ArchivesSolid Joys

11 December : येशू का आला

Alethia4India
Alethia4India
11 December : येशू का आला
Loading
/

ज्या अर्थी ‘मुलें’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला मरणानें शून्यवत करावे, आणि जें मरणाच्या भयानें आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. (इब्रीलोकांस 2:14-15)

मला असं वाटतं, कीं हा शास्त्रपाठ नाताळाच्या आगमनाविषयी माझा आवडता शास्त्रपाठ आहे कारण असा दुसरा कोणताही शास्त्रपाठ मला माहीत नाहीं जो येशूच्या पृथ्वीवरील जीवनाचा आरंभ आणि शेवट – म्हणजें त्याचे देहधारण आणि वधस्तंभावरील मरण- यांच्यातील संबंध स्पष्टपणें व्यक्त करत असेल. ही दोन वचनें येशूच्या येण्यामागचा हेतू अगदी स्पष्ट करतांत; म्हणजें, त्यानें मरण सोसावे यासाठीं. नाताळाविषयीं तुमचा ख्रिस्ती दृष्टिकोन काय आहे हे तुम्हीं तुमच्या एखाद्या ख्रिस्तीतर मित्राला किंवा अजूनही तारण न पावलेल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला टप्प्याटप्प्यानें समजावून सांगण्यासाठी ह्या वचनांचा उपयोग करणें उत्तम ठरेल. तुम्हीं  टप्प्याटप्प्यानें समजावून सांगण्यासाठी एका वेळी एक वाक्यखंड घेऊन खालील पद्धतीचा उपयोग करूं शकतां :   

“ज्या अर्थी ‘मुलें’ एकाच रक्तमांसाची होती. . . “

“मुलें” हा शब्द मागील वचनातून प्रयुक्त केला गेला आहे आणि तो शब्द मशीहा म्हटलेंल्या ख्रिस्ताच्या आध्यात्मिक मुलांकडें संकेत करतो (यशया 8:18; 53:10 पहा). ही “देवाची मुलें” देखील आहेत (योहान 1:12). दुसऱ्या शब्दांत, देवानें ख्रिस्ताला पाठवलें ते विशेषत: आपल्या “मुलांचे” तारण व्हावें म्हणून.

हे खरे आहे कीं “देवानें जगावर अशी प्रीति केलीं कीं त्यानें आपला एकुलता एक पुत्र [येशू] दिला” (योहान 3:16). परंतु हे देखील खरे आहे कीं देव विशेषतः “देवाच्या पांगलेल्या मुलांनाहीं जमवून एकत्र” करित होता (योहान 11:52).आपण ख्रिस्ताला जगासाठीं अर्पण करावें आणि आपल्या “मुलांचे” तारण साध्य करून घेणें हा त्यामागे देवाचा हेतू होता (पहा 1 तीमथ्य 4:10). तुम्हीं ख्रिस्तावर विश्वास ठेऊन देवाची दत्तक-मुलें बनूं शकता (योहान 1:12).

” . . त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. . “

याचा अर्थ असा कीं ख्रिस्त देही झाला त्यापूर्वीहि तो होता. तो आत्मा होता. तो सनातन शब्द होता. तो देवासह होता आणि देव होता (योहान 1:1; कलस्सैकर 2:9). पण तो रक्तमांसाचा झाला आणि आपल्या देवपणावर मानवस्वरूपाचे आच्छादन घातलें. तो पूर्ण मनुष्य बनला आणि त्याचवेळी पूर्णतः देवहि होता. हे वेगवेगळ्या कारणांनी महान गुड आहे. ते आपल्या विश्वासाचे— आणि बायबल जे जे शिक्षण देते त्याचे –मूळ आहे.

” . . मरणानें. . . “

तो मानव बनला, हेतू हा कीं आपण मरावे. देव शुद्ध आणि अखंड असल्यानें तो पापी लोकांसाठीं मरू शकत नाहीं. पण माणूस म्हणून तो ते मरण पत्करू शकला. मरण हेच त्याचे ध्येय होते. त्यामुळें त्याला मानव म्हणून जन्म घ्यावा लागला. तो मरण्यासाठीं जन्माला आला होता. गुड फ्रायडे हा नाताळाचा उद्देश होय. नाताळ म्हणजें काय आज बहुतेक लोकांना हेच ऐकण्याची गरज आहे.

” . . कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला मरणानें शून्यवत करावे. . . “

आपल्यां मरणाने, ख्रिस्तानें सैतानाला शून्यवत केलें, म्हणजें त्याचे विषारी दांत पाडलें. कसे? आमची सर्व पापें झाकून. याचा अर्थ असा कीं सैतानाकडें देवासमोर आपल्यावर आरोप लावण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नाहीं. “देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे” (रोमकरांस 8:33) — तो कोणत्या आधारावर नीतिमान ठरवतो? येशूच्या रक्तानें (रोमकरांस 5:9).

सैतानाचे अंतिम शस्त्र जे तो आपल्याविरुद्ध उपयोगांत आणतो ते आपलें स्वतःचे पाप आहे. जर येशूच्या मृत्यूनें ते काढून घेतलें तर, सैतानाचे मुख्य शस्त्र – त्याच्याकडें असलेलें एक नश्वर शस्त्र – त्याच्या हातातून काढून घेतलें जाते. आम्हांला मरण-दंड व्हावा असा अभियोग तो आता आमच्या विरुद्ध आणू शकत नाहीं, कारण नीतिमान ठरविणारा जो न्यायाधीश त्यानें आपल्या पुत्राच्या मरणाने  आमची निर्दोष मुक्तता केलीं आहे!

” . . आणि जें मरणाच्या भयानें आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे.”

म्हणून आता आपण मरणाच्या भयापासून मुक्त आहों. देवानें आपल्याला नीतिमान ठरवलें आहे. सैतान देवाचा हा राजादेश मोडू शकत नाहीं. आणि देवाचा हेतू असा आहे कीं आपला हा राजादेश आपल्या अंतिम सुरक्षेतेसाठीं आपल्या जीवनात त्वरित अमलांत यावा. त्याचा ह्यामागील हेतू हा कीं शेवट हा हर्षनादाने व्हावा म्हणून संप्रतकाळात असलेल्या दास्याचे बंधन आणि भय हे आमच्यातून काढून टाकावें.

जर आपल्याला आपला शेवटचा आणि सर्वात मोठा शत्रू, म्हणजें मृत्यूची भीती बाळगण्याची गरज नाहीं, तर आपल्याला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाहीं. आपण मुक्त होऊ शकतो. हर्षनाद करण्यासाठीं मुक्त. आणि हा हर्ष इतरांसाठीं देखील फुकट आहे.

देवाकडून आम्हांला मिळालेली नाताळाची ही किती अप्रतिम भेट आहे! आणि आम्हांकडून जगाला!

10 December : सोने, ऊद, आणि गंधरस

Alethia4India
Alethia4India
10 December : सोने, ऊद, आणि गंधरस
Loading
/

तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला; नंतर ते त्या घरात गेलें तेव्हां तो बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केलें. मग आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून ‘सोने, ऊद व गंधरस’ ही ‘दाने’ त्याला अर्पण केली. (मत्तय 2:10-11)

देवाला काही उणें आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडत नाहीं (प्रे. कृत्ये 17:25). मागीं लोकांनी आणलेली दानें ही त्याची काहीं मदत व्हावी किंवा त्याची एखादी गरज पुरवावी म्हणून देण्यात आली नाहींत. जर विदेशी पाहुणें राज-घराण्यासाठीं मदत म्हणून दान घेऊन जर येत असतील तर यापेक्षा अधिक अनादर एखाद्या सम्राटाचा होऊ शकत नाहीं.

ही दानें लाच स्वरूपांत देखील नव्हती. अनुवाद 10:17 म्हणते कीं देव लाच घेत नाहीं. तर मग, त्यांचा अर्थ काय? त्यांचे स्वरूप उपासना कसे काय आहे?

श्रीमंत आणि स्वतःमध्यें समर्थ अशा लोकांस दिलेंली दानें किंवा बक्षिसे देणाऱ्याच्या इच्छेचे प्रतिध्वनी आणि रंजक आहेत, ज्यामुळें घेणारा हा किती महत्वाचा व्यक्ती आहे हे दाखविलें जाते. एका अर्थाने, ख्रिस्ताला दानें देणें उपवास करण्यासारखे आहे – एखाद्या वस्तुवाचून राहणें, हे दाखविण्यासाठीं कीं तुम्हीं ज्या गोष्टीचा त्याग करीत आहात त्यापेक्षा ख्रिस्त अधिक मौल्यवान आहे.

जेव्हां तुम्हीं ख्रिस्ताला या प्रकारे दानें देता, ते असे म्हणण्याची एक पद्धत आहे कीं, “मला ह्यामुळें तो अतिशय आनंद प्राप्त होतो ज्याच्या मी शोधांत असतो” (मत्तय 2:10 कडें लक्ष द्या! “तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला”) – ज्या आनंदाचा मी शोध घेतो तो तुमच्याशी विनिमय करण्याद्वारे अथवा एखाद्या रकमेविषयी वाटाघाटी करण्याद्वारे श्रीमंत होण्याची आशा नव्हे. मी वस्तूंसाठीं तुमच्याकडें आलो नाहीं, परंतु स्वतः तुमच्यासाठीं आलो आहे. आणि आता मी वस्तूंचा त्याग करण्याद्वारे, वस्तूंचा नव्हे तर तुझा आणखी आनंद घेण्याद्वारे आता मी ही इच्छा प्रगट करतो आणि तीव्र करतो. ज्याची तुला गरज नाहीं, आणि ज्याचा मी आनंद घेऊ शकतो ते तुला देण्याद्वारे, मी आणखी आग्रहाने आणि आणखी खरेपणाने म्हणत आहे, “माझी संपत्ती या वस्तू नाहीं, तू आहेस,.”

मला असे वाटते कीं सोने आणि ऊद आणि गंधरस यांची दाने देऊन देवाची उपासना करण्याचा हाच अर्थ आहे. किंवा ते सर्व जें आम्हीं देवाला देण्याचा निर्धार करतो.

देव आमच्या ठायीं प्रत्यक्षात ख्रिस्तासाठीं एक इच्छा उत्पन्न करो. आपण अंतःकरणापासून म्हणावे, “प्रभु येशू, तू इस्राएलचा राजा ख्रिस्त आहेस. सर्व राष्ट्रे येऊन तुजपुढे नमन करतील. जगाने तुझी उपासना याची खात्री करून घेण्यासाठीं देव ह्या जगाला चालना देतो. म्हणून, मला जो विरोध आढळून येतो, त्यांत मी आनंदाने तुला सर्व अधिकार व प्रतिष्ठेचे श्रेय देतो, आणि माझी दानें घेऊन अंगीकार करितो कीं माझ्या अंतःकरणाची तहान केवळ तूच तृप्तकरू शकतोस, या दानांना बिलगून राहण्याने नाहीं.

9 December : येशूचे दोन प्रकारचे विरोध

Alethia4India
Alethia4India
9 December : येशूचे दोन प्रकारचे विरोध
Loading
/

“हेरोद राजाने हे ऐकले तेव्हां तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेलें;” (मत्तय 2:3)

जे लोक येशूची उपासना करू इच्छित नाहीं त्यांच्यासाठीं तो भीतीदायक आहे, आणि जे त्याची उपासना करतात त्यांच्यासाठीं तो विरोधकांना चीथावतो. शक्यतः मत्तयाच्या मनात हा मुख्य मुद्दा नसावा, पण जस-जशी गोष्ट पुढे वाढत जाते, हे एक अटळ तात्पर्य म्हणून प्रकट होते.

या गोष्टीत, दोन प्रकारचे लोक आहे ज्यांना येशूची उपासना करावयाची नाहीं.

पहिला प्रकार, ते लोक आहेंत ज्यांना येशूबरोबर कांहींहि देणेंघेणें नसते. तो त्यांच्या जीवनात अस्तित्वच ठेवत नाहीं. या गटाचे प्रतिनिधित्व येशूच्या जीवनाच्या सुरूवातीला मुख्य याजक आणि शास्त्री लोकांद्वारे करण्यात आले आहे. मत्तय 2:4 म्हणते, “आणि त्यानें प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले कीं, ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे?” आणि त्यांनी सांगितलें, बस इतकेच : आणि नेहमीप्रमाणें ते आपल्या दिनचर्येवर परत गेलें. या पुढार्यांची भयाण शांती आणि औदासिन्यपणा जे काही घडत होते त्या मानानें धक्कादायक आहे.

आणि पाहा,“हेरोद राजाने हे ऐकले तेव्हां तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेलें.” दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ही अफवा पसरली होती कीं कोणालातरी वाटते कीं ख्रिस्ताचा, म्हणजें मशीहाचा जन्म झाला आहे. पण मुख्य याजकांचे कांहींच न करणें मात्र आश्चर्यचकित करणारे आहे. ते मागी लोकांबरोबर का गेलें नाहीं? त्यांना कांहीं स्वारस्य नव्हतें. देवाच्या पुत्राचा शोध घेऊन आपण  त्याची उपासना करावीं याविषयी त्यांना उत्साह नाहीं.

दुसऱ्या प्रकारचे लोक जे येशूची उपासना करू इच्छित नाहींत ते अशाप्रकारचे लोक आहेत ज्यांना त्याची खूप भिती वाटते. या गोष्टीत असा मनुष्य म्हणजें हेरोद. तो खरोखर घाबरला आहे, इतका कीं तो कारस्थान रचतो आणि खोटे बोलतो आणि मग येशूपासून मुक्त होण्यासाठीं जनसामान्यांचा खून करतो.

म्हणून हे दोन प्रकारचे विरोध ख्रिस्ताविरुद्ध आणि त्याच्या उपासकाविरुद्ध उद्भवतील : दुर्लक्ष्य करणारे आणि शत्रूत्व ठेवणारे. मला निश्चितच आशा आहे कीं तुम्हीं त्यापैकीं एकाही गटांत नाहीं.

आणि जर तुम्हीं ख्रिस्ती असाल, तर नाताळाचा हा हंगाम तुम्हांला ख्रिस्ताची उपासना करण्याचा आणि त्याचे अनुसरण करण्याचा अर्थ काय आहे – त्यासाठीं काय किंमत चुकवावी लागते – यावर मनन करावयास संधी देऊ करो.

8 December : बेथलेहेमचा तो अलौकिक तारा

Alethia4India
Alethia4India
8 December : बेथलेहेमचा तो अलौकिक तारा
Loading
/

“यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्हीं पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत.” (मत्तय 2:2)

काही गोष्टी कशा घडतात याविषयी बायबल आम्हांला कुतूहलाने केवळ बुचकळ्यात पाडते. हा “तारा” मागी लोकांस पूर्वेहून यरूशलेमास कसा घेऊन आला?

वचन असे म्हणत नाहीं कीं त्यानें यरूशलेमेच्या दिशेनें त्यांचे मार्गदर्शन केलें अथवा त्यांच्या पुढे पुढे यरूशलेमास चालत गेला. वचन केवळ इतके म्हणते कीं त्यांनी पूर्व दिशेस तारा पाहिला (मत्तय 2:2) आणि ते यरूशलेमास आलें. आणि मत्तय 2:9 सांगते त्याप्रमाणें त्यां ताऱ्याने त्यांच्यापुढे यरूशलेमाहून बेथलेहेमापर्यंत लहानसे पाच मैलांचे अंतर कसे व्यापले? तो तारा नेमका “जेथे तो बालक होता, त्या जागेच्या वर जाऊन” कसा थांबला?

उत्तर हे आहे : आम्हांला माहीत नाहीं. ग्रहांचा संगम किंवा धूमकेतू किंवा सुपर नोवा किंवा अद्भुत प्रकाश या संदर्भात त्याचे स्पष्टीकरण करण्याचे अनेक प्रयत्न झालेंले आहेत. आम्हांला मुळीच माहीत नाहीं. आणि मी तुम्हांला प्रोत्साहन देऊ इच्छितो कीं त्यात गुंतून राहू नका – शेवटी केवळ तात्पुरत्या असणाऱ्या आणि फार कमी आत्मिक महत्व असलेल्या सिद्धांतांवर खिळून राहू नका.

मी तुम्हांला ताकीद देण्यासाठीं सामान्यीकरणाचा धोका पतकरतो : जे लोक अशा गोष्टींचा अभ्यास करतात आणि त्यात गुंतून राहतात, जसे ताऱ्याने कसे काम केलें आणि तांबडा समुद्र कसा विभागला आणि मन्ना कसा पडला आणि योना मत्साच्या पोटातून कसा वाचला आणि चंद्र कसा रक्तबंबाळ होतो, सामान्यतः असे लोक आहेत ज्यांच्याजवळ अशी मानसिकता आहे ज्यास मी अत्यल्प मानसिकता म्हणतो.

तुम्हांला त्यांच्या लेखनांत सुवार्तेच्या थोर केंद्रिय सत्याची सखोल सत्यें दिसणार नाहींत : असें कीं, देवाचे पावित्र्य, पापाची कुरूपता, मनुष्याची लाचारी, ख्रिस्ताचा मृत्यू, केवळ विश्वासाने नीतिमान ठरणें, आत्म्याचे पवित्र करणारे कार्य, ख्रिस्ताचे वैभवाने पुनरागमन, आणि शेवटचा न्याय. असें लोक नेहमीच तुम्हांला कुठल्यातरी नवीन लेखाने अथवा पुस्तकाने दुसऱ्या मार्गास नेण्याचा प्रयत्न करतात ज्याचे कुठल्यातरी सीमित गोष्टीने वर्णन करण्याविषयी ते अतिशय उत्साहित असतात. त्यांना महान आणि केंद्रिय अशा सत्यांनी इतका आनंद होत नाहीं.

पण ताऱ्याच्या या बाबीविषयी हे स्पष्ट आहे कीं तो असे काही करीत होता जे तो स्वतःहून करू शकत नव्हतां : तो मागी लोकांस देवाच्या पुत्राला दंडवत करण्यासाठीं वाट दाखवत होता.

बायबलच्या विचारसरणीत केवळ एकच व्यक्ती आहे जो ताऱ्याच्या संचालना मागे एका विशिष्ट हेतूने असू शकतो : स्वतः देव.

म्हणून, धडा स्पष्ट आहे : देव परराष्ट्रीयांस ख्रिस्ताची उपासना करण्यासाठीं मार्ग दाखवत आहे. आणि तो ते पूर्ण करण्यासाठीं वैश्विक – शक्यतः सार्वत्रिक सुद्धा – प्रभाव आणि सामर्थ्य कामी लावण्याद्वारे करीत आहे.

लूक दाखवितो कीं देव संपूर्ण रोमी साम्राज्यास प्रभावित करतो यासाठीं कीं जनगणना अगदी त्याच वेळी घडून यावीं ज्यावेळी तो एका अतिशय सामान्य कुमारीकेस तिच्या प्रसवाद्वारे भविष्यवाणी पूर्ण व्हावी म्हणून बेतलेहेमास घेऊन येतो. मत्तय दाखवतो कीं देव आकाशात तारा चालवितो यासाठीं कीं थोडक्या मुठभर परराष्ट्रीयांस देवाच्या पुत्राला नमन करता यावे म्हणून बेथलेहेमास जाता यावे.

ही देवाची योजना आहे. ही त्यानें तेव्हां केली. तो आजहि त्यावर काम करित आहे. त्याचे ध्येय आहे राष्ट्रांनी – सर्व राष्ट्रांनी (मत्तय 24:14) – त्याच्या पुत्राची उपासना करावी, त्यास नमन करावे.

तुम्हीं जेथें काम करतां त्यां तुमच्या कार्यालयात, आणि तुमच्या वर्गात, आणि तुमच्या शेजारी, आणि तुमच्या घरी प्रत्येकासाठीं देवाची हीच इच्छा आहे. योहान 4:23 मध्यें म्हटल्याप्रमाणें, “असे आपलें उपासक असावेंत अशीच पित्याची इच्छा आहे.”

मत्तयाच्या सुरूवातीला आपण आज देखील “या-पाहा” हा नमूना पाहतो. पण शेवटी नमूना आहे “जा-सांगा.” मागी लोक आले आणि त्यांनी पाहिले. आम्हांला जाऊन सांगावयाचे आहे.

पण वेगळे जर काही नसेल तर ते म्हणजें राष्ट्रांस एकत्र करण्यात देवाचा हेतू आणि सामर्थ्य कीं त्यांनी येऊन त्याच्या पुत्रास नमन करावे. सर्व राष्ट्रांच्या ज्वलंत उपासनेत ख्रिस्ताचे गौरव व्हावे यासाठींच हे जग अस्तित्वात आहे.

7 December : मागी लोकांसाठींख्रिस्त

Alethia4India
Alethia4India
7 December : मागी लोकांसाठींख्रिस्त
Loading
/

“हेरोद राजाच्या काळात यहूदीयातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर, पाहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले कीं, यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे?” (मत्तय 2:1-2)

लूक नमूद करतो त्याप्रमाणें, मत्तय आम्हांला गव्हाणीत येशूला भेट द्यायला आलेल्या मेंढपाळांविषयी सांगत नाहीं. तो आपला वृत्तांत लगेच विदेशी- परराष्ट्रीय, गैरयहूदी –  लोकांकडें वळवितो, जे येशूला दंडवत करण्यासाठीं पूर्वेकडून येतात.

म्हणून, मत्तय त्याच्या शुभवर्तमानाच्या सुरूवातीला आणि शेवटास येशूचे वर्णन केवळ यहूद्यांसाठीं नव्हे, तर सर्व राष्ट्रांसाठीं असलेला वैश्विक मशीहा, ख्रिस्त म्हणून करतो.

येथे आपण जे प्रथम उपासक पाहतो ते राजवाड्यातील जादूगार, अथवा ज्योतिषी, किंवा असें लोक आहेत जे इस्राएलमधून नव्हे, तर पूर्वेकडून आले – कदाचित बॅबीलोनहून आलेले बुद्धीमान लोक आहेत. ते परराष्ट्रीय होते. जुन्या कराराच्या विधिनियमानुसार ते अशुद्ध होते.

आणि मत्तयाच्या शेवटी, येशूचे शेवटचे शब्द आहेत, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेंला आहे. तेव्हां तुम्हीं जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा” (मत्तय 28:18-19).

त्याच्या या आदेशाने आम्हां परराष्ट्रीयांसाठीं ख्रिस्तामध्यें आनंद करण्याचे केवळ दारच उघडले नाहीं, तर त्यानें आपण ख्रिस्त असल्याचा पुरावा देखील दिला, कारण एक भविष्यवाणी वारंवार देण्यांत आलेली होती कीं राष्ट्रे आणि राजे, वस्तुतः, जगाचा राजा म्हणून त्याच्याकडें येतील. उदाहरणार्थ, यशया 60:3 म्हणते, “राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडें येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडें येतील.”

म्हणून, मत्तय येशू हाच ख्रिस्त असल्याचा पुरावा देतो आणि दाखवतो कीं तोच ख्रिस्त – राजा, आणि अभिवचन पूर्ण करणारा आहे – फक्त इस्राएलसाठीं नव्हे, तर सर्व राष्ट्रांसाठीं.

6 December : ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती

Alethia4India
Alethia4India
6 December : ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती
Loading
/

“आणि तुम्हांला खूण ही कीं, बाळंत्यानें गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल.” इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, “ऊर्ध्वलोकीं देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.” (लूक 2:12)

कोणासाठीं शांती? देवदूतांच्या स्तुतीगानात एक गंभीर स्वर नादला आहे. पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती. म्हणजें त्या लोकांमध्यें शांती ज्यांच्यावर तो प्रसन्न झाला आहे. पण विश्वासावाचून देवाला प्रसन्न करणें शक्य नाहीं (इब्री 11:6). म्हणून, नाताळाचा उत्सव हा सर्वांसाठीं शांती घेऊन येत नाहीं.  

येशूनें म्हटलें “निवाडा हाच आहे कीं, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती” (योहान 3:19). किंवा म्हाताऱ्या शिमोनाने बाळ येशूला पाहतांना म्हटलें, “पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणें व पुन्हा उठणें होण्यासाठीं व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठीं ह्याला नेमले आहे; ह्यासाठीं कीं, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावेत” (लूक 2:34,35). आह, कितीतरी लोक आहेत जे एका उदासवाण्या आणि थंड नाताळाच्या दिवसाची वाट पाहत आहेत आणि त्या पलीकडें तें काहीही पाहत नाहींत – ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह.

“जे त्याचे स्वतःचे2 त्याकडें तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाहीं. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजें त्याच्या नावावर विश्वास ठेवणार्‍यांना त्यानें देवाची मुले होण्याचा अधिकार दिला” (योहान 1:11-12). येशू हे शब्द केवळ आपल्या शिष्यांना बोलला, “मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाहीं. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये” (योहान 14:27).

जे लोक देवाच्या शांतीचा आनंद घेतात जी बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडें आहे ते सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवतात (फिलिप्पै 4:6-7).

देवाच्या खजान्याच्या पेटीचे कुलूप उघडणारी किल्ली म्हणजें देवाच्या अभिवचनांवरील विश्वास. म्हणून पौल प्रार्थना करतो, “आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळें तुम्हांला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो” (रोमकरांस 15:13). आणि जेव्हां आपण देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवतो आणि आनंद व शांती व प्रीतिचा अनुभव घेतो, तेव्हां देवाचे गौरव होते.

ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती! प्रत्येक जण – सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे– जें विश्वास ठेवतील- अशा सर्वांवर.     

5 December : कॅलवरीपासून वळसा नाहीं

Alethia4India
Alethia4India
5 December : कॅलवरीपासून वळसा नाहीं
Loading
/

तेथे असताना असे झालें कीं, तिचे दिवस पूर्ण भरले; आणि तिला तिचा प्रथमपुत्र झाला; त्याला तिने बाळंत्यानें गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती. (लूक 2:6-7)

तुम्हीं विचार कराल कीं जर देव जगावर अशाप्रकारे राज्य करतो कीं तो मरीया आणि योसेफाला बेथलेहेमात आणण्यासाठीं पूर्ण साम्राज्यात जनगणनेचा आदेश अस्तित्वांत आणतो, तर मग त्यानें निश्चितच ह्या गोष्टीची देखील खात्री करून घ्यायला पाहिजें होती कीं उतारशाळेत त्यांच्यासाठीं जागा उपलब्ध असावी.

होय, तो ह्या गोष्टीची देखील खात्री करून घेऊ शकला असता. तो नक्कीच तसें करू शकला असता! आणि येशूचा जन्म श्रीमंत कुटूंबात होणें शक्य होते. त्याला अरण्यात धोंड्यांपासून भाकरी बनविणेंहि शक्य होते. त्याला गेथशेमाने बागेत त्याच्या मदतीसाठीं 10,000 देवदूतांना बोलावणें शक्य होते. तो वधस्तंभावरून उतरून खाली येऊ शकला असता आणि स्वतःला वाचवू शकला असता. प्रश्न हा नाहीं कीं देव काय करू शकला असतां, पण त्यानें काय करण्याचे ठरविलें होते हा आहे.

देवाची इच्छा ही होती कीं ख्रिस्त जरी धनवान होता, तरी त्यानें तुमच्यासाठीं तो दरिद्री व्हावें. बेथलेहेमातील कोणत्याच उतारशाळेत “जागा नव्हती” ही तुम्हांला खूण होती. “तो तुमच्याकरिता दरिद्री झाला” (2 करिंथ 8:9).

तो त्याच्या लेकरांसाठीं सर्व गोष्टींवर – मग ते होटेल्स, असोत, वा विमानें- राज्य करतो. त्याचा कलवरीचा प्रवास बेथलेहेमात “जागा नव्हती” या चिन्हाने सुरू होतो आणि त्याचा शेवट यरूशलेमातील वधस्तंभावर थूंकणें आणि थट्टा करणें याने होतो.

आणि त्यानें जें म्हटलें तें आम्हीं हे विसरता कामा नये, कीं “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्यानें आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे” (लूक 9:23).

आम्हीं कलवरीच्या मार्गावर त्याला अनुसरतो आणि त्याला हे म्हणतांना ऐकतो, “दास धन्यापेक्षा मोठा नाहीं’ हे जे वचन मी तुम्हांला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील” (योहान 15:20).

जो उत्साहाने म्हणतो, “आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन” त्याला येशू उत्तर देतो, “खोकडांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत; परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाहीं” (लूक 9:57-58).

होय, येशूच्या जन्माच्या वेळी त्याला खोली मिळावी याविषयी देव खात्री करून घेऊ शकला असतां. पण ते कलवरीच्या मार्गावरून वळसा म्हणजें माघार घेणें झालें असते.

4 December : देवाच्या दीनजनांकरिता

Alethia4India
Alethia4India
4 December : देवाच्या दीनजनांकरिता
Loading
/

त्या दिवसांत असे झालें कीं, सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त ह्याची आज्ञा झाली. क्‍विरीनिय हा सूरियाचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हां सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून देण्यास गेलें. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळें तोही गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला, व नावनिशी लिहून देण्यासाठीं, त्याला वाग्दत्त झालेंली मरीया गरोदर असताना तिलाही त्यानें बरोबर नेले. (लूक 2:1-5)

मशीहाचा जन्म बेथलेहेमात व्हावा (मीखा 5:2 मधील भविष्यवाणी दाखविते त्याप्रमाणें) हे देवानें आधीच योजून ठेवले होते हे किती अद्भुत आहे ह्याचा आपण कधी विचार केलात का; आणि त्यानें काही बाबी अशारीतीने योजल्या कीं काळाची पूर्णता झाल्यावर, मशीहाची आई आणि अधिकृत पिता हे बेथलेहेमात नव्हे तर नासरेथात राहात होते; आणि त्याच्या वचनाची पूर्ती करण्याकरिता दोन अप्रसिद्ध, अत्यंत गरीब, हीन-दीन लोकांना त्या पहिल्या नाताळासाठीं बेथलेहेमास आणण्याकरिता, देवानें कैसर औगुस्ताच्या मनात घातले कीं संपूर्ण रोमी जगताची आपापल्या गावी नावनिशी व्हावी? दोन लोकांना सत्तर मैल स्थलांतरित करण्याकरिता संपूर्ण जगाला आज्ञा!

सात अब्ज लोकसंख्या असलेल्या या जगामध्यें, जिथे सर्व बातम्या ह्या मोठ्या राजकिय आणि आर्थिक आणि सामाजिक चळवळी आणि जागतिक स्तरावरील लक्षणीय महत्व प्राप्त व भरपूर सामर्थ्य आणि प्रतिष्ठा असणार्‍या लोकांबाबत असतात, तिथें मला जाणवते तसे तुम्हांला सुद्धा आपण दीन आणि अप्रसिद्ध आहोत असे कधी जाणवलें आहे का?

आपणास तसे वाटले असेल, तर त्यामुळें स्वत:ला निराश आणि दु:खी होऊ देऊ नका. कारण पवित्र शास्त्रात हे गृहित धरण्यात आलेले आहे कीं सर्व भव्य राजकिय शक्ती आणि विशाल औद्योगिक जाळे, या सर्वांना त्यांच्या नकळकत स्वतः देव चालवितो, त्यांच्या स्वत:करिता नव्हे तर देवाच्या दीन लोकांकरिता—कनिष्ठ मरीया आणि कनिष्ठ योसेफाला नासरेथाहून बेथलेहेमेला आणण्याकरिता. देव त्याचा शब्द पूर्ण करण्याकरिता आणि त्याच्या लेकरांना आशीर्वाद देण्याकरिता एका साम्राज्याला हाती धरून त्याचा उपयोग करतो.

आपण आपल्या अनुभवाच्या जगतामध्यें विपत्ती अनुभवली म्हणून देवाचा हात तोकडा पडला असा विचार करू नका. आमची समृद्धी किंवा प्रसिद्धी नव्हे तर देव त्याच्या संपूर्णमनानें आमचे पावित्र्य शोधत आहे. आणि त्याकरिता तो संपूर्ण जगावर  हुकुमत करतो. नीतिसूत्रे 21:1 म्हणते, “राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणें परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडें तो ते वळवतो.” आणि त्याच्या लोकांमध्यें त्याचे तारण आणि त्याचे पवित्रीकरण आणि सनातन संकल्प सिद्धीस नेण्याकरिता तो ते नहेमीच वळवतो.

हीन-दीन लोकांकरिता थोर असा देव आहे, आणि आम्हांला आनंद करण्याचे फार मोठे कारण आहे कीं जगाचे सर्व राजे आणि अध्यक्ष आणि पंतप्रधान आणि कुलपती आणि मुख्य लोक नकळतआमच्या स्वर्गीय देवाची सार्वभौम आज्ञा पाळतात, जेणेंकरून, आम्हीं जी त्याची लहान बालकें त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त ह्याच्या प्रतिरूपाशी एकरूप व्हावे— आणि त्याच्या सार्वकालिक गौरवात प्रविष्ट व्हावे.

3 December : दीर्घकाळ प्रलंबित भेट

Alethia4India
Alethia4India
3 December : दीर्घकाळ प्रलंबित भेट
Loading
/

“इस्राएलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्यानें ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांची ‘खंडणी भरून सुटका’ केली आहे; आणि आपल्यासाठीं त्यानें आपला दास ‘दावीद’ ह्याच्या घराण्यात ‘बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे; हे त्यानें युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते;’ म्हणजें आपल्या ‘शत्रूंच्या’ व आपला ‘द्वेष करणार्‍या’ सर्वांच्या ‘हातून’ सुटका करावी.” (लूक 1:68-71)

लूक 1 मधील अलीशिबेचा पति, जखऱ्या याच्या शब्दांतून निघालेल्या दोन अद्भुत गोष्टींकडें लक्ष द्या.

पहिली, नऊ महिन्यांपूर्वी, जखऱ्याला विश्वास नव्हतां कीं त्याच्या पत्नीला मूल होईल. परंतु आता, पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन, त्याला येणाऱ्या मशीहात देवाच्या मुक्तीच्या कार्याविषयी एवढा विश्वास आहे कीं तो ते भूतकाळात मांडतो: “त्यानें ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांची ‘खंडणी भरून सुटका’ केली आहे.” विश्वास ठेवणाऱ्या मनासाठीं, देवाचे अभिवचनदत्त कार्य जणू ते पूर्ण झाल्याइतकेच उत्तम आहे. जखऱ्या हा देवाच्या शब्दावर विश्वास करावयास शिकला आणि म्हणून त्याला ही अद्भुत खात्री पटलीं : देवानें “भेट घेऊन…सुटका केली आहें!” (लूक 1:68).

दुसरी, येशू ख्रिस्ताचे येणें हे देवानें जगाची घेतलेली भेट आहे : इस्राएलाच्या देवानें भेट घेऊन सुटका केली. अनेक शतके, यहूदी लोक या विश्वासाखाली खितपत पडले होते कीं देव हा पाठमोरा झाला होता : संदेशाचा आत्मा थांबला होता; इस्राएल रोमी लोकांच्या हातात दास्यांत पडले होते. आणि इस्राएलातील सर्व भक्तिमान लोक देवाच्या भेटीची प्रतीक्षा करीत होते. लूक आम्हांला सांगतो कीं आणखी एक वृद्ध पुरुष, भक्तिमान शिमोन, होता जो “इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता” (लूक 2:25). त्याचप्रमाणें, प्रार्थनाशील हन्ना ही देखील “यरूशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत” होती (लूक 2:38).

हे मोठ्या आशेनें भरलेलें दिवस होते. जिची ते दीर्घकाळ प्रतीक्षा करित आलें होते ती देवाची भेट आता घडून येणार होती – कोणीही अपेक्षा केली नव्हती अशाप्रकारे तो खरोखर येण्याच्या मार्गावर होता.

2 December : मरीयेचा प्रतापी परमेश्वर

Alethia4India
Alethia4India
2 December : मरीयेचा प्रतापी परमेश्वर
Loading
/

“माझा जीव प्रभूला’ थोर मानतो, आणि ‘देव जो माझा तारणारा’ त्याच्यामुळें माझा आत्मा ‘उल्लासला आहे.’ कारण ‘त्यानें’ आपल्या ‘दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केलें आहे.’ पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील! कारण जो समर्थ आहे, त्यानें माझ्याकरता महत्कृत्ये केली आहेत; आणि ‘त्याचे नाव पवित्र आहे.’ आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’ त्यानें आपल्या ‘बाहूने’ पराक्रम केला आहे; जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने ‘गर्विष्ठ आहेत त्यांची त्यानें दाणादाण केली आहे.’ ‘त्यानें अधिपतींना’ राजासनांवरून ‘ओढून काढले आहे’ व ‘दीनांस उंच केलें आहे.’ ‘त्यानें भुकेलेंल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केलें आहे,’ व ‘धनवानांस रिकामे लावून दिलें आहे.’ ‘आपल्या पूर्वजांस’ त्यानें सांगितले ‘त्याप्रमाणें अब्राहाम’ व त्याचे ‘संतान ह्यांच्यावरील दया’ सर्वकाळ स्मरून त्यानें आपला सेवक इस्राएल ह्याला साहाय्य केलें आहे.” (लूक 1:46-55)

मरीया देवाविषयी स्पष्टपणें एक अतिशय उल्लेखनीय गोष्ट पाहते: तो संपूर्ण मानव इतिहासाचा क्रम बदलणार आहे; इतिहासातील अत्यंत महत्वाची तीन दशके सुरू होणार आहेत.

आणि देव कोठे आहे? तो आपलें सर्व लक्ष अप्रसिद्ध व दीन अशा दोन स्त्रियांवर केंद्रित करतो – एक म्हातारी आणि वांझ (अलीशिबा), एक तरुण आणि कुमारीका (मरीया). आणि मरीया देवाच्या या दृष्टांताने, जो दीनांवर प्रीति करणारा आहे, इतकीं भारावून जाते कीं तिच्या अंतःकरणातून गीत उचंबळून येते – असे गीत ज्यास “मरीयेचे स्तोत्र” म्हटलें जाते.

मरीया आणि अलीशिबा लूकाच्या वृत्तांतातील दोन महान नायिका आहेत. त्याला या दोन स्त्रियांचा विश्वास आवडतो. असें दिसून येतें कीं त्यां दोघींच्या बाबतीत ज्यां गोष्टीचा त्याच्यावर जास्त प्रभाव पडला, आणि जी गोष्ट तो त्याच्या शुभवर्तमानाचा कुलीन वाचक थियोफिलस याच्या मनावर ठसवू इच्छितो ती गोष्ट आहे अलीशिबा आणि मरीया ज्या त्यांच्या प्रतापी देवाला समर्पित होतात त्याबाबतीत त्यांचा दीनपणा आणि हर्षयुक्त नम्रपणा.

अलीशिबानें म्हटलें, (लूक 1:43) माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडें यावे हा मान मला कोठून? आणि मरीयेनें म्हटलें (लूक 1:48) “त्यानें’ आपल्या ‘दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केलें आहे”

ज्यांचा जीव खरोखर प्रभूला थोर मानतो असें एकमेव लोक अलीशिबा आणि मरीयेसारखे लोक आहेत – जे लोक त्यांची दीन दशा कबूल करतात आणि प्रतापी देवाच्या नम्रतेने भारावून जातात.