देवाच्या कृपेचे साधन म्हणून फेलोशिप (सहभागिता)
आम्ही “फेलोशिप हॉल” ह्या नावाला कमी केले.
आमच्या मंडळीने तीन वर्षांपूर्वी एक इमारत खरेदी केली. जी इमारत आम्ही खरेदी केली होती तिच्यातील असणाऱ्या एका मोठ्या हॉलला असणारे “फेलोशिप हॉल” हे नाव आम्हाला खरेदीसहित मिळाले होते. अलीकडे, काही नूतनीकरण करण्याच्या प्रक्रियेत, आम्हाला प्रत्येक खोलीसाठी एक नाव औपचारिक रीतीने ठेवणे आवश्यक होते. आणि आता हे नाव बदलून “चॅपल” असे ठेवण्यात आले आहे,
शब्द फेलोशिप (fellowship, सहभागिता) हा शब्द एन्करेज़ (encourage, उत्तेजन ) ह्या शब्दाप्रमाणे बऱ्याच मंडळींमधून सहज आणि हलक्या स्वरूपाच्या उपयोगाने योग्य अर्थभरीत जोर देऊन वापरला जात नाही. तुम्ही म्हणाल की, ही किती क्षुल्लक बाब आहे. आपण फेलोशिप ह्या नावाला पडद्याआड केले आहे, ह्या कारणामुळे नाही की त्याचे महत्व हे पवित्र शास्त्राच्या सत्यतेतून कमी होत चालले आहे. पण सत्य हे ह्याच्या अगदी उलट आहे. आपली इच्छा असावी की ख्रिस्ती जगतातून सहभागिता (fellowship, फेलोशिप) हा शब्द हळुवार पणे लोप होऊन न जाता नवीन करारातील ह्या शब्दाची सामर्थी ओळख ही आपल्या मंडळीने पुन्हा मिळवावी.
शब्द सहभागिता हा जितके आपण समजतो त्यापेक्षा मोठा आहे
जर आपण फेलोशिप (सहभागिता) ह्या शब्दाला कृपेचे साधन म्हणून आणि त्याचा सर्वोच्च हेतू हा येशूचा आनंद घेण्याचा आहे, ही संकल्पना विसरलो आहोत, तर ह्याकारणामुळे कदाचित हा शब्द आपल्याला पोकळ (अधिक महत्वाचा नाही असे) वाटू शकतो.
ही जी कृपेची साधने आहेत ते आपल्या ख्रिस्ती जीवनासाठी काहीतरी उदिष्ट, काही ध्येय, काही लक्ष्य सूचित करतात. दुसऱ्या शब्दांत ही “साधने” म्हणजे ही ती साधने आहेत ज्यांचे काहीतरी उदिष्ट आहे. परन्तु ह्याचा अर्थ असा होत नाही की ही साधने हेच उदिष्ट आहेत. आणि जर आपण प्रमुख उद्दिष्टाला अर्थभरित स्पष्टीकरण न देताच सोडले, तर त्या जागी कमी अर्थभरित उद्दिष्ट हे साधले जातील. लहान उद्दिष्ट म्हणजे थोडकी वाढ. म्हणजेच ईश्वरभक्ती किंवा पवित्रता हे उद्दिष्ट जितके महत्त्वाचे आणि मौल्यवान आहे तितके न समजणे.
“ख्रिस्त येशू, जो परमेश्वर-मनुष्य आहे, त्याद्वारे परमेश्वराला जाणून घेणे आणि त्यात आनंद करणे, हे ख्रिस्ती सहभागीतेचे ध्येय आणि शेवट आहे.”
खरे म्हणजे, येशू ख्रिस्त जो परमेश्वर-मनुष्य आहे त्याद्वारे परमेश्वराला जाणून घेणे आणि त्यात आनंद करणे हे ख्रिस्ती सहभागीतेचे ध्येय आणि शेवट आहे. जसे पौल (फिलिप्पै ३:८) मध्ये लिहितो की, “इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाचे श्रेष्ठत्व..” हा ख्रिस्ती कृपेच्या कोणत्याही सवयीचा अंतिम आनंद आहे. येशूने प्रार्थना केली—सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे (योहान 17:3)—हे त्याच्या कृपेच्या साधनांचे लक्ष्य आहे. तसेच जे.आय. पॅकर ह्यांनी लिहिल्याप्रमाणे, “एखादा व्यक्ती हा जितक्या चांगल्या रीतीने शेवट करू पाहतो तो त्या दृष्टीने साधनांचा वापरही तितकाच काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक करेल” (ऑनरिंग द पीपल ऑफ़ गॉड, 274, Honouring the People of God, 274).
ह्या साधनांपैकी, देवाचे वचन आणि प्रार्थना ह्यांना ख्रिस्ती जीवनात त्यांच्या निर्णायक स्थानासाठी बऱ्याचदा अधोरेखित केले जाते. आणि हे अगदी बरोबर देखील आहे. परंतु आजच्या ह्या एकलवादी जगण्याच्या आधुनिक युगात, एक तिसरे महत्त्वपूर्ण साधन देखील आहे—ज्याविषयी विसर पडला आहे—ज्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, ते साधन आहे: सहभागिता.
मित्रत्वापेक्षा काहीतरी अधिक
एका तारणकर्त्यात, एका आत्म्याद्वारे, एका देहाद्वारे, सहभागी होण्याची आपली पवित्र ख्रिस्ती सहभागिता ही मनोरंजन आणि सह भोजन करण्यापेक्षा अधिक आहे. नव्या करारात, हा शब्द सहभागिता हा एखाद्या भव्य ख्रिस्ती क्रीडा मोहोत्सवासारखा नाही तर मैदानावर खेळाडूंनी स्वतः एकत्र येऊन खेळ खेळण्यासारखा आहे.
कोविडचा फटका बसण्यापूर्वी कृपेचे साधन म्हणून सहभागिता ही किती महत्त्वाची होती हे कदाचित आपल्यापैकी काहींना समजलेच असेल. अनेकांनी अनपेक्षितपणे त्रास भोगला आणि आपल्या काही मंडळींना अजूनही ह्याचा परिणाम जाणवतो. एकत्र येऊन सामुहिक उपासना करणे आणि एकमेकांसमवेत सभागीतेच्या नियमित भेटीद्वारे आपल्या आत्म्याला किती पोषण मिळते आणि किती आरोग्य मिळते, ह्या प्रवृत्तीला आपण नेहमी कमी लेखतो. खासकरून आजच्या प्रचंड तांत्रिक प्रगतीच्या ह्या युगात जे आपल्यापासून दूर आहेत त्यांच्याशी आपला संपर्क हा जरी सुलभ झाला असला, पण तरी त्याचबरोबर जे आपल्या जवळचे आहेत त्या लोकांशी असलेला आपला संपर्क हा हळुवार पणे दुर्मिळ झाला आहे. आपल्या यांत्रिक उपकरणांनी आपल्या एकमेकांसोबतच्या खऱ्या मैत्रीचे आयुष्य काढून घेत आपल्या आभासी “मित्रांची” संख्या ही वाढवली आहे.
नव्या करारात नमूद केलेली सहभागिता ही सामान्य मानवी मैत्रीपेक्षा खूपच सखोल आहे. सहभागिता ही तीच्या सर्वोत्तम अर्थरुपात, बांधिलकी असलेल्या सर्व नातेसंबंधांमध्ये, म्हणजे मुबलकता आणि कमतरता, वेदना आणि गैरसोय आणि अवघडलेपणा आणि चिडचिड, ह्यांत करार निष्ठता आहे. हे अमेरिकन लोकांसाठी बऱ्याच काळापासून एक आव्हान म्हणून राहिले आहे, जेव्हां ते एखाद्या आंदोलनाला करण्यासाठी एकत्र येतात, तेव्हां ते अनेकदा हे सर्व वैयक्तिक हक्क, स्वातंत्र्य आणि आपल्या वैयक्तिक आनंदाच्या संरक्षणासाठी करतात.
देवाने आम्हाला एकमेकांसाठी दिले आहे
सहभागिता हे एक कृपेचे साधन आहे ह्याविषयी इब्री लोकांस पत्रातील दोन शास्त्रलेख हे स्पष्ट आहेत, जे आपल्या ह्या आजच्या पिढीच्या समस्येविषयी सांगून दाखवतात. इब्री 3 आणि 10 मध्ये आपण पाहतो त्याप्रमाणे, जीवन, आरोग्य आणि ख्रिस्ती विश्वासात टिकून राहणे हे एक सामुदायिक कार्य आहे. जस-जसे आपण सहभागीतेपासून दूर जात जाऊ, तस-तसे आपली अंतःकरणे ही कठीण होत जातात आणि आपला विश्वास हा ढासळत जातो.
“जीवन आणि आरोग्य आणि टिकून राहणे हे ख्रिस्ती जीवनातील एक सामुदायिक कार्य आहे.”
पण जेव्हा आपण हेतुपुरस्पर एकमेकांशी सहभागीतेत जोडले जातो आणि ते संबंध अधिक दृढ करतो, तेव्हा न केवळ आपल्याला आपली अंतःकरणे ही कोमल राहिलेली आणि आपला विश्वास टिकून राहिलेला आढळतो; पण त्याचबरोबर आपण एकमेकांसाठी ख्रिस्ताच्या कृपेचे साधन असण्याचा आनंददेखील अनुभवतो. आत्म्याला राखून ठेवण्याच्या कार्याचे मंडळीमध्ये मानवी साधन बनणे हे आश्चर्यकारक आणि अत्यंत समाधानकारक आहे. इब्री लोकांस पत्रातील हे दोन्हीही परिच्छेद आपल्याला स्थानिक मंडळीच्या करारातील सहवासात कृपा प्राप्त करण्याचे आणि कृपा करण्याचे लाभ दर्शवतात.
ह्या दोन्ही ही शास्त्रलेखातील पहिला भाग हा कदाचित आपल्याला अधिक नकारात्मक म्हणून वाटेल, परंतु दोन्ही शास्त्रभागांचे योग्य अध्ययन केले, तर त्यांचे उर्वरित भाग हे अधिक सकारात्मक बळाला स्पष्ट करतांना दिसतात.
एकमेकांवर लक्ष ठेवा
इब्री लोकांस पत्र अध्याय 3 मध्ये, लेखक आपल्या वाचकांना ख्रिस्ती जीवनात टिकून राहण्यासाठी स्तोत्र 95 मधील शास्त्र संदर्भ देत प्रेरित करतो आणि त्यानंतर फक्त स्वतःपुरतेच नाही तर संपूर्ण मंडळीसाठी ह्याचे तात्काळ लागुकरण करायला लावतो:
बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. जोपर्यंत “आज” म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी ‘कठीण होऊ’ नये. (इब्री 3:12-13)
एकमेकांना सांभाळ, एकमेकांकडे लक्ष द्या, एकमेकांची काळजी घ्या—फक्त तुमच्याच नव्हे तर तुमच्या भावाच्या आत्म्याबद्दल ही सावधगिरी बाळगा. संपूर्ण मंडळीने अशा सर्व मनुष्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे ज्यांची अंतःकरणे ही थंडावलेली असू शकतात. आणि ह्यापेक्षा दुसरी गोष्ट मोठी असू शकत नाही. “अविश्वासू हृदय” हे न केवळ दुर्दैवी असते, पण त्याच बरोबर ते दुष्ट ही असते. ही स्थिती जिवंत देवापासून दूर जाण्यास कारणीभूत ठरते—म्हणजे आध्यात्मिक जिवंतपणापासून ते आध्यात्मिक मृत्यूपर्यंत. ह्यासाठी उपाययोजना ही इब्री लोकांस पत्रात सांगितल्याप्रमाणे दोन प्रकारे आहे.
प्रथम म्हणजे दक्ष राहण्याचे दैनंदिन कार्य. रोजच का? सर्व प्रथम ह्यासाठी की स्तोत्र 95 मध्ये “आज” असे म्हटले गेले आहे. आपल्याला उद्याविषयीचे कुठलेही वचन दिले गेलेले नाही. जर तुम्हाला स्वतःमध्ये किंवा तुमच्या बंधूमध्ये अंतःकरणाची कठोरता ही दिसत असेल, तर तिला लगेचच शोधून आजच बाहेर काढा. अशा प्रकारे स्वतःच्या आत्म्याची आणि इतरांविषयी काळजी ही (मासिक किंवा वार्षिक) करण्याऐवजी, दैनंदिन आणि साप्ताहिक स्तरावर करणे आवश्यक आहे. मनाची अशी ही कठोरता तर एका दिवसात एकाच वेळी नव्हे, तर टप्प्या-टप्प्याच्या हळुवार वाढीमुळे होते. पण आनंदाची बातमी अशी आहे की ही स्थिती टाळता येऊ शकते आणि तुम्हाला काहीतरी झाल्याशिवाय अशी स्थिती उद्भवत नाही. वाईट बातमी अशी आहे की अशी ही होणारी वाढ ओळखणे हे कठीण असू शकते आणि कालांतराने त्यात मोठी वाढ होऊ शकते. परंतु नियमित दक्ष राहिल्यामुळे आपल्याला अशा प्रकारे कठोर होण्याच्या स्थितीपासून दूर राहता येते. सहभागिता हे देवाच्या कृपेचे एक साधन आहे जे आपल्या अंतःकरणाच्या थंड होण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आणते.
द्वितीय प्रयुक्त बळ, म्हणजे वचनांचे सामर्थ्य: “एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा.” दिलेला शब्द ‘बोध’ (exhort) (ग्रीक पराकलेओ, parakaleo) हा शब्द इतर संदर्भांमध्ये ‘सांत्वन’ किंवा ‘उत्तेजन’ ह्या अर्थाने आढळतो. (जसे इब्री 10:25 मध्ये दिल्याप्रमाणे). ह्या शब्दाच्या मुख्य अर्थात हा शब्द एकमेकांना वचनाच्या द्वारे आधार देणे—वेगवेगळ्या संदर्भात विविध तर्हेने वचनाच्या द्वारे एकमेकांना सहाय्य करणे, कठोर अंतःकरणाला सुधारणूकीसाठी फटकारणे, मृदू विवेकाला सांत्वन देणे किंवा नम्र विश्वासाला प्रोत्साहन देणे, असा आहे. आत्म्याद्वारे राखून ठेवण्याच्या वचनाचे मानवी साधन बनत विश्वासात असलेल्या आपल्या बंधूसोबत किंवा बहिणीसोबत उभे राहण्याचे हे पाचारण आहे.
दुसऱ्या शब्दांत, संघर्ष करणाऱ्या बंधूला आपण असे म्हणू शकतो की, देवाची वाणी ही तुझ्या भावाच्या वाणीत ऐक! आणि मंडळीच्या संपूर्ण देहासाठी, काही जणांविषयी दक्ष राहा, आपल्या भावाच्या अंतःकरणाला कठोरता आणि अविश्वासूपणापासून वाचवून त्यांना—कोमल आणि विश्वासू बनवण्यासाठी त्यांच्या कानांसाठी देवाची वाणी व्हा.
एकमेकांना उत्तेजित करा
याच बरोबर असाच दुसरा शास्त्रभाग इब्री 10:24-25 हा ह्या विषयावर अधिक प्रकाश टाकतो, जो आता अधिक सकारात्मक गोष्टींना दाखवतो:
आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा.
आता, ज्या प्रकारे इब्री 3 मध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला सकारात्मक बोधपर वचनांच्या जबाबदारीविषयी लक्ष द्यायला सांगितले आहे, त्याच प्रकारे इब्री 10 मध्ये आपल्याला “आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा” ह्याकडे दुर्लक्ष करण्याविरुद्ध ही चेतावणी देण्यात आली आहे. इथे पुन्हा इब्री 3 मधील शब्द कोणी (जे कठीण होऊन जाणारे होते), ज्यांकडे संपूर्ण देह (मंडळी) ही एकत्रितपणे लक्ष ठेवते आणि वचनाच्या सेवेद्वारे (“एकमेकांना उत्तेजन देत”) लक्ष ठेवते.
इब्री लोकांस पत्र 10 मध्ये “एकमेकांना कसे उत्तेजित करावे याविषयी विचार करा”—किंवा शब्दशः घ्यायचे ठरले तर, “प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ” हे लक्षवेधक आहे. मूळ भाषेत ‘कसे’ हा शब्द आढळून येत नाही. तर त्याऐवजी, संतांच्या ध्यानाचा मुख्य उद्देश किंवा केंद्रबिंदू हा “एकमेकांकडे” असा आहे. एकमेकांकडे लक्ष द्या….हा एक वैयक्तिक स्वरूपाचा आदेश आहे आणि हे सांगतांना असे गृहीत धरले गेले आहे की हे संत एकमेकांना खास आणि सखोल रीतीने ओळखतात—जे फक्त मनुष्यांना किंवा सर्वसाधारणपणे ख्रिस्ती असणाऱ्या लोकांनाच प्रेरणा देण्यासाठी नव्हे तर खासकरून संघर्ष करणाऱ्या संतांमध्ये प्रेम आणि चांगली कामे जागृत करण्यासाठी वचनाच्या सेवेच्या मुख्य भूमिकेवर बारकाईने विचार करण्यास पुरेसे आहे.
येथे एका संताद्वारे दुसऱ्या संतासाठी ख्रिस्ती प्रेम आणि आचार-व्यवहार जागृत करण्यासाठी किंवा त्याला उत्तेजित करण्यासाठी सहाय्य करणारी वचने ही संकल्पित केली गेली आहेत. असे उत्तेजन देणे हे चांगले आहे, वाईट नाही—क्रोधासाठी नव्हे तर प्रेम करण्यासाठी आहे; वाईटासाठी नव्हे तर भल्यासाठी आहे; कटुतेसाठी नव्हे तर आनंदासाठी आहे. आणि आपल्या बंधूसाठी देवाची वाणी होणे म्हणजे केवळ शास्त्रवचनांचा रट्टाच मारणे नव्हे, तर आपल्या भावाला ठीक रीतीने समजून घेणे आहे आणि ह्याच्या विपरीत त्याच्यासाठी देवाची वाणी म्हणून त्याला आपल्या स्वतःच्या शब्दात चुकीच्या शास्त्रवचनांची माहिती न देणे आहे, तर कृपेचे साधन म्हणून हे आपल्या भावाला सांगणे आहे, त्याला प्रेम आणि चांगल्या कृतींसाठी उत्तेजन देणे हे आहे.
आणि इब्री लोकांस पत्र 10:24 मध्ये उल्लेखित सभा, एका ठिकाणी गोळा होणे (एकत्र येणे) ही काही अर्थशून्य बाब नाही. सामुहिक उपासना ही ख्रिस्ती जीवनात कृपेचे एकमेव महत्त्वाची साधने आहेत, ज्यात आपण तीन आवश्यक घटक हे एकत्रित करतो: वचनाचे सुशिक्षण, प्रार्थना आणि सहभागिता. हे तीनही घटक एकत्र गोळा होण्याच्याद्वारे एकत्र येतात. साप्ताहिक स्तरावर, ख्रिस्ती जीवनासाठी कृपेची ही एकमेव साधने सर्वात महत्त्वाची आहेत.
आजचा दिवस आणि ‘तो दिवस’
ख्रिस्ती जीवनात प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो. आणि प्रत्येक रविवार हा सहभागीतेच्या सुसंगतेसह महत्त्वाचा असतो. स्वतःला आणि इतरांना विश्वासात टिकवून ठेवण्यासाठी अथक प्रयत्नांची नाही, तर नियमित देखभालीची गरज आहे. सतत दक्ष राहून, इतरांच्या आत्म्याची काळजी घेणे, हे काहींना विनाशाकडे जाण्यापासून वाचवते, आणि जस-जसा ख्रिस्ताचा तो दिवस जवळ येत असल्याचे आपल्याला दिसते, ख्रिस्ताच्या कृपेत ज्याविषयी आपण अपेक्षा करतो तसतसे हे “अधिक करावे”.
सहभागिता ही ख्रिस्ती जीवनात कृपेचे अपरिवर्तनीय साधन म्हणून आपल्याला दोन प्रकारचे अमूल्य आनंद देते: इतरांना सहाय्य करण्याऱ्या वचनांद्वारे देवाची कृपा ही प्राप्त करणे आणि आपल्या स्वतःच्या माध्यमातून इतरांना त्याची कृपा ही देणे. येशू ख्रिस्त केवळ आपण आपल्या स्वतःलाच “दृढ” करावे, जणू जे बंधू तो आम्हाला देते त्यांची आम्हाला गरज नाही, असे पाचारण देत नाही. तर आपण एकमेकांना खंबीरपणे दृढ राहण्यास आणि उन्नती करण्यास मदत करतो.शब्द फेलोशिप (सहभागिता) हा आमच्या मंडळीच्या इमारतीमधील खोलीचे नाव असो वा नसो, आम्ही ह्या वास्तविकतेला देवाच्या निरंतर कृपेचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून पकडून राहू आणि अलीकडील वर्षांच्या परीक्षांनंतरही कदाचित असे करणे हे अधिकच करत राहू.
सर्प हाताळणे आणि प्राचीन हस्तलेख
गोषवारा: मार्ककृत शुभवर्तमानाच्या शेवटी असलेले 16:9-20 ही वचने, यात असलेल्या बहुतेक ग्रीक हस्तलेखांमध्ये समाविष्ट
आहेत आणि मंडळीच्या इतिहासातील बहुसंख्य ख्रिस्ती विश्वास करणाऱ्यांनी ही वचने देवाची वचने म्हणून स्वीकारली आहेत. तरीसुद्धा, बाह्य आणि अंतर्गत दोन्ही ही पुरावे या विषयी सूचित करतात की मार्क ने कदाचित त्याचे शुभवर्तमान हे वचन 8 पर्यंत समाप्त केले असावे, तथापि असा निष्कर्ष हा असंगत वाटू शकतो. बाह्य पुराव्यांचे अवलोकन असे सूचित करते की, प्राचीन ग्रीक हस्तलेखामधून अशा प्रकारची दीर्घ समाप्ती ही वगळण्यात आली आहे आणि प्रारंभिक मुख्य साक्षीदार ही यास सुसंगत असल्याचे वाटत नाही. अंतर्गत स्वरूपाचे अवलोकन असे सूचित करते की, अशी ही थोडक्यात समाप्ती अधिक कठीण निष्कर्षाला प्रस्तुत करते आणि म्हणूनच, वाचण्यासाठी अधिक योग्य आहे असे वाटते. दोन्ही ही प्रकारे, अशी दीर्घ समाप्ती ही इतर शुभवर्तमांनासोबत विसंगत होत नाही, आणि जरी हे प्रेरित शास्त्राप्रमाणे नसले तरी ही विश्वासी उपयुक्त भाष्य म्हणून याचे वाचन करू शकतात.
पाळक आणि सुवार्तिकांसाठी आम्ही चालवत असलेल्या फीचर आर्टिकल (feature article) या मालिकेसाठी आम्ही, पीटर ऑर, जे मूर कॉलेजमधील नव्या कराराचे व्याख्याते आहेत, यांना मार्कच्या शुभवर्तमानाच्या मूळ समाप्तीविषयीचे पुरावे सादर करण्यास सांगितले.
2015 च्या जुलैमध्ये, 60 वर्षीय जॉन डेव्हिड ब्रॉक जेन्सन, जे केंटकी येथील मॉसी सिम्पसन पेंटेकोस्टल मंडळीच्या भक्तीत उपस्थित होते. त्या दिवशी सकाळी भक्तीदरम्यान, ब्रॉक ह्यांनी एक विषारी नाग हातात घेतला जो नंतर त्यांना चावला. त्यांनी वैद्यकीय उपचार नाकारले आणि नंतर सापाच्या विषामुळे त्यांचा मृत्यू झाला. अशा प्रकारच्या परिस्थितीत मरण पावलेला ब्रॉक हा एकमेव व्यक्ती नव्हता. जेमी कूट्स, जे एक पाळक आणि रिॲलिटी-टीव्ही स्टार होते, या घटनेच्या एका वर्षापूर्वी अशाच प्रकारे भक्तीदरम्यान सापाला हाताळत होते, परिणामी ते ही साप चावल्याने मरण पावले.
ही अशा प्रकारची कृती ही मार्क 16:18 च्या एका विशिष्ट व्याख्येवरून होते, जिथे येशू हे अभिवचन देतो की जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते, “सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही.” अशा प्रकारे साप हाताळणे (जे मुख्यतः अमेरिकेच्या ॲपलाचियन प्रदेशातील पेन्टेकोस्टल मंडळीमध्ये आढळते) हा मार्क 16:18 चा एक अतिशय असामान्य अनुप्रयोग आहे. या शास्त्राला वाचन करणारे बहुतेक लोक याला रूपकात्मक रीतीने समजतात किंवा त्याचा संबंध अशा परिस्थितीशी जोडतात जिच्यात देव हा चमत्कारिकरित्या सापाने चावलेल्या एखाद्या व्यक्तीचे रक्षण करतो, जसे तो प्रेषितांची कृत्ये 28:3-5 मध्ये पौलाविषयी करतो.
अशा या दुःखद कथा मार्कच्या शुभवर्तमानाच्या समाप्तीविषयी वादविवादाला उपस्थित करतात. मार्क 16:9-20 या शास्त्र भागाला ESV पवित्र शास्त्रा प्रमाणे जवळजवळ प्रत्येक इंग्रजी पवित्र शास्त्र हे चौकोनी समासात टिपण देत दर्शवतात की: “काही प्राचीन हस्तलेखांमध्ये 16:9-20 हा भाग सापडत नाही.” तर मग या शास्त्र परिच्छेदाविषयी आपण काय समजावे? याला आपण देवाचे वचन म्हणून पाहिले पाहिजे का? आणि मार्कच्या शुभवर्तमानाचा शेवट म्हणून याला वाचले आणि याचा प्रचार केला पाहिजे का? का मग याचा समावेश हा शास्त्रात नंतर केला गेला—संभवतः शुभवर्तमानाच्या अचानक होणाऱ्या समाप्तीचा शेवट दर्शविण्यासाठी—आणि म्हणून याला देवाचे वचन मानावे का?
मार्कच्या शुभवर्तमानाची दीर्घ समाप्ती
मार्कच्या शुभवर्तमानाच्या दीर्घ समाप्तीमध्ये (मार्क 16:9-20) मग्दालीया मरीया हिला येशू दिसल्याचे वर्णन केले गेले आहे, ज्याविषयी तिने इतर शिष्यांना देखील सांगितले होते, पण त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही (व.9-11). नंतर येशूचे दोन शिष्य हे, “बाहेरगावी चालले असताना” तो त्यांना दिसतो (जसे लूक 24:13 मध्ये शिष्य अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते त्याप्रमाणे); हे शिष्य इतरांना याविषयी सांगतात, जे पुन्हा यावर विश्वास ठेवत नाहीत (वचन 12-13). मग शेवटी येशू अकरा जणांसमोर प्रकट होतो आणि “त्यांचा अविश्वास व अंत:करणाचा कठीणपणा ह्यांविषयी त्यांना” दोष लावतो (वचन 14). त्यानंतर त्याने त्यांना सांगितले की, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा” (वचन 15), आणि सांगितले की, “जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल (व.१६). त्याचबरोबर, “विश्वास धरणार्यांबरोबर ही चिन्हे असत जातील: ते माझ्या नावाने भुते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही; त्यांनी दुखणाइतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.” (वचन 17-18).
शुभवर्तमानाच्या अशा दीर्घ समाप्तीत शेवटच्या वचनामध्ये येशू हा स्वर्गात गेल्याचे आणि देवाच्या उजव्या हाताला बसल्याचे वर्णन केले गेले आहे (व.19), आणि त्यानंतर प्रेषितांनी त्याच्या आज्ञेचे पालन करत, बाहेर जाऊन सर्वत्र प्रचार केला आणि, “प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणार्या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करत होता.” (व.20) दाखवले गेले आहे.
या अशा दीर्घ समाप्तीबद्दल खासकरून असामान्य असे काही ही नाही. फक्त काही वाक्प्रचारांवर विशेष जोर देण्यात आला आहे जे अनोखे आहेत, जसे की, “जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल” (व.16), जे विश्वास ठेवतात ते “नवनव्या भाषा बोलतील” हे अभिवचन (व.17), आणि अर्थातच “सर्प उचलतील” (व.18). तथापि, या सर्व वाक्प्रचारांवर दिल्या गेलेल्या जोराविषयी स्पष्टीकरण हे उर्वरित नवीन कराराशी त्यांच्या असलेल्या सुसंगतते द्वारे दाखविले जाऊ शकते.1 त्यामुळे, जरी हा एक महत्त्वाचा प्रश्न वाटत असला तरी तो कठीण असा नाही, हे आपण ओळखले पाहिजे. मार्कच्या शुभवर्तमानाच्या या अशा समाप्तीकडे आपण विश्वासाने कसे पाहतो, याचा विरोध करण्यासाठी कोणताही मोठा सिद्धांत हा आजपर्यंत अस्तित्वात नाही.
“मार्कच्या शुभवर्तमानाच्या या अशा समाप्तीकडे आपण विश्वासाने कसे पाहतो याचा विरोध करण्यासाठी कोणताही मोठा सिद्धांत हा आजपर्यंत अस्तित्वात नाही.”
खरं पहिल तर मार्कच्या शुभवर्तमानाच्या अशा या दीर्घ समाप्तीचा पुरावा हा खूपच विश्वसनीय आहे. याविषयी असलेल्या ग्रीक हस्तलेखांपैकी, फक्त दोनच लेख हे असे आहेत की जे मार्क 16:8 पर्यंत येऊन समाप्त होतात.2 त्यामुळे, जर आपण फक्त अशा प्रकारे हस्तलेखांचीच मोजदाद करायला लागलो, तर या दीर्घ समाप्तीच्या बाजूने असलेले पुरावे हे आपल्याला प्रबळ होतांना दिसतील. त्याच प्रकारे ऐतिहासिक दृष्ट्या ही असे दिसून येते की बहुसंख्य ख्रिस्ती विश्वास करणाऱ्यांनी मार्कच्या शुभवर्तमानाच्या अशा या दीर्घ समाप्तीचा स्वीकार हा आनंदानेच केला आहे. त्यामुळे मार्कच्या शुभवर्तमानाच्या 16:9-20 या दीर्घ समाप्तीला सत्य मानून घेणे हे सहज आणि सर्वोत्तम आहे असे आपल्याला कळून येईल.
पण याचबरोबर, या शास्त्र भागाची लहान समाप्ती याविषयी ही पुरावा हा देखील पटणारा आहे.
प्राचीन हस्तलेख
असा युक्तिवाद केला जातो की सर्वात प्राचीन जतन केलेले दोन हस्तलेख हे लहान समाप्तीविषयी दुजोरा देतात म्हणून हेच बरोबर आहे, या प्रकरणात एवढेच मानने हे मुख्य कारण नाही. खरे पहिले असता नवीन कराराविषयी उपलब्ध असलेले सर्वात प्राचीन असे जतन केलेले सायनाइटिकस आणि व्हॅटिकनस हे प्राचीन हस्तलेख जे चौथ्या शतकातील असून ते अजूनही शाबूत आहेत. आणि जेव्हा आपण या दोन हस्तलेखांची तुलना करतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की, हे हस्तलेख एकमेकांकडून काळानुसार हस्तांतरित होत असतांना त्यांच्यात लक्षणीय (पण मोठ्या प्रमाणात) छोटे-छोटे बदल झाले आहेत. म्हणजेच, दोन व्यक्तीं हे जेव्हां एकाच वेळी एकाच हस्तलेखाची दोन प्रत बनवत असतील तर तसे करत असतांना त्यात थोडाफार बदल होण्याच्या शक्यतेला नाकारले जाऊ शकत नाही, पण इतक्या मोठ्या प्रमाणात नाही. त्यामुळे, अशी शक्यता दिसून येते की, ज्यांनी या लेखांची प्रत बनवली आहे त्यांचे पूर्वज हे त्यांच्या सारखेच, “पूर्वीच्या पिढीचे असले पाहिजेत”. 3 आणि हे दोन्ही ही महत्त्वपूर्ण हस्तलेख मार्कच्या छोट्या समाप्तीची पुष्टी करतात या कारणामुळे, हे हस्तलेख मार्क 16:8 या लहान समाप्तीच्या पुराव्याकडे निर्देश करतात. त्यामुळेच, बहुधा, याविषयी सर्वात प्राचीन ग्रीक हस्तलेख हे मार्कच्या छोट्या समाप्तीचे पुरावे देतात.
“सर्वात प्राचीन ग्रीक हस्तलेख हे मार्कच्या लहान समाप्तीचे पुरावे देतात.”
तथापि, व्हॅटिकनस हा हस्तलेख याच्या उलट भक्कम पुरावा प्रदान करतो. या नव्या कराराच्या हस्तलेखात मार्कच्या शुभवर्तमानाची समाप्ती ही अद्वितीय आहे.4 या हस्तलेखाच्या अंतिम पृष्ठावर असलेल्या, तीन सामासांपैकी दुसरा समास हा 16:8 नंतर समासाच्या शेवटी थोडे अंतर देऊन समाप्त होतो. तसेच तिसऱ्या समासात, ज्याच्याविषयी आपल्याला अपेक्षा होती की इथून लूकाच्या शुभवर्तमानाची सुरवात ही असायला हवी होती, तो रिक्त आहे आणि लूकाचे शुभवर्तमान हे पुढील पृष्ठावर सुरू होते. व्हॅटिकनसच्या हस्तलेखाच्या नव्या कराराच्या या भागात असे हे स्थळ एकमेव आहे. उदाहरणार्थ, मत्तयाच्या शुभवर्तमानाची समाप्ती ही दुसऱ्या समासाच्या शीर्षस्थानी होते आणि त्या समासाचा उर्वरित भाग हा रिक्त ठेवला गेला आहे. तथापि, तिसरा समास हा रिक्त ठेवला गेलेला नाही—तर त्यात मार्कच्या शुभवर्तमानाची सुरुवात करण्यात आली आहे. तर मग, मार्कच्या शुभवर्तमानाच्या शेवटी समासात अशी अतिरिक्त जागा का सोडली गेली आहे? म्हणून ही बाब आपल्याला मार्कच्या दीर्घ समाप्तीच्या शक्यतेची जाणीव दर्शवू शकते. अर्थात, असा हा पुरावा उलटपक्षी देखील होऊ शकतो: लेखकाला कदाचित दीर्घ समाप्तीची जाणीव होती परंतु त्याने तसे न करण्याचे निवडले, हे त्याप्रमाणे आहे ज्याप्रमाणे आपल्या आधुनिक पवित्र शास्त्रामध्ये काहीतरी ठळकपणे स्पष्ट करण्यासाठी जागा सोडली जाते.5 वेगवेगळ्या प्रारंभिक भाषांतरांचे (जसे लॅटिन, सिरीयाक आणि इतर काही) परीक्षण केल्यावर आपल्याला मार्कच्या शुभवर्तमानाच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा पुरावा सापडतो. या दोन्हीं ही प्रकरणात, सर्वात जुना हस्तलेख हा दीर्घ समाप्तीला वगळतो आणि 16:8 पर्यंत येऊन समाप्त होते.6 अशा प्रकारे, भाषांतर केलेल्या प्रत्येक भाषेतील ओघ हा दीर्घ समाप्तीला जोडण्याविषयीचा आहे, जे सूचित करते की हा लेख त्याच्या मूळ स्वरूपात नाही.
युसेबियसचा अभिप्राय
प्रारंभीच्या ख्रिस्ती लेखकांचा दृष्टीकोन हा मार्कच्या शुभवर्तमानाच्या समाप्तीच्या बाबतीत हा कसा होता? या प्रश्नाचे उत्तर देणे हे जरा कठीण आहे, कारण की आपल्याकडे मार्कच्या बाबतीत प्रारंभाच्या उपदेशांचे किंवा भाष्यांचे बरेच दस्तऐवज हे उपलब्ध नाहीत. दुसऱ्या शतकातील लेखकांचे अवलोकन केल्यावर आपल्याला कळून येते की याविषयी आपण जास्त काही सांगू शकत नाही. इतिहासकार ओरिजेन हा देखील मार्कच्या दीर्घ समाप्तीचा उल्लेख करत नाही, तसेच तो मार्क विषयी फारसे भाष्य ही व्यक्त करत नाही. अलेक्झांड्रियाचा क्लेमेंट ही याच प्रमाणे दीर्घ समाप्तीचा संदर्भ देत नाही, तसेच तो याचा उल्लेख देखील करत नाही, उदाहरणार्थ मत्तयाच्या शुभवर्तमानाच्या शेवटच्या अध्याया प्रमाणे.7 म्हणून, मार्कच्या शुभवर्तमानाच्या बाबतीत दुसऱ्या शतकातील पुरावे हे संदिग्ध असल्याकारणामुळे—एक बाजू किंवा दुसरी बाजू मांडण्यास पुरेशी लिखित प्रतिबद्धता ही उपलब्ध नाही.
तथापि, जेव्हा आपण युसेबियस आणि चौथ्या शतकापर्यंत येऊन पोहोचतो, तेव्हा मार्क 16:8 या समाप्तीच्या बाजूने अधिक पुरावे दिसून येतात. मरिनसला लिहिलेल्या पत्रात युसेबियसने मत्तय आणि मार्क ह्यांच्यातील पुनरुत्थानाच्या वेळेच्या संदर्भात दिसत असलेल्या विरोधाभासाचा प्रश्न हाताळला आहे, मार्क 16:9 ला घेऊन तो दर्शवतो की, येशू हा आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रात:काळी उठला आणि मत्तय 28:1 नुसार तो शब्बाथा नंतर उठला असे सुचवतो. या विशिष्ट प्रश्नाच्या तपशिलांची आपल्याला काळजी करण्याची गरज नाही 8 परंतु ही चर्चा करत असतांना, युसेबियस हा एक संभाव्य उपाय सुचवतो की मार्कच्या शुभवर्तमानाचा शेवट हा वचन 8 इथे होतो, ज्यामुळे अडचण दूर होण्यास मदत होते:
या प्रकरणाचा खरा आधार हा परिच्छेद स्वतः आहे जो असे सांगतो की, जो ही कोणी याचा नकार करतो [म्हणजे, दिलेला हा परिच्छेद हा मूळ नाही म्हणून त्याला अशाप्रकारे चिन्हांकित करतो] तर हा परिच्छेदच स्वतःच असे प्रकट करतो की तो मार्कच्या सुवार्तेच्या सर्व हस्तलेखांच्या प्रतींमध्ये आढळत नाही: मार्कन लेखाच्या अचूक हस्तप्रती या त्या तरुणाच्या शब्दांनी समाप्त होतात ज्याला स्त्रियांनी पाहिले, आणि ज्याने त्यांना म्हटले: “चकित होऊ नका…. येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहात इ. . .” त्यानंतर लिहिलेले आहे: “मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या; कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या; त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या.” मार्कच्या शुभवर्तमानाच्या जवळजवळ सर्व प्रतींमध्ये वर्णन हे इथपर्यंत येऊन समाप्त होते. काही वेळेस काही प्रतींमध्ये जे काही वर्णन आढळते, खासकरून तेव्हां जेव्हां त्यात इतर सुवार्तिकांच्या पुराव्यास विरोधाभासी काहीतरी आहे आणि जे नंतर जोडले गेले असावे, जे सर्वच प्रतींमध्ये आढळत नाही.
तर मग, अशा स्थितीत एका व्यक्तीचे उत्तर असेल: याचा नकार करणे, आणि हा प्रश्न निरर्थक आहे म्हणून त्याला टाळून देणे. 9
युसेबियसचे हे विधान की, “जवळजवळ सर्व प्रती” या 16:8 पर्यंत येऊन समाप्त होतात, ही एक महत्त्वपूर्ण प्रारंभिक साक्ष आहे. तथापि, आम्हाला हे समजणे आवश्यक आहे की आपण मत्तय 28:1 ला समजून मार्क 16:9 च्या कठीणपणाविषयी निराकरण कसे करू शकतो, ज्याविषयी त्याने चर्चा केली आहे, जी सूचित करते की मार्क 16:9-20 हा परिच्छेद खरा असण्याच्या शक्यतेबाबत जाणून घ्यायला किमान तो तयार तरी होता. आणखी एक पुरावा हा युसेबियसच्या, नथिंग पैरेलल बिटवीन द गोस्पेल्स (noting parallels between the Gospels) या लेखातून येतो—ज्याला “कॅनन टेबल” म्हणून ही ओळखले जाते. यात, कॅनन 1 मध्ये असे दर्शविले गेले आहे की, सर्व चारही शुभवर्तमान हे एकमेकांशी सुसंगत आहेत, तर कॅनन 2 मध्ये असे दर्शविले गेले आहे की मत्तय, मार्क आणि लूक हे एकमेकांशी सुसंगत आहेत, आणि लक्षणीय गोष्ट म्हणजे, त्याने त्याच्या कॅनन टेबलमध्ये मार्क 16:9-20 ला समाविष्ट केलेले नाही. त्यामुळे संतुलितरित्या बघायचे ठरले तर हे दोन पुरावे (जरी ठामपणे नाही तरी ते), असे सूचित करतात की युसेबियसने या वचनांना खरे किंवा ते मूळ आहेत असे मानले नाही.
अंतर्गत पुरावा
आपल्याला बाह्य पुराव्यांबरोबरच (म्हणजे हे हस्तलेख काय स्पष्ट करतात), अंतर्गत पुराव्यांचा ही विचार करणे आवश्यक आहे. मजकूरावर केल्या जाणाऱ्या भाष्याच्या तत्त्वांपैकी एक म्हणजे, जो मजकूर दुसऱ्या मजकुराचे सर्वोत्तम स्पष्टीकरण देते त्याला प्राधान्य देणे आहे. याच्याशी संबंधित एक तत्त्व असे आहे की, कठीण मजकुरांना प्राधान्य देणे (तर्कविसंगत मजकुरांना नव्हे, ज्यात केवळ अधिक चुका असण्याची शक्यता ही दाट असते). उदाहरणार्थ, मार्क 10 मध्ये, एक माणूस येशूला विचारतो, “उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे?” येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्यावाचून कोणी उत्तम नाही” (मार्क 10:17-18). मत्तय 19 मधील अशाच समांतर मजकुरात, येशूचे उत्तर हे थोडे वेगळे आहे: “काय चांगले आहे असे मला का विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे…” (मत्तय 19:17). मत्तयमधील येशूची ही वचने सूचित करतात की, जो चांगला आहे, तो देव आहे, परंतु त्याची ही वचने मार्कमधील वचनांपेक्षा कमी स्पष्टोक्ती देतात.
तथापि, KJV भाषांतरामध्ये मत्तय 19:17 याप्रकारे आहे, “मला उत्तम का म्हणतोस? उत्तम असा एकच आहे, तो आहे, देव.” याठिकाणी, मत्तय आणि मार्क हे अधिक सहमत दिसून येतात. आणि हे इंग्रजी भाषांतरात फरक आहे म्हणून हे असे आहे, असे नाही तर; KJV भाषांतर हे वेगवेगळ्या हस्तलेखांचे अनुसरण करते म्हणून हा असा फरक आहे, ज्यामुळे मत्तय 19:17 हे वचन मार्क 10:18 शी सहमत आहे असे कळून येते.
जर आपण वेगवेगळ्या हस्तलेखांची गुणवत्ता बाजूला ठेवली, तर अंतर्गत पुराव्यांचा विचार करता कोणत्या हस्तलेखाचे वाचन हे अधिक कठीण आहे आणि असे ते कोणते वाचन होते ज्यामुळे दुसऱ्या वाचनाकडे वळण्याची शक्यता ही अधिक होती, याविषयी मूल्यांकन करणे समाविष्ट असते. थोडक्यात, मत्तय 19 ची नक्कल करणाऱ्या लेखकाने मार्क 10 मधील मजकुराशी अधिक मिळत्या-जुळत्या समांतरतेसाठी त्यात बदल केला असण्याची शक्यता ही अधिक आहे. के.जे.व्ही. (KJV) नसलेले भाषांतर हे समजण्यास कठीण आहे कारण यात मत्तय 19:17 आणि मार्क 10:18 मध्ये येशूने सांगितलेल्या गोष्टींची नोंद ही (किंचित) वेगळ्या तऱ्हेने केली गेली आहे. असे असल्यामुळे, नक्कल बनवणाऱ्या एका लेखकाने अशा प्रकारच्या कठीणपणामुळे कठीण भाषांतर हे का बदलले असेल, हे सहजपणे स्पष्ट होते, जेणेकरून दोन्ही ही मजकूरांमधील साम्यता ही स्पष्ट राहावी. किंवा मग हा बदल हेतुपुरस्पर सुद्धा केला गेला असावा, कदाचित मजकूर हा चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे असा लेखकाचा विचार असल्यामुळे सुद्धा. आणखीन, हा बदल जवळजवळ आपसूकच, अनावधानाने पण झाला असावा, कारण लेखकाला मार्कचा मजकूर हा चांगल्या रीतीने माहीत असेल म्हणून. कोणत्याही प्रकारे असो, सहज रीतीचे वाचन हे कठीण प्रकारच्या वाचनात का बदलले गेले यापेक्षा कठीण वाचन हे सहज वाचनात का बदलले गेले याला स्पष्ट करणे खूप सोपे आहे.
बरं मग, मार्कच्या शुभवर्तमानाला ही तत्त्वे कशी लागू होतात? तर, कठीण वाचन हे ते वाचन आहे जे मार्क 16:8 पर्यंत येऊन समाप्त होते. वचन 7 मध्ये, देवदूत कबरेवर आलेल्या स्त्रियांना आदेश देतो की, “तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे. त्याने तुम्हांला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. आणि पुढील वचनात, “मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या; कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या; त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या.” (वचन 8). किमान म्हणायचे ठरले तर ही अचानक झालेली समाप्ती आहे! जिच्यात येशूच्या पुनरुत्थानाचे कुठलेही वर्णन मिळून येत नाही. त्या स्त्रियांनी शिष्यांना जाऊन सांगून त्या आदेशाचे पालन केले हे आपल्या वाचण्यात येत नाही. त्याऐवजी, त्या भयाने कापत आहेत आणि किमान वरवर बघायचे ठरले तर, त्यांनी अवज्ञा केली असेल असे भासते. म्हणून, जेव्हा आपण या दोन समाप्तींची तुलना करतो, तेव्हा आपण सहजपणे समजू शकतो की कोणते वाचन हे कठीण रीतीचे आहे: ते आहे 16:8 जे लहान, पण अचानक समाप्तीस जाणारे आहे. यावरून मार्कचे शुभवर्तमान हे असे का समाप्त होऊ शकत नाही असे जे लेखकाला का वाटले असेल, याला समजून घेणे सोपे आहे. कारण अशी ही लहान समाप्ती समजण्यास कठीण आहे आणि म्हणूनच, या दृष्टिकोनातून, हे अधिक शक्य आहे.
पुढे, जर आपण दीर्घ समाप्तीची सामग्री आणि शैली पाहिली तर, बाकीच्या शुभवर्तमानापेक्षा ती स्वरूपाने बरीच वेगळी दिसते (जरी अशा प्रकारच्या निर्णयामध्ये काही प्रमाणात विषयभाव असला तरी). यात शैलीत्मक फरक आहेत (उदा., apisteō आणि blaptō, सारखे शब्द, जे मार्कमध्ये इतरत्र कुठेच वापरले गेले नाहीत).10 पुढे, वचन 8 आणि 9 मधील संबंध हा क्लिष्ट स्वरूपाचा आहे: वचन 9 हे स्त्रियांकडून लगेच येशूकडे त्याचे कुठल्याही प्रकरे वर्णन न करतां, त्याचे/त्याने असे सांगत पुढे जातात.
तथापि, आपण हे देखील विचारले पाहिजे की अशी ही दीर्घ समाप्ती आली तरी कोठून. मार्क 10 आणि मत्तय 19 च्या आपल्या उदाहरणाप्रमाणे, जर हा बदल असेल तर, कदाचित हा बदल दुसऱ्या मजकुराच्या माहितीमुळे अनावधानाने होऊ शकत नाही. नाही! कारण काहीही असो, दीर्घ समाप्ती (मी युक्तिवाद केल्याप्रमाणे ती मूळ नसल्यास) ती नंतरच्या कालखंडात जोडली गेलेली आहे. काहींनी असेही सुचवले आहे की अशी ही दीर्घ समाप्ती मार्कने एका वेगळ्या कारणासाठी केलेली असावी, जी त्याने किंवा त्याच्या अनुयायांनी नंतर त्याच्या शुभवर्तमानात जोडली असेल.
सुरुवातीचा शेवट
जर आपण मार्क 16:8 ला जर स्त्रिया, “बाहेर निघून कबरेपासून पळाल्या; कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या; त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या.” (16:8).11 अशा रीतीने समाप्ती म्हणून स्वीकारले, तर या पुस्तकात एक चरमोत्कर्ष नाही असे वाटेल, तथापि, या ग्रंथाची “शुभवर्तमानाचा प्रारंभ” (1:1) ही ओळख ही त्याच्या अचानक होणाऱ्या समाप्तशी जुळते. मार्क या शुभवर्तमानाला आधीच ज्ञात असलेल्या म्हणजे ज्या सुवार्तेला लोकांद्वारे आधीच सांगितले गेले आहे, त्या संदर्भाला अनुसरून लिहितो, स्त्रियांप्रमाणे नाही ज्या भीतीमुळे पळून गेल्या होत्या. त्याचे वाचक हे सुवार्तेच्या घोषणेत क्रियाशील राहतील असे गर्भित प्रोत्साहन देत देखील तो याला लिहितो. त्याच प्रकारे अशी ही अचानक होणारी समाप्ती ही, “मार्कच्या शुभवर्तमानाची केवळ सुरुवात आहे, कारण येशूची सुवार्ता ही त्यानंतर आपलीझालीआहे आणि ती हे शुभवर्तमान जिथे समाप्त होते तिथून पुढेआपल्याला न्यायची आहे.” या वस्तुस्थितीला प्रकट करते 12 तर मग, या दीर्घ समाप्तीविषयी आपण काय समजावे? हा शास्त्राचा खंड महत्वाचा आहे की नाही, आपण असा विचार करत नाही; आणि जरी हा लेख मूळ नाही, म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करत तो निरुपयोगी म्हणून त्याला बाजूला ठेवण्याची गरज नाही. हा उतारा आजही एक ऐतिहासिक दस्तऐवज असू शकतो; पुनरुत्थानानंतर जे काही घडले त्याचे हे खरे वृतांत असू शकते (जे इतर शुभवर्तमानातील कोणत्याही वृतान्ताशी विरोधाभास उत्पन्न करत नाही). त्यामुळे, आपण याला नवीन कराराचा संदर्भ अधिक फलदायीपणे समजून घेण्यासाठी वाचू शकतो.कदाचित आपण याला एक उपयुक्त ख्रिस्ती पुस्तक आणि पहिल्या शतकातील ऐतिहासिक स्त्रोताचे (जोसेफस प्रमाणे) संयोजन मानू शकतो. पण तरीसुद्धा, जर आपण हा उतारा मूळ नाही असे मानतो, तर मग हा देवाच्या वचनाचा भाग नाही आणि आपल्यासाठी याला मंडळीच्या आराधनेत पवित्र शास्त्राप्रमाणे वाचणे किंवा प्रचार करणे हे योग्य ठरणार नाही.
लेखक
डेव्हिड मॅथिस