ArchivesSolid Joys

20 December : नाताळाचे ऐक्य

Alethia4India
Alethia4India
20 December : नाताळाचे ऐक्य
Loading
/

सैतानाची कृत्यें नष्ट करण्यासाठींच देवाचा पुत्र प्रकट झाला.” (1 योहान 3:8)

सैतानाची यंत्रणा एकजुटीने दररोज लक्षावधी पापांचे उत्पादन करतो. तो मोठमोठ्या मालवाहू विमानातून ते बांधून स्वर्गास पोहोचवतो आणि ते परमेश्वरासमोर पसरवतो आणि खूप खूप हसतो, हसतच राहतो.

काही लोक पूर्ण वेळ या यंत्रणेंत कामे करतात. इतर लोकांनी ते काम सोडले आहे आणि फक्त कधी कधी परत येत असतात.

या यंत्रणेंतील कामाचा प्रत्येक क्षण देवाला सैतानाचा हास्य विषय बनवितो. पाप सैतानाचा उद्योग आहे कारण त्याला देवाचा प्रकाश आणि सौंदर्य आणि पावित्र्य आणि गौरवाचा हेवा वाटतो. जेव्हां सृष्ट प्राणी आपल्या कर्त्यावर अविश्वास ठेवतात आणि त्याची आज्ञा मोडतात तेव्हां तो अतिशय प्रसन्न होतो.

म्हणूनच नाताळ हा मनुष्यासाठीं सुवार्ता आहे आणि देवासाठीं सुवार्ता आहे.

“ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणें स्वीकारण्यास योग्य आहे; त्या पापी लोकांपैकीं मी मुख्य आहे” (1 तीमुथियुस 1:15). ही आमच्यासाठीं सुवार्ता आहे.

“पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठींच देवाचा पुत्र प्रकट झाला” (1 योहान 3:8). ही देवासाठीं देखील सुवार्ता आहे.

नाताळ हा देवासाठीं सुवार्ता आहे कारण येशू सैतानाच्या या संघ यंत्रणेंवर आघात करण्याचे नेतृत्व करावयास आला आहे. त्यानें थेट या कारखान्यात प्रवेश केला आहे, विश्वासूच्या दृढ ऐक्याची मागणी केली आहे, आणि एका विशाल संपाची सुरूवात केली आहे.

नाताळ हा पापाच्या यंत्रणेंवरला सोडून संपावर जाण्याचे पाचारण आहे. व्यवस्थापकांसोबत कुठलीही वाटाघाट नाहीं. कुठलीही सौदेबाजी नाहीं. फक्त एकचित्ताने, न डळमळता उत्पादनास विरोध करावयाचा आहे. त्याच्या उत्पादनाचा आम्हीं यापुढे भाग बनणार नाहीं.

नाताळाच्या ऐक्याचे ध्येय या मालवाहू विमानांस खाली आणणें आहे. ते बलप्रयोग किंवा हिंसाचार करणार नाहीं, पण सत्यासाठीं अदम्य भक्तीने ते सैतानाच्या उद्योगाच्या जीवननाशक यंत्रणेंचे कारस्थान प्रकाशात आणील.

नाताळाचे ऐक्य तोवर मोडणार नाहीं जोवर संपूर्ण टाळेबंदी साध्य होत नाहीं.

जेव्हां पापाचा नायनाट होईल, तेव्हां देवाचे नीतिमत्व पूर्णपणें प्रकट केलें जाईल. यापुढे कोणीही हसणार नाहीं.

जर या नाताळाला तुम्हीं देवाला कांहीं भेट देऊं इच्छिता, तर पापाच्या या यंत्रणेंबाहेर निघा आणि परत जाऊ नका. प्रीतिच्या संप रांगेत आपलें स्थान ग्रहण करा. जोपर्यंत देवाचे प्रतापी नाव दोषमुक्त होत नाहीं, आणि तो नीतिमानांच्या प्रशंसेत गौरवी असा सिद्ध होत नाहीं तोवर नाताळाच्या ह्या ऐक्यात आवर्जून भाग घ्यां.

19 December : नाताळ स्वातंत्र्यासाठींआहे

Alethia4India
Alethia4India
19 December : नाताळ स्वातंत्र्यासाठींआहे
Loading
/

ज्या अर्थी ‘मुलें’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला मरणानें शून्यवत करावे, आणि जें मरणाच्या भयानें आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. (इब्रीलोकांस 2:14-15)

येशू मानव झाला कारण जी गोष्ट अगत्याची होती ती म्हणजें एका अशा मनुष्याचा आत्मयज्ञ जो स्वतः मनुष्यापेक्षा श्रेष्ठ असा आहे. देही होणें म्हणजें देवानें स्वतःला मरणाच्या नांगीच्या अंकित केलें.

ख्रिस्तानें मृत्यूचा धोका पत्करला नाहीं. त्यानें मृत्यू निवडला. त्यानें मरणाला मिठी मारली. म्हणूनच तो आला: “सेवा करून घेण्यास नाहीं, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठीं आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे” (मार्क 10:45).

येशूनें वधस्तंभापासून माघार घ्यावी म्हणून सैतानाने खूप प्रयत्न केला यात काही आश्चर्य नाहीं — अरण्यांत (मत्तय 4:1-11) आणि पेत्राच्या तोंडून (मत्तय 16:21-23)! वधस्तंभ हा सैतानाचा नाश होता. येशूनें त्याचा नाश कसा केला?

इब्रीलोकांस 2:14 म्हणते कीं सैतान “मरणावर सत्ता गाजवतो.” याचा अर्थ, सैतानाकडें मरणाला घाबरून टाकणारं रौद्र रूप देण्याचे सामर्थ्य आहे. “मरणाचे सामर्थ्य” हे असें सामर्थ्य आहे जे मरणाच्या भीतीने मनुष्यांना गुलाम बनवते. ते मनुष्यांना पापात ठेवण्याची ही शक्ती आहे जेणेंकरून मरण एक भयानक सत्य म्हणून प्रकट व्हावें.

पण येशूनें सैतानाचे हे सामर्थ्य काढून त्याला शून्यवत केलें. त्याला नि:शस्त्र केलें. त्यानें आपल्यासाठीं नीतिमत्वाचे एक कवच तयार केलें जे आपल्याला सैतानाच्या दोषारोपापासून मुक्त करते. त्यानें हे कसे केलें?

त्याच्या मरणाने, येशूनें आपली सर्व पापे पुसून टाकली. आणि पाप नसलेल्या मनुष्याला सैतान दोषी ठरवू शकत नाहीं. पापांची क्षमा झालेंलें, असें आपण शेवटी अविनाशी झालों आहों. देवाच्या स्वतःच्या न्यायालयात देवाच्या लोकांवर दोष लाऊन देवाच्या राज्याचा नाश करावा हे सैतानाचे कारस्थान होते. पण आता, ख्रिस्तामध्यें, दंडाज्ञा नाहींच. सैतानाचा राजद्रोह धूळीस मिळविण्यात आला आहे. जगाचा घात करण्याचा त्याचा डाव हाणून पाडण्यात आला आहे. “त्याचा रोष आपण सहन करू शकतो, कारण पाहा त्याचा नाश येऊन पोहचला आहे.” वधस्तंभाने त्याचा पराभव केला आहे. आणि ती वेळ येत आहे जेव्हां तो आपला शेवटला श्वास घेईल.

नाताळ स्वातंत्र्यासाठीं आहे. मरणाच्या भीतीपासून मुक्तता.

येशू बेथलेहेममध्यें आमच्यांसारखा रक्तमांसाचा झाला, येरूसलेमात आमच्या मरणाचा स्थानापन्न झाला – यासाठीं कीं आज आम्हीं आमच्या नगरांत निर्भयपणें वावर करूं शकू. होय, निर्भयपणें. कारण माझ्या आनंदाला असलेला सर्वात मोठा धोका जर नाहींसा झाला, तर मी चिमुरड्यांवर का जळफळावे? तुम्हीं असें कसे म्हणू शकता (खरोखर का!), “बरें, मला मरण्याची भीती वाटत नाहीं, पण मला माझी नोकरी गमावण्याची भीती वाटते”? नाहीं. नाहीं. विचार करा!

जर मरणाची (मी म्हणालो, मरण! — नाडीचा ठोका किंवा सर्दी गेली हे नाहीं!) जर मरणाची यापुढे भीती नाहीं, तर आपण स्वतंत्र आहों, खरोखर स्वतंत्र आहों. ख्रिस्तासाठीं आणि त्याच्या प्रीतिसाठीं या जगांत कोणताहि धोका पत्करण्यास स्वतंत्र. आता चिंतेची गुलामगिरी नाहीं.

जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्हीं खरेखुरे बंधमुक्त व्हाल!

18 December : सुवार्ताप्रसारासाठीं नाताळाचा नमूना

Alethia4India
Alethia4India
18 December : सुवार्ताप्रसारासाठीं नाताळाचा नमूना
Loading
/

“जसे तू मला जगात पाठवलेस तसे मीहित्यांना जगात पाठवले.” (योहान 17:18)

नाताळ हा सुवार्ता प्रसारासाठीं एक नमूना म्हणजें आदर्श आहेत. सुवार्ता प्रसाराचे कार्य नाताळाचे प्रतिबिंब दाखविणारा आरसा आहे. “जसे तू ….तसे मीहि”

उदाहरणार्थ, संकट. ख्रिस्त जे त्याचे स्वकीय त्यांकडें आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाहीं. तसेच तुमच्यांबरोबरहि होते. त्यांनी त्याच्याविरुद्ध कारस्थान रचले. तसेच तुमच्यांविरुद्धहि केलें जाते. त्याचे कायमचे घर नव्हते. तुमचेहि नाहीं. त्यांनी त्याच्यावर खोटे आरोप लावले. तुमच्यांवरहि लावले जातांत. त्यांनी त्याला चाबकांनी मारले आणि त्याची थट्टा केली. तुम्हांबरोबर तसेच वर्तन केलें जाते. तो तीन वर्षांच्या सेवेनंतर मृत्यू पावला. तुमचाहि मृत्यू होईल.

पण याहिपेक्षा एक अतिशय वाईट संकट आहे ज्यामधून येशू वाचला. तुम्हीं सुद्धा वाचविले जाल!!

16व्या शतकाच्या मध्यकाळात फ्रांसिस झेविअर (1506-1552), यांनी मलाका (आजच्या मलेशियाचा भाग) येथें कार्यरत असलेले फादर पेरेज यांना चीनप्रत त्याच्या सुवार्ता कार्यात ते तोंड देत असलेल्या संकटांविषयी लिहिलें. त्यांनी म्हटलें,

सर्व संकटांपैकीं सर्वात मोठे संकट देवाच्या दयेत आपला भरवसा आणि विश्वास गमावणें आहे… त्याच्यावर अविश्वास करणें कोणत्याही भौतिक वाईटापेक्षा अधिक भयंकर गोष्ट ठरेल जी देवाचे शत्रू एकत्र मिळून आमच्यावर लादू शकतात, कारण देवाच्या परवानगीवाचून दुरात्मे किंवा त्यांचे मानव रुपी सेवक आम्हास थोड्या प्रमाणातही अळखळण आणू शकत नाहींत.

सुवार्तिकांना ज्या सर्वात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते ते संकट मृत्यू नाहीं तर देवाच्या दयेवर अविश्वास बाळगणें आहे. जर ते संकट यशस्वीपणें टाळण्यात आलें, तर इतर सर्व संकटे आपली नांगी गमावतील.

शेवटी देव आमच्या हातात प्रत्येक कट्यारास राजदंड बनवितो. जे.डब्लू. अलेक्झेंडर म्हणतो, “सांप्रतकाळातील कष्टाच्या प्रत्येक क्षणाची गौरवाच्या लक्षावधी युगांनी कृपापूर्णरित्या परतफेड केली जाईल.”

ख्रिस्त या संकटातून निभावून गेला – देवावर अविश्वास करण्याचे संकट. म्हणून देवानें त्याला अत्युच्च केलें! जसे त्याला केलें, तसे तुम्हांलाहि करील.

या नाताळाच्या हंगामांत हे लक्षात ठेवा कीं नाताळ हा सुवार्ता प्रसारासाठीं नमूना व आदर्श आहे. जसे मी, तसे तुम्हीं. आणि त्या कार्याचा अर्थ आहे संकट. आणि सर्वात मोठे संकट देवाच्या दयेवर अविश्वास बाळगणें हे आहे. यास जर तुम्हीं बळी पडला कीं सर्वकाही गमावले, येथें जर जिंकला तर येणाऱ्या लक्षावधी युगानेयुग कोणतीहि गोष्ट तुमचे अहित करू शकणार नाहीं.

17 December : शक्य असें सर्वात मोठे तारण

Alethia4India
Alethia4India
17 December : शक्य असें सर्वात मोठे तारण
Loading
/

“परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत कीं त्यात इस्राएलाचे घराणें व यहूदाचे घराणें ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन” (यिर्मया 31:31)

देव नीतिमान आणि पवित्र आणि आमच्यासारख्या पापी लोकांपासून पूर्णपणें भिन्न असा आहे. नाताळाच्या ह्या हंगामात – आणि इतर सर्व प्रसंगी- आमची हीच मुख्य अडचण आहे. आम्हीं ह्या नीतिमान आणि पवित्र देवाबरोबर आमच्या नात्यांत कशी सुधारणा करणार?

तथापि, देव ममताळू आहे आणि त्यानें यिर्मया 31 मध्यें अभिवचन दिलें (ख्रिस्ताच्या जन्माच्या 500 वर्षांपूर्वी) कीं एक दिवस असा येईल जेव्हां तो काहीतरी नवीन करील. तो छायेंच्या जागी ख्रिस्ताची वास्तविकता आणेंल. आणि तो सामर्थ्यानिशी आमच्या जीवनांत येईल आणि त्याची इच्छा आमच्या अंतःकरणावर लिहील यासाठीं कीं बाहेरून आम्हास भाग पाडले जाऊ नये, तर आम्हीं त्याच्यावर प्रीति करावयांस आणि त्याच्यावर विश्वास ठेवावयांस आणि त्याचे अनुसरण करावयांस आतून इच्छुक असावें,.

ते साध्य करण्यांत आलेलें असे सर्वात मोठे तारण ठरेल – जर देव आम्हास विश्वातील सर्वात मोठी वास्तविकता उपभोगावयास देणार असेल आणि नंतर आम्हांला या वास्तविकतेची अशाप्रकारे याची जाणीव देण्यासाठीं आमच्यात कार्य करीत असेल कीं जिचा आम्हीं सर्वात मोठ्या स्वातंत्र्यानिशी आणि शक्य तेवढ्या मोठ्या आनंदात आस्वाद घेत असू. हे नाताळाचे एक असें बक्षिस आहे ज्याविषयी आम्हीं गीत गाऊन आनंद केलें पाहिजें.

खरे म्हणजें, नव्या करारात अगदी याविषयीच अभिवचन देण्यात आले होते. पण एक मोठे अडखळण होते. आमचे पाप. आमच्या अधर्मामुळें देवापासून आमचे विभक्त होणें.

पवित्र आणि नीतिमान देव आम्हा पातक्यांस इतक्या दयेने कसे वागवू शकतो कीं तो आम्हास सर्वात शक्य आनंदाचा आस्वाद घेण्यासाठीं विश्वातील सर्वात मोठी वास्तविकता (म्हणजें त्याचा पुत्र) देतो?

उत्तर हे आहे कीं देवानें आमची पापे त्याच्या पुत्रावर टाकली, आणि त्यांस तेथे शिक्षा दिली, यासाठीं कीं त्याला ते त्याच्या मनातून काढता यावे, आणि आमच्याशी दयेने वागावे आणि त्याचवेळी स्वतः नीतिमान आणि पवित्र असावें. इब्री 9:28 म्हणते कीं ख्रिस्त “पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठीं’ एकदाच अर्पण केला गेला.”

ख्रिस्त जेव्हां मेला तेव्हां त्यानें आमची पापे स्वदेही घेतली (1 पेत्र 2:24). त्यानें आमची शिक्षा स्वतःवर घेतली (रोम 8:3). त्यानें आमचा दोष पुसून टाकला (रोम 8:1). आणि त्याचा अर्थ आमची पापे नाहींशी झाली (प्रे. कृत्ये 10:43). ती दंडाज्ञेसाठीं आधार म्हणून यापुढे देवाच्या मनात नाहींत. त्या अर्थाने, तो त्यांस ”विसरून जातो“ (यिर्मया 31:34). ती ख्रिस्ताच्या मरणात गिळंकृत झालीं.

ज्याचा अर्थ हा आहे कीं देव आता त्याच्या न्यायास स्मरून, अवर्णनीयरित्या थोर अशा नव्या कराराच्या अभिवचनांची आमच्यावर उधळण करण्यास स्वतंत्र आहे. तो आम्हास आमच्या आनंदोपभोगासाठीं, विश्वातील सर्वात मोठी वास्तविकता, म्हणजें ख्रिस्त देतो. आणि तो स्वतःची इच्छा –त्याचे स्वतःचे अंतःकरण – आमच्या हृदयांवर लिहितो यासाठीं कीं आम्हास ख्रिस्तावर प्रीती करता यावी आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवता यावा आणि स्वातंत्र्य आणि आनंदाने आतून-बाहेरून ख्रिस्ताचे अनुसरण करता यावे.

16 December : देवाचा अत्युच्च नम्रपणा

Alethia4India
Alethia4India
16 December : देवाचा अत्युच्च नम्रपणा
Loading
/

ह्यामुळें देवानें त्याला अत्युच्च केलें, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलें; ह्यात हेतू हा कीं, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठीं प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. (फिलिपै. 2:9-10)

नाताळ हा देवाच्या सर्वात यशस्वी अशा अत्युच्च नम्रपणाला चिन्हांकित करणारा आरंभ आहे. नम्रतारुपी या पराजयाद्वारे त्याचे सामर्थ्य दाखविण्यात त्याला नेहमीच आनंद वाटतो. योजनाबद्ध विजय मिळविण्यासाठीं तो चातुर्यपूर्ण माघार घेतो.

जुन्या करारात, याकोबाच्या बारा पुत्रांपैकीं एक, योसेफास त्याच्या स्वप्नात गौरव आणि सामर्थ्याचे अभिवचन देण्यात आले होते (उत्पत्ति 37:5-11). पण तो विजय साध्य करण्यासाठीं त्याला मिसर देशात गुलाम बनावे लागले. आणि, जणूकाही ते पुरेसे नव्हते, जेव्हां त्याच्या प्रामाणिकपणामुळें त्याच्या स्थितींत सुधारणा घडून आली, तेव्हां त्याला गुलामापेक्षा अति वाईट असें स्थान देण्यात आले: कैदी.

पण ते सर्वकाही योजिलेले होते. त्याचे आणि त्याच्या कुटूंबाचे कल्याण व्हावें म्हणून, आणि शेवटी संपूर्ण जगाचे कल्याण व्हावे म्हणून ते देवानें योजिले होते! कारण तेथे तुरूंगात त्याची भेट फारोच्या प्यालेबरदाराशी झाली, जो शेवटी त्याला फारोजवळ घेऊन आला, ज्याने त्याला मिसर देशचा अधिकारी ठरविले. आणि शेवटी त्याचे स्वप्न खरे ठरले. त्याच्या भावांनी त्याजपुढे नमन केलें, आणि त्यानें त्यांस उपासमारीपासून वाचविले. गौरवाकडें घेऊन जाणारा कसा अशक्य मार्ग!

पण हा देवाचा मार्ग आहे – त्याच्या पुत्रासाठीं सुद्धा. त्यानें स्वतःला रिक्त केलें आणि दासाचे स्वरूप धारण केलें. दासापेक्षाही वाईट – कैदी म्हणून – आणि त्याला वधस्तंभी देण्यात आले. पण योसेफाप्रमाणें, त्यानें आपला प्रामाणिकपणा राखून ठेवला. “ह्यामुळें देवानें त्याला अत्युच्च केलें, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलें; ह्यात हेतू हा कीं, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा….” (फिलिपै. 2:9-10).

आणि हा आमच्यासाठीं देखील देवाचा मार्ग आहे. आम्हांला गौरवाचे अभिवचन देण्यात आले आहे – जर आम्हीं त्याच्यासोबत दुःख सोसत असू जसे रोम 8:17 मध्यें म्हटलेंले आहे. वर जाण्याचा मार्ग खालून सुरू होतो. पुढे जाण्याचा मार्ग मागे आहे. यशाकडें जाणारा मार्ग देवानें ठरविलेल्या पराजयातून जातो. तो नेहमीच जणू अपयशासारखा दिसेल आणि जाणवेल.

जर योसेफ आणि येशू या नाताळा समयी काही शिकवीत असतील तर ते हे आहे : जे सैतानाने आणि पापी लोकांनी वाईटासाठीं योजले होते, “देवानें ते चांगल्यासाठीं योजले होते!” (उत्पत्ति 50:20).

हे घाबरलेल्या संता, पुन्हा धैर्य धर

ज्या ढगांचे तुला भय वाटते

ते दयेने वाढलेले आहेत आणि लवकरच

तुजवर आशीर्वादांची वृष्टी करतील.

15 December : नाताळाच्या हंगामावेळी जीवन आणि मरण

Alethia4India
Alethia4India
15 December : नाताळाच्या हंगामावेळी जीवन आणि मरण
Loading
/

“चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो; मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणें व्हावी म्हणून आलो आहे.” (योहान 10:10)

मी आजची भक्ती सुरू करणारच होतो कीं तितक्याच मला मॅरियन न्यूस्ट्रम हिचे नुकतेच निधन झाल्याची बातमी मिळाली. मॅरियन आणि तिचा नवरा एल्मर हे त्या काळापासून आमच्या चर्चचे सदस्य होते ज्याकाळी आमच्या चर्चच्या बहुतेक सदस्यांचा जन्महि झाला नव्हता. त्या 87 वर्षांच्या होत्या. त्यांच्या लग्नाला 64 वर्षे झाली होती.

जेंव्हा मी एल्मरशी बोललो आणि त्याला सांगितलें कीं त्यानें प्रभूमध्यें धीर धरावा आणि जीवनात पराजय पत्करू नये, तेव्हां तो म्हणाला, “तो माझा खरा मित्र आहे.” मी प्रार्थना करतो कीं सर्व ख्रिस्ती लोकांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी हेंच म्हणावें, “ख्रिस्त माझा खरा मित्र आहे.”

नाताळाचा आगमनोत्सव करतांना मी प्रत्येक वर्षी माझ्या आईचा स्वर्गवासदिन साजरा करतो. ती 56 वर्षांची असतांना इस्रायलमध्यें बस अपघातांत तिचा हात कापला गेला. तो 16 डिसेंबर 1974 चा दिवस होता. आणि आश्चर्य म्हणजें, त्या घटना आजही माझ्या मनांत ताज्या आहेत. जर मी धीर धरला नाहीं तर मला सहज रडू येईल — उदाहरणार्थ, माझ्या मुलांनी तिला कधीच जाणले नाहीं असा विचार करून. नाताळच्या दुसऱ्या दिवशी आम्हीं तिला पुरलें. किती मौल्यवान नाताळ होता तो!

तुमच्यापैकीं अनेंकांना या नाताळमध्यें आपलें आप्तजन या जगातून गेल्याची अधिक स्पष्टपणें अनुभूती होईल. त्या आठवणींचा प्रतिकार करू नका. त्यांना येऊ द्या. ते अनुभवा. जीवन आणि मरण या दोहोंमध्यें – आपल्यातील आपुलकीला अधिक तीव्रता देणें यापेक्षा मोठी प्रीति आहे काय? पण अरे, त्यां आठवणीं आपसातले कटूपण स्मरून निष्ठूर होऊ नकां. कटूपण स्मरून निष्ठूर होणें हे आत्मघाती आहे.

येशू नाताळाला या जगांत आला जेंणेंकरून आपल्याला सार्वकालिक जीवनप्राप्ती व्हावी. “मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणें व्हावी म्हणून आलो आहे” (योहान 10:10). एल्मर आणि मॅरियन यांनी त्यांची शेवटची वर्षे कुठे घालवायची यावर चर्चा केली होती. एल्मरनें सांगितलें, “मॅरियन आणि मी सहमत झालें होतो कीं आमचे शेवटचे गन्तव्यं प्रभूचे घर असेल.”

तुम्हीं स्थायिक घरासाठीं अस्वस्थ आहां का? माझे कुटुंब सुट्टीसाठीं घरी येत आहे. ऐकून बरं वाटतं. मला हे ऐकून बरं वाटतं याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजें हे कीं ते सर्व आणि मी आपल्या अंतिम घरवापसीसाठीं निवडलेले आहों. त्यामुळें जेव्हां जेव्हां आम्हीं ही जगिक घरवापसी करतो, आम्हांला त्यां अंतीम घरवापसीचा आगाऊ आस्वाद प्राप्त होते, आणि तो आगाऊ आस्वाद किती मधुर आहे.

पण तो आस्वाद तुम्हीं तेव्हांच चाखू शकतां जर तुम्हीं त्यांचे स्थान तात्पुरत्या घरवापसींना देत नाहीं. म्हणून नाताळाच्या या हंगामातील सर्व गोड गोष्टींना त्यां अंतिम, उत्कृष्ट, सर्व-समाधानकारक अशा गोड गोष्टींचे स्थान घेऊं देऊं नका. आपल्या प्रत्येक आप्तजनाने या जगातून घेतलेल्या निरोपाची आठवण आणि नाताळाचा प्रत्येक आनंद तुमची अंतःकरणें स्वर्गात असलेल्या गोष्टींकडें आकर्षित करों.

नाताळ. नाताळ म्हणजें हेंच : त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणें व्हावी म्हणून आलो आहे, नाहीं का? मॅरियन न्यूस्ट्रम, रुथ पायपर, तुम्हीं आणि मी – आम्हां सर्वांना आता आणि सर्वकाळचे जीवन मिळावे.

सार्वकालिक झऱ्यातून पिऊन या नाताळाला तुमचे वर्तमान अधिक विपुल आणि सखोल बनवा. तो अत्यंत जवळ आहे.

14 December : त्यानें त्याच्या लोकांसाठींते वास्तविक बनवलें

Alethia4India
Alethia4India
14 December : त्यानें त्याच्या लोकांसाठींते वास्तविक बनवलें
Loading
/

तर आतां ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळें, जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणांत अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे. (इब्री 8:6)

इब्री 8:6 प्रमाणें ख्रिस्त हा नव्या कराराचा मध्यस्थ आहे. म्हणजें काय? म्हणजें हें कीं त्याच्या रक्तानें – जे या कराराचे रक्त आहे (लूक 22:20; इब्री 13:20) – आम्हांसाठीं देवाच्या अभिवचनांची पूर्तता ही अंतिमरीत्या आणि निर्णायकपणें विकत घेऊन ती राखून ठेवली आहेत.

याचा अर्थ असा आहे कीं देव, त्यानें नव्या कराराची जी अभिवचनें दिलीं त्याप्रमाणें, ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारें आम्हांमध्यें आंतरिक परिवर्तन घडवून आणतो.

आणि याचा अर्थ असा आहे कीं देव आपल्यामध्यें हे परिवर्तन विश्वासाद्वारें घडवून आणतो – म्हणजें ख्रिस्तामध्यें देव आपल्यासाठीं जो सर्वकांहीं झाला त्यावर विश्वास.

नवा करार ख्रिस्ताच्या रक्ताद्वारें विकत घेण्यांत आला आहे, ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारें तो कार्यकारी केला जातो आणि ख्रिस्तावरील विश्वासानें  तो कह्यांत घेतला जातो.

ख्रिस्ताला नव्या कराराचा मध्यस्थ म्हणून कसे काम करतो याचे वर्णन इब्री 13:20-21 ह्या शात्र भागांत उत्तमरित्या केलेंलें आहे :

आता ज्या शांतीच्या देवानें ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा’ महान ‘मेंढपाळ’ आपला प्रभू येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘परत आणले,’ तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणांमध्यें येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणें करण्यास तुम्हांला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो; त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन

“तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणांमध्यें…करो” हे शब्द  नवीन कराराच्या अनुषंगानें देव जेंव्हा आपल्या अंतःकरणावर त्याचे नियम लिहितो तेव्हां नेमके काय परिवर्तन घडून येते याचे वर्णन करतांत. आणि “येशू ख्रिस्ताच्या द्वारे” हे शब्द त्यां सार्वभौम कृपेनें घडून येणाऱ्या या गौरवशाली कामाचा मध्यस्थ म्हणून येशूचे वर्णन करतांत.

म्हणून, नाताळाचा अर्थ केवळ हा नाहीं कीं देव यां सर्व छायेचे ठिकाण खऱ्या स्वरूपाला देतो, तर त्याचा हाहि अर्थ होतो कीं तो ते खरे स्वरूप घेऊन त्याच्या लोकांसाठीं ते वास्तविक बनवतो. तो ते आमच्या हृदयपटलावर लिहितो. तो तारण आणि परिवर्तन यांनी भरून असलेलीं नाताळाची भेट झाडाखाली लपवून ठेवत नाहीं, कीं जणू ती आपण जाऊन आपल्या स्वत: च्या सामर्थ्यानें उचलावी. तर ती भेट तो स्वतः उचलतो आणि तुमच्या अंत:करणांत आणि तुमच्या मनात ठेवतो आणि तुम्हांला खात्री देतो कीं तुम्हीं देवाचे लेकरू आहात.

13 December : अंतिम वास्तव येथे आहे

Alethia4India
Alethia4India
13 December : अंतिम वास्तव येथे आहे
Loading
/

सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे कीं, स्वर्गामध्यें राजवैभवाच्या सिंहासनाच्या ‘उजवीकडें बसलेला’ असा प्रमुख याजक आपल्याला आहे. तो पवित्रस्थानाचा म्हणजें माणसानें नव्हे तर ‘प्रभूनें घातलेल्या’ खर्‍या ‘मंडपाचा’ सेवक आहे. . . “पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणें सर्व वस्तू बनवण्याची सावधगिरी ठेव,” ही आज्ञा, मोशे मंडप करणार होता तेव्हां  त्याला जशी मिळाली, तसे तेहि, जें स्वर्गीय वस्तूचें प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करितात.” (इब्री 8:1-2, 5)

आम्हीं ह्या शास्त्रपाठावर यापूर्वी मनन केलें आहें. पण त्यांत आणखी बरेच कांहीं आहे. नाताळ म्हणजें छायेच्या ऐवजी खरी आणि ठोंस अशी गोष्ट.

इब्री 8:1-2, 5 ही वचनें  एक प्रकारचे सारांश रुपी मांडलेले कथन आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे कीं एक याजक जो आमच्या आणि देवाच्या मध्यें मध्यस्थी जातो, आणि देवाबरोबर आमचा समेट घडवून आणतो, आणि आपल्यासाठीं देवाजवळ विनवणी  करतो तो जुन्या कराराच्या दिवसांत व्हायचे त्यांप्रमाणें सामान्य, दुर्बळ, पापाचे अडखळत असलेला, व शेवटी मरणानें नाश पावणारा असां याजक नाहीं. तो देवाचा पुत्र आहे – सामर्थ्यशाली, पापरहित, अविनाशी जीवन असलेला.

इतकेच नाहीं तर, तो पृथ्वीवरील अशा मंडपाचा सेवक नाहीं जो जीर्ण पावतो, ज्यांस कीड लागते, जो पावसाने भिजून नाहींसा होण्याच्या बेतांत असतो, जो अग्नीने जळतो, फाटतो आणि चोरीला जातो व ज्याच्या आपल्या सर्व मर्यादा आहेत आणि ज्याचे स्थान विनाशी आहे. नाहीं, इब्री 8:2 म्हणते कीं ख्रिस्त आपल्यासाठीं “माणसानें नव्हे तर ‘प्रभूनें घातलेल्या’ खर्‍या ‘मंडपाचा’ सेवक” झाला आहे.” ही छाया नाहीं. तो स्वर्गात घातलेला खरा मंडप आहे. हे ते वास्तव आहे ज्याचे प्रतिरूप व छाया मोशेला पर्वतावर दाखवलेल्या नमुन्याप्रमाणें देण्यांत आली होती.

इब्री 8:1 सांगते त्याप्रमाणें, छायेपेक्षा श्रेष्ठ असलेल्या ह्या ‘खर्‍या’ गोष्टीविषयी आणखी एक मोठी गोष्ट म्हणजें ही कीं आपला महायाजक हा स्वर्गामध्यें राजवैभवाच्या सिंहासनाच्या ‘उजवीकडें बसलेला’ आहे. जुन्या कराराचा कोणताही याजक असां दावा करू शकला नाहीं.

येशू हा प्रत्यक्षांत देव पित्यासमोर आमचा मध्यस्थ आहे. देवाशेजारी त्याला मानाचे स्थान प्राप्त झालें आहे. त्याच्यावर देवाची अनन्य प्रीति आणि आदर आहे. तो सतत देवासोबत असतो. हे पडदे, वाट्या, मेज, मेणबत्त्या, झगे, मेंढ्या, शेळ्या आणि कबुतरांप्रमाणें छाया मात्र नाहीं. हे अंतिम, परम सत्य आहे : देव आणि त्याचा पुत्र आमच्या सार्वकालिक तारणासाठीं प्रीति आणि पवित्रतेमध्यें एकमेकांबरोबर एकत्र काम करतात.

अंतिम वास्तविकता म्हणजें देवत्वाच्या व्यक्तींमध्यें असलेले परस्पर नातेसंबंध, जें एकमेकांशी त्यांचे वैभव आणि पावित्र्य आणि प्रीति आणि न्याय आणि चांगुलपणा आणि सत्य तारण पावलेल्या लोकांमध्यें कसे प्रकट होईल याबद्दल एकमेकांबरोबर एकत्र काम करतात.

12 December : छाया बदलणें

Alethia4India
Alethia4India
12 December : छाया बदलणें
Loading
/

सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे कीं, स्वर्गामध्यें राजवैभवाच्या सिंहासनाच्या ‘उजवीकडें बसलेला’ असा प्रमुख याजक आपल्याला आहे. तो पवित्रस्थानाचा म्हणजें माणसानें नव्हे तर ‘प्रभूनें घातलेल्या’ खर्‍या ‘मंडपाचा’ सेवक आहे. (इब्री 8:1-2)

इब्रीलोकांस पत्राच्या पुस्तकाचा मुख्य मुद्दा हा आहे कीं, देवाचा पुत्र असलेला येशू ख्रिस्त हा श्रेष्ठ आणि अंतिम मानव-याजक म्हणून देवानें लावून दिलेंल्यां याजकीय सेवेची केवळ या पृथ्वीवरील व्यवस्थेमध्यें सांगड बसण्यासाठीं आला नाहीं, तर तो त्या व्यवस्थेची अंतिम पूर्तता करण्यासाठीं आणि तिचा अंत करण्यासाठीं, आणि आमचे सर्व लक्ष स्वतःवर केंद्रित करवून घेण्यासाठीं आला आहे, जो सर्वप्रथम कॅल्व्हरी येथे आमचे अंतिम अर्पण बनला आणि आता स्वर्गात आमचा अंतिम याजक म्हणून सेवा करित आहे.

जुन्या कराराचा मंडप आणि याजक आणि यज्ञ ह्या सर्व गोष्टीं केवळ छाया होत्या. आता जे वास्तविक ते आलें आहे आणि छाया लयांस गेल्या आहेत.

येथे लहान लेकरांसाठीं नाताळाच्या आगमनाविषयी एक गोष्ट आहे — आणि आपण जे एकेकाळी लहान मुलें होतो त्यां आपल्याला त्याची आठवण असेलच कीं या गोष्टींत नेमके काय व्हायचे. तुम्हीं नाताळाच्या खरेदीसाठीं तुमच्या आईबरोबर बाजारात जातां आणि समजां तुम्हीं सुपर-शॉप किराणा दुकानात हरवलांत आणि तुमची आई तुम्हांला दिसत नाहीं, आणि तुम्हांला भीती वाटू लागते आणि तुम्हीं घाबरून जाता आणि किराणावस्तु ठेवलेल्या कोणत्या लेन मधून जायचे ते कळत नाहीं, आणि तुम्हीं लेनच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावत राहतां आणि तुम्हीं रडायला सुरवात करणाच तेवढ्यांत लगेच लेनच्या एका टोकाला तुम्हांला जमिनीवर एक सावली (छाया) दिसू लागते जिचा आकार अगदी तुमच्या आईसारखी आहे. आतां, ह्यामुळें खरोखर तुमच्या जीवांत जीव येतो आणि आई येथेंच असल्याची एक आशा निर्माण होते. पण कोणती गोष्ट उत्तम आहे? आईची छाया दिसून आली ही आशा, कीं आईनें कोपऱ्यात पाऊल टाकलें आणि हे कीं ते पाऊल खरोखर तिचे आहे?

जेंव्हा येशू आपला महायाजक म्हणून प्रकट झाला तेव्हां नेमके हेच झालें. नाताळाचा अर्थ म्हणजें हांच. नाताळ म्हणजें छायेच्या ऐवजी खरी आणि ठोंस अशी गोष्ट : आई किराणावस्तु ठेवलेल्या लेनच्या एका कोपऱ्यात पाऊल टाकते आणि त्यामुळें जे सुखावलेले समाधान व जो आनंद त्यां लहान मुलाला प्राप्त होतो ते.

11 December : येशू का आला

Alethia4India
Alethia4India
11 December : येशू का आला
Loading
/

ज्या अर्थी ‘मुलें’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला मरणानें शून्यवत करावे, आणि जें मरणाच्या भयानें आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. (इब्रीलोकांस 2:14-15)

मला असं वाटतं, कीं हा शास्त्रपाठ नाताळाच्या आगमनाविषयी माझा आवडता शास्त्रपाठ आहे कारण असा दुसरा कोणताही शास्त्रपाठ मला माहीत नाहीं जो येशूच्या पृथ्वीवरील जीवनाचा आरंभ आणि शेवट – म्हणजें त्याचे देहधारण आणि वधस्तंभावरील मरण- यांच्यातील संबंध स्पष्टपणें व्यक्त करत असेल. ही दोन वचनें येशूच्या येण्यामागचा हेतू अगदी स्पष्ट करतांत; म्हणजें, त्यानें मरण सोसावे यासाठीं. नाताळाविषयीं तुमचा ख्रिस्ती दृष्टिकोन काय आहे हे तुम्हीं तुमच्या एखाद्या ख्रिस्तीतर मित्राला किंवा अजूनही तारण न पावलेल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला टप्प्याटप्प्यानें समजावून सांगण्यासाठी ह्या वचनांचा उपयोग करणें उत्तम ठरेल. तुम्हीं  टप्प्याटप्प्यानें समजावून सांगण्यासाठी एका वेळी एक वाक्यखंड घेऊन खालील पद्धतीचा उपयोग करूं शकतां :   

“ज्या अर्थी ‘मुलें’ एकाच रक्तमांसाची होती. . . “

“मुलें” हा शब्द मागील वचनातून प्रयुक्त केला गेला आहे आणि तो शब्द मशीहा म्हटलेंल्या ख्रिस्ताच्या आध्यात्मिक मुलांकडें संकेत करतो (यशया 8:18; 53:10 पहा). ही “देवाची मुलें” देखील आहेत (योहान 1:12). दुसऱ्या शब्दांत, देवानें ख्रिस्ताला पाठवलें ते विशेषत: आपल्या “मुलांचे” तारण व्हावें म्हणून.

हे खरे आहे कीं “देवानें जगावर अशी प्रीति केलीं कीं त्यानें आपला एकुलता एक पुत्र [येशू] दिला” (योहान 3:16). परंतु हे देखील खरे आहे कीं देव विशेषतः “देवाच्या पांगलेल्या मुलांनाहीं जमवून एकत्र” करित होता (योहान 11:52).आपण ख्रिस्ताला जगासाठीं अर्पण करावें आणि आपल्या “मुलांचे” तारण साध्य करून घेणें हा त्यामागे देवाचा हेतू होता (पहा 1 तीमथ्य 4:10). तुम्हीं ख्रिस्तावर विश्वास ठेऊन देवाची दत्तक-मुलें बनूं शकता (योहान 1:12).

” . . त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. . “

याचा अर्थ असा कीं ख्रिस्त देही झाला त्यापूर्वीहि तो होता. तो आत्मा होता. तो सनातन शब्द होता. तो देवासह होता आणि देव होता (योहान 1:1; कलस्सैकर 2:9). पण तो रक्तमांसाचा झाला आणि आपल्या देवपणावर मानवस्वरूपाचे आच्छादन घातलें. तो पूर्ण मनुष्य बनला आणि त्याचवेळी पूर्णतः देवहि होता. हे वेगवेगळ्या कारणांनी महान गुड आहे. ते आपल्या विश्वासाचे— आणि बायबल जे जे शिक्षण देते त्याचे –मूळ आहे.

” . . मरणानें. . . “

तो मानव बनला, हेतू हा कीं आपण मरावे. देव शुद्ध आणि अखंड असल्यानें तो पापी लोकांसाठीं मरू शकत नाहीं. पण माणूस म्हणून तो ते मरण पत्करू शकला. मरण हेच त्याचे ध्येय होते. त्यामुळें त्याला मानव म्हणून जन्म घ्यावा लागला. तो मरण्यासाठीं जन्माला आला होता. गुड फ्रायडे हा नाताळाचा उद्देश होय. नाताळ म्हणजें काय आज बहुतेक लोकांना हेच ऐकण्याची गरज आहे.

” . . कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला मरणानें शून्यवत करावे. . . “

आपल्यां मरणाने, ख्रिस्तानें सैतानाला शून्यवत केलें, म्हणजें त्याचे विषारी दांत पाडलें. कसे? आमची सर्व पापें झाकून. याचा अर्थ असा कीं सैतानाकडें देवासमोर आपल्यावर आरोप लावण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नाहीं. “देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे” (रोमकरांस 8:33) — तो कोणत्या आधारावर नीतिमान ठरवतो? येशूच्या रक्तानें (रोमकरांस 5:9).

सैतानाचे अंतिम शस्त्र जे तो आपल्याविरुद्ध उपयोगांत आणतो ते आपलें स्वतःचे पाप आहे. जर येशूच्या मृत्यूनें ते काढून घेतलें तर, सैतानाचे मुख्य शस्त्र – त्याच्याकडें असलेलें एक नश्वर शस्त्र – त्याच्या हातातून काढून घेतलें जाते. आम्हांला मरण-दंड व्हावा असा अभियोग तो आता आमच्या विरुद्ध आणू शकत नाहीं, कारण नीतिमान ठरविणारा जो न्यायाधीश त्यानें आपल्या पुत्राच्या मरणाने  आमची निर्दोष मुक्तता केलीं आहे!

” . . आणि जें मरणाच्या भयानें आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे.”

म्हणून आता आपण मरणाच्या भयापासून मुक्त आहों. देवानें आपल्याला नीतिमान ठरवलें आहे. सैतान देवाचा हा राजादेश मोडू शकत नाहीं. आणि देवाचा हेतू असा आहे कीं आपला हा राजादेश आपल्या अंतिम सुरक्षेतेसाठीं आपल्या जीवनात त्वरित अमलांत यावा. त्याचा ह्यामागील हेतू हा कीं शेवट हा हर्षनादाने व्हावा म्हणून संप्रतकाळात असलेल्या दास्याचे बंधन आणि भय हे आमच्यातून काढून टाकावें.

जर आपल्याला आपला शेवटचा आणि सर्वात मोठा शत्रू, म्हणजें मृत्यूची भीती बाळगण्याची गरज नाहीं, तर आपल्याला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाहीं. आपण मुक्त होऊ शकतो. हर्षनाद करण्यासाठीं मुक्त. आणि हा हर्ष इतरांसाठीं देखील फुकट आहे.

देवाकडून आम्हांला मिळालेली नाताळाची ही किती अप्रतिम भेट आहे! आणि आम्हांकडून जगाला!