15 August : आम्हांला मुळांत कोणत्या उद्देश्याने बनविले होते

Alethia4India
Alethia4India
15 August : आम्हांला मुळांत कोणत्या उद्देश्याने बनविले होते
Loading
/

कारण, आपल्याला देवाकडें आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठीं, नीतिमान अनीतिमान लोकांसाठीं, एकदा मरण पावला. (1 पेत्र 3:18)

सुवार्तेची- म्हणजें शुभवर्तमानाची –  सर्वात मोठ्या आनंदाची बाजू म्हणजें स्वतः देवाबरोबर सहभागीतेचा आनंद घेणें. ही सत्य येथे 1 पेत्र 3:18 मध्यें “आपल्याला देवाकडें आणण्यास” या वाक्यात अगदी स्पष्ट शब्दांत मांडलेले आहे. ख्रिस्त यासाठींच मरण पावला.

सुवार्तेत असलेली इतर सर्व दानें हा आनंद साध्य केला जावा म्हणूनच आहेत.

  • आपल्या अपराधांची क्षमा झाली आहे, कीं यापुढे आपलें अपराध आपल्याला देवापासून दूर नेणार नाहींत.
  • आपण नीतिमान ठरविलेले गेलें आहोंत, कीं यापुढे दंडाज्ञा आपल्याला देवापासून दूर करणार नाहींत.
  • ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताद्वारे देवाचा कोप दूर केला गेला, कीं यापुढे आपला पिता झालेंल्या देवाचा कोप त्याच्या आणि आपल्यामध्यें अडखळण नसावा.
  • आम्हांला आता सार्वकालिक जीवन दिलें गेले आहे, व पुनरुत्थान होईल तेव्हा नवीन शरीरे दिली जातील, कीं ज्यामुळें आपण सर्वकाळासाठीं देवाबरोबर राहण्यांस व त्याच्या सहवासाचा आनंद घ्यावयांस पूर्णपणें समर्थ व्हावें.

आपली अंत:करणें चाचपडून पाहा. तुम्हांला तुमच्या पातकांची क्षमा का हवी आहे? का तुम्हांला नीतिमान ठरविले ज्याण्याची गरज आहे? देवाचा कोप शमविला जावा म्हणून प्रायश्चित व्हावे असे तुम्हांला का वाटते? तुम्हांला सार्वकालिक जीवन का हवे आहे? “कारण मला देवाचा आत्ता आणि सर्वकाळासाठीं आनंद घ्यायचा आहे” हे याचे निर्णायक उत्तर आहे का?

देवानें ह्या शुभवर्तमानांत आम्हांला प्रीतिची जी भेट दिली ती भेट स्वतः देव आहे. मुळांत आम्हांला यासाठींच निर्माण केलें गेलें होते. पण आम्हीं आपल्या पापामुळें देवाचा हा सहवास गमाविला होता. ख्रिस्त हेच नाते व सह्भागीता पुन्हा स्थापित करण्यासाठीं आला.

“तुझ्या उपस्थितीत विपुल हर्ष आहे, तुझ्या उजव्या हातांत सुख सर्वकाळ आहेत” (स्तोत्र 16:11).

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *