परमेश्वर केंद्रित पवित्रशास्त्राचा आनंद घेणे

पाळक – पेपरेल, मॅसॅच्युसेट्स

तुम्हाला उपदेशांबद्दल एक आंतरिक गुपित जाणून घ्यायचे आहे का? ते अगोदरच तुमच्या लक्षात आले असेल. जर नसेल, तर कदाचित आता पुढे ते तुमच्या लक्षात येईल. हे गुपित म्हणजे हे : उपदेशकांना अनेकदा एखाद्या चित्रणाने, कथेने, शब्दाने, वाक्प्रचाराने किंवा पवित्रशास्त्रातील एखाद्या उताऱ्याने उपदेश सुरू करायला आणि मग शेवटी पुन्हा त्याच गोष्टीकडे परत येणे आवडते. अशा प्रकारचा प्रारंभ आणि शेवट उपदेशकाचा मुद्दा अधोरेखित करतो आणि तो मुद्दा मंडळीच्या अंतःकरणात आणि विचारांत अधिक खोलवर रुजतो.

पवित्रशास्त्राचे लेखक हे जाणून होते. राजा दावीद स्तोत्र 103 ची सुरुवात स्वतःला हा उपदेश देत करतो: ““हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर” (स्तोत्र 103:1). आणि तो ह्या स्तोत्राचा शेवट अगदी अशाच प्रकारे करतो: “हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर!” (स्तोत्र 103:22). (स्तोत्र 103:22). अशा प्रकारचा प्रारंभ आणि शेवट (याला तांत्रिक भाषेत inclusion म्हणतात) संपूर्ण स्तोत्राचा मुख्य मुद्दा अधोरेखित करतो. दावीद स्वतःच्या जीवाला परमेश्वराचे स्तवन करण्यास प्रवृत्त करतो. आणि मध्ये असलेला सर्व मजकूर परमेश्वराचे स्तवन का करावे यामागील कारणे मांडतो, तसेच तो अखिल स्वर्ग आणि पृथ्वीला या स्तवनामध्ये सामील होण्याचे आवाहन करतो.

जर एखाद्या स्तोत्राचा प्रारंभ आणि शेवट त्याच्या मुख्य आशयावर जोर दर्शवत असेल, तर मग संपूर्ण पवित्रशास्त्राचा प्रारंभ आणि शेवट ह्याविषयी काय? ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राच्या प्रारंभाचे आणि शेवटाचे परीक्षण करतो तेव्हा आपल्याला काय आढळून येते?

शेवट हा प्रारंभापासून आहे

उत्पत्ति 1:1 म्हणते, “प्रारंभी देवाने . . .” —सूर्यास्त, समुद्री शैवाल, जिराफ, बीजगणित, वीज, टोमॅटो, हास्य, सुपरनोवा, बबलगम, कॉफी—अश्या इतर सर्व गोष्टीं अस्तित्वात येण्यापूर्वी, फक्त त्रैक्य देव हा होता, जो त्याच्याच त्रैक्यतेत अनादीकाळापासून आनंदी होता. आणि इतर सर्वजण हे नंतर अस्तित्वात आले.

पवित्रशास्त्राच्या दुसऱ्या टोकाला, म्हणजे प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या शेवटी एका सार्वकालिक भविष्याचे वर्णन आहे ज्यामध्ये “पाहा,’ देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि’ देव स्वतः त्यांच्याबरोबoर राहील.” (प्रकटी. 21:3). अश्या ह्या शेवटाविषयी तीन सत्ये लक्षात घ्या. प्रथम, परमेश्वर बायबलमध्ये प्रारंभापासून ते शेवटपर्यंत येतो, जो प्रारंभ आणि शेवट दोन्ही ठिकाणी ठामपणे उपस्थित आहे. तो पवित्रशास्त्राचा अल्फा आणि ओमेगा, पहिला आणि शेवटला आहे. तो कधीही निर्माण केला गेला नाही आणि तो कधीही लयास जाणार नाही. तो अखंड, अपरिवर्तनीय वास्तव आहे. त्याला सोडून इतर कुणाबद्दल हे सत्य नाही. बायबलच्या प्रारंभी आणि शेवटी दोन्ही ठिकाणी फक्त  परमेश्वरच उपस्थित आहे.

दुसरे, उत्पत्ति 1 पासून ते प्रकटीकरण 21 पर्यंत एक महत्त्वाचा बदल घडून आलेला दिसतो. बायबलच्या अगदी सुरुवातीपासूनच, देव स्वतःच्या परमानंदमय सहभागीतेमध्ये अस्तित्वात आहे. आणि बायबलच्या अगदी शेवटी, जेव्हा तो सर्वकाही नवे करतो, तो त्याच्या लोकांसोबत वस्ती करतो. हे लोक आणि असे स्थान आलेत तरी कुठून? देवाने स्वतःच हे पापमुक्त लोक आणि स्थान तयार केले आहे.

“देवाच्या लोकांची आरोळी ही नेहमीच देवाविषयी वृध्दिंगत तळमळ असते.”

तिसरे सत्य हे, हे लक्षात घेण्यासारखे आहे की जरी एक पुस्तक म्हणून बायबलचा शेवट होतो, तरी त्यातील घटनाक्रम (वा वृत्तांत) थांबत नाही तो सुरूच राहतो. बायबलच्या शेवटच्या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायाचे उपांत्य वचन (प्रकटी. 22:20) ही हृदयातून आलेली आरोळी आहे: “ये प्रभु येशू!”, ज्याचा अर्थ असा आहे की शास्त्रवचनांचा शेवट हा, ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या सखोल, परिपूर्ण, समृद्ध अनुभवासाठी उत्कटतेने होतो. देवाचा वृत्तांत सनातन आहे. देवाच्या लोकांची आरोळी ही नेहमीच देवाकडे अधिकाधिक जवळ जाण्याची तळमळ असते.

प्रत्येक वृत्तान्तांच्या मागे एक वृत्तांत

ह्या सर्वांचे तात्पर्य म्हणजे हे की बायबलचा वृत्तांत हा सरतेशेवटी आपल्या विषयी नसून देवाविषयी आहे. देव स्वतःच मुख्य पात्र—आणि लेखक देखील आहे, जो हालचाली ठरवतो. बायबल प्रामुख्याने देवाचे कार्य, देवाचा मार्ग आणि त्याचे शास्त्र यांविषयी भाष्य-ग्रंथ आहे.  

होय, ह्यात बरेचसे दुय्यम पात्र आणि मनोरंजक कथानक आहेत. आपण संपूर्ण जगभरातील भौतिक निर्मितीबद्दल, ज्यामध्ये वनस्पती आणि प्राणी जीवनाची विपुलता आणि विविधता समाविष्ट आहे, ह्यांविषयी शिकतो. आपण नोहा, अब्राहम, मोशे, दावीद, नेहेम्या, पेत्र, पौल आणि इतर शेकडो लोकांचे आकर्षक वृत्तांत वाचतो, ज्यांनी मोठ-मोठ्या चुका केल्यात आणि मोठ-मोठ्या गोष्टी देखील साध्य केल्यात. बायबलमध्ये मानवी दुर्बलता, बंडखोरी, कारस्थान, प्रेम, धैर्य आणि शोकांतिकेचे वृत्तांत आहेत. पण ह्यातील एकही वृत्तांत हा मुख्य  नाही. ह्यांतील एकही पात्र हा मुख्य नायक नाही.

बायबलचा सर्वांगीण वृत्तांत हा देवाचा वृत्तांत आहे—एकमेव असा देव जो प्रारंभी आणि शेवटी दोन्ही ठिकाणी उपस्थित आहे. इतर प्रत्येकजण (आणि सर्व काही) ह्या कथेत त्यांची योग्यता नसतांनाही आमंत्रित अतिथी म्हणून आहेत. मानवी अस्तित्वाची सर्व गुंतागुंत आणि ताराकामंडलांचे विशाल आयुष्य, देवाच्या सार्वकालिक वृत्तांतात अस्तित्वात आहे.

मुख्य पात्राकडे दुर्लक्ष करणे

बायबल हा मुख्यतः देवाचा वृत्तांत आहे, काहीही न समजता असा स्पष्ट दावा केला जाऊ शकतो, परंतु अशा प्रकारे यथार्थाला चुकणे हे किती सोपे आहे. वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध बायबल विद्वानाने “द नेग्लेक्टेड फैक्टर इन न्यू टेस्टामेंट थियोलोजी (The Neglected Factor in New Testament Theology)” नावाचा लेख लिहिला होता. त्यात त्यांने देव स्वतः उपेक्षित घटक असल्याचा युक्तिवाद केला होता! शास्त्रवचनांचा काळजीपूर्वक आणि कठोरपणे अभ्यास करण्यासाठी वचनबद्ध असलेल्यांनी देवाची उपस्थिती इतकी वारंवार गृहीत धरली होती की त्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले गेले. होय, असे प्रत्यक्षात घडते.

दैनंदिन स्तरावर, आपल्यापैकी बरेच जण प्रामाणिकपणे कबूल करू शकतात की आपण ज्या वृत्तांतामध्ये वावरतो त्यांच्या केंद्रस्थानी आपण स्वतःला  ठेवतो. जेव्हा आपण देवाला स्थान देतो (बहुतेकदा ज्याला आपण पूर्णपणे विसरलेले असतो), तर तो आमच्या स्वतःच्या कथेत कसा बसतो हे पाहतो. त्याने वारंवार हस्तक्षेप केला नाही म्हणून आपण गोंधळलेले किंवा रागावलेले किंवा दुःखी असू शकतो. किंवा त्याने जे केले त्याबद्दल आपण मनापासून कृतज्ञ असू शकतो. पण सरतेशेवटी, आपण हा वृत्तांत उलटवून टाकतो : देवाला आमच्या  कथांमध्ये जागा दिली जाते, त्याऐवजी हे उलटे असायला पाहिजे. कदाचित परमेश्वराविषयी केंद्रियता आपल्याला वाटते तितकी स्पष्ट नाही.    

कधी-कधी उत्पत्ती आणि प्रकटीकरणाच्या महान बायबलच्या पुस्तकांकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनातून देवाला कमी लेखण्याची आणि दुर्लक्षित करण्याची आपली प्रवृत्ती स्पष्ट दिसून येते. देवाने निर्मिती नेमकी कशी आणि केव्हां केली, तसेच त्याच्या पुनरागमनाच्या काळ-वेळेच्या संघर्षासाठी हे दोन्ही ही रणांगणे ठरतात. हे प्रश्न महत्त्वाचे नाहीत असे नाही. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, ह्यांनी कधी-कधी प्रत्यक्षांत देवालाच पडद्याआड केले आहे. देवाने कार्य कसे केले आहे (किंवा तो काय करील) ह्याबद्दलच्या असलेल्या आपल्या मोहामुळे, त्याने कृतीत आणलेल्या मुख्य सत्याकडे—आणि त्याच्याबद्दल ते जे काही सांगते, त्याकडे बरेचदा घोर दुर्लक्ष झाले आहे.

एवढेच नव्हे तर, उत्पत्ती आणि प्रकटीकरण (जे आमच्याकडे आहेत) ह्यांची थोडक्यात माहिती देखील दर्शवून देईल की ही दोन महान पुस्तके देवाचा वृत्तांत सांगतात.

प्रारंभाच्या केंद्रस्थानी

उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपल्याला कळून येते की, सर्व गोष्टी ह्या देवाकडून आणि देवासाठी आहेत. तो सर्वांचा उत्पन्नकर्ता आहे आणि ह्या सर्वांचा आनंद घेणारा सर्वप्रथम तोच आहे. तो शब्द बोलून सर्वकाही अस्तित्वात आणतो. ह्याचा अर्थ आहे की इतर सर्व काही निर्मित करण्यात आलेले आहे आणि त्या सर्वांचा स्रोत हा त्याच्यामध्ये आहे. एवढेच नाही तर निर्मिती करत असतानाही, तो जे बनवतो त्याचे निरीक्षण करतो आणि त्याचे कौतुक देखील करतो. वारंवार, तो पाहतो की त्याची जी निर्मिती आहे ती चांगली आहे (उत्पत्ति 1:4 , 10 , 12 , 18 , 21 , 25), अगदी “खूप चांगली” (1:31). यावरून आपल्याला कळून येते की तो खरोखर तिचा आनंद घेत आहे. सर्व गोष्टी ह्या त्याच्याकडून आणि त्याच्यासाठी आहेत.

शिवाय मानवजात, ह्या “खूप चांगल्या” निर्मितीची श्रेष्ठता, त्याची योग्यता प्रदर्शित करण्यासाठी अस्तित्वात आहे. देवाने त्याच्या प्रतिरुपाप्रमाणे (उत्पत्ति 1:26) केलेली पुरुष आणि स्त्रियांची निर्मिती ही सूचित करते की, त्यांनी उर्वरित जगासमोर त्यांच्या कार्यांद्वारे आणि त्याची सेवा करण्याद्वारे त्याचे प्रतिरूप सादर करावे. “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा” (उत्पत्ती 1:28) ही त्याची आज्ञा दर्शविते की त्यांच्या योग्यतेचे त्यांचे प्रदर्शन हे केवळ स्थानिक स्तरासाठी नाही तर जागतिक स्तरासाठी आहे. आणि देव सर्व मानवजातीला आशीर्वाद देण्याच्या आणि सर्वत्र त्याची योग्यता प्रदर्शित करण्याच्या त्याच्या कार्यात अगदी नेटाने उभा आहे. तो आदाम आणि हव्वा ह्यांच्या बंडखोरीमुळे त्याचा कार्याला मार्गी लागु देत नाही, परंतु मानवतेसोबत चिकाटीने काम करत आहे. महापुराच्या विध्वंसानंतर, तो नोहाच्या कुटुंबापासून पुन्हा सुरुवात करतो. राष्ट्रांचा अहंकारीपणा (उत्पत्ति 11) असताही, तो अब्राहमाला “पृथ्वीवरील सर्व कुटुंबांसाठी” दैवी आशीर्वादाचा एक मार्ग म्हणून सेवा करण्यासाठी बोलावतो (उत्पत्ति 12:3).

उत्पत्तीच्या संपूर्ण पुस्तकात, देव हा सार्वभौम नियोजक, सतत आरंभकर्ता आणि मुख्य नायक आहे. तोच तो आहे जो महापूर पाठवतो, अब्राहमाला बोलावतो, अब्राहमाला आशीर्वाद देतो, इसहाक आणि याकोबाशी केलेल्या कराराचे नूतनीकरण करतो आणि योसेफाला त्याच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी मिसर देशामध्ये अगोदरच पाठवतो (उत्पत्ति 45:7 ; 50:20). तोच वृत्तांत लिहितो आणि पावलो-पावली पुढे ही नेतो.

त्याचप्रकारे देव हा त्याच्या लोकांसाठी सर्वात गोड आशीर्वाद, मौल्यवान खजिना आहे. आदाम आणि हव्वेच्या बंडानंतर, त्यांची सर्वात मोठी शिक्षा म्हणजे देवाच्या उपस्थितीतून हद्दपार होणे ही होती (उत्पत्ति 3:22-24). देवाने अब्राहमाला दिलेले वचन की, “मी तुझा व तुझ्यामागे तुझ्या संतानाचा देव राहीन” आणि अब्राहमाच्या वंशजांना दिलेले वचन की “मी त्यांचा देव राहीन.” (उत्पत्ति 17:7-8) हे भूमी आणि संततीच्या आशीर्वादापेक्षाही अधिक मौल्यवान आहेत.

उत्पत्तीचे पुस्तक हे एक गहन असे परमेश्वर-केंद्रित पुस्तक आहे. ज्यात सर्व गोष्टी ह्या देवाकडून, आणि देवासाठी आहेत.

शेवटाच्या केंद्रस्थानी

प्रकटीकरणाच्या पुस्तकात असलेले सात आशीर्वाद (पहिला 1:3 मध्ये आणि शेवटला 22:14 मध्ये) दर्शवतात की ह्या पुस्तकाचा मुख्य उद्देश हा काळाच्या शेवटाविषयी जिज्ञासा पूर्ण करणे किंवा उघड केलेल्या गोष्टींविषयी कोडी सोडवत बसणे नाही तर देवाच्या पीडित लोकांवर दैवी आशीर्वाद आणणे आहे. कृपा मिळावी ही देवाची इच्छा आहे, जसे की 1:4 मध्ये (“ह्यांच्याकडून कृपा…असो”) आणि 22:21 (“प्रभू येशूची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो”).

“देवाचा आशीर्वाद ही अशी देणगी नाही जी त्याच्यापासून वेगळी करता येण्यासारखी आहे. उलट देवाचा आशीर्वाद हा देवालाच प्राप्त करणे आहे.”

महत्त्वाचे म्हणजे, देवाचा आशीर्वाद ही अशी देणगी नाही जी त्याच्यापासून वेगळी करता येण्यासारखी आहे. उलट, देवाचा आशीर्वाद हा देवालाच  प्राप्त करणे आहे. नव्या सृष्टीमध्ये, तो त्याच्या लोकांसोबत “वास” करेल (प्रकटी. 21:3), एक असे वचन जे इस्राएलमध्ये निवासमंडपात त्याच्या उपस्थितीची आठवण करून देते. खरेतर, नव्या येरुशलेमाचे समभूज सोनेरी चौकटी स्वरूप (प्रकटी. 21:15-21) निवासमंडपातीलती परमपवित्र स्थानास मान्यता देते, ते ह्याला सूचित करते की नवीन सृष्टीमध्ये देवाचे लोक त्याच्या उपस्थितीचा आनंद तात्काळ घेतील, ज्याला घेण्याची परवानगी ही फक्त मुख्य महायाजकाला होती (आणि ती ही फक्त वर्षातून एकदाच).

नवीन जगात, त्याचे लोक त्याचे मुख पाहतील (प्रकटी. 22:4), एक असा आश्चर्यकारक विशेषाधिकार ज्याविषयीची परवानगी ही मोशेला देखील नव्हती. आदाम आणि हव्वेच्या पापानंतर आणि त्यांना बागेतून काढून टाकल्यानंतर सुरू झालेल्या, आणि वचनदत्त भूमीतून इस्रायलच्या गुलामगिरीपर्यंत सतत चालू राहिलेल्या, देवाच्या उपस्थितीपासून काढून टाकले जाण्याविषयीचा दीर्घ आणि वेदनादायक वृत्तांत शेवटी समाप्त होईल. देवाचे लोक नवीन सृष्टीमध्ये त्याच्या परिपूर्ण उपस्थितीचा आनंद घेतील आणि त्यांना पुन्हा कधीही घालवून दिले जाणार नाही.

दरम्यान, ह्या वचन दिलेल्या भविष्याची देवाचे लोक वाट पाहत असताना, प्रकटीकरण त्यांना असे सांगून आधार देते की कुठलीही गोष्ट ही योगायोगाने घडत नाही, तर सर्व गोष्टी ह्या देवाच्या सार्वभौम योजनेनुसार घडतात. ह्या सर्वांना सांगून दाखवणारे  एक पुस्तक आहे “हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ते देवाने ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहेत, त्या आपल्या दासांना दाखविण्यासाठी ख्रिस्ताला दिले” (प्रकटी. 1:1). ह्या वचनात आलेल्या आवश्यक  ह्या मुख्य शब्दाने दैवी आवश्यकता ही व्यक्त केली पाहिजे. ह्या पुस्तकाचा शेवट या आठवणीने होतो की, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना स्वतःचा पवित्र आत्मा देणारा देव प्रभू ह्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्याच्या सेवकांना कळविण्यासाठी त्याच्या दूताला पाठविले आहे.”(प्रकटी. 22:6). हे घडलेच पाहिजे  कारण ही देवाची इच्छा आहे. त्याचे सार्वभौम नियंत्रण हे वर्तमान काळात भक्कम दिलासा आणि बळ पुरवते.

प्रकटीकरणाचे पुस्तक हे मूलत: देव-केंद्रित आहे. सार्वभौम देव ह्या जगाचे मार्ग निर्धारित करतो. तेजस्वी, त्रैक्य देव हा त्याच्या लोकांचे ध्येय आणि खजिना आहे. देवदूत आणि मानव यांच्या उपासनेच्या केंद्रस्थानी त्याचे राजासन आहे (प्रकटीकरण 4-5).

एका देव-केंद्रित जगाचा आनंद

बायबलचा प्रारंभ आणि शेवट हा देव-केंद्रिततेला सूचित करतो की संपूर्ण बायबल हे खरं तर देवाची वृत्तांत सांगण्यासाठी देवावर केंद्रित आहे. आणि ही आमच्यासाठी खूप उत्तम बातमी आहे. ज्यावेळेस आपण आपले जीवन हे फक्त स्वतःसाठी जगतो तेव्हा आयुष्य चांगले जात नाही. परंतु जेव्हा आपण आपले जीवन हे त्याच्यासाठी जगतो तेव्हा आपण त्याने कार्य करण्यासाठी निर्मित केलेल्या अखिल विश्वाच्या कणा-कणा सोबत जगत असतो. त्यामुळे आपण खरा, सखोल, चिरस्थायी आनंद अनुभवतो. ज्यावेळेस बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने ऐकले की येशूची ख्याती ही वाढत जात आहे, तेव्हा तो म्हणाला, “माझा हा आनंद आता पूर्ण झाला आहे” (योहान. 3:29). एक स्पॉटलाइट ऑपरेटर म्हणून खऱ्या नायकावर प्रकाश टाकून योहानाला खूप आनंद झाला.

जीवन चरित्र लेखक अरनॉल्ड डॅलिमोर ह्यांनी चार्ल्स स्पर्जनबद्दल एक जीवन वृत्तांत लिहिला आहे, ज्यांच्या दिवसात रस्त्यावरील दिवे हे गॅसने पेटवलेले जायचे. प्रत्येक दिवा हा स्वतंत्रपणे पेटवावा लागत असत. एका रात्री स्पर्जनने एका टेकडीच्या पायथ्यापासून ते शिखरापर्यंत सरळ गेलेली पथदिव्यांची एक सरळ रेखा पाहिली. त्या क्षणाचे वर्णन त्यांनी नंतर केले ते असे:

मला दिवा लावणारा हा दिसला नाही. त्याचे नाव, त्याचे वय, त्याचे राहण्याचे ठिकाण हे मला माहित नाही; पण त्याने जे दिवे लावले होते ते मला दिसले आणि तो स्वत: निघून गेल्यावर ही ते दिवे जळत राहिले. त्या पथदिव्यांच्या प्रकाशात चालत असताना मी माझ्या मनात विचार केला, “सार्वकालिक जीवनाची पवित्र ज्योत एकामागून एका आत्म्यासाठी प्रज्वलित करण्यासाठी माझे जीवन हे व्यतीत व्हावे अशी प्रामाणिक इच्छा माझ्या मनात कितपत आहे! असे करत असतांना मी स्वतः शक्य तितका दृष्टीआड राहील आणि ज्यावेळेस माझे हे काम पूर्ण होईल तेव्हा वरील चिरस्थाई तेजात मी विलीन होऊन जाईल.” (स्पर्जन , 162) एका खऱ्या देवाच्या एका महान कथेत जगत असताना आपण आपल्या आनंदाला अधिकाधिक वाढू देऊया.

लेखक

स्टीफन विटमर

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *