पुरुष इतर पुरुषांना कसे दृढ करतात

बियरची ती जुनी व्यावसायिक जाहिरात आठवते का? एक बाप आणि मुलगा हे नेहमी प्रमाणे एका धरणावर मासेमारी करत आहेत. डोळ्यात अश्रू येत प्रौढ मुलागा हा वडिलांना म्हणतो, “बाबा, तुम्ही माझे बाबा आहात आणि मी तुम्हांवर प्रेम करतो.” हे खूपच विचित्र आहे, जो पर्यंत बाबा त्याला गमतीशीर रीतीने म्हणाले नाहीत की: “जॉनी, तू माझी बियर घेऊ शकत नाहीस.” हे खूप विनोदी होते, आणि हे खूप व्हायरल देखील झाले, कारण पुरुषांना माहित असते की ते असे करत नाही. पुरुषांना प्रोत्साहन देणे हे इतके अवघड का आहे?

मी काही अंदाज लावू शकतो. हे भावनिक आहे. पुरुष हे जेव्हा भावनिक होतात तेव्हा ते अस्वस्थ होतात. आणि जेव्हा भावना ह्या शिगेला पोहचतात तेव्हा ते खुळचट दिसतात. पुरुषांना खुळचटपणा हा आवडत नाही. शिवाय, आजच्या ह्या पुरुष-स्त्री जातीसंदर्भात-गोंधळलेल्या जगात, पुरुषांना स्वतःला इतर पुरुषांसमोर कसे व्यक्त करावे ह्याविषयी अचंबा होतो. असे असल्यामुळे आपण असे करत नाही. काही वेळेस, तुम्ही ज्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहात त्याला ते अस्वस्थ करू शकते. मला आठवते की एका तरुण पाळकाने एक उत्कृष्ट उपदेश दिला ज्याविषयी मी त्याची स्तुती करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा प्रतिसाद हा एक सौम्य फटकार होता: “मॅक, तुम्हाला माहिती आहे, खुशामत करणे हे पाप आहे.”

सर्व स्थितीत फक्त शांत राहणे हे सोपे असते तर मग ह्या सर्व गोष्टी का कराव्यात? याशिवाय, बहुतेक पुरुष हे चांगल्या रीतीने राहतात, बरोबर ना? तथापि, प्रोत्साहन, ही केवळ एक चांगली कल्पनाच नाही, तर ही पवित्र शास्त्रा मधील एक आज्ञा आहे—होय, अगदी पुरुषांसाठीही.

आपल्याला अनेक दृष्टीकोनातून प्रोत्साहन मिळू शकते, परंतु प्रेषित पौल अटकेत असताना, रोममध्ये खटल्यासाठी जात असताना देव त्याला कसे प्रोत्साहन देतो, यावरून मला शिकायचे आहे. पुनरुत्थित झालेला ख्रिस्त त्याच्या पुढे येऊन उभा राहिला आणि म्हणाला, “धीर धर; जशी तू यरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.” (प्रेषितांची कृत्ये 23:11). येथे प्रोत्साहन हे तीन विभागात आले: भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य.

भूतकाळातील विश्वासूपणाकडे लक्ष द्या

जर मी माझ्या आयुष्यात काही शिकलो असेल तर ते आहे, मी ख्रिस्ताच्या काळजीबद्दल किती विसराळू आहे. देवाची विश्वासार्हता पाहिल्याशिवाय मी कधीही त्याच्यासाठी जोखीम पत्करली नाही. एक नवीन विश्वासू म्हणून वस्तीगृह मध्ये पवित्र शास्त्र अभ्यासाचे नेतृत्व करण्यापासून ते मी 60 वर्षांचा असताना इराकमध्ये मंडळीचा पाळक होण्यासाठी जाण्यापर्यंत, त्या उचललेल्या भीतीदायक प्रत्येक पावलांमध्ये देव हा माझ्याबरोबर होता (आणि अशा इतर हजारो जनांबरोबर तो आहे). तरीही प्रत्येक पावलावर, मला देवाची विश्वासार्हता लक्षात ठेवण्यासाठी मित्र आणि कुटुंबाच्या प्रोत्साहनाची आणि शास्त्रात खोलवर रुजण्याची गरज होती.

माझ्या ह्या विसराळूपणात मी एकटाच नाही. देवाच्या विश्वासूपणाचे स्मरण करण्याचे आवाहन करून पवित्र शास्त्र अनेकदा आपल्याला प्रोत्साहन देते. हे स्तोत्रांमध्ये विशेषतः उजळून येते कारण लेखक हा देवाच्या लोकांना, अगदी निराशा आणि भीतीच्या काळातही, आपल्या प्रभूच्या तारणाचे स्मरण करण्यास प्रोत्साहित करतात (पहा, स्तोत्र 42–43).

निर्गमन मधील वल्हांडण सणापासून ते येशू ने प्रस्थापित केलेल्या प्रभू-भोजनापर्यंत, आपल्या प्रभूने विश्वासणाऱ्यांच्या जीवनात आठवणी निर्माण केल्या ह्यात काही आश्चर्य नाही. यासोबतच, आपण नियमितपणे एकमेकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. उदाहरणार्थ, पौल, थेस्सलनी येथील विश्वासणाऱ्यांना सांगतो, “म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा; असे तुम्ही करतच आहात.” (1 थेस्स. 5:11).

जुन्या करारात आणि नवीन करारात वारंवार, ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळालेले महान तारण लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित केले गेले आहे. सुवार्ता, हाच महत्वाचा विषय आहे. येशूने आपल्या वतीने केलेल्या कार्याचे स्मरण करून एकमेकांना उत्तेजन देण्यासाठी आपल्याला पाचारण देण्यात आले आहे. म्हणून, देवाने भूतकाळात कसे कार्य केले आहे याची आठवण करून देऊन इतरांना विशेषतः प्रोत्साहित करा.

आलेल्या वेळेत धीर धरा

येणाऱ्या कुठल्याही वेळेविषयी आपण प्रोत्साहन प्राप्त करावे असे आवाहन ही पवित्र शास्त्र करते. सध्याच्या वेळेमध्ये सर्वात मोठ्या निराशा ज्या आपल्याला भेडसावतात त्या आहेत: बेपर्वा असणाऱ्या लेकरांविषयी ऐकणे, कर्करोगाचे निदान, नोकरी सुटणे, विनाकारण आपल्या मनात येणारा अंधार.

स्तोत्र 27:14 मध्ये दावीद म्हणतो, “परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.” निराशामय वेळेसाठी हा धीर आहे. अशा वेळेस, “एक दीर्घ श्वास घ्या; प्रभु आपल्याबरोबर आहे.” जेव्हा देवाने मोशेला प्रोत्साहन दिले, तेव्हा “मी स्वत: येईन आणि तुला विसावा देईन.” हे मोठे प्रतिज्ञा वचन होते (निर्गम 33:14). देव त्याच्या उपस्थितीचे वचन आपल्या लागोपाठ येणाऱ्या क्षणांसाठी देतो.

“आपल्या कठीण दिवसांमध्ये आपण विश्वसनीय विश्वासूंच्या सहभागीतेत असल्याने खूप फरक पडतो.”

पवित्र शास्त्रामध्ये वारंवार प्रोत्साहन देण्याचा एक मार्ग दिलेला आहे तो म्हणजे, सहभागीता. आपल्या कठीण दिवसांमध्ये आपण विश्वसनीय विश्वासूंच्या सहभागीतेत असल्याने खूप फरक पडतो. पौल करिंथ येथील मंडळीला, “तीताच्या येण्याकडून” त्याला मिळालेल्या सांत्वनाबद्दल सांगतो (2 करिंथ 7:6). जेव्हा पौल रोममध्ये आला आणि खटल्याची वाट पाहत होता, तेव्हा तो जिथे राहत होता तिथे काही विश्वासू लोक जमले. “त्यांना पाहून पौलाने देवाची उपकारस्तुती करून धैर्य धरले” (प्रेषित 28:14–16). मला माहीत असलेले ख्रिस्ती लोक जे निराश होऊन जगलेत ते बऱ्याचदा सहभागीतेच्या बाहेर होते, ह्यात आश्चर्य नाही.

भविष्याकडे पहा

आतापर्यंत, शास्त्रवचनांमध्ये ख्रिस्ती लोकांना ज्या प्रकारे सर्वात जास्त प्रोत्साहन दिले जाते ते आहे, आपल्या भविष्याकडे पहा. पुन्हा, पौल लिहितो,

“कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघांरूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.” (1 थेस्स. 4:16-18)

भविष्यातील कृपेमुळे इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे वचन थेट आज्ञा आहे.

तर मग पवित्र शास्त्रामधील प्रोत्साहनाचा मूलभूत सारांश असा आहे: प्रथम, तुमच्या जीवनातील देवाच्या भूतकाळातील विश्वासूपणाचे स्मरण करा. जे येशूवर प्रेम करतात त्यांना जे अद्भुत तारण मिळाले आहे, त्याचे स्वतःसाठी (आणि इतरांसाठी) स्मरण करा. दुसरे म्हणजे, जेव्हा निराशा येते तेव्हा श्वास घ्या आणि प्रभूची वाट पहा. तो तुमच्याकडे येईल. त्यांनी म्हटले आहे की, तो सदोदित आपल्यासोबत राहील. इतरांच्या सहभागीतेत राहण्याचा सदोदित प्रयत्न करा. आणि तिसरे, सुवार्तेमधील आपल्या भविष्यातील आशेवर दृढ राहा—कारण जे शेवटपर्यंत राखून ठेवले गेले आहेत त्यांचे गौरव, कुठलीही वस्तुस्थिती जिचा आपण सामना करू, ते गौरव आपल्या कडून काढून घेऊ शकणार नाही.

एक पुरुष म्हणून प्रोत्साहन देण्याचा सराव करणे

काही व्यावहारिक पायऱ्यांबद्दल काय, विशेषत: पुरुषांसाठी इतर पुरुषांना प्रोत्साहन देण्यासाठी? ह्या अस्वस्थतेवर मात करण्यासाठी खाली पाच संकल्पना दिल्या आहेत. प्रत्येकासोबत, प्रोत्साहनाशी संबधित भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील विभाग लक्षात ठेवा.

1. प्रोत्साहन देणाऱ्या संस्कृतीला घडवा.

विशेषतः वडिलांनी ह्यात पुढाकार घेत इतर पुरुषांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की, लहान मुलांनी कठीण प्रयत्न करून सुद्धा काही वेळा जिंकला नाही तर उगाचच त्यांची पाठ थोपटू नका. अगदी नाही, जे विश्वासात वाढ होण्यासाठी खरी पावले उचलतात त्यांना प्रोत्साहन द्या: पहिला उपदेश, रविवारच्या शास्त्र वर्गाची पहिली शिकवण किंवा एखाद्या तरुण विश्वास करणाऱ्याला शिष्य बनवण्यासाठी पुढाकार घेणे.

मी अलीकडेच एका मंडळीमध्ये उपदेश दिला होता आणि संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळेनंतर पाळकाने सकाळी दिलेल्या उपदेशाविषयी काही प्रोत्साहनवर्धक शब्द मंडळीला सांगण्यासाठी सांगितले. मला असे यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नव्हते आणि ते उत्साहवर्धक होते. पण ज्या गोष्टीचे मी सर्वात जास्त कौतुक केले ते म्हणजे पाळकाने प्रोत्साहन देण्याच्या संस्कृतीचा हेतुपुरस्सर केलेला विकास.

2. इतर पुरुषांबद्दल चांगल्या गोष्टींची गपशप करा.

पुरुष हे विश्लेषणात्मक प्राणी असू शकतात, ज्याचे रुपांतर हे पटकन टीकेमध्ये होते. विश्वासू असलेल्या इतर विश्वास करणाऱ्यांच्या चांगल्या बातम्यांचा प्रसार करून ह्याच्या विरुद्ध लढा द्या.

कलस्सै 4:7-8 मध्ये, पौल म्हणतो, “प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयीच्या सर्व गोष्टी तुम्हांला कळवील. त्याला मी तुमच्याकडे ह्यासाठीच पाठवले आहे की, आमचे वर्तमान तुम्हांला कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे.” इतरांबद्दल सांगण्यासारख्या सकारात्मक गोष्टींचा विचार करा, जसे पौलने तुखिकविषयी केले. खऱ्या, थोडक्या आणि अस्सल टिप्पण्या ह्या पुरेशा आहेत.

3. स्वतःला प्रोत्साहित करण्याचे लक्षात ठेवा.

मी तुम्हाला पुस्तकांच्या दुकानात असलेल्या स्वतःस मदत कशी करावी ह्या विभागात घेऊन जात नाही. त्याऐवजी, मी ह्यापेक्षाही अधिक बोलत आहे जे मला उपयुक्त वाटते: स्वतःशी बोला; स्वतःचे ऐकू नका—अगदी स्तोत्रकर्त्यांप्रमाणे. स्तोत्रकर्ता स्वतःला बोलून दाखवतो, “हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास?” (स्तोत्र 42:5). मग, देवाविषयीच्या सत्याने स्वतःला उत्तेजन देऊन तो स्वतःला उत्तर देतो.

स्वतःला देवाविषयीचे सत्य सांगून दाखवा. तुम्हाला भूलीत पडणारे रात्रीचे आवाज ऐकू नका. त्याऐवजी, सुवार्तेबद्दल आणि देवाच्या अभिवचनांबद्दल स्वतःशी बोला. याकडे लक्ष द्या की पवित्र शास्त्र हे किती प्रोत्साहनवर्धक आहे—ज्यात खऱ्या अर्थाने प्रोत्साहन हा शब्द वापरला गेला आहे—जो परिस्थिती गंभीर नाही किंवा सर्व काही ठीक होईल असे ढोंग रचत नाही. त्याऐवजी, तो आपल्याला आपली आशा ही किती मोठी आहे आणि ख्रिस्तामध्ये आपले भविष्य हे किती अद्भुत आहे ह्याची आठवण करून देतो.

4. देवभिरु कृतीला प्रोत्साहन द्या.

कधीकधी नीतिमत्वाला प्रोत्साहन देणे म्हणजे वेदना सहन करणे असते. उदाहरणार्थ, थेस्सलनी येथील मंडळीतील स्वतंत्रपणे काम करणाऱ्यांबद्दल पौल लिहितो, “अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वत:चेच अन्न खावे.” (2 थेस्स. 3:12).

ज्या बांधवांना दैवी कृतीसाठी धैर्य हवे आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवा. मग कृती करणाऱ्यांची त्वरित प्रशंसा करा. जे एकमेकांसोबत त्यांच्या विश्वासाला धैर्याने वाटतात त्यांना प्रोत्साहन द्या. कामाच्या ठिकाणी आपल्याला विरोध होत असला तरीही इतर पुरुषांना कुटिल आणि भ्रष्ट पिढीमध्ये नीतिमान आणि पवित्र जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करा. ख्रिस्ताच्या वतीने उभे राहिल्याबद्दल देव त्यांचा सन्मान करील हे लोकांना कळू द्या.

मी करत असलेल्या सेवाकार्यातील एक उदाहरण म्हणून, मी अनेकदा एखाद्या तरुणाला मिशन क्षेत्रात जाण्याची इच्छा व्यक्त करताना ऐकले आहे. जर त्यांच्यासारखे पुरुष तुमच्या मंडळीमध्ये असतील, तर कृपया त्यांना महान आज्ञेच्या माध्यमातून जगण्याची इच्छा करण्यापासून अनावश्यकपणे परावृत्त करू नका. त्यांना प्रोत्साहन द्या.

५. प्रोत्साहन देण्याची सेवा मिळवण्याचा यत्न करा.

मी एकदा डॉक्टरांशी त्यांच्या मैत्रीबद्दल विचारले आणि त्यांनी मला सांगितले, “माझी पत्नी ही माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि त्यामुळे मला खरोखर इतर मित्रांची गरज नाही.” मला वाटते की अनेक पुरुषांना असेच वाटते. पण प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तुम्ही इतर पुरुषांशी मैत्री केली तर तुमच्या त्या सेवेबद्दल काय?

“मी हे शिकलो आहे की, प्रोत्साहन देणारे असणे हे कठीण आहे आणि नित्य प्रोत्साहन देत राहणे हे जवळजवळ अशक्य आहे.”

जेव्हा इतरांच्या द्वारे आपल्याला प्रोत्साहन दिले जाते तेव्हा आपल्याला आनंद मिळतो हे आपण समजतो, परंतु जेव्हा आपण इतरांना प्रोत्साहन देतो तेव्हा आपल्याला आनंद कसा मिळतो याचा आपण नेहमी विचार करत नाही. एखाद्याला कमी लेखणे, अपमानित करणे, टीका करणे, हे सोपे असते. पण घडवणे, इतरांना ईश्वरी कृतीसाठी प्रवृत्त करणे आणि इतरांमध्ये चांगले शोधणे हे कठीण असते. परंतु पुरुषांना ख्रिस्तामध्ये वाढण्यास प्रवृत्त करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हे आवश्यक असते. संकटातही आनंद आणण्यासाठी येशू वापरत असलेल्या देणग्यांपैकी एक म्हणजे प्रोत्साहना देण्याचे कार्य आहे. अर्थात, मंडळीच्या संदर्भात हे सर्वोत्तम रीतीने घडते. पुरुषांनो, तुमच्या मंडळीमध्ये तुम्ही मित्र बनवा. तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचे आहे अशा पुरुषांशी भेटणे सुरू करा. मग तुमच्या प्रोत्साहन देण्याच्या सेवेमध्ये हेतुपुरस्सर व्हा. मी एक ख्रिस्ती म्हणून अनेक दशके जगलो आहे. मी हे शिकलो आहे की, प्रोत्साहन देणारे असणे हे कठीण आहे आणि नित्य प्रोत्साहन देत राहणे हे जवळजवळ अशक्य आहे. म्हणून, ख्रिस्तामध्ये, एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित व्हा.

लेखक: मॅक स्टाइल्स

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *