21 August : अखंड आनंदी देव

Alethia4India
Alethia4India
21 August : अखंड आनंदी देव
Loading
/

“माझा आनंद तुमच्यामध्यें असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.” (योहान 15:11)

परमेश्वर हा निखालस सार्वभौम आहे.

“आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो” (स्तोत्र 115:3).

त्यामुळें तो कधीही निराश होऊ शकत नाहीं. त्यानें मोशेच्या द्वारे इस्रायलाला ज्या पराक्रमाने सोडविले त्याविषयीच्या विविध रंगांवर तो विचार करतो, तेव्हां त्याला आपल्या कृतींपासून आनंद होतो. त्याच्या आनंदाला खंड पडत नाहीं.

त्याचा आनंद हा मुळांत त्याला स्वतःमध्यें असलेली आत्मसंतुष्टी आहे. सृष्टीची उत्पत्ती करण्यापूर्वी, तो त्याच्या पुत्राच्या व्यक्तीत्वात असलेल्या त्याच्या गौरवाच्या प्रतिमेपासून आंनदी होता– म्हणजें त्याच्या प्रिय पुत्रामध्यें ज्याच्याविषयी तो संतुष्ट होता (मत्तय 3:17). नंतर देवाचा हा आनंद त्यानें सृष्टीची उत्पत्ती केलीं व तारणाचे गौरवी कार्य केलें त्यावेळी सर्व “जगासमोर उघड झाला”.

ह्या कृतींपासून देवाच्या मनाला आनंद होतो कारण ती त्याच्या वैभवाचे प्रतिबिंब आहेंत. आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते (स्तोत्र 19:1). “परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो! परमेश्वराला आपल्या कृतींपासून आनंद होवो!” (स्तोत्र 104:31). तो जें काहीं करतो ते सर्व तो आपलें हे वैभव टिकवून ठेवण्यासाठीं व ते जगासमोर उघड करण्यासाठीं करतो, कारण यापासूनच त्याच्या जिवाला आनंद होतो.

देवाच्या सर्व कृतींचा कळस तारण पावलेलें त्याचे लोक त्याची थोरवी वर्णितांत त्यांत आहे. “त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा; त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा!” (स्तोत्र 150:2). त्याच्या आनंदाचा कळस म्हणजें जेव्हा तो पवित्र केलेंल्या आपल्या सर्व लोकांच्या स्तवनाची ललकारपूर्ण प्रतिध्वनी ऐकतो त्यापासून त्याला होणारा आनंद घेतो. “तो घोड्याच्या बलाने आनंदित होत नाहीं, मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाहीं. जे परमेश्वराचे भय धरतांत, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतांत त्यांच्यावर तो संतुष्ट होतो” (स्तोत्र 147:10-11).

परंतु त्याच्या थोरवीचा प्रतिध्वनी म्हणून जेव्हा देव आपली स्तवने ऐकतो तेव्हां त्यापासून केवळ त्यालाच आनंद होत नाहीं; त्याच्या थोरवीचे हे स्तवन आपल्या आनंदाचा देखील कळस आहे. स्तवन म्हणजें जेव्हां आपण देवाची थोरवी पाहतो व तिचा आस्वाद घेतो तेव्हां त्यांत आपल्याला जो आनंद मिळतो त्यात आपल्याला मिळणारी संतुष्टी

म्हणून, आपल्याकडून त्याचे स्तवन व्हावे हा देवाचा शोधाशोध आणि त्यांत आनंद मिळवण्याचा आपला शोधाशोध हा शोधाशोध आहे. ख्रिस्तात प्रकट झालेंल्या देवाच्या कृपेच्या गौरवाच्या सुवार्तेचा हा अग्रगण्य परिणाम आहे!

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *