24 May : तुमच्यांतारणाच्या खात्रीचा खडक

Alethia4India
Alethia4India
24 May : तुमच्यांतारणाच्या खात्रीचा खडक
Loading
/

“कारण आत्म्याच्या द्वारें होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवानें तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठीं निवडले आहे.” (2 थेस्सल 2:13)

पवित्र शास्त्र आपण काहीही बरे किंवा वाईट करण्यापूर्वी (रोम. 9:11) पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्ताठायी आपली निवड केलीं जाण्याविषयी बोलते – म्हणजें देवानें आम्हांला निवडले (इफिस 1:4). त्यामुळें, आमची निवड खऱ्या अर्थाने कोणत्याही अटीविरहित आहे. आमचा विश्वास किंवा आमची आज्ञाधारकता याचा आधार नाहीं. हि निवड मुक्त आणि आम्हीं पात्र नसतांना करण्यांत आलेली आहे.

दुसरीकडे, पवित्र शास्त्रातील डझनभर शास्त्रलेख आपल्या अंतिम तारणाविषयी बोलतात (सार्वकालिक जीवनासाठीं भूतकाळात झालेंल्या आपल्या निवडीच्या विपरीत) ज्याची अट आहे परिवर्तित हृदय आणि जीवन. म्हणून, प्रश्न उठतो, सार्वकालिक जीवन वतन म्हणून मिळण्यासाठीं आवश्यक असलेल्या विश्वासात आणि पावित्र्यात मी टिकून राहीन याची खात्री मला कशी प्राप्त होईल?

उत्तर हे आहे कीं ती खात्री आमची झालेंली निवड यांत मुळावलेली आहे. 2 पेत्र 1:10 यात म्हटले आहे, “ज्या संदेष्ट्यांनी तुमच्यांवर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला.” देवाची निवड हा मला तारण्याच्या देवाच्या वचनबद्धतेचा पाया आहे, आणि म्हणून त्याच्या निवडीच्या कृपेने जे सुरू झालें आहे ते पवित्र करणाऱ्या कृपेद्वारें तो मजमध्यें कार्य करील.

नव्या कराराचा हा अर्थ आहे. येशूवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण नव्या कराराचा सुरक्षित लाभार्थी आहे, कारण येशूनें लूक 22:20 मध्यें म्हटले आहे, ”हा प्याला माझ्या ‘रक्तात’ नवा ‘करार’ आहे. ते रक्त तुमच्यांसाठीं ओतले जात आहे.“ म्हणजें, माझ्या रक्ताद्वारें जे माझे आहेत त्या सर्वांसाठीं मी नवा करार प्राप्त करतो. 

नव्या करारात देव केवळ आज्ञापालनाची आज्ञा देत नाहीं, तर आज्ञापालन घडवून आणतो. “तुझा देव परमेश्वर तुझ्या हृदयाची व तुझ्या वंशजांच्या हृदयाची सुंता करील, आणि आपण जिवंत राहावे म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रेम करशील” (अनुवाद 30:6).  “मी तुमच्यां ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्हीं माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांप्रमाणे आचरण कराल असें मी करीन” (यहेजकेल 36:27; तुलना 11:20). ही नवीन कराराची अभिवचने आहेत.

निवड ही त्याच्या लोकांसाठीं हे करण्याची परमेश्वराची सार्वकालिक वचनबद्धता होय. म्हणून, निवड ही हमी देते कीं ज्यांस परमेश्वर विश्वासाने नीतिमान ठरवितो, त्यांचे तो अवश्य गौरवहि करील” (रोम 8:30). याचा अर्थ हा कीं तो आपल्यामध्यें गौरवीकरणासाठीं घालून दिलेंल्या सर्व अटी पूर्ण करण्यासाठीं अचूकपणे कार्य करेल.

आमची झालेंली निवड तारणाच्या या खात्रीचा अंतिम पाया आहे कारण देव तारण देण्यासाठीं वचनबद्ध आहे म्हणून, तारणासाठीं जे काही उपलब्ध आहे ते सर्व सक्षम करण्यासाठीं देव वचनबद्ध आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *