ख्रिस्ती वाचकांसाठी एक आदर्श मार्गदर्शिका

स्टेफन चार्नोक यांच्या द्वारे लिहिलेले द एक्सिस्टेंस एंड ऐट्रिब्यूट्स ऑफ़ गॉड (The Existence and Attributes of God) हे पुस्तक प्युरिटन युगातील उत्कृष्ट लिखाणापैकी एक आहे. ईश्वर शास्त्रज्ञानी दिग्गजांच्या लेखणीतून उदयास आलेले शेकडो सुप्रसिद्ध पुस्तके आणि उपदेश प्रबंधांचा विचार जर एखाद्या व्यक्तीने केला तर त्यानुसार हे लिखाण एक उत्कृष्ट असे लिखाण आहे. या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी करण्यात आले, दु:खाची गोष्ट ही आहे की हे पुस्तक पूर्ण होऊ शकले नाही, ज्यामध्ये चौदा उपदेश प्रबंधांना (डीस्कोर्सेस, Discourse, स्टेफन चार्नोक यांनी लिहिलेल्या लिखाणाला डीस्कोर्सेस, Discourse असे म्हणतात) अंतिम रूप दिले गेले असले, तरी यामध्ये अजूनही बरेच काही समाविष्ट करण्याची योजना होती.

हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून चार्नोक आणि त्यांच्या लिखाणाविषयी कौतुकाची कमतरता ही कमी झालेली नाही. ईश्वर शास्त्रज्ञानी आणि इतिहासकार एडमंड कॅलमी (1671-1732) हे चार्नोक यांच्या ख्यातीबद्दल असे बोलतात:

ते एक अतिशय लक्षणीय असे विद्वान होते, शिक्षणाच्या कोणत्याही भागाविषयी ते अपरिचित होते असे क्वचितच होईल. त्यांच्याकडे जुन्या आणि नवीन करारातील मूळ भाषांविषयी एक विलक्षण कौशल्य होते. या दृष्टीकोनातून त्यांची नैसर्गिक क्षमता ही उत्कृष्ट होती. त्यांची ठाम निर्णय शक्ती आणि एक चैतन्यशील कल्पनाशक्ती ही, ज्या दोघांचाही संयोग हा क्वचितच होतो. ते एक खूप प्रतिष्ठित असे देवभिरु व्यक्तिमत्व होते.

इरास्मस मिडलटन (1739-1805) यांनी त्यांना ख्रिस्ताच्या मंडळीमधील, “सखोल उलगडात्मक शैली असणारे, सुस्पष्टता ठेवणारे, ईश्वरी विद्येविषयी अचूकता असणारे” सर्वात महान पुरुषांपैकी एक असे संबोधले आहे. ते पुढे म्हणतात, “ते परमेश्वराचे अस्तित्व, गुणविशेष आणि त्याचा पुरवठा या अतुलनीय उपदेश प्रबंधांचे (डीस्कोर्सेस, Discourse) लेखक होते.”

अँग्लिकन भक्तीगीत-लेखक ऑगस्टस टोपलेडी (1740-1778) यांनी ही अशाच प्रकारे त्यांच्या उपदेश प्रबंधांच्या (डीस्कोर्सेस, Discourse)  महानतेवर टिप्पणी केली आहे: सुस्पष्टता आणि सखोलता; आध्यात्मिक उदात्तता आणि सुवार्तेविषयी साधेपणा; अफाट शिक्षण आणि त्याविषयी सुगमता, पण तरीही निर्विवाद तार्किकता; त्या सर्वात अमूल्य लिखाणाला मूर्त रूप देणारा, ज्याने पवित्र न्याय आणि मनुष्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेचा सन्मान केला.

जोएल बीक यांनी एकदा मला सांगितले होते की, परमेश्वराच्या सिद्धांताविषयी चार्नोक यांनी लिहिलेले हे लिखाण प्युरिटन युगातील उत्कृष्ट

असे लिखाण आहे जे प्रत्येकाने “वाचणे आवश्यकच” आहे आणि ते पुढे म्हणाले की देवाच्या चांगुलपणावरील (गॉड्स गुडनेस, God’s goodness) त्यांनी लिहिलेला उपदेश प्रबंध (डीस्कोर्सेस, Discourse) का “सोन्यासारखा बहुमूल्य” आहे आणि सर्व इंग्रजी साहित्यात अतुलनीय आहे. जेरी ब्रिजेस यांनी स्वतःला परमेश्वराच्या पवित्रतेविषयी लिहिलेल्या लिखाणाचे (डीस्कोर्सेस ऑन  गॉड्स होलीनेस, Discourse on God’s holiness) अंदाजे अर्धा डझनभर पाने वाचल्यावर, त्याच्या पवित्रतेने भारावून देवासमोर गुडघे टेकवले. आणि ज्या वेळेस ते परत उठले आणि पुन्हा वाचायला सुरुवात केली, तेव्हा काही पाने वाचल्यानंतर ते पुन्हा देवासमोर गुडघे टेकून बसले होते.

मी माझ्या उर्वरित आयुष्यासाठी फक्त दोन पुस्तकांना घेत, आनंदाने स्वतःला पवित्र शास्त्र आणि चार्नोक यांच्या उत्कृष्ट लिखाणासह देवाच्या ज्ञानात व्यस्त ठेवेन!

मंडळीच्या भवनात रांगेत बसलेल्या लोकांसाठी ईश्वर शास्त्रज्ञान

हे उपदेश प्रबंध (डीस्कोर्सेस, Discourse) मुख्यतः प्रचार संबंधी उद्देशांसाठी लिहिली गेली आहेत, हे कळल्यावर कदाचित काही वाचकांना आज आश्चर्य वाटेल. या दरम्यान जरी या उपदेशांमध्ये काही स्पष्ट संपादन हे केले गेले आहेत तरी, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आजच्या वाचकांसमोरील असलेली ही पृष्ठे त्याकाळी ज्या मंडळीत थॉमस वॉटसन आणि चार्नोक हे सोबत मिळून सेवा करत होते तिथल्या मंडळीच्या भवनाच्या रांगेमध्ये बसलेल्यांच्या ऐकण्यासाठी होती. (प्रसंगवश, त्या वेळी ब्रिटनमध्ये जिवंत असलेल्या दोन सर्वात प्रतिभाशाली ईश्वर शास्त्रज्ञानी यांना ऐकत असणाऱ्या लोकांविषयी असे पाहून हेवा वाटण्यापलीकडे दुसरे काहीच वाटत नाही.)

या लिखणाच्या कठीणपणाचा अर्थ असा होत नाही की ते सामान्य वाचकांच्या आवाक्या बाहेर आहे. किंबहुना, या लिखणाला एक प्रकारे उत्कृष्ट लिखाण बनवणारी गोष्ट म्हणजे, कठीण अशा परमेश्वराच्या सिद्धांताला (the doctrine of God) चार्नोक यांची अशा पद्धतीने लिहिण्याची क्षमता आहे जिची केवळ विद्वान आणि पाळकच नव्हे, तर सर्वसाधारण ख्रिस्ती लोकही प्रशंसा करू शकतील—आजच्या काळात, सरासरी ख्रिस्ती पुस्तकापेक्षा या पुस्तकाविषयी खूप अधिक लक्ष देण्याची आवश्यकता भासू शकते.

चौदा उपदेश प्रबंधांपैकी (डीस्कोर्सेस, Discourse) प्रत्येक उपदेश प्रबंधातएक सुप्रसिद्ध पवित्र शास्त्रातील वचनाचा शास्त्रोक्त उलगडा आहे. चार्नोक हे नेहमी प्रत्येक विषयाचा उलगडा करण्यासाठी, सामान्यत: त्याच विषयावरील इतर सुधारित शिकावणींना घेऊन स्पष्टीकरण करत असत (उदाहरणार्थ, देवाच्या अस्तित्वाच्या शिकवणीसाठी स्तोत्र 14:1). धर्मशास्त्रीय शिकवणींवरील प्रवचनांसाठी हा एक विशिष्ट दृष्टीकोन होता. याला वाचल्यावर एखाद्याला लगेच लक्षात येईल की, देव कोण आहे याविषयी चार्नोक यांना त्याच्या व्यावहारिक परिणामांची चिंता आहे, ज्याचाच अर्थ होतो की देवाच्या अस्तित्वावरील त्यांच्या लिखाणात नास्तिकवादाविषयी उत्तर देण्यासाठी यात एक मोठा भाग आहे.

सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात अधिकाधिक लोक हे देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेऊ लागले होते, त्या काळात देवाच्या अस्तित्वाच्या सिद्धांताविषयी असलेले मोठे धोके म्हणजे, पहिला, देवाच्या शास्त्रीय शिकवणीवर हल्ले आणि दुसरा म्हणजे, परमेश्वर हा सदैव अस्तित्वात आहे आणि तो आपले विचार आणि कृती यांना जाणतो हे समजून ही जीवन जगण्यास विफल होणे. चार्नोक यांचे हे लिखाण या समस्यांच्या व्याप्तीचे भेदक विश्लेषण आहे, परंतु ते आपल्या या अशा नास्तिकतेविषयी अनेक उपाय देखील सुचवतात.

ज्यावेळेस चार्नोक यांचे लिखाण हे देवाचे अस्तित्व आणि गुणविशेष या विषयांना स्पष्ट करतात, आपण असे समजू नये की ते ख्रिस्तावर लक्ष केंद्रित करत नाही. प्रत्येक गुणविशेष हा ख्रिस्ताशी कसा संबंधित आहे हे त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक धड्यात मुबलक प्रमाणात विखुरलेले आहे. खरे तर, दैवी गुणांच्या संबंधात ख्रिस्ताविषयी चार्नोकचे काही सर्वोत्तम विचार हे प्रत्येक उपदेश प्रबंधाच्या (डीस्कोर्सेस, Discourse) “लागूकरण” (“uses”) या विभागात आढळतात. हे एक साधे पण महत्त्वपूर्ण निरीक्षण आहे की, देवाच्या सिद्धांताच्या लागूकारणात ही आम्ही पाहतो की चार्नोक हे त्यांच्या उपदेश प्रबंधांना (डीस्कोर्सेस, Discourse) ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्त्वामध्ये मजबुतीने मांडतांना दिसतात.

कठीणपणा जो समजण्यास सहज आहे

या उपदेश प्रबंधांमधील (डीस्कोर्सेस, Discourse) “लागूकरण” (किंवा “सूचना”) हा भाग आपल्याला दाखवतो की देवाविषयी सैद्धांतिक शिकवण ही ख्रिस्ती जीवनासाठी किती व्यावहारिक आहे. यात त्यांच्या दिलेल्या लागूकरणाशिवाय, हे लिखाण एखाद्या सुंदर कारसारखे राहील जिला चालवायास चाके नाहीत. आज ही आपल्या काही प्रमाणात या कल्पनेने त्रास होतो की, एक ईश्वर ज्ञानशास्त्राचे पुस्तक (a theology book) हे फारसे व्यावहारिक नसते आणि तसेच एखादे व्यावहारिक पुस्तक हे फारसे ईश्वर ज्ञानशास्त्रीय सुद्धा नसावे. ही संकल्पना चार्नोकच्या लिखाणाने ध्वस्त केली आहे, जितके ते व्यावहारिक आहे तितकेच ते ईश्वर ज्ञानशास्त्रीय सुद्धा आहे.

“जर कॅल्वीन हे ‘सुस्पष्ट संक्षिप्तपणा’ साठी ओळखले जात असतील, तर मला वाटते की चार्नोक हे सुस्पष्ट सुविज्ञतेसाठी ओळखले गेले पाहिजे.”

जॉन ओवेन (1616-1683) आणि रिचर्ड बॅक्स्टर (1615-1691) या सारख्या काही अति लोकप्रिय प्युरिटन धर्मशास्त्रज्ञांनी समजण्यास अत्यंत क्लिष्ट असे ग्रंथ लिहिले. सतराव्या शतकातील इंग्रजी भाषिक धर्मशास्त्रज्ञांमध्ये त्यांचे शिक्षण कदाचित अतुलनीय होते. आणि जेव्हा तुम्ही त्या दोघांचे लिखाण वाचता, तेव्हा तुम्हाला कधीकधी “अनुवादका” ची गरज भासते—होय, त्यांचे जे लिखाण इंग्रजी भाषेत आहे त्यासाठी! पण चार्नेक यांच्या लिखाणाला “अनुवादकाची” आवश्यक नाही. त्यांचे लिखाण हे समजण्यास सोपे आणि स्पष्ट आहे आणि त्या इतर दोन पेक्षा त्यांची वाक्ये ही समजण्यास सहज आहेत. दुसऱ्या शब्दांत, जर यांपैकी कोणी जर ट्विटरवर असेल तर तो चार्नोक (आणि वॉटसन) राहील. जर कॅल्वीन हे ‘सुस्पष्ट संक्षिप्तपणा’ साठी ओळखले जात असतील, तर मला वाटते की चार्नोक यांना सुस्पष्ट सुविज्ञतेसाठी (सहज आणि सुयोग्य स्पष्टीकरणासाठी) ओळखले गेले पाहिजे.

चार्नोक यांनी त्यांच्या ज्ञानाला व्यावहारिक रूप देऊन वापरलेले वाक्प्रचाराचे सहज सुंदर प्रयोग हे मंडळीच्या भवनात बसलेल्या देवाच्या लोकांना आशीर्वादित करण्यासाठी होते. जितकी त्यांना नैसर्गिक जगताची विलक्षण माहिती होती त्यांची रूपके आणि उपमा देण्याची पद्धती ही तितकीच ख्रिस्तासारखी होती (“फुले कशी वाढतात याचा विचार करा,” लूक 12:27). ते त्यांच्या काळातील प्रसिद्ध उत्कृष्ट मनुष्य होते; आणि त्यांच्या लिखाणाच्या बहुतेक पानांवर दिसणारे रूपक, चित्रे आणि उपमा यांतून त्याचे वैद्यकीय प्रशिक्षण हे उजळते. त्याचबरोबर मानवी स्वभावाविषयीची त्यांची अंतर्दृष्टी ही त्यांच्या सुयोग्य स्पष्टीकरणाचे मुख्य बळ आहेत. म्हणून एखाद्याला समजून येते की चार्नोक यांना देवाविषयीच्या विद्वत्तेमुळे मानवी मनात आणि एवढेच नव्हे तर कृपेच्या स्थितीत असतांना ही आपल्याला वेठीस धरणाऱ्या सर्व पापी वैशिष्ठ्यांमुळे त्यांना याविषयी खोलवर डोकावणे हे शक्य झाले.

एका मोठ्या देवावर एक मोठे पुस्तक

चार्नोक यांनी लिहिलेले द एक्सिस्टेंस एंड ऐट्रिब्यूट्स ऑफ़ गॉड (The Existence and Attributes of God) हे पुस्तक आपण का वाचले पाहिजे? जसे वर सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की विसावे शतक हे देवाविषयीच्या सिद्धांतासाठी (doctrine of God) फारसे चांगले असे शतक नव्हते. आज ही ख्रिस्ती लोक हे देवाविषयी असणाऱ्या अपारंपरिक कल्पनांना सहज आणि हलक्या रीतीने घेतात, असे कदाचित अयोग्य किंवा अपुऱ्या शिक्षणामुळे होते. यासाठी उपाय योजनेची सुरवात ही प्रचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्यासपीठापासून सुरू होते, परंतु त्याचबरोबर यात आपला खाजगी आणि सामुहिक शास्त्र अभ्यास हा देखील समाविष्ट करावा लागतो.

“जसे आपण एका मोठ्या देवाबद्दल शिकतो तसे आपण एका मोठ्या जगात देखील प्रवेश करत आहोत.”

चार्नोक यांच्या उपदेश प्रबंधांच्या (डीस्कोर्सेस, Discourse) अलीकडील पुनर्मुद्रणामुळे, वेळेच्या कसोटीवर टिकून राहिलेल्या देवावरील सुयोग्य शिक्षणाच्या सिद्धांताला पाळक शिकू शकतात आणि वाचू शकतात, ज्यामुळे त्यांच्या स्वतःच्या उपदेशाला अधिक प्रकाश मिळेल. जे.आय. पॅकर यांनी एकदा मला सांगितले होते की मार्टिन लॉयड-जोन्स यांची सर्वोत्तम प्रशंसा म्हणजे त्यांनी “देव परमेश्वराला प्रचाराच्या व्यासपीठावरून गाजवले.” जेव्हा “डॉक्टर” प्रचार करत होते तेव्हा हे स्पष्ट होते की देव परमेश्वर हा त्याच्या सामर्थ्यात उपस्थित होता. जर पाळकगण हे देवाला प्रचाराच्या व्यासपीठावरून घोषित करू पाहतात, तर चार्नोक ज्या देवाबद्दल इतक्या उत्कृष्टपणे लिहितात त्याच देवाद्वारे जर ते आवेशी झालेले नसतील तर असे करणे हे शक्य होणार नाही.

याव्यतिरिक्त, एक पाळक म्हणून किंवा एक सामान्य व्यक्ती म्हणून देखील चार्नोक यांचे हे लिखाण वाचतांना, तुम्ही फक्त एकल ख्रिस्ती विचारवंत बनत नाही, तर तुम्ही ख्रिस्तीत्वाचे व्यापकतेचे वाचन करणारे बनतात. तुम्ही अशा विचारवंतांच्या (अगदी मूर्तिपूजक कवी आणि तत्त्वज्ञ यांच्या) विचारांचा सामना करत आहात ज्यांच्या विचारांचा व्याप हा अनेक शतके आणि परंपरेत आहेत. जसे आपण एका मोठ्या देवाबद्दल शिकतो तसे आपण एका मोठ्या जगात देखील प्रवेश करत आहोत.

1700 पेक्षा जास्त पानांचे असे हे लिखाण वाचणे ही एक मोठी उपलब्धी आहे, परंतु मला असे वाटते की जो ही कोणी विचारपूर्वक आणि प्रार्थनापूर्वक हे लिखाण वाचतो आणि समजतो तो पूर्णपणे बदलून जाईल. हे खरोखरच जीवनाचे परिवर्तन करणारे पुस्तक आहे. आणि जर तुम्ही पुस्तकाच्या पानांच्या संख्येने काहीसे घाबरून जाणार असाल तर कमीतकमी, देवाच्या चांगुलपणावरील लेखाला (Discourse on God’s goodness) वाचण्याचा विचार करा आणि देवासमोर, जो तुम्हाला दररोज विविध प्रकारे त्याच्या कृपेचा आस्वाद देतो त्याच्यासमोर विनम्र आणि कृतज्ञ म्हणून नम्रपणे गुडघे टेकायला तयार व्हा (ज्याकडे आपल्यापैकी कित्येकांनी दुर्लक्ष केले आहे).

केवळ मनालाच नव्हे तर देवाच्या लोकांची अंतःकरणे हे उत्तेजित करणाऱ्या देवाबाबतच्या अधिक दृढ, अधिक पवित्र शास्त्रासंबंधी आणि धर्मशास्त्रीयदृष्ट्या माहितीपूर्ण दृष्टिकोनासाठी आज मंडळीमधील तातडीची गरज पूर्ण करण्याच्या आशेने चार्नोक यांनी लिहिलेल्या या दोन खंडांचे संपादन करणे हे आनंददायक होते. माझ्या मते, गेल्या शेकडो वर्षांमध्ये लिहिली गेलेली काही पुस्तके ही आज मंडळीला खूप सहाय्यभूत ठरू शकतात, जसे की चार्नोक लिखित एक्सिस्टेंस एंड ऐट्रिब्यूट्स ऑफ़ गॉड (Existence and Attributes of God) हा उपदेश प्रबंध (Discourses), ज्याची कितीही प्रशंसा केली गेली तरी ती कमीच आहे.

लेखक

मार्क जोन्स

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *