आम्ही कोमट लोकांना का इशारा देतो
मिस्टर ए मंडळीचे सभासद आहेत. त्यानी अनेक वर्षांपूर्वी बाप्तिस्मा घेतला होता, अजूनही ते विश्वास व्यक्त करतात आणि रविवारी नियमितपणे उपस्थित असतात. येशूवर फार प्रीती करण्यासाठी किंवा आध्यात्मिक गोष्टींबद्दल फार उत्साही म्हणून त्यांची ओळख नाही, ते उघड पापी म्हणून देखील ओळखले जात नाहीत. ते पुरेसे चांगले आहेत. ते वेळोवेळी सेवा करतात आणि दारातून बाहेर पडताना इतरांशी संभाषण करणे टाळत नाहीत. ते आपल्या काही पापांशी संघर्ष करतात, पण कोण करत नाही?
दर आठवड्याला ते एकाच बाकावर बसत असले, तरी खरे सांगायचे तर ते निघून जरी गेले तर अनेकांच्या लक्षातही येणार नाही. ते अगदी मनापासून विश्वास बाळणणारे असा कित्ता नाहीत. पण ते अजूनही सभासद आहेत – वेगवेगळे सदस्य, वेगवेगळी दाणे.
ते पवित्रतेत वाढत आहे का? खरंच सांगता येत नाही. ख्रिस्ताविषयीचे त्यांचे ज्ञान वाढत आहे का? सांगणे कठीण आहे. ते खरंच बंधूंवर प्रीती करतात का? बरं, तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? ते देवाच्या प्रीतीने उबदार होतात का किंवा प्रभू येशूमध्ये त्यांना आनंद होतो का? कदाचित खोलवर. आपण या व्यक्तीबरोबर मंडळीमध्ये गेला आहात, कदाचित त्यांच्याबरोबर छोट्या गटात सामील झाला आहात, परंतु या सर्वांमध्ये, त्यांच्या प्रभूबद्दल त्याचे हृदय फारसे प्रकट झाले नाही. मंदिराच्या कोपऱ्यात असलेल्या बनावट वनस्पतीप्रमाणे ते रविवार ते रविवार मंदिरातील बाकांशी एकरूप होतात.
वर्षं निघून जातात. ते कुटुंबाचे संगोपन करतात. त्यांची मुलगी लेकरांसोबत गायनात भाग घेते. त्यांची पत्नी अधूनमधून मंडळीच्या एकत्र येण्यात जेवण बनवते. ते कधीही गंभीर अनैतिकता गोष्टी करत नाहीत. ते कधीही चुकीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत नाहीत. ते येणे कधीच थांबवत नाहीत. शेवटी त्यांच्या कबरीवर लिहिले आहे, “येथे मिस्टर ए, ख्रिस्ती पती, वडील, मंडळीचे सभासद आहेत.”
वर्षानुवर्षे मला या प्रकारच्या माणसाची खूप काळजी वाटत होती – या माणसाकडे मी ओढला जात असे – बहुधा कारण मी या माणसासारखाच होतो.
अपरिवर्तितांकरिता मंडळी
अगदी स्पष्टपणे सांगायचे तर: माझा असा विश्वास आहे की मिस्टर ए सारखी माणसे बर्याच मंडळ्यांमध्ये खूप आरामात असतात आणि ते स्वत:ला नरकात झोकतात. नामधारीपणा – किंवा जर आपल्याला पवित्र शास्त्राचा शब्द हवा असेल तर कोमटपणा – विश्वास व्यक्त करणार्याच्या आत्म्यासाठी धोकादायक आहे आणि मंडळ्यांमध्ये बरेचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. येशूच्या काही शब्दांचा विचार करा.
मीठ हा चांगला पदार्थ आहे; पण मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला रुची कशाने आणता येईल? ते जमिनीला किंवा उकिरड्यालाही उपयोगी नाही; ते बाहेर टाकून देतात. (लूक 14:34–35)
कोणाएकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते; त्यावर तो फळ पाहण्यास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, “पाहा, गेली तीन वर्षे मी ह्या अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे; परंतु मला काही आढळत नाही; ते तोडून टाक; उगाच त्याने जागा तरी का अडवावी?” (लूक 13:6–7)
तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. (प्रकटी 3:1)
तू कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. (प्रकटी 3:16)
जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. (मत्तय 10:37)
उकिरड्यावर फेकला जाणारा रुचीहीन विश्वास व्यक्त करणारा. तोडून टाकले जाणारे निष्फळ अंजीराचे झाड. उघड केलेली पोकळ प्रतिष्ठा. देवाच्या तोंडातून पाण्याचा कोमट घोट ओकला जाणे. ख्रिस्ताचा शिष्य म्हणून स्वीकार न केला गेलेला निरुत्साही व्यक्ती. किती स्त्री-पुरुष धार्मिक कर्तव्याच्या सौम्य उताराचे पालन करतात आणि अगदी मंडळीचे सभासदत्वसुद्धा स्वीकारून शांतपणे नरकात जातात, हे पाहून मी थरथरतो. या आध्यात्मिक दुटप्पी लोकांचे पुढे असणार्या ख्रिस्ती लोकांशी बरेच साम्य होते, परंतु त्यांचे पाय मात्र खाली या जगाच्या प्रेमात पुरलेले असतात.
विश्वास व्यक्त करणार्यांना पाठीशी घालणे
मला ज्या गोष्टीमुळे अस्वस्थता वाटते – आणि मला वाटते की आपल्याला सुद्धा त्यामुळे अश्वस्था वाटावयास हवी – ती म्हणजे मंडळ्यांमध्ये निर्जीव विश्वास व्यक्त करणार्यांसाठी कोणतीही वेगळी श्रेणी नाही असे दिसते. काही डॉक्टर ऑफ डिव्हिनिटी झालेल्यांकरिता सुद्धा, असे दिसून येते की मंडळीच्या निर्देशिकेमध्ये मृतांची नावे असू शकतात. आता कोणतीही स्थानिक मंडळी ही परिपूर्णत: पुनरुज्जीवीतांची म्हणून आकारास येत नसली तरी, माझा मुद्दा असा आहे की पवित्र शास्त्राशी विसंगत असणार्या गोष्टींना जीवन म्हणून स्वीकारल्या जात आहे, ज्यामुळे रुंद रस्त्याला स्थानिक मंडळीमधून महामार्ग बनण्याची परवानगी दिली जाते.
जॉन पायपर लिहितात, “मी जितका जास्त काळ जगतो आणि स्वर्गाच्या जितका जवळ येतो, तितकीच त्रासदायक गोष्ट म्हणजे बरेच लोक ख्रिस्ती म्हणून जगतात, परंतु खऱ्या अर्थाने ख्रिस्ती असल्याचा फारसा पुरावा देत नाहीत.” माझ्या मनांवर तेच आहे. ते पुढे म्हणतात, “माझे दु:ख तेव्हा वाढते जेव्हा मी विचार करतो की असे लाखो लोक असू शकतात जे स्वतःला स्वर्गबद्ध, नरकापासून वाचणारे ख्रिस्ती समजतात पण ते तसे नाहीत – असे लोक ज्यांच्यासाठी ख्रिस्त त्यांच्या विचारांच्या आणि आपुलकीच्या कक्षात आहे परंतु परिवर्तनाच्या केंद्रस्थानी नाही. ते लोक येशूला न्यायाच्या वेळी असे म्हणताना ऐकतील, ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती; …माझ्यापुढून निघून जा.’ (मत्तय 7:23)” (व्हाट इज सेव्हींग फेथ?, 29) What Is Saving Faith?, 29).
“आमच्या मंडळ्यांमध्ये किती लोक असे आहेत जे वर्षानुवर्षे खरे ख्रिस्ती असल्याचा फार थोडा किंवा काहीच पुरावा देत नाहीत?”
आमच्या मंडळ्यांमध्ये किती लोक असे आहेत जे वर्षानुवर्षे खरे ख्रिस्ती असल्याचा फार थोडा किंवा काहीच पुरावा देत नाहीत? किती लोकांना आपण “बंधू” किंवा “भगिनी” म्हणतो जे त्यांच्या विचारांच्या आणि आपुलकीच्या श्वासामध्ये ख्रिस्ताला बसवतात? आपण त्यांना लक्षात घेता का? विचार करता त्यांच्यापैकी बरेच जण नाश पावले असतील — मंडळीचे प्रश्न, विनवण्या आणि चेतावणी असूनही नाही, पण चांगल्या माणसांनी उपदेश केलेल्या खऱ्या स्थानिक मंडळ्यांमध्ये आनंदाने नाश पावले असणार. आजूबाजूच्या संतांनी त्यांची पर्वा न करताच ते नरकात गेले आणि शेवटी त्यांच्या पाळक लोकांकरिता सुद्धा ते अज्ञातच राहिले आणि पाठपुरावा केला गेला नाही.
आपल्या मंडळ्यांमध्ये कोमटपणाबद्दल पश्चाताप व्हायला हवा, हलगर्जीपणाने ते बळकट होता कामा नये. महान आणि पहिली आज्ञा – आमच्या नव्या जन्माचा विशेषाधिकार — आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रीती करणे हा आहे (मत्तय 22:37–38; अनुवाद 30:6). जर आपण ख्रिस्ती जीवनासाठी आपल्या स्वतःच्या मानकांकरिता ही आज्ञा सोडून दिली, जर आपण आत्मिक हरवलेल्यांना पाठीशी घातले, डोक्याचे ज्ञान आणि नियमित उपस्थिती ख्रिस्ती बनवते हे पटवून दिले, तर इतर सर्व ठिकाणांपेक्षा आपली स्थानिक मंडळी ही आत्मिकरित्या मरण पावलेल्यांसाठी सर्वात आरामदायक बनू शकेल.
धोकादायक असंतुलन
हे दुष्टचक्र कशामुळे कायम राहू शकते? ख्रिस्ती समुदायांमध्ये नामधारी सभासदांना इतके सहज वाटण्यामागे काय कारणीभूत ठरू शकते? मला असे वाटते की प्रोटेस्टंट मंडळ्या अशा एका प्रवृत्तीमध्ये पडू शकतात जी नीतिमत्वाला अधिक लेखते आणि पुनरुज्जीवनाला कमी लेखते.
नीतिमत्वाला अधिक लेखणे
जेव्हा सर्व काही नीतिमत्वाविषयी बनते, जेव्हा ख्रिस्ताने त्याच्या बदलीच्या मरणामध्ये आपल्याबाहेर काय केले आहे यावर कथा थांबते, तेव्हा आपण सभासदत्व आणि शिष्यत्वाच्या शिथिल मानकांकडे झुकू शकतो. प्रत्येक गोष्ट त्याने साध्य केलेल्या गोष्टीशी बौद्धिकरीत्या सहमत होऊन संज्ञानात्मक संमतीपर्यंत खाली उतरू शकते — आणि मग आम्ही आमच्या “विश्वासाचे आज्ञापालन,” पश्चातापास योग्य फळ देणे, किंवा “प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास” (रोम. 1:6; मत्तय 3:8; गलती 5:6) ह्या बाबींवरील जोर म्हणजे जिवंत विश्वासाचे जीवन व कृती ह्यावरील जोर तोडून टाकतो.
“माझ्या बंधूंनो, माझ्या ठायी विश्वास आहे, असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला तारण्यास समर्थ आहे काय?” (याकोब 2:14). अर्थातच ते शक्य आहे – तारण केवळ विश्वासाने आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे? अनेक लोक उत्तर देतात. आणि असे करताना आपण मृत विश्वास व्यक्त करतो — जो उपस्थित राहतो आणि म्हणतो की तो विशिष्ट मतांगिकारांवर विश्वास ठेवतो, सार्वजनिक घोटाळा टाळतो, पण आनंदाने, भयाने “तारण साधून घ्या” किंवा “ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा ‘झटून प्रयत्न करा’” ह्या बाबींची पूर्ती करत नाही (फिलिप्पै. 2:12; इब्री 12:14) — हे सर्व खर्या नीतिमत्वातून आणि केवळ ख्रिस्तावरील विश्वासातून प्रवाहीत होते.
निर्जीव, स्पंदनहीन, उत्कट धार्मिक जीवन हे नित्य उपस्थितीतून दिसून येते – तारणासाठी देवाची हीच शक्ती आहे का? आमच्या कबुलीजबाबांनी स्पष्ट उत्तर मिळते :
अशा प्रकारे ख्रिस्त आणि त्याच्या धार्मिकतेवर विश्वास ठेवणे आणि त्यावर अवलंबून राहणे, हे नीतिमत्वाचे एकमेव साधन आहे: तरीही तो नीतिमान ठरवलेल्या व्यक्तीमध्येच केवळ नाही, तर सदैव इतर सर्व तारक कृपांमध्ये आहे, तो मृत विश्वास नाही, तर तो प्रीतीने कार्य करतो. (वेस्टमिनिस्टर कन्फेशन ऑफ फेथ,11.2 Westminster Confession of Faith, 11.2)
पुनरुज्जीवनाला कमी लेखणे
“मी तुम्हांला खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही” (योहान 3:3). या नवीन कराराच्या युगात, पृथ्वीवर नव्याने जन्म न घेतलेला कोणीही स्वर्गात नसेल ह्या येशूच्या शिकवणीने निकोदेमाचे जग उलथवून टाकले.
हे तसेच आहे. जर आपण स्वर्गात असू तर हृदय परिवर्तन, प्रीती बदल, जीव बदल झालाच पाहिजे – तरीही या बदलाची ताकद किती जणांना ठाऊक आहे? आपल्या मंडळीमधील बहुतेक सभासदांबद्दल आम्हाला अपेक्षा आहे, परंतु आपण ही बाब कधीही दृष्टी आड करू नये की नव्याने जन्माला येणे हे अचूक फळांनी जस जसा वेळ जातो तसे स्वत:ला सिद्ध करते. यहेज्केलला दिलेल्या नव्या कराराच्या वचनात असे बंधन घालण्यात आले आहे :
मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल; तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती ह्यांपासून मी तुमची शुद्धी करीन. मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांला मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. (यहेज्केल 36:25–27)
“नव्याने जन्माला येणे हे तारणाच्या अचूक फळांनी जस जसा वेळ जातो तसे स्वत:ला सिद्ध करते.”
देव आपल्याला या नव्या जन्मात एक नवीन हृदय, नवीन प्रेम, नवीन निष्ठा देईल. म्हणूनच, ख्रिस्ती म्हणून आपण दिलेली खातरी आपल्या आज्ञाधारकतेच्या आणि इतर विश्वासणार्यांवरील प्रीतीच्या जीवनाशी थेट कशी निगडित आहे याबद्दल योहान त्याच्या पहिल्या पत्रात अशी स्पष्ट विधाने करू शकतो (1 योहान 2:29; 3:9–10; 4:7; 5:1, 18).
“एकदा सभासद झाले म्हणजे कायमचे सभासद” हे आधीच व्यस्त असलेल्या पाळकांसाठी अधिक नीटनेटके, अधिक स्वच्छ आणि अधिक सोयीस्कर आहे, परंतु ते त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी – त्या महान दिवसाच्या पार्श्वभूमीवर अधिक कठीण आहे जेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांच्या आत्म्यासाठी “हिशोब” देऊ. (इब्री 13:17).
त्या दिवशी पुष्कळ जण म्हणतील
‘पुष्कळ’ हा शुभवर्तमानातील येशूच्या मुखातून निघणार्या अनेक शब्दांपैकी सर्वात दिलासादायक आणि भीतीदायक शब्दांपैकी एक आहे. येथे तो सर्वात भीतीदायक आहे :
मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे म्हणणार्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’ तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणार्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’(मत्तय 7:21–23)
अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा; कारण मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. (लूक 13:24)
अनेक हरवलेले स्त्री-पुरुष स्वत:ला तारण मिळाल्याचा विश्वास ठेवून त्या महान न्यायाच्या दिवसाकडे जातील. ते मंडळीमध्ये गेले; त्याच्या नावाने त्यांनी कामे केली; ते त्याला प्रभू म्हणत. ह्याचा क्षणभर विचार करा. देवदूत आपल्या लोकांपैकी त्यांना किंवा आपल्याला खेचून नेत असताना अत्यंत अविश्वासाने हादरून जाण्यापेक्षा अधिक दु:खी, अधिक धक्कादायक, दयनीय काही असू शकते का? “पण प्रभू, तूच माझा प्रभू आहेस! मी तुझा एक अनुयायी आहे!”
अरे, खूप उशीर होण्याआधी, आपल्याकडून होईल तितका, आपल्या लोकांना न्यायाच्या मार्गाने घसरू न देण्याचा संकल्प करा. आपण त्यांना डोळे उघडे ठेवण्यास, सतर्क राहण्यास सांगणार नाही का? नवीन करारात सापडणार्या त्या शिष्यत्वाकडे आपण त्यांना बोलवणार नाही का? मनापासून प्रार्थना करत आपण त्यांच्या आत्म्यावर लक्ष ठेवणार नाही का? देवाच्या वचनाची तुतारी त्यांच्या कानात वाजवून आपण त्यांना प्रोत्साहन देणार नाही का, बोध करणार नाही का, धिक्कार करणार नाही का? त्यांचे पाळक आणि सहसभासद ह्या नात्याने आम्ही त्यांना पृथ्वीवर ओळखत नव्हतो म्हणून ते स्वर्गातील परमेश्वराकडून “मी तुला कधीच ओळखत नव्हतो” असे ऐकतील का? आपण अनभिज्ञ राहून त्यांचे साहाय्यक होऊ का? हे परमेश्वरा, आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी, असे होऊ नये.
लेखक
ग्रेग मॉर्स