मातृत्वाचा दीर्घकालीन प्रभाव
“तुम्हाला कधी हे आठवते का की तुमच्या आईने तुम्हाला कपडे घालायला मदत केली होती?”
या प्रश्नाची विचारणा ही माझ्या पत्नीकडून करण्यात आली जी दोन लहान मुलांची आई आहे, ज्यांना अजून त्यांचे कपडे स्वतः घालता येत नाहीत. मी माझ्या आयुष्याच्या त्या सुरुवातीच्या वर्षांची आठवण केली, हजारो वेळा मी पँट आणि शर्ट घातली आणि काढली असतील ज्याविषयी आता मला तसेच माझ्या पत्नीलाही आता आठवत नाही.
हा क्षण एक नम्र करणारा क्षण होता, जसे आम्ही आमच्या मुलांची कल्पना जर आजपासून तीस वर्षांनंतर केली, तर आम्हाला या रोजच्या नित्यक्रमांपैकी जवळजवळ काहीही आठवणार नाही. त्याच प्रकारे हा एक क्षण असा देखील होता— असे वाटते जो आजकाल वारंवार येतो—ज्याने मातृत्वाला नवीन आणि पवित्र असा प्रकाश दाखवला.
शलमोन (नीतिसूत्रे 14:1) मध्ये आम्हाला सांगतो की, “प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते.”—आणि घराची बांधणी करणे ज्याला मी शिकत आहे, हे सुंदर आणि विसरण्यासारखे दोन्ही ही आहे. हे अत्यावश्यक आहे आणि त्याचबरोबर अनेकदा दुर्लक्षित देखील असते. हे कार्य जगातील सर्वात महत्वाच्या कार्यांपैकी एक आहे आणि सर्वात सहज दुर्लक्षित केले जाणारे देखील आहे. मुलांना कपडे घालणे, मुलांना जेवू घालणे, मुलांना शिकवणे, मुलांना शिस्त लावणे—हे विटावर-वीट रचण्यासारखे आहे: वेदनादायक आणि कष्टदायक, संथ गतीने चालणारे आणि ऐहिक.
पण जर तुम्ही या सर्व गोष्टींसाठी नीतिमान पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या प्रारंभीच्या काळामध्ये डोकावले, तर तुम्हाला कळून येईल की बऱ्याचदा पँटमधून पायाला ओढताना एक आई दिसेल, जी धूळ चढलेल्या शास्त्रातून स्तोत्रांचे पठण करताना आणि अशा प्रकारच्या इतर दहा हजार छोट्या-छोट्या क्षणांमधून घर बांधताना दिसेल, ज्याच्या भिंती या दैवी ज्ञानाने चमकतात आणि ज्याचे मजले हे परमेश्वराच्या भयावर बांधलेले असतात.
दोन स्त्रिया, दोन घरे
अनेक बुद्धी साहित्याप्रमाणे नीतिसूत्राचे पुस्तक, जीवन जगण्याच्या दोन मार्गांचे वर्णन करते. आणि त्या दोन मार्गांच्या केंद्रस्थानी दोन स्त्रिया आणि दोन घरे आहेत: ज्ञान, ज्याला अलंकारिकरित्या स्त्री प्रमाणे दाखवले गेले आहे आणि “तिचे घर” (नीतिसूत्रे 9:1), आणि मूर्ख स्त्री आणि “तिचे घर” (नीतिसूत्रे 9:13-14). या दोन्ही ही स्त्रिया आता हाक मारतात (नीतिसूत्रे 9:3, 15); या दोघी जो कोणी भोळा आहे त्याला “तो इकडे वळो” म्हणून आमंत्रित करतात (नीतिसूत्रे 9:4 , 16). पण ते जे ज्ञानाच्या घरात असतात त्यांना जीवन मिळते (नीतिसूत्रे 9:6,11), पण मूर्खपणाचा दरवाजा हा मृत्यूकडे नेतो (नीतिसूत्रे 9:18).
आपण असे गृहीत धरू शकतो की या स्त्रिया रूपकात्मक दृष्ट्या सर्जनशील साहित्यिक साधने, दोन जीवन मार्गांचे मूर्त रूप यापेक्षा जास्त नाहीत. पण नीतिसूत्राचे पुस्तक हे आपल्याला यापेक्षा ही अधिक समजण्यासाठी आमंत्रित करते. प्रामुख्याने मुलांना उद्देशून लिहिलेल्या या पुस्तकात, वारंवार येणाऱ्या सर्वात मोठ्या धोक्यांपैकी म्हणजे एक ‘परस्त्री’ चे वर्णन केले गेले आहे, जी खऱ्या आयुष्यात भोळ्या मुलांना फसवून भुरळ पडणारी स्त्री आहे. (नीतिसूत्रे 7:5, 21). नीतिसूत्राचे पुस्तक तिला मूर्ख (वाचाळ व स्वच्छंदी) स्त्री म्हणून चित्रित करते (नीतिसूत्रे 7:11; 9:13) जी अनेक मुलांचा नाश करते (नीतिसूत्रे 7:26).
असे असले तरीही, या दरम्यान, ज्ञान जे जणू देह रुपात आहे, ज्याला एका देवभिरु पत्नीच्या स्वरुपात, जसे ती एका पुरुषाला सुंदर मुकुट घालते, दाखवले गेले आहे (नीतिसूत्रे 4:9), अशीच एक सद्गुणी पत्नी देखील आहे (नीतिसूत्रे 12:4). ज्याप्रमाणे, “…ज्याला मी (ज्ञान) प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते” (नीतिसूत्रे 8:35), त्याचप्रमाणे, “ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो, त्याला परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.” (नीतिसूत्रे 18:22). नीतिसूत्राचे पुस्तक अशा स्त्रीचे चित्रण करणाऱ्या कवितेने समाप्त होते, जिच्या तोंडातून न केवळ, “सुज्ञतेचे बोल निघतात” (नीतिसूत्रे 31:26) तर ती सद्गुणी पत्नीच्या रूपात ज्ञान आहे (नीतिसूत्रे 8:11 ; 31:10).
म्हणून यापूर्वी की एखाद्या पुरुषाला हे ज्ञान एक पत्नी म्हणून मिळावे, त्याला या ज्ञानाला एक आई म्हणून सुद्धा भेटावे लागेल.
सुज्ञानी आई
नीतिसूत्रे या पुस्तकाचा शेवट हा एक आई आपल्या मुलाला शिकवते असा होतो (नीतिसूत्रे 31:1). तथापि, नीतिसूत्रे 31 च्या खूप आधी, हे पुस्तक आपल्याला एक नीतिमान आई म्हणून एका स्त्रीच्या रुपात असणाऱ्या ज्ञानाचे एक मूर्त रूप पहायला शिकवते. नीतिसूत्रे 9:1 मधील (ज्ञानाच्या रुपात असणाऱ्या स्त्री बद्दल) आणि नीतिसूत्रे 14:1 मध्ये दाखवलेल्या (सुज्ञ आई बद्दल) साम्य लक्षात घ्या :
ज्ञानाने आपले घर बांधले आहे. (नीतिसूत्रे 9:1)
प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते. (नीतिसूत्रे 14:1)
“मातृत्वाच्या छोट्या-छोट्या क्षणांमध्ये बऱ्याचश्या गोष्टी या घडत असतात ज्या डोळ्यांनी दिसत नाही”.
मातृत्वाच्या छोट्या-छोट्या क्षणांमध्ये बऱ्याचश्या गोष्टी या घडत असतात, ज्या डोळ्यांनी दिसत नाही. एक अपरिपूर्ण पण देवभीरू स्त्री तिचे घर बनवते, ती तिच्या मुलांसाठी ज्ञानाचा पहिला चेहरा, पहिला आवाज, पहिला स्पर्श बनते. तिच्या दैनंदिन उपस्थितीद्वारे, मुले ही ज्ञान कसे दिसते आणि कसे वाटते हे शिकतात; तिच्या दैनंदिन शब्दांतून, मुले ज्ञानमय विनंती ऐकतात: “तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका….तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा” (नीतिसूत्रे 8:32; 9:6). नीतिसूत्राच्या पुस्तकात एक स्त्री, एक आई, ही जीवन आणि मृत्यू ह्यांच्या मार्गात, तिच्या मुलांसाठी असे शिक्षण देते, आणि अशी पुकारते आणि असे जीवन जगते की तिची मुले ही त्यामुळे परमेश्वराचे भय निवडतात, ज्ञानाला निवडतात, जीवनाला निवडतात. तिची पुकार मूर्ख स्त्री प्रमाणे (नीतिसूत्रे 9:13) मोठ्याने असू शकत नाही; ती बहुतांशी लोकांच्या नजरेआड असू शकते; तिचे कार्य हे कधी-कधी लहान मुलाच्या बुटाला बांधलेल्या लेसप्रमाणे किंवा पट्टीला बांधून विसरून गेल्यासारखे असू शकते. पण कालांतराने, तिचे घर हे ज्ञानाचे केंद्र बनते, ज्यात असे लेकरं घडवले जातात जे मुर्खपणाचा तिरस्कार करतात.
कुटुंबाचे हृदय
साहजिकच, जीवन आणि मृत्यूच्या या मार्गात एक पिता सुद्धा आहे. खरं तर, नीतिसूत्रे या पुस्तकामधील बरीचशी शिकवण ही थेट पित्याकडून त्याच्या मुलांना दिली गेली आहे. ज्ञान ज्याला स्त्रीची उपमा देण्यात आली आहे तिच्यासारखाच हा पिता देखील आपल्या मुलांना जीवन निवडण्यासाठी सूचना देतो आणि चेतावणी देतो आणि विनवणी करतो (नीतिसूत्रे 3:13-18), आणि तो संपूर्ण अध्याय 1-9 मध्ये कुटुंबाला सर्वप्रथम शिक्षण देणारा आणि उपदेशक (नीतिसूत्रे 1:8; 3:12) 4 :1 ; 6:20) म्हणून दिसून येतो. तरीही, नीतिसूत्राचे पुस्तक ज्ञानाला एक स्त्री म्हणून दर्शविते आणि नंतर तिला पत्नी आणि आईच्या स्वरुपात वास्तविक जीवनात मूर्त रूप देते. का?
निश्चितच या कुटुंबात पित्याचा प्रभाव हा अंशतः पण, जरी खोल आणि पायाभूत असला तरी, देवाने त्याला दिलेल्या विशिष्ट पाचारणामुळे मर्यादित देखील आहे. नीतिसूत्रे 31 मध्ये, पती आणि पिता हा घरापासून दूर, “वेशीत…बसला” आहे (नीतिसूत्रे 31:23), तर पत्नी आणि आई “आपल्या कुटुंबाच्या आचारविचारांकडे लक्ष देते” (नीतिसूत्रे 31:27).
हा पिता, निःसंशयपणे, कुटुंबात बराच वेळ घालवतो—आणि ही आई, जसं आपल्याला माहित आहे, बाजार-उद्योग करायला घाबरत नाही (नीतिसूत्रे 31:18 , 24). परंतु पती-पत्नीच्या या पूरक एकतेमध्ये, पित्याची दिवसभराची वेळ ही सामाजिक गोष्टीकडे अधिक आहे, तर आईची कुटुंबाविषयी अधिक. आणि म्हणूनच, ती घर-बनवणारी, घर-सजवणारी, घराची सुरक्षा करणारी या नात्याने, जरी तिचा नवरा हा कुटुंबात वेळ देण्यासाठी उपस्थित राहू शकत नाही, अशा अनेक तासांत ती ज्ञानाची मजबूत उपस्थिती आहे.
“दिवसेंदिवस—जेवणाच्या वेळी आणि झोपेच्या वेळी, चिडखोरपणात आणि अश्रू गाळत —ती ज्ञानाचे धडधडणारे हृदय आहे.”
ज्या कुटुंबांमध्ये आई ही कधी-कधी घराबाहेर काम करते, या संदर्भात हर्मन बाविंक यांचे निरीक्षण हे अजूनही खरे ठरते: “ती तिच्या सर्व मुलांसोबत पतीपेक्षा कितीतरी जास्त राहते आणि दुःखात तीच्या मुलांसाठी ती सांत्वन देणारी स्त्रोत, गरजेच्या वेळेस सल्ल्याची स्त्रोत, दिवसा आणि रात्री आश्रय आणि दुर्ग आहे.” खरंच, “जर पती हा जर कुटुंबाचा मस्तक असेल तर पत्नी ही कुटुंबाचे हृदय आहे” (द ख्रिश्चन फॅमिली, 95-96). दिवसेंदिवस—जेवणाच्या वेळी आणि झोपेच्या वेळी, चिडखोरपणात आणि आश्रू गाळत—ती ज्ञानाचे धडधडणारे हृदय आहे.
तर मग, एका आईचा आपल्या मुलांवर सखोल प्रभाव हा, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये छोटे-छोटे काम करून येतो, असे नाही, तर त्या गोष्टींत असलेल्या तीच्या विशिष्टपणामुळेच येतो. प्रत्येक जॅकेट ज्याची चैन ही आनंदाने लावली जाते, प्रत्येक न्याहारी जी प्रेमाने दिली जाते, झोपत असतांना देवाचे प्रत्येक वचन कुजबुजत, ती कुटुंबाच्या भिंतीत ज्ञानाची आणखी एक वीट रचते आणि तीच्या मुलांना तिच्या पावलावर पाऊल ठेवण्यास आणखी एक कारण देते.
जेव्हा तिची मुले वाढतात
“परमेश्वराचे भय बाळगणार्या” (नीतिसूत्रे 31:30) या आईमध्ये देवाने दिलेली ही देणगी माझ्या लहान लेकरांना अद्याप समजू शकलेली नाही. आज सकाळी त्यांच्या आईने त्यांची स्वच्छता ही अलगद रीतीने कशी केली किंवा तिने गुणगुणत देवाची स्तुती केली, हे संभवतः त्यांना आठवणार नाही. परंतु दिवसेंदिवस त्यांना आईच्या रुपात ज्ञानाचा स्पर्श जाणवत आहे आणि त्याचा आवाज ऐकू येत आहे. आणि देवाच्या इच्छेनुसार, जेव्हा ते तिला स्वतःसाठी (आणि ज्या ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व ती करते) तिला मिठीत घेण्यास शिकतात, तेव्हा निःसंशयपणे ज्ञानाने संगोपन झालेल्या मुलांसोबत त्यांचा ही आवाज मिसळेल:
तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात,
तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. (नीतिसूत्रे 31:28)
एक प्रशंसनीय नायक, जसे की नेहमीच देवाच्या राज्यासंदर्भात असते, हा आपल्या समाजाला अपेक्षित तसा नसतो: तो मोठा नसून, लहान असतो; तो सुप्रसिद्ध नसतो, तर अप्रसिद्ध असतो; चित्रपटांमध्ये दाखविल्या जाणाऱ्या पुरुषांशी लढाई करणारी महिला नसते, तर ती असते जी लहान मुलाच्या डोक्यावर टी-शर्ट घालत संघर्ष करते. ज्यावेळेस जे लपवलेले सर्व काही उघड होईल आणि प्रत्येक ज्ञानवान आईच्या विसरलेल्या परिश्रमांची घोषणा ही घराच्या छतावरून केली जाईल त्या दिवशी आपण उठू आणि तिला धन्य म्हणू. शलमोन आपल्याला सांगतो, “प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते,” आणि अशा स्त्री मध्ये आनंद करणे हेच आपले ज्ञान आहे.
लेखक
स्कॉट हबर्ड