणें. ही सत्य येथे 1 पेत्र 3:18 मध्यें “आपल्याला देवाकडें आणण्यास” या वाक्यात अगदी स्पष्ट शब्दांत मांडलेले आहे. ख्रिस्त यासाठींच मरण पावला.

सुवार्तेत असलेली इतर सर्व दानें हा आनंद साध्य केला जावा म्हणूनच आहेत.

  • आपल्या अपराधांची क्षमा झाली आहे, कीं यापुढे आपलें अपराध आपल्याला देवापासून दूर नेणार नाहींत.
  • आपण नीतिमान ठरविलेले गेलें आहोंत, कीं यापुढे दंडाज्ञा आपल्याला देवापासून दूर करणार नाहींत.
  • ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताद्वारे देवाचा कोप दूर केला गेला, कीं यापुढे आपला पिता झालेंल्या देवाचा कोप त्याच्या आणि आपल्यामध्यें अडखळण नसावा.
  • आम्हांला आता सार्वकालिक जीवन दिलें गेले आहे, व पुनरुत्थान होईल तेव्हा नवीन शरीरे दिली जातील, कीं ज्यामुळें आपण सर्वकाळासाठीं देवाबरोबर राहण्यांस व त्याच्या सहवासाचा आनंद घ्यावयांस पूर्णपणें समर्थ व्हावें.

आपली अंत:करणें चाचपडून पाहा. तुम्हांला तुमच्या पातकांची क्षमा का हवी आहे? का तुम्हांला नीतिमान ठरविले ज्याण्याची गरज आहे? देवाचा कोप शमविला जावा म्हणून प्रायश्चित व्हावे असे तुम्हांला का वाटते? तुम्हांला सार्वकालिक जीवन का हवे आहे? “कारण मला देवाचा आत्ता आणि सर्वकाळासाठीं आनंद घ्यायचा आहे” हे याचे निर्णायक उत्तर आहे का?

देवानें ह्या शुभवर्तमानांत आम्हांला प्रीतिची जी भेट दिली ती भेट स्वतः देव आहे. मुळांत आम्हांला यासाठींच निर्माण केलें गेलें होते. पण आम्हीं आपल्या पापामुळें देवाचा हा सहवास गमाविला होता. ख्रिस्त हेच नाते व सह्भागीता पुन्हा स्थापित करण्यासाठीं आला.

“तुझ्या उपस्थितीत विपुल हर्ष आहे, तुझ्या उजव्या हातांत सुख सर्वकाळ आहेत” (स्तोत्र 16:11).

14 August : देव कश्याप्रकारे पातकांची क्षमा करूनही नीतिमान ठरतो

Alethia4India
Alethia4India
14 August : देव कश्याप्रकारे पातकांची क्षमा करूनही नीतिमान ठरतो
Loading
/

दावीद नाथानाला म्हणाला, “मी परमेश्वराविरुद्ध पातक केलें आहे,” नाथान दाविदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझे पातक दूर केलें आहे; तू मरणार नाहींस. तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिलें आहेस, ह्यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार.” (2 शमुवेल 12:13-14)

जे झालें ते संतापजनक आहे. उरिया मृत झाला आहे. बथशेबेवर बलात्कार झाला आहे. ह्यातून जे बाळ जन्मास आलें तेहि खात्रीने मरणार. तरी नाथान म्हणतो, “परमेश्वराने तुझे पातक दूर केलें आहे.”

बस असेच? दावीदाने व्यभिचार केला. त्यानें हत्येचा आदेश दिला. त्यानें लबाडी केलीं. त्यानें “परमेश्वराची आज्ञा तुच्छ” मानली (2 शमुवेल 12:9). त्यानें परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिलें. तरी “परमेश्वराने [त्याचे] पातक बस असेच सहजपणें दूर केलें”?!

हा देव कोणत्या प्रकारचा नीतिमान न्यायाधीश आहे? तुम्हीं बलात्कार व खून करून व खोटे बोलून असेच निर्दोषपणें सुटून जाऊ शकत नाहीं. कोणी नीतिमान न्यायाधीश असे करणार नाहीं.

पौलासाठीं ही एक मोठी पेंचांत पाडणारी धर्मशास्त्रीय अडचण होती – आज लोक ज्या अडचणींशी झुंज देत आहेत त्यापेक्षा खूपच वेगळी : देव एकाच वेळी अपराध क्षमा करणारा व तरीही नीतिमान असावे हे कसे शक्य आहे? रोमकरांस 3:25-26 मध्यें पौलाने जे म्हटले त्यांत या प्रश्नाचे उत्तर आहे :

त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवानें [ख्रिस्ताला]  पुढे ठेवले. ह्यासाठीं कीं, पूर्वी झालेंल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळें त्यानें आपलें नीतिमत्त्व व्यक्त करावे; म्हणजें आपलें नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे कीं, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणार्‍याला नीतिमान ठरवणारे असावे

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, देव दावीदाच्या पातकाची शुद्ध उपेक्षा करत असल्याचे जे दिसून येते त्यामुळें आपल्याला होणारा मनस्ताप योग्यच आहे जर देव दावीदाचे पाप अगदी सहजपणें गालिच्याखाली दाबून टाकून देत असेल. पण तो तसे करित नाहींये.

देव जेव्हां दावीदाने पाप केलें त्यां काळापासून पुढे भविष्यांत अनेक शतकानंतर त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या मृत्यूकडें पाहतो जेव्हां तो दावीदाच्या जागी मरण सोसणार होता, ज्यामुळें देवाच्या दयेवर असलेला दावीदाचा विश्वास आणि भविष्यात ख्रिस्ताद्वारे देवाचे मुक्तीचे कार्य ह्या दोन्ही गोष्टी दावीद व ख्रिस्त यांमध्यें समेट घडवून आणतांत. आणि ज्याला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे तो देव आपल्या मनांत दावीदाची पापे ही ख्रिस्ताची पापे म्हणून गणतो आणि ख्रिस्ताचे नीतिमत्त्व हे त्याचे नीतिमत्त्व म्हणून गणतो आणि अशाप्रकारे देव ख्रिस्तामुळें सहनशीलतेने दावीदाच्या पापाची न्याय्यत्वाने उपेक्षा करतो.

देवाच्या पुत्राचे मरण मनस्ताप देण्यांस पुरे आहे, आणि त्याद्वारे देवाचा जो गौरव कायम राहतो तोही मर्यादेपलीकडें आहे, म्हणजें असे कीं जेव्हां देव दावीदाला त्याचे व्यभिचाराचे, खून करण्याचे व लबाड बोलण्याचे पातक क्षमा करतो त्यांत तो नीतिमान ठरतो. तसेच, आमच्याही पातकांची क्षमा करण्यांत तो नीतिमान ठरतो.

अशाप्रकारे देव त्याचे परिपूर्ण नीतिमत्व आणि न्याय दोन्हींचे रक्षण करतो आणि त्याच वेळी येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांवर दया करतो, मग त्यांची पातकें कितीही असंख्य असों वा कितीही भयानक असों. अनिर्वचनीय (अकथनीय) सुवार्ता हीच आहे.