त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्यानें जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. ‘त्यानें आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारें स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. (इफिसकरांस पत्र 1:4-5)
चार्ल्स स्पर्जन यांचा अनुभव सर्वसाधारण ख्रिस्ती व्यक्तीच्या अनुभवापेक्षा वेगळा नाहीं.
स्पर्जन, ज्यांचा जीवनकाळ 1834 ते 1892 हा होता, ते जॉर्ज म्युलर आणि हडसन टेलर यांचे समकालीन होते. त्यांनी लंडन येथील मेट्रोपोलिटन टॅबरनेकल येथे त्या काळात सर्वात प्रसिद्ध पाळक म्हणून तीस वर्ष सेवा केलीं.
त्यांचे उपदेश इतके सामर्थ्यशाली होते कीं दर आठवडी लोक ख्रिस्ताकडे वळत होते. त्यांचे उपदेश आज देखील छापले जातात आणि त्यांच्याकडें आज सुद्धा आदर्श आत्मे जिंकणारा व्यक्ती म्हणून पाहिले जाते.
ते जेव्हां सोळा वर्षाचे होते तेव्हां त्यांना जो अनुभव आला, ज्याने त्यांच्या सेवाकार्याला आकार दिला त्याची आठवण ते नेहमी करत असत :
मी जेव्हां ख्रिस्ताकडे येत होतो, तेव्हां मला वाटत असें कीं सर्व काही मीच करत आहे, आणि मला वाटत असें कीं मी कळकळीने देवाचा शोध करत आहे. मला या गोष्टीची कल्पना नव्हती कीं प्रभू माझा शोध करत होता. एखादा नवीन विश्वासणारा ही गोष्ट जाणून असेंल असें मला वाटत नाहीं.
मला तो दिवस, तो तास आठवतो जेव्हां पहिल्यांदा मला ही सत्ये समजली [कृपेची सार्वभौम, मात करणारी तत्वे ] माझ्या मनात – जेव्हां त्यांनी कार्य केलें, जॉन बनयन जसे म्हणतात, माझ्या हृदयात एक अग्नि पेटली, आणि आज देखील मला कसे वाटले ते आठवते – अचानक मी एका बालकातून एक प्रौढ व्यक्ति झालो होतो- अखेरीस देवाच्या सत्याचा सुगावा लागल्याने माझी शास्त्राच्या ज्ञानात प्रगती झाली होती.
एका रात्री, मी चर्च मध्यें बसलो असताना, मी पाळकांच्या उपदेशाचा जास्त विचार करत नव्हतो, कारण मला त्यावर विश्वास नव्हता.
मला एका विचाराने घेरले, तुम्हीं ख्रिस्ती कसे झाला ? मी देवाचा शोध केला. पण तुम्हीं देवाचा शोध कसा करू लागला ? माझ्या मनात हे सत्य क्षणात उमगले – मी त्याचा शोध केला नसता, जर माझ्या मनात आधीच देवाचा शोध करण्याच्या प्रभाव पडला नसता. मी प्रार्थना केलीं होती, असा मी विचार केला, पण मी स्वत:ला विचारले, कीं मी प्रार्थना कशी करू लागलो ? शास्त्र वाचून मी प्रार्थना करण्यास प्रेरित झालो. मी शास्त्र वाचन कसे करू लागलो ? मी ते वाचत होतो, पण मला कोणी वाचन करण्यास प्रेरित केलें ?
मग, त्या क्षणामध्यें माझ्या लक्षात आले, ह्या सर्व गोष्टीच्या तळाशी देव होता. आणि तोच माझ्या विश्वासाचा लेखक होता, आणि त्यावेळेला कृपेची तत्वे मला उमगली, आणि आज पर्येंत मी त्या पासून विभक्त झालो नाहीं आहे, आणि मी सातत्यानें हे कबूल करू इच्छितो कीं, “माझ्यात झालेंला बदल याचे सर्व श्रेय मी देवाला देतो.”
तुमच्यां विषयी काय? तुम्हीं तुमच्यां तारणाचे श्रेय देवाला देता का? ह्या सर्व गोष्टींच्या तळाशी तोच आहे का? मग ही गोष्ट तुम्हाला देवाच्या सार्वभौम, मात करणार्या कृपेच्या गौरवाची स्तुति करण्यास प्रवृत्त करते का?