लहान लेकरांच्या पालकांसाठी प्राथमिक मार्गदर्शिका
मी आणि माझी पत्नी ज्युली गेल्या 43 वर्षांपासून पालक आहोत. ह्या दरम्यान, देवाने त्याच्या कृपेने आम्हाला 6 मुले आणि 22 नातवंडे दिली आहेत, ज्यात आणखी एक येणार आहे (आमचं बाळ नाही तर, आणखी एक नातू!). जरी पालकत्वाविषयीच्या आमच्या अनुभवांविषयी आम्ही बऱ्याच वेळेस गोंधळलेलो होतो, तरी पालकपणाचा हा एक दांडगा अनुभव आहे.
मुलांचे संगोपन कसे करावे ह्याविषयी जेव्हा लोक आमचा सल्ला मागतात, जसे आमच्या मुलांनी ही अनेकदा केले आहे, तेव्हा त्याविषयी अगदी थोडक्यात उत्तर देणे हे कठीण होऊ शकते. पालकपण जरी अवघड असले, तरी ह्याविषयी काही सोपी उत्तरे देखील आहेत.
अर्थातच, ह्यासंदर्भात ती वचने महत्वाची आहेत जी देवाने आपल्याला दिली आहेत, जसे की प्रेषित पौलाद्वारे इफि. 6:4 मध्ये : “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” आणि त्याचप्रमाणे
कलस्सै 3:21 मध्ये : “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; आणाल तर ती खिन्न होतील.”
हे विशेष आहे की, ह्या दोन वचनांमध्ये पौलाने एक सर्वसाधारण चेतावणी दिली आहे: “आपल्या मुलांना चिडीस आणू नका.” त्यांना जेरीस आणू नका. त्यांच्यावर जास्त दडपण आणू नका. त्यांना निराश करू नका. पण हे सर्व करण्यापासून आपण स्वतःला कसे रोखू शकतो? मला आठवते की आमच्या पालकत्वाच्या सुरुवातीच्या वर्षांत, पालकत्वाच्या कोणत्याही समस्येला सोडविण्यासाठी आणखी नियम बनवणे हाच मार्ग आहे, असे मला बऱ्याचदा वाटायचे. पण दुर्दैवाने, माझ्या मुलांना चिडीस आणण्यासाठी हा प्रकार एक मुख्य मार्ग बनला. आणि हे विशेषतः तेव्हां अधिक उघड झाले जेव्हा मी प्रत्यक्षात बनवलेले नियम हे कोणते होते तेच विसरून गेलो.
आपल्या मुलांना चिडीस न आणण्याचा एक सुज्ञ मार्ग म्हणजे, देवपिता हा आपल्यासाठी काय आहे ह्याचा विचार करणे आहे. ह्या सर्व वर्षांत लहान मुलांचे दैनंदिन संगोपन हे बळजबरीने करण्याऐवजी, त्यांचे संगोपन हे देव पित्याच्या मनाप्रमाणे कसे करावे, ज्याविषयी तो आपल्याला पाचारण देतो, ह्याविषयी कमीतकमी तीन असे मार्ग आहेत ज्यांना मी आणि ज्युलीने ओळखले आहे.
लक्ष पुरवा
ह्या सतत धावणाऱ्या आणि लक्ष वेधून घेणाऱ्या स्पर्धात्मक युगात, मुलांकडे लक्ष देणे हे आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक आव्हानात्मक असू शकते.
विचलित करणारे मार्ग हे प्रभावी आणि सातत्य ठेवून असतात जसे की, न धुतलेली भांडी. न आवरलेले घर. मळके कपडे. मातीने माखलेली लेकरे. किराणा मालाची खरेदी. मित्रांसोबत वेळ. काळ-वेळ मर्यादा. एकमेकांना पाठवायचे संदेश. अर्धवट वाचलेली पुस्तके, मासिके आणि लेख. इंटरनेट ब्राउझिंग. सोशल मीडियाचे सततचे आकर्षण, मोबाईल मधील गेम्स आणि मालिकांविषयी असलेली सततची ओढ. आपल्या डोळ्यांदेखत असणाऱ्या लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे हे सोपे असते. जर आपल्याकडे करण्यासाठी काहीतरी “अधिक महत्त्वाचे” आहे तर रडणाऱ्या किंवा आपल्या शर्टला बोटाने खेचणाऱ्या मुलाकडे दुर्लक्ष करण्याची आपल्याकडे एक विलक्षण क्षमता आहे.
परंतु देव हा असा नाही. “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.” (स्तोत्र 32:8). जसा आपला प्रभू आपल्याला शिकवत असतो तसा तो आपल्यावर नजर ही ठेवत असतो. खरं तर, तो नेहमीच आपल्यावर लक्ष ठेऊन असतो: “पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात… त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे.” (स्तोत्र 33:18).
आपण देवाच्या दृष्टीआड कधीच होऊ शकत नाही. त्याचे लक्ष हे नेहमीच आपल्यावर लागलेले असते. ह्याच प्रकारे, आपल्या मुलांना ही हे कळणे आवश्यक असते की आपले लक्ष हे त्यांवर लागलेले असते. ह्याचाच अर्थ होतो की ते सांगत असलेल्या गोष्टी आपण धैर्यपूर्वक ऐकाव्यात. त्यांवर लक्ष केंद्रित करावे. आपल्या मुलांवर नजर ठेवणे. त्याबरोबर वेळ घालवणे. म्हणजेच अनेक गोष्टींचा नकार करणे होय. जसे की टीव्ही बंद करणे किंवा टीव्हीचा किंवा संगीताचा आवाज कमी करणे. तुमचा संगणक बंद करणे. तुमचा फोन वापरणे बंद करणे.
नक्कीच, मुलांना ज्यावेळेस मोठी माणसे ही बोलत असतात त्यात व्यत्यय आणू नये आणि इतरांच्या वार्तालापाविषयी आदर करण्यास शिकवले गेले पाहिजे. परंतु अनेकदा आपण आपल्या मुलांना खऱ्या अर्थाने जाणून न घेता किंवा त्यांना समजून न घेता त्यांचे संगोपन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्याविषयी ज्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतात त्यासंदर्भात आपण त्यांना अडथळा आणणारे, उपद्रव करणारे किंवा उच्छाद करणारे असे समजू शकतो.
पण आपल्या मुलांचे संगोपन हे देवाच्या गौरवासाठीच करावे हेच आपल्याला साध्य करायचे आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला त्यांच्याकडे लक्ष हे दिलेच पाहिजे.
प्रेम करा
आपल्या लहान मुलांना फक्त एवढेच माहित नसावे की आपण त्यांच्यावर लक्ष ठेवतो, तर आपण त्यांच्यावर प्रेम देखील करतो हे देखील त्यांना माहित असावे. ते आपल्या प्रेमाला प्रतिसाद देण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठीच निर्माण झाले आहेत.
जे. सी. रायल हे त्यांच्या, द ड्यूटिस ऑफ़ पेरेंट्स (The Duties of Parents) ह्या पुस्तकाद्वारे आम्हाला आठवण करून देतात की,
प्रेम हा तुमच्या सर्व वर्तनाचा मौल्यवान भाग असला पाहिजे. दयाळूपणा, नम्रता, सहनशीलता, संयम, क्षमाशीलता, सहानुभूती, लहान लेकरांच्या समस्यांना सामोरे जाण्याची तयारी, लहान लेकरांच्या आनंदात भाग घेण्याची तयारी—हे ते भाग आहेत ज्याद्वारे मुलाला सहजपणे वागवले जाऊ शकते—जर तुम्हाला त्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचायचे असेल तर त्यासाठी ह्या सुगावांचे अनुसरण हे केले गेले पाहिजे. (11)
देवाच्या त्याच्या लोकांबद्दलच्या प्रेमाविषयी विचार करा—असे प्रेम जे आपण आपल्या मुलांवर करू इच्छितो:
मीच एफ्राइमाला चालायला शिकवले, मी त्यांना आपल्या कवेत वागवले आणि मी त्यांना बरे केले, पण ते त्यांना ठाऊक नाही. मानवी बंधनांनी, प्रेमरज्जूंनी, मी त्यांना ओढले; बैलाच्या गळ्यातले जोते सैल करणार्यासारखा मी त्यांना झालो; त्यांना मी ममतेने खाऊ घातले. (होशे 11:3-4)
परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. (स्तोत्र 103:8)
प्रेमाची सुरुवात ही हृदयापासून होते, आणि त्याचा परिणाम हा शारीरिक संपर्कात होतो: जसे हात पकडणे, स्पर्श करणे, आलिंगन देणे, चुंबन घेणे, मिठी मारणे—आणि खास करून मुलांविषयी सांगायचे ठरले तर, कुस्ती खेळणे.
लेकरांच्या उर्मटपणामुळे आणि उघडपणे केलेल्या अवाज्ञेमुळे तसेच त्यांच्या स्वार्थीपणामुळे आणि उलटून उद्धट बोलण्यामुळे ज्या वेळेस आपल्याला त्यांना “धडा शिकवायचा असतो” त्यावेळेस त्यांसाठी असलेले आपले प्रेम हे आपण सहजपणे काही काळ रोखून ठेऊ शकतो. आणि ह्यामुळे लेकरांप्रत असलेली आपली प्रतिक्रिया ही थोडकी आणि कठोर बनून जाते. आणि अशा वेळेस आम्ही ज्या प्रकारे त्यांच्याशी वर्तणूक करतो किंवा त्यांच्याशी संवाद साधतो त्याबद्दल काहीही प्रेमळ किंवा आकर्षक अस उरत नाही.
“हा देवाचा दयाळूपणा आहे, त्याची कठोरता नाही, जो आपल्याला पश्चात्तापाकडे घेऊन जातो. आमच्या मुलांबाबतही हेच खरे होईल.”
आपल्याला कितीही चिडचिडपण, निराशामय, वेदनामय, गैरसोईचे किंवा वाईट वाटत असले तरी, देवाने आपल्या पुत्राच्या माध्यमातून आपल्यासाठी जे प्रेम दाखवले आहे ते आपण गमावू इच्छित नाही. असे प्रेम दाखवण्याचा अर्थ असा होत नाही की आपण काही वेळेस स्पष्टपणे, ठामपणे किंवा अगदी कठोरपणे बोलत नाही. आमची इच्छा असते की असे काही मार्ग आहेत जे आमच्या मुलांनी समजून घ्यावेत, आमची इच्छा असते की त्यांनी पापे करू नयेत तसेच आमची इच्छा असते की त्यांनी धोक्यांपासून पळ काढावा.
परंतु बऱ्याचदा, आपला राग हा आपल्याला शहाणपणा आणि प्रेमाऐवजी चालवतो. पौल आपल्याला रोम 2:4 मध्ये आठवण करून देतो की हा देवाचा दयाळूपणा आहे, त्याची कठोरता नाही, जो आपल्याला पश्चात्तापाकडे घेऊन जातो. आपल्या मुलांबाबतही हेच खरे होईल. जेव्हा देवाची लेकरे ही आज्ञा मोडतात तेव्हा देव त्यांच्यापासून आपले प्रेम काढून घेत नाही. आम्ही हे असे करता कामा नये.
अधिकार
मुलांनी त्यांच्या पालकांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत ह्याबद्दल पवित्र शास्त्र अस्पष्ट नाही.
माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस. (नीतिसूत्रे 6:20)
मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा; हे प्रभूला संतोषकारक आहे. (कलस्सै 3:20)
“लक्ष देणे आणि प्रेम करणे ह्यांच्या संयोगाने जो अधिकार येतो, तो खासकरून आपल्या मुलांसाठी त्यांच्या प्रारंभीच्या काळात महत्त्वपूर्ण असतो.”
परंतु एका पालकपणाच्या अधिकाराला मागणी करणे, दमदाटी करणे, धूर्तता, नामुष्की करणे, उपहास करणे, शिवीगाळ करणे, हाकलून लावणे, कमी लेखणे, दमन करणे, वर्चस्व निर्माण करणे किंवा अंतर निर्माण करणे, असे समजून गोंधळून जाऊ नये. तो कधीही कठोर किंवा क्रूर किंवा स्वार्थ किंवा सूडाने रुजलेला नसावा. अशा प्रकारचा अधिकार हा आपल्या मुलांना देवाकडे नेण्याऐवजी त्यांना त्याच्यापासून दूर नेतो. परंतु लक्ष देणे आणि प्रेम करणे ह्यांच्या संयोगाने जो अधिकार येतो, तो खासकरून आपल्या मुलांसाठी त्यांच्या प्रारंभीच्या काळात महत्त्वपूर्ण असतो.
आम्ही प्रौढ आहोत म्हणून आम्ही आमच्या मुलांवर अधिकार वापरत नाही तर आम्ही ह्यासाठी वापरतो की त्यांना देवाच्या अधिकाराकडे निर्देशित करावे. आपल्यावरची त्याची सत्ता ही परिपूर्ण आणि निरपेक्ष आहे; आपली अशी आशा नसते. म्हणून, आपण आपल्या अधिकाराचा वापर करत असताना, आपण आपल्या मुलांना देवाच्या आज्ञांचे सौंदर्य, त्यांची गरज आणि त्यांना पाळण्याचा आनंद सांगण्याचे मार्ग शोधावे. उदाहरणार्थ:
- देवाची आपल्याकडून काय इच्छा आहे आणि आपण आनंदाने त्याच्या आज्ञा का पाळाव्या याबद्दल त्यांच्याशी नियमितपणे बोला.
- नियोजित केलेल्या वेळी आणि दिवसभर मिळेल त्या वेळी उत्स्फूर्तपणे देवाच्या वचनांचा आढावा घ्या.
- देवाचे नियम आणि आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी ह्यात फरक समजावून सांगा.
- देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याचे परिणाम कळवा.
- ज्यावेळेस देवाच्या आज्ञा ह्या स्पष्टपणे ऐकल्या गेल्यास, समजल्या गेल्यास आणि त्यानंतर ही त्यांची अवज्ञा किंवा त्यांकडे दुर्लक्ष केल्यास योग्य ती शिस्त लावा.
- शांत, अशायुक्त आणि विश्वासाने भरलेल्या आत्म्याने शिस्त सातत्याने लावा.
देवभिरु अधिकार जे नेतृत्व करतात
अधिकाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते किंवा त्याचा गैरवापर केला जातो ह्या कारणामुळे, आपल्या मुलांच्या जीवनात अधिकार वापरणे हे इतके महत्त्वाचे का आहे, हे लक्षात ठेवणे देखील उपयुक्त आहे.
प्रथम, अधिकार हा देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्या मुलांना जीवन जगायला शिकवतो. “परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणार्यांना त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहेत.” (स्तोत्र 25:10). आपल्या मुलांनी खोटे बोलू नये, चोरी करू नये, इतरांना दुखवू नये किंवा त्यांचा अनादर करू नये केवळ हेच शिकवणे आपले प्राधान्य नाही—तर त्यांना कळवावे की ह्या देवाच्या आज्ञा आहेत. त्याचप्रमाणे, दयाळू असणे, सत्य जोपासणे, उदार असणे, दयाळू असणे आणि विश्वासू असणे हे गुणविशेष त्यांना केवळ चांगले नागरिक बनवत नाही—तर ते स्वर्गातील त्यांच्या पित्याला दर्शवितात हे त्यांना समजावे (इफि. 5:1).
दुसरे म्हणजे, देवाच्या आज्ञा तंतोतंत पाळण्यास आपली मुले ही असमर्थ आहेत, अधिकार ह्या तथ्याला दर्शवितो. पौल ट्रिप ह्यांनी म्हटल्याप्रमाणे , “पालकत्व हे फक्त वर्तणुकीवर नियंत्रण करण्याचे ध्येय नाही; तर हे एका हृदयाला वाचविण्याचे ध्येय आहे.” आपले कार्य हे आपल्या मुलांना पाप करण्यापासून रोखणे नाही (कारण की हे एक अशक्य कार्य आहे), तर त्यांना त्यांच्या पापाविषयी तारणकर्त्याच्या प्रकाशात त्यांनी काय करावे हे शिकवणे आहे.चांगलं करणे आणि चांगलं असणे तसेच आपली वर्तणूक आणि आपण कसे आहोत ह्यात फरक आहे. जस-जसा काळ लोटतो त्याप्रमाणे देवाचा अधिकार हा आपल्या मुलांचा स्वच्छंदीपणा, बंडखोरी, फसवणूक आणि स्वतःला तारण्याची त्यांची असमर्थता ह्यांना प्रकट करण्यासाठी आहे.
शेवटी, अधिकार म्हणजे आपल्या मुलांना तारणकर्त्याकडे निर्देशित करणे आहे, ज्याने त्याच्या पित्याची आज्ञा पूर्णपणे पाळली आणि आपण केलेल्या आज्ञाभंगाबद्दल त्याने देवाची शिक्षा स्वतःवर घेतली. आपल्या मुलांना स्वतःच्या आणि इतरांना होणाऱ्या नुकसानापासून रोखण्यासाठी पालकांची शिस्त ही आवश्यक आहे, परंतु अशा प्रकारे त्यांचे हृदय बदलू शकत नाही. ते निष्कलंक आहेत असे रेकॉर्ड ठेवून त्यांना आशा ही प्राप्त होऊ शकत नाही, तर ती आशा त्यांना येशूच्या निष्कलंकपणातून प्राप्त होते हे, हे त्यांना कळाले पाहिजे. आपली मुले ही बाहेरून कितीही चांगली दिसतात किंवा भासतात म्हणून त्यांना तारणकर्त्याची गरज नाही, असे नाही. त्याचप्रकारे आपली मुले ही बाहेरून इतकी वाईट आहेत की, ते तारणकर्त्याच्या सामर्थ्याच्या पलीकडे आहेत, असे ही नाही. पालकत्वाशी संबंधित अशा ह्या सर्व गोष्टींविषयी, आपल्या कोणत्याही योजना किंवा इतर कोणत्याही युक्त्या तसेच ह्याविषयी जी अशा आपण बाळगतो, अशाप्रकारे कधीच पूर्णत्वास येणार नाहीत. परंतु हा आपला स्वर्गीय पिताच आहे ज्याची नजर ही नेहमीच आपल्यावर असते, ज्याचे मन हे नेहमीच आपल्यावर लागलेले असते आणि असे करण्यात त्याला खूप आनंद होतो—आणि खासकरून, आपण आपल्या लहान मुलांचे पालक म्हणून, हे जाणून घेतल्यावर आपल्याला खूप सांत्वन मिळू शकते (स्तोत्र 121:7-8; स्तोत्र 103:17; फिलि. 2:13).
लेखक
बॉब कॉफ्लिन