दावीद नाथानाला म्हणाला, “मी परमेश्वराविरुद्ध पातक केलें आहे,” नाथान दाविदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझे पातक दूर केलें आहे; तू मरणार नाहींस. तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिलें आहेस, ह्यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार.” (2 शमुवेल 12:13-14)
जे झालें ते संतापजनक आहे. उरिया मृत झाला आहे. बथशेबेवर बलात्कार झाला आहे. ह्यातून जे बाळ जन्मास आलें तेहि खात्रीने मरणार. तरी नाथान म्हणतो, “परमेश्वराने तुझे पातक दूर केलें आहे.”
बस असेच? दावीदाने व्यभिचार केला. त्यानें हत्येचा आदेश दिला. त्यानें लबाडी केलीं. त्यानें “परमेश्वराची आज्ञा तुच्छ” मानली (2 शमुवेल 12:9). त्यानें परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिलें. तरी “परमेश्वराने [त्याचे] पातक बस असेच सहजपणें दूर केलें”?!
हा देव कोणत्या प्रकारचा नीतिमान न्यायाधीश आहे? तुम्हीं बलात्कार व खून करून व खोटे बोलून असेच निर्दोषपणें सुटून जाऊ शकत नाहीं. कोणी नीतिमान न्यायाधीश असे करणार नाहीं.
पौलासाठीं ही एक मोठी पेंचांत पाडणारी धर्मशास्त्रीय अडचण होती – आज लोक ज्या अडचणींशी झुंज देत आहेत त्यापेक्षा खूपच वेगळी : देव एकाच वेळी अपराध क्षमा करणारा व तरीही नीतिमान असावे हे कसे शक्य आहे? रोमकरांस 3:25-26 मध्यें पौलाने जे म्हटले त्यांत या प्रश्नाचे उत्तर आहे :
त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवानें [ख्रिस्ताला] पुढे ठेवले. ह्यासाठीं कीं, पूर्वी झालेंल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळें त्यानें आपलें नीतिमत्त्व व्यक्त करावे; म्हणजें आपलें नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे कीं, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणार्याला नीतिमान ठरवणारे असावे
दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, देव दावीदाच्या पातकाची शुद्ध उपेक्षा करत असल्याचे जे दिसून येते त्यामुळें आपल्याला होणारा मनस्ताप योग्यच आहे जर देव दावीदाचे पाप अगदी सहजपणें गालिच्याखाली दाबून टाकून देत असेल. पण तो तसे करित नाहींये.
देव जेव्हां दावीदाने पाप केलें त्यां काळापासून पुढे भविष्यांत अनेक शतकानंतर त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या मृत्यूकडें पाहतो जेव्हां तो दावीदाच्या जागी मरण सोसणार होता, ज्यामुळें देवाच्या दयेवर असलेला दावीदाचा विश्वास आणि भविष्यात ख्रिस्ताद्वारे देवाचे मुक्तीचे कार्य ह्या दोन्ही गोष्टी दावीद व ख्रिस्त यांमध्यें समेट घडवून आणतांत. आणि ज्याला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे तो देव आपल्या मनांत दावीदाची पापे ही ख्रिस्ताची पापे म्हणून गणतो आणि ख्रिस्ताचे नीतिमत्त्व हे त्याचे नीतिमत्त्व म्हणून गणतो आणि अशाप्रकारे देव ख्रिस्तामुळें सहनशीलतेने दावीदाच्या पापाची न्याय्यत्वाने उपेक्षा करतो.
देवाच्या पुत्राचे मरण मनस्ताप देण्यांस पुरे आहे, आणि त्याद्वारे देवाचा जो गौरव कायम राहतो तोही मर्यादेपलीकडें आहे, म्हणजें असे कीं जेव्हां देव दावीदाला त्याचे व्यभिचाराचे, खून करण्याचे व लबाड बोलण्याचे पातक क्षमा करतो त्यांत तो नीतिमान ठरतो. तसेच, आमच्याही पातकांची क्षमा करण्यांत तो नीतिमान ठरतो.
अशाप्रकारे देव त्याचे परिपूर्ण नीतिमत्व आणि न्याय दोन्हींचे रक्षण करतो आणि त्याच वेळी येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांवर दया करतो, मग त्यांची पातकें कितीही असंख्य असों वा कितीही भयानक असों. अनिर्वचनीय (अकथनीय) सुवार्ता हीच आहे.